Maharashtra News Live Update : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत मुळा नदीत महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

| Updated on: Mar 30, 2022 | 11:28 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत मुळा नदीत महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज बुधवार 30 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखीत राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात उन्हाळ्यातील पहिल्या वन वणव्याची नोंद झाली आहे. आग झपाट्याने पसरत असल्याचे पाहून वनपथके सक्रिय झाले आहेत. त्याचबरोबर चंद्रपुरात आज जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या तापमानाची नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या तापमानाने पानगळ झालेल्या जंगलात वेगाने पसरली आग आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Mar 2022 10:28 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत मुळा नदीत महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

    -हिंजवडीत मुळा नदीत चार महिन्यापूर्वीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय

    -हा मृतदेह महिलेचा असल्याच हिंजवडी पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अंगावर गाऊन परिधान केल्यान तो महिलेचा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालंय

    -अंदाजे चार ते पाच महिन्यांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रथमदर्शनी आत्महत्या केल्याचं दिसून येतं, मात्र तसा कोणताही पुरावा तिथं आढळून येत नाहीये. त्यामुळे ही हत्या असावी अशी शक्यता पोलिसांना आहे.

    -याचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत

  • 30 Mar 2022 09:14 PM (IST)

    कोल्हापूरमधील दूध उत्पादकांना खूशखबर, म्हैस,गायीच्या दूध खरेदी दरात वाढ

    कोल्हापूरमधील दूध उत्पादकांना खुश खबर

    म्हैस, गायीच्या दूध खरेदी दरात वाढ

    गोकुळ दूध संघाकडून दूध उत्पादकांना पाडव्याची भेट

    म्हैस दूध 41.50 प्रति लिटरवरून 43.50 रुपये प्रति लिटर

    गायीचे दूध 27 रुपये प्रति लिटर वरून 29 रुपये लिटर होणार

    1 एप्रिल पासून दरवाढ लागु

  • 30 Mar 2022 08:58 PM (IST)

    प्रांत कार्यालयात प्रांत अधिकाऱ्यासमोरच दोन महिलांनी घातला गोंधळ

    कल्याण प्रांत कार्यालयात धक्कादायक प्रकार

    प्रांत कार्यालयात प्रांत अधिकाऱ्यासमोरच दोन महिलांनी घातला गोंधळ

    मुंबई बडोदरा महामार्गत संपादनाच्या मोबदला मध्ये या दोघींना त्यांच्या हिस्सा पतीकडून योग्य पद्धतीने दिले जात नसल्याचा केला आरोप

  • 30 Mar 2022 08:16 PM (IST)

    ती क्लिप माझी नाही, बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण

    वीज वितरण कंपनीचे आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात असून मी कुठल्याही प्रकारचा फोन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना लावलेला नसून आणि माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही त्यामुळे मी फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे काही षडयंत्र रचणाऱ्या लोकांनी माझी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल केले असून व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप माझी नसून ते माझ्याविरुद्ध रचलेले कुभांड असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे

  • 30 Mar 2022 06:34 PM (IST)

    कल्याण पंचायत समितीत शिवसेना भाजप राष्ट्रवादीची सत्ता,भाजपाच्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध 

    कीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप मधील वाद विकोपाला गेले आहेत अस असताना कल्याण पंचायत समिती मध्ये मात्र शिवसेना राष्ट्रवादी भाजप एकत्रित रित्या सत्तेचा आस्वाद घेत असल्याचे चित्र आहे .पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर सभापती पदाची निवडणुक बिनविरोध करत शिवसेना राष्ट्रवादी भाजप या तिन्ही पक्षांनी सभापती पदाचा आस्वाद घेतला आहे. आज बिनविरोध निवड झालेल्या भाजपच्या सभापती रेश्मा भोईर यांनी सर्व पक्षीय सदस्याच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

  • 30 Mar 2022 05:49 PM (IST)

    कल्याण रेल्वे स्थानकात चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले

    कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील घटना

    चाकूचा धाक दाखवून प्रवाशाला लुबाडले

    वर्णनावरून चोरट्याला अवघ्या दोन तासात अटक

    कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

  • 30 Mar 2022 04:28 PM (IST)

    महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालतंय : मनीषा कायंदे

    किमान समान कार्यक्रमावरच खरंतर महाविकास आघाडी सरकार चालत आहे आणि आम्ही पुढे चालत राहील याची अनेक उदाहरणं देता येतील गरिबांकडे महिलांकडे दलित आदिवासी ओबीसी याना कोरोना काळात मदत केली आहे

    शिव भोजन थाळी आठ कोटी च्या वर वाटप झालय, गरीब मजूर विद्यार्थ्यांनाही मदत हे सरकार करण्याचा प्रयत्न करते आणि पुढेही करत राहील त्यामुळे किमान समान कार्यक्रम आप असून हे सरकार कुठेही मागे राहणार नाही

  • 30 Mar 2022 03:35 PM (IST)

    किमान समान कार्यक्रमावर काम सुरु व्हावं असं पत्र दिलंय : नाना पटोले

    नाना पटोलेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

    किमान समान कार्यक्रमावर काम करण्याचं आवाहन

    दलित आणि ओबीसींच्या विकासासाठी लक्ष देण्याचं आवाहन

    किमान समान कार्यक्रमावर काम सुरु व्हावं असं पत्र दिलंय

    सोनिया गांधी यांनी दिलेल्या कार्यक्रमाची आठवण करुन दिली

    काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्त्वाला भेटणं चूक नाही

    तो नाराजीचा भाग नसतो,

    आमदारांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट मागितली आहे

  • 30 Mar 2022 02:56 PM (IST)

    प्रविण दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे: धनंजय शिंदे 

    आपच्या कार्यकर्त्यांची प्रविण दरेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी

    आंदोलक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

    प्रविण दरकेरांना विरोधी पक्षनेते पदावरुन हाकललं पाहिजे

    दरेकरांसोबत संचालक आहे त्यांनी हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केलाय

    प्रविण दरेकरांना जेलमध्ये टाकलं पाहिजे: धनंजय शिंदे

  • 30 Mar 2022 02:53 PM (IST)

    आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात पाय पसरायचे म्हणून आंदोलन : प्रविण दरेकर

    आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात पाय पसरायचे म्हणून आंदोलन

    धनंजय शिंदे, भाई जगताप आणि नाना पटोले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

  • 30 Mar 2022 02:48 PM (IST)

    प्रविण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचं आंदोलन 

    प्रविण दरेकर यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचं आंदोलन

    आपकडून प्रविण दरेकर यांच्या राजीनाम्याची मागणी

    मुंबई बँक मजूर प्रकरणी आप आक्रमक

  • 30 Mar 2022 02:11 PM (IST)

    पाच वर्ष गिरीश बापट झोपले होते का ? मोहन जोशींचा सवाल

    पुण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याला भाजपा जबाबदार

    पाच वर्ष गिरीश बापट झोपले होते का ?

