Maharashtra News Live Update : दोघांचं कॅबिनेट हा चेष्टेचा विषय, संजय राऊत यांची पुन्हा सडकून टीका

| Updated on: Jul 16, 2022 | 9:29 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : दोघांचं कॅबिनेट हा चेष्टेचा विषय, संजय राऊत यांची पुन्हा सडकून टीका
मोठी बातमी

मुंबई : आज शनिवार 16 जुलै 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघरचे शिवसेना खा. राजेंद्र गावित, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, बविआतून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई विरारचे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. काल सायंकाळच्या सुमारास वसई विरार नालासोपारा परिसरातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला दिले समर्थन दिले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jul 2022 08:19 PM (IST)

    गोपाल पाटील अरबट यांच्यासह शेकडो पदाधिकारी शिंदे गटात दाखल

    अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्यासह शेकडो पदाधिकारी शिंदे गटात दाखल.

    ठाणे उपमहापौर रमाकांत माडवी यांच्या उपस्थितीत दर्यापूर येथे गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात शिंदें गटात

    अमरावती येथे आज पार पडली गुप्त बैठक.

    तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.

  • 16 Jul 2022 07:25 PM (IST)

    अमित ठाकरेंची कोकण टीम तयार

    मुंबई – मुसळधार पाऊस कोसळत असतानाही सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा सात दिवसीय मनविसे पुनर्बांधणी महासंपर्क दौरा करून मुंबईत परतल्यावर चारच दिवसात अमित ठाकरे यांनी त्यांची कोकण टीम जाहीर केली आहे. या तिन्ही जिल्ह्यातील मनविसेचे जिल्हाध्यक्ष त्यांनी आज जाहीर केले तसंच या सर्वांना मुंबईत बोलावून त्यांना नेमणूक पत्रही दिले. जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात मनविसेचे युनिट स्थापन करा, आगामी सिनेट निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा आणि अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी करा असे आदेशही त्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

    नवनिर्वाचित पदाधिकारी यादी….

    श्री अमोल साळुंके,जिल्हा संपर्क अध्यक्ष (रत्नागिरी व सिंधुदुर्ग) श्री पुष्पेन दिवटे,जिल्हा अध्यक्ष उत्तर रत्नागिरी (खेड,दापोली,मंडणगड,चिपळूण,गुहागर) श्री गुरूप्रसाद चव्हाण,जिल्हा अध्यक्ष,दक्षिण रत्नागिरी ( राजापूर,लांजा,संगमेश्वर,रत्नागिरी) श्री निलेश मेस्त्री,जिल्हा अध्यक्ष उत्तर सिंधुदुर्ग ( वैभववाडी,देवगड,मालवण,कणकवली) श्री सुधीर राऊळ,जिल्हा अध्यक्ष दक्षिण सिंधुदुर्ग (सावंतवाडी,दोडामार्ग,वेंगुर्ला,कुडाळ) श्री प्रसन्न बनसोडे, जिल्हा अध्यक्ष मध्य रायगड (कर्जत, खालापूर, पेण,सुधागड, अलिबाग, मुरुड) श्री प्रतिक रहाटे, जिल्हा अध्यक्ष दक्षिण रायगड (महाड, पोलादपूर, रोहा, माणगाव, हसळा, तळा, श्रीवर्धन) श्री अनिकेत ओझे,जिल्हा अध्यक्ष (उत्तर रायगड -पनवेल, उरण) श्री अनिकेत मोहिते,शहर अध्यक्ष (पनवेल महानगर) श्री गौरव डोंगरे,तालुका संपर्क अध्यक्ष (रत्नागिरी तालुका) श्री चिन्मय वार्डे,तालुका संपर्क अध्यक्ष (अलिबाग तालुका)

  • 16 Jul 2022 07:23 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

    पालघर आणि गडचिरोली जिल्ह्याची स्थिती बिकट होती, मला गडचिरोली जिल्ह्यातला नक्षलवाद संपवायचा होता. तिथल्या पोलिसांनी आता तिथला नक्षलवाद कमी करून टाकलेला आहे. लोकांच्या हाताला आम्ही काम देतोय, बंद असणारी कंपनी आम्ही सुरू केली. त्याच्यामध्ये अनेक अडथळे आले. मुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या अधिवेशनात घोषणा केली मात्र मी सांगितलं घाबरून चालणार नाही, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे आहे, कंपनी सुरू करायला सांगितलीय पाच ते दहा हजार लोकांना तिथं काम मिळालंय दुसऱ्या कंपन्या तिकडे सुरू होत आहेत. लोकांच्या हाताला काम मिळत आहे, मी सत्तेत होतो, लोक विरोधी पक्षाकडून सत्तेत जातात, माझ्याबरोबर सात ते आठ मंत्री सत्ता सोडून ही भूमिका का घेतली? याचं कारण बाळासाहेबांची भूमिका आणि अडीच वर्षात आलेले अनुभव आहेत. टीका करणे मला कोणावरती आवडत नाही, मी कमी बोलतो आणि जास्त ऐकतो कुणी किती काही बोलले तरी मी त्याच्यावर बोलत नाही. लोकांना बोलायचं काम असतं माझ्याकडे तेवढा वेळ नाही. काम करणारा माणूस आहे.

