Maharashtra News Live Update : राणेंची 9 तास चौकशी, अमित शाह यांना फोन केल्यावर सोडलं-राणे
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शनिवार 5 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणावर तोडगा!; प्रभाग रचनेसह सर्व प्रक्रिया स्वत:कडे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेतल्याने आज दिवसभरात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
राणेंची पोलीसांकडून 9 तास चौकशी
राणेंची चौकशी संपली
मला दोन दिवसांपूर्वी 41A ची नोटीस आली होती, आपलं म्हणणं सागण्यासाठी यावे अशी नोटीस होती. त्यात असे म्हणाले की दिशा सॅलियानच्या आईने तक्रार केली असल्याने तुम्हाला यावं लागेल. मी आणि नितेश काय बोललो, तिची आत्महत्यान नाही हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत होते. त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी त्यांच्या कुटुंबियांना तक्रार करायला भाग पाडलं. आमची बदनामी होतेय. अशी तक्रार केली. खोटी तक्रार केली. आम्हाला अधिकार आहे. मी मंत्री नितेश आमदार आहे. कोणावर अन्याय होत असेल तर आम्हाला अधिकार आहे बोलायचा. तरी माझी नऊ तास चौकशी केली. मी पोलिसांना सर्व सांगितलं. जे घडलं ते सर्व मांडलंं. सुशांतची हत्या झाल्यानंतर मला उद्धव ठाकरेंचा दोनवेळा फोन आला की तुम्ही याबाबत बोलू नये. असे सांगितले. मात्र पोलिसांनी माझं हे वाक्य जबाबातून वगळले. मात्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहणार. आम्ही आवाज उठवणार. दिशा सॅलियची केस क्लोज केली जातीय. ज्या लोकांनी अत्याचार केला त्यांना सरकार सौरक्षण देत आहे. मी शरद पवारांचे स्टेटमेंट ऐकले. वा पवारसाहेब, काय बोलावं की कीव करावी हे कळेना. आमचा कुणी दाऊद दोस्त नाही, तो देशद्रोही आहे. त्याच्याशी मलिकांचे संबंध, म्हणून आम्ही राजनामा मागतोय. तुम्ही आमचे राजीनामे मागता. तुम्ही हेच केलं आयुष्यभर हीच तुमची पुण्याई आहे. आमचा आवाज तुम्ही दाबू शकणार नाही.
-
नारायण राणेंची 8 तासांपासून चौकशी, समर्थकांच्या घोषणाबाजीनंतर पोलिसांची कारवाई
नारायण राणे आणि नितेश राणे यांची 8 तासांपासून चौकशी
दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलिसांकडून चौकशी
8 तासांपासून चौकशी सुर असल्यानं राणे समर्थक आक्रमक
राणे समर्थकांकडून घोषणाबाजी
राणे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं,
-
-
नारायण राणे आणि नितेश राणे अजूनही मालवणी पोलीस स्टेशनमध्येच
गेल्या 7 तास 50 मिनिटांपासून नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे मालवणी पोलीस ठाण्यात हजर आहेत.
राणे पितापुत्र 1 वाजून 40 मिनिटांनी पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
दिशा सालियन प्रकरणी पोलिस दोघांचे जबाब नोंदवत आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने यावे : जगदीश मुळीक
उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, पुणे मेट्रो चे लोकार्पण, ई बसेस चे लोकार्पण व नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन अश्या विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यनिमित्ताने एम आय टी कॉलेज मैदानावर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असून सदर सभा सर्वांसाठी खुली असून पुणेकरांना मा. मोदीजी यांचे विचार ऐकण्याची संधी असून सर्वांना ह्या पुणे मनपा आयोजित कार्यक्रमात येण्यासाठी शहर भाजप च्या वतीने आमंत्रित करत आहोत असेही जगदीश मुळीक यांनी सांगितले.
-
सातारच्या एका निवडणुकीत टेंशन आलं : शरद पवार
सातारच्या एका निवडणुकीत टेंशन आलं
श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे
एकीकडे श्रीनिवास पाटील तर दुसरीकडे उदयनराजे छत्रपती, शिवाजी महाराजांचे वंशज कोणाला तिकीट द्यायच….श्रीनिवास पाटील म्हणाले हरकत नाही, मी थांबतो
उदयराजेंना तिकीट दिल…एकदा निवडून आले, दोनदा निवडून आले…तीनदा निवडुन आले….नंतर निवडुन आल्यावर खासदारकीचा राजीनामा दिला…भाजपमध्ये गेले…मग आम्ही राजांना म्हटलो या आता
राजांच्या अंगात आलं….श्रीनिवास पाटील निवडून आले…विचारांची बांधिलकी महत्वाची
-
-
श्रीनिवास पाटील यांनी डान्समध्ये विद्यापीठ पातळीवर सुवर्णपदक मिळवलं हे अनेकांना माहित नाही: शरद पवार
कॉलेजमध्ये कोणी तरी अतिशय उत्तम कथककल्ली डान्स केला
आम्हाला त्यातलं काही कळत नव्हतं
दुसऱ्या दिवशी मी आणि श्रीनिवास पाटील चाललो होतो
पुढं ज्यांनी डान्स केला त्या होत्या, तेव्हा पाटील म्हणाले ते बघा काल ज्यांनी नाच केल्या त्या….
