मुंबई : आज शनिवार 26 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या कामाची ईडी किंवा एसआयटी कडून चौकशीची मागणी भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी केली आहे.
आम्ही जो सत्याच्या आग्रहासाठी आलो होतो. त्यासाठीचा आग्रह अजून सुरु आहे. सर्व्हे नंबर 446 जे रिसॉर्ट बांधले आहेत ते अनिल परब यांचे आहेत. अनिल परब यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 30 तारखेला दापोली कोर्टात सुनावणी सुरु आहे भारत सरकारच्या याचिकेवर सुरु आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट तुटेपर्यंत तो रिसॉर्ट बांधण्यासाठी जो पैसा खर्च करण्यात आला त्यासंदर्भात ईडी, आयटी, ग्रीन ट्रिब्युनलकडे तक्रार केलीय. पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पलीकडे सोडणार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.
सरकारची पोलिसांच्या माध्यमातून दंडेलशाही महाराष्ट्र पाहतोय. सोमय्यांच्या मागणीची दखल न घेता तेच दोषी आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न
आम्ही तुमची कोणत्याही प्रकारची गोष्ट चालू देणार नाही
आतंकवादी येतात काय अशा प्रकारे तिथं फोर्स लावण्यात आली
एसपी बोलत नाहीत, एसपींना कोणीतरी सूचना देतंय
किरीट सोमय्यांना अटक केल्यास आश्चर्य वाटायला नको : प्रविण दरेकर
हेकेखोर पणा कोण करतंय हे महाराष्ट्राची जनता पाहतंय
एसपींनी हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याची गरज होती
एसपींनी वरुन आलेल्या सूचनांनुसार काम सुरु
एसपी समोर न येता पडद्यामागून काम करत आहेत
आम्ही किरीट सोमय्यांना तिथं जाणार नाही असं सांगितलं होतं
आमचे स्थानिक पोलीस निर्णय घेतील
वरिष्ठ पातळीवरुन कोणताच हस्तक्षेप नाही
आमचे अधिकारी कोणत्याही दडपणात नाहीत
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं पोलिसांचं काम
कोणाच्या हेकोखोर पणानं जाणीवपूर्वक कायदा मोडण्याचं काम करणार असतील तर पोलीस त्यांचं काम करतील
निलेश राणे यांचं म्हणनं चुकीचं
किरीट सोमय्यांचं म्हणनं लेखी स्वरुपात पोलिसांकडे द्यावं
पोलीस ते तपासतील आणि गुन्हा दाखल करतील,शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया
पोलीस वारंवार सांगत असताना, मनाई करत असताना, वैयक्तिक मालमत्तेतं जाण्याचा प्रयत्न करणं अयोग्य
किरीट सोमय्यांची आम्हाला काळजी असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले
पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात
पोलीस आणि कार्यकर्ते आमने सामने
विशेष पोलीस दलाला पाचारण करण्यात आलं
किरीट सोमय्यांना पोलिसांनी पुन्हा अडवलं
पोलिसांनी किरीट सोमय्यांना पुन्हा अडवलं
निलेश राणे यांचं रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकांवर प्रश्नचिन्ह
आमच्यावर कारवाई करा, पाच लोकांचा विषय कशाला कारवाई करा
मला काही झालं तर पोलीस प्रशासन जबाबदार
दापोलीतील रिसॉर्टकडे चालत जाणार
किरीट सोमय्या आणि निलेश राणे चालत निघाले
भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती
किरीट सोमय्या अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टकडे रवाना
एसपी भेटण्यास तयार नाहीत, निलेश राणेंचं वक्तव्य
किरीट सोमय्यांनी तीन तास ठिय्या मारला
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उद्या दि.27 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर
दुपारी 02.30 वाजता लातूर येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण.
दुपारी 03.30 वाजता तुळजापूर येथे आगमन व दर्शनासाठी राखीव
-पुण्यात शिरूर ते वाघोली मोठा रस्ता बांधणार आहे तो तीन मजली असणार ,15 हजार कोटी चा हा रस्ता असणार आहे,तळेगांव-चाकण रस्त्यावर देखील करण्याचा विचार सुरू आहे
-नवीन जे आहे ते स्वीकारलं पाहिजे ते नेहमीच स्वीकारलं पाहिजे,हे तंत्रज्ञान मेट्रो सह विविध ठिकाणी वापरण्यात येईल
-आशा प्रकारचे कारखाने सर्व राज्यात उभारायचे आहेत
-ह्या तंत्रज्ञानामध्ये फायबर स्टीलचा वापर सुरू आहे,कारण स्टील च्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे,ह्या तंत्रज्ञानाची मागणी वाढली तर सिमेंट आणि स्टील च्या किमती कमी होतील असा विश्वास आहे
लोकप्रतिनिधी या नात्यानं आमचा प्रश्न उपस्थित करा आणि न्याय मिळवून द्या, असं लोक म्हणतात.
माजी महापौर सुनील कदम यांनी इथल्या एका राजकीय नेत्या संपत्तीमधील अनियमितता, घरफळा यासंदर्भात माहिती मला दिली
मी पॉईंट ऑफ ऑर्डरद्वारे मी माहिती दिली मी कुणाचं नाव घेतलं नाही
सुनील कदम यांचा लढा आहे तो लढा त्यांनी लढावं
बंटी पाटील यांनी जी भाषा वापरलीय
मला आठ खाती असल्यानं तेरा आयएएस अधिकारी होती यादव मला ओएसडी होते
मी मराठा समोरुन वार करतो असं म्हणालात माझ्यावर समोर वार करा
27 महिने तुम्ही काही करु शकला नाहीत
दोष असेल तर माझ्यावर कारवाई करा
यादव शिंदे यांना मध्ये का घेत आहेत
लढाई आमने सामने होऊ देत असं चंद्रकांत पाटील म्हणाले
आष्टा नजीक गाताडवाडी येथे स्विफ्ट आणि अल्टो कारचा भीषण अपघात
अपघातात 4 ठार तर 3 जखमी
दोन जणांचा जागीच मृत्यू तर हॉस्पिटलमध्ये दोन जणांचा मृत्यू
जखमी ना उपचारासाठी दाखल केले रुग्णालयात
निलेश राणे यांनी आपल्याला सांगितंल आहे की किरीट सोमय्याचा हत्या असं कटकारस्थान दापोली पोलीस स्टेशन एसपी आणि शिवसेना यांचं झालं आहे. मुंबई, रायगड येथून रत्नागिरी येथे आलो. आमच्या कार्यकर्त्यांना अर्ध्या किलोमीटरवर अडवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून घातपाताची शक्यता असल्याचं पोलिसांनी दिलं. आम्हाला रिसॉर्टला जायचंय आम्ही जाणार आहे. आम्हाला पोलीस स्टेशनला या सांगितलं. चार जणांना यायला सांगितलं. कमांडोंचं म्हणनं आहे की सुरक्षेची खात्री होत नाही तोवर इथून बाहेर पडून नका असं सांगितंल.