  • 16 Jul 2022 06:30 PM (IST)

    शिवसेना जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदेरेंचं विजय शिवतारेंना आवाहन

    विजय शिवतारेंच्या जाण्यानं शिवसेनेला काही फरक पडणार नाही

    पुढच्या वेळेस विजय शिवतारे आमदार होणार नाहीत

    त्यांनी फक्त एक पंचायत समिती , जिल्हा परिषद पुढच्या वेळेस निवडून आणावी मी आव्हान देतो

    त्यांनी पक्षाशी गद्दारी केलीये

    2021 मध्ये त्यांनी नवीन पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवला होता

    तेव्हाच त्यांनी पक्षाशी गद्दारी केली

    बाळासाहेब चांदेरेंनी दाखवला पुरावा

    जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीत शिवतारेंना जागा दाखवू

    जिल्हाध्यांनी दिलं थेट आव्हान

  • 16 Jul 2022 06:24 PM (IST)

    जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये जवानाकडून गोळीबार

    इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या 8 व्या बटालियनच्या एका हवालदाराकडून गोळीबार

    गोळीबारात 3 सहकारी जखमी

    नंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

    सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून ते सुरक्षित

    न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत

    ITBP कडून अधिकृत माहिती

  • 16 Jul 2022 06:21 PM (IST)

    कोयना धरण अपडेट

    कोयना धरणात 53.53 tmc पाणीसाठा झाला

    धरणात 55279 कयुसेक पाणी आवक सुरु

    कोयना नदीपात्रात 2100 कयुसेक पाणी विसर्ग सुरु

    धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस

    कोयनानगर 41 मिलिमीटर

    नवजा 46 मिलीमिटर

    महाबलेश्वर 60 मिलीमीटर

  • 16 Jul 2022 06:21 PM (IST)

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलावलेली बैठक संपली

    सर्वपक्षीय बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा

    महागाई , अग्निपथ योजना आणि रुपयाची होणारी घसरण यावर पावसाळी अधिवेशनात चर्चा करा

    विरोधी बाकावरच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत मागणी, सूत्रांची माहिती

    सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

    काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे नेते होते या बैठकीला उपस्थित

  • 16 Jul 2022 05:02 PM (IST)

    कोंबड्या चोरल्याचा संशय घेऊन मारहाणीत एकाचा मृत्यू

    – येवला तालुक्यातील भारत येथील घटना… – बाळू गणपत नळे असे मृत झालेल्या हॉटेल कामगाराचे नाव… – हॉटेल मालका विरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • 16 Jul 2022 05:01 PM (IST)

    राज्यपलांनी महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण केले

    महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज हरेला उत्सवानिमित्त राजधानी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण केले. हरेलाउत्सव हा उत्तराखंड राज्यातील महत्वाचा उत्सव असून या उत्सवाने श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते.

  • 16 Jul 2022 04:31 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    जनमताचा आदर करून ठाकरे सरकारने नामांतराचा निर्णय घेतला. त्याला काँग्रेस राष्ट्रवादीचे मंत्री होते. जे मंत्री पळून गेले तेही बैठकीला होते. मात्र त्यांनी हा निर्णय रद्द केला. हे ते कसं करु शकतात. आज दोघांच्या कॅबिनटमध्ये तो निर्णय घेतला. दोघांचं कॅबिनट असतं का कधी. तुम्ही हिदूत्ववादी आहे. तुम्ही संभाजीनगर नावाला कशी स्थगिती देऊ शकता. का हे नाटक सुरू आहे. काय आदेश देतात, काय निर्णय घेतात कुणाला माहिती नाही. अधिवेशन घ्यायची यांची हिंमत नाही. बहुमत यांनी पाकीटमारीतून सिद्ध केलंय. हे बेकायदेशीर आहे. त्यांना भविष्यात याची उत्तरं द्यावी लागतील. शिवसेना फोडल्याचा आता आनंद होत असला तर शिवसेना अशी फुटणार नाही. दोघांचं कॅबिनट हा देशात चेष्टेचा विषय आहे. ही लव्ह स्टोरी, एक दुजे के लिय, वासू और सपान अशी अवस्था आहे. स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. जनतेचं गुरगुरनं बंद करून टाकलं आहे.

  • 16 Jul 2022 03:26 PM (IST)

    25 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार

    बदलापूर पालिकेतील शिवसेनेचे सर्वच्या सर्व 25 नगरसेवक शिंदे गटात सामील होणार

    तर ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अंबरनाथ पंचायत समिती सभापती अनिता निरगुडा, अंबरनाथ तालुकाप्रमुख बाळाराम कांबरी हे देखील शिंदे गटात सहभागी होणार

    बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी नंदनवन बंगल्यावर दाखल

    काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात सहभागी होणार

  • 16 Jul 2022 02:59 PM (IST)

    शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

    संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगर करणे म्हणजे हा प्रक्रिया लंबवण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेनेनं संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत केला. संभाजीनगर नामकरणासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या, परवानगी मिळाली होती, मात्र आता नव्याने घोषणा करीत शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणजे सगळ्या प्रक्रिया नव्याने पूर्ण कराव्या लागणार आहे. म्हणून हे नाव मोठं करून ही प्रक्रिया लंबावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. या सरकारचा हा एक डाव आहे, असा आरोप शिवसेनेनं केलाय. संभाजीनगर नामकरण करण्याची प्रक्रिया माविआच्या काळात आम्ही पूर्ण केली. याच श्रेय घेण्याचं प्रयत्न इतर लोक करतील, यांनी आमच्या निर्णयाला स्थगिती दिली, आम्ही रोष व्यक्त केला, जनमत रेट्या पुढं यांना नमते घ्यावे लागले आणि तातडीने कॅबिनेट घेऊन यांनी निर्णय आज घेतला असे शिवसेना म्हणाली. 1 महिन्यात आता राहिलेली प्रक्रिया पूर्ण करावी, फक्त जसे व्हीटीचे सिएस्टी झाले तसे आज घोषित केलेल्या नावाचे होऊ नये असा टोलाही शिवसेनेने लगावलाय.