    दिल्लीत संसदीय अधिवेशन गिरीश बापट पुण्याच्या गल्लीबोळात स्टंट करत फिरतात

    गिरीश बापटांनी आयुक्तांच्या घरात जाऊन पाण्याचं प्रेशर केल होतं चेक

    पुण्यात गेल्या तीन चार दिवसांपासून कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्यावरून भाजप काँग्रेसमध्ये जूंपली

    काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशींची गिरीश बापटांवर टिका

  • 30 Mar 2022 02:07 PM (IST)

    शिवसेनेतील ९५ टक्के आमदार नाराज आहेत – बावनकुळे

    बाकी आमदारांना काहीचं मिळणार नाही

    त्यामुळे अजिबात निधी मिळणार नाही

    मतदारसंघात विकास काम न झाल्याने आमदार नाराज आहे

    कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे

    शिवसेनेतील ९५ टक्के आमदार नाराज आहेत.

  • 30 Mar 2022 01:50 PM (IST)

    झोमॅटो कर्मचाऱ्यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

    नाशिक – झोमॅटो कर्मचाऱ्यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

    कर्मचाऱयांना ‘गिग्ज’ पद्धतीने काम करावं लागतं असल्याने कर्मचाऱयांना होतोय तोटा

    पेट्रोल अलाऊन्स,डिस्टन्स पे देखील मिळत नसल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी

    1,2,3 एप्रिल रोजी नाशिक झोन च्या सर्व कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

    मागण्या मान्य न झाल्यास संप चिघळण्याची शक्यता

  • 30 Mar 2022 01:49 PM (IST)

    कॅन्टीन मध्ये समोसा महाग झाल्याने वकिलाने दिला डिस्ट्रिक्ट बार असोशियशन च्या सदस्य पदाचा राजीनामा

    कॅन्टीन मध्ये समोसा महाग झाल्याने वकिलाने दिला डिस्ट्रिक्ट बार असोशियशन च्या सदस्य पदाचा राजीनामा..

    नागपूरच्या जिल्हा न्यायालयात असलेल्या कॅन्टीन मध्ये मिळणाऱ्या समोस्याची किंमत वाढविल्याने DBA च्या सदस्याने दिला राजीनामा..

    ऍड धर्मराज बोगाटी राजीनामा देणाऱ्या सदस्याचे नाव..

    DBA कडून चालविणाऱ्या कॅन्टीन मध्ये वकिलांना सवलतीच्या दरात समोसा मिळण्या ऐवजी सदस्यांना महाग समोसा विकत असल्याचा आरोप..

  • 30 Mar 2022 01:48 PM (IST)

    रिफायनरी समर्थक यांचा आनंद उत्सव

    रत्नागिरी- रिफायनरी समर्थक यांचा आनंद उत्सव

    राजापूरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आनंदोत्सव

    पेढे वाटून आणि फटाक्याची माळ लावून जल्लोष

  • 30 Mar 2022 01:40 PM (IST)

    अंबरनाथमध्ये ‘बटन’ गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

    अंबरनाथमध्ये ‘बटन’ गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा मृत्यू

    ‘बटन’ आणि ‘सोल्युशन’ विकणाऱ्यांवर कारवाई करा!

    मृत तरुणाच्या आईची प्रशासनाकडे आर्त विनवणी

    विक्री आढळल्यास कारवाई करण्याचं पोलिसांचं आश्वासन

  • 30 Mar 2022 01:36 PM (IST)

    मनसेच्या वतीने पेट्रोल पंपावर प्रातिनिधिक आंदोलन

    नाशिक – मनसेच्या वतीने पेट्रोल पंपावर प्रातिनिधिक आंदोलन

    साखर वाटून केला पेट्रोल दर वाढीचा निषेध

    घोषणाबाजी आणि फलक झलकवत केला पेट्रोल दरवाढीचा विरोध

  • 30 Mar 2022 01:35 PM (IST)

    दहावीचा पेपर फूटला नाही

    दहावीचा पेपर फूटला नाही

    कोल्हापूरच्या जयसिंपूरमधील घटनेवर माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचं स्पष्टीकरण,

    बनावट पेपर तयार करून व्हायरल करण्यात आला

    विज्ञान व तंत्रज्ञानाचा पेपर फुटला नाही

    टीव्ही 9 मराठीला माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती

  • 30 Mar 2022 01:24 PM (IST)

    औरंगाबादेत तलवारीचा मोठा शस्त्रसाठा जप्त

    औरंगाबादेत तलवारीचा मोठा शस्त्रसाठा जप्त

    कुरियर मधून आलेला मोठा शस्त्रसाठा जप्त

    औरंगाबाद शहरातील क्रांती चौक पोलिसांनी जप्त केला शस्त्रसाठा

    डिटीडीसी कुरियर मार्फत आला होता शस्त्रसाठा

    तब्बल 37 तलवारी आणि एक कुकरी केली जप्त

  • 30 Mar 2022 12:38 PM (IST)

    कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

    कात्रज सिलेंडर स्फोट प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल

    सागर पाटील हा व्यवसायिक असून सदर जागेवरील मालक यांच्यासह आणखी २ जणांवर गुन्हा दाखल

    अनधिकृत रित्या सिलेंडरचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला असून 142 छोटे तर 26 मोठे सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत

    बेकायदेशीरपणे सिलेंडर भरण्याचे काम इथे चालतं होतं..

