Maharashtra News Live Update : वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक, बैठकीत काय खलबतं?

| Updated on: Mar 11, 2022 | 11:16 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक, बैठकीत काय खलबतं?
Image Credit source: tv9 marathi

गुरुवारी पाच राज्यांचे निवडणूक निकाल हाती आले. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश होता. यापैकी चार राज्यात भाजपाला मोठे यश मिळाले आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का देत आपने बाजी मारली आहे. चार राज्यात भाजपाला यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नेत्यांसह कार्यकर्ते विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. दरम्यान आज मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. काल रात्रीपासूनच तयारीला सुरुवात झाली असून, मुंबईत अनेक ठिकाणी पक्षाचे बॅनर आणि झेंडे लावण्यात आले आहेत. निवडणुकीत यश मिळाल्याने देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 11 Mar 2022 08:20 PM (IST)

    पुण्यात संभाजी उद्यानाजवळ दुचाकी पावसामुळे झाल्या स्लीप

    12 दूचाकी स्लीप झाल्याची माहिती ..

    गुडलक चौक, डेक्कन पोलीस स्टेशन चौकातही गाड्या स्लीप झाल्याची माहिती

    महिला पोलीस जखमी झाल्याची माहिती

    घटनास्थळाकडे अग्निशमन दलाची गाडी रवाना

  • 11 Mar 2022 07:44 PM (IST)

    टीव्ही 9 मराठीला आयोगातील विश्वसनीय सूत्रांची माहिती…

    राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचं कामकाज घेतलं काढून

    ओबीसी आरक्षणासाठी नवीन आयोग स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार

    मात्र एक आयोग नियुक्त केला असताना दूसरा आयोगा कसा स्थापन करणार ?

    मात्र राज्य मागासवर्गीय आयोगाचं कामकाज राज्य सरकारने काढलं

  • 11 Mar 2022 07:14 PM (IST)

    महाविकास आघाडीच्या नेत्यांची खलबतं

    जलसंपदा मंत्री जयंत पाटील वर्षा बंगल्यावर दाखल

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू

  • 11 Mar 2022 06:34 PM (IST)

    मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी रेल्वेसेवा उशिराने

    वांगणी – शेलू स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात झाला होता बिघाड

    दुसरं इंजिन लावून मालगाडी रवाना, मात्र रेल्वेसेवा जवळपास २ तास होती ठप्प

    अजूनही रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलंच

  • 11 Mar 2022 05:45 PM (IST)

    काँग्रेस खासदार कुमार केतकर यांचे भाकित

    महाराष्ट्र राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे

    आता पाच राज्यांच्या निकालानंतर हा प्रयत्न जोमाने सुरु होणार

    आत्ताचे विरोधक यापूर्वी भाजपसोबत होते त्यामुळेच विरोधक एकत्र येत नाहीयेत

    देशातल्या विरोधकांबाबत खासदार कुमार केतकर यांचे वक्तव्य

    विरोधी पक्षांनी शहाणपण दाखवण्याची गरज, विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न शरद पवार करत आहेत पण त्याला अनेक विरोधक विरोध करत आहेत

    निवडणुकीत रोड शो, मोठ्या रॅली हे निकष असू शकत नाहीत मग बाळासाहेब ठाकरे कधीच मुख्यमंत्री झाले असते पण त्यांचं राज्य बऱ्याच वर्षांनी आलंय

    केजरीवाल यांचा आप हा पक्ष मोठा होत असला तरी त्याचा धोका कुणालाच नाही – पण केजरीवाल यांच्यासमोर मोठी आव्हान आहेत – केतकर

  • 11 Mar 2022 05:18 PM (IST)

    ओबीसींना मोठा दिलासा

    ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आम्ही विधेयक आणलं होतं..

    या कायद्याला मान्यता हवी होती यासाठी राज्यपालांची स्वाक्षरी हवी होती

    ती स्वाक्षरी राज्यपालांनी केली

    मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती ..

  • 11 Mar 2022 04:16 PM (IST)

    वर्षा बंगल्यावर आज महत्वाची बैठक

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक

  • 11 Mar 2022 04:13 PM (IST)

    नाना पटोले 13 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 13 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    – सोलापूर शहर आणि जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या मेळाव्याला करणार मार्गदर्शन

    – त्याचबरोबर सोलापूर शहर-जिल्ह्यातील भटके विमुक्त जातीच्या मेळाव्यालाही लावणार हजेरी

    – सोलापूर महापालिका आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर करणार भाष्य

    – कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची माहिती

  • 11 Mar 2022 04:12 PM (IST)

    बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया

    मराठवाड्याच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसळणारा हा अर्थसंकल्प आहे

    या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीडच्या वॉटर प्रोजेक्टसाठी कुठलीही आर्थिक तरतूद नाही

    मराठवाड्याच्या विकासासाठी एकही रुपया या अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही

    मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय केलाय

  • 11 Mar 2022 03:30 PM (IST)

    अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांची घोषणाबाजी

    आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे.

    त्यानंतर विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत जोरदार घोषणाबाजी केली.

    हा अर्थसंकल्प फसवा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे

  • 11 Mar 2022 02:45 PM (IST)

    अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

    विकासाची पंचसुत्री राबविणार

    मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3

    फिरत्या पशुशाळा उभारणार

    8 कोटी रुपये खर्च करुन 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने सुरु करणार

    सर्व जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्‍णालय उभारणार

    देशातील होतकरु विद्यार्थ्‍यांना प्रवेश मिळावा म्‍हणून मुंबई, नाशिक आणि नागपूर मध्ये संस्‍था

    टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन

    प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय, 3 हजार 183 कोटींचा निधी

    पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार; सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली

    ​​​​​​​प्रशिक्षित मनुष्‍यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार

    पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद

    छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार

    कर्मचाऱ्यांची 275 कोटी 40 लाखांची देणी देणार

    41 हजार कोटींचे कर्ज वाटप

    ​​​​​​​वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र 100 कोटींचा निधी मिळणार

    येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला 3 हजार कोटी रुपये​​​​​​​

    शेततळे अनुदानात वाढ

    महिला सन्मान योजना वर्ष

    अन्न प्रक्रीया येत्या तीन वर्षांत राबविणार

    ​​​​​​​कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले

    नियमीत कर्जफेड शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदानात​​​​​​​​​​​​​​

    या आर्थिक वर्षात कृषी सिंचन योजनेचा विस्तार करणार

    20 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

    शेतकऱ्यांसाठी 60 हजार वीज कनेक्शन जोडणार​​​​​​​

    ​​​​​​​बैलांसाठी विशेष योजना​​​​​​​

    जलसंपदा विभागासाठी 13 हजार कोटींचा निधी

    आरोग्य सेवांवर तीन वर्षांत 11 हजार कोटी रुपयांचा खर्च

    हवेलीमध्‍ये छत्रपती संभाजी महाराज यांच स्‍मारक उभारणार, 250 कोटी रुपये खर्च करणार

  • 11 Mar 2022 01:24 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवरती टिका

    छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन करण्यासाठी सुधिर मुनगंटीवार उभे राहिले. ते बोलत असताना धर्मा बाबतचां अभिमान जागा झाला. हिंदू मुलगी मुस्लिम मुलासोबत लग्न करते यासाठी उपस्थित राहायचं. जर खरे हिंदुवादी सरकार असेल तर औरंगाबद नामकरण करणे गरजेचं होत. परंतु ते झाले नाही.