त्यांनी ऐकलं, त्या चिडल्या….मागे वळाल्या…मी म्हटलो मी नाही हा….
त्यांनी आम्हाला सुनावल, नाचायला ही अक्कल लागते….हे ऐकल्यावर आमच्यातला पाटील जागा झाला
दुसऱ्या दिसशी श्रीनिवास पाटील यांनी रोहिणी भाटे यांच्याकडे डान्स क्लास लावला
पुढे डान्स मध्येही विद्यापीठ पातळीवर सुवर्णपदक मिळवलं, हे फार जणांना माहिती नाही
-
एसपी कॉलेजला माझी आणि श्रीनिवास पाटीलची गाठ पडली ती कायमची : शरद पवार
पवारांनी सांगितला कॉलेज जीवनातला किस्सा
आम्ही कॉमर्स कॉलेजेला शिकायला, देशातल मोठं कॉलेज…तिथं मुली कमी….असल्यातरी त्या कॅम्पातल्या पारशी… त्या इंग्लिश बोलायच्या….मग आम्ही ग्रामीण भागातून आलेलो…काय बोलणार त्यांच्याशी….?
मग एसपी कॉलेज जवळ होत, अशा कामांना एसपी कॉलेज प्रसिध्द होत, तिथंच माझी आणि श्रीनिवास पाटीलची गाठ पडली ती कायमची
-
मला जाणवलं यात स्पार्क आहे, मग मी सुशीलकुमार शिंदे यांना सोडलं नाही : शरद पवार
पुण्यात लॉ कॉलेजला असताना माझी आणि सुशीलकुमार शिंदेंची ओळख झाली
मला कौतुक वाटलं उपेक्षित समाजातला मुलगा लॉ कॉलेज पर्यत आला
मला जाणवलं यात स्पार्क आहे, मग मी त्यांना सोडलं नाही
आत्ता ते म्हणाले मी सोडलं, पण नाही तुम्ही गेलात गांधी नेहरूंच्या विचाराने
आम्हीही त्याच विचाराचे आहोत, गांधी नेहरूंचेच विचार मानतो
विचाराने आपण अजूनही एकच आहोत
मी काँग्रेसच्या विचारांचा असलो तरी आचार्य अत्रे यांच्याविषयी आकर्षण होत
अत्रेंचा जन्म कऱ्हा नदीचा उगम जिथं होतो तिथल्या कोडीत गावातला, ते कऱ्हेच पाणी लिहायचे, त्या कऱ्हा नदीचा शेवट बारामतीत होतो
-
महाराष्ट्र घडविण्याचा शरद पवारांना नाद : सुशीलकुमार शिंदे
शरद पवारांनी महाराष्ट्रातील अनके मुलं निवडून सोबत घेतली, त्यातला मी एक आहे…अर्थात मी यांच्यासोबत राहिलो नाही…ही खंत मला आहे…त्यांनाही असेल…त्यांनीही थांबवल नाही….जा म्हणायलाही मोठेपणा लागतो
महाराष्ट्र घडविण्याचा शरद पवारांना नाद आहे
मी आयुष्यभर काटे सोबत घेऊन चालणारा माणूस, पण आपल्याकडचे काटे इतरांना टोचू नये याची शिकवण पवारांनी दिली
-
गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात पुन्हा एकदा उडी
गोपीचंद पडळकर यांची ST आंदोलनात पुन्हा एकदा उडी
मंगळवारी सकाळी आझाद मैदानात एस टी कर्मचारी आणि पडळकर यांची महत्वपूर्ण बैठक
एस टी आंदोलन पुन्हा एकदा चिघळणार
अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर ठाकरे सरकारच्या विरोधात पडळकर – खोत यांचा पुन्हा एकदा एल्गार
एस टी अहवाल येण्यापुर्वीच टिव्ही ९ ने दिली होती बातमी
टिव्ही ९ च्या बातमीवर शिक्कामोर्तब
राज्यभरातील एस टी कर्मचारी पुन्हा एकदा आझाद मैदानावर एकवटणार
-
आमदार रवी राणा यांना अटकपूर्व जामीन मंजूर
अमरावती मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या वरील शाई फेक प्रकरण……
आमदार रवी यांना यांना अटकपूर्व जामीन मंजूर;रवी राणांना मोठा दिलासा…
अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाचा जमिनावर अंतिम निर्णय…
शाई फेक प्रकणात आमदार रवी राणा यांच्या वर होता 307 चा गंभीर गुन्हा दाखल…
काल तब्बल अडीच तास झाला जामिनावर युक्तिवाद…
9 फेब्रुवारीला झाला होता शाई फेक हल्ला…
जामीन मंजूर झाल्याची रवी राणा यांच्या वकिलांची माहिती….
