Maharashtra Assembly News Live Update : पुणे महापालिकेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता, 14 मार्चला कार्यकाळ संपणार

| Updated on: Mar 03, 2022 | 10:45 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Assembly News Live Update : पुणे महापालिकेवर प्रशासक नेमला जाण्याची शक्यता, 14 मार्चला कार्यकाळ संपणार

मुंबई : आज गुरूवात 3 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. मुंबईत आज अधिवेशन असल्याने राजकीय घडामोडी होण्याची शक्यता अधिक आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अनेक प्रश्न विचार असल्याचे काल प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. त्याचबरोबर अधिवेशनापुर्वी असलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे काल पाहायला मिळाले आहे. आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याने नेमकं अधिवेशनात काय होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अधिवेशनात महाविकास आघाडी भूमिका ठाम मांडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Mar 2022 08:27 PM (IST)

    नागपूर मनपावर प्रशासक, उद्या संपतोय कार्यकाळ

    मुदत संपत असलेल्या नागपूर महानगर पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी याबाबतचा आदेश

    राज्याच्या नगरविकास विभागाने काढले आदेश

    नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्ण बी यांच्याकडे प्रशासकाचा कार्यभार

    4 मार्चला संपतेय नागपूर मनपाची मुदत

  • 03 Mar 2022 07:41 PM (IST)

    पुणे महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार?उद्यापर्यंत शासन निर्णय येण्याची शक्यता

    पुणे महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार

    प्रशासक नेमण्याची शासन स्तरावर प्रक्रीया सुरू,

    उद्यापर्यंत शासन निर्णय येण्याची शक्यता

    महापालिकेचेच आयुक्त असणार महापालिकेवर प्रशासक ,

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    पुणे महापालिकेवरतीही प्रशासक येणार !

  • 03 Mar 2022 07:20 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 78 कोरोना रुग्णांची वाढ

    – पुण्यात दिवसभरात 78 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 215 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 01 मृत्यू. -57 जणांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत

  • 03 Mar 2022 06:29 PM (IST)

    सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांची तडीपारी रद्द

    – सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांची तडीपारी रद्द

    – भाजप नगरसेवक आणि विद्यमान उपमहापौर असलेल्या राजेश काळे यांच्यावर सोलापूर शहर पोलिसांनी केली होती तडीपारीची

    – सोलापुरात विविध प्रकारचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने झाली होती कारवाई

    – पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तडीपारी रद्द करण्याचे दिले आदेश

  • 03 Mar 2022 05:54 PM (IST)

    पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी काँग्रेसला जशास तस उत्तर देऊ

    – काँग्रेसला जशास तसे उत्तर देऊ

    – भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा कॉंग्रेसला इशारा

    – पंतप्रधान मोदींच्या दौऱयावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीने आंदोलनाचा इशारा दिलाय,

    – शिवाय राष्ट्रवादी शहराध्यक्षाच्या घोषणांना आम्ही किंमत देत नाही, मुळीकांचा राष्ट्रवादीला टोला

  • 03 Mar 2022 04:11 PM (IST)

    राज्यपालांना आपले अभिभाषण पूर्ण करू द्यायला हवे होते : एकनाथ खडसे

    जळगाव: राज्यपालांना आपले अभिभाषण पूर्ण करू द्यायला हवे होते,

    एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षासह महाविकास आघाडीला फटकारले

    सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी

    जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेऊ नये – एकनाथ खडसे

  • 03 Mar 2022 03:40 PM (IST)

    केंद्रीय यंत्रणांतर्फे शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न : मनीषा कायंदे

    चौकशी सुरू झालेली आहे ईडी इन्कम टॅक्स या केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशा लावून खास करून शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहे

    मीडियामध्ये येत आहे ऑफिशियली केंद्रीय एजन्सी करणा-या संदर्भात कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही

    ऑफिशियली जे काय आहे ते येऊ दे व्हाट्सअप च्या माध्यमातून ही माहिती येत आहे त्यामुळे मीडियाने विचारलं म्हणून विरोधी पक्ष त्यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व सुरु आहे

  • 03 Mar 2022 03:31 PM (IST)

    रवी राणा यांच्या अटक पूर्व जामिनावरील सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली

    मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाई फेक प्रकरण…

    आमदार रवी राणा यांच्या अटक पूर्व जामिनावरील सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली.

