Maharashtra News Live Update : देश हा एक दोघांनी बनत नाही, देश हा सर्व धर्मांनी बनतो-अकबरुद्दीन ओवैसी
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई : आज गुरूवार 12 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. अंधेरी पूर्व विधानसभाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्याचबरोबर बदलापूर शहरातील दुकानं आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्याचे आदेश आस्थापना विभागानं दुकानदारांना दिले आहेत. याबाबतची नोटीस दुकानदारांना देण्यात अली असून येत्या आठ दिवसात दुकानदारांनी पाट्या मराठीत न केल्यास प्रशासनाकडून कारवाई करणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
अकबरुद्दीन ओवैसी यांच्या सभेत पुन्हा एकदा गदारोळ
मंचावर उतरताना चाहत्यांच्या गर्दीमुळे ओवैसी घसरले
तर गर्दी करणाऱ्या चाहत्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात झाला गोंधळ
-
नागपूरच्या काही भागात रिमझिम पावसाला झाली सुरवात
दुपार नंतर ढगाळ वातावरण आणि वारे वाहायला झाली होती सुरवात
आता अवकाळी पावसाला सुरवात झाली
आधीच गर्मी ने परेशान असलेल्या नागपूरकरांना तापमानापासून काहीसा दिलासा मिळणार
मात्र पावसाच्या नंतर उकाळा वाढण्याची शक्यता
नागपूर हवामान विभागाने वर्तविला होता पावसाचा अंदाज
-
-
उत्तर प्रदेश राज्यात मदरशांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक
योगी सरकारचा मोठा निर्णय
मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणावे लागणार
उत्तर प्रदेश राज्यातील सगळ्या मदरशांमध्ये अंमलबजावणी करण्याचा योगी सरकारचा आदेश
दुवा पठण सोबतच राष्ट्रगीत म्हणावे लागणार
-
– सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस
– अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर तुफान पाऊस
– उकाड्याने हैराण झालेले नागरिक पाऊसामुळे सुखावले
– तर काही भागातील बागायतदार शेतकरी धास्तावले
– सोलापूर जिल्ह्यात विविध तालुक्यात पावसाची हजेरी
-
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेतून Live
इम्तियाज जलील यांना घाबरण्याची गरज नाही
जेव्हा शहिद होता तेव्हा डायरेक्ट जन्नतमध्ये जातो
-
-
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेतून Live
या ठिकाणी हिंदूही आहेत, मुस्लिमही आहे, इथे अनेक धर्माचे लोक आहेत
काही वर्षांपूर्वीची माझी भाषण ऐकली तर तुम्हाला कळेल किती मुस्लिम शिकले
महाराष्ट्रात किती अधिकारी मुस्लिम आहे हे मी सांगितलं आहे
परिस्थिती अत्यंत खराब आहे
-
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेतून Live
आज मी मुस्लिमांबाबत बोललो तर लोक बोलतील फक्त मुस्लिमांबाबत बोलत आहे
मात्र मी मुस्लिमांबाबत बोलत राहणार
मुस्लिमांना ताकद देऊन पुढे आणू
देश हा एक दोन लोकांनी बनत नाही
देश बनतो तो अनेक धर्मांनी
-
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेतून Live
अकबरुद्दीन ओवैसी आपल्या लोकांना कधी विसरत नाही
माझ्यासाठी कोणी एक खडा उचलला तर त्याचे उपकार मी विसरत नाही
आज सर्वात जास्त मागास हा मुस्लिक समाजच आहे
-
पुण्यातील डेक्कन नदीपात्रात लोखंडी कडा धडकेनं कोसळला टेम्पोवर
सुदैवाने टेम्पोचालक बचावला
टेम्पो आणि एका दुचाकीचं नुकसान
लोखंडी कड्याची उंची कमी असल्यानं टेम्पोनं दिली धडक
सुदैवाने जिवीतहानी टळली !
डेक्कन नदीपात्रातील ओंकारेश्वर इथली घटना !
