मुंबई : आज शुक्रवार 25 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. उल्हासनगरात कपडा दुकानदारावर अज्ञात चोरट्यांचा हल्ला. हल्ला करणारे चार ते पाच जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील एक मंत्री म्हणून घरफाळ्याबाबत आरोप केला
चंद्रकांत दादा अपरिपक्व असतील असे वाटले नव्हते .. जर थकबाकी असती तर विधान परिषद निवडणूक अर्ज वैध ठरला नसता
साडे अकरा कोटींचा घरफाळा भरलेला आहे ..महापालिकेच लेखीपत्र आहे आमची कोणतीही थकबाकी नसल्याच त्यात म्हटलं आहे. त्यामुळे चंद्रकांतदादाकडून ही अपेक्षा नाही
विधानसभेची निवडणूक बाजूला राहिली यांनी माझ्या वर टीका चंद्रकांतदादा करत आहेत ..
भाजपाची नीती आहे खोट बोलायचं वारंवार खोटं बोलायचं
निवडणूक झालं की सगळं बाहेर पडल जात
कोल्हापूरची जनता अशा गोष्टी ना भुलणार नाही
तुम्ही पाच वर्षात कोल्हापूर साठी काय केलं .. चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना ह्यांनी काय केलं ते सांगा … फक्त टीका करण्याचं काम केलं जात
कल्याणमधील एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्ष आयाज मौलवी यांचा सदस्यत्वाच्या राजीनामा
वरिष्ठ पदाधिका:यांच्या मनमानीला कंटाळून दिला राजीनामा
आयाज मौलवी यांची पत्नी तंजिला होती एमआयएमची नगरसेविका
पती पत्नी आत्ता राष्ट्रवादीत प्रवेश करणार
सांगली शहरा सह जिल्ह्यात अनेक भागात वादळ वाऱ्या सह मुसळधार पावसा ला सुरवात
सांगली सह जिल्ह्यात सकाळ पासून हवामान ढगाळ
गेली चार दिवस सतत हवामानात होत आहे बदल
अचानक सुरू होत असलेल्या पावसामुळे सर्व ची होत आहे धावपळ
माझा जामीन फेटाळला आहे
मी कायद्याचे पालन करणारा नागरिक
मला मंगळवारपर्यंत संरक्षण
मला न्याय मिळेल, माझा उच्च न्यायालयावर विश्वास : प्रविण दरेकर
महाविकास आघाडीला उत्तरं देता आली नाही
अजित पवारांना विदर्भ मराठवाड्यात किती पैसे खर्च झाले सांगता आलं नाही
अधिवेशनात मोठे निर्णय नाहीत
सरकारकडून कोणतेही दिलासा देणारे निर्णय नाहीत
महाराष्ट्र सरकारनं कर कमी केले नाहीत
पेट्रोल डिझेल बाबत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस किती दुटप्पी आहेत
आजचं भाषण शिवाजी पार्कवरील भाषण होतं
मुख्यमंत्री काश्मीरला गेले, दिल्लीला गेले पण भ्रष्टाचारावर बोलले नाहीत
उद्धव ठाकरे नवाब मलिक यांचं समर्थन करतात
काय लाचारी शिवसेनेवर आली
महाविकास आघाडी सरकार या अधिवेशनामुळं उघडं पडलं: देवेंद्र फडणवीस
1994 ला वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली
विदर्भाला राज्यापालांच्या सूचनेनुसार जो काही निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळाला पाहिजे
मराठवाडा आणि विदर्भावर महाविकास आघाडीचं सरकार अन्याय होऊ देणार नाही
विदर्भाला 29 हजार कोटी रुपये दिले
मराठवाड्याला साडे 21 हजार कोटी
आम्ही पण सरकारमध्ये काम करतो
कोणीही राज्याचा मुख्यमंत्री, मंत्री म्हणून करतो
आम्ही सरकारमध्ये असलो की विदर्भाचे विरोधक आहोत अशी भावना तयार करायचं काम होतं
जयंत पाटील अर्थमंत्री असताना नाथसागरपासून गोदावरी वर बॅरेज बांधण्याचं काम केलं
मराठवाडा ग्रीडला आमचा विरोध असण्याचं कारण नाही
इस्त्राईल सारख्या देशात चार इंच पाऊस पडतो, पाईपलाईन द्वारे लांबवर पाणी नेलं
मुळाला पाणी द्यायचं म्हणजे काय, शिवाराला पाणी द्यायचं असा प्रयत्न झाला
मागच्या सरकारमध्ये मराठवाडा ग्रीड संदर्भात काम झालं
आम्ही टप्प्या टप्प्यानं पुढं जाणार आहे
बबनराव लोणीकर इथं नाहीत
आज 62 वर्ष झालेत राज्याला
विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांनी 32 वर्ष मुख्यमंत्रिपद भूषवलं
10 वर्ष कोकण
20 वर्ष पश्चिम महाराष्ट्रानं मुख्यमंत्रिपद भूषवलं
समोरचा व्यक्ती नवी दिल्लीला गेल्यावर उत्तर महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळू शकतो
आपला महाराष्ट्र साधुसंताचा
चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्यासाठी नेत्यांकडून मागणी
वाईन सुपरमार्केटमध्ये ठेवण्याचा निर्णय अद्याप लागू नाही
मध्यप्रदेश मधील दारु आणि वाईन विक्रीसंदर्भातील आकडेवारी अजित पवारांनी मांडली
सुपरमार्केटमध्ये सध्या अंडी, मटण, विक्रीस ठेवलेलं असतं तिथं शाकाहारी माणूस जात नाही
जनतेला ते नको असेल तर ते आम्ही लादणार नाही
उत्पन्न वाढवण्यासाठी काही गोष्टी केल्या पण वाईट गोष्टी घडणार असतील तर तो निर्णय लागू होणार नाही
राम मंदिर नंतर दाऊदचा विषय हाती घेणार का?
दाऊद कुठं आहे हे कुणाला माहिती आहे.
रामाच्या नावानं मतं मागितली होती आता दाऊदच्या नावानं मत मागणार का
मेहबुबा मुफ्ती यांच्या सोबत सरकारमध्ये बसला होता, त्या सरकारला अफजल सरकार आणि बुऱ्हाण सरकार म्हणणार का?
कडवट हिंदुत्त्ववादी आहे आणि राहणार आहे
सत्तेसाठी आपण काय करायचं हे सोडून
एक म्हणं आहे, स्वत: चं ठेवायचं झाकून असा प्रकार आहे
मुद्दसीर लांबे यांच्या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्युत्तर
लांबे यांच्या नियुक्तीपत्रावर विनोद तावडे यांची हिरव्या शाईनं सही
कोरोनाशी लढताना नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांना पक्षीय भेद न करता मदत केली
केंद्रानं काही काळ पीपीई किट दिलं, ते मोफत दिलं
त्यानंतर केंद्रीय सचिवांचा गट तयार केला गेला.
