Maharashtra News Live Update : हिजाब गर्लची मिरवणूक आणि सभेस मालेगाव पोलिसांनी परवानगी नाकारली
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शनिवार 12 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत.राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या पेपरफुटीसंदर्भातली मोठी बातमी, पुणे सायबर पोलीसांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध 3 हजार 500 पानांच दोषारोपपत्र केलं दाखल केलंय, म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 6 जण अटकेत आहे. महाराष्ट्रातल्या दिवसभर घडणा-या घडामोडी आपण इथं पाहणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
हिजाब गर्लची मिरवणूक आणि सभेस मालेगाव पोलिसांनी परवानगी नाकारली
हिजाब गर्लची मिरवणूक आणि सभेस मालेगाव पोलिसांनी परवानगी नाकारली
माजी आमदार शेख यांचा हिरमोड
मालेगाव चे माजी आमदार आसिफ शेख यांनी मुस्कान खानला मालेगाव येथे कुटुंबासह आणून तिची मिरवणूक व सन्मान करण्याचे नियोजन केले होते. मंगळवारी हा कार्यक्रम होणार होता, मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने या कार्यक्रमावर पडदा पडला असला तरी यावर माजी आमदार शेख काय भूमिका घेता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
जळगावात सलग दुसऱ्या दिवशी अग्नितांडव
जळगावात औरंगाबाद रस्त्यावरील कुसुंबा जकात नाक्याजवळ शनिवारी सायंकाळी भंगारच्या गोदामाला आग लागली असून आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्टआहे. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून महापालिकेच्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्रीही जळगाव शहरात केळकर मार्केट मधील कापड दुकानांना आग लागल्याची घटना घडली होती.
-
-
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांना फोडण्याचा भागवत कराड यांचा प्रयत्न
भाजपकडून महविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू
भर कार्यक्रमातच भाजप मंत्र्यांकडून काँग्रेसचा आमदार फोडण्याचा प्रयत्न
भाजपचे मंत्री भागवत कराड यांनी केली काँग्रेस आमदार फोडण्याचा प्रयत्न
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांना फोडण्याचा भागवत कराड यांचा प्रयत्न
भाजप मध्ये प्रवेश करण्याचं मांचावरच केलं खुलं आव्हान
विकास कामांचे अमिश देऊन काँग्रेस आमदाराला भाजप प्रवेशाची केली सूचना
-
राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या जनसपंर्क कार्यालयाचं उद्घाटन
दिवा मनसे कार्यालय उदघाटन
मनसे राज ठाकरे आणि अमित ठाकरे आले
-
राज ठाकरे यांच्या हस्ते दिवा ठाणे येथे जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन
राज ठाकरे यांच्या हस्ते दिवा ठाणे येथे जनसंपर्क कार्यालयाचं उदघाटन
मनसे आमदार प्रमोद पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन
चंद्रांगण रेसिडेन्सी पहिल्या मजला शिळ रोड दिवा पूर्व येथील कार्यालयाचा उद्घाटन..
मोठे संख्येने मनसे कार्यकर्ते पाहायला मिळतेय..
-
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी चा कार्यक्रम जाहीर
12 एप्रिलला होणार मतदान,तर 16 एप्रिलला होणार मतमोजणी
24 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करावी लागणार तर 25 मार्चला होणार उमेदवारी अर्जांची छाननी
कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदासाठी होतेय पोटनिवडणूक
-
पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, विरोधकांचं अनोखं आंदोलन
-एकीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ आज संपुष्टात येतोय
-तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या नगरसेवक अन पदाधिकाऱ्यांनी प्रारूप महासभेचे आयोजन केले
-जनतेच्या सहभागाने भाजपचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा हा खटाटोप करण्यात आला
-यासाठी शिवसेनेकडे महापौर, काँग्रेसकडे आयुक्तपद अन राष्ट्रवादीकडे नगरसचिव अशी पद विभागण्यात आलेली होती
-
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट, पुण्यातील उद्याचे कार्यक्रम रद्द, पोलीस माहिती घेण्यासाठी घरी येणार असल्याचं स्पष्ट
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट, पुण्यातील उद्याचे कार्यक्रम रद्द, पोलीस माहिती घेण्यासाठी घरी येणार असल्याचं स्पष्ट
सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2022
-
मुंबई पोलीस देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी जणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट नोंदवण्यासाठी मुंबई पोलीस सागर या शासकीय निवासस्थानी जाणार आहेत. भाजपनं बीकेसी पोलीस स्टेशनजवळ शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. रश्मी शुक्ला यांचे विरोधात फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गृह विभागाची बैठक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सागर या निवासस्थानी जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. ही माहिती सूत्रांकडून टीव्ही 9 मराठीला मिळाली आहे.