-
दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्यातील गाड्यांमुळे बारामतीत वाहतुकीचा खोळंबा
– बारामतीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रस्त्यावरील ताफ्यातील गाड्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा…
– बारामतीत नो पार्कींग मध्ये गाडी लावल्यास पोलिसांकडून दंड केला जातो.. आता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताप्यातील गाड्या एक तास उभ्या राहिल्याने भिगवण चौक ते अहिल्यादेवी चौक दरम्यान काहीवेळ वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्याला नागरिकांना होत आहे, यामुळे आता वाहतूक पोलीस भरणे यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे…
-
वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक सुरु
शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली वसंत शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक सुरु…
शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे बैठकीला सुरुवात…
शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित….
-
बालेवाडी स्टेडियमजवळील बंद खोलीला आग
बालेवाडी स्टेडियम येथील स्टाफ क्वार्टर्स नजीक गवत पेटल्याने शेजारीच टाकाऊ वस्तु ठेवलेल्या एका बंद खोलीत आग, अग्निशमन दल दाखल
-
राज्यपाल संविधानाप्रमाणेच काम करतात : देवेंद्र फडणवीस
जाणीवपूर्वक असंविधानिक कृती करायची आणि राज्यपालांविरोधात बोलायचं असं सुरु आहे. राज्यपाल एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संविधानाप्रमाणं काम करतात. त्यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ज्या प्रकारे सरकार कायदे करत आहे, दुरुस्त्या करत त्या असंविधानिक आहेत, त्यावर राज्यपालांनी बोट ठेवल्यास त्यांना टार्गेट केलं जातं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख डॉ विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ५) डॉ माहेश्वरी यांची नियुक्ती जाहीर केली.
-
नारायण राणे, नितेश राणे मालवणी पोलीस स्टेशनमध्ये, दिशा सालियन प्रकरणी जबाब नोंदवण्याच काम सुरु
गेल्या 40 मिनिटांपासून नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे मालवणी पोलीस ठाण्यात हजर आहेत.
राणे पितापुत्र 1 वाजून 40 मिनिटांनी पोलीस ठाण्यात पोहोचले.
दिशा सालियन प्रकरणी पोलिस दोघांचे जबाब नोंदवत आहेत.
-
नारायण राणे आणि नितेश राणे यांनी मालवणी पोलीस ठाणे पोहोचले
दिशा सालियन प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे आणि नितेश राणे मालवणी पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.
-
भांडुपच्या ड्रीम्स मॉल मध्ये लागलेल्या आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे अग्नीशमन दलाचे प्रयत्न
मुंबईतील भांडुपच्या ड्रीम्स मॉल मध्ये लागलेल्या आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे अग्नीशमन दलाचे प्रयत्न अजूनही सुरूच…
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या… . काल संध्याकाळी साढे आठच्या सुमारास लागली होती आग… आग विझवल्यानंतर कुलिंग आमपरेशन सुरू…
ड्रीम्स मॉल मध्ये गेल्या वर्षी 25 मार्चला लागली होती आग… यामध्ये तिसर्या माळ्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटल मधील ९ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता..