व्हेंटिलेटर घेतले गेल पण चालले नाहीत
कोविडच्या काळात जी परिस्थिती होती त्यावेळी लोकांना वाचवायचं होतं की वाट बघत बसायचं होतं
धारावी वाचवली हे केवढं मोठं काम झालं
केंद्राचं पथक यायचं, धारावीला वाचवायला सांगायचं
महापालिका कर्मचारी, आयुक्त यांनी काम केलं
धारावीला वाचवलं
मुंबईतील दहिसर येथील प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना चिमटे
डू द नीडफूल अशी सही कुणाची
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असा उल्लेख केला तर चालेल ना
केरळचं उत्तर तामिळनाडूला, असं होईल, उद्धव ठाकरेंचा नारायण राणेंना टोला
त्या जागेवर रुग्णालय व्हावं ही तुमच्यासारखीच आमची इच्छा
कोर्टात प्रकरण आहे, महापालिकेचा आक्षेप आहे, वाजवीपेक्षा जादा पैसे दिले गेले, दर ठरवण्याचं काम महसूल खात्यानं केलं
कोविड काळात भ्रष्टाचार
धारावीचा पूनर्विकास प्रकल्प रखडलाय
बॉम्बे उच्च न्यायालयाचं मुंबई उच्च न्यायालय करायचंय
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद प्रश्न रखडलाय
आरेची जागा वादग्रस्त आहे. कांजूरमार्गला केंद्रानं मंजुरी दिली नाही, तरी देखील मेट्रोचं काम सुरु आहे
मेट्रोच्या कामाबद्दल जो मुद्दा मांडलाय तो देवेंद्र जी तुमच्याच काळातील आहे
खर्च का वाढला ते पाहावं लागेल
मुंबई मॉडेलचं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयानं कौतुक केलं
जम्बो कोविड सेंटर सुरु केलं
नरेंद्र मोदी यांनी धोक्याची घंटा लक्षात आणून दिली
कोरोना काळात जम्बो रुग्णालय उभारली
देशात दुसऱ्या कोणी जम्बो कोविड सेंटर उभारली नसती तर काही ठिकाणी नदीत मृतदेह सापडले यासारखी स्थिती झाली असती
मुंबईतील अनेक विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत.
मराठी भाषा भवनचं 2 एप्रिलला भूमिपूजन होणार
Uddhav Thackeray Live :
रावणाचा जीव म्हटलं जातं तसं
काही जणांना केंद्रात काही मिळालं तरी त्यांचा जीव मुंबईत आहे असं म्हटलं जातं
मुंबईसाठी काय केलं ते दिसत नसेल तर लक्षात आणून द्यावं लागेल
महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून रांग लागलेली असते
8 भाषांमधून शिक्षण देणारी पहिली महापालिका
कोविड काळात मोफत, 5 रुपयांनी आणि आता 10 रुपयांनी शिवभोजन दिलं
कोट्यवधी थाळ्या लोकांना दिल्या
आझादीचा अमृतमहोत्सव आहे त्याला 500 कोटी रुपये राखीव ठेवले
आरसा बघितला तरी त्यांना भ्रष्टाचार झाला असा भ्रम होतो
आरसा बघितल्याशिवाय स्वत:चा चेहरा कसा आहे हे कसं कळणार
समृद्धी महामार्ग, कोकणातील महामार्गाची काम करतोय
जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत.
शस्त्रक्रियेच्या काळात आपण सांभाळून घेतलंत
मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी देखील चांगलं काम केलं,
जे झालंय ते झालय ते नाकारण्याचा नाकर्तेपणा करु नये
सुधीर भाऊ छानपैकी बोलता त्याचं उत्तर द्यावं लागतं
महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणालात
आपण, चंद्रपूरमधून आलात विदर्भाचे मुद्दे मांडणार
बाजूला मध्यप्रदेश आहे, त्यांचे आकडे वाचणार आहे
आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं… असं करायचं नाही
एक लाख लोकसंख्येमागं मद्यविक्रीची दुकानं महाराष्ट्रात कमी आहेत
कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि तामिळनाडूच्या आकडेवारीचं मुख्यमंत्र्यांकडून वाचन
महाराष्ट्राला बदनाम करता हे योग्य नाही
टीका करा पण कोणत्या टोकाला जाताय हे योग्य नाही
Uddhav Thackeray Live : राज्यपाल काय बोलतात ते ऐकून घ्यायला हवं होतं
तुम्ही आठवडाभर दाऊदचा मुद्दा काढत होता
राज्यपालांंचं भाषण ऐकलं नाही
राष्ट्रगीताला राज्यपालांना थांबू दिलं नाही
हजारो किलोमीटर लांबून ऑक्सिजन आणायला लागत होता
मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑक्सिजन एअरलिफ्ट करता येतो का हे विचारलं
ऑक्सिजन ज्वलनशील असल्यानं एअरलिफ्ट करता येत नाही, मग रिकामे टँकर एअरलिफ्ट करण्यात आले
ही तिचं यंत्रणा आहे जी कोरोना काळात कार्यरत होती
पर्यावरणाबद्दल गांभीर्यानं कोणी काम करतंय का?
स्कॉटलंड येथील परिषदेत महाराष्ट्राचा सन्मान
केशव प्रसाद मौर्य, ब्रजेश पाठक यांना उपमुख्यमंत्रिपद
दिनेश मिश्रा यांना डच्चू
योगी सरकारचा आज शपथविधी
ईडीने जप्तीच्या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार
महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती ही कारवाई सुरु आहे
मी काही गोष्टींचा तपास करीत आहे
ईडीच्या जी काही प्रक्रिया त्याला सहकार्य केलं
माझ्याबाबत सुरू असलेल्या बातम्या पाहत होतो
माझी वस्तूस्थिती सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून मी बोलतोय
माझी मुलं माझ्या कंपनीत मला भागीदार आहेत.
मी विद्यार्थी दशेतून राजकारणात आलोय
न्याय प्रक्रियेवरती माझा विश्वास आहे
केंद्राच्या आणि राज्याच्या संघर्षामध्ये या गोष्टी होणार आहेत.
महाराज्यांनी स्वराज्याची स्थापण केल्यानंतर त्यांनाही अडचणी आल्या
मुख्यमंत्री आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत,
त्याच्यावर कानावर सगळ्या घातल्या आहेत. यापुढेही घालणार आहे.
ईडीने मला नोटीस दिल्यानंतर दोनदा मी दाखल झालो
मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मदत करेन
ठाकरे सरकारची ही माफीया सेना, राज्यात जनतेला वाचवण्यासाठी इडीच्या कारवाया… एनएसइएलचा ५६०० कोटींचा हा घोटाळा आहे, कारवाया सुरूच राहणार…
– २१६ कोटी रुपये अस्था कंपनीत आले, त्यातील ३५ कोटी प्रताप सरनाईकला गेले, त्यातून त्याने ठिकठिकाणी संपत्ती घेतल्या… टिटवाळ्यातील ७८ एकर जमिन जप्त झाली, २ फ्लॅट जप्त झाले..
