Maharashtra News Live Update : सातारा पोलिसांकडून घरफोडी करणारी टोळी जेरबंद

| Updated on: Mar 16, 2022 | 6:27 AM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : सातारा पोलिसांकडून घरफोडी करणारी टोळी जेरबंद
Image Credit source: tv9 marathi

मुंबई : आज मंगळवार 15 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर आजपासून दहावीची बोर्डाची परीक्षा होणार सुरु होणार आहे, 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी परीक्षा देतील. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून 21 हजार 384 ठिकाणी परीक्षा होईल. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून घेतली परीक्षा घेतली जाणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Mar 2022 10:05 PM (IST)

    सातारा पोलिसांकडून घरफोडी करणारी टोळी जेरबंद

    साताऱ्यातील वडूज,औंध,उंब्रज,दहिवडी या ठिकाणी धाडसी दरोडे टाकून मारहाण करत जबरी लूटमार करणारी 5 जणांची टोळी सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि बीड जिल्ह्यातील आष्टी येथून ही टोळी जेरबंद केली आहे.. या आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनी वडूज,पुसेसावळी,मसूर येथील दरोड्याच्या गुन्ह्यांसह वडूज आणि दहिवडी येथील प्रत्येकी 1 घरफोडी अश्या 5 गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे..

  • 15 Mar 2022 07:47 PM (IST)

    राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव परत पाठवला

    विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचं प्रकरण

    राज्यपालांनी निवडणुकीचा प्रस्ताव माघारी पाठवला

    न्यायालयात प्रकरण असल्यानं राज्यपालांनी परवानगी नाकारली

  • 15 Mar 2022 07:30 PM (IST)

    नागपुरात 17 तारखेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच होणार जंगी स्वागत

    नागपुरात 17 तारखेला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच होणार जंगी स्वागत

    विमानतळ पासून काढण्यात येणार रैली

    रैली नंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरा जवळ होणार जाहीर सभा

    फडणवीस आणि गडकरी करणार सभेला संबोधित

    होळीच्या दिवशी भाजप उधळणार गुलाल

    फडणवीस यांच्या नेतृत्वात गोव्यात मिळालेला विजय आणि चार राज्यात गडकरी यांच्या प्रयत्नाला आलेलं यश याचा साजरा केला जाणार जलोश

  • 15 Mar 2022 06:27 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत दाखल

    नवी दिल्ली- देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत दाखल

    गोवा मुख्यमंत्री पदाबाबत नवी दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा

    प्रमोद सावंत गोव्यातून दिल्लीत रात्री दाखल होणार

    सावंत यांच्या येण्यापूर्वी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक

    विश्वजीत राणे यांचं मुख्यमंत्री पदाबाबत बंड शमणार का ?

    अमित शहा यांच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार

  • 15 Mar 2022 05:35 PM (IST)

    औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लवकर घेण्याची मागणी

    औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लवकर घेण्याची मागणी

    औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडीले यांनी केली मागणी

    सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे निवडणूक घेण्याची मागणी

    23 महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेवर सुरू आहे प्रशासकीय कारभार

  • 15 Mar 2022 05:33 PM (IST)

    प्रविण आष्टीकर शाई फेक प्रकरण, अजय मोरया यांना अटकपूर्व जामीन मंजूर

    अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ प्रविण आष्टीकर शाई फेक प्रकरण.

    आरोपी अजय मोरया यांना अटकपूर्व जामीन मंजूर.

    अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला जामीन

    वकील दीप मिश्रा व वकील प्रशांत देशपांडे यांनी केला युक्तिवाद..

  • 15 Mar 2022 04:39 PM (IST)

    चिकनचे दर 40 रुपयांनी महागले

    बर्ड फ्लू चा वाढता धोका आणि त्याच प्रमाणे उन्हाळ्यामध्ये असे देखील वाढणारे चिकनचे दर ,यामुळे आता सर्वसामान्य चिकन व्यवसायिक चांगलेच वैतागले आहेत.. गेल्या आठवड्याच्या तुलनेत नाशिक मध्ये चिकन प्रति किलो 40 रुपयांनी महाग झालाय तर अंड्यांचे दर देखील गेल्या आठवड्याच्या तुलनेत वधारल्याचे चित्र बाजारात बघायला मिळत आहे ..

