Maharashtra News Live Update : नितेश राणे राहुल गांधींना म्हणतात, सर्टीफाईड पप्पू, एकादशीच्या ट्विटवरून निशाणा

| Updated on: Jul 10, 2022 | 8:39 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update :  नितेश राणे राहुल गांधींना म्हणतात, सर्टीफाईड पप्पू, एकादशीच्या ट्विटवरून निशाणा
मोठी बातमी

मुंबई : आज रविवार 10 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज आषाढी एकादशी राज्यात साजरी करण्यात येईल. तसेच बकरी ईद देखील साजरी होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक महापूजा करण्यात आली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Jul 2022 08:07 PM (IST)

    गोव्यातही महाराष्ट्राचा फॉर्म्युला ?

    गोव्यातील काँग्रेसचे आमदार प्रत्यक्ष पक्षातून न फुटता विधानसभेत स्वतःचा एक गट तयार करण्याच्या तयारीत

    काँग्रेस आमदारांचा हा गट गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता

    गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे

    त्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय

    कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेल्या दुफळीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पुढील कार्यवाहीसाठी आज दुपारी गोव्यात दाखल झाले आहेत.

  • 10 Jul 2022 07:09 PM (IST)

    चंद्रपूर : दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूरला झोडपले

    हवामान खात्याने दिलाय पावसाच्या सतर्कतेचा 72 तासांचा रेड अलर्ट,

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच नदी-नाले वाहताहेत ओसंडून,

    जिल्ह्यातील 15 तालुक्यात पैकी पाच तालुक्यात झाली अतिवृष्टी,

    दोन तासांच्या मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्ह्यातील सखल भाग जलमय,

    जिल्ह्यातील जीवती- पोंभूर्णा -गोंडपिपरी- वरोरा- मूल या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जलमय स्थिती,

    चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गांवर पाणीच पाणी,

    महत्त्वाच्या वाहतूक शाखा-टी पॉईंटवर नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा,

    महिला मुले व वृद्ध यांना दुचाकीवरून हा रस्ता पार करणे झाले अवघड,

    वाहतूक शाखा चौकात सातत्याने होणाऱ्या वेगवान जलप्रवाहाच्या समस्येकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

  • 10 Jul 2022 07:07 PM (IST)

    आषाढी एकादशी साठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात

    दोघांचा मृत्यू तर तिघेजण जखमी

    मृत दोघेही बेळगाव जिल्ह्यातील अनंगुळ गावचे

    राजू शिदोळकर आणि परशुराम जवरुचे अशी मृतांची नावे

    सोलापूर जवळील कासेगाव फाटा येथे झाला अपघात

  • 10 Jul 2022 06:57 PM (IST)

    नितेश राणे राहुल गांधींना म्हणतात, सर्टीफाईड पप्पू

  • 10 Jul 2022 06:14 PM (IST)

    उद्याची सुप्रीम कोर्टातली सुनावली लांबणीवर ?

    सरकारच्या भवितव्याची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता

    सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात सुनावणी बाबत समावेश नाही

    उद्या सकाळी सुनावणी बाबतचा समावेश होऊ शकतो मात्र समावेशानंतर उद्या सुनावणी होण्याची शक्यता कमी

  • 10 Jul 2022 05:37 PM (IST)

    पावसाची संततधार सुरू

    चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. 48 तासांपेक्षा अधिक काळापासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोरपना तालुक्यातील धानोली तांडा क्रमांक दोन येथिल बारा ते पंधरा घरात पुराचे पाणी शिरले आहे. घरात पाणी गेल्याने गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. घरातील अन्नधान्य व सामानाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची त्वरित मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात अड्याळ जानी येथे वीज पडून मासेमारी करणाऱ्या इसमाचा मृत्यू झालाय. तर सावली शहरात विविध भागात पावसाचे पाणी शिरून घरांचे नुकसान झाले आहे.

  • 10 Jul 2022 05:27 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच सोलापूरात जंगी स्वागत

    गाडीवर उभं राहून हात उंचावत मुख्यमंत्र्यांनी मानले सोलापूरकरांचे आभार

    मुख्यमंत्री विमानतळाकडे रवाना

    थोड्या वेळात मुंबईकडे होणार रवाना

  • 10 Jul 2022 05:26 PM (IST)

    छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

    ऑल इंडिया सैनी समाज सेवा संघ यांच्या परिषदेला आलो होतो

    या परिषदेला उत्तर प्रदेश चे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य, खासदार संघमित्रा मौर्या यांच्यासारखे असे अनेक खासदार मंत्री उपस्थित होते

    सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात ज्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळं अनेक राज्य अडचणीत आले आहेत

    गुजरात मध्ये देखील हीच समस्या आहे. गुजरात मध्ये साडेतीन हजार ग्रामपंचायत निवडणुका…

    आता गुजरात सरकार कमिशन नेमणार

    मोदी साहेबांनी यात लक्ष घालून मार्ग काढावा, छगन भूजबळ यांची मागणी

    मोदी यांनी यामध्ये लक्ष घालून 27 टक्के आरक्षण जे देण्यात आलं आहे. ते टिकवण्यासाठी मदत करावी आणि सर्वोच्च न्यायालयात ज्या केसेस सुरू आहे. त्यामध्येही मदत करावी.