– भविष्यात प्रताप सरनाईक यांनाही अटक होऊ शकते…
– २०१३ मध्ये हा घोटाळा मी ऊघडकीस आणला , कोर्टात तक्रार केली, ६५०० कोटी रुपयांचा हा घोटाळा, बोगस कर्ज दाखवलं, एकालाही कर्ज दिलं नाही…
– मोहीत अग्रवालने आणि प्रताप सरनाइतने जिथे जिथे पैसे फिरवले ती संपत्ती इडीला जप्त करावी लागेल…
– एका बाजूला एनएसइएल तर सुदरीकडे एमएमआरडीए स्कॅमची भविष्यात चौकशी होणार…
– हायकोर्टाचं सध्या सरनाईकांचे संरक्षण… पण मी इडीला सांगितलं की इडीने पुढाकार घ्यावा, कोर्टाला सांगा की. प्रताप सरनाईक तपासात सहकार्य करत नाही…
– अदीत्य ठाकरेंच्यै मनी लाॅंड्रींगचे डाॅक्युमेंट दिले आहेत… ही केवळ सुरवात… डर्टी डजनविरोधात कारवाई सुरू…
– संजय राऊतांच्या पार्टनरवरही कारवाई होणार,
– मी भविष्य सांगत नाही, पण कर्मात विश्वास करतो, धमक्या दिल्या तरी लढतोय,
– त्यांचा लूटचा माल इडी जपत करतोय, ठाकरे सरकारने मन्सुख हिरेनची हत्या केली, या माफियांना सोडणार नाही, संजय राऊत दोन महिने बोंबलले की नील जेलमध्ये जाणार, काय झालं, अनिल परबचा रिसाॅर्ट आज ना ऊद्या तोडणार…
अकोला जिल्हात कापसाला मिळाला 12 हजार रुपये भाव….
अकोट बाजार समिती मध्ये मिळाला कापसाला 12 हजार रुपये भाव….
राज्यातील आतापर्यंतचा सर्वोच्च दर….!
आमदारांच्या पेन्शन बाबत पंजाब सरकारचा मोठा निर्णय
एकाच टर्म मध्ये मिळणार आमदारांना पेन्शन
यापुढे पंजाबच्या आमदारांसाठी पेन्शन एका टर्मसाठी असेल
प्रत्येक टर्मसाठी वेगळी पेशन मिळणार नाही. जे ते आताच्या प्रणालीप्रमाणे जिंकले असतील त्यांना पेशन मिळेल
मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मोठा निर्णय
पेन्शनच्या निर्णयांमध्ये केला मोठा बदल
आपल्या कडील हळद निर्यात होते
1लाख 40 हजार कोटी च खाद्य तेल निर्यात करतो
मी रोजगार देण्यासाठी काम करत असतो 92 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे
रोजगार साठी ग्रामीण भागात योजना राबवायचा आहे
नोकरी करणाऱ्या पेक्षा नोकरी देणारे बना
जगाच्या मार्केट मध्ये भारतीय वस्तू ला मोठी मागणी आहे
नागपुरात संत्र्याचा जाम तयार केला तो सगळ्यांना आवडतो आहे
पॉवर साठी कोळसा लागतो मात्र सरकार ला निर्णय घ्यायला लावला आता व्हाइट कोल वापरायचा बायोमास पासून पॅलेट तयार करायचे यात शेतकऱ्यांच्या वेस्ट जाणाऱ्या पराट्या तुराट्या पासून पॅलेट तयार केले तर ते एनटीपीसी विकत घेईल त्यातून शेतकात्याना ही फायदा होईल आणि विजेची बचत होऊ शकते
ग्रामीण भागातही रोजगार निर्माण होईल
राहुल गांधींच्या निवासस्थानी बैठक सुरू
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बैठकीला उपस्थित
तुगलक लेनमध्ये पोहोचल्या सोनिया गांधी
हरियाणातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
एमपीएससी आयोगानं पीएसआय पदांचा निकाल केला जाहीर
2019 च्या जाहीरातीमधील 496 पदांचा निकाल केला जाहीर
निलेश बर्वै राज्यात मुलांमधून प्रथम आलाय तर सुप्रिया रावण ही मुलींमधून प्रथम आलीये
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अँक्टीव्ह मोडवर !
सर्वोच्च न्यायालयाने UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दिव्यांग उमेदवारांना IPS, RPF आणि DANIPS मध्ये नोकरीसाठी अर्ज सादर करण्याची परवानगी दिलीय.
उमेदवार १ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
हा अंतरिम आदेश असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मात्र या लोकांना सेवेत घेतले जाणार की नाही हे अंतिम आदेशावर अवलंबून असेल.
संसदेत खासदार नवनीत राणा यांच्याकडून pendrive बॉम्ब ?
मी खासदार असतानाही कुठलाही गुन्हा केला नसताना, मला गाडी मधून नेलं गेलं, माझ्यासोबत गैरव्यवहार केला गेला
शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवला, 100 हुन अधिक पोलीस घरी आले होते, जे आमच्या जवळचे लोक आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत
आरती सिंग यांच कौतुक केलं जातं आहे, सुप्रिया सुळे यांना टोला
Pendrive मधून राणा यांनी सादर केले पुरावे, पोलीस आयुक्त वर कारवाई व्हावी – राणा
आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरुन बराच गदारोळ होतोय, मी स्पष्ट करु इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत अधिक बांधकाम खर्च ( अपेक्षित खर्च 70 लाख ) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.
– जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
बारामतीत फलटण रस्त्यावर इसाक बागवान यांचं अलिशान हॉटेल
हॉटेल निलम पँलेस इसाक बागवान यांच्या मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर
बारामतीत असणार ए ग्रेड चं 30 खोल्याचं हॉटेल
जागेबरोबरचं काही कोटींची मालमत्ता बागवान यांनी कमावल्याचा फडणवीसांचा आरोप
राज्याच्या कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागात महाघोटाळा
घोटाळ्याची संचालक दिलीप झेंड, कृषी आयुक्त धिरज कुमार आणि दादा भुसे यांची तक्रार
वसंत मुंडे यांची ईडी कडे तक्रार
कागदपत्रांसह घोटाळा उघड करण्याचा इशारा
प्रताप सरनाईक यांची 11.36 कोटींची संपत्ती जप्त
11.36 कोटींची संपत्ती असल्याची माहिती मिळत
ठाण्यातली मालमत्ता
ईडीची ठाण्यातली दुसरी कारवाई
जमीनींची किंमत 11.36
प्रताप सरनाईक यांना दणका
ईडीने या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे
भाजप आमदार अमित साटम यांचा गंभीर आरोप
पालिका आयुक्त इक्बाल सिंग आणि त्यांचे नातेवाईक गायक सोनू निगमला धमकी देत आहे
फुकट शो करा नाहीतर तोडक कारवाई करु अशी धमकी दिली जाते।
– आमदारांना मिळणाऱ्या घराबाबत कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदेची प्रतिक्रिया
– मुंबईत आमदारांना देण्यात येणारे घर स्विकारणार नसल्याची आमदार प्रणिती शिंदेंची भूमिका
– घरांसाठी बऱ्याच आमदारांची मागणी होती. अनेक आमदार ग्रामीण भागातून येतात आणि त्यांना मुंबईत घरे नसतात
– माझ्यासारखे काही आमदार आहेत ज्यांची मुंबईत घरे आहे. त्यामुळे त्यांना घराची गरज नाही.