आता पुन्हा त्याच मॉल मध्ये आग लागल्याने माॅलचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर… माॅलची वीच कापल्याने ही आग शाॅर्टसर्किटने लागली नसून यामागे घातपाताचा कट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे,
-
पुणे हे जसं शिक्षणाचं माहेरघर आहे तसं ते शिक्षणाचं हब आहे – शरद पवार
पुणे हे जसं शिक्षणाचं माहेरघर आहे तसं ते शिक्षणाचं हब आहे
त्याची किंमत नागरिकांना द्यावी लागतीये, बाहेरच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागतीये
केंद्रीय परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणं झालं
विद्यार्थ्याची तक्रार अशी आहे की युक्रेनच्या सीमेबाहेर या
मात्र बाहेर येण्यासाठी 6 तास चालत जावं लागतील आणि मग रशियाची सीमा येतीये
थंडी आहे आणि वरून गोळीबार सुरू आहे
-
केंद्रीय परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणं झालं – शरद पवार
पुणे हे जसं शिक्षणाचं माहेरघर आहे तसं ते शिक्षणाचं हब आहे
त्याची किंमत नागरिकांना द्यावी लागतीये, बाहेरच्या विद्यार्थ्यांना द्यावी लागतीये
केंद्रीय परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणं झालं
विद्यार्थ्याची तक्रार अशी आहे की युक्रेनच्या सीमेबाहेर या
मात्र बाहेर येण्यासाठी 6 तास चालत जावं लागतील आणि मग रशियाची सीमा येतीये
थंडी आहे आणि वरून गोळीबार सुरू आहे
-
राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही – गिरीश महाजन
– पक्षांतर्गत व्यवस्था आहे – औरंगाबाद,उत्तरप्रदेश, गोवा या तिन्ही ठिकाणी काम करत होतो – आता नाशिकची जवाबदारी माझ्याकडे – जयकुमार रावल देखील माझ्यासोबत – महापालिकेच्या वतीने नाशिकमध्ये चांगलं काम पुन्हा नाशिकमध्ये पूर्ण बहुमत
– राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही – ज्या वेळेस आमची सत्ता होती,तेव्हा संजय राऊत कुठे होते – संजय राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते – मागच्या काही दिवसांपासून संजय राऊत यांना ओळखायला लागले – राष्ट्रवादी प्रवक्ते म्हणून बोलायला लागले,तेव्हा त्यांची ओळख झाली – शिवसेना आम्हाला सोडून गेली यांच्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता – त्यानंतर त्यांना ओळखायला लागले – फोन टॅप झाले यांच्यात कोणतेही पुरावे नाही – देशभरातील सगळ्या विरोधकांचे ते आता नाव घेतील – राऊत भंपक विधान करत आहेत – पुरावा तर द्या ना काही – राऊत यांच्या जिभेला हाड उरले नाही
– राज्य शासन, पोलीस यंत्रणा काम करते आहे – या चौकशीत काही पुरावे समोर आले तर त्या गोष्टीला अर्थ आहे
– राज्यपालांची नेमणूक काही शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या हातात नाही – आमच्या मना सारख करा नाहितर हटवा अशी त्यांची भूमिका – शासनाच्या, पोलीस खात्याच्या बदल्या या सगळ्या बाबतीत त्यांचे असेच चालले आहे – राज्यपाल यांचं पद संवैधानिक – कोणी कितीही म्हटलं तरी आम्ही फारसा लक्ष देत नाही
– नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मागणी – दाऊद चे हस्तक यांच्याकडून नगण्य किमतीत प्रॉपर्टी घेतली आहे – हसीना पारकर याना पैसे दिले आहेत – तरीही राज्यसरकार त्यांना देशभक्त म्हणत असेल तर काय बोलणार – मग संजय राठोड चा राजीनामा का घेतला – हे गेंड्याच्या कातडीचे सरकार – यांना जनाची मनाची काहीच राहीले नाही – कुठे बाळासाहेबांची शिवसेना आणि आज नवाब मलिक जिंदाबाद च्या घोषणा देणारी शिवसेना – यापेक्षा शिवसेनेचे दुर्दैव काही नाही – मलिक हटाव च्या बॅनर वर विधान सभा अध्यक्षांची देखील सही
– एकनाथ खडसेंच्या म्हणण्याला काही फार महत्व नाही – खडसेंना काम नाही – घरी बसून असे विधान करत आहेत – मी पैसे घेतल्याचा एकनाथ खडसे यांनी पुरावा द्यावा – तेव्हा तुम्हीही पक्षात होते – तुम्ही घेतले का, की तुमच्या मध्यस्तीने घेतले ते सांगा
– ओबीसी आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणूक घेऊ नये – राज्य सरकार नाकर्ते आहे – अहवाल पाठवला त्यावर सही, तारीख पण नाही – मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी सही पण केली नाही
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टिका
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टिका
प्रकल्प पुर्ण नसतानाही उद्घाटन केलं जातंय
पंतप्रधान येतायेत त्यांच स्वागत कारण देवा
मी मेट्रो प्रकल्पाची पाहणी केली मात्र काम पुर्ण नव्हते
नदीसुधार प्रकल्याची मला काळजी वाटते,
नदीच पात्र अरूंद होऊन रस्ते आणि फिरायचं ठिकाण होणार आहे
-
मी पानशेत फुटलं तेव्हा मी आमचा दूकानंदार आहे का बघायला गेलो होतो – शरद पवार
हे सगळे विद्यार्थी संकटात आले दोन दोन दिवस जमिनीखाली बसले , जेवण नाही काही बाहेर आले मात्र आपली मुलं तिथे आहेण
देशाचे पंतप्रधान उद्या इथं येतायेत इथं असतील तर कारण नाही
मेट्रोचं उद्घाटन आहे..