-
पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारचा ब्रेक
– पंतप्रधान मोदींनी भूमिपूजन केलेल्या नदी सुधार योजनेला ठाकरे सरकारचा ब्रेक,
– नदीकाठ सुधार योजनेवरील आक्षेप, योजनेतील कामे, परिणाम याबाबींचा करण्यात येणार अभ्यास,
– यासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण खात्यातील सचिवांची समिती नेमण्यात येणार,
– पुढील आठ ते दहा दिवसात समितीचा अहवाल येणार,
– त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमवेत बैठक होणार,
– येत्या बुधवारी याबाबत तातडीने बैठक घेण्यात येणार आहे,
-
महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण वाढलंय : रुपाली चाकणकर
महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे
कोरोना नंतर आलेली परिस्थिती याला कारणीभूत आहे
बालविवाह करणाऱ्या आई-वडिलां बरोबरच आता ग्रामपंचायत सदस्यांवर ही कारवाई केली
कारवाईमध्ये त्यांचे सदस्यत्व आणि पद रद्द करण्याची महिला आम्ही मागणी राज्य शासनाकडे केलीय, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
-
देवेंद्र फडणवीसांना का नोटीस दिली हे माहित नाही – जयंत पाटील
मला देवेंद्र फडणवीसांना का नोटीस दिली हे माहित नाही, त्यामुळं मी त्याबाबत बोलण अत्यंत चुकीचं आहे. याबाबत तुम्हाला महाराष्ट्राचे गृहमंत्री सविस्तर उत्तर देतील. आमच्या सरकारकडून कोणालाही मुद्दाम त्रास द्यायचा नाही. तसेच त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी आम्हाला द्यावे आम्ही त्यांच्यावर कारवाई करू.
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक
राज्यमंत्री बच्चू कडू यांना मातृशोक….
इंदिराबाई बाबाराव कडू यांचं ७८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन
अमरावती येथील खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार
चांदुर बाजार तालुक्यातील बेलोरा येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
बच्चू कडू अमरावती वरून गावात रवाना
-
माझ्या माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीस
१२ मार्चच्या मुंबई बॉम्बस्फोटांना 3 दशकं झाली तरी त्याचे पडसाद आणि घाव आपल्या मनावर कायम बॉम्बस्फोटांच्या आरोपींशी व्यवहार करणारे जेलमध्ये जाऊनही मंत्रिमंडळात कायम आहेत, याविषयी खंत मार्च २०२१ मध्ये मी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत होम डिपार्टमेंटमधील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता त्याचे ट्रान्सक्रिप्ट पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहेत, देशाच्या होम डिपार्टमेंटला देणार असल्याचं बोललो होतो त्याच दिवशी मी दिल्लीला जाऊन होम सेक्रेटरींना माहिती सादर केली त्याचं गांभीर्य ओळखून न्यायालयाने सगळी चौकशी सीबीआयला सुपूर्द केली तत्कालीन गृहमंत्र्यांचा त्यात समावेश असून ते जेलमध्ये आहेत राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी एक एफआयआर दाखल केला ऑफिशिअल माहिती लीक कशी झाली, हा आरोप होता पोलिसांनी मला एक प्रश्नावली पाठवली होती विरोधी पक्ष नेता म्हणून मला प्रिव्हिलेज आहे, याची माहिती कुठून आली, हे मला विचारलं जाऊ नये पुन्हा मला क्वेश्चनेअर पाठवलं आणि कोर्टात सांगितलं की वारंवार ते पाठवूनही मी उत्तर देत नाही काल पुणे पोलिसांनी मला सीआरपीसी १६० ची नोटीस पाठवली आहे उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलिसात मला बोलावलं आहे माझ्या माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही मी कुठलीही माहिती बाहेर न येऊ देता देशाच्या सचिवांना दिली मात्र राज्याच्या मंत्र्यांनी ती बाहेर लीक केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत मी पोलिसांना याची माहिती देणार आहे
-
घोटाळा दाबण्याकरता सरकारकडून एक तक्रार दाखल करण्यात आली
मी पोलिस भरतीतील घोटाळा एक वर्षापुर्वी काढला होता
बदल्यांच्या घोटाळ्यामध्ये उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलिस ठाण्यात हजर होण्यास सांगितले आहे
ही सगळी माहिती देशाच्या होम सेक्रेटरीकडे आहे
पोलिसाच्या चौकशीला हजर राहणार
योग्य उत्तर देणार
मी राज्याचा गृहमंत्री राहिलो आहे
माहिती बाहेर कशी आली, यापेक्षा योग्यवेळी कारवाई करण्यात आली
सगळी सर्वाच्छ न्यायालयाने सीबीआयला दिली
सध्याची राज्य सरकारची परिस्थिती आहे
राज्य सरकार आणि पोलिस यांना आता उत्तर सुचन नसेल म्हणून मला त्यांनी नोटीस पाठवण्यात आली आहे.