    आदिवासीच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याठिकाणी नविन टाऊन शिप करण्यचा प्रयत्न सुरू आहे. ज्या दिवशी सरकार गेलं त्यावेळीं 125 फाईल पडून होत्या. माञ आता त्या क्लिअर केल्या आहेत.

    आदिवासी आमदार आणि खासदार यांनी हा विषय सत्तत्यने मांडला होता परंतु यांनी आज पर्यंत काहीही केलेलं नाही.

  • 11 Mar 2022 12:32 PM (IST)

    भाजपचे 20 आमदार आणि अपक्ष 3 असे मिळून आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे – भाजप आमदार रवी नाईक

    आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आमचे 20 आमदार निवडून आले आहेत, 3 अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. बाकीचे काही माहीत नाही. आता आम्हाला कुणाची गरज नाही. आमदारांची बैठक बोलावली जाईल. मला वाटते डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री होतील.

    डॉ. सावंत साहेबांनी मेहनत घेतली आहे. आणखीही आमचे नेते होते. राज्याबाहेरूनही आले होते. महाराष्ट्रातून आले होते. त्यांनीही काम केले आहे. त्यामुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे. आमचे सरकार होणार हे नक्की आहे.

    मी कुठे तरी वाचले होते की मी डॉ प्रमोद सावंत यांना पाठिंबा देणार नाही. लोकमत पेपर ला हेड लाईन होती. (हे विधान महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आणि आमदार सुदिन ढवळीकर यांच्या संदर्भात आहे)

    महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा पाठिंबा कुणी घेतला माहित नाही. कुणाकडे पाठिंब्याचे पत्र दिलंय माहीत नाही. आम्हाला कुणाची गरज नाहीये. फुलफ्लेज भारतीय जनता पक्ष…आणखी येणार आमच्याकडे…

    काँग्रेसचे आमदार आमच्याकडे येणार याबाबत माझ्याकडे काही माहिती नाही. त्यांना त्यांच्या पक्षाने हॉटेलमध्ये लॉक करून ठेवले आहे…

  • 11 Mar 2022 12:25 PM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाची हजेरी

    – सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाची हजेरी

    – सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा भिजल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान

    – मार्केट यार्डातील कांद्याची आवक वाढल्याने कांद्याची पोती उघड्यावर राहिल्याने कांदा भिजला

    – पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान

    – त्याचबरोबर काढलेली ज्वारी, गहू, हरभरा तसेच कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान.

    – काढणीला आलेले द्राक्षाचे नुकसान होण्याची शक्यता

    – मध्यरात्रीपासून सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची रिमझिम सुरूच

    – जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून अद्याप सुर्यदर्शन झालेले नाही

  • 11 Mar 2022 11:58 AM (IST)

    महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही – जयंत पाटील

    जयंत पाटील

    त्यांचा विजय झाला आहे, उत्साहाच्या भरात असे दवे करणं स्वाभाविक आहे

    विजय तो विजय असतो, ज्यांचा पराभव झाला त्यांनी विचार करावा

    पराभव ज्यांचा झाला त्यांनी मान्य करावा

    यूपीमध्ये 1 कोटी 20 लाख बसपाला मतं मिळाली, पण एक आमदार निवडून आला

    याचा अर्थ सर्व विरोधक एकत्र आले असते तर चित्र वेगळं असतं

    आता जर तर बोलून काही फायदा नाही

    महाराष्ट्रातलं सरकार पडणार नाही

    काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत, त्यामळे सरकार काही पडणार नाही

    भ्रष्टाचारी फक्त भाजप सोडून इतर पक्षात आहेत असा दावा मोदींनी केलेल्या नाही

    त्यामुळे भाजप पक्षात जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करा

    परंतु त्यांच्या वर कारवाई होत नाही आहेत पुरावे देण्यात आले पण त्यांच्यावर कारवाई होत नाहीये

    चार राज्यात जिंकले म्हणून इथे धाबे दणाणायचे कारण नाही

    मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतंय

    काँग्रेसला सल्ला देणं योग्य नाही

    त्यांचे नेते अंतर्मुख होऊन चर्चा करतील

    यंत्रणा आक्रमक होतील की भाजप आक्रमक होईल

  • 11 Mar 2022 11:55 AM (IST)

    तब्बल घरफोडीचे 41 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी केली अटक 

    घरफोड्या करताना टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवत मुंबई ठाणे परिसरात तब्बल 41 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कोलशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे . मूळचा तामिळनाडूमधील नारायण तेवर हा फिरस्ता आहे , नारायण  गेली अनेक वर्ष मुंबई ,ठाणे सह आसपासच्या भागात  घरफोड्या सारखे गुन्हे करत होता. मागील तीन महिन्यापूर्वी  एका गुन्ह्या शिक्षा  भोगून जेलमधून परतला होता.

  • 11 Mar 2022 11:53 AM (IST)

    येरवड्यातील गाडीतळ येथे वाहनाची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न

    येरवड्यातील गाडीतळ येथे वाहनाची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असून एक चारचाकी वाहन, 5 रिक्षा,5 दुचाकी वाहनावर दगड, पालघन सारख्या हत्याराने काचा फोडल्या

    मुख्य रस्त्यावरील रिक्षा तसेच आतील गल्ली बोळातील वाहनावर तसेच नागरिकांच्या घरावर हत्यारे मारून दहशत माजविण्याचा प्रकार

  • 11 Mar 2022 11:52 AM (IST)

    ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिथे केंद्रीय तपास यंत्रणा काम करताना दिसताहेत – अस्लम शेख

    निवडणूक जिंकले अभिनंदन

    युपीत झाल ते महाराष्ट्रात होणार नाही

    निवडणुकांचा निकाल वेस्ट बंगालमध्ये जसा दिसला तासाच इथे दिसेल

    भाजपचे नेत्यांनी आतापर्यंत सरकार पाडण्याच्या तारखाच दिल्या आहेत

    भाजप जर एवढी शक्तिशाली असेल तर पंजाबमध्ये आली असती

    मुंबईत भाजप निवडून आले ते शिवसेनेमुळे

    सुरुवातीपासून शिवसेनेसोबत लढले

    आता बघा किती जागा जिंकतात ते

    ऑन मोदी स्टेटमेंट

    ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही तिथे केंद्रीय तपास यंत्रणा काम करताना दिसताहेत

  • 11 Mar 2022 11:50 AM (IST)