    आता उद्या जिल्हा व सत्र न्यायालयात होणार सुनावणी..

    पोलिसांनी आज न्यायालयात आपला जवाब नोंदवला…

    आमदार रवी राणा यांना अटक की अटकपूर्व जामीन याकडे सर्वांचे लक्ष..

  • 03 Mar 2022 03:26 PM (IST)

    ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ठाकरे सरकारची ठाम भूमिका : छगन भुजबळ

    सुप्रीम कोर्टात काय झालं ते आज मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलं

    कोणत्याही परिस्थिती ओबीसी आरक्षण टाळून निवडणुका घेऊन नयेत हे मंत्रिमंडळानं ठरवलं

    काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पूर्ण करता येतील.

    सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं हे वकिलांकडून जाणून घेऊन त्यावर मार्ग काढता येईल

    प्रधान सचिवांना यासंबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत

    जो मार्ग काढता येईल तो काढून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत असं ठरल्याचं भुजबळ म्हणाले

    साधारणपणे एखादी बाजू आपल्या विरोधात गेली विरोधक बोलतात

    जो जिता वो सिकंदर असतो.

    सिंग हे वकिल म्हणून उभं राहतात, विकास गवळी यांच्यासाठी उभं राहतात

    ओबीसींच्या भल्यासाठी उभं राहतोय, असं विकास गवळी म्हणाले

    वकिलांशी चर्चा करुन पुढील कामाची दिशा ठरवू, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. पर्याय बाहेर सांगण्याऐवजी तो आम्ही शोधत आहोत.

    कोण कुणाच्या मांडीवर बसलंय हे समजत नाही, मात्र गवळी यांच्या मागं मोठी आर्थिक ताकद लावली जातेय, असं भुजबळं म्हणाले.

  • 03 Mar 2022 02:53 PM (IST)

    नाशिक महापालिकेवर प्रशासक नियुक्त

    ब्रेक नाशिक – नाशिक महापालिकेवर प्रशासक नियुक्त

    आयुक्त कैलास जाधव यांच्यावर प्रशासक म्हणून जवाबदारी

    14 मार्च पासून प्रशासक म्हणून आयुक्त बघणार कामकाज

    विहित वेळेत महापालिका निवडणूक होत नसल्याने अखेर महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक

    नगरविकास विभागाचे प्रशासनाला आदेश

  • 03 Mar 2022 02:52 PM (IST)

    जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत: विजय वडेट्टीवार

    जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत

    स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत

    पर्याय काय असेल यावर विचार सुरु आहे, असं  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

  • 03 Mar 2022 02:32 PM (IST)

    ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

    ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक घेणार नाही, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

    ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय

  • 03 Mar 2022 02:11 PM (IST)

    ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल नाकारल्यामुळे खंत वाटते: लक्ष्मण हाके

    – ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल नाकारल्यामुळे खंत वाटते,

    – आम्ही अंतरिम अहवाल दिला होता अंतिम नाही,

    – इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने संवेदनशीलता दाखवावी,

    – नवीन काय निर्देश येतात त्यांनतर पुढील दिशा ठरणार

  • 03 Mar 2022 01:27 PM (IST)

    ओबीसी आरक्षणाच्या अहवालासंदर्भातली मोठी बातमी टीव्ही 9 मराठीवर

    ओबीसींच्या राजकीय मागासलेपणाचा अहवाल राज्य सरकारने आयोगाला दिला नाही

    राजकीय मागासलेपणाचा अहवाल नमूद न करता तसाचा अहवाल कोर्टात सादर केला गेला

    राजकीय मागासलेपण न सिद्ध झाल्यामुळे कोर्टानं अहवाल फेटाळला

    राजकीय सर्वेक्षण न झाल्यानं अहवालात मागासलेपण सिद्ध करता आलं नाही

    आयोगातील सदस्यांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    अहावालातील चुकीमुळे अहवाल नाकारला

  • 03 Mar 2022 12:50 PM (IST)

    ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला

    ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला

    पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा निर्वाळा न्यायालयाने दिला

    ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की, मागासवर्ग आयोगाने याबद्दलचा निर्णय घ्यावा.