  • 16 Jul 2022 02:53 PM (IST)

    शिंदे गटाकडून अमरावती शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांच्याशी संपर्क

    शिंदे गटातील व्यक्तीने राजेश वानखडे यांना बैठकीला बोलावलं.राजेश वानखडे बैठकीला गेले नसल्याची सूत्रांची माहिती. शिंदे गटातील व्यक्ती अमरावतीमध्ये आल्याची सूत्रांची माहिती…

  • 16 Jul 2022 02:30 PM (IST)

    खान्देशला वरदान ठरलेल्या गिरणा धरणाचा पाणीसाठा 92 टक्के

    *खान्देशला वरदान ठरलेल्या गिरणा धरणाचा पाणीसाठा 92 टक्के

    * धरणातून 2476 क्यूसेस पाण्याचा गिरणा नदीत विसर्ग सुरू

    * धरणांचे दोन दरवाजे 1 फुटाने उचलले..

    * नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    * अडीच महिने आगोदरच धरणाने गाठली पातळी …

    * जळगावसह खान्देशच्या पिण्याचा प्रश्न मिटला.

  • 16 Jul 2022 02:29 PM (IST)

    21 जुलैला पुन्हा काँग्रेस रस्त्यावर उतरणार

    21 जुलैला पुन्हा काँग्रेस रस्त्यावर उतरणार

    सोनिया गांधी यांची 21 जुलैला ईडी चौकशी

    देशभरातील काँग्रेस शासित मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांना दिल्ली येण्याचा आदेश

    21 जुलैला राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस करणार मोठे शक्ती प्रदर्शन

  • 16 Jul 2022 02:29 PM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यातील किती पट्टी भागात आजही उधाण

    रत्नागिरी- जिल्ह्यातील किती पट्टी भागात आजही उधाण

    किनारपट्टी भागात 3.65 मीटर उंचीच्या लाटा

    भगवती जेटीवरून अजस्त्र लाटा पलीकडच्या बाजूला

    रत्नागिरी साखरीनाटे गुहागर दापोली लाटांचे तांडव

    पौर्णिमेनंतर सलग दुसऱ्या दिवशी समुद्राला उधाण

  • 16 Jul 2022 02:28 PM (IST)

    गोव्यात पाच दिवसांपूर्वी फसलेल्या ‘लोटस ऑपरेशन’ची पुन्हा चर्चा

    राष्ट्रपती पदाच्या निवडणूक मुहूर्तावर काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या भीतीने काँग्रेसने आपले पाच आमदार तातडीनेचेन्नईला हलवले

    गोव्यात पाच दिवसांपूर्वी फसलेल्या ‘लोटस ऑपरेशन’ची पुन्हा चर्चा

    संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडाल्फ फर्नांडिस, ऍड कार्लोस फरेरा, एल्टन डिकॉस्टा या पाच आमदारांना काँग्रेसने चेन्नईला हलवले

    सोमवारी राष्ट्रपती निवडणुकीवेळी मतदानासाठी हे पाच आमदार गोव्यात दाखल होणार

    काँग्रेसचे गोव्यात एकूण 11 आमदार

    पाच आमदारांचा एक गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या याधीच तयारीत होता

    मात्र, पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश म्हणजे 8 आमदारांची फुटीसाठी गरज असल्याने गेल्या आठवड्यात गोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ ऐनवेळी फसले होते.

  • 16 Jul 2022 01:30 PM (IST)

    शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी

    शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहर प्रमुख पदावरून हकालपट्टी

    कल्याण शहर प्रमुख पदी सचिन बासरे यांची नियुक्ती

    शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून बासरे यांची नियुक्ती जाहीर

    सचिन बासरे टीम टर्म नगरसेवक ,सभागृह नेते पदाचा कार्यभार

    शिवसेनेत अनेक संघटनात्मक पदावर कार्य केलं आहे

    कट्टर शिवसैनिक म्हणून बासरे यांची ओळख

  • 16 Jul 2022 01:29 PM (IST)

    औरंगाबादच्या गुलमंडीवर भाजपचा जल्लोष

    औरंगाबादच्या गुलमंडी वर भाजपचा जल्लोष

    औरंगाबाद शहराचे नाव बदलल्याचे पार्श्वभूमीवर जल्लोष सुरू

    भाजपचे अनेक कार्यकर्ते जल्लोषात सहभागी

    ढोल तासे वाजवत भाजपचा जल्लोष सुरू

  • 16 Jul 2022 01:15 PM (IST)

    मराठी पाट्यांसाठी व्यापाऱ्यांना सतत मुदतवाढ का ?

    – मराठी पाट्यांसाठी व्यापाऱ्यांना सतत मुदतवाढ का ?

    – अमराठी व्यापारी राज्य सरकार, महापालिकांचे जावई आहेत का ?

    – मनसे जनहित संघटनेचे सरचिटणीस जयराज लांडगे यांचा राज्य सरकारला सवाल,

    – मराठीचा अवमान असाच सुरू राहिल्यास अमराठी व्यापाऱ्यांना मनसेचा धडा शिकवण्याचा इशारा.

  • 16 Jul 2022 01:15 PM (IST)

    15 दिवसाच्या शिंदे सरकारवर एकनाथ खडसे बरसले – एकनाथ खडसे

    -15 दिवसाच्या शिंदे सरकारवर एकनाथ खडसे बरसले

    FTP-muktainagar 1Ravi Gore Eknath khadse.mp4

    -पंधरा दिवस घालवले अजून मंत्री मंडळाचा विस्तार नाही त्यामुळे अनेक कामे प्रलंबित

    -या शिंदे सरकारने संवेदने घालवले का? पूरग्रस्त व शेतकऱ्यांना मदत नाही

    -राज्यात पुराने हाकार घातला आहे गावाचे गाव वाहून जात आहेत

    पूरग्रस्तांमध्ये नागरिक निर्वासित झाले आहेत त्यांना मदत द्यायला कोणी तयार नाही

    शेतकरी मोठ्या प्रमाणात संकटात आहे

    या शिंदे सरकारने संवेदने घालवले का

    पंधरा दिवस झाले हे सरकार त्यांच्या आमदारांच्या जेवणाडीमध्ये व्यस्त

    फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपल्या आमदारांना घेऊन जाऊन देण्यासाठी यांना वेळ आहे

    आमदारांना फाईस स्टार हॉटेलमध्ये जेवण द्यायचं असेल तर त्या मात्र शेतकऱ्यांनाही न्याय द्या?