    मुश्रीफ यांचा 158 कोटींचा बेनामी व्यवहार बाहेर – किरीट सोमय्या

    आज मी दिल्लीत आलोय, यशवंत जाधव विरोधात बाकी एजन्सी नी पण चौकशी सुरू केली आहे

    मंत्री हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखाना विरोधात तपास करण्याचे आदेश देण्यात आलेत, महाराष्ट्र राज्याला लवकरच घोटाळा मुक्त करणार

    मुश्रीफ चौकशी इन्कम टॅक्स करत होत, हा विषय sfio कडे गेलाय,

    मुश्रीफ यांचा 158 कोटींचा बेनामी व्यवहार बाहेर

  • 11 Mar 2022 11:48 AM (IST)

    नारायण राणे यांच्या भ्रष्टाचारावर फडणवीस बोलले होते आता ते का बोलत नाहीत – नाना पटोले

    भाजप मध्ये ही भ्रष्टाचारी माणसे आहेत त्याच्यावर मोदी का बोलत नाहीत..

    नारायण राणे यांच्या भ्रष्टाचारावर फडणवीस बोलले होते आता ते का बोलत नाहीत..

    दोगली भूमिका भाजप ची पाहायला मिळते

    केंद्र सरकारच्या महागाई मुळे जनता होरपळली आहे..

    राज्यसरकारने महागाई,शेतकरी,कामगार यांना न्याय देण्यासाठी वेळ पडली तर कर्ज घेऊन मदत करावी अशी आमची भूमिका आहे..

    राष्ट्रपती राजवट लावायची भूमिका भाजप आधीपासूनच मांडत आहेत..

    महाराष्ट्र सरकारला धोका नाही 5 वर्ष सरकार चालेल.

    भ्रष्टाचाराचा एक पॅरॅमिटर ठरला पाहिजे..

    भाजप मध्ये ही भ्रष्टाचार आहे..

  • 11 Mar 2022 11:47 AM (IST)

    उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली – किरीट सोमय्या

    उद्धव ठाकरे आणि त्यांच्या माफिया सेनेची इज्जत गेली आहे, गोवा यूपी जनतेने दाखवून दिलं

    संजय राऊत यांच्यामार्फत स्टंट करून काही साध्य होत नाही

    काल उच्च न्यायालयात ठाकरे यांनी स्वतःची इज्जत घालवून घेतली, सामना मध्ये काय बातमी ??

    निल सोमय्या बाबत कोणती चौकशी करणार नाही – सामना

    मग राऊत यांनी 2 ट्रक कागदपत्रे दिली त्याच काय झालं ? हायकोर्टात ठाकरे यांनी लोटांगण घातलं,

    निल वर तुम्ही जो अत्याचार केला, त्याचा हिशोब सोमय्या नक्की घेणार – सोमय्या यांचा ठाकरेंना इशारा

    राऊत तुमच्या माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा, पुण्यात 77 सेना गुंड होते, त्यात 30 गुंड मुंबई मधील होते

  • 11 Mar 2022 11:24 AM (IST)

    गोवा भाजप विधिमंडळ गटनेते पदी डॉ प्रमोद सावंत यांची निवड होणार

    गोवा भाजप विधिमंडळ गटनेते पदी डॉ प्रमोद सावंत यांची निवड होणार.

    केंद्रीय विशेष निरीक्षक आज गोव्यात दाखल होणार

    विशेष निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ( नवनिर्वाचित भाजप आमदार ) यांची आज बैठक पार पडणार

    त्या बैठकीत गटनेता निवड होणार

    ही कार्यवाही पूर्ण केल्यावर राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला जाणार

    सत्तास्थापनेसाठी भाजपचे 20 आमदार, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 आणि अपक्ष 3 असे मिळून 25 आमदारांचे संख्याबळ आहे.

  • 11 Mar 2022 11:23 AM (IST)

    29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे – अमोल मिटकरी

    5 राज्यांच्या विधानसभा निकालाबाबत अनेक वाहिन्या दाखवत आहे की मोदी लाट कायम आहे परंतु असं नाही कालच्या पाच राज्यांव्यतिरिक्त जर माहिती घेतली तर भाजपची परिस्थिती वाईट आहे

    29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपचे स्पष्ट बहुमत आहे दुसरीकडे :- सिक्कीममध्ये 0 जागा मिझोराममध्ये 0 जागा तामिळनाडूमध्ये 0 जागा. त्यांच्याकडे जागा आहेत:- आंध्रमध्ये 175 पैकी 4 केरळमध्ये 140 पैकी 1 पंजाबमध्ये 117 पैकी 3 बंगालमध्ये 294 पैकी 3 तेलंगणात 119 पैकी 5 दिल्लीत ७० पैकी ८ ओरिसात 147 पैकी 10 नागालँडमध्ये 60 पैकी 12

    ज्या राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार आहे, तेथे भाजपच्या जागांची स्थिती आहे मेघालयात 60 पैकी 2 बिहारमध्ये 243 पैकी 53 J&K मध्ये 87 पैकी 25 गोव्यात 40 पैकी 13 जागा.

    देशातील एकूण 4139 विधानसभा जागांपैकी भाजपकडे 1516 जागा आहेत त्यापैकी 950 जागा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, यूपी, एमपी, राजस्थान या 6 राज्यांतील आहेत. अर्थ स्पष्ट आहे…भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही, प्रत्यक्षात देशात 66% जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.

  • 11 Mar 2022 11:21 AM (IST)

    अखिलेश सिंग यांचं देखील अभिनंदन करावं लागेल – संजय राऊत

    उत्तर प्रदेश मध्ये संपूर्ण भाजपनी ताकद लावली परंतु पंजाब मध्ये भाजपने निवडून येण गरजेचं होतं परंतु त्यांना पंजाब सारख्या राज्याने का नाकारलं याचं चिंतन त्यांना करावं लागेल

    अखिलेश सिंग यांचा देखील अभिनंदन करावं लागेल

    तुमच्या आनंदात सहभागी आम्ही होऊ. लोकशाही मध्ये निवडणुका होतात पण पंजाब मध्ये मला चिंता वाटते त्या ठिकाणी एखादा राजकीय पक्ष निवडून येणे गरजेचे आहे पंजाब हा पोरखेळ नाही

    पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी देखील अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात होत्या पवार साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही तयार आहोत अजून काय करणार आहात अजून रेड टाकणारा हात आणखी खोटे गुन्हे दाखल करणार अजून काय करू शकतात झाकी आणि बाकी आम्हाला माहित आहे आम्ही पण तयार आहोत

    चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोकं टारगेट केले जात आहेत पश्चिम महाराष्ट्र आणि बंगाल यावर आपण मत व्यक्त केलं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबाव खालीच काम करत आहेत यावर आघाडी ठाम आहे मी जरी तिथे बोललो आणि दहा मिनिटांनी घरावर माझ्या रेड पडली तरी मी घाबरत नाही

    सत्य सांगणे हा दबाव आहे का तर मग सत्य ऐकण्याची देखील तयारी ठेवा.