    सरकार म्हणून त्यांनी काही निर्णय घ्यावेत आणि ओबीसीचं दुखनं बंद करावं

    छगन भूजबळ यांची मागणी

    देशात होणाऱ्या जनगणनेत ओबीसीची देखील जनगणना व्हावी.

    12 तारखेला ओबीसीची जनगणना या संदर्भात मी वकिलाशी चर्चा केली

    छगन भूजबळ यांचं बंठिया आयोगाने बोट

    आडनावावरून जात ठरवणे योग्य नाही

    मध्यप्रदेश पेक्षा आपला रिपोर्ट उजवा

    महाराष्ट्रात पाऊस निवडणूका पुढं ढकलाव्या

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील हिच मागणी

    महाविकास आघाडी स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एकत्र लढवणार

    महाराष्ट्र 16 आमदार प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे त्या बद्दल….

    हे क्लिष्ट प्रकरण आहे

    आमच्या सुद्धा लक्षात येत नाही

    सर्वोच्च न्यायालयात काय होणार याबाबत माझ्या मनात संभ्रम, गोंधळ आहे

  • 10 Jul 2022 05:15 PM (IST)

    राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार Live

    आगामी निवडणुकीत आमचे सर्व सहकारी पूर्ण ताकदीने उतरतील. एकत्र लढावं हा माझा व्यक्तिगत विचार आहे. मात्र आमची मित्रपक्षांशी चर्चा झाली नाही.

  • 10 Jul 2022 04:49 PM (IST)

    राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार Live

    कोर्टाचा निकाल तर येऊद्या, जर तर वर गोष्टी चालत नसतात. मला या देशातील न्यायव्यवस्थेवर असतात. काही गोष्टींचा निकाल हा चिंताजनक असल्याची विधानं मी वाचली. ज्या प्रकारे निर्णय होत आहेत. ते आमच्यासाठी धक्कादायक असल्याची वक्तवं कपिल सिब्बल यांनी केलं आहे.

    आम्हीला भाजपची कुठलीही ऑफर नव्हती. सत्ता आपल्या हातातून गेली म्हणून काही लोकं अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्था काही प्रमाणात दूर झाली असेल असे मी समजतो. लपूनछपून भेटायचं कायतर प्रेमप्रकरण चालू होतं.

    असे प्रश्न हे शेवटी न्यायलयात सुटतात. मी एकदा अशा संकटातून गेलो आहे. काँग्रेसमध्ये दोनवेळा असे प्रसंग आले आहेत. आधी आमची खून बैलजोडी हीत. ती चक्र झाली.

  • 10 Jul 2022 04:32 PM (IST)

    राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार Live

    मध्यवर्ती निवडणुका होतील असे मी म्हणालो नव्हतो. निवडणुकांच्या आधी एक वेगळ वातावरण असतं.

    बंडखोर आमदारांना सांगयाला काही निश्चित कारण नाही, म्हणून कोणी हिंदूत्वाचं कारण सांगतं, तर कुणी निधी दिला नाही म्हणून सांगतं. जो निर्णय घेतला त्या निर्णयाला काही आधार नाही.

    सरकार बनल्यानंतर अनेक लोक सांगायचे राष्ट्रवादीचे मंत्री जास्त काम करतात जास्त प्रश्न सोडवतात असा अनुभव मी आघाडीच्या नेत्यांकडून ऐकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीह सक्षम कारण नाही. हे कार्यकण्यामागे काय प्रभावशाली होतं हे मला माहिती नाही.

  • 10 Jul 2022 03:30 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    लोक विरोधाकडून सत्तेकडे जात असतात

    मात्र आम्ही तर सत्तेत होतो, मी नगरविकास मंत्री होतो

    बाळासाहेबांच्या हिदुत्वाचं काम आम्ही पुढे नेतोय

    प्रत्येक समाजाचा आदर्श राखणं हे आपलं काम आहे

    किती टीका झाली हे आपल्याला माहिती आहे

    आम्ही टीकेवर काहीच बोललो नाही, आम्ही कामातून उत्तर देणार आहोत

  • 10 Jul 2022 03:27 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    ही लढाई सोपी नव्हती

    एकिकेड सत्ताधीश होते

    दुसरीकडे एक शिवसैनिक होता

    एवढ्या आमदारांनी विश्वास ठेवणे ही साधी सोपी गोष्ट नाही

    आतापर्यंतची ही सर्वात मोठी ऐतिहासिक घटना आहे.