  • 15 Mar 2022 04:11 PM (IST)

    वांद्रेच्या स्टेलर वर्ल्ड स्कूल शाळेत आयटीचे छापे

    वांद्रेच्या स्टेलर वर्ल्ड स्कूल शाळेत आयटीचे छापे

    अमरिश पटेल, करण जोहर सल्लागार समितीत

    36 तासांहून अधिक तास छापे सुरु

  • 15 Mar 2022 03:32 PM (IST)

    गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीला जाणार

    गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत जाणार दिल्लीला

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची घेणार भेट

    गोव्यातील राजकीय स्थितीबाबत करणार चर्चा

    प्रमोद सावंत यांचा दिल्ली दौरा गोव्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा?

  • 15 Mar 2022 02:48 PM (IST)

    पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस,वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस

    वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    वारजे माळवाडी येथील ‘रामनगर गृहरचना सहकारी सोसायटी’मध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा

    सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या मूळ सभासदांच्या हक्काच्या सदनिका भलत्याच लोकांना विकून ही फसवणूक केल्याचे समोर

    याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 15 Mar 2022 02:27 PM (IST)

    शेतकऱ्यांचं पीक उभं आहे तोपर्यंत कारवाई नाही: नितीन राऊत

    आपल्याला सवलती देत असलो तरी आपण वीज बिल वेळेत भरावे ग्राहकांनी असे आवाहन करत आहे

    वीज बिलाची तोडणी होणार नाही, शेतकऱ्यांचं  पीक ऊभं आहे तोपर्यंत कारवाई करणार नाही.. वेळेत बिल भरावं

    मध्यप्रदेशच्या धर्तीवर सरसकट वीजबिल माफी होईल का यावर विचार केला जाईल, असं नितीन राऊत म्हणाले.

  • 15 Mar 2022 12:38 PM (IST)

    शेतक-यांबाबत संवेदना या सरकारला राहीलेली नाही – देवेंद्र फडणवीस

    आज सभागृहात दोन्ही बाजूने सरकार सावकारी पद्धतीने वीज तोडमी चालू आहे, अदिवेशनात अजित पवार यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करत नाही, हे सरकार कोडगे आहे, शेतक-यांबाबत संवेदना या सरकारला राहीलेली नाही, ज्यांचे वीज तोडली त्यांना वीज जोडावी,

    मी कालच सांगितले होते सभागृहात प्रविण दरेकर यांच्यावर कारवाईल होईल, ते अर्बन बॅंक गटातून निवडून आलेत ते मजूर गटातून निवडणून आलेले नाहीत सत्ताधरी पक्षाचे नेत्यांचे मजूर संस्था आहेत, जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई झाली, 90 ट्क्के मजूर संस्थेतील लोक विविध पक्षांचे आहेत त्याच्या वर कारवाई करावी, सरकारला आम्ही सांगू जेवढे गुन्हे दाखल करा आम्ही सत्य बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही,

    कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे, कोर्टाने मान्य केले या सर्व व्यवहारात टेरर फंडींग शी संलग्न आहे आत्ता जर राजीनामा घेतला नाही तर हे सिद्ध होईल की त्यांचा दाऊदशी संबंध आहे सरकारवर कोणता दबाव आहे, का त्यांच्या वर दाऊदचा दबाव होता उद्धव टाकरे यांनी नवाब मलिक यांना तात्काळ बर्खास्त करावे

    मला अभिनंदन करतो 6 हजार 500 कोटींचे वीज बिल भरले, मी राज्याच्या सरकारकडे विनंती करतो शेतक-यांचे वीजेचे पैसे सरकारने द्यावे,

    स्वातंत्र ठिक आहे ,अधिकार ठीक ाहेत परंतु ज्या शैक्षणिक संस्था आहेत तेथे जे नियम ाहेत ते पाळले गेले पाहीजेत हिजाबचा वाद निर्माण करणा-यांनी आत्ता तरी गप्पा बसावे,

  • 15 Mar 2022 12:21 PM (IST)

    ठाकरे सरकार कोडगं सरकार – देवेंद्र फडणवीस

    ठाकरे सरकार कोडगं सरकार – देवेंद्र फडणवीस

    सुलतानी पध्दतीने शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे

    जाणीवपूर्वक प्रवीण दरेकरांवरती गुन्हा दाखल

    प्रविण दरेकरांविरूध्द सुडबुध्दीने गुन्हा दाखल केला आहे

    शेतक-यांविषयी सध्याचं सरकार संवेधनशील नाही

    विरोधक शेतक-यांविरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे

    विरोधक शेतक-यांविरोधात बोलतात म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे

    महाराष्ट्र सरकारने शेतक-यांच्या विजेच्या बिलाचे पैसे महावितरणला द्यावे

    शेतक-यांचं वीज बील माफ करावं

  • 15 Mar 2022 11:40 AM (IST)

    जे मजूर संस्थेत आहेत त्यांची यादी समोर आणू – प्रवीण दरेकर

    – चुकीचा एफआयआर झालाय, आधीच सी समरी फाईल केलीये, सुड भावनेतून गुन्हा दाखल केलाय,

    – राज्यात राष्ट्रवादीच्या आमदार खासदार नेते यांच्याही मजूर संस्था आहेत, त्यांचीही चौकशी करा अशी मागणी आम्ही करतोय…

    – जे मजूर संस्थेत आहेत त्यांची यादी समोर आणू…

    – भाजपला टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न, न्यायव्यवस्थेकडे दाद मागू,

    – एफआयआर झाल्यावर कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करावी लागेल, भाजपचे कोण प्रभावशाली नेते आहेत, त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतंय…

    – गिरीश महाजन यांना जसं फसवलं तसंच मला फसवण्याचा प्रयत्न, यांचं षडयंत्र होतं कालच करणार होते आज केलंय, आम्ही कायदेशिर ऊत्तर देऊ…

  • 15 Mar 2022 10:58 AM (IST)

    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार.

    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज सायंकाळी दिल्लीला जाणार.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या दिल्लीत ते भेटतील.

    गोव्याच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर डॉ. सावंत दिल्लीला निघतील.

    गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर डॉ. सावंत पहिल्यांदा दिल्लीला जात असून ते पंतप्रधानांना भेटणार आहेत.

    भाजपचे 20, अपक्ष 3 आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे 2 असे एकूण 25 आमदारांचे संख्याबळ गोव्यात सत्तास्थापनेसाठी पक्षाकडे आहे.

    मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याचे गूढ अजुन कायम आहे.

    नवनिर्वाचित आमदार आणि माजी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी शीतयुद्ध सुरू आहे.

    त्यातच, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा सत्तास्थापनेसाठी पाठींबा घेण्याच्या मुद्द्यावर गोवा भाजपाअंर्तगत प्रचंड विरोध आहे.

    या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची दिल्लीवरी महत्वाची मानली जातेय.

  • 15 Mar 2022 10:57 AM (IST)

    भाजप कार्यकर्ता मनोज कटके हल्ला प्रकरण

    भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले मात्र आरोपी अद्याप अटक केली नसल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. आज भाजपा कार्यकर्त्यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलं .लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली . उपोषण पोलिस ठाण्यात करण्यात येणार होते मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पोलिस ठाण्याबाहेर  जमा होत घोषणाबाजी करत पोलीस स्टेशन समोर किया मांडत उपोषण सुरू केलं .

  • 15 Mar 2022 10:38 AM (IST)

    काँग्रेस पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक

    काँग्रेस पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक

    पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेस मंथन करणार

    प्रियंका गांधी पराभवाच्या परिस्थितीचा आढावा घेणार

    पुढची रणनीति बैठकीत ठरण्याची शक्यता

  • 15 Mar 2022 10:17 AM (IST)

    विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

    विरोधी पक्षेनेते प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

    मुंबै बॅंकेतील बोगस मजूर प्रकरणी गुन्हा दाखल

    फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    न्यायालयात दाद मागणार

  • 15 Mar 2022 10:01 AM (IST)

    जलयुक्त शिवार घोटाळा प्रकरण, दोन निवृत्त अधिकाऱ्यासह दोन कर्मचार्‍यांना अटक

    बीड  : जलयुक्त शिवार घोटाळ्या प्रकरणी चौघांना अटक.. दोन निवृत्त अधिकाऱ्यासह दोन कर्मचार्‍यांना अटक..

    बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.. यातील शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत..