    मंगळवारी या ठिकाणी 20 सिलेंडर एकापाठोपाठ फुटल्याने इथे मोठा स्फोट झाला

    यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तसेच स्थानिकांचा मोठं नुकसान झालं होतं…

  • 30 Mar 2022 12:37 PM (IST)

    नाणारबाबात शिवसेना भांबावलीये, लाखोंना रोजगार मिळणार आहे – प्रवीण दरेकर

    – मुंबई बॅंक प्रकरणी माला न्यायालयाने दिलासा दिलाय, सत्तेचा दुरूपयोग करून त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, प्रमुख नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न, त्यांचे नेते जेलमध्ये म्हणून काऊंटर अटॅक होतोय…

    – माझी मागणी की पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचीही सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मी अमित शहा यांच्याकडे करणार, सत्य जनतेसमोर यायला हवं…imp

    – नाणारबाबात शिवसेना भांबावलीये, लाखोंना रोजगार मिळणार आहे, शिवसेनेची आत्ताही भूमिका बदलली, त्यावेळी राजकारण आणि विरोध केला, काय सेटलमेंट झालं माहीत नाही, पळवाट काढत समर्थन करत आहेत… आरेसारखी गत झालीये…

    – बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना… युपीएचं अध्यक्ष पदाचा निर्णय संयुक्तिक नाही, अर्थ नाही… कांग्रेस सगळं गुंडाळून शरद पवारांना करतील की नाही हा प्रश्न, राज्यात दोन्ही पक्ष शिवसेनेला संपवत आहे…

    – अडीच वर्षात सेनेचा ग्राफ वाढला नाही,

    – जयंत पाटील तुम्ही हिंदू नाहीत का ? तुम्ही काय बोलता याची पर्वा नाही… मेळावे होतात, सभा होतात तेव्हा विरोध करता का ? कुणाला खुष करताय…

    – कोवीडबाबात सरभरीत वक्तव्य, खुलेआम लोक मोकळ्या वातावरणात फिरत आहे, मग मास्कची बंदी का ? का लोकांना छळत आहात, हा अतिरेकी निर्बंध…

  • 30 Mar 2022 12:31 PM (IST)

    अमरावतीमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात भरली विद्यार्थ्यांची शाळा…

    अमरावतीमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात भरली विद्यार्थ्यांची शाळा…

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्याने आता विद्यार्थी आले आंदोलनात..

    मागील सव्वीस दिवसांपासून सुरू आहे अमरावती विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचे आंदोलन.

  • 30 Mar 2022 12:30 PM (IST)

    अनिल देशमुख तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते काटोल येथे येणार

    – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात येणार राष्ट्रवादीचे दिग्गज नेते

    – धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, रोहीत पवार काटोल दौऱ्यावर येणार

    – अनिल देशमुख तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते काटोल येथे येणार

    – काल अमोल मिटकरी यांनी केला काटोलचा दौरा

    – काटोल मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड मजबूत काहावी म्हणुन प्रयत्न

    – काँग्रेस नेते आशिष देशमुख काटोलमध्ये कामाला लागल्याने राष्ट्रवादी अलर्टवर

  • 30 Mar 2022 12:29 PM (IST)

    धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, रोहीत पवार काटोल दौऱ्यावर येणार

    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात येणार राष्ट्रवादीचे दिग्गज नेते

    – धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, रोहीत पवार काटोल दौऱ्यावर येणार

    – अनिल देशमुख तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीचे दिग्गज नेते काटोल येथे येणार

    – काल अमोल मिटकरी यांनी केला काटोलचा दौरा

    – काटोल मतदारसंघावर राष्ट्रवादीची पकड मजबूत काहावी म्हणुन प्रयत्न

    – काँग्रेस नेते आशिष देशमुख काटोलमध्ये कामाला लागल्याने राष्ट्रवादी अलर्टवर

  • 30 Mar 2022 12:29 PM (IST)

    नाणार प्रकल्पाबाबत नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

    नाणार प्रकल्पाबाबत नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

    तिथल्या लोकांचा गैरसमज असेल तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जागा आहेत

    जसं की विदर्भात जर विदर्भात देतं असतील तर विदर्भातही घेऊन जाऊ

    पश्चिम महाराष्ट्रात जागा आहेत

    मात्र हा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नये

    कोकण हा निसर्ग समद्ध आहे

    कोकणाचा ज्या पद्धतीने विकास व्हायला हवा होता तो झाला नाही

    शासनाने पुढाकार घेऊन लोकांचा गैरसमज दूर करावा

    पर्यावरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीला धोका नसेल तर प्रकल्प व्हावा

    मी ज्या संशोधनाचा अभ्यास केलाय त्यानुसार तरी त्यामध्ये काही दिसतं नाही .

  • 30 Mar 2022 12:28 PM (IST)

    नोटबंदी आणि जीएसटीविषयी राहूल गांधींनी भूमिका मांडली होती

    2024 ला राज्यात आणि देशात काँग्रेसचा पंतप्रधान असेल हे मी वक्तव्य केलं..

    राहूल गांधी हे व्हीजन असलेलं नेतृत्व आहे..

    भाजप लोकांची टिंगलटवाळी करतं

    नोटबंदी आणि जीएसटीविषयी राहूल गांधींनी भूमिका मांडली होती

    त्यानंतर आपण बघितलं कि देशात काय झालं ?

    देशातील कोरोना परिस्थितीमूळे अनेकांचे बळी गेले त्याला भाजप जबाबदार ते जबाबदारी घेणार का ?

    ऑन वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख

    या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेय

    मात्र त्यांच इंटेन्शन वेगळं होतं एखाद्या राजकीय कार्यक्रमात उभं करून तलवार देण ही काय परंपरा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात आहे

    कोणत्या आधारावल गुन्हे दाखल करण्यात आले याचा जबाब आम्ही दिलीप वळसे पाटलांना विचारू..