पोलीस घात करतील असं निलेश राणे यांना वाटतंय
आमच्या गाड्या अर्धा किलोमीटरवर थांबवल्या आहेत
किरीट सोमय्यांनी फोन करुन चालत येण्याचं आवाहन केलं
किरीट सोमय्यांचा पोलीस ठाण्याच्या आवारत ठिय्या
ठाकरे सरकारची पोलीस माफिया पोलीस झाली आहे
दोन रिसॉर्टपैकी एका रिसॉर्टसंदर्भात तक्रार घेतली
उद्धव ठाकरेंच्या माफिया मंत्र्याचा रिसॉर्ट
किरीट सोमय्या आणि निलेश राणे पोलिसांच्या केबिनमधून बाहेर पडले.
किरीट सोमय्या आणि मी पीआय एफआयआर का घेत नाही याची विचारणा केली.
रितसर एफआयआर झाली पाहिजे,
एका सामान्य नागरिकाला एफआयआर देण्याचा अधिकार आहे
ज्याला एफआयआर द्यायचीय ती पोलीस स्टेशनला घ्यावी लागेल
एफआयआर घेत नाही तर आम्ही रिसॉर्टच्या दिशेनं चाललोय
अगोदर ताब्यात घेणार असं सांगितलं आता जिल्ह्याबाहेर सोडणार सांगितलं
एसपी साहेबांना बाहेरुन आदेश दिले जात होते
किरीट सोमय्या आणि निलेश राणेंना पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता,सूत्रांची माहिती
अनिल परब यांचं रिसॉर्ट का पाडलं नाही, सोमय्यांचा पोलिसांना सवाल
जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळं पोलीस सोमय्यांना ताब्यात घेण्याची शक्यता
किरीट सोमय्यांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोमय्यांविरोधात घोषणाबाजी
किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशनमध्ये
किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल
नील सोमय्या देखील सोबत
निलेश राणे देखील उपस्थित
कार्यकर्त्यांना बाहेरचं अडवलं
किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशन परिसरात पोहोचले
पोलीस ठाण्यात 5 जणांना प्रवेश मिळणार
निलेश राणे आणि कार्यकर्ते देखील पोलीस ठाण्याच्या परिसरात
मला कौतुक करायचं आहे दापोलीतील नागरिकांचं
दिवाळीत आल्यावर दापोलीकरांना वचन दिलं होतं की अनिल परबची माफियागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही
समजतात काय स्वत:ला. मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला आणि अनिल परबचा रिसॉर्ट तोडणार
मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो. तुमच्यात हिम्मत असेल तर अनिल परबचा रिसॉर्ट वाचवून दाखवा. मी तोडून दाखवणार
माफिया सेना उभी केली, वसुलीचे पैसे येतात. सचिन वाझेपासून प्रदीप शर्मा सुपारीबाज… आता नरेंद्र मोदींनी सांगितलं ना ना खाऊंगा ना खाने दुंगा. महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही.
नाटकं काय करतात, पोलिस नोटीस देतात. अडकणार पोलीस, इथला इन्स्पेक्टर. पोलिस काय सांगतात तर रिसॉर्ट तुटल्यावर बेरोजगारी निर्माण होईल.
मोदी सरकारनं दापोली कोर्टात अनिल परब विरोधात फौजदारी कारवाई करावी असं अपील केलंय.
पोलिसांना बळीचा बकरा काय करताय..
हा प्रतिकात्मक हातोडा परबचा रिसॉर्ट पाडण्यासाठी आणलाय पण ठाकरे सरकारचा एक एक भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
सुप्रिया सुळे बसून सांगतात सोमय्याला कसं कळतं कुणावर कारवाई… ताईंना आज सांगतो पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई.
किरीट सोमय्यांच्या आंदोलनाला विरोध
निवडणुका दूर आहेत, निलेश राणे आणि नितेश राणे यांना प्रत्युत्तर
शिवसेना भाजपचं सरकार असताना झोपला होता का
हॉटेल व्यावसायिकांचा किरीट सोमय्यांना विरोध
कुणालाही कुठलिही लढाई लढायची असेल तर कायदेशीर मार्गानं लढली पाहिजे. कोणीही कायदा हातात घ्यायची गरज नाही. अशा प्रकारचा कायदा हातात घेऊन चुकीच्या पद्धतीनं ट्रेसपासिंग केलं तर पोलीस नियमाप्रमाणं कारवाई करतील.
