Maharashtra News Live Update : आर्वी गर्भपात प्रकरण : डॉ. कदमच्या घरात आढळली दागिन्यासह लाखोंची रक्कम 

| Updated on: Jan 23, 2022 | 12:02 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : आर्वी गर्भपात प्रकरण : डॉ. कदमच्या घरात आढळली दागिन्यासह लाखोंची रक्कम 
सांकेतिक फोटो

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. पाच राज्यांचा निवडणूक (Election) कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे देशपातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, माणिपूर या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना या महाराष्ट्रातील पक्षांनी गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठवरले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्येदेखील हे पक्ष आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहेत. तसेच सध्या कडाक्याची थंडी असताना वातावरणात बदल झाला आहे. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jan 2022 07:55 PM (IST)

    आर्वी गर्भपात प्रकरण : डॉ. कदमच्या घरात आढळली दागिन्यासह लाखोंची रक्कम 

    कदमच्या घरात आढळली लाखोची रक्कम आणि दागिने

    पोलिसांकडून रक्कम मोजण्याची प्रक्रिया सुरू

    मशिनच्या साहाय्याने मोजल्या जात आहेत नोटा

    बंद असलेल्या बेडरूमध्ये होती रक्कम

    आर्वी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र पाठवल्याची माहिती

  • 22 Jan 2022 07:35 PM (IST)

    मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँग्रेसच रोखू शकतं – पृथ्वीराज चव्हाण

    नाशिक : देशात सध्या पाच राज्याच्या निवडणुकीवरून (Five State Elections) राजकाण तापलंय. त्यात भाजपमध्ये होणाऱ्या बंडखोरीने आणखी खतपाणी घातलं आहे. अशातच काँग्रेसकडून (Congress) चारी बाजुंनी भाजपला (Bjp) घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींची हुकूमशाही वाटचाल आहे, त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो असे वक्तव्य केले आहे. देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचंय. मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झालेत, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे राजकीय आखाडा पुन्हा तापला आहे.

  • 22 Jan 2022 06:43 PM (IST)

    Mumbai fire : धक्कादायक! आगीत होरपळलेल्यांना तीन रुग्णालयांनी उपचार नाकारले! महापौरांचे चौकशीचे आदेश

    मुंबईत आज लागलेल्या आगीत (Mumbai fire) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक गवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला (Kamla building Fire) इमारतीला ही आग लागली होती. या आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori pednekar) यांनी दिली आहे. मसिना, व्होकहार्ड, रिलायन्स या रुग्णालयांनी उपचार नाकारले अशी नावंही किशोरी पडणेकर यांनी सांगितली आहेत. या रुग्णलयांनी अशा आणिबाणीच्या वेळेला उपचार का नाकारले? याबाबत चौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असेही महापौर म्हणाल्या आहेत.

  • 22 Jan 2022 05:56 PM (IST)

    मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

    दक्षिण मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

    अनपेक्षित पावसानं वातावरणात गारवा

    कमाल तापमानात घट

  • 22 Jan 2022 04:45 PM (IST)

    गोव्यातील काँग्रेस उमेदवारांनी घेतली पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची  शपथ

    गोव्यातील काँग्रेस उमेदवारांनी घेतली पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची  शपथ

    निवडणुकीनंतर पक्षांतर करणार नसल्याची शपथ

    देवी महालक्ष्मी आणि बांबोळीतील क्रॉससमोर उमेदवारांनी घेतली शपथ

  • 22 Jan 2022 04:40 PM (IST)

    झोपडपट्ट्यांच्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड आक्रमक

    ठाणे : ठाण्यातल्या झोपडपट्ट्यांवरून मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच आक्रमक झाले आहेत. पन्नास वर्षे राहिलेल्या माणसाला घर (House) खाली करायला सांगता हे योग्य नाही. रेल्वे विस्तारीकरण होत असते तर मान्य होते मात्र केंद्र सरकारच्या (Central Government) जागेवर असलेल्या जागा खाली करायला सांगितले जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यानी केंद्र सरकारवर केला आहे. तसेच कळव्यात अशाच पद्धतीने घर पाडण्यात येणार होती ती आम्ही पाडू दिली नाहीक आज त्या झोपड्या तशाच आहेत, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. कळवा आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात झोपटपट्टी आहे. मंत्री जितेंद्र आव्हाडही विधानसभेत मुंब्र्याचे प्रतिनिधीत्व करतात, त्यामुळे तिथल्या घरांवरून जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • 22 Jan 2022 03:06 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण बाईट 

    – देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवाचंय – मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झालाय – अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झालेत – कोण – मोदींची केवळ भाषणबाजी, त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत – देशाकडे मोदींचं लक्ष नाही – मोदींची हुकूमशाही वाटचाल, त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – मुंबई महापालिका निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढणार – केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली – चंद्रकांत पाटील भाजप किती लवकर सत्तेत येतो, याची स्वप्न पाहतयात, त्यांनी स्वप्न पाहत रहावी – मुख्यमंत्र्यांचं काम व्यवस्थित सुरुय, फक्त आताच त्यांचं ऑपरेशन झालंय, ते वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या फिरण्यावर काही बंधनं आहेत, काही राहतील ती

  • 22 Jan 2022 02:44 PM (IST)

    अहमदनगर

    शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे गोळीबार

    परमेश्वर उर्फ पप्पू पातकळ वय 26 या व्यक्तिवर आणि हवेत गावठी कट्यातून गोळीबार

    पप्पू पातकळ याच्यावरती अरविंद (पप्पू) दराडे याने केली गोळी फायर

    चापडगावच्या बसस्थानक परिसरातील भरचौकात हा गोळीबार झाला

    हल्लेखोरांनी पातकळ यांच्यावर एक गोळी झडली, ती गोळी त्याच्या हाताला चाटून गेली यात पातकळ किरकोळ जखमी

    जुन्या वादातून गोळीबार झाल्याची चर्चा, तर वाळू तस्करीवरून गोळीबार झाल्याची परिसरात चर्चा

    शेवगाव पोलीस आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल

    तर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकले रवाना

  • 22 Jan 2022 02:44 PM (IST)

    नितीन राऊत

    – नागपूरात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, त्याच गांभीर्य ओळखणं गरजेचं आहे

    – लसीकरणाची गती वाढवलीय, चाचण्याही वाढवल्याय

    – गरजेच्या बाबी रुग्णालयात उपलब्ध करुन दिल्याय

    – बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना आखत आहेत

    – सोमवारी व्यापारी संघटनांशी चर्चा करणार

    – ज्या मनपा झोनमध्ये जास्त रुग्ण वाढतायत, त्यावर नजर ठेऊन आहो

    – नागपूरात लसीचा दुसरा डोज 100 टक्के झालाय. पात्र तरुणाचं 60 टक्के लसीकरण झालंय

    – ॲाक्सीजन आणि बेड रिकामे नसेल तेव्हा निर्बंध लावले जातात

    – पुढील आठवड्यात तरी लोकांचं नुकसान होईल अशे निर्बंध लावणार नाही

    – मास्क न लावणाऱ्यांवर करडी नजर

    – जानेवारीच्या शेवटपर्यंत रुग्ण वाढणार, फेब्रुवारीत रुग्णसंख्या स्थिर राहिल

    – रुग्ण फार वाढले, गुरज भासली तर लोकांशी बोलून निर्बंध लावले

    – मला भेटायला कार्यालयात आलेल्यांची तपासणी केली, त्यापैकी चार जण कोरोना पॅाझीटीव्ह आलेय

    – शाळा लगेच सुरु करणार नाही, 26 जानेवारी पर्यॅत परिस्थिती बघून निर्णय घेणार

    – परिस्थिती नियंत्रणात आली तर शाळा सुरु करणार

    – सध्या 17000 बेडपैकी 8 हजार ॲाक्सीजन बेड आहेत

    – 26 जानेवारीपर्यंत नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरु होणार नाही,

    – 26 जानेवारी नंतर परिस्थिती पाऊस निर्णय घेऊ

    – नागपूरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत, पण अद्याप पीक आला नाही. आणखी रुग्ण वाढणार

    – सध्या निर्बंध लावणार नाही, भविष्यात परिस्थिती पाहून निर्णय घेऊ

    – सोमवारपासून व्यापारी आणि विविध संघटनांशी चर्चा करणार

  • 22 Jan 2022 02:41 PM (IST)