    या जगातील 33 देशांनी या घटनेची नोंद घेतली आहे

    ही एक विचारांची लढाई आपण लढतोय.

    बाळासाहेबांचे विचार म्हणजे तेजस्वी विचार, आज मी तुमच्यापुढे मुख्यमंत्री म्हणून उभा आहे ते म्हणजे दिघे साहेबांच्या कृपेमुळे

    आनंद दिघे यांचं हिमालयाएवढं काम होतं.

    प्रसिद्धीपासून ते अलिप्त होत काम करत होते

    शाखा हेच माझं घर, शिवसैनिक हेच माझं ऐश्वर्य असे ते जगत होते

    दिघेंनी दाखवलेला आदर्श आणि काम कधीच विसरू शकणार नाही

    20, 22 वर्षात खूप मोठे प्रसंग आले मात्र ते पहाडासारखे उभे राहिले

  • 10 Jul 2022 03:23 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार Live

    शेवटी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे.

    मात्र शेवटी कोर्टाचा निर्णय काय येईल त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे

    यावर दोन्ही बाजुने बोलणारे लोक असतात. काहींना वाटतं उद्धव ठाकरे यांच्या बाजुने निकाल लागेल.

    मला सगळे वकील म्हणाले कायद्याचं पालन करायचं म्हटलं. तर सोळा लोकांच्या बाबतीत निकाल वेगळा लागला पाहिजे.

    आता आम्ही सरकारमध्ये नसताना या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

    उद्या मी आमच्या मित्रपक्षांशी चर्चा करणार आहे.

  • 10 Jul 2022 03:06 PM (IST)

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि चिंतामणी ज्ञानपीठ आयोजित गुरुजन गौरव समारंभ

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार गुरुजनांचा सत्कार

    बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलाय समारंभ

    नारायण महाराज, योगगुरु डॉ. संप्रसाद विनोडझ भाऊसाहेब जाधव, पारसमल जैन (मोदी) यांचा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार सत्कार

  • 10 Jul 2022 02:43 PM (IST)

    मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही,आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल – आदित्य ठाकरे

    मुंबई -राज्यात आलेल्या नवीन सरकारने मुंबईचं फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या आरे जंगलातच मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांकडून आरेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी पर्यावरणमंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आज रविवारी भेट दिली. यावेळी पर्यावरणवाद्यांची भेट घेऊन या आंदोलनाला आमचा भक्कम पाठिंबा असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. ‘आरे बचावासाठी शिवसेना सदैव लढा देईल आणि मुंबईच्या फुफ्फुसांना धक्का पोहचू देणार नाही,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 10 Jul 2022 02:40 PM (IST)

    परत येण्याचे आवाहन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना करावे- आमदार संजय गायकवाड

    मुंबई – आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना, अजूनही प्रेम असेल कर मातोश्रीवर येण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे आमदारांना आवाहन करण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना आवाहन करा, असे मत बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. या वादात पहिल्यापासून तोडगा काढण्यापेक्षा बंडखोर आमदारांवर टीका करण्याचे काम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याचेही गायकवाड म्हणाले आहे.

  • 10 Jul 2022 02:09 PM (IST)

    कायदेशीर लढाईत सेना कुठेही कमी पडणार नाही – संजय राऊत

    रोजच १५ १५ तास बैठका सुरू आहे. शिवसेनेचा प्रत्येक विभाग शहरातील येत आहेत, भेटत आहे. त्यांच्याशी चर्चा करत आहे. जिल्हा शहरातील कार्यकारिणी येत आहे. चर्चा करत आहे. शिवसेना जागेवरच आहे. शिवसैनिक शिवसेना प्रेमी जनता आहे तिथे आहे. त्याचा कपचाही उडाला नाही. ही ठाकरेंची शिवसेना आहे

    शिवसैनिक सदोदित आमच्यासोबत आहे. आम्ही मातोश्रीच्यासोबत आहोत. मातोश्री आमची आई आहे. बाळासाहेब आमची आई आहे. शिवसेना आमची आई आहे. आम्ही आईसोबत गद्दारी करत नाही. बेईमानी करत नाही. लाखो शिवसैनिक आजही आमचे मातोश्रीशी नाते अतूट. सत्ता राहो ना राहो आमचं नातं अतूट

    कायदेशीर लढाईत सेना कुठेही कमी पडणार नाही. आम्हलाा माहीत आहे कुणावर कसे दबाव सुरू आहे. कायद्याची कशी पायमल्ली होत आहे. लोकशाहीचा खून करण्याचा मिनिटा मिनिटाला प्रयत्न होत आहे. पण उद्या ११ तारीख आहे. उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकशाही आणि न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही हे उद्या कळेल. आमची न्यायव्यवस्था किती दबावात आहे हे उद्या कळेल.