खोटेनाटे आरोप करायचे, केंद्रीय यंत्रणांची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे
जो संबंध नाही तो संबंध जोडायचा
एका बाजूला कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आहे म्हणायचं
छोटे मोठे मोर्चे काढून सरकारची प्रतिमा बिघडणार नाही
आम्ही काम करत आहोत ते करत राहणार
किरीट सोमय्या कुठं पोहोचले याला महत्त्व देत नाही
स्थानिक कायदा व सुव्यवस्था बिघडणार असेल तर पोलीस जी चौकशी करायची ते करतील
किरीट सोमय्यांना खेड पोलीसांनंतर आता दापोली पोलीसही नोटीस बजावणार
खेड पोलिसांनी बजावली आहे नोटीस
रिसॉर्ट परिसरात किरीट सोमय्यांना मज्जाव दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार यांनी बजावली नोटीस
दापोलीत 5 पेक्षा अधिक लोक सोमय्यां एकत्र जमा करू शकणार नाहीत
किरीट सोमय्यांना कशेडी घाटात अडवलं
पोलिसांनी किरीट सोमय्यांना 149 ची नोटीस स्वीकारण्याची विनंती केली
जमावबंदी आदेश लागू असल्याचं कारण पोलिसांनी सांगितलं
किरीट सोमय्यांकडून पोलिसांना प्रतिप्रश्न
उत्तरप्रदेश विधिमंडळात विरोधी पक्षनेतेपदी अखिलेश यादव यांची निवड
विधिमंडळात समाजवादी पक्षाचा असणार विरोधी पक्ष नेता
खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अखिलेश यादव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
किरीट सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा दाखवला
उद्धव ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलायला हवं
कुणीही कोणाच्या कुटुंबापर्यंत जाण्याचा प्रश्न नाही
कुणाबाबत मी सांगू शकत नाही
उद्धव ठाकरे बोललेत ते गांभीर्यानं घेण्यासारखं नाही
आम्ही 2024 ची तयारी करत आहोत
स्वबळावर लढून सरकार आणणार आहे
भ्रष्टाचारासंदर्भात जे आरोप लावले त्यासंदर्भात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हतं
नवी दिल्ली 31 मार्चला काँग्रेसचे देशभरात आंदोलन
काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातील बैठकीनंतर मोठा निर्णय
महागाईच्या विरोधात काँग्रेसच देशव्यापी आंदोलन
थाली बजाऊ मंहगाई भगाव चा नारा
दोन ते चार एप्रिल जिल्हास्तरावर होणार आंदोलन
जिल्हास्तरावर काँग्रेस आक्रमक होणार
7 एप्रिलला राज्यांच्या राजधानीत कॉंग्रेस आंदोलन करणार
प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय
रत्नागिरी- दापोलीच्या रस्त्यावर ती स्वतः उतरले पोलीस अधीक्षक
नाक्यावरची पोलिस बंदोबस्ताची करतात पाहणी
पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग
आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा रद्द,
आज होणार होता औरंगाबाद दौरा
औरीक सिटी आणि पाणीपुरवठा योजनेची करणार होते पाहणी
दौरा रद्द झाल्यामुळे कार्यकर्ते नाराज
अजित पवार यांनी व्यक्त केलेली खंत ही योग्यच
राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उत्तर महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचे वक्तव्य सभागृहात केले होते दरम्यान अजित पवार यांनी व्यक्त केलेली खंत योग्यच असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातून अनेक मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना त्यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले नाही त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा विकास रखडला असल्याचे ही गुलाबराव देवकर म्हणाले.
रत्नागिरी भाजप नेते किरीट सोमय्या दापोली मध्ये दाखल होणाऱ्या रोडवर पोलिसांचे बरीकेटिंग
पोलीस स्टेशनच्या चौकात मोठा बंदोबस्त
खेड-दापोली रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
खेडमधून 100 गाड्यांसह सोमय्या होणार आहेत दापोली दाखल
अजित दादा पवार यांनी काल विधानसभेत देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांना उपरोधिक टोला लावला उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची हुलकावणी देण्यात आली
उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदासाठी कुठे कमी ?पडला यावर एकनाथ खडसे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली
उत्तर महाराष्ट्रात स्वर्गीय बळीराम हिरे, रोहिदास जी पाटील मधुकरराव चौधरी एकनाथ खडसे यांच्यासारखे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील त्यानंतर गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल असा उपरोधिक टोला दादांनी त्या ठिकाणी लावला
उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही सत्तर वर्षात उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळाले नाही
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव यातील एकाला ही संधी मिळाली नाही
कोकणात संधी मिळाली
मराठवाड्यात चार चार मुख्यमंत्री झाले
विदर्भात चार चार मुख्यमंत्री झाले
उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची पात्रता असतानाही एकालाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचं दुर्दैवी आहे
एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे हे समजता बरोबर माझी छळवणूक करण्यात आली
माझे दाऊदच्या बायकोबरोबर संबंध जोडण्यात आले खोटा भूखंड, ईडी प्रकरण अनेक आरोप माझ्यावर लावण्यात आले
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो म्हणून रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून माझा फोन टॅपिंग करण्यात आला
माझं तिकीट नाकारण्यात आलं
उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय छळणूक कधीनाकधी भरून निघेल
70 वर्षापासून आम्हाला उत्तर महाराष्ट्राला नाही मिळाला नाही
कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर अटक करण्यात येईल – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
नियमाला धरून हे सगळं झालं आहे का ?