    नवी दिल्ली

    यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला गोव्याचा चित्ररथ

    गोव्यातील स्मारकाच्या थिंमवर यंदाचा चित्ररथ

    दरम्यान या गोवा राज्याचा चित्ररथ नेमका कसा आहे याबाबत अधिक माहिती दिली आहे आमची नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी

  • 22 Jan 2022 01:02 PM (IST)

    यावेळी कोरोनाचा धोका जास्त नाही, मृत्यूचे प्रमाण कमी आहे- अजित पवार

    घरात एकाला जर कोरोना झाला तर तो घरातील बाकीच्या लोकांना लवकर होतो. यावेळी कोरोनाचा जास्त धोका नाही. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. पण दुसऱ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. दुसऱ्यांना त्रास देण्याचा आपल्याला अधिकार नाही. माणसाचा जीव महत्वाचा आहे, असे अजित पवार म्हणाले.

  • 22 Jan 2022 12:59 PM (IST)

    ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांकडून लसीकरणाला चांगला प्रतिसाद- अजित पवार

    कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या आगामी काळात वाढणार आहे. तज्ज्ञांनी तसे सांगितले आहे. त्यामुळे शाळा सुरु न करण्याचा सध्यातरी निर्णय घेतला आहे. दुसरा डोस घेतलेले एक कोटी 60 लाख लोक आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील लोक लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहेत. दोन्ही डोस घेतले तर विषाणूची तीव्रता तेवढी राहत नाही.

  • 22 Jan 2022 12:57 PM (IST)

    गर्दी हाताच्या बाहेर गेली तर थोडा अंकुश लावला जाईल- अजित पवार

    अजित पवार माध्यमांशी बोलत आहेत. गर्दी हाताच्या बाहेर गेली तर थोडा अंकुश लावला जाईल. पन्नास टक्क्यांपर्यंत सोशल डिस्टन्सिंग पाळून काम करता येईल. पण गर्दी झाली तर अंकुश लावला जाईल.

  • 22 Jan 2022 12:48 PM (IST)

    लसीकरण आम्ही गांभीर्याने घेत आहोत, 15 ते 18 वयोगटातील 51 टक्के लसीकरण झालं- अजित पवार

    मुंबई – खासगी हॉस्पिटलबाबत तक्रार आली होती

    – त्याबाबत प्रशासनाशी आज बोलणं झालंय

    – लसीकरण आम्ही गांभीर्याने घेत आहोत

    – 15 ते 18 वयोगटातील लसीकरण 51 टक्के झालं आहे

  • 22 Jan 2022 12:46 PM (IST)

    सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेतो, अजित पवार यांचे चंद्रकांत पटलांना प्रत्युत्तर

    पुणे- अजित पवार पुण्यात माध्यमांशी बोलत आहेत.

    गेल्या आठ दिवसातील जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती मांडण्यात आली

    – सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेतो

    अजित पवार यांचे चंद्रकांत पटलांना प्रत्युत्तर

    – अजून सात दिवस शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देऊ नये असं आज ठरलंय

    – पुढच्या बैठकीत याबाबत चर्चा केली जाणार

  • 22 Jan 2022 11:25 AM (IST)

    नागपूरच्या रामेश्वरी परिसरात तरुणीवर ॲसिडसदृश्य द्रव्याने हल्ला, आरोपीचा शोध सुरु

    नागपूर – नागपूरच्या रामेश्वरी परिसरात तरुणीवर ॲसिडसदृश्य द्रव्याने हल्ला

    – जखमी तरुणीला मेडीकल रुग्णालयात केलं दाखल

    – अजनी पोलीस स्टेशन हद्दीतली घटना

    – पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु

  • 22 Jan 2022 10:27 AM (IST)

    1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावची लढाई वास्तव पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

    पुणे : 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगावची लढाई वास्तव या पुस्तकावर बंदी घालण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात ) गटाची मागणी

    राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली जातीये मागणी

    उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीये

    या पुस्तकामुळे वाद पेटण्याची चिन्हं आहेत

    कोरेगाव भीमाची लढाई ही विशिष्ट जातिविरोधात नसून ती एक चकमक होती असा उल्रेख लेखक अँड. रोहन माळवदकरांनी या पुस्तकात केलाय