-
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना पुणे पोलिसांना नोटीस
106 अंतर्गत देवेंद्र फडणवीसांना नोटीस
महाविकास आघाडी सरकारकडून चौकशी
मुंबईचा बॉम्बस्फोट १२ मार्चला झाला होता
१२ मार्च १९९३ साली मुंबईत शहिद झालेल्या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करतो्
महाविकास आघाडीचे सगळे पुरावे माझ्याकडे असल्याचे सांगितले आहे.
सीबीआयला माहिती देण्यात आली
अनिल देशमुखांची देखील चौकशी सुरू आहे
महाराष्ट्राचे गृहमंत्री जेलमध्ये आहेत
घोटाळा दाबण्याकरता सरकारकडून एका तक्रार दाखल करण्यात आली
-
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा
गोवा- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा
गोव्याचे राज्यपाल यांच्याकडे सोपवला राजीनामा
तर नवीन सरकार स्थापनेचा लवकरच करणार दावा
राज्यपाल पी स श्रिधरन पिल्ले यांच्याकडे सोपवला राजीनामा
-
रिव्हर्स टेम्पोची अनेक गाड्यांना धडक
मावळ,पुणे
-पुणे जिल्ह्यातील मावळात एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवली. निमुळता मार्ग असल्याने गाडीची अनेकांना ठोकर ही बसली
-ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झालीये
-अपघात झाल्याने पळून जाताना त्याने हे कृत्य केलं.नवलाख उंबरे गावात ही घटना 9 मार्चला घडली
– रिव्हर्स जाण्याआधी टेम्पो चालकाने एका धडक दिल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू ही झाला.आता ग्रामस्थ आपल्याला मारतील या भीतीने त्याने रिव्हर्स गाडी हाकली, यात अनेकांचं नुकसान झालं काही जखमी ही झाले
-
मुंबई गोवा महामार्गवरील चिपळूण परशुराम घाट वाहतुकीसाठी करण्यात आला बंद
रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गवरील चिपळूण परशुराम घाट वाहतुकीसाठी करण्यात आला बंद
मागील अपघातातील मातीच्या डिगाऱ्यात अडकलेले पोक्लेन बाहेर काढण्यासाठी घाट ठेवण्यात आला आहे बंद
घाटातील वाहतूक दोन तास राहणार बंद
-
अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन
अहमदनगर
श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड रोडवर मढेवडगाव येथे कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम बंद करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन
रयत क्रांती संघटनेच्यावतीने सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन
आंदोलनासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत सहभाग
आंदोलनाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी हे आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला
मात्र आक्रमक होत शेतकऱ्यांनी महावितरणच्या आश्वासनाशिवाय रास्ता रोको मागे घेणार नसल्याची घेतली भूमिका
-
अनिल परब यांची उलटी गिणती सुरू झाली आहे – किरीट सोमय्या
अनिल परब यांची उलटी गिणती सुरू झाली आहे – किरीट सोमय्या
90 दिवसात रिसॉर्ट पाडण्याची जी पक्रिया सुरू आहे आता 30 दिवस झाले आहे
आता लवकर पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल
यशवंत जाधव यांच्या वर देखील कारवाई होणार आहे
Ed ची सर्व प्रकरणी प्रक्रिया सुरू आहे
घोटाळे बाजांना जेल मध्ये जावे लागणार
सामनामध्ये देखील सांगावे लागले निल सोमय्या बाबत
हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर पाठपुरावा सुरू आहे
-
कुणबी समाजाचा सारथी मध्ये समावेश आहे – विजय वडेट्टीवार
– कुणबी समाजाचा सारथी मध्ये समावेश आहे
– लोकसंख्येनुसार निधीची आमची मागणी होती
– महाज्योतीला २५० कोटी मिळालेय
– महाज्योती, बारटी आणि सारथीला सारखा निधी
– भटक्या जमातीबाबत माहिती घेण्यासाठी काम करणार
– १५ हजार विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंट प्रशिक्षण देणार
– पीएचडी च्या सर्व विद्यार्थांना नोंदणी आणि अवॅार्ड झाल्यापासून ३१ हजार रुपये देणार
– नोकरीचा पत्ता नाही, पण संशोधन कृषी एकाच विषयावर चाललंय.