  • 10 Jul 2022 02:08 PM (IST)

    मातोश्रीवर रोजच बैठक चालू आहेत – संजय राऊत

    मातोश्रीवर रोजच बैठक चालू आहेत रोज राज्य़ातील पदाधीकारी उध्दवजींना भेटायला येत आहेत शिवसेना जाग्यावर आहे सेनेला जरासाही धक्का लागलेला नाही शिवसैनीकांचे मातोश्रीसोबतचे नाते अतुट आहे

    कायदेशीर लढाईत शिवसेना कोठे कमी पडणार नाही लोकशाहीचा मिनटा मिनटाला खुण होत आहे उद्या न्यायालयात सुनावनी आहे उद्या देशाला कळेल न्यायव्यवस्था किती स्वतंत्र आहे ते आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे

  • 10 Jul 2022 02:00 PM (IST)

    आषाढी एकादशी निमित्त प्रविण दरेकरांच्या हस्ते तुळशी रोप वाटप

    भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज आषाढी एकादशी निमित्त मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील विठ्ठल रखुमाई मंदिरात मनोभावे पूजा करून दर्शन घेतले व दिंडी यात्रेत सहभागी झाले. यावेळी आषाढी एकादशी निमित्त विभागातील नागरिकांना प्रविण दरेकरांच्या हस्ते तुळशी रोप वाटप करण्यात आले.

  • 10 Jul 2022 01:21 PM (IST)

    कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त

    कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त

    सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या बैठकीत खासदार संजय मंडलिक यांनी केली घोषणा

    सर्व कार्यकारणी आणि पदाधिकारी बरखास्त

    येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सर्व पक्षाची पुनर्बांधणी करणार

    शिवसेनेला नवी बळकटी देणार

    शिवसेनेचा कोणीही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात नाही,ती फक्त अफवा

    खासदार संजय मंडलिक यांचा दावा

    शिवसेनेचा गुरुवारी कोल्हापुरात मेळावा

    विनायक राऊत,अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत होणार मेळावा

  • 10 Jul 2022 01:09 PM (IST)

    अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी आश्रमशाळेत घुसले नदीचे पाणी

    – अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी आश्रमशाळेत घुसले नदीचे पाणी – जोरदार पावसाने देव नदी ओसंडुन वाहत असुन नदीचे पाणी शिरले आश्रमशाळेत – आश्रमशाळेतील अनेक विद्यार्थ्यांना दोरीच्या सहाय्याने पाण्यातुन काढत हलवण्यात आले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती मध्ये – तर काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या तीसऱया मजल्यावर घेतला सहारा – तर गाव परिसररातही पाणी घुसल्याने सर्वत्र जलमय स्थिती

  • 10 Jul 2022 12:50 PM (IST)

    यासाठी तुमचीही साथ हवी आहे – एकनाथ शिंदे

    यासाठी तुमचीही साथ हवी आहे

    शासन आणि प्रशासन यांनी एकत्रित काम केलं पाहिजे

    5 कोटीची तरतूद आम्ही यासाठी शासनाकडून करूयात

    सगळीकडे वारकरी पाहायला मिळतायेत

    वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एक विकास आराखडा बनवण्याच्या सूचना मी दिल्या आहेत

    वारकऱ्यांना चांगल वातावरण तयार होईल

    देवस्थान समितीनं

    पांडुरंगाच्या आशिर्वादानं हे सरकार तयार झालंय

    आपण कमी पडणार नाही

  • 10 Jul 2022 12:44 PM (IST)

    या सरकारचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे, मुख्यमंत्री असलो तरी जनतेचा सेवक आहे

    या सरकारचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे

    या राज्यात उद्योग येण्यासाठी

    महाराष्ट्रात खूप क्षमता आहे आपला जीडीपी खूप आहे

    आपल्यात कौशल्य खूप आहे

    मी 24 तास काम करणारा मुख्यमंत्री आहे

    मुख्यमंत्री असलो तरी जनतेचा सेवक आहे

  • 10 Jul 2022 12:43 PM (IST)

    शिंदे गटाच्या पहिल्या मेळाव्याला कमी आमदार

    शिंदे गटाच्या पहिल्या मेळाव्याला कमी आमदार गेले आहेत. मी सुद्धा मतदारसंघात आहे, मी जाणार आहोत. परंतु लोकांच्या भेटीगाठी घ्यायच्या असल्याने मी माझ्या मंतदारसंघात आहे. संपुर्ण माझे समर्थक, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. एकनाथ शिंदे यांना आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत, त्यासाठी आम्ही तयार सुरु केली आहे. नेत्याचं प्रेम कार्यकर्त्यांवरती असतं आणि कार्यकर्त्यांचं प्रेम नेत्यावरती असतं. बाळसाहेब ठाकरे यांची इच्छा होती. की शिवसैनिकाने त्या खुर्चीवरती बसलं पाहिजे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची युती ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हती. मी बाळ शिवसैनिक आहे. आम्ही सतत त्याच्याशी भांडायचो पण काही कारणास्तव त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागलं. खोक्याचा अर्थ काय आहे. मला अद्याप ते समजलं नाही. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे यांना मी गुरू मानतो.