  • 11 Mar 2022 11:14 AM (IST)

    4 राज्यातल्या विजयानंतर मोदींचा रोड शो

    4 राज्यातल्या विजयानंतर मोदींचा रोड शो

    4 राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या विजय रॅलीला अहमदाबादमध्ये सुरूवात झाली आहे. चार राज्यात अनेक सभा घेतल्याने भाजपाला यश मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींची विजयी रॅली काढली आहे.

    नरेंद्र मोदी अनेकवर्षे गुजरातमध्ये मुख्यमंत्री राहिलेले आहेत

    रोड शो ला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी

    आगामी निवडणुकीसाठी मोदी गुजरातमध्ये दाखल

    नरेंद्र मोदींचा आज गुजरात दौरा

  • 11 Mar 2022 11:03 AM (IST)

    2024 साली महाराष्ट्रात पुर्ण बहुमतात सरकार येईल – फडणवीस

    पहिल्यांदा तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे, या निवडणुकीने सिध्द केलं, मोदीजीच्या नेतृत्वात लोकांना केंद्रातलं सरकार मान्य आहे

    ज्या राज्यातून दिल्लीला रस्ता जातो. तिथ बहुमत सिध्द झाल्याने आनंद

    गोव्यात मोदीची जादू आहे, गोव्यात अधिक मदत झाली

    नोटा पेक्षा राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला कमी मतं

    विजय आज साजरा करू, पण उद्यापासून कामाला सुरूवात करू

    महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्यासाठी आज रात्रीापासून कामाला लागा

    केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्र नेहमी राहिला आहे

    २०२४ साली महाराष्ट्रात बहुमतात सरकार पाहायला मिळेल

  • 11 Mar 2022 10:46 AM (IST)

    आम्हाला महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे – देवेंद्र फडणवीस

    आम्हाला महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे – देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस भाजपाच्या मोठ्या नेत्यांसह विधानभवनाकडे रवाना

    चंद्रशेखर बावनकुळे, अशिष शेलार, नितेश राणे, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन यांचे आभार

    हा विजय मोदींना विश्वास निर्माण केल्यामुळे झाला आहे. मोदी आपल्या उपाशी राहू देणार तसेच मरू देखील देणार नाही.

    गोव्यात पुन्हा सरकार स्थापण करणार

    भाजपाची सेना पाठवली त्यामुळे आमचा विजय झाला

    शिवसेनेचा पराभप कसा झाला हे तुम्ही पाहिले

    राष्ट्रवादी आणि शिवसेनेला गोव्यात नोटांपेक्षा कमी पडली

    शिवसेनेचं गोव्यात काय झालं ते तुम्ही काय

    युपीत प्रचारासाठी गेलेल्या नेत्यांचं देखील अभिनंदन करतो

    सगळ्यांचा आर्शिवाद मोदींच्या पाठीशी आहे.

    लढाई समाप्त झाली, अजून बाकी आहे

    आता खरी लढाई मुंबईत होईल

    आम्हाला महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचं आहे

  • 11 Mar 2022 10:41 AM (IST)

    कमी काळात अधिक चांगली राजकीय कारर्कीद – चंद्रकांत पाटील

    कमी काळात अधिक चांगली राजकीय कारर्कीद – चंद्रकांत पाटील

    भाजपाचा माणूस मोठा झाला

    स्वागताचा अर्थ सन्मान आहे, त्यामुळे आम्ही त्यांचा सत्कार करत आहे

    कमी वयात नगरसेवक

    कमी वयात आमदार

    कमी वयात मुख्यमंत्री

    कमी वयात प्रभारी अशी पदं मिळाली

    आपला माणूस मोठा झाल्याने आनंद

  • 11 Mar 2022 10:29 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस भाजपाच्या कार्यालयात दाखल

    देवेंद्र फडणवीस भाजपाच्या कार्यालयात दाखल

    भाजपाच्या कार्यालाबाहेर फडणवीसांनी घेतली चंद्रकांत पाटलांची गळाभेट

    महाराष्ट्रातील दिग्गज नेते हजर

    गोव्याचा करेक्ट कार्यक्रम

    संपुर्ण देशात जल्लोष, देशात भाजपमय वातावरण

  • 11 Mar 2022 10:25 AM (IST)

    ढोल ताशांच्या गजरात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत

    देवेंद्र फडणवीस भाजपाच्या कार्यालयात दाखल

    भाजपाच्या कार्यालाबाहेर फडणवीसांनी घेतली चंद्रकांत पाटलांची गळाभेट

    महाराष्ट्रातील दिग्गज नेते हजर

    गोव्याचा करेक्ट कार्यक्रम

    संपुर्ण देशात जल्लोष, देशात भाजपमय वातावरण

  • 11 Mar 2022 10:19 AM (IST)

    4 राज्यात भाजप विजयी यात नरेंद्र मोदी यांचा हात आहे – रामदास आठवले

    – 4 राज्यात भाजप विजयी यात नरेंद्र मोदी यांचा हात आहे – वेगवेगळ्या योजना मोदी सरकार ने आणली म्हणून भाजपचा विजय झाला – उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्य नाथ यांनी गुंडाराज संपवला, केलेल्या विकासामुळे उत्तर प्रदेश मध्ये भाजप विजयी – पंजाबमध्ये आप सत्ता मिळाली मी समीकरण बोलो होतो पन ते झालं झालं नाही आणि आप सत्तेत आली अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन – पंजाब मध्ये लोकशाहीचा कल आम्हला मान्य – ही निवडणूक म्हणजे 2024 च्या निवडणूकीची ट्रायल होती – 2024 मध्ये 400च्या वर जागा मिळतील

    पंजाब पराभव – मोदींनी शेतकरी कायदे मागे घेतले – लोकांना कॉग्रेस नको होती – पंजाब मध्ये भाजपची ताकद कमी पडली – पुढच्या वेळी आप ला सत्तेतून बाहेर करू

    कॉग्रेस – राहुल गांधी भाजपला विरोध करतात त्याच नुकसान होतय – प्रियांका गांधी यांचा पण जादू उत्तर प्रदेश मध्ये चालला नाही – कॉग्रेस पक्ष आता दिसेनासा झाला – काँग्रेस पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे – काँग्रेसची अवस्था दयनीय झाली – राहुल गांधी यांनी ऊठसूट नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू नये या मुळे भाजपचा फायदा – युक्रेन पाकिस्तानच्या मुद्द्यावर काँग्रेसने सरकारच्या बाजून उभं राहील पाहिजे – राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यश मिळणे अशक्य आहे – काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज मात्र काँग्रेस मध्ये ऍक्टिव्ह नेता नाही – कॉग्रेस ला भवितव्य नाही