  • 15 Mar 2022 09:59 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी सीबीआय तपासाची मागणी केसी पाहीजे हा संवेदनशील विषय – मोहित कंबोज

    – ८ मार्च ला संजय राऊत यांना खुप आरोप केले सलीम जावेद जसे नवे काल्पनिक एपीसोड घेऊन येतात तसे संजय राऊत – संजय राऊत यांनी जे ओरोप केले आणि माहीती दीली ती अर्धवट – जीतू नवलानी अनेकांकडून पैसे घेतात असे आरोप करतायेत – १३ पानांचे हे पत्र – इडीच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असा आरोप संजय राऊत यांनी केला – १६० कोटींचा आरोप त्यांनी केला की जीतू नवलानी ने इडी च्या नावाने घेतले असा आरोप केला – संजय राऊत यांनी जर हे खरं असेल ॲन्टी करप्शन आणि सीबीआय ची मागणी केली असती – सेंट्रल एजन्सीची जर चौकशी करायची असेल तर सीबीआय आहे – या कंपन्यांवर सुद्धा गुन्हे नोंद पाहीजेत कारण लाच देणारा आणि घेणारा दोन्ही गुन्हेगार – या मध्ये सगळ्यांना आरोपी केलं पाहीजे – हे आरोप करताना उद्धव ठाकरे यांची सहमती मुख्यमंत्र्यांनी सीबीआयला पत्र लिहले पाहीजे – या पत्रात काहीही सत्य नाही स्वत:ला वाचवण्यासाठी हा खेळ खेळत आहेत – खंडणीची नवी सुरवात संजय राऊत करत आहेत का,

    मोहीत कंभोज –

    – जीतू नवलानी मार्फत कसे पैसे इडीला जातात याचा खुलासा राऊत यांनी केला पाहीजे

    – मुख्यमंत्र्यांनी सीबीआय तपासाची मागणी केसी पाहीजे हा संवेदनशील विषय

    – जर १५ दिवसात महाराष्ट्र सरकारने काही केले नाही तर आम्ही जनहित याचिका दाखल करणार आणि गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार,

    मोहीत कंभोज –

    डाॅ लांबे हा निवडणुन आलेले आहे त्यामुळे ते वक्फ बोर्डचे मेंबर झाले

    ते नाॅमनेटेड नाही , राष्ट्रवादीशी ते संलग्नित

    शरद पवार यांच्या बरोबर फोटो दाऊद बरोबर राष्ट्रवादी नेते कसे जोडले जातात याचे उत्तर द्या,

    देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फोटो त्यांचा आहे तो माहीम दर्गा येथील कार्यक्रमातील कारण लांबे तिथे ट्रस्टी होता

  • 15 Mar 2022 08:33 AM (IST)

    हिजाब प्रकरणी बेंगलोर उच्च न्यायालय आज देणार अंतिम निर्णय

    हिजाब प्रकरणी बेंगलोर उच्च न्यायालय आज देणार अंतिम निर्णय

    मुख्य न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जैबुन्नीसा मोहिउद्दीन यांच्या समोर सुरू होती सुनावणी

    विशेष सदस्यीय समिती आज निर्णय देणार

    निकालाकडे सर्वांचं लक्ष

    या निकालाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

    आज सकाळी सहा वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी असणार जमाव बंदी आदेश

    शाळा महाविद्यालयांच्या बाहेर पोलिसांची विशेष खबरदारी

  • 15 Mar 2022 08:32 AM (IST)

    सातारा जिल्ह्यातील 763 केंद्रांवर आजपासून दहावीची परीक्षा

    सातारा जिल्ह्यातील 763 केंद्रांवर आजपासून दहावीची परीक्षा…

    जिल्ह्यातील एकूण 39 हजार 903 विद्यार्थी देणार परीक्षा…

    जिल्ह्यात दहावीची 116 प्रमुख केंद्रे आहेत तर 647 उपकेंद्र आहेत…

    सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभाग सज्ज

  • 15 Mar 2022 08:09 AM (IST)

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळकत पत्रिकेवर पुरुषांसह आता महिलांची नावे लावण्याच्या उपक्रमाला सुरूवात

    पुणे

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळकत पत्रिकेवर पुरुषांसह आता महिलांची नावे लावण्याच्या उपक्रमाला सुरवात

    पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 1118 ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील पाच लाख 87 हजारांपेक्षा अधिक महिलांची नावे मिळकत पत्रिकेत समाविष्ट केली