    पण मागासवर्ग आयोगाने दोन आठवड्यांमध्ये जो अहवाल तयार केला तो अहवाल न्यायालयाने नाकारला.

  • 03 Mar 2022 12:50 PM (IST)

    राज्यपालांना छत्रपतींचा एवढा तिरस्कार का ? – विजय वडेट्टीवार

    – राज्यपालांना छत्रपतींचा एवढा तिरस्कार का ? त्यांना द्वेश का आहे ऐवढा

    त्यांनी राजिनामा का देऊ नये हा मोठा प्रश्न… याचा त्यांनीच विचार करावा…

    – नवा मलिक निर्दोष आहेत, याचं राजकारण केलं जातंय…आमची भुमिका ठाम आहे…

    – चंद्रकांत दादा तारीख पे तारीख देत आहेत… त्यांना कुणी गांभिर्याने घेत नाही…

  • 03 Mar 2022 12:49 PM (IST)

    भुसावळ येथील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचा संपर्क तुटला

    भुसावळ येथील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचा संपर्क तुटला

    भुसावळ शहरातला लोकेश विजय निंभोरे हा वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मधील कीव या ठिकाणी होता दरम्यान युद्धजन्य परिस्थिती मुळे मायदेशी परतण्याचा व युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेल्या आवाहनानुसार लोकेश हा रेल्वेद्वारे बॉर्डर पर्यंत येउन पोहोचला ,  युद्धाच्या वातावरणातून मुलगा परत येत असल्याने पालकांची देखील चिंता काही प्रमाणात मिटली होती. मात्र बॉर्डर पर्यंत पोहोचल्या नंतर लोकेश चा संपर्क तुटल्याने पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

  • 03 Mar 2022 12:47 PM (IST)

    यशोमती ठाकूर यांची विरोधकांवर टीका

    – नवाब मलिक यांच्यावर जे काही आरोप होत आहेत त्याबाबत आत्ता सुप्रिया सुळे यांना भेटणार… आम्ही याबाबात कोर्टात दाद मागणार…मी स्वता जाणार… आरोप खोटे आहेत…

    – देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र आहेत का? , त्यांनी काहीही आरोप करायचे आणि मग त्याला प्रत्त्युत्तर दिलं की अशी भाषा वापरायची , हे योग्य नाही

    – इक्बाल मिर्ची याने किती पैसे भाजपला दिले हे सांगा ना…

    – या अधिवेशनात राज्यपालांकडून छत्रपतींचा अपमान, अभिभाषण अर्धवट सोडून गेले, शेवटची ओळ वाचली, जयघोष आवडत नाही का?, दाऊदचं नाव घेतलेलं चालतं…

    – चंद्रकांत दादांनाच विचारा कोणती गुड न्युज मिळणार आहे ते.. आम्ही काय सांगायचं…

  • 03 Mar 2022 12:03 PM (IST)

    विधानभवनात विरोधक आक्रमक, झाल्यामुळे विधानसभेचं कामकाज स्थगित

    विधानभवनात विरोधक आक्रमक, झाल्यामुळे विधानसभेचं कामकाज स्थगित

    नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा म्हणून विरोधक आक्रमक

  • 03 Mar 2022 11:27 AM (IST)

    राष्ट्रवादीच्या आमदाराचं राज्यपालांविरोधात शीर्षासन

    विधान परिषदेवरील बीडमधून राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांचं खाली डोकं वर पाय, राज्यपालांच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर शीर्षासन

  • 03 Mar 2022 11:19 AM (IST)

    सत्ताधारी आमदारांची घोषणाबाजी, राज्यपाल निघून गेले

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी, राज्यपाल अभिभाषण सोडून निघाले, राज्यपालांना हटवा, सत्ताधारी आमदारांची घोषणाबाजी

  • 03 Mar 2022 10:56 AM (IST)

    राज्यपाल विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पोहोचले

    राज्यपाल विधानभवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पोहोचले

  • 03 Mar 2022 10:42 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

    नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यासाठी भाजपाचं विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन

    विरोधक आक्रमक

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

  • 03 Mar 2022 10:29 AM (IST)