  • 10 Jul 2022 11:58 AM (IST)

    गोव्यात राजकीय भूकंप, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार

    गोव्यात राजकीय भूकंप

    माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार

    कामत यांच्यासह आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार

    गोव्यात काँग्रेसला खिंडार

    दिगंबर कामत गोव्याचे माजी मुख्यमंत्री

  • 10 Jul 2022 11:51 AM (IST)

    दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी दिलासा दायक बातमी…

    – दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी दिलासा दायक बातमी… – जायकवाडीच्या दिशेने नांदूरमधमेश्वर धरणातून गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू…. – 6310 क्यूसेक पाण्याचा पाच वक्रकार गेटमधून विसर्ग सुरु… – नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नासिक आणि निफाड तालुक्यात होत असलेल्या पावसाचे पाणी… – गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू… – दारणा,चेहडी धरणातून तसेच नाशिकमधुन नांदूरमधमेश्वर पाणलोट क्षेत्रात होते पाणी दाखल… – दिवसभर पावसाची संततधार सुरू अशीच राहिल्यास पाण्याच्या विसर्गात संध्याकाळ पर्यन्त वाढ करण्याचा इशारा … – गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा….

  • 10 Jul 2022 11:47 AM (IST)

    आषाढी एकादशीचं निमित्त असल्याने आज देवाच्या आळंदी मध्ये भक्तांनी मोठी गर्दी केलीय

    -आषाढी एकादशीचं निमित्त असल्याने आज देवाच्या आळंदी मध्ये भक्तांनी मोठी गर्दी केलीय

    -संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी चे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे

    -दरम्यान आळंदी मध्ये इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे

  • 10 Jul 2022 11:32 AM (IST)

    राज्यातील दोन्हीं सरकारने या युनिव्हरीसीटी ला चांगली मदत केली

    राज्यातील दोन्हीं सरकारने या युनिव्हरीसीटी ला चांगली मदत केली

    काम चांगलं झालं , पिडब्लूडी काम करणार असल्याने माझ्या मनात शंका होत्या मात्र त्यांनी काम चांगलं केलं मी त्यांना धन्यवाद देतो

    आयटी कंपनी नागपुरात मोठ्या प्रमाणात आल्या

    56 हजार युवकांना रोजगार मिळाला 1 लाख पर्यन्त ते पोहचवयाच आहे

    यां ठिकाणी चार पदरी रोड आहे या ठिकाणी 6 पदरी करायला मी मंजुरी दिली ,

    प्रत्येक।गोष्ट सरकारच्या पैशातून करणं योग्य नाही काही पैसा उभा करायला पाहिजे

    याला आणखी मोठं करा

    मी रोड बनविताना पैशाचा विचार करत नाही , पैशाची कमी नाही

    या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाड लावा ग्रीन सिटी बनव

  • 10 Jul 2022 11:23 AM (IST)

    आमचा राग मुंबईकरांवरती काढू नका, आदित्य ठाकरेंची सरकारवरती टीका

    ही सगळी काम होत असताना आम्ही आरेची काळजी घेतली होती. परंतु सध्याचं सरकारने कारशेड आरेत करण्याचा हा सरकारचा घाट आहे. पर्यावरण प्रेमींकडून आरे बचाव आंदोलन…

    आमच्यावरचा राग मुंबईच्या लोकांवरती काढू नका असं बाबांनी सुद्धा सांगितलं, तेच मी सांगतोय….

  • 10 Jul 2022 11:12 AM (IST)

    आमची न्याय व्यवस्था मजबूत आहे ती आणखी मजबूत होईल – देवेंद्र फडणवीस

    या युनिव्हर्सिटी साठी पैशाची कमी आम्ही पडू देणार नाही असं मी आस्वासन देतो।

    हे पुढील पिढी साठी बीज रोवल जात आहे

    आम्हाला जगाची सगळ्यात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनवायचं असेल तर आमची जुडीशीयली मजबूत असली पाहिजे त्यासाठी चांगले विध्यर्थी इथे घडणार आहे

    आमची न्याय व्यवस्था मजबूत आहे ती आणखी मजबूत होईल

    आज हा खुशीचा दिवस आहे लॉ युनिव्हर्सिटी च्या हॉस्टेल च उदघाटन झालं

    आता हा कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणार ठरणार

    आमचं स्वप्न होत नागपुरात लॉ युनिव्हर्सिटी व्हावी या साठी सगळ्याच सरकारने चांगली भूमिका निभावली

    नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात आम्ही ठरविलं होत की नागपुरात वर्ल्ड क्लास सुविधा असणारे शिक्षण येणार नाही ती पर्यंत विकास होणार नाही

    अनेक शहरात आर्थिक विकास होतो पण शैक्षणिक होत नाही म्हणून आम्ही नागपुरात शैक्षणिक दृष्ट्या लक्ष दिलं

  • 10 Jul 2022 10:55 AM (IST)

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून औरंगाबाद दौऱ्यावर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आजपासून औरंगाबाद दौऱ्यावर

    औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले

    यानंतर औरंगाबादच्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार

    आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभंगाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार

    उद्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

  • 10 Jul 2022 10:42 AM (IST)

    ‘विठ्ठल…विठ्ठल…’ संजय राऊतांचे ट्विट

    शिवसेना नेते संजय राऊतांचे नवे ट्विट

    ‘विठ्ठल…विठ्ठल…विठ्ठल… विठ्ठल…विठ्ठल… विठ्ठल..’