मला मेट्रो दाखवली..
माझ्या लक्षात आलं की सगळं काही काम झालं नाही
सगळं काम झालं नाही तरी उद्घाटन होतंय
नदीसुधार योजना आहे.. मला त्याची काळजी वाटते पात्र मर्यादित ठेऊन , रस्ता, फिरण्याची व्यवस्था आहे
मी काही इंजिनिअर नाही मला माहिती आहे वर धरणं आहे
उद्या ढगफुटी झाली तर पाणी कुठं जाईलष मात्र तज्ञांनी विचार केलाय तर हरकत नाही
मात्र संकट आलं तर त्याची झळ सर्वसामान्यांना बसेल
मी पानशेत फुटलं तेव्हा मी आमचा दूकानंदार आहे का बघायला गेलो होतो,
पंतप्रधान इथं येतायेत त्याचा
प्रकल्प पुर्ण झाला
देशाचे पंतप्रधान इथं येतायेत त्याचं स्वागत आहे
मात्र ढगफुटी झालं तर आपल्यालाच बघायचं आहे..
जाणकारांना घेऊन आपण त्याची माहिती घेऊ कमतरता असेल तर राज्य सरकारला घेऊ
-
कोल्हापूर महावितरण कार्यालयाबाहेर स्वाभिमानीचा आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सरकारचा घातल जातय बाराव
कोल्हापूर महावितरण कार्यालयाबाहेर स्वाभिमानीचा आंदोलन
कार्यकर्त्यांनी मुंडण करत केला सरकारचा निषेध
गेल्या 11 दिवसापासून राजू शेट्टी महावितरण बाहेर करतात धरणे आंदोलन
सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आज स्वाभिमानीने घातलं सरकारचे बाराव
राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी
-
नारायण राणे आणि नीतेश राणे मालवणी पोलिस ठाण्यात दुपारी येणार
दिशा सालियन प्रकरणी मालवणी पोलीस आज केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांचा जबाब नोंदवणार आहेत.
दुपारी एक वाजेपर्यंत नारायण राणे आणि नीतेश राणे मालवणी पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी येणार असल्याचे वृत्त आहे.
मात्र त्यापूर्वी मालवणी पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
नेव्हीला लागणारं सामान आपण युक्रेनकडून घेतं होतो – शरद पवार
त्यांना मी धन्यवाद देतो आणी उद्घाटन झालं असं जाहीर करतोय
आपण एका संकटातून जातोय मधे कोरोना आला
एक एक महिना दार बंद करून घरात बसावं लागलं
काम थांबलं, एवढं मोठं संकट देशावर आलं
महाराष्ट्रात आपलं भाग्य आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,अजित पवारा यांनी दिवसाचा रात्र करून सुविधा कशी देता येईल यासाठी प्रयत्न केला
मी तेव्हा ठिकठिकाणी फिरलो मला तेव्हा सांगायचे घरात बसा मात्र महाराष्ट्र संकटात असताना घरात बसणं मला जमलं नाही
मंत्रीमंडळातले मंत्री चांगले काम करत होते, जालन्यातील शेतकरी कुटुंबातील राजेश टोपेंनी चांगलं काम केल काही जिल्ह्यात गेलो तेव्हा लोक त्याला डॉक्टर म्हणायला लागले
कोणता पक्ष , गट न मानता माणूस म्हणून काम केलं
त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र कोरोनामुक होतंय
जगात संकट आलंय युक्रेन आणि रशिया
मी संरक्षणमंत्री म्हणून दोनवेळा गेलो
नेव्हीला लागणारं सामान आपण युक्रेनकडून घेतं होतो
-
कोल्हापुरातील रेल्वे गुडस इथं पुन्हा एकदा मालगाडीचा डबा रुळावरुन घसरला
कोल्हापुरातील रेल्वे गुडस इथं पुन्हा एकदा मालगाडीचा डबा रुळावरुन घसरला
सुदैवाने कोणतीही हानी नाही
रेल्वे अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी
प्लॅटफॉर्म नंबर 1 वरची घटना
रेल्वे रूळ परिसरात घुशीने पोखरल्यामुळे मालगाडीचा डबा रुळावरुन घसरल्याची प्राथमिक माहिती.