    नवाब मलिक हाय हाय, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

    विधानभवनाच्या पाय-यांवर भाजपाचं आंदोलन

    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी भाजपाकडून पाय-यावर आंदोलन

    मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचं आंदोलन

    नवाब मलिकचा राजीनामा झाला पाहिजे

    दाऊदच्या दलाल मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • 03 Mar 2022 09:41 AM (IST)

    आमची 170 ची ताकद कायम आहे – संजय राऊत

    आमची 170 ची ताकद कायम आहे – संजय राऊत

    विरोधकांनी विनाकामाचं वादळ निर्माण करू नये

    वादळ महाराष्ट्रात अडीच वर्षापुर्वी आलं

    विरोधकांना अधिकार आहे प्रश्न उपस्थित करण्याचा

    विरोधकांनी परंपरेनुसार काम करावं

    हेच राज्याच्या हिताच आहे.

    चंद्रकांत पाटलांची मला दया येते.

  • 03 Mar 2022 09:40 AM (IST)

    नागपूरातील ‘आपली बस’चा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच

    – नागपूरातील ‘आपली बस’चा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच

    – ‘आपली बस’च्या संपामुळे परिक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मोठा फटका

    – वेतन वाढीच्या मागणीसाठी मंगळवारपासून ‘आपली बस’चे कर्मचारी गेले संपावर

    – तिसऱ्या दिवशीही ‘आपली बस’ बंदच असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय

    – काल प्रशासनाने काही बसेस विनावाहक प्रवाशांकडून पैसे न घेता सोडल्या

    – ‘आपली बस’ कर्मचाऱ्यांच्या संपाचा मनपाच्या परिवहन विभागाला आर्थिक फटका

    – आज सायंकाळपर्यंत कर्मचारी कामावर आले नाही तर मेस्मा लावण्यासंदभार्त होणार चर्चा

    – वेतनवाढ मिळत नाही तोपर्यंत संप कायम ठेवणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार

  • 03 Mar 2022 09:19 AM (IST)

    नाशिक – बेशुद्ध बिबट्या अचानक उठून पळतो तेव्हा … !!

    नाशिक – बेशुद्ध बिबट्या अचानक उठून पळतो तेव्हा … !!

    – त्रंबक रोड परिसरातील घटना

    – अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या झाला होता जखमी

    – बेशुद्ध झालेला बिबट्या अचानक उठून बघ्यांच्या अंगावर धावला

    – बिबट्या अचानक उठून धावल्याने बघ्यांची उडाली तारांबळ

    – नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोड वरील थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

  • 03 Mar 2022 08:27 AM (IST)

    नाशिकमध्ये कोरोना निर्बंध कायम

    – 90 टक्के लसीकरण न झाल्यानें निर्बंध जैसे थे

    – ज्या जिल्ह्यात 90 टक्के पर्यंत लसीकरण झाले आहे त्या जिल्ह्यातील निर्बंध काढायचा झाला आहे निर्णय

    – नाशिक मध्ये विवाह,धार्मिक, राजकी कार्यक्रम फक्त 50 टक्के उपस्थित होणार

    – हॉटेल,नाट्यगृह आणि चित्रपट गृह देखील फक्त 50 टक्के उपस्थित सुरू राहणार

    – नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा

    – निर्बंध काढायचे असेल तर नागरिकांनी लसीकरण करावे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच आव्हान

  • 03 Mar 2022 08:25 AM (IST)

    नागपुरातील विधी विद्यापीठला युजीसीचा बूस्टर डोस

    नागपुरातील विधी विद्यापीठला युजीसी चा बूस्टर डोस

    विद्यापीठाला मिळाला 12 बी दर्जा

    सरकारी अनुदानासाठी पात्र

    यामुळे विध्यपीठा चा विकासाचा मार्ग झाला मोकळा

    विद्यापीठाचा शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा दर्जा वाढण्यास मदत मिळणार

    जगातील दर्जा च्या सुविधा उभारण्याचा मार्ग देखील होणार मोकळा

  • 03 Mar 2022 07:45 AM (IST)