    शिवसेना – शिवसेनेची अवस्था कॉग्रेस सारखी दयनीय होणार – लोकसभेत 3 ते 4 जागा निवडणूक येतीलकी नाही – भाजप सेनेने एकत्र यावे – अडीच अडीच वर्षाच्या समीकरणाला एकत्र याव – संजय राऊत किव्हा सेनेचे खासदार भेटले तर त्यांना मी सूचना करत असतो

    ED – महाविकास आघाडीच्या नेत्यावर ED चे छापे पडत आहे असं नाही अनियमितेचे व्यवहार आहे म्हणून छापे पडत आहे – यात सरकारचा समंध नाही – आम्हला कुणाला त्रास द्यायचा नाही – चुकीच्या पद्धतीने पैसे कमावले नेते जेलमध्ये जातील

  • 11 Mar 2022 10:17 AM (IST)

    संपुर्ण देशात जल्लोष, देशात भाजपमय वातावरण – गिरीष महाजन

    संपुर्ण देशात जल्लोष, देशात भाजपमय वातावरण – गिरीष महाजन

    मी निवडून आलो तरी मला इतका आनंद झाला नव्हता

    पुढे काय होईल ते तुम्ही पाहा

    सरकार पडल्यास आम्ही पर्यायी सरकार देऊ

    कालच्या विजयाचा परिणाम महाराष्ट्रावरती होणार

    देवेंद्र फडणवीस काही वेळात भाजप कार्यालयात पोहोचतील

  • 11 Mar 2022 10:11 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस काही वेळात भाजप कार्यालयात पोहोचतील

    अनेक नेत्यांनी धरलात बॅंजोवरती ठेका, कार्यालयासमोर उत्साहाचं वातावरण, चार राज्यात चांगलं यश मिळाल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष, देवेंद्र फडणवीसांच्या गाड्याचा ताफा काहीवेळात कार्यालयात होईल दाखल.

  • 11 Mar 2022 10:06 AM (IST)

    पाच राज्याच्या निवडणुकीचा आणि महापालिकेचा काही संबंध नाही – संजय राऊत

    पाच राज्याच्या निवडणुकीचा आणि महापालिकेचा काही संबंध नाही

    महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे त्यामुळे इथे काय बदल होईल असं वाटतं नाही

    महापालिकेवरती शिवसेनाचा झेंडा कायम राहील

    आता अजून आमच्यावरती ईडीचे गुन्हे दाखव होतील, त्यासाठी आम्ही तयार आहोत

    फक्त दोन राज्यात ईडीचे धाडी

  • 11 Mar 2022 10:01 AM (IST)

    सुधीर मुनगुंटीवार भाजप कार्यालयात दाखल

    सुधीर मुनगुंटीवार भाजप कार्यालयात दाखल

    सुधीर मुनगुंटीवार भाजप कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी, महाराष्ट्र सरकार हे विष पेरत असल्याची टीका त्यांनी केली आहे. देशातल्या जनतेला मोदीचं सरकार पसंतीला पडलं आहे. त्यामुळे चार राज्यात आमची सत्ता आली आहे. याच्या आगोदरच्या सरकारने देशात जातीचं राजकारण केलं असंही मुनगुंटीवार म्हणाले.

  • 11 Mar 2022 09:57 AM (IST)

    भाजपाच्या मोठ्या नेत्यांची उपस्थिती

    प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, अशिष शेलार, नितेश राणे इत्यादी नेत्यांची मुंबई कार्यालयाबाहेर उपस्थिती, नेत्यांनी बॅंजोवरती थिरकताना दिसत आहेत. काहीवेळात फडणवीसांचं होणार आगमन, चंद्रकांत पाटलांनी वाजवला ढोल…कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधान…चार राज्यांच्या विजयानंतर आनंद

  • 11 Mar 2022 09:52 AM (IST)

    मोदी नेतृ्त्व सर्व सामा्न्य लोकांना मान्य – चंद्रकांत पाटील

    मोदी नेतृ्त्व सर्व सामा्न्य लोकांना मान्य – चंद्रकांत पाटील

    पवार साहेबांनी आयुष्यात कमी लोकांना घेऊन सत्ता स्थापन केली

    पवारांकडे लोकांना पटवायचं स्कील आहे.

    कमी परिश्रमामध्ये सरकार कसं येतं पवारांना माहित आहे.

  • 11 Mar 2022 09:52 AM (IST)

    अकोल्यात बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरला 32 कॉपी बहाद्दर निलंबित…!

    1) अकोल्यात बारावीच्या भौतिकशास्त्र पेपरला 32 कॉपी बहाद्दर निलंबित…!

    इयत्ता बारावीच्या परीक्षेला 4 मार्च पासून सुरुवात झाली तर सहा दिवसांच्या कालावधीनंतर बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर होता या पेपरला निरंतर शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने पातुर तालुक्यातील भंडारा येथील शाळेवर धाड टाकून तब्बल बत्तीस विद्यार्थ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे…!

    2) अकोला जिल्ह्यात शिवसेना कार्यकारणी बदलण्याचे अनिल देसाई यांनी दिले संकेत…!

    अकोला जिल्ह्याच्या शिवसेना कार्यकारिणीत लवकरच फेरबदल होणार असून अध्यक्ष व अध्यक्षासह संपूर्ण कार्यकारणी नव्याने जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहे… तर अकोला चे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया सह शिष्टमंडळ शिवसेना पदाधिकार्‍यांसह मुंबईच्या शिवसेना भवनात पक्षश्रेष्ठींचा सोबत चर्चा झाली…यात गेल्या काही महिन्यापासून निष्ठावंत आणि जुन्या पदाधिकाऱ्यांना पक्षात सावत्र वागणूक दिली जात आहे तर ज्यांनी शिवसेनेची मोट बांधून जिल्हा शिवसेना मजबूत केली त्यांना डावलून इतरांना पुढे केल्या जात असल्याच्या समस्यावर शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्याशी सविस्तर चर्चा केली… त्या वेळी शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी कार्यकारणी बदलाचे संकेत दिले आहेत….!

    3) अकोला : मी BSNL मधून बोलत आहे हे सांगून एका वृद्धच्या बँक खात्यामधून एक लाख 14 हजाराची रक्कम केली लंपास….!

    मी बीएसएल मधून बोलत असल्याचे सांगून अकाउंटचा तपशील व एटीएम चा क्रमांक मिळवून 70 वर्षे वृद्धाच्या बँक खात्यामधून एक लाख 14 हजार रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतल्याची घटना घडली असून या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस स्टेशन सह सायबर सेलमध्ये अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार देण्यात आली आहे….!