ज्याच्यामुळे सामान्यांना त्रास होईल त्यांना आम्ही अटकाव केला जाईल
कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर अटक करण्यात येईल
मुख्यमंत्र्यांनी कोणाचं सु्ध्दा नाव घेतलं नाही
काल विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं
मला मोहित कंबोज हे काय म्हणालेत हे माहित नाही
अधिकारी त्याच्या चौकटीत राहून काम करायचं
राजकीय विधान करावीत, सभागृहात
– पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघाताचा फटका जुना पुणे मुंबई महामार्गावर दिसून येत आहे
-पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गवर जाणारी जड वाहतूक ही जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळविल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी
-तळेगांव दभाडे टोल नाक्यावर वाहनांच्या मोठी रांग लागलीय 3 ते 4 किलोमीटर पर्यंत ही रांग गेल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीय
-द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत झालेल्या या अपघाताला आठ तास उलटून गेलेत तरी अजून दोन ते तीन तासांचा अवधी लागणार आहे पुण्यावरीन मुंबईला जाणारी मार्गिका सुरु होण्यास अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघिणीचा व्हिडिओ वायरल,
देवाडा बफर जंगलात तापमानाने लाही लाही झालेली W नामक वाघीण पाण्यात आहे पहुडली,
पाण्यात पहुडलेल्या1 वाघिणीसोबत आहेत तिचे 3 बछडे, तीनही बछड्याना मायेने दूध पाजत आहे W वाघीण,
ताडोबातील व्याघ्र सफरीचा हंगाम जोरावर असताना कोअर आणि बफर भागात होणाऱ्या व्याघ्रदर्शनाने पर्यटक आनंदले
अलीकडे माझे महाराष्ट्र मध्ये येणे कमी होते
पाण्याची महाराष्ट्र मध्ये मोठी समस्या
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागे मूळ पाणी आहे
आर आर पाटील मला नेहमी सांगायचं जरा, आटपाडी , सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग पहा
बळीराजा योजना तयार करून पश्चिम महाराष्ट्र करता 6 हजार कोटी मंजूर केले होते, आज तो भाग पाणीदार झालाय याचा आनंद
गणपत रावदेवशमुख सांगोलाला।पाणी देण्यासाठी मागणी करत होते, ते ही मागणी।पूर्ण।केलं
सांगली -पेठ 350 कोटी येत्या 3-4 महिन्यात मंजूर टेंडर करून करू
मी महाराष्ट्रचा ambesiter आहे
हवेतून चालणारी 80 लोक बसणारी बस सुरु करणार आहे
महाबळेश्वर मध्ये रोपवे,
60 प्रकल्प।मंजूर केलेत
पुणे-शिरूर, वाघोली 1200कोटीचा पूल उभारतो य
जलसंवर्धन काम केले, रस्ते बांधताना
रस्त्यामध्ये एकही पैसा मागत नाही
सांगली-सोलापूर रस्ता मध्ये नदी, नाले, खोलीकरण करू
दुष्काळी भागात शेततळे फुकट बांधून देऊ
सांगली जिल्ह्यातील सगळ माल जाईल
लॉजीस्टिक पार्क, सॅटेलाईट पूल
50 टके राज्य, /केंद्र
लॉजीस्टिक पार्क मध्ये कोणतेही विमान उतरवले
महाराष्ट्र ला फाटकमुक्त।करू
120 किमी प्रति तासाला लवकरच परवानगी देणार
पावसाळ्यात वाहन अडणार नाही असे रस्ते पुणे-बेंगलोर
सिमेंट आणि स्टील वल्याने black मार्केटिंग सुरू केलेय
शेतकरी केवळ अनदाता नाही तर ऊर्जादाता बनला पहिजे
शेतकरी पेट्रोल-डिझेल, विजेचा पर्याय देईल
साखर ऐवजी इथेनॉल केले पाहिजे
राज्यपालांकडून विद्यापीठांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व स्टार्टअप्सचा आढावा
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा तसेच त्या माध्यमातून सुरु झालेल्या स्टार्टअपचा एका विस्तृत बैठकीत आढावा घेतला.
मुंबई, पुणे, नागपूर यांसह विविध विद्यापीठांमधील इनोव्हेशन, इन्क्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या संचालकांसोबत शुक्रवारी (दि. २५) राजभवन येथे झालेल्या बैठकीत राज्यपालांनी हा आढावा घेतला.
विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्टार्टअप्स व उद्योजकतेला चालना देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या कार्याचा राज्यपालांनी यावेळी विद्यापीठनिहाय आढावा घेतला.
विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावे असे मत व्यक्त करून राज्यपालांनी प्रत्येक विद्यापीठांच्या यशोगाथा वाढावयास पाहिजे असे मत व्यक्त केले.
विद्यापीठांनी इन्क्युबेशन केंद्रातून काय सुविधा दिल्या, विद्यापीठांमधून किती पेटंट्स मिळाले तसेच विद्यापीठांच्या नवसंकल्पनांना किती बीज भांडवल मिळाले याची देखील राज्यपालांनी चौकशी केली.
यावेळी राज्यपालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व इतर विद्यापीठांच्या कार्याचे कौतुक केले तसेच विद्यापीठांनी परस्परांकडून शिकावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
किरीट सोमय्यांना रत्नागिरी पोलीस स्टेशनच्या बाहेर अडवलं जाण्याची शक्यता
कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही दौऱ्याला विरोध करणार असल्यानं गोंधळ होण्याची शक्यता त्यामुळे पोलिसांनी दिल्या नोटीसा
मात्र किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशनबाहेरचं अडवलं जाण्याची शक्यता सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती
मालेगाव शहरातील सोयगाव येथील १३२ के.व्ही. उपकेंद्रातील काही तांत्रिक कामकाजासाठी रविवार सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंन्त विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहर व परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या १४ वीज फिडर क्षेत्रातील वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेडतर्फे देण्यात आली आहे.तरी शहर व परिसरातील वीज ग्राहकांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन मालेगाव पॉवर सप्लॉय कंपनीने केले आहे.
मालेगाव शहरातील जुने पॉवर हाऊस, कालीकुट्टी, गोल्डननगर उपकेंद्र, जाफरनगर, आझादनगर, किल्ला, द्याने, संगमेश्वर, बोहराबाग, मोसमपुल, कॅम्प – २ उपकेंद्र, सटाणा नाका, मुंगसे, वडेल, कॅम्प – १, उपकेंद्र मार्केट, यॉर्ड-कॅम्प- रावळगाव, मालेगाव सिटी फिडीर, डोंगराळे फिडर, नववसाहत फिडर आदी भागात वीजपुरवठा खंडित राहणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात कळविण्यात आले असून मालेगाव शहर व परिसरातील वीजपुरवठा दिवसभर खंडित राहणार आहे.
काँग्रेस मुख्यालयात बैठक सुरु
सोनिया गांधी यांनी बोलावलीय आज बैठक
देशभरातील काँग्रेसचे महासचिव आणि प्रभारी बैठकीत सहभागी
प्रियंका गांधी, सोनिया गांधी ही बैठकीला उपस्थित
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बैठकीत होणार चर्चा
देशात काँग्रेस सदस्य नोंदणी बाबत होणार चर्चा
राज्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात आंदोलन करण्याबाबत होणार चर्चा
राजू शेट्टी महविकास आघाडीतुन बाहेर पडण्याची शक्यता शक्यता
5 एप्रिल रोजीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याचे सूतोवाच
विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या यादीत आमदार व्हायचं की नाही हेही पाच तारखेला ठरवणार
भविष्यात आघाडीचं राजकारण करायचं की नाही याचा गंभीर विचार करणार
येत्या पाच तारखेला राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय घेणार
राजू शेट्टी यांचं स्पष्टीकरण….