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल हटाव मोहीम सुरू

    नाशिक – राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल हटाव मोहीम सुरू

    राज्यपालांना हटवण्यासाठी राष्ट्रपतींना पाठवणार पत्र

    युवक काँग्रेस राष्ट्रपतींना पाठवणार सहा हजार पत्र

    युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांची टिव्ही9 ला माहिती

  • 03 Mar 2022 07:44 AM (IST)

    नाशिकमध्ये इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

    नाशिक – इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

    बॅनर लावण्यासाठी गेला असता पाचव्या मजल्यावरून पडला खाली

    अशपाक नगीनेवाले अस मयत तरुणाचे नाव

    तरुणाच्या मृत्यूनंतर हॉस्पिटल परिसरात काहीकाळ तणाव

    पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला

  • 03 Mar 2022 07:29 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेतील बोगस कंत्राट घोटाळा

    – बोगस कंत्राट घोटाळ्याची सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या माध्यमातून होणार चौकशी

    – गेल्या पाच वर्षांतील कंत्राटाची होणार चौकशी

    – प्रशासनाकडून आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याचे महापौरांचे निर्देश

    – मनपाच्या काल झालेल्या शेवटच्या सभेत बोगस कंत्राट घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर

    – बड्या अधिकाऱ्यांवंही ताशेरे

  • 03 Mar 2022 07:28 AM (IST)

    आज उत्तर प्रदेशमध्ये सहावा मतदानाचा टप्पा

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक

    आज उत्तर प्रदेश मध्ये सहावा मतदानाचा टप्पा

    10 जिल्ह्यातील 57 मतदार संघात होणार मतदान

    बस्ती बलरामपुर गोरखपुर मध्ये मतदान

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपुर मध्ये आज मतदान प्रक्रिया

    आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर मध्ये आज मतदान प्रक्रिया

  • 03 Mar 2022 07:28 AM (IST)

    गेल्या १० वर्षांत २०० च्या वर वाघांचा शिकाऱ्यांनी घेतला बळी

    – गेल्या १० वर्षांत २०० च्या वर वाघांचा शिकाऱ्यांनी घेतला बळी

    – राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) चा अहवाल

    – ‘एनटीसीए’च्या अहवालानुसार २०१२ ते २०२२ दरम्यान वेगवेगळ्या कारनाने देशात १००८ वाघांचा मृत्यू

    – २०१२ ते २०२० पर्यॅत ४१७ वाघांचा नैसर्गिक कारणाने मृत्यू

    – विद्युत प्रवाहाने १०८ वाघांचा झाला मृत्यू

    – २०१२ ते २०२२ दरम्यान सर्वाधिक २५० वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशात

    – मध्य प्रदेश पाठोपाठ १७४ वाघांच्या मृत्यूंसह महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक

  • 03 Mar 2022 07:27 AM (IST)

    पुणे रेल्वे मार्गाच्या जमीन खरेदीसाठी प्रशासनाला 24 कोटी

    नाशिक- पुणे रेल्वे मार्गाच्या जमीन खरेदीसाठी प्रशासनाला 24 कोटी

    संपादित जमिनीची मोजणी पूर्ण

    जमिनीचे मूल्यांकन सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

    समृद्धीच्या धर्तीवर दीड पट निकशा ने मूल्यांकन

  • 03 Mar 2022 07:27 AM (IST)

    नाशिकमध्ये बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

    नाशिक – अभियांत्रिकीच्या बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला

    सैयदपिप्री येथील पाटाच्या पाण्यात आढळला मृतदेह

    अभिषेक खरात असे मृतदेह आढळलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

    जालना येथील असलेला अभिषेक नाशिकला शिक्षणासाठी आला होता

  • 03 Mar 2022 07:26 AM (IST)

    पुणे महापालिकेची सुरक्षा कडक करण्याचे आयुक्तांचे आदेश

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दिलेत आदेश,

    – पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पालिकेत येणार,

    – त्यामुळे आता पालिकेत प्रवेशासाठी पास अनिवार्य,

    – किरिट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिकेच्या सुरक्षेत खबरदारी

  • 03 Mar 2022 07:25 AM (IST)

    नाशिकमध्ये बारावीची ऑफलाईन परीक्षा

    नाशिक – बारावीची ऑफलाईन परीक्षा शुक्रवारपासून

    नाशिक मधील 420 केंद्रांवरील परीक्षेची तयारी पूर्ण

    कोरोना प्रतिबंधक नियमनाची जबाबदारी घेत आसनव्यवस्था

    कोरोना संसर्गामुळे शाळा तिथे केंद्र उपाययोजना

  • 03 Mar 2022 07:25 AM (IST)

    शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर कारवाई सुरू

    शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखाना (एसएसके) घोटाळ्यावर कारवाई सुरू. ED ने जिल्हाधिकाऱ्यांना SSK च्या कोणत्याही मालमत्तेच्या विक्री हस्तांतरणास परवानगी देऊ नये असे सांगितले आहे

  • 03 Mar 2022 07:23 AM (IST)

    बायका नवर्‍यांच्या छळ करत असल्याच्या औरंगाबादेत 285 तक्रारी..

    गेल्या वर्षात बायकोकडून नवर्‍याचा छळ झाल्याच्या तब्बल 285 तक्रारी महिला सहाय्य कक्षाकडे दाखल. .

    महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना आता नवऱ्यावरही वाढले अन्याय-अत्याचार..

    पतीविरुद्ध 1794 तक्रारी तर पत्नी च्या विरोधात 285 तक्रारी प्राप्त..

    मोबाईल मुळे वाढले नवरा-बायकोमध्ये तक्रारीचे आणि वादाचे प्रमाण..

  • 03 Mar 2022 07:18 AM (IST)

    रशिया आणि युक्रेन मधील युद्धाचा पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातीला फटका

    – पूर्व विदर्भातून रशिया आणि युक्रेन होते मोठ्याप्रमाणात तांदळाची निर्यात

    – पूर्व विदर्भातून या दोन देशांत जाणाऱ्या तांदळाला युद्धाचा फटका बसलाय

    – विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काँसिलने मांडलं वास्तव

    – तांदूळ नागपुरातून मुंबई आणि तिथून जहाजमार्गे इतर पाठवला जातो

    – युक्रेन, रशियाला साधारणपणे ८ ते १० हजार टन हा तांदूळ जातो

    – युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी जहाज पाठवणे बंद केल्याने तांदूळ निर्यातीला फटका

  • 03 Mar 2022 06:43 AM (IST)

    घोटाळ्यांवरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या दिल्लीत

    ठाकरे सरकारच्या डर्टी डझन मंत्री/नेत्यांच्या घोटाळ्यांवरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज आणि उद्या दिल्लीत असेन – किरीट सोमय्या

  • 03 Mar 2022 06:41 AM (IST)

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल

    युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले.
    ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईला पोहोचणारे एअर इंडियाचे हे तिसरे विमान आहे.
    या विमानाने 183 भारतीय नागरिकांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे आणण्यात आले आहे.
    केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत.
  • 03 Mar 2022 06:40 AM (IST)

    धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू

    भरधाव बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ रात्रीच्या सुमारास घडली. पारसनाथ मनोहर रोहिटे (वय 22 रा.आहेरवडगाव ता.बीड), कृष्णा भारत शेळके (23 रा.दगडी शहाजानपूर ता.बीड), अक्षय सुरेश मुळे (22 रा.घोडकाराजुरी ता.बीड) अशी मयतांची नावे आहेत. हे तिघे बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन येत होते. यावेळी धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसने जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ व कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला.

  • 03 Mar 2022 06:39 AM (IST)

    सामना अग्रलेख – वादळ नव्हे आदळआपट

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेऊन काही विषयांवर भूमिका मांडली.

    छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे दिशाभूल करणारे वक्तव्य केले

    त्याचा साधा निषेधही देवेंद्र फड़णवीस यांनी करू नये? खरे तर असे अनेक विषय वादळी आहेत व त्यावर विधिमंडळात चर्चा होणे गरजेचे आहे.

    12 बेशिस्त सदस्यांचे निलंबन, विधानसभा अध्यक्षांची निवड हे विषय ओघाने येतील व जातीत

    पण विरोधकांना स्वतःचे तोंड लपवायचे आहे म्हणून ते विधिमंडळात गोंधळ घालणार असतील तर त्यास वादळ म्हणता येणार नाही. फार तर त्यास आदळआपट म्हणावी लागेल!

Published On - Mar 03,2022 6:22 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.