  • 11 Mar 2022 09:47 AM (IST)

    फडणवीसांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी

    गोव्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप बहुमत मिळालं आणि तिथं मोठा विजय झाला. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या स्वागतसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. काहीवेळात फडणवीस कार्यालयात पोहोचतील. भाजपाच्या अनेक नेते बॅंजोवरती ठेका धरला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

  • 11 Mar 2022 09:36 AM (IST)

    चंद्रपूर दोन दिवसांपासून कोळशाची वाहतूक रोखली

    एकोना येथे ठिय्या आंदोलन : शेतकरी व बेरोजगारांवर वेकोलिकडून अन्याय

    वरोरा तालुक्यातील एकोना येथील खुल्या कोळसा खाणी करिता शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहित करताना अधिकाऱ्यांनी गैरप्रकार करून शेतकऱ्यांची तसेच स्थानिक बेरोजगारांची मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे.

    यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आक्रमक होऊन सदर अन्यायाविरुद्ध एकोना खुल्या कोळसा खाणीत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

  • 11 Mar 2022 09:35 AM (IST)

    पुणे पोलीस दलातील चौघांनी राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पोलीस दलाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

    पुणे

    पुणे पोलीस दलातील चौघांनी राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पोलीस दलाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

    वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल

    2017 ते 2020 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला

    पोलीस हवालदार गणेश अशोक जगताप (नेमणूक विशेष शाखा, पुणे शहर), नितेश अरविंद आयनूर ( पोलीस उपायुक्त कार्यालय गोपनीय शाखेतील कनिष्ठ लिपिक), रवींद्र धोंडीबा बांदल (वरिष्ठ लिपिक) आणि गणेश जगतापच्या अज्ञात सहकाऱ्याविरोधात भादवी 409, 420, 467, 468, 475, 476, 474, 472, 471, 466, 167 व 120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात

    वरिष्ठ लिपिक संतोष प्रतापराव भोसले यांनी याप्रकरणी दिली तक्रार

  • 11 Mar 2022 09:34 AM (IST)

    म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी 500 पानी दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल

    पुणे

    म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणी 500 पानी दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल

    म्हाडाच्या अंर्तगत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीची नियुक्ती करण्यात अली हाेती.

    कंपनीचा संचालक डाॅ.प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फाेडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली हाेती.

    पुणे सायबर पाेलीसांनी तपास करत, डाॅ.प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ , संताेष हरकळ या तिघां विराेधात प्रथमवर्ग न्यायदहडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात तीन हजार ५०० पानांचे दाेषाराेपपत्र दाखल

    याप्रकरणात आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आली.

    देशमुख आणि हरकळ बंधू यांच्या शिवाय जमाल इब्राहीम पठाण (वय-४७,रा.जळकाेट,लातूर), कलीम गुलशेर खान (५२,रा.बुलढाणा), दिपक विक्रम भुसारी (३२,रा.बुलढाणा) या आराेपींना ही अटक करण्यात आली आहे म्हाडाचे वतीने गट अ,ब,क या पदांचे परीक्षा घेण्याकरिता जी.एस.साॅफ्टवेअर कंपनी साेबत करार केला हाेता.

  • 11 Mar 2022 09:33 AM (IST)

    पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसचे मंथन

    पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसचे मंथन

    काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार

    अध्यक्ष निवडण्याच्या बाबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा

    काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार

    आज किंवा उद्या बैठक होण्याची शक्यता

    पाच राज्यात पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस घेणार तातडीची बैठक

  • 11 Mar 2022 09:32 AM (IST)

    31 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पुलावरून उडी मारत केली आत्महत्या

    31 वर्षीय तरुणाने बंडगार्डन पुलावरून उडी मारत केली आत्महत्या

    सुनील वसंत म्हस्के असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव

    सुनील हा एजा डकंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता

    आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

    येरवडा पोलीस करातेय तपास

  • 11 Mar 2022 08:45 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून गुजरातमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा

    – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून गुजरातमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभा

    – ११ ते १३ मार्च अखिल भारतीयप्रतिनिधी सभा

    – गुजरात मधील पिराणा येथे प्रतिनिधी सभा

    – चार राज्यातील भाजपच्या विजयावरंही होणार मंथन

    – सरसंघचालक डॅा. मोहन भागवत आणि सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे राहणार उपस्थित

    – भाजपचे प्रतिनिधी म्हणुन राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा राहणार उपस्थित

    – देशभरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार मंथन

    – देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी सहभागी

    – भाजपसह संघ परिवारातील विविध संघटनांचे प्रतिनिधी कार्यअहवाल मांडणार

  • 11 Mar 2022 08:44 AM (IST)

    नागपूरच्या क्वेटा कॉलोनी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक मिळाल्यानं खळबळ

    नागपूरच्या क्वेटा कॉलोनी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक मिळाल्यानं खळबळ उडाली होती.

    पोलीस तपासात हे अर्भक जवळच्याच पुरोहित नर्सिंग होम चे असल्याचं पुढं आलंय.

    हे अर्भक सहा वर्षे जुने आहे.

    स्त्री रोग तज्ञ डॉ. यशोदा पुरोहित यांनी एका हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सहा अर्भक आणले होते.

    ते अर्भक त्यांनी नर्सिंग होम मध्ये सुरक्षित ठेवले होते.

    मात्र, 2016 मध्ये त्यांचा मृत्यु झाला.

    काही दिवसांपूर्वी नर्सिंग होम च्या पुनर्निर्मितीस सुरुवात झाली. त्यामुळं डॉ. गोकुळ पुरोहित यांनी केअरटेकर बिपीन शाहू याला जुने साहित्य विकून टाकण्यास सांगितले.

    भंगारवाल्याला हे साहित्य विकून टाकण्यात आले. मात्र, भंगारवाल्याने भंगारासह बायोमेडिकल वेस्ट आणि अर्भक ही घेतले.

    अर्भक आपल्या कामाचे नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले.

    सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झालाय.

    काचेच्या बरणीत असलेले हे अर्भक नंतर एक कचरा विकणाऱ्या व्यक्तीने काचेची बरणी घेऊन हे अर्भक तसेच टाकून दिले.

    मात्र, उत्तरीय तपासणी नंतर सत्यता बाहेर येईल.

  • 11 Mar 2022 08:37 AM (IST)

    देवेंद्र फडणवीसांचं मुंबई भाजप कार्यालयात जंगी स्वागत करणार

    मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या शासकिय सागर बंगल्याबाह्र भाजप कार्यकर्त्यांची बॅनरबाजी…

    – गोव्याच्या विजयाचे शिल्पकार अशा आशयाचे लगावले बॅनर…

    – आज ९.३० वाजता देवेंद्र फडणवीस यांचं मुंबई भाजप कार्यालयात जंगी स्वागत…

    – भाजपकडून जल्लोषात स्वागताची कार्यालयात तयारी सुरू…

  • 11 Mar 2022 08:36 AM (IST)

    वाकड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केली

    -पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत वाकड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक केलीय

    -विशेष म्हणजे अटक केलेल्या मध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराचा समावेश आहे

    -त्यांच्या कडून सोने, चांदी, दागिने, मोबाईल आणि दुचाकी असा 4 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय

  • 11 Mar 2022 08:35 AM (IST)