    तीन पक्षाचं सरकार आहे त्यामुळे काही होतं

    जे आमदार पक्षाच्या प्रमुखांना भेटायचं म्हणतायेत तर गैर काय ?

    आमदार आम्हाला काही सांगतात मात्र नाराजी असं काही नाही..

  • 30 Mar 2022 12:23 PM (IST)

    लसीकरणाच्या बाबतीत चालढकल नको – राजेश टोपे

    लसीकरणाच्या बाबतीत चालढकल नको

    बाबा साहेबांची जयंतीचा राज्यात उत्साहात साजरी करावी

    एक तारखेपासून आपत्कालीन कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू

    मास्कशिवाय फिरल्यानंतर कारवाई होणार

    ज्यावेळी परिस्थिती बदलेलं त्यावेळी मास्कबाबत निर्णय घेऊ

    निर्बंधावरती आम्ही मागण्या करतो, त्यानुसार आणि निर्णय घेतो

    मला वाटतं की, आपण शिस्तबद्ध पध्दतीने कार्य करणार असलो तर काहीच अडचण नाही

    योग्य तोच निर्णय घेत असतो

    बऱ्यापैकी शिथिलीकरण केलेलं आहे, फक्त मास्क अपवाद आहे

    लसीकरण करून घ्याव,

    थोडसं वेट आणि वॉचची गरज आहे

    समाज हिताचा निर्णय घेऊ

    शोधा यात्रेच्या दिशेने निर्णय घेऊ

    सगळ्यांना विचारात घेऊन निर्णय घेऊ

  • 30 Mar 2022 12:10 PM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात मोठया वणव्याने वेलगुर जंगलाचे सागवान वृक्षाचे मोठे नुकसान

    गडचिरोली जिल्ह्यात मोठया वणव्याने वेलगुर जंगलाचे व सागवान वृक्षाचे जंगलाचे मोठे नुकसान

    आज सकाळी 8 वाजेपासून लागलेली ही आग झपाट्याने वेलगुरु जंगलातील दोन्ही बाजूला पसरत गेली

    तापमान वाढत चालल्यामुळे ही आग वणवा जास्तच पसारत गेल्याची महिती

    आलापल्ली वनविभाग अंतर्गत जवळपास तीन हेक्‍टर जंगल क्षेत्राचे नुकसान या वणव्यामुळे झालेले आहे

    जंगल व वृक्षाची नुकसान करण्यासाठी अज्ञात व्यक्तीनी आग लावल्याचे प्राथमिक माहिती

    आग नियंत्रणात आणण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू

    एफ.डी.सी.एम व वन विभागाचा क्षेत्र असलेला मुलचेरा तालुक्यातील वेलगुरु जंगल

  • 30 Mar 2022 12:05 PM (IST)

    काँग्रेसशिवाय युपीए होऊ शकत नाही – नाना पाटोले

    काँग्रेसशिवाय युपीए होऊ शकत नाही

    तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही

    शरद पवारांवर विश्वास ठेवणार का ? या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं

    काँग्रेसशिवाय पर्याय नाही नाना पटोलेचं वक्तव्य

  • 30 Mar 2022 12:04 PM (IST)

    मुंबईत घर न मिळाल्याची चंद्रकांत खैरे यांना अजूनही आहे खंत

    मुंबईत घर न मिळाल्याची चंद्रकांत खैरे यांना अजूनही आहे खंत

    आमदार आणि गृहनिर्माण मंत्रीपद भूषवूनही चंद्रकांत खैरेना मिळालं नाही मुंबईत घर

    32 वर्ष उलटले तरीही माजी गृहनिर्माण मंत्री चंद्रकांत खैरे मुंबईत बेघर

    मुंबईत घर न मिळाल्याची चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली खंत

    मात्र आता लवकरच घर मिळणार असल्याची चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आशा

  • 30 Mar 2022 11:30 AM (IST)

    नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा

    नाणार रिफायनरी प्रकल्प विदर्भात स्थलांतरित करा

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समिती स्थापन करावी

    गोसेखुर्द प्रकल्पाजवळ रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो

    काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची मागणी

    नितीन गडकरी यांनीही विदर्भात प्रकल्प उभा करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे

  • 30 Mar 2022 11:29 AM (IST)

    पालकमंत्र्यांकडे अनेकांनी परवानगी मिळत नसल्याची तक्रार केली होती

    – पालकमंत्र्यांकडे अनेकांनी परवानगी मिळत नसल्याची तक्रार केली होती

    – एक दिवसांपेक्षा जास्त कार्यक्रम घेणाऱ्यांना परवानगीसाठी बोलावलं आहे

    – इतरांना परवानगी दिलेली आहे

    – खाजगी संस्था जर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेत असतील तर परवानगी घ्यावीच लागणार

    – प्रत्येकाच्या अर्जाची छाननी केल्यानंतरच परवानगी देणार

    – एकाच्या कार्यक्रमाचा दुसर्यांना त्रास होऊ नये

    – कोण कायदेशीर कामासाठी आणि कोण बेकायदेशीर कामासाठी एकत्र येत आहे हे कळण्यासाठी अर्ज

    – ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्याचा निर्णय

    – एक खिडकी योजने च्या बळकटीसाठी CCTS या ऑनलाईन पोर्टल वर परवानगी घेण्याची देखील व्यवस्था

    – येत्या 1-2 दिवसात हे पोर्टल कार्यान्वित होणार

    – पोलीस स्टेशन ला येण्याची आवश्यकता पडणार नाही

  • 30 Mar 2022 11:19 AM (IST)

    आमदारांना मुंबईत घरे दिल्याचा आक्रोश

    गरीब व गरजू आमदारांना हक्काचे घर मिळवून दिल्या बद्दल मुख्यमंत्री साहेबांचे आभार असे चक्क बॅनर लावून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

    जिल्हातील जेवनाळा येथील शेतकऱ्यांनी लावले बॅनर

    आमदारांना मुंबईत घरे दिल्याचा आक्रोश.