-
आरोपीला तीन वेळा जन्मठेपेची शिक्षा
यवतमाळ- सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला तीन वेळा जन्मठेपेची शिक्षा
दि.१५ मार्च रोजी आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावात घडली होती घटना
दारव्हा जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली तीन वेळा जन्मठेप
जन्मठेप बरोबर पंधरा हजार रूपये दंड
दंडाची रक्कम पिडीत मुलीला देणार
कलम ३७६(AB) (जन्मठेप, पाच हजार रूपये दंड)
बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत (जन्मठेप, पाच हजार रूपये दंड)
अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा (जन्मठेप, पाच हजार रूपये दंड
४२ दिवसात निकाल यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच वेळ
दारव्हा जिल्हा व अप्पर न्यायालयाचे न्यायाधीश एच.एल.मनवर यांनी सुनावली जन्मठेप
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांकडून जप्त
चाळीसगांव शहरातून अवैद्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले यासंदर्भात ट्रॅक्टर चालका विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली असून ट्रॅक्टरसह एकूण 4 लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. -
कोल्हापूर महापालिकेने दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई करत
राजारामपुरीतील अतिक्रमणे जीसीबीच्या सहाय्याने हटवलीयावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. -
अनिल बाबर यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा
महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला टिकवायचा असेल तर आमचेही ऐकून घेतलं पाहिजे, म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये खदखद राहणार नाही
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा
आम्ही काही मंत्रीपद मागायला आलो नाही , ना सत्ता मागायला आलोय,,,फक्त महाविकास आघाडी मध्ये आम्हाला त्रास होत असल्याचं सांगत आमदार अनिल बाबर यांनी ही भावना व्यक्त केली
-
अकबरुद्दीन ओविसींच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांमध्ये राडा
कार्यकर्त्यांना भेटू न दिल्या कारणाने अकबरुद्दीन ओबीसींच्या आराम कक्षाबाहेर धिंगाणा..
पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच वेळ गोंधळ..
प्रवेश न दिल्यामुळे शेकडो कार्यकर्ते आक्रमक..
औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम गृह याठिकाणी अकबरुद्दीन ओवेसी आल्यानंतर घडला प्रकार..
-
पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक संपन्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना 10 जुले रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या महापुजेसाठी आमंत्रित करणार … रुक्मिणी मातेच्या चरणावर लवकरच वज्रलेप केला जाणार तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा देखील महत्व पूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली …
-
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी 16 तारखेला पुणे दौऱ्यावर
पुणे दौऱ्यात अमित शहा आणि वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावणार हजेरी
चंद्रकांत पाटील आणि शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन सोहळा
बालगंधर्व रंगमंदिरात होणार प्रकाशन सोहळा !
-
आमदार हिरामन खोसकर यांनी सातत्याने या कामासाठी पाठपुरावा केला – नितीन राऊत
– आमदार हिरामन खोसकर यांनी सातत्याने या कामासाठी पाठपुरावा केला – अनेकदा विजेच्या लाईन इथं पर्यंत येतात – पण fluctuation असल्याने आपल्याला वाटत लोड शेडिंग आहे की काय – लॉक डाऊन मध्ये देखील तुम्हाला 24 तास वीज उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केला – महापूर,अतिवृष्टीच्या वेळेस देखील आम्ही तुम्हाला वीज दिली – आज कोळश्याच संकट एकट्या आपल्या देशावर नाही,तर संपूर्ण जगावर संकट – चीन सारख्या देशाने लोकांना मेणबत्या दिल्या – आपलं एकमव राज्य, ज्यात लोडशेडिंग नाही – एका मोठ्या उद्योजकाने आम्हाला 1400 मेगा वॅट वीज दिली नाही – वीज घ्यायला कोळसा लागत – प्रत्येक वेळेस आम्ही पैसे भरले, पैसे उधार ठेवलेले नाही – आम्ही कोळसा घेतो आणि पैसे देतो – शेतकऱ्यांनी देखील वीज बिल वेळेवर भराव – तुम्ही बिल भरल,मला कर्ज घ्यावं लागणार नाही – तुम्हाला देखील वेळेवर वीज बिल भरल्यास इंसेंटिव्हीब मिळते – चहा साठी आपण दूध आणतो, त्याला पैसे भरतो ना आपण – तुम्ही मोबाईल बिल भरता, तर विजेचे पैसे भरले पाहिजे – तुम्हाला चांगली सेवा द्यायला आम्ही तयार, – पण वीज कापण्याची संधी देऊ नका