सांगलीत रस्ते उत्तम प्रकारचे केले आहेत वेगळ्या देश्यात आलो असे वाटते
आपण वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आपण विकास कामासाठी कायम एकत्र येत असतो
जयंत पाटील यांचा गोपीचंद पडळकर यांना चिमटा
चांगल्याला चांगले नाही म्हटले तर पडळकर जरा प्रॉब्लम तयार होतात..
खासदार संजयकाकाच्या खासदारकी काळात गडकरीच्या माध्यमातून रस्ते चांगले झाले याचेही जयंत पाटील यांनी केले कौतुक
समान क्वालिटीचे रस्ते अति वेगवान रस्ते करण्याचं काम गडकरी साहेबांनी केले आहे..
भारतामध्ये ज्याची गरज होती त्याच खात्याचे मंत्री गडकरी साहेब आहेत..
सांगली –
जयंत पाटील यांचा गोपीचंद पडळकर यांना चिमटा
चांगल्याला चांगले नाही म्हटले तर पडळकर जरा प्रॉब्लम तयार होतात
खासदार संजयकाकाच्या खासदारकी काळात गडकरीच्या माध्यमातून रस्ते चांगले झाले याचेही जयंत पाटील यांनी केले कौतुक
चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाच्या उदघाटनाबाबत मोठा राजकीय वाद…
या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक आमदाराला आमंत्रित केलं नसल्याचा काँग्रेस चा आक्षेप,
उदघाटनाचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा काँग्रेस ने दिला इशारा,
तर दुसरीकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यक्रमाला बोलवलं नाही तरी मी जाणार आणि उदघाटन करणारच असं म्हणत म्हणत शहरात लावले “होय मी येणारच आहे” चे बॅनर,
आज संध्याकाळी 6 वाजता आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आझाद बगीच्याचे उदघाटन,
भाजप च्या ताब्यात आहे चंद्रपूर महानगरपालिका, निवडणुकी आधी रंगला उदघाटना वरून राजकीय कलगीतुरा
किरीट सोमय्यावर मला काही बोलायचं नाही
आम्ही व्यवस्थित अर्थसंकल्प सादर केलाय. हा असा म्हणाला आणि तुम्हाला काय म्हणायचय यावर उत्तर देणं हाच धंदा मला नाही.
अधिवेशनाच्या आधी खुप काही बोललं गेलं की असं होईल, तसं होईल.. पण मी पुन्हा सांगतो की जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा निर्णय आहे तोपर्यंत हे सरकार चालणार.
आम्ही संपुर्ण पोलीस दलाला सुविधा देत आहेत तर पोलीसांनी देखील त्यांच काम चोख करायला हवं
आगाखान पॅलेस चे पाणी महापालिकेकडून बंद करण्यात आलय तर मी महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना याबाबत दुपारी विचारेन.
जुन्नरची बिबट सफारी बारामतीला हलवलीय हे धादांत खोटे आहे. बारामतीचा प्रकल्प 2016 ला मंजुर झालेला आहे तर जुन्नरचा प्रकल्प वेगळा आहे. पण काहीजण यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. पण काल मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील बोललो आहे. आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण विभाग आहे. वन विभागाकडून जुन्नरमधे सर्वे करुन बिबट सफारीसाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरुय. ते झालं की अतुल बेनके आणि अमोल कोल्हे हे जे तिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वासात घेऊन बिबट सफारीचे काम सुरु करण्यात येईल.
एस टी चा विषय काल मिटलेला आहे. एस टी कर्मचार्यांनी आता आत्महत्या न करता कामावर रुजु व्हावे.
आम्ही १७ विधेयक मंजूर
आमच्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न
अर्थसंकल्प सादर केला, अधिवेशन पार पाडलं
शरद पवार, सोनिया गांधी
जागतीक पातळीवर तेलाचे दर वाढल्याने आपल्याकडे महागाई वाढली आहे
कोरोनाच्या नंतर अर्थसंकल्प सादर करीत असताना लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे
कायदा व्यवस्था चोख पोलिसांनी ठेवली पाहिजे
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुरक्षित वाटलं असं काम पोलिसांचा असावा
मुख्यमंत्र्यांशी काल बोलण झालं, आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणं झालं
राहूल पाटील यांनी सुध्दा काल चौकशी केली आहे
कोणालाही अडचण येणार नाही अशा पध्दतीने मार्ग काढू
मेट्रो अंडर गाऊंडचा खर्च खूप आहे
त्याचा प्रवासखर्च सगळ्यांना परवडला पाहिजे
पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोची काम सुरू होणार
एसटीचा प्रश्न सुटला आहे, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत
त्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे
एसटीची गरज लोकांना आहे, त्यामुळे एसटीची कर्मचारी कामावर रूजू व्हावे
मार्च अखेरीनंतर कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करवाई
रत्नागिरी जिल्ह्या पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांची बैठक सुरू
जिल्ह्यातील वरीष्ठ पोलीस अधिकारी बैठकीला उपस्थित
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गरड बैठक घेतायेत
किरीट सोमय्यांना रिसॉर्टपर्यंत पोलीस जाऊ देणार की पोलीस ठाण्यातचं अडवलं जाणार ?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं विरोध केल्यानं पोलिसांची जबाबदारी वाढली
मुंबई आग्रा महामार्गावर तिहेरी अपघात..
मालेगांवच्या सौंदाणे गावाजवळ अपघात झाला असून अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
आयशर पिकअप आणि कार असा अपघात झाला असून कार मधील एकाच मृत्यू झाला असून दोघेही गंभीर जखमी आहेत..
अपघात हा ट्रॅव्हल च्या गाडीमुळे झाला असून कार ला १०० फुटापेक्षा जास्त फेरफटत नेले असून द्राक्षांच्या पिकपचे देखील मोठे नुकसान झाले आहे..
तर आयशर मध्ये गाई होत्या त्यातील काही गाई जखमी झाले असून त्यांना मुंगसे येथील गोशाळेत टाकण्यात आले आहे..