    मेहकर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर

    बुलडाणा

    मेहकर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर,

    गतशिक्षण अधिकाऱ्यांसह पंचायत समितीत 14 पदे रिक्त,

    पदे रिक्त असल्याने विस्तार अधिकाऱ्यांची जबाबदारी केंद्र प्रमुखांवर,

    124 कर्मचार्यांवर 140 गावाचा कारभार पाहण्याची वेळ

  • 11 Mar 2022 08:34 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मनुष्यबळाची कमतरता

    – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मनुष्यबळाची कमतरता,रिक्त पदे न भरल्याचा परिणाम,कंत्राटी कामगारांवर सर मदार

    -गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेली नोकर भरती,नियतवयोमानानुसार व स्वेच्छेने निवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे मनुष्यबळ दर महिन्याला घटत आहे त्यामुळे रिक्त जागांची संख्या वाढत आहे

    -सद्यस्थितीत अ,ब,क,ड या चारही पदावरील विविध 355 संवर्गातील 11 हजार 511 पदे सरकारकडून मजूर आहेत त्यातील चार हजार 246 पदे रिक्त

  • 11 Mar 2022 08:33 AM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यात प्रभाग रचनेच्या कामाला गती

    बुलडाणा

    जिल्ह्यात प्रभाग रचनेच्या कामाला गती,

    तर हरकतीसाठी 17 मार्च ची मुदत

    राजकीय वर्तुळासंह सर्वसामान्यांचे लागले लक्ष,

    जिल्ह्यातील 9 पालिकांच्या प्रभाग रचनेला प्रशासकीय पातळीवर सुरुवात ,

  • 11 Mar 2022 08:20 AM (IST)

    योगी आदित्यनाथ आज दिल्लीत

    – योगी आदित्यनाथ आज दिल्लीत.

    – उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजया नंतर दिल्ली मुख्यालयात भाजपची बैठक

    – भाजपचे उत्तर प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग होणार बैठकीत सहभागी

    – उत्तर प्रदेश शपथविधी आणि मंत्रिमंडळा बाबतंही होणार चर्चा

  • 11 Mar 2022 07:58 AM (IST)

    खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत

    खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे कोल्हापुरात करण्यात आले जंगी स्वागत

    मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आझाद मैदान वरील आंदोलनानंतर संभाजीराजे पहिल्यांदाच कोल्हापूर

    हत्ती,घोडे आणि लवाजम्यासह काढण्यात आली संभाजीराजे यांची सवाद्य मिरवणूक

    मराठा संघटनांसह सर्वपक्षीयांनी केल स्वागत

  • 11 Mar 2022 07:58 AM (IST)

    नागपूरमध्ये जिल्हा बाल संरक्षण समितीने रोखला बाल विवाह

    जिल्हा बाल संरक्षण समितीने रोखला बाल विवाह

    15 वर्षाची मुलगी तर 18 वर्षाच्या मुलाचा होणार होता विवाह

    विवाह मंडप सजला , वर्हाडी सजून धजून लग्नाला पोहचले

    वर वधू बोहल्यावर चढण्याच्या तयारी असतानाच मंडपात पोहचल बाल संरक्षण समिती पथक

    वर आणि वधू च्या वयाचा दाखल मागताच नातेवाईकांचे धाबे दणाणले

    दाखले बघितल्या नंतर हा बाल विवाह थांबनिण्यात आलं यश

    नागपूर च्या कळमना परिसरातील घटना

  • 11 Mar 2022 07:45 AM (IST)

    चंदगड तालुक्यातील करजगाव इथल्या जवानांला आसाम सीमेवर वीरमरण

    चंदगड तालुक्यातील करजगाव इथल्या जवानांला आसाम सीमेवर वीर मरण

    नितेश महादेव मुळीक असं वीरमरण आलेल्या जवानाच नाव

    बुधवारी सायंकाळी आलं कर्तव्य बजावत असताना आलं वीर मरण

    करजगावं सह चंदगड तालुक्यात शोककळा

    उद्या सकाळी करजगाव मध्ये नितेश च्या पार्थिवावर केलं जाणार अत्यंसंस्कार

  • 11 Mar 2022 07:40 AM (IST)

    “मिस्टर पेटी टाईट ग्लोबल” या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आशिष शिंदेची निवड

    जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वडगाव च्या आशिष शिंदेने सांगलीच्या सांस्कृतिक क्षेत्रात रोवला आणखी एक मानाचा तुरा,,, मलेशिया येथे होणाऱ्या “मिस्टर पेटी टाईट ग्लोबल” या स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झाली निवड

  • 11 Mar 2022 07:39 AM (IST)

    एसटी आता पूर्ण संख्येने धावण्याच्या तयारीत ?

    एसटी आता पूर्ण संख्येने धावण्याच्या तयारीत ?

    मंत्र्यांच्या आवाहन नंतर संपा वरील काही कर्मचारी रुजू व्हायला झाली सुरवात

    34 कर्मचारी झाले कामवार रुजू

    बडतर्फ कर्मचार्यांपैकी 14 कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी केला अर्ज

    मात्र अजूनही नागपूर विभागातील।1278 कर्मचारी संपावर ठाम।

  • 11 Mar 2022 07:32 AM (IST)

    मुलीचे अपहरण करून, फरार होणारा पोलिसांच्या ताब्यात

    वसई:- 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून, फरार होणारा आरोपीला 24 तासात बेड्या ठोकण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे..

    आरोपीच्या अटके नंतर अवघ्या 4 दिवसात वालीव पोलिसांनी वसई न्यायालयात दोषारोपपत्र ही सादर केले..

    दोषारोपपत्रातील सबळ पुराव्याच्या आधारे वसई न्यायालयाने आरोपीला 2 वर्षांची शिक्षा आणि 500 रुपयांचा दंड सुनावली आहे..

    कंसा सिंग असे आरोपीचे नाव आहे. वालीव पोलीस ठाणे हद्दीतील 6 वर्षाच्या मुलीचे 4 मार्च ला राहत्या घराच्या परिसरातून चॉकलेट चे आमिष देऊन अपहरण केले होते..

    दोन दिवसानंतर मालाड रेल्वे स्थानक परिसरात मुलगी सुखरूप मिळून आली होती. त्यानंतर सीसीटीव्ही आधारे वालीव पोलिसांनी आरोपीला ही बेड्या ठोकल्या होत्या..

  • 11 Mar 2022 07:30 AM (IST)

    नील सोमैया विरोधात कोणतीही FIR नाही प्राथमिक चौकशी सुरू नाही – किरीट सोमय्या

    नील सोमैया विरोधात कोणतीही FIR नाही प्राथमिक चौकशी सुरू नाही. वसई निकॉन इन्फ्रा कंपनी जमीन व्यवहार संबंधात कुठलीही चौकशी, गुन्हा दाखल नाही, म्हणून जामीन किंवा अटकपूर्व जामीन ची गरज नाही, अशा अहवाल/स्पष्टता EOW पोलीस, राज्य सरकारनी मुंबई उच्च न्यायालयात दिला.