– घरे देताना अशा आमदारांची निवड करावी ज्यांच्याकडे मुंबईत घरे नाहीत.
– मला या सदनिकेची गरज नाही उलट सध्या असलेल्या आमदार निवासाचा वापर माझ्या मतदारसंघातले रुग्ण, गरजू जेव्हा मुंबईत जातात तेव्हा त्याचा वापर करतात.
– त्याप्रमाणे ज्या आमदारांना ही घरे नको आहेत त्याचा वापर रुग्णासाठी, लोकांसाठी तसेच औषधोपचारासाठी वापरावा.
– आम्ही लोकांसाठी राजकारणात आलोय त्यामुळे ज्यांना गरज नाही त्यांनी घर घेणे चुकीचे ठरेल
– त्यामुळे मी इतर आमदारांना आवाहन करते की त्यांनी यावरील हक्क सोडावा.
– मुख्यमंत्री आणि मंत्रीमहोदयांना कळवणारे आहे की मला हे घर नकोय आणि स्वइच्छेने मी हे देऊन टाकते.
– विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे मनापासून धन्यवाद
– फडणवीसांनी हा विषय विधानसभेत मांडल्यामुळे अवैध धंद्यावर आळा बसेल.
– या प्रकरणातील पीएसआय संदीप शिंदे यांच्यावर चौकशी असताना त्यांचे प्रमोशन केले गेले.
– चौकशीदरम्यान त्यांची पदोन्नती करणे हे चुकीचे याविरोधात मी पोलिस आयुक्तांना निवेदन देणार
– संदिप शिंदे यांच्या पदोन्नतीबाबत चौकशी केली जावी तसेच संदिप शिंदे यांना तातडीने निलंबित केले जावे याबाबत निवेदन देणार
– क्राईम ब्रांच मध्ये संदिप शिंदे यांची एक टीम होती. त्यात त्यांचे मित्र आणि काही पोलिस कॉंस्टेबलचा समावेश होता. अवैध धंद्यांना ते प्रोत्साहन देत होते
– स्टिंगमध्ये दिसलेले अजय पाडवी यांचे निलंबन झाले. आता पीएसआय संदिप शिंदे यांचे निलंबन व्हावे
– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाडवींवर कारवाई केली असती तर हा विषय विधानसभेत गेला नसता.
– या प्रकरणात (ACB) लाचलुचपतचा मोठा निष्काळजीपणा आहे. सोलापुरातील डीवायएसपी निष्काळजीपणे काम करतात
– या प्रकरणात एसीबी मार्फत गुन्हा नोंद व्हावा म्हणून पुन्हा एकदा एसीबीकडे तक्रार देतोय
– तसे न झाल्यास मी हायकोर्टात जाऊन लाचलुचपतचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार.
राज्य सरकार शेतकऱ्यांच दुश्मन झाला आहे अशी टीका अनिल बोंडे यांनी केली…
तेलंगना मधील अर्थमंत्र्यांच्या विधानात तथ्य आहे….
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सळो कि पळो करून ठेवल आहे .
एक तर दिवसा वीज नाही;रात्री 11 वाजता सुरू करतात सकाळी बंद करतात…
दिवसा सलग आठ तास जरी वीज मिळाली तरी शेतकऱ्यांना त्यांचे पीक वाचवणे शक्य होते..
रोहित्र ट्रान्सपोर्ट जळल्यानंतर पंधरा-पंधरा दिवस महावितरण दुरुस्त करायला येत नाही.
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी सोलर चा प्रोजेक्ट आणला होता
या सरकार मूळ शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून पीक वाचचावी लागत आहे.
कर्नाटक सरकार म्हणत असेल की शेतकरी कर्नाटकात जमीन घेत आहे तर ते खोटं नाही.
पण राज्य सरकार शेतकऱ्यांच दुश्मन झाल आहे अशी टीकाही अनिल बोंडे यांनी केली .
वैद्यकीय क्षेत्राबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
आयुर्वेदिक आणि अलोपॅथिक वाद संपुष्टात
दोन्ही डॉक्टर एकाच वेतनाचे हक्कदार
वेतन समान मिळण्याचा मार्ग मोकळा
अनिल परब यांचा रिसाॅर्ट अनधिकृत, त्यावर कारवाई होत नाही त्यामुळे त्याची विचारणा करण्यासाठी सोमय्या येत आहेत
सोमय्या प्रशासनाला जाब विचारायला येत आहेत कुणाच्या हिमत असेल तर कोण आडवं येतं ते पहायचं आहे
आम्ही सकळे जाणार आहोत, कुणाला धमकी द्यायची हा राजकीय विषय नाही
तुम्ही जर याला राजकीय रंग देणार असाल आम्ही बुलडोजर घेवून जातोय
आम्ही प्रशासनाला विचारायला जातोय आम्हाला धमकी देणार असतील तर जशास तसे उत्तर देवू
दोन हात करायचे ठरवले असतील तर आमचे काय हात बांधलेले नाहीत जशास तसे उत्तर मिळेल
सोमय्या यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीकडून होणाऱ्या विरोधाला माजी खासदार निलेश राणेंचे उत्तर
रिफायनरी बाबात शिवसेनेची बदललेली भुमिका बदलणारच
परिस्थिती बदलते पैसे दिसायला लागतात तसी शिवसेना टुम करून बदलते
पैसे हा शिवसेनेचे बटण आहे पैसा आला कि शिवसेना ट्टिस्ट
रिफायनरी आता कोकणात येणार हे कळल्यावर शिवसेनेनी यावर आढावा घेतला
शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी यावर वजाबाकी केली, एन्राॅन बाबत जे केले तेच रिफायनरी बाबतीत होणार
विधानसभेतील मुख्यमंत्र्याचे भाषण नव्हते ते सेना भवनातलं होतं
बाशासाहेबांच्या भाषणाची क्वाॅलीटी मुख्यमंत्र्यामध्ये नाही
टोमणे मारणे म्हणजे मुख्यमंत्र्याचे भाषण नाही
मुख्यमंत्र्याचे भाषण म्हणजे रटाळ कुजलेलं भाषण
मुख्यमंत्र्यांची विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली त्यात ते निरुत्तर झालेत
मुख्यमंत्र्यांनी लोकं टिंगल उडवायला लागलेत, मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासारखे बोलत नाही
ते दादरमध्ये असल्यासारखे बोलतात- निलेश राणे
चोरी चकारी केली तर ईडी मागे लागणारच
यांची चोरी केली तर हुकुमशाही केंद्राचा दबाव असतो
राणेंना आठवड्याला तीन नोटिस आठड्याला येतात
खोट्या केसेस दाखल केल्या जातात
तक्रार नसताना केस हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतय
आपण काय करतो हे ठाकरे सरकारने पहावे
मेवणा पकडला गेला म्हणुन तडफड आहे
मुख्यमंत्री दिसले नाहीत इतके वर्ष
दोन वर्ष मुख्यमंत्री दिसले नाहीत, मेवणा पकडला गेला म्हणुन मुख्यमंत्री बाहेर आले
मुख्यमंत्री असे मिळाले कि ज्यांना महाराष्ट्र कळला नाही विधिमंडळ कळले नाही
पुन्हा मालेगांव शहरात लागली प्लास्टिक गोदामाला आग..