-
निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये हिच राज्य सरकारची भुमिका, त्यासाठी कायदे केले जातील – विजय वडेट्टीवार
– कायदा जुनाच आहे, पण पूर्वी वॅार्ड संरचनेचे अधिकार निवडणूक आयोगाकडे होते, आता वॅार्ड संरचनेचा अधिकार, तारखा जाहिर करण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असेल
– ज्या पद्धतीनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगढने कायदे केले, आणि त्या कायद्याला केंद्र सरकारने संरक्षण दिलं. तसाच कायदा करु
– पाच जणांचा डेडीकेटेड आयोग नेमुन ओबीसींच्या मागासलेपणणाचा डाटा लवकरात लवकर तयार करेल
– निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये हिच राज्य सरकारची भुमिका, त्यासाठी कायदे केले जातील
– मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ ने केलेला कायदा टिकत असेल, तर आमचाही कायदा टिकेल
– सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे स्वतंत्र आयोग नेमण्याचा निर्णय काल झाला, माजी सनदी अधिकारी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमणार
– त्या आयोगाच्या माध्यमातून लवकरात लवकर रिपोर्ट दिला की सर्वोच्च न्यायालयात मांडू
– ओबीसींचा मागासलेपणा तपासून रिपोर्ट सादर करणार
-
नाशिकचे प्रभारी पद मिळाल्यानंतर गिरीश महाजन आज पहिल्यांदा नाशिकमध्ये
नाशिकचे प्रभारी पद मिळाल्यानंतर गिरीश महाजन आज पहिल्यांदा नाशिकमध्ये
महाजन यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिका-यांची मोठी फौज सज्ज
पाथर्डी फाट्यावर ढोल ताशांच्या गजरात होणार महाजन यांचे स्वागत
-
संजय राऊत यांच्या आरोपाला भाजप गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांच प्रत्युत्तर
निवडणुका म्हटल की राजकारण,आरोप प्रत्यारोप होणारच
ज्याच्याकडे खोटं नाही त्यांना घाबरण्याची गरज काय
आम्ही कोणावर डाव धरायचा,हल्ला करायचा असा विचार सुध्दा करत नाही
संजय राऊत यांच्या आरोपाला भाजप गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांच प्रत्युत्तर
भाजप कडून फोन टॅपिंग केल गेलं नाही
गोव्यात भाजप 22 प्लस होऊन सत्ता स्थापन करेल
आजगावकर यांनी व्यक्त केला विश्वास
सत्ता स्थापनेसाठी ढवळीकरांची गरजच लागणार नाही नाही
-
महाराष्ट्रात माझा आणि खडसेंचा फोन टॅप केला जात होता – संजय राऊत
— महाराष्ट्रात माझा आणि खडसेंचा फोन टॅप केला जात होता. रश्मी शुक्ला यांनीहे केलं आणि त्यांनी कुणाला दिल हे सगळ्यांना माहीत आहे. आता कुलाबा मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
— निवडणुकीनंतरही काय चाललंय हे माहीत व्हावं यासाठी माझा फोन टॅप केला जात होता
— गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जातोय हे मीच त्यांना सांगितलं
— फोन टॅपिंग चा हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. आणि महाराष्ट्र पॅटर्न चे चे प्रमुख आता गोव्यात निवडणुकीचे प्रमुख होते
— गोव्यात भाजप येणार नाही हे मी सुरवातीपासून सांगतोय
— देश धर्म रक्षणासाठी आणखी काही करता येईल.पण आता लोकशाहीच देशातली धोक्यात आली आहेव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आलं आहे.
–विधानसभेच काम होऊ दिलं नाही, हे विरोधी पक्षनेत्यांनी केलं
— राज्यपाल हटवले पाहिजेत) हे महाराष्ट्राचे म्हणणं आहे घटनात्मक पदांवर असं राजकीय व्यक्ती बसवली की असं होतं.
— राज्यपालांनी तात्काळ तारीख दिली पाहिजे
-
नवाब मलिकांवर केलेल्या आरोपांवर शरद पवार मौन सोडणार का ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची आज पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेत शरद पवार भाजपच्या आरोपांना काय उत्तर देणार?
नवाब मलिकांवर केलेल्या आरोपांवर शरद पवार मौन सोडणार का ?
पंतप्रधान मोदी उद्या पुण्यात
शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष
-
गोव्यातही फोन टॅप केले जात आहेत – संजय राऊत
गोव्यातही फोन टॅप केले जात असल्याचा महाराष्ट्र पॅटर्न
सुदिन ढवळीकर, विजय देसाई, दिगंबर कामत, गिरीष चोंडकर
केंद्रीय तपास यंत्रणा गोव्यात सुध्दा दाखल होण्याची शक्यता
गोव्यात भाजपा येणार नाही.