    राज्यात अनेक जिल्ह्यात पालकमंत्री नाही कोणत्या मंत्रिमंडळाचा विस्तार नाही चाललय काय?

    मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांना ग्रामीण भागातील जनतेचा काही घेणं देणं नसल्याचे दिसते

    मंत्रिमंडळाचा विस्तारचं अद्याप झाला नसल्याने जनतेला दिलासा कोण? देईल

    एकनाथ खडसेंच्या विधा परिषद विधानसभेच्या विरोधी पक्षनेते वर्णी बाबत

    विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत माजी अद्याप आमच्या कुठलीही वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही मला याबाबत विचारण्यात आले हे नाही न

    नाही मात्र ज्या पक्षाचे आमदार जास्त त्याचाच विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता होईल

    – शहराच्या औरंगाबादच्या व उस्मानाबादच्या नामांतरावर खडसेंची प्रतिक्रिया

    माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद उस्मानाबाद नामकरण शिक्का मोर्तब झाला होता तरीही

    शिंदे सरकारचं औरंगाबाद, उस्मानाबाद नामकरण करणावर क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे

    पंधरा दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार नाही देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब हे दोघेच सरकार चालवत आहेत

    या दोघांच्या भरोशावर राज्य चालू आहे जनता वारेवर आहे

    आगामी निवडणुका राष्ट्रवादीचे सर्विस शरद पवार यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित निवडणुका लढायला पाहिजे असे सांगितले आहे

  • 16 Jul 2022 01:11 PM (IST)

    संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

    संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

    शिवाजी रस्त्यावर वाहतूक कोंडी

    पोलिसांकडून मंदिर परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे

    दर्शनासाठी रांग बनवण्यात आलीये

    आज चतुर्थीच्या निमित्ताने पुणेकरांनी गर्दी केलीये

    याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी

  • 16 Jul 2022 12:44 PM (IST)

    लोणावळ्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांना उद्यापर्यंत बंदी

    -लोणावळ्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांना उद्यापर्यंत बंदी

    – पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उद्या रविवार पर्यंत आणि जिल्हाधिकारी यांचा पुढचा आदेश येईपर्यंत ही पर्यटन स्थळी बंदी असणार आहे

    -लोणावळा पोलिसांनी लोणावळ्यातील पर्यटन स्थळे जाणारे मार्ग बॅरिगेट्स लावून बंद करण्यात आलेत

    -स्थानीक नागरिक आणि हॉटेल मधील बुकिंग पाहून पोलीस पर्यटन स्थळाकडे सोडत आहे

  • 16 Jul 2022 12:33 PM (IST)

    संजय राऊतांच्या स्टेटमेंटला लोक ऐकायला तयार नाही, शिवसेनेची अवस्था केविलवाणी…

    – संजय राऊतांच्या स्टेटमेंटला लोक ऐकायला तयार नाही, शिवसेनेची अवस्था केविलवाणी…

    – कॅबिनेटला ऊशीर होतोय, पण कोणतंही काम थांबलं नाहीये, महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत, संजय राऊत बोलायचं मेहणून बोलतात, अंताची चिंता करू नका, तुमचं काय होईल ते पाहा…

    – ऊद्धव ठाकरेंना सांगायचंय की यांना आवर घाला नाहीतर सेना संपेल…

    – तेयांचा प्रण की सेनेत केवळ ऊद्धव आणि अदित्यच राहतील अशी व्यवसथा करायची…

    – चंद्रकांत खैरेंनी आमची काळजी करू नये, लोकसभा आहे त्याकडे लक्ष द्या… नाहीतर कळेल

    – सगळ्या राज्यात सरपंच थेट निवडण्याचा निर्णय, हा ेामचा निर्णय, घोडेबाजार करायचा, पैशांचं गैरव्यवहार करायचा हे ऊद्देश मविआचं होतं…योग्य माणसाची निवड होईल…

    – सगळ्या राज्यात हीच पद्धत सुरू आहे.. दबाव तंत्र आहे सगळं सुरू आहे, शिवसेनेत राहायला कुणी तयार नाहीत, शिवसेनेत राहण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नाहीये , लोकं कंटाळलेले आहेत…

  • 16 Jul 2022 12:32 PM (IST)

    जीएसटीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो – अजित पवार

    हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे..

    जीएसटीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो

    नवीन जे अर्थमंत्री होतील त्यांना देखील मी विनंती करणार आहे

    18 लोकसभेचे अधिवेशन सुरू होतंय त्यावेळी खासदारांनी हा मुद्दा मांडावा

    वरीष्ठ लोकांनी यात लक्ष घालून यातून मार्ग काढावा. अर्थमंत्र्यांनी यातून मार्ग काढावा

    -ऑन नामांतर

    अनेकदा पाठीमागच्या सरकारने घेतलेले निर्णय फेरविचारासाठी घेतले जातात. तो त्यांचा अधिकार आहे

    जे जनतेच्या हिताचे निर्णय असतात ते घेतले जातात. आम्ही तसे निर्णय घेतले आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक आहे. ती झाल्यानंतर मी अधिकृत रित्या बोलेल

    -ऑन मंत्रिमंडळ विस्तार

    विश्वास दर्शक ठराव पास केला, अध्यक्ष नेमला मग मंत्रिमंडळ विस्तार का केला नाही हे कळत नाही. पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्याठिकाणी पालकमंत्री नेमणे गरजेचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जनतेच्या वतीने मी विनंती करतो आहे की मंत्रिमंडळ विस्तार करावा

    अतिवृष्टीमुळे लोकांना त्रास करावा लागतो तो दूर करावा, अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. बियाणे उपलब्ध करून द्यावी लागतील. ज्यांची घर पडली आहेत त्यांना मदत करावी..