प्लास्टिक गिट्टी कारखान्याचा लाखो रुपयांचा माल जाळून खाक..
हरित लवादाच्या आदेशानंतर मालेगाव मनपा आणि प्रशासनाने म्हाळदे शिवारातील १०० हुन अधिक कारखाने सील केल्याचा केला होता दावा..
कारखाने बंद होते तर प्लास्टिक आले कुठुन..
एक नव्हे तर अनेक कारखान्यांना लागली आग..
सुदैवाने जीवितहानी झाली नाही..
परंतु प्रशासन आणि मनपाच्या अग्निशमन विभागाची उडालेली तारंबर याला जबाबदार कोण…
जवळच असलेल्या नागरी वस्ती आणि पेट्रोल पंप यांच्या पर्यंत आग पोहचू नये यासाठी अग्निशमन विभागाचे अतोनात प्रयत्न सुरू..
सुमारे १०:३० च्या सुमारास आग लागली असून आत्ता पर्यंत सुरू असून अग्निशमन विभागाचे 6 बंब पोहचले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू…
नाशिक -ऑनलाइन गेम संदर्भात कायद्यात बदल करण्याची आवश्यकता
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज्यसरकार कडे केली मागणी
ऑनलाइन गेम मुळे अनेक तरुणांची आत्महत्या
गेम मध्ये आर्थीक नुकसान झाल्याने तरुण करत आहेत आत्महत्या
कायद्यात दुरुस्ती केल्यास ऑनलाइन गेम वर आळा घालण्यात मदत होईल
15 हजार कोटींची एक इंडस्ट्री वर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारला पोलीस आयुक्त करणार मागणी
जळगाव मध्ये ज्या विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला त्याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. ही अपघाताची दुःखद घटना आहे आणि या वडिलांनी या मुजोर सरकाराला शरद पवार राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारणा केली पाहिजे. जेव्हा जेव्हा मेल्यावर ती कारवाई झाली त्या वेळी स्वतः गाडी चालवून त्यांना तिकडे जाण्यासाठी वेळ आहे मात्र चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यांची मागणी आहे त्यांना निदान एक दोन तीन मिनिट तरी भेटायला वेळ आहे का हा प्रश्न आता एसटी कर्मचारी उपस्थित करत आहेत.
टेस्ट जरी भाजपची असली तरी बेबी तुमच्याच नावाची आहे
त्यामुळे पेन ड्राईव्हला टेस्ट ट्यूब बेबीचे नाव दिले जात आहे
खासदार नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका
पेन ड्राइव्ह टेस्ट ट्यूब बेबी आहे का ? राऊत यांनी विचारला होता सवाल
महाराष्ट्र राज्यात सुडाचे राजकारण चालू आहे – नवनीत राणा
आमदारांना घर आहेत, मात्र गोरगरिबांना महाराष्ट्रात घर नाहीत, त्यांचा विचार राज्य सरकारने करावा, मनोरा आमदार निवासबाबत राज्य सरकारने विचार करावा, आदर्श घोटाळा प्रमाणे मनोरा आमदार निवास घोटाळा आहे, राज्य सरकारकडून आमदारांना तीनशे घरे देण्याचा निर्णय
यापूर्वी देशात महाराष्ट्राचे प्रशासन अग्रभागी होत, पण आता नियमाप्रमाणे प्रशासन चालत नाही, म्हणूनच परमविर सिंह केस सीबीआयकडे दिली गेली
आता मातोश्री डेंजर झोनमध्ये आले आहे – राणा
जळगाव विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण, ही घटना दुःखदायक आहे, एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था सरकारने पाहावी, सगळ्या बाबतीत ठाकरे सरकार फेल होत आहे
मुख्यमंत्र्यांना त्यांचे आरोग्य कामाची परवानगी देत नसेल तर शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद द्यावे नवनीत राणा यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
नंदुरबार निझर रस्त्यावर हॉटेल हायवे जवळ कंटेनर आणि आर्टिका गाडीचा भीषण आपघात….
रात्री 1 वाजेच्या सुमारास झाला आपघात..
आपघतात तीन जण ठार..
आपघातात हिरालाल पवार,अनिल सोलंकी,प्रशांत सोनवणे हे ठार….
प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलाचा जवान.
देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेल्या बारामतीतील जागेवर टीव्ही 9 मराठी
42 एकरात प्लॉटींगचं काम सुरू
पोलीस दलातील माजी अधिकारी इसाक बागवान यांनी बारामती ते मुंबईपर्यंत जागा घेतल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप
सध्या 42 एकर जागेत काम सुरु बारामतीत इतरही ठिकाणी जमिनी
सदनिका आणि अलिशान हॉटेलही आहे ..
देवेंद्र फडणवीसांनी आरोप केलेल्या जागेची काय परिस्थिती आहे
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चिरेखणी येथील मराठा रेजीमेंट मध्ये महेंद्र भाष्कर पारधी हा जवान कार्यरत होता. माञ अरुणाचल येथे होत असलेल्या हिमवृष्टीमुळे महेंद्र याचा बर्फाच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाला आहे. महेंद्र यांचा पार्थिव शरीर आज त्याच्या स्वागवी आला असून शासकीय इतमामात अंत्य संस्कार होणार आहे. महेंद्र याच पार्थिव शरीर स्वागवी पोहचताच नागरिक तसेच शाळकरी मुलांनी सुद्धा सलामी दिली आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यावर भाजपच्या नेत्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी
विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक आक्रमक
दाऊद सरकार हाय हाय अशा देत आहेत घोषणा
मी एका गिरणी कामगाराचा मुलगा आहे
माझ्या घरातील कामगार बेरोजगार झाले
सर्वसामान्यांचे भयानक होतील असे वागू नका
एसटीच्या संपाचा फटका सामान्यांना बसेल
सगळं श्रेय तुम्हाला घ्या, पण लोकांचे संसार उद्धवस्त करू नका – चंद्रकांत पाटील
कल्याणकारी राज्याने ५ गोष्टी तोट्यात राहून करायच्या असतात
भयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे
आमदार पळून जातील, सरकार पडतील
घरं देणार कशासाठी घर पाहिजे
त्यापेक्षा शेतकऱ्यांना पैसे द्या, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे लक्ष द्या
तिघाडीत एकमत नसल्याचं वारंवार बाहेर येत आहे
नाशिक -ऑनलाइन गेम संदर्भात कायद्यात बदल करण्याची आवश्यकता
नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी राज्यसरकार कडे केली मागणी
ऑनलाइन गेम मुळे अनेक तरुणांची आत्महत्या
गेम मध्ये आर्थीक नुकसान झाल्याने तरुण करत आहेत आत्महत्या
कायद्यात दुरुस्ती केल्यास ऑनलाइन गेम वर आळा घालण्यात मदत होईल
15 हजार कोटींची एक इंडस्ट्री वर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारला पोलीस आयुक्त करणार मागणी
घाणेरड्या पध्दत म्हणत नाहीत, याला सुड म्हणतात
महाराष्ट्रात नीच पातळीचं राजकारण कधी झालं नव्हतं
शत्रूशी सन्मानाने वागावे,
यांच्या घरात पेन्ड्राई बाळत होतात का ?