    राज्य सरकारचा निवेदन मुळे आत्ता अटकपूर्व जामीन अर्ज ची सुनावणी ची आवश्यकता नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी भाजपचे नील किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्याची परवानगी दिली.

    ह्यापूर्वी सेशन कोर्टात ही राज्य सरकारने नील किरीट सोमैया विरोधात संजय राऊत नी कोणतीही तक्रार केली नसल्याचे सांगितले होते.

  • 11 Mar 2022 07:27 AM (IST)

    मेट्रोच्या कामामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत, आज पुण्यातून सुटणाऱ्या काही लोकल राहणार बंद

    मेट्रोच्या कामामुळे रेल्वे वाहतुक विस्कळीत, आज पुण्यातून सुटणाऱ्या काही लोकल राहणार बंद

    सकाळी 11 ते संध्याकाळी 4 यावेळेतपाच तासांचा ब्लॉक घेऊन मेट्रो गर्डर टाकण्याचे काम करणार

    या गर्डरची लांबी 79 मीटर इतकी असणार

    खडकी ते रेंजहील दरम्यान हे गर्डर टाकले जाणार

    आज पुण्याहून सुटणाऱ्या 8 लोकल सह डेक्कन एक्सप्रेस रद्द

    तर अन्य काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट व री शेड्युल करण्यात आल्यात

    कोल्हापूर -मुंबई दरम्यान धावणारी कोयना एक्सप्रेस ही कोल्हापूर ते पुणे पर्यंतच धावेल

    त्यामुळे १२ मार्च पुण्याहूनच कोयना एक्सप्रेस कोल्हापूरला रवाना होईल

    तर दौंड -इंदोर रेल्वे दौंड स्थानकावरून दुपारी दोन वाजता न सुटता दुपारी चार वाजता सुटणार

    ह्या गाड्या उशिराने धावणार

    मुंबई -चेन्नई एक्सप्रेस , मुंबई -भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस , चेन्नई- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस , नागरकोइल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्सप्रेस, बेंगलुरु- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई उद्यान एक्सप्रेस ह्या गाड्या उशिराने धावणार

  • 11 Mar 2022 07:26 AM (IST)

    40 वर्षांनी पुणे महापालिकेचे पुन्हा एकदा टीपी स्किमनुसार नियोजीत विकासाला प्राधान्य

    उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील सुमारे 650 हेक्टर जागेवरील नियोजीत टीपी स्किमचा प्रारुप आराखडा हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यास सर्वसाधारण सभेने दिली मान्यता

    यानिमित्ताने तब्बल 40 वर्षांनी पुणे महापालिकेचे पुन्हा एकदा टीपी स्किमनुसार नियोजीत विकासाला प्राधान्य

    असून वरिल क्षेत्रात स्किम लागू झाल्यानंतर रस्ते, एस. टी. पी., कचरा रॅम्प, उद्याने या सारख्या नागरी सुविधांसाठी कुठल्याही मोबदल्याशिवाय जागा मिळणार असून तेथे राहणार्‍या नागरिकांनाही या सुविधा तात्काळ उपलब्ध होणार असल्याचा भाजपचा दावा

  • 11 Mar 2022 07:25 AM (IST)

    पुणे-लोणावळा मार्गावर धावणारी लोकल सेवा मेट्रोच्या कामामुळे काहीशी विस्कळीत होणार आहे

    -पुणे-लोणावळा मार्गावर धावणारी लोकल सेवा मेट्रोच्या कामामुळे काहीशी विस्कळीत होणार आहे

    -खडकी ते शिवाजीनगर स्थानकांदारम्यान मेट्रोचे गर्डर बसविण्याचे काम केले जाणार असल्याने पुणे-लोणावळा मार्गावरील आठ लोकल आज रद्द करण्यात आल्या आहेत

    -पुणे रेल्वे स्थानकातून सुटणा-या सकाळी 8.05, 9.55, दुपारी 3, 4.25 या चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोणावळा स्थानकातून सुटणाऱ्या सकाळी 10.05, दुपारी 2.50, 5.30, 6.30 या चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत

    -तसेच पुणे-मुंबई दरम्यान धावणारी 11007 आणि 11008 ही डेक्कन एक्सप्रेस देखील आज धावणार नाही.कोयना एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान रद्द असेल. दौंड -इंदोर एक्सप्रेस गाडी दुपारी दोन ऐवजी चार वाजता दौंड स्थानकावरून निघेल.

    -चेन्नई एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, नागरकोईल-सीएसएमटी एक्सप्रेस आणि उद्यान एक्सप्रेस आज पुणे विभागात उशिराने धावतील

  • 11 Mar 2022 07:24 AM (IST)

    11 मार्च 2020 रोजी मिळाला होता नागपुरात पहिला कोरोना रुग्ण

    11 मार्च 2020 रोजी मिळाला होता नागपुरात पहिला कोरोना रुग्ण

    त्यानंतर सुरू झाला कोरोना चे थैमान

    तेव्हा पासून नागपूरकरांच कोरोना सोबत युद्ध सुरू

    11मार्च 2020 पासून आता पर्यंत जिल्ह्याने बघितले 5लाख 77 हजार 666 रुग्ण

    तर 5 लाख67 हजार 217 जणांनी कोरोनवर मात केली

    तर 10हजार337 जणांचा मृत्यू झाला

  • 11 Mar 2022 07:24 AM (IST)

    अमरावतीच्या सावंगी मग्रापुरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याची शक्यता

    अमरावतीच्या सावंगी मग्रापुरातील पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याची शक्यता….

    लाखो रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजूरि;प्रशासनाने केले कामाचे भूमिपूजन….

    पाण्यासाठी एक महिन्यांपूर्वी वार्ड क्रमांक एक मधील ग्रामस्थांनी सोडले होते गाव….

    गावाच्या वेशीवर केले होते तीन दिवस ठिय्या आंदोलन; आंदोलनाला आले मोठे यश….

    पाण्यासाठी गाव सोडल्याने राज्यभर गाजले होते.सावंगी मग्रापूर मधील आंदोलन….

    सरपंचांनी जाणीवपूर्वक 28 दिवस पाणीपुरवठा बंद केल्याचा केला होता ग्रामस्थांनी आरोप….

  • 11 Mar 2022 07:04 AM (IST)

    अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून विजयी जल्लोष

    भाजपनं चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत केलेल्या दमदार कामगिरीनंतर अंबरनाथमध्ये भाजपनं आनंदोत्सव साजरा केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले यांच्या नेतृत्त्वाखाली अंबरनाथमध्ये भाजपनं जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक याठिकाणी भाजपनं ढोल ताशे वाजवत, फटाके फोडत जल्लोष केला. तर शहरातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली सुद्धा काढली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा भाजप कार्यकर्त्यांनी जयजयकार केला. यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Published On - Mar 11,2022 6:43 AM

Follow us
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.