    – ऑन सेना चिन्हमुळे निवडणूक पुढे ढकलली आरोप

    आरोपाना तथ्य नसत. आरोपाला उत्तर द्यायला मी रिकामा नाही. जी वस्तुस्थिती समोर आल्यावर मी प्रतिक्रिया देईल

    -ऑन सेना राष्ट्रवादी युती

    यावर उद्धव ठाकरे आणि पवार साहेब जो निर्णय घेतील त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करू

    -अजित पवार ऑन थेट नगराध्यक्ष सरपंच निवडणूक

    बाजार समितीत शेतकऱ्यांना संधी दिली त्याबद्दल दुमत असण्याचे येण्याचं कारण नाही पण त्याचा बोजा हा बाजार समितीवर पडणार आहे.

    नगराध्यक्ष थेट करता, सरपंच थेट करता, मग मुख्यमंत्री पण थेट करा, पंचायत समितीचा सभापती पण थेट करा. राष्ट्रपती देखील थेट करा.

    लोकशाहीत काही परंपरा घालून दिल्या आहेत. त्याच पालन करावे लागत..

    सरपंच आणि नगराध्यक्ष एका विचाराचे असतात आणि बॉडी दुसऱ्या विचारांची असते. त्यामुळे बॉडीला विचारून निर्णय घेत नाहीत. मग एक हाती जाते आणि हे लोकशाहीला घातक असते..

    ज्यांच्याकडे मसल पावर आहे किंवा मणी पॉवर आहे तेच अशा प्रकारच्या निवडणूक लढवू शकतात

    दोघांचे मंत्रिमंडळ असल्याने त्यांना हा निर्णय घेण्याची घाई झाल्याचे दिसत आहे.

    पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा चर्चेला घ्यायला पाहिजे हा होता..त्यावर काही सूचना आल्या असत्या. त्यावर चर्चा झाली असते ते जास्त योग्य ठरले असते..

    -ऑन मध्यवर्ती निवडणूक

    अजिबात मध्यवर्ती निवडणूक होतील अस वाटत नाही..

  • 16 Jul 2022 12:03 PM (IST)

    आज मंत्रीमंडळाची बैठक झाली, राज्य शासनाकडून नवे निर्णय घेण्यात आले आहेत – एकनाथ शिंदे

    आज मंत्रीमंडळाची बैठक झाली . त्यावेळी काही निर्णय शासनाने घेतले. हे प्रस्ताव पुन्हा सादर करा. आजच्या कॅबिनेट नावमध्ये औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबादचं नाव देखील धाराशीव करण्यात आलं आहे. लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला असं नाव देण्यात आलं आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला खूप महत्त्व असतं. त्यामध्ये हे निर्णय घेतले आहेत. याचा कायदा करावा लागतो. याचा ठराव तयार करावा लागतो. एमएमआरडीए खूप मोठा प्रोजेक्ट तयार करत आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल.

    मेट्रो, ट्रॅफिकचे कोंडी सोडवण्याचं काम सुरू आहे. एमएमआरडीए अनेक कामे करत असते. ६० हजार कोटीपर्यंतचं कर्ज उभारण्यासा एमएमआरडीएला मान्यता दिलं आहे. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटी रकमेची आज शासन हमी देण्यात आली आहे. कोणताही प्रकल्प थांबणार नाही. याची काळजी. फडणवीसांच्या कारकिर्दीत अनेक प्रकल्प सुरू झाले. दोन वर्षात कोविड आणि तर कारणाने हे प्रकल्प मार्गी लागले नाही.

  • 16 Jul 2022 11:27 AM (IST)

    सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे – आदित्य ठाकरे

  • 16 Jul 2022 10:56 AM (IST)

    मीरामार बीचवर महिलेचा मृतदेह


    मीरामार बीचवर महिलेचा मृतदेह

    25 ते 30 वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह

    मिरामार पोलीस घटनास्थळी दाखल

    अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ

    मुसळधार पावसामुळे बीचवरची अनेक हॉटेल्स बंद

    सीसीटीव्ही द्वारे पोलिसांकडून चौकशी केली जाणार

    मृत महिला भारतीय असल्याचा अंदाज

  • 16 Jul 2022 10:45 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर मध्ये दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूर मध्ये दाखल

    काही वेळातच बुंदेलखंड महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडणार

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांचे केले स्वागत

  • 16 Jul 2022 10:42 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचा फोन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचा फोन

    ललित पाटील या एमपीएससी विद्यार्थ्यांन मुख्यमंत्र्यांना केला फोन

    एकनाथ शिंदेंनी बाजू मांडण्यासाठी स्विय सहाय्यकाला फोन करण्याची केली विनंती

    विद्यार्थ्यांची तक्रार घेतली ऐकून एमपीएससी भरतीत कमी जागा असल्याची केली तक्रार

    काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाची घेतली बैठक

    लवकरच जागा वाढीसंदर्भात मागणीपत्र राज्य सरकारकडून दिलं जाणार एमपीएससीला

    राज्य सेवा पुर्व परीक्षा 2022 जाहीरातीत फक्त 166 जागांची भरती

    मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल लवकरात लवकर मागणीपत्र एमपीएससीला जाणार

    विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • 16 Jul 2022 10:34 AM (IST)

    मीरामार बीचवर महिलेचा मृतदेह

    मीरामार बीचवर महिलेचा मृतदेह

    25 ते 30 वर्ष वयोगटातील महिलेचा मृतदेह

    मिरामार पोलीस घटनास्थळी दाखल

    अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ

    मुसळधार पावसामुळे बीचवरची अनेक हॉटेल्स बंद

    सीसीटीव्ही द्वारे पोलिसांकडून चौकशी केली जाणार

    मृत महिला भारतीय असल्याचा अंदाज

  • 16 Jul 2022 10:30 AM (IST)

    महाराष्ट्राच्या जनतेमध्ये काय खळबळ माजली आहे आम्हाला माहित आहे – संजय राऊत

    या देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल.