    ट्विट

  • 10 Jul 2022 10:17 AM (IST)

    उल्हासनगरच्या बिर्ला मंदिरात आषाढीची पूजा

    उल्हासनगरच्या बिर्ला मंदिरात आषाढीची पूजा

    केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली पूजा

    लहानपणी रांगेत लागलो अन आज माझ्या हस्ते पूजा झाली!

    मला मिळालेलं मंत्रिपद ही विठ्ठलाचीच किमया!

    केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

  • 10 Jul 2022 10:00 AM (IST)

    पाण्याचा अंदाज चालकाला न समजल्यामुळे ट्रक पाण्यात वाहून गेला, तीन प्रवाशांचे मृतदेह सापडले

    गडचिरोली भामरागड तालुक्यातील पेरमिली पुरात वाहून गेले सहा प्रवाश्यातुन तीन प्रवाशांचे मृतदेह सापडले

    भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्यावर मुसळधार पावसामुळे दीड ते दोन फूट पाणी होता

    पाण्याचा अंदाज चालकाला न समजल्यामुळे ट्रक पाण्यात वाहून गेला

    सध्या गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाचा फटका भामरागड एटापल्ली अहेरी मुलचेरा सिरोंचा या पाच तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत आहे

  • 10 Jul 2022 09:51 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

    कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

    पंचगंगा नदीचे पुन्हा एकदा इशारा पातळीकडे वाटचाल

    पंचगंगा नदीचे पाणी पातळी पोहोचली 33 फुटांवर

    नदीच्या पाणी पातळी आणखी वाढ होण्याच्या शक्यतेने प्रशासन अलर्ट मोडवर

    राधानगरी ही धरण 50 टक्के भरलं

    तर वारणा सह अन्य नद्या वाहतायत दुथडी भरून

  • 10 Jul 2022 09:51 AM (IST)

    भुसावळ शहरात मुस्लिम बांधवांची बकरी ईद

    भुसावळ शहरात मुस्लिम बांधवांची बकरी ईद….. ……

    महाराष्ट्रभरात आज हिंदू- मुस्लिम समाज बांधवांचे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण

    मुस्लिम समाज बांधवांची बकरी ईद भुसावळ शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांनी उत्साह पूर्ण वातावरणात भुसावळ शहरातील ईदगावर मुस्लिम बांधव एकत्र येत नमाज पठण केले मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र आले होते…….

  • 10 Jul 2022 09:23 AM (IST)

    अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस

    -अमरावतीच्या मेळघाटात जोरदार पाऊस

    -मेळघाटातील सिपणा नदीला महापूर

    -दिया गावातील सिपणा नदीत ३५वर्षीय युवक वाहून गेला

    -कृष्णा कासदेकर राहनार दिया असं पुरात वाहून गेलेल्या युवकाच नाव

    -मेळघाटातही अनेक गावांचा संपर्क तुटला ..

  • 10 Jul 2022 09:21 AM (IST)

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरु

    कोयना धरण अपडेट

    कोयना धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरु

    कोयना धरचा पाणीसाठा झाला 28.53 tmc

    धरणात 38194 कयुसेक पाणी आवक सुरु

    पाणलोट क्षेत्रात कोयनानगर 151 मिलिमीटर नवजा 194 मिलीमिटर महाबलेश्वर 177 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली

  • 10 Jul 2022 08:57 AM (IST)

    शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तानाजी सावंत यांना हाटवलं

    – शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तानाजी सावंत यांना हाटवलं

    – तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भुम- परंडा मतदार संघांचे आहेत शिवसेनेचे बंडखोर आमदार

    – शिंदे गटातील नेत्यांना सेनेपासून दूर ठेवाण्याचा ठाकरेंचा प्रयत्न

    – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांची नवे संपर्क प्रमुख म्हणून केली नियुक्ती

    – सोलापूर युवा सेनेचा जिल्हा प्रमुख मनीष काळजेची हकालपट्टी करत नवे युवासेना जिल्हा प्रमुख म्हणून बालाजी चौगुलेंची केली नियुक्ती

  • 10 Jul 2022 08:20 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री प्रवास करीत असलेल्या एक ट्रक पेरमिली नाल्यावरून वाहून गेला

    गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री प्रवास करीत असलेल्या एक ट्रक पेरमिली नाल्यावरून वाहून गेला

    या ट्रकमध्ये पाच ते सहा प्रवासी प्रवास करीत होते चालकाचा संतुलन बिघडल्यामुळे ट्रक पाण्यात वाहून गेला

    SDRF पथक शोध मोहीम साठी निघाली असून अजून पर्यंत काही पत्ता या 5 ते 6 प्रवासयांच्या लागलेला नाही

    भामरागड तालुक्यातील पेरमिली या नाल्याजवळ वाहून गेला ट्रक

  • 10 Jul 2022 08:20 AM (IST)

    आषाढी एकादशी निमित्त साकारली एस टी बस स्थानकात पंढरीच्या वारीची थ्रीडी रांगोळी

    – भंडाऱ्यातील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी आषाढी एकादशी निमित्त साकारली एस टी बस स्थानकात पंढरीच्या वारीची थ्रीडी रांगोळी

    – भंडारा बस स्थानात येणाऱ्या प्रवासाच्या डोळ्याचे पाळने फेडणारी हि रांगोळी असून चित्रा याना हि रांगोळी साकारायला ५ दिवसाचा कालावधी तसेच ५० किलो रंग लागले आहे .

  • 10 Jul 2022 07:49 AM (IST)

    देशातील अतिशय व्यस्त रेल्वे स्थानकांमध्ये नागपूर मध्यवर्ती स्थानकाचा समावेश आहे.

    देशातील अतिशय व्यस्त रेल्वे स्थानकांमध्ये नागपूर मध्यवर्ती स्थानकाचा समावेश आहे.

    या स्थानकाला आणखी सुसज्जीत करून प्रवाशांना जागतिक दर्जाचा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

    रेल भूमी विकास प्राधिकरणाने (आरएलडीए) रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाकरिता प्रस्ताव तयार केला आहे.

    या कामासाठी जवळपास ५३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

    त्यानुसार प्रवाशांना विविध सुविधा मिळणार असून लवकरच या कामाला सुरवात होणार

    नागपूर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी नुकतीच गेल्या महिन्याच्या २० तारखेला आरएलडीएने एक बैठक घेतली होती.

  • 10 Jul 2022 07:49 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते भव्य इस्कॉन मंदिराचे भुमिपुजन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते भव्य इस्कॉन मंदिराचे भुमिपुजन

    -मुख्यमंत्री बोलत आहेत-

    -१५ एकर जागेत भव्य दिव्य असे मंदिर उभे राहील-

    – १९६५ पासुन जगभरात मंदिरे आहेत.गोशाळा संशोधन,संवर्धन,बालसंस्कार;अन्नछत्र याचे हजारो जण लाभ घेतात.

    -इस्कॉन मंदिराचे माध्यमातुन अध्यात्मिक,सामाजिक काम होत आहेत.

    -केवळ मंदिरे बांधुन थांबत नाही तर सामाजिक कामात ही अग्रेसर-

    -मागे येथे पंढरपुरात आले होते.घाटाच्या पुजेला मी आलो होतो.

    -विश्वशांती,बंधुता,सांगणारी

    -आषाढी पूजा करण्याचा मला भाग्य लाभले ते केवळ आपल्या जनतेमुळेच

    -मी राज्याचा राजा नसुन सेवक आहे.गोरगरिब वंचिताना न्याय देण्याचे काम सरकार करील

    -राज्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण प्रयत्न करणार

    -पंतप्रधान,राष्ट्रपती भेटल्यावर ते म्हणाले विकासात राज्याने झेप घ्यावी.केंद्र सरकार पाठीशी राहील असा विश्वास दिला.

    -प्रत्येकाला आपलं वाटावं असं सरकार यापुढील काळात सर्वाना दिसेल-

  • 10 Jul 2022 07:48 AM (IST)

    गेल्या आठच दिवसांत पुण्याला चार महिने पुरेल इतका पाणीसाठा वाढला

    खडकवासला प्रकल्पांतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यापासून सातत्याने संततधार पाऊस

    संततधार पावसाने एकाच आठवड्यात पाणीसाठ्यात ४.४४ टीएमसीने वाढ

    यामुळे खडकवासला प्रकल्पातील एकूण पाणीसाठा ६.९५ टीएमसी झाला

    गेल्या आठच दिवसांत पुण्याला चार महिने पुरेल इतका पाणीसाठा वाढला

    शिवाय सध्याचा एकूण साठा हा शहराला किमान सहा महिने पुरू शकणार असल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली

  • 10 Jul 2022 07:47 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात एका दिवसात 945 कोरोना रुग्ण आढळले

    राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शनिवारी (दि. 9) पुणे शहरात 566, पिंपरी-चिंचवडमध्ये 220, तर पुणे ग्रामीणमध्ये 159 कोरोनाबाधितांची नोंद

    पुणे जिल्ह्यात एका दिवसात 945 रुग्ण आढळले

    शुक्रवारी 1032 रुग्णांची नोंद झाली

    सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णही पुणे जिल्ह्यात

    पुणे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 371

  • 10 Jul 2022 07:17 AM (IST)

    परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव शिंदे गटात दाखल

    परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव शिंदे गटात दाखल

    पंढरपूरात शासकीय महापूजेला लावली हजेरी

    राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेचे खासदार शिंदे गटात दाखल होणार ?