  • 22 Jan 2022 10:12 AM (IST)

    भापजकडून पणजीमध्ये भ्रष्टाचारी नेत्याला उमेदवारी, उत्पल पर्रिकर यांना आमच्या शुभेच्छा- संजय राऊत

    राजकारण कसं असावं हे मनोहर पर्रिकर यांनी दाखवून दिलं आहे. मात्र उत्पल पर्रिकर यांच्यावर भाजपने अन्याय केलं आहे. उत्पल पर्रिकर यांनी भाजप पक्षातून राजीनामा दिला आहे. तसेच ते अपक्ष लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. आता ही लढाई चिरत्र आणि बेईमानी अशी लढाई होणार आहे. पणजी येथून मनोहर पर्रिकर यांनी नेतृत्व केलेलं आहे. तिथे आता भाजपकडून भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही सगळे उत्पलला शुभेच्छा देतो

  • 22 Jan 2022 08:49 AM (IST)

    मुंबईत नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग, 7 जण जखमी

    मुंबई : नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग

    – साडेसातच्या सुमारास लागली आग

    – 20 मजली इमारत

    – इमारतीच्या 18 व्या मजल्यावर लागलीय आग

    – पावणे आठच्या सुमारास आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा

    – आगीत 7 जण जखमी

    – भाटिया रुग्णालयात दाखल

    – आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन 7 जंबो टँकरद्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु

    – पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची माहिती

  • 22 Jan 2022 08:34 AM (IST)

    मुंबईत नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग, 7 जण जखमी

    नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला आग – साडेसातच्या सुमारास लागली आग – 20 मजली इमारत – इमारतीच्या 18 व्या मजल्यावर लागलीय आग – पावणे आठच्या सुमारास आग लेव्हल 3 ची असल्याची अग्निशमन दलाकडून घोषणा – आगीत 7 जण जखमी – भाटिया रुग्णालयात दाखल – आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन ७ जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सूरु – पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची माहिती

  • 22 Jan 2022 08:25 AM (IST)

    बोगस नोटा असल्याचं सांगत नाशिकमध्ये महिलेला घातला गंडा

    नाशिक – बोगस नोटा असल्याचं सांगत महिलेला घातला गंडा

    नोटा तपासून देतो, बोगस नोटा आहेत असं सांगत 1 लाख रुपयांमधील 36 हजार घेऊन चोरट्याने केला पोबारा

    बोधलेनगर जवळील एटीएमजवळ घडला प्रकार

    मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 22 Jan 2022 08:24 AM (IST)

    महाराष्ट्राच्या चित्ररथाला अखेर परवानगी, सुरक्षेच्या कारणावरून नाकारली होती परवानगी

    नवी दिल्ली  : नवी दिल्ली महाराष्ट्राच्या चित्ररथाला अखेर परवानगी

    प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ

    पश्चिम बंगालच्या चित्ररथाबाबत मात्र अद्याप निर्णय नाही

    महाराष्ट्रातील जैवविविधता या विषयावर यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ

    सुरक्षेच्या कारणावरून चित्ररथाला परवानगी नाकारली होती

  • 22 Jan 2022 08:23 AM (IST)

    औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघासाठी आज मतदान

    औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघासाठी आज मतदान..

    14 जागांपैकी सात जागांसाठी आज सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत होणार मतदान..

    सहा मतदान केंद्रावर होणार मतदान..

    23 जानेवारीला निकाल होणार स्पष्ट..

    औरंगाबाद,कन्नड,पैठण,फुलंब्री, वैजापूर आणि सिल्लोड येथील सहाय्यक प्रबंधक कार्यालयात मतदान..

    माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध सुरेश पठाडे या निवडणुकीकडे सहकार व राजकीय क्षेत्राचे लक्ष..

  • 22 Jan 2022 07:05 AM (IST)

    शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रविवारी औरंगाबादेत येणार  

    औरंगाबाद : शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी

    चार वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रविवारी येणार औरंगाबादेत

    मात्र फेब्रुवारीत होणार अनावरण

    क्रांती चौक येथे बसवणार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

    25 फूट उंच 21 फूट लांब आणि 10 टन पुतळ्याचे वजन

Published On - Jan 22,2022 6:13 AM

Follow us
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.