    जगातल्या सगळ्यात मोठी लोकशाही असं आपण म्हणू, तर ते पंख कापण्याचे काम करीत आहेत

    शिवसेनेतून काढण्यात आहेत, शिवसेना तुम्ही सोडलेली आहे.

    तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापण करा, बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आहे

    तुम्ही तुमचं स्वत:च स्थान निर्माण करा

    ठीक आहे, बंडखोर नेत्याला असं बोलावं लागतं

    महाराष्ट्राच्या जनतेमध्ये काय खळबळ माजली आहे आम्हाला माहित आहे

    इतिहास बदलण्याची ताकद त्यांच्यात नाही

    त्यांना काहीही करू द्या मुळात सरकारचं बेकायदेशीर आहे

    एकदुजेकेलिये सिनेमात काय झालंय हे सगळ्यांनी पाहिलं आहे

  • 16 Jul 2022 10:18 AM (IST)

    खाडा गावातून जव्हार कडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बंद

    पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात मुसळधार पावसामुळे मोखाडा जव्हार रस्त्यावर जुने वडाचे झाड पडल्यामुळे मोखाडा गावातून जव्हार कडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बंद झाला आहे  पोलिसांन कडून हा मार्ग मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे या घटनेत  जीवित हानी झालेली नाही

  • 16 Jul 2022 10:15 AM (IST)

    कोल्हापुरातील बंदला धान्य व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    अन्न धान्या सह जीवनावश्यक वस्तूवर लावलेल्या जीएसटी विरोधात आज महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स राज्यव्यापी बंदअन्नधान्य दुकान बंद एक दिवस बंद ठेऊन सरकारच्या निर्णयाचा करणार निषेध

    कोल्हापुरातील बंदला धान्य व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    लक्ष्मीपुरीतील धान्य लाईन कडकडीत बंद

    बंद मुळे धान्य लाईन परिसरात शुकशुकाट

    निर्णय लवकर मागे घ्या अन्यथा राज्यभर तीव्र लढा उभारणार

    महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांचा इशारा

  • 16 Jul 2022 10:14 AM (IST)

    महाविकास आघाडी ही आम्हाला मान्य नाही – शिवतारे

    महाविकास आघाडी ही आम्हाला मान्य नाही.

    हे का करावं लागलंयय

    माझी भूमिका या आगोदर देखील मांडली होती

    संजय राऊतांनी शिवसेना राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधली आहे

    ठाकरे यांनी संजय राऊतांना का कळत नाही

    अजून राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी जुळवून घ्या असं सांगितलं जात आहे

    राऊतांमुळे शिवसेनेचे हाल सुरू झाले

    गोव्यात सुध्दा आदित्य ठाकरेंच्या तोंडावर पाडलं

    युपीमध्ये सुध्दा शिवसेनेचं डिपोझिट जप्त झालं

    आमदार विजय शिवतारे

    माझ्या प्रश्नांसाठी मी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे

    आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र आहोत.

    तुम्ही मतदार संघावरती लक्ष द्यावं…

    महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांची बोंब होती.

    ही फक्त सुरुवात आहे…सगळे कार्यकर्ते शिवसेनेच्या संपर्कात असतील

  • 16 Jul 2022 10:09 AM (IST)

    कॅबिनेट बैठकित एकनाथ शिंदे ठाण्याबाबत महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता…

    ब्रेक – आज कॅबिनेट बैठकित एकनाथ शिंदे ठाण्याबाबत महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता…

    1. १. इस्टर्न एक्सप्रेस फ्रि वे मानखुर्दपासून पुढे ठाण्यापर्यंत नेण्यावर आज निर्णय होण्याची शक्यता
    2. २. ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट फेस १ च्या विकासाला हिरवा सिग्नल
    3. ३. ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत आराखडा मंजूर होऊन आयुक्तांना दिशा निर्देश जारी होण्याची शक्यता…
  • 16 Jul 2022 09:56 AM (IST)

    व्यापाऱ्यांच्या भारत बंदमध्ये पुण्यातील व्यापाऱ्यांचा सहभाग नाही

    व्यापाऱ्यांच्या भारत बंदमध्ये पुण्यातील व्यापाऱ्यांचा सहभाग नाही

    पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाची भूमिका

    केंद्र सरकारने घेतलेल्या 5 टक्के जीएसटी निर्णयाला आमचा विरोध आहे

    मात्र सर्वसामान्य नागरिकांच नुकसान होऊ नये यासाठी आम्ही बंदमध्ये सहभागी होणार नाहीत

    देश स्तरावरील मोठ्या संघटनेनं बंद पुकारल्यास आम्ही विचार करू

    पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांची माहिती.