– पुढच्या वर्षी ही संख्या कमी करणार
Imp ( महाराष्ट्रात सत्तापालट )
– जय परायज निवडणूकीत होत असतो
– सत्तेत सहभागी होण्याची प्रत्येकाची इच्छा असते
– लोकांच्या मनात आहे तोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार आहे
– जोपर्यंत महाविकास आघाडीचा एक पक्ष फुटत नाही तोपर्यंत या सरकारला धोका नाही. असं होण्याची शक्यता नाही
-
राज्य सरकार निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोगाला कळवणार – विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
– १९९४ पर्यॅत वॅार्ड रचना, प्रभाग रचना काम ही कामं राज्य सरकारकडे होती
– आता तो अधिकार राज्य सरकारकडे देण्याचा निर्णय झाला
– राज्य सरकार निर्णय घेऊन राज्य निवडणूक आयोगाला कळवणार
– सहा महिन्यात हे संपवून, आम्ही आयोगाला निवडणुक आयोगाला सांगणार
– आम्ही काल राज्यपाल यांना भेटलो, त्यांनी लगेच स्वाक्षरी केली
– जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत निवडणूका पुढे जातील
– प्रभाग रचना पुन्हा करण्याची शक्यता
– हे खरं आहे की ऊर्जा खात्याला कमी निधी मिळाला असेल, तर पुरवणी मागण्यात निधी मिळेल
– ओबीसी विभागाला राज्य सरकारचा निधी असतो, म्हणू तफावत दिसते
– केंद्र सरकार ओबीसींना निधी देत नाही
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एकाच दिवशी तब्बल 29 ठिकाणी उदघाटन
– उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एकाच दिवशी तब्बल 29 ठिकाणी उदघाटन,
– राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीनी केलेल्या विविध कामाचं लोकार्पण होणार अजित पवारांच्या हस्ते,
– शहरातील विविध 29 ठिकाणी अजित पवार सकाळी सातपासून लावणार हजेरी,
– एकाच दिवशी सर्वाधिक उदघाटन करण्याचा पहिलाच योग,
– तर दुसरीकडे भाजपकडूनही विविध ठिकाणी उदघाटनाचा धडाका,
– विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच ते सहा ठिकाणी होणार उदघाटन कार्यक्रम,
– उद्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही पुण्यात..
– आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपकडून विकासकामांचा धडाका…
-
नागपूरात प्रेमी युगुलाची धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या
नागपूरात प्रेमी युगुलाची धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या,
नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील घटना,
18 वर्षीय तरुण आणि 16 वर्षीय तरुणीने प्रेम प्रकरणातून केली आत्महत्या,
दोघांनीही हातात हात घालून धावत्या रेल्वेखाली उडी मारून केली आत्महत्या,
दोघेही शहरातील जयभीम चौक येथील रहिवासी,
घरच्यांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागल्याने आणि विरोध असल्यानं उचलले आत्महत्येचे पाऊल
-
पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू.
भंडारा
पोहायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू.
कॉन्व्हेंटमध्ये पाचव्या वर्गात शिकत होते
जिल्ह्यातील सेंदुरवाफाची घटना.
शोधमोहीम राबविली असता रात्री उशिरा धवल व भावेशचा मृतदेह आढळून आला.