    जिल्ह्यात 1384 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात नऊ लाख 33 हजार 188 एवढय़ा मिळकत पत्रिकांची संख्या

    त्यापैकी 1118ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन मिळकत पत्रिकांवर महिलांची नावे समाविष्ट केली

    उर्वरित 266 ग्रामपंचायत क्षेत्रात मिळकत पत्रिकांवर महिलांची नावे लावणे बाकी

  • 15 Mar 2022 08:08 AM (IST)

    रत्नागिरी- कोकण बोर्डामार्फेत १० वीचे ३१ हजार ५२६ विद्यार्थी परिक्षा देणार

    रत्नागिरी- कोकण बोर्डामार्फेत १० वीचे ३१ हजार ५२६ विद्यार्थी परिक्षा देणार

    दहावीच्या परिक्षेला आजपासून प्रारंभ, ४ एप्रिलला शेवटचा पेपर

    शाळी तिथे परिक्षा केंद्र हि संकल्पना राबवण्यात येणार

    यंदा परिक्षेसाठी अर्धा तास वाढळून वेळ

    रत्नागिरी जिल्ह्यातील २१ हजार ७९ तर सिंधुदूर्गातील १० हजार ४४७ विद्यार्थी परिक्षा देणार

  • 15 Mar 2022 08:07 AM (IST)

    पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 18 वाहनांचा ई-लिलाव

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 18 वाहनांचा ई-लिलाव

    -मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या 18 वाहनांचा जाहीर ई-लिलाव पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे 23 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईनरित्या आयोजित करण्यात आलाय

    -लिलावातील वाहने पाहणीसाठी 11 मार्च ते 22 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड आवारात उपलब्ध आहेत

    -यामध्ये बस, ट्रक, डी. व्हॅन, टुरिस्ट टॅक्सी, रिक्षा, जेसीबी या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे

  • 15 Mar 2022 08:06 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद

    -पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून पालिकेने आता पर्यंत 456 कोटी 61 लाख रुपये कर वसूल केला आहे

    -या महिन्या च्या अखेर पर्यंत ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे कर संकलन विभागाने स्पष्ट केलंय

  • 15 Mar 2022 07:52 AM (IST)

    नाशिक महपालिकेची प्रभाग रचना नव्याने होणार

    नाशिक – महपालिकेची प्रभाग रचना नव्याने होणार : अधिसुचना जारी

    इच्छुकांचे पुढील कार्यवाही कडे लक्ष, शासनाचा निर्णयाने धक्का

    शासनाकडून कोणतेही आदेश नाही हा विषय प्रलंबित राहिल्याने न्यायप्रविष्ट होण्याची शक्यता

    विभागणी, हद्दी निश्चितीची प्रक्रिया राहिलेली किंवा पूर्ण रद्द मानण्यात येईल असे अधिसूचनेत नमूद

  • 15 Mar 2022 07:51 AM (IST)

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध !

    नाशिक ब्रेकिंग –

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध !

    योगी आदित्यनाथ यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून निषेध !

    प्रणती शिंदे यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र पाऊल टाकण्याचा इशारा

    महंत अनिकेतशास्त्री यांच्यासह शिष्यांनी निषेध नोंदवत केले आंदोलन

  • 15 Mar 2022 07:51 AM (IST)

    राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला

    राष्ट्रीय लोकअदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला

    नुकत्याच झालेल्या लोकअदालतमध्ये 64 हजार 373 दावे निकाली काढण्यात आले

    लोकअदालतीसाठी 125 पॅनेलची नेमणूक

    विविध न्यायालयांत प्रलंबित 16 हजार 695 प्रकरणे, विशेष मोहीमेच्या माध्यमातून 17 हजार 714 प्रकरणे आणि दाखलपूर्व 29 हजार 964 प्रकरणे अशी एकूण 64 हजार 373 प्रकरणे निकाली

    तर 98 कोटी 7 लाख रुपये तडजोड शुल्क वसूल

  • 15 Mar 2022 07:50 AM (IST)

    रत्नागिरी कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट

    रत्नागिरी- कोकणात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट १५ आणि १६ मार्च दोन दिवस तापमानाचा पारा वाढणार हवामान खात्यानं दिला इशारा दुपारी १२ नंतर उन्हाच्या झळा अधिक तीव्र होण्याचा अंदाज उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान

  • 15 Mar 2022 07:49 AM (IST)

    करंजखेडा बाजारसमितीत व्यापाऱ्याला बेदम मारहाण

    करंजखेडा बाजारसमितीत व्यापाऱ्याला बेदम मारहाण

    गुंड व्यापाऱ्यांनी केली गरीब व्यापाऱ्याला बेदम मारहाण

    शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव दिल्यामुळे केली बेदम मारहाण

    व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून केली बेदम मारहाण

    हर्षवर्धन निकम आणि दत्तू गवारे अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे

    तर साहिल चुडीवाला असं बेदम मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव

    मारहाण प्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    मात्र अद्याप पोलिसांकडून आरोपीला अटक नाही

    मारहाणीमुळे करंजखेड बाजारसमितीत दहशतीचे वातावरण

  • 15 Mar 2022 07:49 AM (IST)

    टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण

    टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण

    मुकुंद सूर्यवंशी याच्या पोलीस कोठडीत 16 मार्च पर्यत वाढ

    सूर्यवंशी हा अपात्र परीक्षार्थीकडील प्रवेशपत्र व पैसे एजंटाकडून घेऊन ते अंकुश व संतोष हरकळ यांना देत असल्याचे तपासात आलं समोर

    सूर्यवंशी याच्या मोबाईल क्रमांकाच्या सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्यामध्ये टीईटी 2019-20 साठी बसलेल्या परिक्षार्थींचे संपर्क क्रमांक असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न

  • 15 Mar 2022 07:48 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात 195 केंद्रांवर होणार दहावीची परीक्षा

    वाशिम :

    आजपासून दहावीची परीक्षा असून 19 हजार 517 विद्यार्थी देणार परीक्षा…

    जिल्ह्यात 195 केंद्रांवर होणार दहावीची परीक्षा

    प्रत्येक केंद्रावर एक पोलीस व भरारी पथकाचा राहणार वॉच..

  • 15 Mar 2022 07:47 AM (IST)

    संजय राऊत यांच्या नागपूर भेटीनंतर उपराजधानीतील शिवसेनेत मोठे फेरबदल

    – संजय राऊत यांच्या नागपूर भेटीनंतर उपराजधानीतील शिवसेनेत मोठे फेरबदल

    – नागपूर शिवसेनेत आता असणार दोन महानगरप्रमुख

    – किशोर कुमेरीया यांची नागपूर महानगरप्रमुख म्हणून निवड

    – प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरीया असणार महानगरप्रमुख

    – शहर सहसंपर्कप्रमुखपदी मंगेश काशीकर यांची निवड

    – विशाल बरबटे आणि प्रविण बरडे यांनाही दिली जबाबदारी

    – महानगरपालिका निवडणूकीपूर्वी नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल

    – नागपूर दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांनी केलं होतं संघटनात्मक बदलाचं सुतोवाच

    – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने किशोर कुमेरीया यांची निवड

  • 15 Mar 2022 07:46 AM (IST)

    नारायण राणे यांना 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश

    मुंबई महापालिकेकडून केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांना जुहूतील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तिसरी नोटीस बजावण्यात आली आहे. नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी केली होती. नारायण राणे यांना ही तिसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे.

    नोटीसमुळं नारायण राणे यांना 15 दिवसात बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तर, नोटीसला देखील 15 दिवसात उत्तर द्यावं लागणार आहे.

  • 15 Mar 2022 07:45 AM (IST)

    दोन महिन्यात झालेल्या अपघातात जवळपास 50 जणांचा मृत्यू

    बुलडाणा

    जिल्ह्यात मागील दोन महिन्यात शंभर च्यावर अपघात,

    दोन महिन्यात झालेल्या अपघातात जवळपास 50 जणांचा मृत्यू,

    निर्माणाधिन खड्डे , जीवघेणे खड्डे ठरताहेत अपघातास कारणीभूत

  • 15 Mar 2022 07:44 AM (IST)

    औरंगाबादचा शेख युसूफ आपल्या ‘जिगर’ या घोड्यावर बसून कामाला जातो

  • 15 Mar 2022 07:42 AM (IST)

    चीनमध्ये पुन्हा 5280 कोरोना रूग्णांची नोंद

    चीनमध्ये पुन्हा 5280 कोरोना रूग्णांची नोंद

Published On - Mar 15,2022 6:18 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.