  • 16 Jul 2022 09:56 AM (IST)

    कृष्णावंती नदीच्या पात्रात क्रेटा गाडी वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू

    कृष्णावंती नदीच्या पात्रात क्रेटा गाडी वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू.. अकोले तालुक्यातील कळसुबाई जवळील वारंघुशी परिसरातील घटना… पर्यटनासाठी आलेल्या 2 पर्यटकांचा मृत्यू.. एकाला वाचविण्यात यश.. स्थानिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात यश… क्रेटा गाडी पाण्यात वाहून गेल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू.. तर अन्य एका घटनेत तोल जाऊन पर्यटक पडला कृष्णावंती नदीत.. नाशिक जिल्ह्यातील 72 वर्षीय पर्यटकाचा शोध सुरू… गाडी वाहून गेली त्याच परिसरातील दुसरी घटना.. दोन्ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडल्या आहेत

  • 16 Jul 2022 09:55 AM (IST)

    अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

    अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार

    सकाळी 10 वाजता अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जाणार

    सद्या धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

    धरणा खालील गावांना अलमट्टी धरण प्रशासनाने अलर्ट राहण्याच्या दिल्या सूचना

    अलमट्टीचा विसर्ग वाढविणार असल्याने कोल्हापूर, सांगली सर्वच नद्याची पाणी पातळी कमी व्हायला मदत होणार

  • 16 Jul 2022 09:29 AM (IST)

    सेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची सेनेतून हकालपट्टी

    – सेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची सेनेतून हकालपट्टी,

    – विजय शिवतारे यांनी एकनाथ गटाला समर्थन दिल्यामुळे सेनेकडून हकालपट्टी,

    – विजय शिवतारे यांनी पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे सेनेकडून कारवाई,

    – विजय शिवतारे हे पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी सेनेचे आमदार

  • 16 Jul 2022 09:23 AM (IST)

    शहरातील पूर ओसरायला सुरुवात

    चंद्रपूर: – शहरातील पूर ओसरायला सुरुवात,

    रहमत नगर- राजनगर या भागातील नागरिकांना दिलासा,

    ईरई धरणाचे सात पैकी दोन दरवाजे 0.25 मीटर्सने खुले,

    चंद्रपूर -राजुरा मार्ग वर्धा नदी पुलावर पाणी असल्याने अद्यापही बंद,

    येथेच प्रशासनाने खुला केला सास्तीचा पर्यायी मार्ग,

    चंद्रपूर गडचिरोली जोडणारा आष्टी पूल अद्यापही बंद

  • 16 Jul 2022 08:49 AM (IST)

    जुने नाशिक परिसरात वाड्याची भिंत कोसळली

    -जुने नाशिक परिसरात वाड्याची भिंत कोसळली

    -पावसामुळे वाड्याची भिंत कोसळून, दोन जण जखमी

    -चौक मंडई जवळील बुरुड गल्लीत घडली घटना

    -अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना हलवलं रुग्णालयात

    जुने नाशिक परिसरात धोकादायक वड्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

  • 16 Jul 2022 08:41 AM (IST)

    सलग चार दिवस झालेल्या रिमझिम पावसामुळे सोलापूर शहरातील रस्त्याची झाली चाळण

    – सलग चार दिवस झालेल्या रिमझिम पावसामुळे सोलापूर शहरातील रस्त्याची झाली चाळण

    – शहरातील प्रामुख रस्त्यांची अक्षरशः झाली दुरवस्था

    – पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने नागरिक संतप्त

    – महापलिकेकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी वर्षाकाठी 12 कोटीचा निधी होतो खर्ची

    – मात्र तरीही नागरिकांना खड्ड्यातून वाट काढत जावे लागते

  • 16 Jul 2022 07:57 AM (IST)

    पुण्यात लवकरच शिंदे गटाचा जाहीर मेळावा

    पुण्यात लवकरच शिंदे गटाचा जाहीर मेळावा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार मेळाव्याला हजेरी

    पुण्यात शिंदे समर्थकांकडून मेळाव्याची तयारी सुरु

    पुढच्या आठवड्यात मेळावा होण्याची शक्यता

    शिवसेनेचे अनेकजण संपर्कात शिंदे समर्थकांचा दावा

    पुण्यात मेळावा घेऊन शिंदे गट करणार शक्तीप्रदर्शन !

  • 16 Jul 2022 07:56 AM (IST)

    सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

    सोमवारपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

    अधिवेशनात डिजिटल मीडियाबाबतचा कायदा संमत केला जाणार

    प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमाणे डिजिटल मीडिया ही केंद्र सरकारच्या अख्यत्यारीत येणार

    यापूर्वी डिजिटल मीडियावर केंद्र सरकारच कोणतही नियंत्रण नव्हतं

    यापुढे डिजिटल मीडिया केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार

    डिजिटल वार्तांकनासाठी यापुढे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार

    केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रक्रिया सुरू झाल्याची , सूत्रांची माहिती

  • 16 Jul 2022 07:55 AM (IST)

    गोदावरीला सलग सहाव्या दिवशी पूरस्थिती कायम,

    गोदावरीला आज सलग सहाव्या दिवशी पूरस्थिती कायम..

    गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आज देखील सुरूच

    धरणातून सध्या 7000 क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग

    दुतोंडया मारुतीच्या कमरेला पाणी

    पूर स्थितीत गोदाघाटच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा

    आज आणि उद्या पावसाचा अंदाज

  • 16 Jul 2022 07:44 AM (IST)

    मुसळधार पावसामुळे गोठा पडल्याने जनावरांचा जागीच मृत्यू..


    मुसळधार पावसामुळे गोठा पडल्याने जनावरांचा जागीच मृत्यू..

    2 म्हशी च्या मृत्यु तर 5 शेळ्या जखमी.3 शेतकऱ्यांचे नुकसान.

    तुमसर तालुक्यातील बपेरा येथील घटना.

    संबंधित नुकसान झाल्याची माहिती तहसील प्रशासनाला देण्यात आली असून तलाठ्यामार्फत पंचनामा करण्यात आला आहे.आता नुकसान भरपाई ची प्रतिक्षा आहे.

  • 16 Jul 2022 07:43 AM (IST)

    युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी

    युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी

    शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची घोषणा

    युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांनी पक्षाच्या विरुद्ध काम केल्याने शिवसेनेतून हकलपट्टी

    हकालपट्टीची घोषणा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी युवा सेनेच्या निष्ठा मेळाव्यात केली

    राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर गटाला समर्थन दिल्याने हकालपट्टी

  • 16 Jul 2022 07:41 AM (IST)

    मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आता 3 वर्षे वेतनवाढ रोखणार..

    मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आता 3 वर्षे वेतनवाढ रोखणार..

    जिल्हा परिषद अंतर्गत, शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य कर्मचार्यांना मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश..

    3 वर्षासाठी वेतनवाढ रोखण्याच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उडाली खळबळ..

    वारंवार मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर दुसऱ्यांदा विभागप्रमुख करतील कारवाई..

    औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आदेश..

  • 16 Jul 2022 07:40 AM (IST)

    रत्नागिरी- यंदाच्या वर्षी देखिल गणेशोत्सवात मोदी एक्स्प्रेस धावणार

    रत्नागिरी- यंदाच्या वर्षी देखिल गणेशोत्सवात मोदी एक्स्प्रेस धावणार

    २८ आँगस्टला दादर स्थानकातून सुटणार मोदी एक्स्प्रेस

    सकाळी दहा वाजता दादर ते साावंतवाडी अशी धावणार हि रेल्वेगाडी

    मुंबई भाजपकडून हि गाडी सोडण्यात येणार,

    यासाठीचा खर्च देखिल मुंबई भाजप उचलणार

  • 16 Jul 2022 07:08 AM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बारामती दौरा..

    बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बारामती दौरा..

    – पहाटे ६ वाजल्यापासून अजितदादांकडून विकासकामांची पाहणी..

    – बारामती व परिसरातील विकासकामांची पाहणी..

    – कन्हेरी येथील फळ रोपवाटिकेचीही अजितदादांकडून पाहणी..

  • 16 Jul 2022 07:05 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाश शिंदे राज्यातील मतदारसंघाचा घेणार आढावा

    मुख्यमंत्री एकनाश शिंदे राज्यातील मतदारसंघाचा घेणार आढावा

    निरीक्षक पाठवून घेणार आढावा

    आज पुरंदर तालुक्यात मुंबईतून येणार निरीक्षक

    पुरंदर तालुक्यात आज बोलावली बैठक

    बैठकीला कार्यकर्त्यांना हजर राहण्याचे आदेश

    विजय शिवतारेंनी शिंदे गटात जाण्याचा घेतलाय निर्णय !

  • 16 Jul 2022 07:05 AM (IST)

    शिवतारेंनी शिंदे गटात जाण्याचा घेतलाय निर्णय

    पुरंदर तालुक्यातील गावागावात बनवण्यात आलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपमधून ज्या शिवसैनिकांना विजय शिवतारेंची भूमिका मान्य नाही त्यांना ग्रुपमधून वगळा

    विजय बापू शिवतारे समर्थकांना आदेश

    विजय शिवतारे समर्थक आणि इतर शिवसैनिक यांची भूमिका वेगळी आहे

    त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण होऊ शकतं

    त्यामुळे भूमिका मान्य नसलेल्यांना ग्रुपमधून वगळा

    शिवतारेंनी शिंदे गटात जाण्याचा घेतलाय निर्णय

    पुरंदर तालुक्यात शिवतारे समर्थक विरुद्ध शिवसेना संघर्षाची चिन्हं

  • 16 Jul 2022 07:04 AM (IST)

    पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी क्षेत्रात धरणातील पाणीसाठ्यात वाढ

    पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी क्षेत्रात धरणातील पाणीसाठ्यात वाढ

    खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात 16 टीएमसी जलसाठा झाला जमा

    खडकवासला, पानशेत ,टेमघर आणि वरसगाव या धरणक्षेत्रात 55 टक्के पाणीसाठा जमा

    खडकवासला धरणं भरलं 100 टक्के

    तर इतरही धरणं पाऊस असांच राहिल्यास भरण्याच्या मार्गावर !

  • 16 Jul 2022 07:04 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा होतेय वाढ

    कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा होतेय वाढ

    केल्या 24 तासात आढळले 34 नवे रुग्ण

    रुग्णाची संख्या एका दिवसात दुपटीने वाढली

    जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या पोहचली 124 वर

    रुग्ण संख्या वाढल्यान चाचण्याची संख्या ही वाढवली

  • 16 Jul 2022 06:41 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाश शिंदे राज्यातील मतदारसंघाचा घेणार आढावा

    मुख्यमंत्री एकनाश शिंदे राज्यातील मतदारसंघाचा घेणार आढावा

    निरीक्षक पाठवून घेणार आढावा

    आज पुरंदर तालुक्यात मुंबईतून येणार निरीक्षक

    पुरंदर तालुक्यात आज बोलावली बैठक

    बैठकीला कार्यकर्त्यांना हजर राहण्याचे आदेश

    विजय शिवतारेंनी शिंदे गटात जाण्याचा घेतलाय निर्णय !

  • 16 Jul 2022 06:34 AM (IST)

    पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार

    पालघर जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडार

    पालघर चे शिवसेना खा राजेंद्र गावित, वसई तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, बविआ तुन काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले वसई विरार चे माजी स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांच्यासह 50 शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील…

    आज सायंकाळी च्या सुमारास वसई विरार नालासोपारा परिसारातील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटाला दिले समर्थन…

  • 16 Jul 2022 06:33 AM (IST)

    गोसेखुर्द धरण ठरत आहे पर्यटकांसाठी पर्वणी

    – गोसेखुर्द धरण ठरत आहे पर्यटकांसाठी पर्वणी.

    – पर्यटकांची वाढली रेलचेल

    – धबधबा प्रमाणे होत असलेला पाण्याचा विसर्ग बघण्यासाठी गोसीखुर्द धरनावर पर्यटकांची गर्दी.

  • 16 Jul 2022 06:33 AM (IST)

    विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

    माजी आमदार विजय शिवतारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

Published On - Jul 16,2022 6:26 AM

Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.