आज किरीट सोमय्या दापोली पोलीस स्टेशनला देणार भेट
पोलीस स्टेशन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात ्
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहीतकुमार गरड पोलीस ठाण्यात हजर,
कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचं ठिकाण नेमून दिलं जातंय..
– अधिवेशनात प्रश्न मार्गी न लागल्याने महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजी?
– विधानसभेत लक्षवेधी न लागल्याने काँग्रेस आ. विकास ठाकरे संतप्त
– … तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रकार ररिषद घ्यायची का?
– काँग्रेस आ. विकास ठाकरे यांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल
– ‘मुख्यमंत्र्यां कडे असलेल्या विभागातील घोटाळा, आणि नागपूर मनपातील स्टेशन घोटाळ्याची लक्षवेधी लागली नाही’
– १५ – १५ दिवस पाठपुरावा करुन लक्षवेधी लागत नाही, आम्ही फक्त सही करायला सभागृहात येतो का?
– आ. विकास ठाकरे यांचा विधानसभा अध्यक्षांना सवाल
– ‘नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता’
दिलीप वळसे पाटील
पोलीस कुटुंबीयांना बाजारभावापेक्षा कमी दराने या कॅन्टीन मध्ये वस्तू मिळणार आहेत.
यासाठी एक ॲप देखील तयार करण्यात आले आहे. कोरोना काळात पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले.
कर्तव्य बजावताना मृत्यू आलेल्या पोलिसांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
शिपाई हा रिटायर्ड होण्यापर्यंत पीएसआय झाले पाहिजे, असा निर्णय घेतला.
राज्यातील ३८,१६१ पोलिस नाईक पोलिसांना याचा लाभ होणार आहे.
यशवंत जाधव यांच्या कटातील पैसे इक्बाल चहेल यांना किती मिळाले – मोहित कंबोज
कोरोना काळात अनेक चुकीच्या कंपन्यांना कामं दिली
मुंबईच्या कमिशनरला किती कट दिला
ही घटना झाली, पण ती दाबली गेली
एकमेकांवरती ढकलण्याचा प्रयत्न केला
त्यावेळी इक्बाल चहल घाबरले होते
ट्विट केल्याने तक्रार दाखल करण्यात आली
चुकीचं काही केलं नाहीतर कारवाईला का घाबरताय
कोणत्या भ्रष्टाचारामुळे तुम्ही घाबरला आहे.
महाराष्ट्रात इतका मोठा भ्रष्टाचार झाला
भ्रष्टाचार मोठा झाल्याचे वारंवार समोर आलं आहे
मुंबई महापालिकेचे कमिशनर का घाबरत आहेत
अमित साटम यांच्याकडून काही दिवसात एक पुस्तक येईल
पुणे मुंबई हायवेवर लोणावळाजवळ वाहतूक कोंडी
दोन किलोमीटरपर्यंत वाहनांची हायवेवर रांग
तासाभरापासून वाहनचालक पडले अडकून
लोणावळ्याच्या जवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे बाजूला काही ठिकाणी कामही सुरू आहे
कोविडच नव्हे तर पोलिओ लसीकरनाला देखील मालेगाव च्या पूर्व भागात नकार घंटा…
3500 हजार हुन अधिक डोस शिलक असल्याची धक्कादायक बाब..
पोलिओलाही पूर्व भागातील नागरिकानी नकार घंटा..
भुसावळ शहरात आग लागल्याने एकाचा होरपळून मृत्यू तर एक जण गंभीर जखमी
भुसावळ शहरातील महेश कॉलनी भागात एका फ्लॅट ला पहाटे च्या सुमारास आग लागल्याने या घटनेत केशवलाल वाधवानी यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा लखन वाधवाणी हा गंभीर जखमी झाला आहे , पहाटेच्या सुमारास अचानक फ्लॅट मधून आगीच्या ज्वाळा निघत असल्याने अपार्टमेंट मधील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला व पोलिसांना पाचारण केले अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून फ्लॅटला लागलेली आग आटोक्यात आणली.मात्र फ्लॅट ला आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
परभणी पेट्रोल प्राईज
पेट्रोल :- 116-36 पैसे (72 पैसे वाढ)
डिजल:- 99-00 (55 पैसे वाढ)
भारत पेट्रोलियम
सेवानिवृत्त लाईनमेनने विद्युत खांबाला गळफास घेत केली आत्महत्या ,
पाथरी शहरातील गुलजार नगर येथील घटना ,
कौटुंबिक वादातुन केली आत्महत्या केल्याची माहिती,
दुर्योधन गवई (65) मयताच नाव ,
पोलीस घटनास्थळी दाखल
भाजपा नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर
मंत्री अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टवर मारणार हातोडा
साई रिसॉर्ट परिसरात प्रसारमाध्यमांना चित्रीकरण करण्यास मनाई,
आज किरीट सोमय्या साई रिसॉर्टवर पोहोचणार की दोपीलीतचं शिवसैनीक सोमय्यांना अडवणार
अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले.त्यामुळे दोन दिवसांपूर्वी बेलोरा येथे तेरविचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमा दरम्यान चांदूर बाजारचे पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समोर एक भजन गायले असून ते भजन प्रचंड व्हायरल होत आहे…यावेळी बच्चू कडू यांनी पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांचे कौतूकही केले…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील आरोपींचे संबंध थेट गँगस्टर दाउद इब्राहिमच्या साथीदारांशी असल्याचे विधानसभेतच उलगडून दाखविल्यानंतर पुणे पोलिसांत खळबळ
कोथरुडमध्ये दाखल गुन्ह्याची गोपनीय कागदपत्रे फडणवीस यांच्या हातात कशी पोहोचली कशी? वरिष्ठांचा सवाल
पुणे पोलिस दलातील पोलीस उपायुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याची सूत्रांची माहिती
अहमदनगर
अहमदनगरला पारनेर तालुक्यात आज शिवसैनिकांचा मेळावा…
मंत्री गुलाबराव पाटील , मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत होणार मेळावा…
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्व…
आमदार निलेश लंके यांच्याविरोधात शक्तिप्रदर्शन…
पिंपरी चिंचवड
– पिंपरी चिंचवड मधील जिल्हा रुग्णालय परिसरात दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे
-ह्या कार्यक्रमासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित
कोल्हापूर
डॉ.विरेंद्र तावडे हाच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कटाचा सूत्रधार
विशेष सरकारी वकील ऍड हर्षवर्धन निंबाळकर यांचा युक्तिवात
ऍड निंबाळकर यांनी काही पुरावे ही न्यायालयात केले सादर
कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील संशयित विरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांनी दोषी मुक्तीसाठी जिल्हा सत्र न्यायालयात केलाय अर्ज
या अर्जावरील सुनावणी दरम्यान ऍड निंबाळकर यांचा युक्तिवाद
पुढील सुनावणी 13 एप्रिल ला होणार
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील 3.39 कोटींच्या दलाली प्रकरणातील एफआयआर रद्द…
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा मोठा निर्णय…
जिल्हा मध्यवर्ती बँकेने गुंतवणूक मध्ये 3.39 कोटी रुपये दिल्याचा झाला होता आरोप…
बँकेने एका खाजगी कंपनीत केली होती तबल 700 कोटी रुपयांची गुंतवणूक….