-
गोपीचंद पडळकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटलांच साकडं
गोपीचंद पडळकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटलांच साकडं
बिरोबाला साकडं घालत गोपीचंद पडळकरांना सद्बुद्धी देण्याची केली मागणी
शरद पवार नाव ऐकलं की पडळकरांना झटके येतात
गोपीचंद पडळकर तरुणांची माथी भडकवण्याचं काम करतायेत
आमदार आहेत त्यांनी जपून बोलावं रुपाली पाटलांचा गोपीचंद पडळकरांंना सल्ला
फडणवीस 10 , 20 शरद पवार खिशात घेऊन फिरतात असं पडळकरांनी वक्तव्य केलं होतं
त्या वक्तव्याचा खरपूस समाचार पाटलांनी घेतलाय
-
अंबरनाथमध्ये दुकानदाराला सात लाखांचं वीजबिल!, विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप
अंबरनाथ – अंबरनाथमध्ये एका दुकानदाराला चक्क सात लाखांचं वीजबील महावितरण कडून पाठवण्यात आलं असल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे. इतकं वीज बिल कसं काय येऊ शकत ? असा प्रश्न देखील अनेकांना पडला असेल. परंतु हे प्रकरण खरं असून संबंधित दुकानदारानं विजेच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याचा महावितरणचा आरोप केला आहे. अंबरनाथ पूर्वेच्या नवरेनगर परिसरात केतन मोटा यांचं दुकान आहे. महावितरणच्या भरारी पथकानं धाड टाकत त्यांच्या मीटरची तपासणी केली असता, त्यात छेडछाड करून हे मीटर संथ गतीने करण्यात आल्याचं भरारी पथकाला आढळून आलं. हे कधीपासून संथगतीने मीटर सुरू असल्याची चौकशी अधिका-यांनी केल्यानंतर त्यांना वीज बील पाठवण्यात आलं आहे.
-
येरवड्यातील गाडीतळ येथे वाहनाची तोडफोड करण्याचा प्रकार सीसीटीव्हीत कै
दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असून एक चारचाकी वाहन, 5 रिक्षा,5 दुचाकी वाहनावर दगड, पालघन सारख्या हत्याराने काचा फोडल्या
मुख्य रस्त्यावरील रिक्षा तसेच आतील गल्ली बोळातील वाहनावर तसेच नागरिकांच्या घरावर हत्यारे मारून दहशत माजविण्याचा प्रकार
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एकाच दिवशी तब्बल 29 ठिकाणी उदघाटन
– पुण्यात रविवारी राहणार उदघाटनांचा धडाका,
– उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते एकाच दिवशी तब्बल 29 ठिकाणी उदघाटन,
– राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीनी केलेल्या विविध कामाचं लोकार्पण होणार अजित पवारांच्या हस्ते,
– शहरातील विविध 29 ठिकाणी अजित पवार सकाळी सातपासून लावणार हजेरी,
– एकाच दिवशी सर्वाधिक उदघाटन करण्याचा पहिलाच योग,
– तर दुसरीकडे भाजपकडूनही विविध ठिकाणी उदघाटनाचा धडाका,
– विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच ते सहा ठिकाणी होणार उदघाटन कार्यक्रम,
– उद्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोन्हीही पुण्यात..
– आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजपकडून विकासकामांचा धडाका…
-
चंद्रपूर मनपा आयुक्तांचा बंगला सील
चंद्रपूर शहर महापालिका आयुक्तांचा शासकीय बंगला कायम ठेवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
मात्र, मनपा प्रशासनाची ही विनंती धूडकावत महसूल विभागाने काल बंगला सील करण्याची कारवाई केली.
महापालिकेकडून बंगल्याचे नूतनीकरण, विकासासाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, आता महसूल विभागाने बंगला ताब्यात घेतल्याने लाखांचा खर्च व्यर्थ गेला असून, आयुक्तांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
-
तीने मुलगी आणि पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत पतीने मुलगी आणि पत्नीची हत्या करून केली आत्महत्या,
राजीव नगर, तरोडा मोहल्ला परिसरातील घटना,
पती विलास गवते, 13 वर्षीय मुलगी अमृता आणि 45 वर्षीय पत्नी रंजना गवते अशी मृतकांची नावं,
पत्नी आणि मुलीचा गळा कापून पतीने गळफास लावून केली आत्महत्या,
कौटुंबिक वादातून हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती
-
रत्नागिरी जिल्ह्यातील तरूणाई भोवती आमली पदार्थांचा विळखा
रत्नागिरी- जिल्ह्यातील तरूणाई भोवती आमली पदार्थांचा विळखा होतोय घट्ट
आर्थिक वर्षात २० आमली पदार्थांचे गुन्हे उघड
२० लाखांहून अधिक आमली पदार्थ जप्त
वर्षभरात २८ जणांना आमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी अटक
केरळ कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्रातून आमली पदार्थ कोकणात
-
रत्नागिरीच्या विमानतळाचे स्वप्न पुर्ण होणार
रत्नागिरी- रत्नागिरीच्या विमानतळाचे स्वप्न पुर्ण होणार
रत्नागिरीच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात १०० कोटींची तरतुद
अर्थसंकल्पात राज्य सरकार कोकणावर मेहरबान
रत्नागिरी विमानतळावरून खासगी प्रवासी वाहतुकीचा मुद्दा अनेक वर्ष प्रलंबीत
-
10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची करणार महामंडळ भरती
वारंवार आवाहन करूनही एसटी कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटी महामंडळानं घेतला निर्णय
10 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची करणार महामंडळ भरती
टप्प्या टप्प्याने कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार
आतापर्यंत महामंडळात 2 हजार कंत्राटी कर्मचारी भरण्यात आलेत..