माझे फोन आत्ताही टॅप होत आहेत,
देशातला रोजगार हद्दपार झाला आहे
मुंबईत अतिरेकी नाहीत
दोन अधिवेशनाचं काम झालं नाही, त्याला विरोधी पक्ष जबाबदार आहे
या देशातलं लोकशाही धोक्यात आली आहे
राज्यपाल भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखे काम करीत आहेत.
गोव्यातली अनेक नेत्यांचे फोन टॅप व्हायला सुरूवात झाली आहे.
-
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
अमरावती शहरातील गुलिस्तानगरात प्रहार जनशक्ती कार्यालयाचे उद्घाटन..
कार्यक्रमाला गर्दी जमल्याने पोलीसांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत दाखल केले गुन्हे.
अमरावती शहरातील नागपूरी गेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.
-
एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी शासनाकडून १० मार्चपर्यंत मुदत
एसटी कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी शासनाकडून १० मार्चपर्यंत मुदत…
राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये पूर्णपणे विलीनीकरण करण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी कायदेशीर आणि व्यावहारिकदृष्टया सुसंग नसल्याने मान्य करू नये अशी शिफारस त्रिसदस्यीय सचिव समितीने सरकारला केली आहे.
समितीचा हा अहवाल स्वीकारत सरकारने एसटी कर्मचाऱ्यांची मागणी सरकारने फेटाळून लावली.
महामंडळाची तोटय़ातील आर्थिक स्थिती लक्षात घेता, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळण्यासाठी सरकारने पुढील चार वर्षे महामंडळास आवश्यक तेवढा निधी सरकारकडून दिला जाणार आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांना १० मार्चपर्यंत कामावर रुजू होण्याची अखेरची संधी सरकारने दिली आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचारी समजण्यात यावे या कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी हा अहवाल मांडताना मंत्रिमंडळाने हा अहवाल मान्य केल्याचे सांगितले.
मात्र कर्मचारी विलीनीकरणावर अडून राहिले आहेत…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार उद्घाटन
महापालिकेत पंतप्रधानांची एसपीजी आणि पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात
150 पोलीस कर्मचाऱ्यांचा असणार महापालिकेत बंदोबस्त
पास असेल तरचं महापालिकेत सोडलं जाणार
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी विरोध करणार
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्याच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी विरोध करणार,
– मूक आंदोलन करत मोदींना करणार विरोध,
– सकाळी १० ते १२ दोन तास आंदोलन करणार,
– आंदोलनाला पुणे पोलिसांची परवानगी,
– याआधी मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा राष्ट्रवादीने दिला होता इशारा
-
औरंगाबादचे भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड
औरंगाबादचे भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड
उच्च न्यायालयाच्या आदेशाने संजय केनेकर यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी पुनर्निवड
आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर संजय केनेकर यांचा काढला होता पदभार
पदाभार काढल्यानंतर संजय केनेकर यांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव
अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशाने संजय केनेकर यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी फेरनिवड
म्हाडाच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी झाली फेरनिवड
-
ऑनलाइन खाद्यपदार्थ पोहचवणारे झोमटो डिलिव्हरी बॉयनी पुकारला संप..
ऑनलाइन खाद्यपदार्थ पोहचवणारे झोमटो डिलिव्हरी बॉयनी पुकारला संप..
पुढील 3 दिवस नागरिकांना ऑनलाइन जेवण मिळण्यास येऊ शकतात अडथळे..
कमिशन वाढवणे,वेटिंग टाइमचे पैसे,आणि अंतरानुसार पैसे मिळावे अशी डिलिव्हरी बॉयस ची मागणी..
4 ते 6 फेब्रुवारी या दिवसांसाठी औरंगाबाद शहरातील सर्व डिलिव्हरी बॉय संपावर जाणार असल्याची दिली माहिती..
डिलिव्हरी बॉयस नी पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होत कंपनीला बसणार फटका..
-
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या विहीरी कागदावरचं
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कागदोपत्री अडकल्या विहरी..
अधिकारी 2018 पासून मंजुरी प्रक्रिया टाळण्यावर भर देत असल्याचा नागरिकांचा आरोप..
कन्नड तालुक्यातील स्थिती पाहता मागील 5 वर्षांपासून एकाही विहरिस मंजुरी मिळाली नसल्याने गरजूंमध्ये नाराजी..
996 फाईली पंचायत समिती कडे असून 264 प्रस्तावांची तपासणी होत स्थळ पाहणीचे दिले होते आदेश..