आम्ही एक कवर ड्राईव्ह मारू
रोज एक पेनड्राईव्ह बाळत होतंय
पेनड्राईव्हची कंपनी आहे का ?
एक कवर डाईव्ह सगळ्या पेनड्राईव्ह भारी पडेल
लोकांच्या घरात शिरू नका, तुम्हाला सुध्दा घर आहेत
मला असं वाटतंय असं दाऊदने यांना सुपारी दिली आहे
अलकायद्यादा अजेंठा भारतात राबविली जात आहे
नागपूर दौऱ्यामुळे पेनडाईव्ह बाळत झाली आहेत
– पुण्यातील कायदा सुवस्थेचा प्रश्न ऐरणीवर,
– ओळखीतल्या व्यक्तीकडूनचा होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ,
– हिंजवडीत वडिलांकडून स्वतःच्या १२ वर्षीय मुलीवर बलात्कार,
– तर कोथरूडमध्ये आईने मानलेल्या भावाने केला भाचीवर लैंगिक अत्याचार,
– या दोन्ही प्रकरणांमधील आरोपी अद्याप फरार,
– आठवडाभरात लैंगिक अत्याचाराच्या चार घटना
एसटीच्या संपामुळे घेतला विद्यार्थिनीचा बळी
एसटी सुरू असती तर माझी मुलगी वाचली असती –
बोदवडपासून २ किमी अंतरावर घटना, शेलवड गावामध्ये मध्ये शोककळा
कॉलेज सुटल्यावर रिक्षात बसून घरी शेलवड जाताना अकरावी मधील तृप्ती चौधरी विद्यार्थिनी तोल गेल्याने खाली पडली. मेंदूला मार लागून अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू
गंभीर इजा झाली. यानंतर जळगावला नेत असताना तिचा रस्त्यात मृत्यू झाला.
बसेस सुरु असती तर तृप्ती चौधरी वाचली असती
या घटनेमुळे खळबळ उडाली.
एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये बोदवड तालुक्यातील वेगवेगळ्या खेडेगावातील तब्बल ४, २१५ विद्यार्थी पासेस काढून शिक्षणासाठी अप-डाऊन करायचे.
. कदाचित एसटीचा संप सुरू नसता तर ही दुर्घटना घडली नसती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जूनमधील परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
विद्यापीठाच्या अधिकार मंडळानं घेतला निर्णय पुढच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या ..कोरोना संसर्गामुळं परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता
मात्र आता विद्यापीठानं परिपत्रक काढून महाविद्यालयांना ऑफलाईन पद्धतीने तयारी करण्याचे आदेश दिलेत
जून( 2022 ) ची सत्र परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होणार….
मागोवा आणि तात्पर्य या मासिकाचे संपादक आणि सत्तरीच्या दशकामधील मागोवा गटाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रख्यात मार्क्सवादी विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पुणे येथील समाज विज्ञान अकादमीचे ते विद्यमान विश्वस्त अध्यक्ष होते.
अबब!! वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी 50 वर्ष वर्षीय व्यक्तिने दिड तासात काढले 2550 पुश अप…
आपल्या पन्नास व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पुरुषोत्तम या वयात 2550 पेक्षा अधिक पुश अप काढ़ण्याच्या प्रयत्ना ने तरुण युवक भारावुन गेले ईतके नक्की.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाला चार महिने उलटल्यानंतरही, अनेक कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम राहून कामावर परतलेले नाहीत.त्यामुळे महामंडळाने पूर्ण क्षमतेने सेवा सुरू करण्यासाठी राज्यभरात कंत्राटी चालकांची भरती प्रक्रिय सुरू
गडचिरोली गोठयात शिरुन बिबटयाने पाडला वासराचा फडशा
मुलचेरा तालुक्यातील कोपरअली येथील घटना
सध्या या घटनेमुऴे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे
या पुर्वी होता बिबटयाचा वावर
या बिबटयाला जेरबंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे
– किरीट यांचा ऊद्धव ठाकरे, आदीत्य ठाकरे, तेजस ठाकरेंवर मोठा आरोप…
– थांबवा मला… ते म्हणतात दापोली रिसाॅर्ट पडणार नाही, आम्ही म्हणतो पाडल्याशिवाय राहणार नाही…
– २३ तारखेला सुनावणी आहे, त्यापुर्वी आत्ता दापोलीला जाणार, मार्च काढणार, मला अडवून दाखवांंं
– कोमो स्टाॅक प्राॅपर्टीज नावाने कंपनी आहे, यात ऊद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे पार्टनर आहेत
– २३ मार्च २०१४ ला कंपनी फाॅर्म, २०१९ ला नंदकिशोर चतुर्वेदीला विकली…
– विकल्यानंतर यात पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी ५६ टक्के, ल्युक बेनेडिक्ट आॅस्ट्रोलियन – ३४ टक्के, इतर -१० टक्के अशी कंपनी विकली… ७ कोटींचं मनी लाॅंड्रींग झालं… विदेशी व्यक्तीचा मनी लाॅंड्रींगमध्ये समावेश…
– हा सगळा घोटाळा इडी, इंकम टॅक्स विभागास पाठवला, अनेक घोटाळा बाहेर येणार…
– मी सोमवारी परत जाणार, मी दिल्लीत गेल्यानंतर इथले घोटाळेबाज सक्रीय होताय, चिंचातूर होतात, मी तर फकिर आहे, जनतेनं मला मोठं केलंय…
लग्न होत नसल्याच्या कारणाने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव तालुक्यातील नशिराबाद च्या 30 वर्षीय तरुण चेतन खरोटे हा गेल्या काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणाने चिंतेत होता. अनेक वेळा त्याने त्याच्या मित्रा जवळ ही खंत देखील व्यक्त केली होती. यामुळे तो व्यसनाच्या ही आहारी गेल्याने अखेर चेतन ने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
राज्यसेवा पूर्व परीक्षा अंतिम उत्तरतालिका जाहीर
100 पैकी 8 प्रश्न आयोगाकडून रद्द
प्रश्न रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांचे नुकसान होणार असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
राजपत्रित गट अ आणि गट ब च्या परीक्षेचे आठ प्रश्न आयोगाने केले रद्द
दहशतवादी हल्ल्याचे कटाचे कनेक्शन बुलडाणा,
एन आय ए ने जिल्ह्यातील खामगाव मध्ये मागील तीन दिवसांपूर्वी छापे टाकल्याची माहिती,
हेरगिरीच्या संशयावरून एनआयए ने गुजरात सह बुलडाणा मध्ये छापे टाकले,
दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने माहिती गोळा केल्याप्रकरणी छापे,
पाकिस्तानी हेरांचाही हात समावेश असल्याचा संशय ,
संशयास्पद माहिती सह साहित्य ही जप्त केल्याची माहिती
कोल्हापूर उत्तरच्या मतदानातून अभिजीत बिचुकलेची अखेर माघार
अर्ज दाखल करण्याची मुदत संपली तरी उमेदवारी अर्ज भरलाच नाही
कोल्हापूर उत्तर पोट निवडणूक लढवण्यासाठी बिचुकले ने केली होती तयारी
आजारी असल्याने उमेदवारी अर्ज भरला येऊ शकलो नसल्याचा बिचुकले चा दावा
कोल्हापूर उत्तरसाठी 19 उमेदवारांनी दाखल केले 27 उमेदवारी अर्ज
दाखल अर्जांची छाननी आज होणार
28 एप्रिल पर्यंत माघार घेता येणार आहे
महाविकास आघाडी भाजप सोबतच वंचित बहुजन आघाडी रिंगणात
वंचित कडून शाहिद शहाजहान शेख यांनी दाखल केलाय उमेदवारी अर्ज