  • 30 Mar 2022 11:18 AM (IST)

    माजी काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी संजय राऊत भेट घेतली

    माजी काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी संजय राऊत भेट घेतली

    नाणार प्रकल्प विदर्भात उभा करा

  • 30 Mar 2022 11:18 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल

    कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल

    गावातीलच लहान मुलीचा विनयभंग केल्याचा ग्रामस्थांचा आरोप

    संबंधित शिक्षका विरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नकार

    मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ

  • 30 Mar 2022 11:17 AM (IST)

    सगळ्या परवानग्या ऑनलाईन करण्याचा निर्णय – छगन भूजबळ

    – नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून परवानगी वरून वाद – अनेक लोकांनी याबाबत नापसंती केली आहे – याबाबत सिपी यांच्याशी चर्चा केली – गुढीपाडव्याच्या कोणत्याही परवानग्या घडवलेल्या नाहीत असं आयुक्तांनी मला सांगितलं – धुळवडीला ज्या लोकांवर गुन्हा दाखल केला, त्यांच्या बाबत पुनर्विचार करू – सगळ्या परवानग्या ऑनलाईन करण्याचा निर्णय – सिटीझन पोर्टल वर देखील परवानग्या मिळणार

  • 30 Mar 2022 11:07 AM (IST)

    बारसूमधील ग्रामस्थांचं रिफायनरी विरोधात जोरदार आंदोलन

    बारसूमधील ग्रामस्थांचं रिफायनरी विरोधात जोरदार आंदोलन

    आमची आजपासून सुरूवात केली आहे

    शिवसेनेला दुश्मन म्हणून पाहणार

    दोन्ही बाजूने कसे काय बोलता

  • 30 Mar 2022 11:01 AM (IST)

    स्टॅम्प ड्युटी वाढणार, घर, फ्लॅट, प्लॅाट नोंदणीसाठी लोकांची गर्दी

    – स्टॅम्प ड्युटी वाढणार, घर, फ्लॅट, प्लॅाट नोंदणीसाठी लोकांची गर्दी

    – घर, फ्लॅट, प्लॅाट रजिस्ट्रीवर १ टक्का अधिभार वाढणार

    – एक एप्रिलपासून एक टक्का स्टॅम्प ड्युटी वाढणार

    – स्टॅम्प ड्युटी वाढणार असल्याने नागपूरातील नोंदणी कार्यालयात गर्दी

    – नोंदणी कार्यालयात प्रॅापर्टी नोंदणी करणाऱ्यांची गर्दी

    – पूर्वीपेक्षा २० ते ३० टक्के नोंदणी करणाऱ्यांचं प्रमाण वाढलं

    – एक एप्रिलपासून मेट्रोचा एक टक्के अधिभार वाढणार

    – १ एप्रिल पासून खरेदीसाठी सात टक्के मुद्रांक शुल्क भरावा लागणार

    – सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

  • 30 Mar 2022 11:01 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात 650 एसटी कर्मचारी कामावर परतले

    अमरावती जिल्ह्यात 650 एसटी कर्मचारी कामावर परतले…

    अद्यापही 1100 कर्मचारी संपावर…

    दरोरोज 30 हजार किलोमीटर चा प्रवास…

    135 एस टी बस रस्त्यावर…

    450 एसटी कर्मचारी झाले आहेत निलंबित…

  • 30 Mar 2022 11:00 AM (IST)

    कोल्हापूरच्या जयसिंगपूर इथं दहावीचा पेपर फुटला

    कोल्हापूरच्या जयसिंगपूर इथं दहावीचा पेपर फुटला

    विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा पेपर फुटल्याने उडाली खळबळ

    आज होणारा पेपर रात्रीच विद्यार्थ्यांना मिळाला

    500 रुपयांना पेपरची विक्री होत असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

    जयसिंगपूर पोलिसांकडून पेपर फुटीची चौकशी सुरू

  • 30 Mar 2022 10:36 AM (IST)

    पोलीस आयुक्त दीपक पांडये छगन भुजबळ यांच्या भेटीला

    नाशिक – पोलीस आयुक्त दीपक पांडये छगन भुजबळ यांच्या भेटीला

    पोलीस आयुक्त आणि शहरातील सांस्कृतिक मंडळांमधला वाद चिघळल्यानंतर सिपी- भुजबळ भेट

    शहरातील नववर्ष स्वागत समितीला परवानगी नाकारल्याने चिघळला वाद

    बदली झाली तरी चालेल, माघार नाही अशी पोलीस आयुक्तांनी घेतली होती भूमिका

    सिपी – सांस्कृतिक मंडळांच्या वादात भुजबळ तोडगा काढणार का ? हा प्रश्न

  • 30 Mar 2022 10:35 AM (IST)

    बारसू गावातील ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध

    बारसू गावातील ग्रामस्थांचा रिफायनरीला विरोध

    प्रकल्प नको आहे, आम्हाला आमची जमीन वाचवायची, हवामान वाचवायचं

    रिफायईन बंद

    रिफायनरी कोकणात नको आहे

    रोजी रोटीचा प्रश्न असल्याने बारसू वासिक आक्रमक

  • 30 Mar 2022 10:23 AM (IST)

    दारुच्या नशेत ग्रामसेवक खुर्चीवरच लोळले

    दारुच्या नशेत ग्रामसेवक खुर्चीवरच लोळले..

    जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील विरसी येथील प्रकार.

    वीडियो वायरल वरिष्ठांकडे तक्रार. ग्रामसेवक दारुच्या नशेत बेशुद्ध झाल्याने नियोजित सभा होऊ शकली नाही.

  • 30 Mar 2022 10:23 AM (IST)

    औरंगाबादेत पेट्रोल डिझेल दरवाढीचा कळस

    औरंगाबादेत पेट्रोल डिझेल दरवाढीचा कळस

    औरंगाबादेत पेट्रोल 117 रुपये लिटर

    तर डिझेल 101 रुपये लिटवर वर

    अवघ्या 6 दिवसांत 6 रुपयांनी झाली इंधन दरवाढ

    पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला

  • 30 Mar 2022 10:22 AM (IST)

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पुणे दौऱ्यावर

    पुण्यात काँग्रेस कार्यकर्ता नोंदणी डीजीटल उपक्रमाचं करणार उद्घाटन

    थोड्या वेळात पुणे विमानतळावर येणार…

  • 30 Mar 2022 09:58 AM (IST)

    मुंबईतील गोरेगावात राज्यातील पहिलं ट्रांसजेंडर शौचालय

    मुंबईतील गोरेगावात राज्यातील पहिलं ट्रांसजेंडर शोचालयाचं माजी मंत्री रविंद्र वायकर करणार ऊद्घाटन..

