Maharashtra News Live Update : शेतकऱ्याच्या धान्याची दारू करायची आणि त्यांच्याच पोरांना पाजयची, रस्त्यावर उतरू-चंद्रकांत पाटील
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या
मुंबई : आज गुरुवार 28 जानेवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आजदेखील या दोन्ही पक्षांतील नेते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, उत्तराखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची (Elections) घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांत मोठी उलथापालथ होत आहे. तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात कमालीचे बदल जाणवले असून पुन्हा हुडहुडी वाढली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
बंडातात्या कराडकर यांची सरकारवर सणसणीत टीका
वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याबद्दल उद्धव ठाकरे, अजित पवार आणि महाराष्ट्राचे शहेनशहा शरद पवारांचे अभिनंदन,
– सुपर मार्केटसोबत भाजीपाला मार्केट आणि दूधवाल्यासोबत वाईनची विक्री करा, सरकारला उपरोधिक टोला,
– शिवाय मंदिरामध्ये जर दारू उपलब्ध करून दिली तर भाविकांना तीर्थ म्हणून दारू देता येईल,
-
पुणे व्यापारी महासंघ अध्यक्ष फत्तेचंद रांका काय म्हणाले?
सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण्याचा निर्णय अंत्यत चुकीचा आहे,
आम्ही या निर्णयाला विरोध करणार,
पुण्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवू देणार नाही,
सरकारने यावर पूर्णविचार करावा आणि निर्णय मागे घ्यावा,व्यापारी महासंघाचे आवाहन,
महसूल मिळणार म्हणून सरकारने महिलांचे संसार उद्धवस्त करू नयेत
-
-
वाईन निर्णयावर बंडा तात्या कराडकर यांचा सरकाराला उपरोधिक टोला
सरकारने मंदिरातही दारु वाईन विक्रीस ठेवावी येणाऱ्या भाविकांची सोय होईल शाळेत खिचडी ऐवजी मुलांना वाईन द्या सुदृढ पिढी तयार होईल
जनतेने या निर्णयाचे सडा रांगोळ्यानी स्वागत करावे
व हे सरकार लवकर रसातळाला जावो अशी प्रार्थना करावी
-
आंदोलने होतील आणि महाराष्ट्र पेटेल-बबनराव लोणीकर
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारने किराणा दुकान आणि मॉल मध्ये दारू विकण्याचा निर्णय दुर्दवी आहे. फुले-शाहूंच्या-आंबेडकर आणि संतांच्या महाराष्ट्रात दारू खुली केल्याने या सरकारला जणांची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. दारू विकून हे सरकार चालणार आहे का असा प्रश्न भाजपचे आमदार लोणीकर यांनी आघडी सरकारला केला आहे आणि हा निर्णय आघाडी सरकार ने निर्णय मागे घ्यावा नसता महाराष्ट्रात या निर्णया विरोधात आंदोलने होतील आणि महाराष्ट्र पेटेल असा इशारा बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.
-
चंद्रपुरात मृत अवस्थेत आढळला वाघ
भंडारा शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर मृत अवस्थेत आढळला वाघ
पलाडी गावाच्या शेतशिवारात गावकऱ्यांना आढळला मृत अवस्थेत वाघ
सदर वाघ हा नर वाघ असून वनविभागाची टीम घटनास्थळी
वाघाचा मृत्यूचे कारण अस्पष्ट
-
-
TET परीक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचा मुनगंटीवार यांचा घणाघात
महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धतीने चालवले जाणारे सरकार,
या सरकारसाठी धनवसुली सर्वात महत्त्वाचा मुद्दा,
सरकारने स्पर्धा परीक्षा घेणारी केंद्रे उद्धवस्त केल्याचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप,
TET परीक्षेबाबत सरकार गंभीर नसल्याचा मुनगंटीवार यांचा घणाघात,
याविषयी चौकशी केल्यास मंत्री- नेत्यांपर्यंत धागेदोरे जातील म्हणून चौकशी नकोय अशी व्यक्त केली शक्यता
-
बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्याची आत्महत्या
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्याची आत्महत्या
बेंगळुरू येथील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली.
लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम सुरू
आत्महत्येचे कारण अस्पष्ट, घटनास्थळी पोलिस दाखल
-
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला सुरुवात
पुणे : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीला सुरुवात
पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पार पडतीये बैठक
आजच्या बैठकीत शासनाने दिलेल्या सात सर्वेक्षण अहवालावर चर्चा होणार
त्यानुसार अंतरिम अहवाल तयार केला जाणार
-
केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 16 अधिकांऱ्यावर गुन्हा दाखल
कल्याण : केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 16 अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
आरोपींमध्ये बिल्डर आणि आर्किटेक्ट यांचा समावेश
कल्याण पश्चिमेकडील माणिक कॉलिनी इमारतीच्या पुनर्विकासाला नियमबाह्य परवानगी दिल्याचा ठपका
माजी नगरसेवक अरुण गिध यांनी घेतली होती न्यायालयात धाव
कल्याण न्यायालयाच्या आदेशानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ,पोलीस तपास सुरू
-
सोने-चांदीच्या दरमामध्ये मोठी घसरण, सोन्याची भाव 48 हजार 300 रुपये प्रति तोळा
जळगाव : गेल्या अनेक दिवसापासून स्थिर असलेल्या सोने-चांदीच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या भावात तब्बल 900 रुपयांची घसरण होऊन 48 हजार 300 रुपये प्रति तोळा झाला आहे. तर चांदीच्या भावात 2 हजार ते 2200 रुपयांची घसरण होऊन चांदीचा भाव 63 हजार 600 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर झाल्याने ही घसरण झाल्याचे बोलले जात आहे.