दाखल करण्यात आलेल्या पोहोच लाभार्थ्यांकडे अजूनही पंचायत समितीत फाईल सापडत नसल्याचे विदारक चित्र असल्याचं लाभार्थ्यांकडून येत आहे सांगण्यात..
पुन्हा एकदा तालुक्यातील विहिरीच्या अनुदानाचा विषय संकटाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता..
-
घाटी रुग्णालयातील शिक्षकांचे असहकार आंदोलन सुरू
मागील दीड महिन्यापासून सुरू असलेल्या वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन आता चिघळले..
विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे डॉक्टरांनी प्रशासकीय कामावर टाकली बंदी..
रुग्णालयातील 250 शिक्षकांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन..
आगामी 10 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास करणार रुग्णसेवा बंद..
-
कोल्हापूर करवीर तालुक्यातील चिंचवाड गावाचा पाणीपुरवठा बंद
करवीर तालुक्यातील चिंचवाड गावाचा पाणीपुरवठा बंद
पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याचा परिणाम
गावचा पाणीपुरवठा पुढचे सहा दिवस राहणार बंद
ग्रामस्थांना करावी लागणार वणवण
प्रदूषणामुळे पंचगंगा नदीत गेल्या काही दिवसापासून पडतोय मृत माशांचा खच
मृत माश्यांमुळे परिसरात दुर्गंधी
-
दहावीची परिक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
– दहावीची परिक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू
– कामठी-नागपूर मार्गावर मोहंमद अली पेट्रोलपंपासमोर घटना
– दहावीची तोंडी परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला एका वाहनाने जोरदार धडक दिली
– अपघातात दुचाकीवरील विद्यार्थी जागीच ठार, तर इतर दोन जखमी
दिशांत महादेव पटेल हे मृताचे तर मयंक कुमार सिंग आणि आरव चौधरी अशी गंभीर जखमींची नावे
अपघात झालेले सर्व विद्यार्थी जीपीएस आर्मी पब्लिक स्कूलचे आहेत.
-
नागपूरातील भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी मारहाण केल्याचं व्हीडीओ फुटेज समोर
– नागपूरातील भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी मारहाण केल्याचं व्हीडीओ फुटेज समोर
– काँग्रेस कार्यकर्ता बाबू खान यांना मारहाण करत असल्याचा व्हीडीओ
– उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीचे अनिल नगरारे आणि सुरेश पाटील यांनी दिले पुरावे
– काँग्रेसकडून पोलिसांना सादर करणार पुरावे
– पोलिस आरोपीला वाचवत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप
– विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड प्रकरणानंतर आरोप प्रत्यारोप
– विक्की कुकरेजा यांच्याकडूनंही पोलीसांत तक्रार दाखल
– काँग्रेस कार्यकर्त्यांचीही पोलीसांत तक्रार
-
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोसाठी 98 टक्के भूसंपादनाचं काम पुर्ण झालंय
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोसाठी 98 टक्के भूसंपादनाचं काम पुर्ण झालंय
डीसेंबर अखेर मेट्रोचं काम पुर्ण करण्याच महामेट्रोचं उद्दीष्ट आहे,
वनाझ ते गरवारे महाविद्यालय इथला मार्ग उद्यापासून सुरू होणार आहे
आता गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय इथपर्यंतचा मार्ग एप्रिल अखेर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात मार्ग सुरू होईल असं महामेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात येतंय..
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर
आज आणि उद्या पालिकेतील सर्व विभाग राहणार पुर्णतः बंद
उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची केली आरटीपीसीआर चाचणी,
एसपीजीनं सगळ्या सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा
पासशिवाय कोणीही महापालिकेत नसणार एसपीजीच्या सूचना,
सगळी महापालिका केली सँनिटाईझ,
महापालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्या नरेंद्र मोदी करणार उद्घाटन,
-
युक्रेनमध्ये अडकलेले पुण्यातील १६ विद्यार्थ्यांचे पुण्यात पोहोचले
युद्धग्रस्त युक्रेन मधून पुण्यातील १६ विद्यार्थ्यांचे पुणे विमानतळावर रात्री सुखरूप आगमन.
शनिवारी मध्यरात्री १.३० वाजता पुणे विमानतळावर आगमन
भाजप पुणे शहर पदाधिकारी आणि गिरीश खत्री मित्र परिवाराच्या वतीने पुष्पहार घालून आणि पेढे भरवून स्वागत
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार
काही पालकांनी आपल्या मुलांसाठी केक आणला होता तो कापून विद्यार्थ्यांनी सुटकेचा दिलासा व्यक्त केला
Published On - Mar 05,2022 6:23 AM