अकरा जनावर झाला होता फसवणूकिचा गुन्हा दाखल..
आता न्यायालयाच्या निर्णयाने 11 जणांना मोठा दिलासा…
तक्रार ही सहकार विभागाच्या जॉईट रजिस्टर दर्जाच्या अधिकाऱ्याने देणे होती बंधनकारक….
जिल्हा मध्यवर्ती निवडणूकित गाजला होता दलालीचा मुद्दा…
औरंगाबाद ब्रेकिंग
वैजापूर तालुक्यातील रोटेगाव परिसरात बसची दुचाकीला धडक
धडकेनंतर बस आणि दुचाकीला भीषण आग
धडकेत दुचाकीचालक गंभीर जखमी
जखमीवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू
दुचाकी चालकाचा तोल गेल्यामुळे झाला अपघात
आगीत बस पूर्णपणे जळुन झाली खाक
सुदैवाने कुठलीही जिवित्त हानी नाही
बुलडाणा
मोदींच्या जीवावर निवडून येणाऱ्या लोकांनी मोदीजिना शिकवू नये,
भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांचा खासदार प्रतापराव जाधव यांना टोला,
तर सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले,
सत्तेसाठी लाचार झालेल्यानी शिकवू नये,
असा टोलाही विनोद वाघ यांनी दिलाय
बुलडाणा
धरण उशाला अन कोरड घशाला,
मेहकर शहरात तीव्र पाणीटंचाई,
नगर परिषद चा नियोजन कारभाराचा फटका सामान्य नागरीकाना,
मेहकर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पात मुबलक पाणीसाठी उपलब्ध,
प्रकल्पावरील दोन्ही पम्प महिनाभरापासून नादुरुस्त
– नागपूरात सात हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
– महावितरण ची वीज बील थकबाकीदार ग्राहकांवर धडक मोहीम
– 7127 थकबाकीदार ग्राहकांची वीज कापली
– कारवाई टाळण्यासाठी 31477 ग्राहकांनी 19 कोटी 19 लाख रुपयांचा केला वीज बिलाचा भरणा
– तर वीज चोरी प्रकरणी 112 जणांविरुद्ध कारवाई
नागपूर ब्रेकिंग…
– सीबीआय च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नागपुरातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड चे व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापकाला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक
– महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे आणि मुख्य व्यवस्थापक मनीष नंदले अशी आरोपींची नावं
– रिटेल आउटलेटची मालकी हस्तांतरित करण्यासाठी मागितली एक लाखाची लाच
– तक्रारीवरून सीबीआय ने अटक करत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले
– नागपूरात घर, फ्लॅट, प्लॅाट रजिस्ट्रीवर १ टक्का अधिभार वाढणार
– खरेदीवर आता मेट्रोचा एक टक्के अधिभार वाढणार
– आधीच महागाईचा भडका, त्यात मेट्रोचा भार सर्वसामान्यांवर
– १ एप्रिल पासून खरेदीसाठी सात टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागणार
– सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री
– नागपूरातील अनाधिकृत बांधकामावर तोडगा काढा
– उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश
– नागपूर जिल्हाधिकारी, NIT सभापती आणि मनपा आयुक्तांना न्यायालयाचे आदेश
– संयुक्त बैठक बोलावून अनाधिकृत बांधकामावर तोडगा काढण्याचे आदेश
– अधिकाऱ्यांच्या बैठकीतील चर्चेचा अहवाल १३ एप्रिल पर्यॅत न्यायालयात सादर करण्याचे आदेश
– जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने दिले आदेश
– नागपूर शहरात चोरट्यांचा उच्छाद
– 24 तासात शहरात दहा ठिकाणी लुटीच्या घटना
– पाच ठिकाणी पोलीस असल्याचे सांगून जेष्ठ नागरिकांना लुटले
– एकाची सोनसाखळी, दोघांचे मोबाईल तर दोन ठिकाणी घरफोडी
– पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
– खुनाच्या घटनांनंतर आता नागरिक लुटीच्या घटनांनी दहशतीमध्ये
नाशिक – जिल्हा परिषदेत बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी
बायोमेट्रिक प्रणालीनुसार उपस्थिती राहणार बंधनकारक
बायोमेट्रिक हजेरी मुळे सर्व खातेप्रमुखांना वेळेत लावावी लागणार हजेरी
1 एप्रिलपासून बायोमेट्रिक हजेरी लावण्याची सक्ती
नव्या निर्णयाने कर्मचार्यांमध्ये चलबिचल
– नागपूरात वन विभागाने रोखली ‘स्टार टॅारटॅाईइज’ची तस्करी
– ‘स्टार टॅारटॅाईइज’ तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना वन विभागाने केली अटक
– नागपूरातील अजनी परिसरात वन विभागाची कारवाई
– दुर्गेश शुक्ला, शुभम पुलेवार, शिवम अवस्थी या तीन आरोपींना अटक
– ‘स्टार टॅारटॅाईइज’ तस्करी प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता
नाशिक – करन्सी नोटप्रेसची सामाजिक दयित्वातून रुग्णालयांना मदत
सिक्युरिटी प्रेसच्या सीएसआर फंडातून 3 कोटी 62 लाखांचा निधी
नाशिकच्या बिटको आणि इंदिरा गांधी रुग्णालयाला होणार मदत
रक्तपेढी,अल्ट्रा सोनोग्राफी मशीन साठी सिक्युरिटी प्रेस कडून निधी
औरंगाबाद ब्रेकिंग :-
आमदारांना घरे देण्याच्या मुद्द्यावरुन कन्नड शहरात बॅनरबाजी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कन्नड शहरात बॅनरबाजी
कन्नडच्या आमदारांना मुंबईत घर देण्यासाठी भीक मागो आंदोलन करणार
आमदार उडायसिंग राजपूत यांना भीक मागून घर देण्यासाठी बॅनरबाजी
कन्नड शहराच्या मुख्य चौकात झळकले बॅनर
अकोल्यात पाचव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझल ची दरवाढ़…
पेट्रोल 82 पैसे ने वाढ़ 113.08 पैसे
डीझल 83 पैसे ने वाढ़ 95.88 पैसे
– कोरोनाच्या काळात नागपूर जिल्ह्यात वाढले बालविवाह
– कोरोना काळात महिला व बालकल्याण विभागाने रोखले तब्बल १७ बालविवाह
– जिल्ह्यात कोरोना काळात १०० पेक्षा जास्त बालविवाह झाल्याची शक्यता!