कर्मचाऱ्यांची संख्या अपूरी असल्याने हा निर्णय घेण्यात आलाय .
कामावर या असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना केलं आहे…
-
सिपीआर रुग्णालयातील डॉक्टर सोमवारपासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन
सिपीआर रुग्णालयातील डॉक्टर सोमवारपासून करणार बेमुदत काम बंद आंदोलन
अस्थायी डॉक्टरांना सेवा समावेश करून घेण्यास अन्य मागण्यांसाठी मध्यवर्ती वैद्यकीय शिक्षण संघटनेमार्फत गेल्या दोन आठवड्यापासून सुरू आहे आंदोलन
आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेतली नसल्याने आता डॉक्टर आक्रमक
सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करत असल्याचं अधिष्ठाताना दिल पत्र
आंदोलनाचा रुग्णसेवेवर होणार मोठा परि
-
आता विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पीएचडी नसणार बंधनकारक
आता विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पीएचडी नसणार बंधनकारक
यूजीसी लवकरच घेणार निर्णय होणार
यासाठी विद्यापीठात विशेष जागा नियुक्त केल्या जाणार आहेत..
10 हजार प्राध्यापकांच्या जागा अजूनही रिक्त आहेत त्यामुळे यूजीसीनं हा निर्णय घेतलाय
यासाठी यूजीसीनं समितीही स्थापन केली आहे…
-
२० दिवसांत ५० कोटींच्या मालमत्ता करवसूलीचं नागपूर मनपाचं टार्गेट
– २० दिवसांत ५० कोटींच्या मालमत्ता करवसूलीचं नागपूर मनपाचं टार्गेट
– मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ १७५ कोटींची मालमत्ता करवसूली
– ५०० चौ. फुटांच्या घरांचा कर माफ करण्याच्या प्रस्तावामुळे करवसूलीवर मोठा परिणाम
– नागपूरातील अनेक सरकारी इमारतींकडे मालमत्ता कराची थकबाकी
-
नांदेडमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी
नांदेडमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावलीय, जिल्ह्यातील अनेक भागात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस बरसलाय. या अवकाळी पावसामुळे हाथाशी आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. नांदेडमध्ये सध्या गव्हू हरभरा पिकांची काढणी सुरू असताना ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला सहन करावा लागतोय.
-
नाशिकमध्ये विविध भागात पावसाची जोरदार हजेरी
नाशिक – शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाची जोरदार हजेरी
विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
बे मोसमी पावसाने झोडपल्याने शेतकरी हतबल
कांदा ,द्राक्ष ,गहू हरभरा पिकाचे नुकसान
-
अजित पवार रविवारी करणार पुणे शहराचा दौरा
अजित पवार रविवारी करणार पुणे शहराचा दौरा
शहराध्यक्षांच्या घरी जेवणाचं आमंत्रण
शहरातील पदाधिकाऱ्यांच्या विकासकामांच करणार उद्घाटन
पुणे महापालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अँक्शन मोडवर
अजित पवार दिवसभर असणार पुण्यात !