    – एडवोकेट पवन कुमार आणि सारथिचा लढ्याला अखेर आलं यश…

    – संध्याकाळी होणार ऊद्घाटन

  • 30 Mar 2022 09:57 AM (IST)

    अकोला – पूर्णा – अकोला रेल्वे 1 एप्रिल पासून नियमित धावणार….!

    अकोला – पूर्णा – अकोला रेल्वे 1 एप्रिल पासून नियमित धावणार….!

    अकोला दक्षिण – मध्य रेल्वे ने अकोला – पूर्णा – अकोला हि विशेष गाडी….

    1 एप्रिल पासून पॅसेंजर ऐवजी नियमित एक्स्प्रेस बनून नवीन क्रमांकाने धावणार आहे….

    1 एप्रिल पासून हि विशेष गाडी नियमित एक्स्प्रेस बनून अकोला ते पूर्णा दरम्यान 17683 या नवीन क्रमांकाने धावेल….

    तर पूर्णा ते अकोला दरम्यान 17684 या नवीन क्रमांकाने धावनार आहे….

    कोविड -19 पासून हि रेल्वे बंद होती….

  • 30 Mar 2022 09:56 AM (IST)

    पार्टी करण्यासाठी बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाने केला बलात्कार

    – पार्टी करण्यासाठी बोलावून ज्युनिअर अभिनेत्रीवर दिग्दर्शकाने केला बलात्कार,

    – सन फिल्म्सच्या कास्टिंग डायरेक्टरविरुद्ध गुन्हा दाखल,

    – काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तसेच वेगवेगळ्या पार्टीमध्ये बोलवून अभिनेत्रीवर केला बलात्कार,

    – अभिनेत्री 17 वर्षांची असल्यापासून आज पर्यंत या कास्टिंग डायरेक्टरने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप,

    – तसेच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी,

    – याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल

    – अमित प्रेमचंद सिटलानी (वय 40) असे गुन्हा दाखल झालेल्या कास्टिंग डायरेक्टरचे नाव

  • 30 Mar 2022 09:40 AM (IST)

    शिर्डी विमानतळाला ठोकणार टाळं…

    शिर्डी विमानतळाला ठोकणार टाळं…

    साडेपाच कोटी रुपयांचा कर थकीत असल्याने ग्रामपंचायत आक्रमक….

    पंधरा दिवसात कराची थकीत रक्कम दिली नाही तर शिर्डी विमानतळाला ठोकणार टाळ ठोकण्याचा काकडी ग्रामपंचायतचा इशारा…

    सरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांचेकडून विमानतळाचे संचालक सुशील कुमार श्रीवास्तव यांना देण्यात आले निवेदन…

    ज्या गावाने विमानतळाला जमिनी दिल्या तेच गाव विविध समस्यांनी वंचित….

    अनेक आश्वासने अद्यापही कागदावरच असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप…..

  • 30 Mar 2022 09:18 AM (IST)

    वरुण गांधी भेट ही सदिच्छा भेट होती, ते उत्तम लेखक आहेत – संजय राऊत

    वरुण गांधी भेट ही सदिच्छा भेट होती, ते उत्तम लेखक आहेत , वरून गांधी यांची भेट सदिच्छा भेट होती , त्यांचे ठाकरे परिवाराशीही घनिष्ठ संबंध आहेत

    नाना प्रकल्पाला खीळ घालण्यासाठी शिवसेनेंन कधी पुढाकार घेतला नाही, आजही तिकडे आंदोलन चालू आहे, मात्र प्रकल्प होऊ नये असं नाही, रिफायनरीला काही स्थानिकांचा विरोध आहे

    आमदार आशीष देशमुख यांची मागणी की नाणार प्रकल्प विदर्भात द्या

    ———- शरद पवार UPA अध्यक्ष व्हावे, याच आम्ही स्वागत केल आहे पवार ज्येष्ठ नेते आहेत विरोधकांना एकत्र आणायचं असेल तर शरद पवार हे काम करू शकतात म्हणून हीच भूमिका सातत्याने समोर येत आहे

  • 30 Mar 2022 09:17 AM (IST)

    अनेक पक्षांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार करू शकता – संजय राऊत

    राजकीय विषय चर्चेत निघत असतात

    वरूण गांधी आणि ठाकरे परिवाराचे चांगले संबंध आहेत

    वरूण गांधींबरोबर सदिच्छा भेट

    कोकणात तो प्रकल्प आहे

    कोकणवासींचा प्रखर विरोध आहे

    याचा अर्थ तो प्रकल्प होणार नाही असं नाही

    तो प्रकल्प नागपूरकडे नेता येतो का ?

    तिथं प्रकल्पाला विरोध नाही. त्यांच्या रोजीरोटिला प्रश्न असल्यामुळे विरोध आहे

    हा प्रकल्प कुठेही झाला, म्हणजे महाराष्ट्रात व्हायला हवा

    अनेक पक्षांना एकत्र आणण्याचं काम शरद पवार करू शकता

  • 30 Mar 2022 08:47 AM (IST)

    पुण्यात आजही पेट्रोलच्या दरात वाढ

    पुण्यात आजही पेट्रोलच्या दरात वाढ

    1रुपयांची पेट्रोलच्या दरात वाढ

    काल पुण्यात 114 रुपये 53 पैसे होतं तर आज 115 रुपये 36 पैसे

    दिवसेंदिवस पेट्रोल , डिझेलच्या दरात वाढ सुरूच !