– प्रेमप्रकरणातून गर्भधारणा झालेल्या 12 वर्षीय मुलीचे लावले लग्न
– नागपूरच्या एमआयडीसी भागातील धक्कादायक घटना
– 12 वर्षीय मुलीचे 22 वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध
– प्रेम संबंधातून मुलीला झाली गर्भधारणा
– हा प्रकार लक्षात आल्यावर दोघांच्याही घरच्यांनी लावले लग्न
– पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलाला केली अटक
– ‘माझ्या पतीला सोडा’ निरागस मुलीची पोलिसांना आर्त हाक
कंगना सेलिब्रेटी, पण आरोपी ; सुनावणीला गैरहजर राहण्याची विनंती फेटाळताना अंधेरी कोर्टाचे निरीक्षण…
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली आहे. मात्र आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहोत.
त्यामुळे चित्रीकरणासाठी आपल्याला देश-विदेशात सतत प्रवास करावा लागतो, असे सांगून प्रकरणाच्या सुनावणीसाठी कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची परवानगी देण्याची विनंती कंगनाने अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली होती.
मात्र महानगर दंडाधिकारी आर. आर. खान यांनी तिची ही मागणी फेटाळली.
लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरील डिलाईल रोड उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील कामाला गर्डरमधील तांत्रिक कारणांमुळे विलंब होण्याची शक्यता होती. मात्र या पुलाचे रेल्वेच्या हद्दीतील काम ऑगस्ट २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.
या उड्डाणपुलावर पहिला गर्डर बसवण्याचे काम येत्या मे महिन्यात हाती घेण्यात येणार आहे.
लोअर परळ रेल्वे स्थानकाबाहेरच असलेला डिलाईल रोड उड्डाणपूल धोकादायक बनल्याने त्याची पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हा उड्डाणपूल वाहन आणि पादचाऱ्यांसाठी २४ जुलै २०१८ पासून बंद करण्यात आला आहे, अनेकांना यामुळे वाहतूकींच्या अडचणिंना सामोरं जावं लागत आहे…
आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शुक्रवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात अवाजवी प्रभाव टाकून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचे पुराव्यांतून दिसून येते, असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयाने देशमुख यांना जामीन नाकारला होता.
अकोला शहरातल्या बंद पडलेल्या आईस फॅक्टरीला आग…
आगीत आईस फॅक्टरीतील भंगार साहित्य जळून खाक….
गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे आईस फॅक्टरी….
आईस फॅक्टरी मध्ये होता लाकूड आणि लाकडाचा भुसा…
या आगीत फॅक्टरीतील साहित्य जळून खाक झाले आहे….
मालेगांव दंगल प्रकरणी २६ जणांना जामीन मंजूर..
मालेगांव शहरातील १२ नोव्हेंबर दंगल प्रकरणी अटकेत असलेल्या २६ संशयितांना गुरुवारी जामीन मिळाला.
न्यायाधीशडी.डी. कुरुळकर जामीन मंजूर केल्याचा निर्णय देत इतर चौघांचा जामीन फेटाळून लावला. शहरात त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ १२ नोव्हेंबरला बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण
लागून दगडफेक व तोडफोडीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये पाच गुन्हे दाखल झाले होते. यातील ३० संशयितांनी जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. दोन दिवसांच्या सुनावणी नंतर न्यायाधीश कुरुळकर यांनी २६ जणांना जामीन मंजूर केला. साबीर शेख, वसीम अहमद, वसीम अख्तर व अतिक अहमद यांना जामीन नाकारला आहे. एकाचवेळी
२६ जणांना जामीन मिळाला आहे.
पुणे :
पुण्यात अद्याप मेट्रो प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाला नसला तरी येत्या 1 एप्रिलपासून पुणेकरांना एक टक्का मेट्रो अधिभारचा भुर्दंड सहन करावा लागणार
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठी येत्या 1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी-विक्री करताना एक टक्का मेट्रो कर द्यावा लागेल
त्यासंदर्भातील स्वतंत्र आदेश गुरुवारी नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने काढले
पुण्यात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी होत असलेल्या राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता
यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला
परंतु 2020 मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती
हा कालावधी संपुष्टात येत असल्याने पुण्यात एक एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला
याचबरोबर 1एप्रिलपासून नवीन व वाढीव रेडीरेकनर दरदेखील लागू होणार असल्याने घराच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता
बुलडाणा
जिल्ह्यात एसटी चा संप सुरूच,
मात्र जिल्ह्यात असलेल्या 7 आगारात 605 कर्मचारी कामावर रुजू,
तर 100 बसेस ही धावतात रस्त्यावर,
मागील साडेचार महिन्यांपासून कर्मचारी संपावर गेले आहेत,
परिणामी खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट झाली,
संपावर तोडगा निघत नसल्याने कर्मचारी होतायत रुजू,
– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकाची ‘स्थायी समिती’ची बैठक आता होणार दर मंगळवारी
-महासभेची मान्यता आवश्यक असलेले प्रस्ताव प्रशासकाकडे पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या 5 आणि 20 तारखेला दुपारी तीन वाजता बैठक होईल. तर, विशेष समित्यांच्या मान्यतेसाठीचे प्रस्ताव महिन्याच्या पहिल्या व तिस-या मंगळवारी दुपारी तीन वाजता प्रशासकाकडे पाठविता येणार आहेत
-या बैठकांना विभागप्रमुखांनी संबंधित माहितीसह उपस्थित रहावे, असा आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी काढला आहे
-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी 13 मार्च रोजी संपला आहे. निवडणूक झाली नसल्याने राज्य शासनाने महापालिकेवर आयुक्त राजेश पाटील यांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे स्थायी समिती, महासभेचे सर्व अधिकार प्रशासकाला गेले आहेत
रत्नागिरी- कोकणात रिफायनरीचा मुद्दा पुन्हा तापणार
रिफायनरी रद्द करण्यासाठी विरोधक आक्रमक
30 मार्च रोजी राजापूर तालुक्यातील तहसील कार्यालयावर मोर्चा
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी देखील पडसाद उमटण्याची शक्यता
28 मार्च ते 30 मार्च दरम्यान आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती महाडीबीटी पोर्टलवर जमा करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश..