-
मेकअप क्लास चालकाकडून महिलेवर बलात्कार
नाशिक – मेकअप क्लास चालकाकडून महिलेवर बलात्कार
गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची तक्रार
महिलेचे फ़ोटो काढून पतीला पाठवण्याची दिली धमकी
इच्छेविरोधात महिलेचा गर्भपात केल्याचं देखील उघड
क्लास चालका सह त्याची पत्नी, मित्र यांना देखील पोलिसांनी घेतले ताब्यात
-
नाशिकच्या उपनगर भागात समाजकंटकांनी जाळली दुचाकी
नाशिक – नाशिकच्या उपनगर भागात समाजकंटकांनी जाळली दुचाकी
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
उपनगरच्या सिंधी कॉलनीत प्रेस कामगाराची जाळली दुचाकी
ज्वलनशील पदार्थ टाकून जाळलेली दुचाकी जळून खाक
घटनेच गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली
-
पर्यावरण मंत्र्यांच्या आश्वासनाला खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकडून हरताळ
– पर्यावरण मंत्र्यांच्या आश्वासनाला खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राकडून हरताळ
– नागपूर जिल्ह्यातील नांदगाव फ्लाय अॅश उचलण्याची मुदत उलटूनंही काम पूर्ण नाही
– मुदत लोटून दहा दिवस झाले तरीही खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने काम पूर्ण केले नाही
– महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या आदेशाला औष्णिक केंद्राकडून हरताळ
– आदित्य ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये दिली होती नांदगावला भेट
– १ मार्चपूर्वी शेतातील संपूर्ण राख स्वच्छ करण्याचे आदेश दिले, तरिही राख उचलली नाही
-
नागपूरातून सहा वर्षांत 2800 अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता
– नागपूरातून सहा वर्षांत 2800 अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता
– गेल्या काही वर्षांपासून घरातून पलायन करणाऱ्या मुला-मुलींच्या प्रमाण वाढलं
– घरातून बेपत्ता होण्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त
– नागपुरात गेल्या सहा वर्षांत 12 ते 19 वयोगटातील मुले-मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले
– प्रेमप्रकरण, पालकांकडून छळ, शिक्षणाची भीती, बाह्यजगाचं आकर्षण पलायनाची प्रमुख कारणं
-
येवल्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे जोरदार स्वागत
– येवल्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे जोरदार स्वागत – आगामी निवडणुकात भाजप व रिपाई सत्तेवर येणार – चार राज्यातील यशाचा परिणाम महानगरपालिका, जिल्हा परिषदेवर दिसणार – पंजाब मध्ये आप ला मिळालेल्या यशाबद्दल केजरीवालांचे आठवलेंकडून अभिनंदन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गेल्या आठ वर्षातील कामामुळे भाजप व एनडीए ला यश
-
कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी हालचाली गतिमान
कोल्हापूर
कोल्हापुरात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी हालचाली गतिमान
उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी लोकप्रतिनिधींच शिष्टमंडळ मुख्य न्यायमूर्तीची भेट घेणार
कोल्हापूर सहा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी घेणार भेट
विधान परिषदेचे सभापती राम राजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ भेटणार
मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्याकडे मागितली भेटीसाठी वेळ
-
कारखान्यातील 40 लाखांची वीज चोरी उघडकीस
नाशिक – कारखान्यातील 40 लाखांची वीज चोरी उघडकीस
दोन लाख 21 हजार 856 युनिटची चोरी
वीज चोरी प्रकरणी मालका विरोधात गुन्हा दाखल
महावितरणाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड केल्याचे उघड
-
महालगाव/मोरगाव गटग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात गावकऱ्यांनी एलगार
भंडारा
जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील महालगाव/मोरगाव गटग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात गावकऱ्यांनी एलगार.
पांदन रस्ते तयार न करता पैशाची उचल करणाऱ्या सरपंच व पदाधिकाऱ्यांवर कारवाई मागणी केली आहे.
शासनाने ह्याची गंभीर दखल न घेतल्यास पंचायत समिति उपोषणाचे हत्यार उगारण्याची तंबी देण्यात आली आहे.
-
एनआयसीच्या (नॅशनल इन्फर्मेशन सेंटर) भोंगळ कामाचा जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या कामाला फटका
पुणे : जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसह, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या शेकडो कामांची बिले गेल्या पंधार-वीस दिवसांपासून एनआयसीच्या सर्व्हर डाऊन झाल्याने रखडली
पंधराव्या वित्त आयोगाच्या सर्व कामांची बिले आता ऑनलाईन पध्दतीनुसार काढली जातात
एनआयसीच्या वतीने स्वतंत्र साॅफ्टवेअर विकसित केले आहे
एनआयसीने सॉफ्टवेअरमध्ये काही बदल केले असून, सतत होणाऱ्या सर्व्हर डाऊनमुळे गेले 15-20 दिवसांपासून बिल काढण्यात अडचण
-
पुण्यात 18 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई
पुणे ..
बारावीच्या एसपी होम मँनेजमेंटच्या पेपरला 18 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई
विद्यार्थ्यांना कॉपी करताना भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडलं रंगेहाथ
एसपी होम मँनेजमेंटच्या पेपरला अमरावती विभागात 15 तर लातूर विभागात 3 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे…
-
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचा वाद पोहोचला राज्य शासनाच्या कोर्टात
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचा वाद पोहोचला राज्य शासनाच्या कोर्टात
महापालिकेनं नगरविकास विभागाकडून मागितलं मार्गदर्शन
महापालिकेवर 14 तारखेपासून येणार प्रशासक ..