    पुणेकर वाढत्या पेट्रोल आणि डीझेलच्या दरानं हैराण

  • 30 Mar 2022 08:45 AM (IST)

    कारवाई दरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर दगडफेक

    धानोरी येथे अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण निरीक्षक व जेसीबी चालक यांच्यावर दगडफेक करत गंभीर मारहाण प्रकरण गुन्हे दाखल

    अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी व जेसीबी चालक सुभाष कांबळे हे जखमी झाले होते

    विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे 25 ते 30 आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा सह बेकायदेशीर जमाव जमवून गंभीर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 30 Mar 2022 08:34 AM (IST)

    पुण्यात आजही पेट्रोलच्या दरात वाढ

    पुण्यात आजही पेट्रोलच्या दरात वाढ

    1रुपयांची पेट्रोलच्या दरात वाढ

    काल पुण्यात 114 रुपये 53 पैसे होतं तर आज 115 रुपये 36 पैसे

    दिवसेंदिवस पेट्रोल , डिझेलच्या दरात वाढ सुरूच !

  • 30 Mar 2022 08:34 AM (IST)

    खासदार संजय राऊत आणि खासदार वरुण गांधी यांच्यात खलबतं

    खासदार संजय राऊत आणि खासदार वरुण गांधी यांच्यात खलबतं

    काल रात्री राऊत यांच्या निवासस्थानी वरुण गांधी यांनी घेतली भेट

    दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तीन तास झाली चर्चा

    वरुण गांधी सध्या भाजपवर नाराज

  • 30 Mar 2022 07:54 AM (IST)

    अकोल्यात नवव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझल ची दरवाढ़

    अकोल्यात नवव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझल ची दरवाढ़…

    पेट्रोल 83 पैसे ने वाढ़ 115.59 पैसे

    डीझल 83 पैसे ने वाढ़ 98.36 पैसे

  • 30 Mar 2022 07:47 AM (IST)

    बदलापूरहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प

    बदलापूरहून मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा ठप्प

    अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकांदरम्यान लातूर मुंबई एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड

    ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत

    गेल्या अर्धा तासापासून रेल्वे सेवा विस्कळीत

  • 30 Mar 2022 07:36 AM (IST)

    येत्या निवडणुकांमध्ये मुस्लिम वोटबॅंकेला आपल्या जवळ करण्यासाठी हाजी अराफत यांनी घेतली नारायण राणे यांची भेट

    येत्या निवडणुकांमध्ये मुस्लिम वोटबॅंकेला आपल्या जवळ करण्यासाठी हाजी अराफत यांनी घेतली नारायण राणे यांची भेट…

    राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे नेते हाजी अरफात शेख यांची दिल्लीची वारी… राज्यातील विविध समस्यांंबाबत केंद्रीय मंत्र्यांशी केली चर्चा…

    – शेख यांनी केंद्रीय सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योग मंत्री नारायण राणे यांची दिल्ली येथे उद्योग भवन कार्यालयात भेट घेतली.

  • 30 Mar 2022 07:32 AM (IST)

    आमदार निलेश लंके यांनी केला सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध

    आमदार निलेश लंके यांनी केला सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध…

    सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर केली होती टीका…

    जेष्ठांबद्दल बोलताना जरा विचार करावा आमदार लंके यांचे प्रत्युत्तर…

    पवार साहेबांबद्दल टीका करण्यासाठी भाजपने खोत यांना काहीतरी आमिष दाखवलं असेल….

    आमदार निलेश लंके यांचा सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा

  • 30 Mar 2022 07:31 AM (IST)

    जळगावात उष्माघाताचा पहिला बळी

    जळगावात उष्माघाताचा पहिला बळी

    शेतात काम करून घरी परतत असताना बसलास शेतात उन्हाचा फटका*

    33 वर्षीय जितेंद्र संजय माळी याचा उष्माघाताने बळी

    अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शेतकरी कर्याचा मृत्यू

    उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याने स्थानिक डॉक्टरांचे म्हणेने

    मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष पाटील यांनी दिली माहिती

    Pm रिपोर्ट आल्यावर होईल खुलासा

    मंगळवारी जळगाव जिल्ह्याचा पारा होता 43.5 अंशावर

    अजून दोन दिवस राहणार तापमानाच्या पार्यात वाढ

    अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात करण्यात आली अकस्मात मृत्यूची नोंद

    मांडळ गावात दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकून मका काढण्यासाठी गेला होता

  • 30 Mar 2022 07:30 AM (IST)

    म्हाडाच्या राखीव सदनिका न देणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करणार

    नाशिक – म्हाडाच्या राखीव सदनिका न देणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करणार

    विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांचे आदेश

    मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय

    सातशे कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी झाली बैठक

    संबंधित विकासकांना सात दिवसांचा अल्टीमेटम

  • 30 Mar 2022 07:30 AM (IST)

    – राज्यात करोनाबळींच्या कुटुंबीयांना १५० कोटींची मदत

    – करोना काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दीडशे कोटी रुपये कोरोना मृतकांच्या वारसांना

    – करोना काळात एकूण ३४०.४५ कोटींच्या देणग्या प्राप्त झाल्या

    – माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना आरटीआय मधून ही माहिती देण्यात आलीय

    – कोरोनात मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देहविक्रय करणाऱ्या महिलांना ४८ कोटी १७ लाख रुपयांची मदत

  • 30 Mar 2022 07:28 AM (IST)

    लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 4 करोड रुपयांची रोकड पकडली आहे

    -लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 4 करोड रुपयांची रोकड पकडली आहे. ही कारवाई पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर करण्यात आली

    -अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैश्यांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मुंबईहून पुण्याकडे जाताना अज्ञात कारला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तशीच ती पुढे निघून गेली. पोलिसांनी पाठलाग करून मोटारीला पकडले त्यात 4 करोड रुपये सापडले

    -मोटार चालक आणि इतर एकाला अटक करण्यात आलीय

  • 30 Mar 2022 07:28 AM (IST)

    गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या आरोपींना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या

    पिंपरी चिंचवड

    -गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या आरोपींना सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या

    -पिंपरीतील एस, वाघेरे कॉम्प्लेक्सवर छापा टाकून 11 किलो गांजा सामाजिक सुरक्षा पथकाने जप्त केलाय

    -या प्रकरणी गांजा विक्री करणारा गौतम किसन गायकवाड आणि गांजा पुरवणारा दीपक इन्द्रेकर ला अटक करण्यात आलीय. आरोपींकडून एकूण 3 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय

  • 30 Mar 2022 07:27 AM (IST)

    राज्यातील उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणूकीचं बिगूल वाजलं

    राज्यातील उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणूकीचं बिगूल वाजलं ..