– बालविवाहातून नागपूरातील १२ वर्षांची मुलगी झाली गरोधर
– तज्ज्ञ डॅाक्टरांच्या देखरेखीत १२ वर्षांच्या गरोधर मुलीचं समुपदेशन सुरु
– … त्या १२ वर्षांच्या मुलीचा गर्भपाता बाबात जज्ज्ञांचा विचार सुरु
– १२ वर्षांच्या मुलीच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार?
– नागपूरच्या एमआयडीसी भागातील धक्कादायक घटना
– पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलाला केली अटक
विधानसभेत भाषणात काल मुख्यमंत्री मला अटक कराघोटाळेबाज सरकारचा हातात हातोडा घेऊन सत्यानाश करणार आहे
आम्ही जनतेचा हातोडा आहे
बारा कोटी जनतेचा हातोडा आहे
हा आमचा सत्याग्रह आहे
अनिल परबला आज ना उद्या मंत्रीमंडळातून बाहेर काढाव लागणार आहे
दोन्ही अनिल परबांचे रिसोर्ट आहेत
माझ्या मागे जनता आहे, मोदी सरकारची झेट कॅटेगिरी सुरक्षा आहे
आदित्य ठाकरेच्या प्रकरणाबाबत बोलण्याची हिंमत आहे का ?
मेव्हण्याच्या प्रकऱणावर बोलायची हिंमत ठेवा
मला जेलमध्ये टाका म्हणून काल म्हणाले
माफियागिरी दाऊदगिरी महाराष्ट्रात चालू देणार नाही
सोमवार पासून राज्यात उष्णतेची लाट
पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज
राज्यभरातील वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज
राज्यभरातील बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान 40 ते 41 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज
किरीट सोमय्या यांच्या घराखाली ४० ते ५० गाड्यांची रांग, शेकडोच्या संख्येनं कार्यकर्ते एकवटले…
– महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत साई रिसाॅर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या रोड शे करत आहेत…
– अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी यावे असं आवाहन किरीट सोमय्यांनी केल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच ऊत्साह…
– नील सोमय्या यांनी दिलीये या रोड शो ची पुर्ण माहीती…
रत्नगिरी- भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आज दापोली मार्च
सोमय्या यांच्या दौऱ्यात पूर्वीच राजकीय वातावरण तापलं
अनिल परब यांचे अनधिकृत रिसॉर्ट वर कारवाईसाठी सोमय्या यांचा मार्च
सोमय्या यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी केलेला विरोध
सोमय्या जोरदार शक्तिप्रदर्शन करून काढणार मार्च
खेड पासून दापोली पर्यंत 100 वाहनांचा ताफा
रिसॉर्ट वरील कारवाईसाठी प्रथम पोलीस स्थानकावर सोमय्या यांचा मार्च
तर त्यानंतर मुरुड मधील साई रिसॉर्टवर सोमय्या यांचा मार्च
– कृषिमंत्री दादा भुसे यांच्या गेल्या 2 वर्षच्या कार्यकाळात झालेल्या कामांची ईडी किंवा एसआयटी कडून चौकशी करावी.
– मालेगाव बाह्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा टक्का वाढला म्हणून मुस्लिमांचे शिवसेना लांगुलचालन करते आहे.
– शहरात भाजपकडून केले जात असलेल्या विकासकामांना अडवणूक केली जाते आहे.
– हिंदुत्वाच्या नावाने मोठे झालेल्यांना आता हिंदुत्व शिकवण्याची वेळ आली आहे.
– सीएए, एन आर सी, हिजाब प्रकरणात शिवसेना गप्प का राहिली?
– कृषिमंत्री भुसे यांनी मंत्रिपदाचा अधिकार वापरून शहरात प्रस्तावित असलेले कत्तलखाने का थांबवले नाही?
– महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेने पाठीत खंजीत खुपसला
– शहरात हिंदू अल्पसंख्याक असून त्यांच्या वर होत असलेल्या अन्याय बद्दल कोणी बोलायला तयार नाही भाजप गप्प बसणार नाही
– मालेगांव शहहारामध्ये झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा मनपाच्या विकास कामांची ED,SIT चौकशी करण्याची मागणी..
उपमहापौरांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देतांना सुनील गायकवाड यांच्या निषाणाला थेट कृषिमंत्री होते..
– कृषिमंत्र्यांचा कार्यकाळामध्ये झालेल्या विकास कामांची ED, SID कडे चौकशीची मागणी..
-त्यामुळे ईडगाह मैदानावरून सुरू झालेले राजकारण थेट आता कृषिमंत्र्यांपर्यंत जाऊन पोहोचले..