महापालिकेची मुदत संपली तरी जोपर्यंत स्थायी समितीची निवड निवडणूक पद्धतीने होत नाही तोपर्यंत स्थायी समिती काम करेल.स्थायी समिती अध्यक्षांचा दावा
महापालिकेनं मागितलं मार्गदर्शन राज्य शासन काय निर्णय देणार ?.
-
पुणे ते कन्याकुमारी असा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.
पुणे ते कन्याकुमारी असा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.
31 मार्चपासून धावणार पुणे ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते पुणे एक्स्प्रेस
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून बंद होती पुणे- कन्याकुमारी एक्स्प्रेस
उद्यापासून ऑनलाईन बुकींगला सुरुवात
31 मार्चला कन्याकुमारीवरून गाडी पुण्याकडे होणार रवाना
तर 1 एप्रिलपासून पुण्यातून कन्याकुमारी एक्स्प्रेस धावणार …
-
म्हाडाच्या पेपरफुटीसंदर्भातली मोठी बातमी
म्हाडाच्या पेपरफुटीसंदर्भातली मोठी बातमी
पुणे सायबर पोलीसांनी न्यायालयात आरोपींविरुद्ध 3 हजार 500 पानांच दोषारोपपत्र केलं दाखल
म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 6 जण अटकेत आहे.
म्हाडाच्या पेपरचं काम हे जी ए सॉफ्टवेअर याच कंपनीला देण्यात आलं होतं
जी ए सॉफ्टवेअरच्या प्रितीश देशमुख आणि एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांचा तपास करून हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्नद्धा डोलारे यांच्या कोर्टात हे दाखल करण्यात आलंय…
-
पुणे महापालिकेच्या नदीसुधार प्रकल्पाला शासनाने स्थगिती द्यावी
पुणे
पुणे महापालिकेच्या नदीसुधार प्रकल्पाला शासनाने स्थगिती द्यावी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशींनी ही मागणी केली आहे
6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात नदीसुधार प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलंय
पुणेकरांचे 900 कोटी रुपये पाण्यात घालण्याचा हा अट्टाहास असल्याचं मोहन जोशी यांनी म्हटलंय…
-
राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी सुजर मांढरे यांची नियुक्ती
नाशिक
राज्याचे शिक्षण आयुक्त म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी सुजर मांढरे यांची नियुक्ती
आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडून घेतला आयुक्तपदाचा पदभार
नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून सुरज मांढरे हे काम बघत होते
आता त्यांची नियुक्ती शिक्षण खात्यात करण्यात आली आहे
तर विशाल सोळंकी हे समाज कल्याण आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत..
राज्याच्या शिक्षण विभागानं हे आदेश काढलेत…
-
परिवहन मंत्री अनिल परबांच्या आवाहनाला पुणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद
पुणे
परिवहन मंत्री अनिल परबांच्या आवाहनाला पुणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद
आणखी 94 कर्मचारी परतले कामावर
त्यामध्ये 27 चालक तर 47 वाहक आहेत
पुणे विभागात एकुण 1063 कर्मचारी कामावर परतले आहेत…
-
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या थकबाकीदारांकडे सुमारे चारशे कोटींची थकबाकी
पुणे
शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या थकबाकीदारांकडे सुमारे चारशे कोटींची थकबाकी
बँकेने केली कर्ज वसूल करण्याची मोहीम सुरु
थकबाकीदारांना बजावल्या मालमत्ता जप्तीच्या नोटिसा
थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार
शिवाजीराव भोसले बॅंकेतील संचालकांच्या कथित गैरव्यवहारामुळे बॅंक अवसायनात
सध्या ठेव विमा महामंडळाच्या मदतीने पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना ठेव रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू
गेल्या पाच महिन्यांत ठेवीदारांना 263 कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या
-
21 मार्चपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक नेमले जाण्याची शक्यता
पुणे
जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल येत्या 21 मार्चला संपणार
अद्याप गट आणि गणांची प्रारूप रचना अंतिम न झाल्याने तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर नाही
त्यामुळे जिल्हा परिषदेवर 21 मार्चपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक नेमले जाण्याची शक्यता
Published On - Mar 12,2022 6:25 AM