    संजय जाधवांनी लावली हजेरी एकनाथ शिंदेंनी मंदिरात संजय जाधवांचा केला सत्कार !

    आमदारांपाठोपाठ आता खासदारांचही बंड होणार ?

  • 10 Jul 2022 07:16 AM (IST)

    11 तारखेचा निकाल आमच्याच बाजूने लागेल – भरत गोगावले

    1. 11 तारखेचा निकाल आमच्याच बाजूने लागेल
    2. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच मोठं वक्तव्य
    3. आम्हाला रस्त्यावरची लढाई करण्याची सवय आहे
    4. मी रायगडचा मावळा आहे मला मंत्रीमंडळात स्थान मिळेल अशी आशा आहे
    5. संधी मिळाली तर नक्कीच संधी सोनं करू
    6. भरत गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास
    7. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत ते ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य !
    8. भरत गोगावलेंना मंत्रीपदाची आशा
  • 10 Jul 2022 06:39 AM (IST)

    वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो – एकनाथ शिंदे

    वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो माला आज पुजा करण्याचा मला मान मिळाला मी चार पिढ्याने पुजा केली हे भाग्य सर्वांना मिळावा पुर येऊ नये पण बळीराजा सुखाऊदे दे बळाराज्याचे संकट दूर होऊ द्या कोरोनाचा नायानाट होऊ द्या अस साखळ पांडूरंगाला घातल आहे समाज्यातील सर्व लोकांसाठी हे राज्य असेल पंतप्रधानांनी सांगितले राज्यात मोठे प्रकल्प उभे करा त्यासाठी निधी कमी पडणार नाही आषाढी वारी आढवा घेतला लॉग टर्मसाठी सुधारणा व्हावी ह्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या कायमस्वरूपी विकास करण्याच्या सुचना दिल्या आहे निवडणूका पाऊस पडतो..काही जिल्ह्यात अतिवृषी झाली आहे पूर परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी मनुषबळ लागते पावसाळ्यानंतर ह्या निवडणुका घ्या अशी विनंत करणार न्यान व्यवस्था हे ओबीसीला आरक्षण मिळणार आम्ही राज्य स्थापन केले आहे कायद्यानूसार आम्ही राज्या स्थापन केले आहे हे सरकार हे कायदेशी आहे हे राज्य सर्वसामन्याचे राज्य आहे सर्वांना न्याय मिळणार जागेवर काम होईल अशी आमची इच्छा आहे भाजपा नेत्यांची नाही तर संवैधिनिक पदावर असेल्या व्यक्तींची भेट घेतली राज्याच्या विकासात केंद्रांची मदत होईल ह्यासाठी ही बैठक

  • 10 Jul 2022 06:38 AM (IST)

    10 लाखांपेक्षाजास्त वारकरी सहभागी झाले – एकनाथ शिंदे

    आजचा दिवस माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस आईवडिलांची पुण्याई मला माहापुजाचा मान मिळाला सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो 10 लाखांपेक्षाजास्त वारकरी सहभागी झाले राज्यातील जनेतला हे वर्ष सुखाचे जाव ही प्रर्थांना करतो राज्यातील सर्व संटक दूर होऊ ही प्रार्थान बळीराज्या, कामगार, सर्वांनाच्या आयुष्यात सुख समृधी मिळो आपल्या राज्याची प्रगती व्हावी..आपल्या राज्याचा विकास व्हावा हे साखळ पांडूरंगाला केले पाऊस पडत आहे तिकडे सर्वठिकांनी लक्ष आहे जिवित हानी होऊ नये यासाठी सरकाचे लक्ष आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे जलआयुक्त शिवर योजना तसेच वाया जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्याचे काम सुरू माझ्या सहकाऱ्यांमुळे हा दिवस उजाळला आहे हे मी कधीही विसरणार नाही पंतप्रधान हे महाराष्ट्रातसोबत आहे केंद्र सरकार चांगल्या योजना राबवणार मंदिराच्या विकासाठी आऱखडा मंजूर केला आहे त्यात कसलीही कमी होणार नाही डिपीआर शासन परवागी देईल

    सर्वसान्याला वाटले हे सरकार आपले असं काम करणार आम्ही सर्व शुन्यातून सर्व निर्णान करणार आहे

    दुष्काळग्रस्त भागत पाणी पोहचवणार राज्य विकासाकडे गेले पाहिजे

Published On - Jul 10,2022 6:32 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.