केंद्राचा 60 टक्के तर राज्याचा 40 टक्के हिस्सा महाडीबीटी पोर्टलवर जमा करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश..
केवळ शिष्यवृत्ती जमा करावी,वितरणा संबंधित सहा एप्रिल रोजी घेतली जातील निर्देश..
केंद्राच्या निर्णयास मराठवाड्यातील 6 संस्थांनी खंडपीठात दिले होते आव्हान..
विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क न घेणाऱ्या संस्थांचा हिस्सा संस्थेला मिळाला हवा अशी होती संस्थाचालकांची मागणी..
– विदर्भातून शिवसेनेला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्त्व मिळण्याची शक्यता
– खा. संजय राऊत यांच्या शिवसंपर्क अभियानानंतर मुंबईत हालचाली वाढल्या
– विदर्भात मंत्रीपद देण्याबाबत संजय राऊत यांनी दिले होते संकेत
– फडणवीसांच्या नागपूर जिल्हयात मंत्रीपद देण्याची शिवसेनेकडून चाचपणी सुरु
– पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी सेना विदर्भात मंत्रीपद देण्याच्या हालचाली
– संजय राठोड यांच्यानंतर विदर्भात सेनेचा एकंही मंत्री नाही
पैठण येथे सध्या नाथषष्ठी चा सोहळा सुरू आहे..2 वर्षा नंतर नाथांचे दर्शन होणार असल्याने मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत…त्यामुळे भामटे आणि खिसेकापू मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट यात्रेत होता…पोलिसांनी आज सकाळी पासून सापळा लावून एकाच दिवशी 25 भामट्यांना पकडले यामध्ये 6 महिला चोर ही जाळ्यात अडकल्या आहेत…पोलिसांना आधीच अंदाज होता त्यामुळे पोलिसांनी सध्या वेशात पोलिसांचे जाळे लावले होते…त्यामुळे 25 भामटे अलगद पोलिसांच्या हाती लागले आहेत
नाशिक – नाशिक बाजार समितीवर प्रशासक
फय्याज मुलानी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती
संचालकांची मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकाची नेमणूक
21 दिवसांच्या आत प्रशासक नेमण्याचे होते न्यायालयाचे आदेश
उद्धव ठाकरे यांच्या पत्रानंतर बाजार समितीवर फय्याज मुलानी यांची निवड
नाशिक – राजस्थानच्या मुख्यमंत्री पुत्राचे नाव गुन्ह्यातून अखेर वगळले
फसवणूकीच्या गुन्ह्यात फिर्यादीचे घुमजाव
ई टॉयलेट टेंडर च्या माध्यमातून कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा फिर्यादी सुशील पाटील यांनी केला होता आरोप
संशयित आरोपींमध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र वैभव गेहलोत यांचे देखील होते नाव
मात्र फिर्यादीच्या घुमजाव नंतर प्रकरणाला नवीन ट्विस्ट
न्यायालयाच्या आदेशकडे लक्ष
– तिसऱ्या मजल्यावरून रस्त्यावर पडून ही तीन वर्षाचा चिमुकला सुखरूप…
– निफाड तालुक्यातील ओझर येथील चांदणी चौकातील घटना….
– घटना सीसीटीव्हीत कैद…
– फेयजान सद्दाम शेख असे तीन वर्षाच्या चिमुकल्याचे नाव…
– तिसऱ्या मजल्यावरुन पडून ही फेयजानला दुखापत झाली नसल्याने डॉक्टरांनीदेखील केले आश्चर्य व्यक्त….
– नागपूरात पॅाश मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे अन्न वितरणाला खोडा
– पॅाश मशीनच्या अडथळ्यामुळे अनेक स्वस्त धान्य दुकानात धान्य वितरण थांबलं
– दुकानात धान्य वितरण थांबल्याने दुकानदारांमध्ये नाराजी
– वेळेवर धान्य मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजी
भंडारा
लोप होत चाललेल्या लोककलेचे जतन करण्यासाठी खडीगंमत महोत्सव.
आजच्या आधुनिक युगात या लोप पावत चाललेल्या लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने शासनाने प्रतिवर्षी खडीगमंत महोत्सव आयोजन करण्यास सूरुवात केलेली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासनाच्या वतीने भंडारा जिल्ह्याच्या दवडीपार बाजार या गावात 5 दिवसीय खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथील शाळेत ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या घटनेनंतर काही तासाच्या आतमध्ये आरोपीला पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश
मंगेश पदमुळू असे या नराधमाचे नाव
मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल
साधे पेट्रोल 112.00 रुपये
पॉवर पेट्रोल 116.52 रुपये
डिझेल 94.80 रुपये
वीज वितरण कंपनीने थेट पुण्यातील खेड पंचायत समितीचे वीजबील थकल्याने वीज पुरवठा खंडित करून झटका दिला आहे.
त्यामुळे प्रशासकीय यत्रंणा मात्र खडबडुन जागी झाली आहे.
पंचायत समितीचे वीज बील थकल्याने वीज वितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडले
वीज कनेक्शन तोडल्यामुळे मात्र सर्व संगणकीय यत्रंणा ठप्प झाली
यामुळे मार्च एंडच्या कामांना ब्रेक बसणार
– नागपूरातील निकीता चौधरी जळीतकांड प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
– मित्रानेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
– राहूल बांगरे आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल
– सात दिवसानंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
– ‘निकीतावर अत्याचार झाला नाही, शरीरावर मारहाणीच्या खुना नाही’ मेडीकल अहवालात स्पष्ट
– १५ मार्चला निकीताचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता
चाकण, पुणे
पुण्याच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये कांद्याची २० हजार पिशवी आवक…..
आवक वाढल्याने कांद्याला ९०० ते १३०० रुपये एवढा भाव….
कांद्याच्या दरात सुधारणा होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला……
झालेला खर्च आणि गाडी भाडे भरणे ही शेतकऱ्यांला जिकिरीचे…….