Maharashtra News Live Update : पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही – देवेंद्र फडणवीस
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठवरले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येदेखील हे पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच सध्या कडाक्याची थंडी असून काही ठिकाणी पारा चांगलाच घसरलेला आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेय. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…