    सहकारी संस्थांची चौथ्या ते सहाव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया 1 एप्रिलपासून

    राज्य सहकारी प्राधिकरणानं काढले आदेश

    प्रारुप मतदारयाद्यांच काम पुर्ण

    चौथ्या ते सहाव्या या टप्प्यातील तसेच 2021 मधील 31 मार्च 2021 पर्यंत मुदत संपलेल्या एकूण 17 हजार 194 सहकारी संस्था

    निवडणूक प्रक्रियेस 1 एप्रिल पासून सुरुवात होणार

  • 30 Mar 2022 07:23 AM (IST)

    कोट्यवधींचा खर्च झाल्याने हिशोबाकडे सर्वांचे लक्ष

    नाशिक – 94 व्या साहित्य संमेलनाचा मिळणार आज हिशोब

    कोट्यवधींचा खर्च झाल्याने हिशोबाकडे सर्वांचे लक्ष

    स्वागत समितीसमोर हिशोब ठेवला जाणार

    हिशोबाच्या बैठकीनंतर माहिती दिली जाणार

    पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मांडला जाणार हिशोब

  • 30 Mar 2022 07:19 AM (IST)

    बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एका दिवसात तब्बल 450 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प..

    औरंगाबाद 

    बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एका दिवसात तब्बल 450 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प..

    सरकारी बँक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शहराची उलाढाल ठप्प..

    दोन दिवसात शेकडो कोटींच्या व्यवहारासाठी शहरवासीयांना बसला फटका

    दोन दिवस धनादेश क्लिअरिंग पडले ठप्प

    केंद्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त..

    शासकीय बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा संप..

  • 30 Mar 2022 07:18 AM (IST)

    मराठवाड्यात वाढतोय उन्हाळा चटका

    मराठवाड्यात वाढतोय उन्हाळा चटका..

    मराठवाड्यातील जिल्ह्यात 40 ते 41 अंशावर गेले तापमान..

    तीन दिवस आणखी उन्हाचा तडाखा वाढणार असल्याची हवामान खात्याची माहिती..

    औरंगाबाद जिल्ह्यात सलग 2 वेळा पारा गेला 40 अंश सेल्सियस च्या पुढे..

    आगामी दिवसांत वाढते तापमान पाहता काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन..

  • 30 Mar 2022 07:18 AM (IST)

    प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना बेड मिळणे झाले कठीण..

    औरंगाबाद

    शासकीय घाटी रुग्णलायत प्रसूती वार्ड हाऊसफुल..

    प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना बेड मिळणे झाले कठीण..

    यापूर्वी महिलांच्या उपचारासाठी जमिनीवर गाद्या टाकण्याची आली होती वेळ..

    उर्वरित उपचारासाठी महिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा शल्यचिकित्सकांनी लावले फेटाळून..

    घाटी रुग्णालयात दिवसाला तब्बल 60 तर जिल्हा रुग्णालयात होतात फक्त पाच प्रसूत्या..

  • 30 Mar 2022 07:17 AM (IST)

    खर्चाला फाटा दिल्याने तब्बल 24 लाख रुपयांची होणार बचत..

    औरंगाबादच्या जिल्हा परिषदेमध्ये आता पुष्पगुच्छे आणि हारतुऱ्यांवर असणार बंदी..

    सभा-समारंभात लागणारे पुष्पगुच्छ, हारतुरे आणि अन्य खर्चाला ही कात्री आली लावण्यात..

    खर्चाला फाटा दिल्याने तब्बल 24 लाख रुपयांची होणार बचत..

    आगाऊ खर्च थांबवून जनतेसाठी तो पैसा वापरण्यात येईल यासाठी घेतला मोठा निर्णय..

    औरंगाबाद जिल्हा परिषदेत 35 कोटी 27 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर प्रशासकांनी दिली मंजुरी..

  • 30 Mar 2022 06:47 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाण्याची कमतरता

    पुणे

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पाण्याची कमतरता

    प्रत्येक विभागाला पाणी जपून वापरण्याचं विद्यापीठाचं आवाहन

    पुणे महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाचा त्यामुळे पाणीटंचाई निर्माण

    पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्याचा निर्णय मात्र सध्या तरी पाणी जपून वापरा विद्यापीठाचं आवाहन

  • 30 Mar 2022 06:44 AM (IST)

    पुणे महापालिकेकडून दरवर्षी 1 हजार ते दीड हजार कोटीची देखभाल दुरुस्तीची कामं केली जातात

    पुणे

    पुणे महापालिकेकडून दरवर्षी 1 हजार ते दीड हजार कोटीची देखभाल दुरुस्तीची कामं केली जातात

    मात्र याची एकत्रित नोंद नाही केलेल्या कामांना शिस्त लागावी यासाठी व्यवस्थापन प्रणालीची होणार नोंद

    1एप्रिलपासून वर्क मँनेजमेंट सिस्टीम होणार लागू

    कामांची करावी लागणार नोंद

  • 30 Mar 2022 06:44 AM (IST)

    पुण्यातील धानोरीत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर नागरिकांचा हल्ला

    पुण्यातील धानोरीत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकावर नागरिकांचा हल्ला

    हल्ल्यात महापालिका अधिकारी आणि जेसीबी चालक झाला जखमी

    विश्नांतवाडी पोलीस ठाण्यात 25 जणांवर मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

    अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी यांना झाली होती मारहाण

    आजपासून 15 क्षेत्रीय कार्यालयांची फौज धानोरी येरवड्यात कारवाई करणार महापालिकेचा आक्रमक पवित्रा

Published On - Mar 30,2022 6:24 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.