-
कोरोनाबरोबर कसे जगता येईल त्याचे लोकांना मार्गदर्शन करण्याची गरज- राजेश टोपे
राजेश टोपे माध्यमांशी बोलत आहेत. यूकेमध्ये मास्कमुक्त झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत स्टेट टास्क फोर्स, सेंट्रल टास्क फोर्स यांना निर्देश दिले आहेत. विदेशात मास्क न वापरण्याचा निर्णय विज्ञानाधिष्ठित असेल तर त्यावर अभ्यास केला जावा या हेतूने मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सने अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाबरोबर कसे जगता येईल, त्याचे लोकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे
-
लोकप्रतिनिधींकडून बेशिस्त वर्तन होत असेल तर प्रतिबंध करणे काळाजी गरज- विनायक राऊत
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून बेशिस्त वर्तन होत असेल तर त्याला प्रतिबंध करणे ही काळाजी गरज आहे. याच कारणामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेतून 12 आमदारांचे केलेले निलंबन योग्यच आहे. अध्यक्षांनी जो ठराव केला तो योग्य आहे. मुंबईमध्ये 12 आमदार निलंबित झाले. राज्यसभेतदेखील बारा खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. तिकडच्या निलंबनाचे समर्थन करायचे आणि इकडच्या निलंबनाचे विरोध करायचे, हा भाजपचा दुटप्पीपणा आहे.
-
महाराष्ट्रात वाईन विक्रीला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू- राऊत
मुंबई : राऊत माध्यमांशी बोलत आहेत. वाईन मद्याचा दर्जा आहे का माहीत नाही..जरी असेल तरी देशात दारु बंदी आहे का.. पण जे महाराष्ट्रात जे वाईन विक्रीला विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांचे शत्रू
-
टीईटीच्या 2019-20च्या परीक्षेत मोठा घोटाळा; 7800 परीक्षार्थींना पैसे देऊन केले पात्र
टीईटीच्या 2019-20च्या परीक्षेत मोठा घोटाळा
7800 परीक्षार्थींना पैसे देऊन पात्र केल्याची धक्कादायक बाब उघडकीस
पोलिस तपास मोठे आकडे समोर येण्याची शक्यता
पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून माहिती उघड
-
पुण्यात आज होणार राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक
पुणे : पुण्यात आज होणार राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक
शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाला दिलेल्या सात सर्वेक्षण अहवालाच्या आधारे आयोग अंतरिम अहवाल करणार तयार
8 फेब्रुवारीला शासन आणि आयोगाचा अंतरीम अहवाल सादर करणार
-
औरंगाबाद शहरातील तापमान 10 अंश सेल्सिअसवर, आणखी काही दिवस थंडी कायम राहणार
औरंगाबाद शहरातील तापमानाचा पारा कमालीचा घसरला
औरंगाबाद शहरातील तापमान 10 अंश सेल्सिअसवर
शहरासह संपूर्ण जिल्ह्याला भरली हुडहुडी
गेल्या चार दिवसांपासून तापमानात कमालीची घट
या वर्षातील सर्वात कमी तापमानाची झाली नोंद
आणखी काही दिवस थंडी कायम राहण्याची शक्यता
-
म्हाडा भरतीची परीक्षा होणार ऑनलाईन पद्धतीने, तक्रार असल्यास म्हाडाकडे करता येणार अर्ज
मुंबई : म्हाडा भरतीची परीक्षा होणार ऑनलाईन पद्धतीने
31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान पार पडतीये परीक्षा
परीक्षेनंतर तक्रार असल्यास विद्यार्थ्यांना करता येणार म्हाडाकडे अर्ज
कोव्हीड लक्षणं असलेल्या विद्यार्थ्यांना विलगीकरणात देता येणार परीक्षा
म्हाडातील पेपर घोटाळ्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली होती
विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आलंय
565 पदांसाठी म्हाडाची परीक्षा होतीये
-
नागपूर न्युड डान्स प्रकरण, ब्राह्मणी गावातील उपसरपंच रितेश आंबोनेला अटक
नागपूर – नागपूर ग्रामीणमधील न्युड डान्स प्रकरण
– ब्राम्हणी गावातील उपसरपंच रितेश आंबोनेला पोलिसांनी केले अटक
– मंडप डेकोरेशन, डीजे वाजवणारा आणि एका महिलेला अटक
– उमरेड पोलिसांची कारवाई
– या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक, 12 जणांना मिळाली न्यायालयीन कोठडी
– बीट जमादार आणि पोलीस पाटीलही चौकशीच्या घेऱ्यात
-
अकोल्यात पारा घसरला, तापमान 8 अंश सेल्सिअसवर
अकोला : अकोल्यात पारा घसरला
तापमान गेले 8 अंश सेल्सिअसवर
कालचे तापमान होते 9.03 ℃ सेल्सिअस
Published On - Jan 28,2022 6:16 AM