-
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी देणार औरंगजेब कबरीला भेट
एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी देणार औरंगजेब कबरीला भेट
खुलताबाद शहरातील औरंगजेब कबरीचं घेणार दर्शन
औरंगजेब कबरीचं दर्शन घेण्यामुळे ओवेसी बंधूनवर होतेय सतत टीका
-
जळगावात गोलाणी मार्केट च्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून मुकेश राजापूर या तरुणाची हत्या
जळगावात गोलाणी मार्केट च्या तिसऱ्या मजल्यावरून ढकलून मुकेश राजापूर या तरुणाची हत्या
मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलत केली हत्या
हत्या करून मित्रांनी स्वतः पोलिस स्टेशनला जात मुकेश वरून पडल्याचे पोलिसांना भासवले
पोलिसांना याप्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी करतात झाला प्रकार उघड
-
उरणच्या समुद्रकिनारी स्फोट सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ
उरणच्या समुद्रकिनारी स्फोट सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ
नवीमुंबईच्या बॉम्ब शोधक पथकाला पाचारण
१० ते १२ स्फोटक कांड्या सापडल्याने भितीचे वातावरण
मोरा पोलीस, एसीपी कार्यालय कर्मचारी घटनास्थळी दाखल
माणकेश्वर समुद्रकिनारी ग्रामस्थांना जाण्यास बंदी
-
नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक चौकात भीषण अपघात
नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील अशोक चौकात भीषण अपघात
ट्रक आणि सायकल चा अपघात , अपघाताला सायकल चालक ठार
अशोक चौक येथून 45 ते 50 वय वर्षचा इसम हा सायकल नी जात असताना ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने सायकल चालकाचा मृत्यू
12 वाजता च्या दरम्यान ची घटना …पोलीस घटनास्थळी दाखल
ट्रक ड्रायव्हर घटनास्थळ वरून फरार
काही वेळा साठी वाहतूक विस्कळीत झाली
-
कोव्हीडच्या काळात मी बाहेर डोकं टेकवून दर्शन घेतलं
कोल्हापूर करवीर छत्रपतींचे कुलचार.हे त्या लोकांनी समजून. घेतले नसतील
जे घडलं ते चुकीचे आहे
इंग्रज, निजामाची राजवट होती तेव्हा का कायदा आणला नाही
पहिला नैवेद्य पहिला अभिषेक हे छत्रपतींकडून दिलं जातं
हा फोटो जो आहे तो 40 वर्षापूर्वीचा आहे
आमचे वडील.आहेत धाकटे बंधूराज आहेत
कोव्हीडच्या काळात मी बाहेर डोकं टेकवून दर्शन घेतलं
हा व्यवस्थापक आहे त्याला आतून चालतं का
आज जे काही तुळजापूर बंद पुकारलाय याची दखल सरकारने घ्यावी
माफी मागूनही लोक बोलतायेत
-
सहावर्षाचा कार्यकाळ मी पाहिला, त्यांना कसं संघटीत व्हायचं – संभाजी राजे
सहावर्षाचा कार्यकाळ मी पाहिला, त्यांना कसं संघटीत व्हायचं
आता माझी लाईन स्पष्ट आहे…अपक्ष
राजकारण विरहीत काम लोकांनी पाहिलं आहे
अजून चिन्ह आणि कलर कुठला धरवला नाही
दौऱ्यात लोकं सांगतील कोणता कलर घ्यायचा
मी राजकारण शिकायला लागलो आहे.
दहा आमदारांनी अनुमोदन द्यायला पाहिजे
चुकलं की आपण बोलायचं…
राज्यसभा मला आवडत
लोकशाहीत सगळं चालतं
-
एकच समाजाजं हितं पाहलं
महाविकास आघाडीकडे 27 मतं आहेत आणि भाजपकडे 22 मतं आहेत त्यामुळे तुम्ही विचाराल की कोणत्या पक्षात जाल
यावर्षीची राज्यसभेची निवडणूक मी लढवणार आहे
यावर्षी मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे..
माझी कार्यपद्धती जर बघितली तर राजकारण विरहीत घेतली
एकच समाजाजं हितं पाहलं
एका छताखाली लोकांना कसं आणता येईल
सगळ्यांना संघटीत करण्यासाठी
गोरगरीबांच्या कल्याणासाठी
एक संघटना स्थापित करत आहोत
त्या संघटनेचं नाव आहे स्वराज्य
या संघटना याचा प्रसार होण्यासाठी या महिन्यात महाराष्ट्राचा दौरा करणार आहे
त्यावेळी अनेक लोकांची इच्छा होती…
या पाच सहा दिवसात, काय ताकद आहे सोशल मीडियाची…
संभाजी राजे तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा
पहिला टप्पा…स्वराज्य ही संघटीत करूया
आपण ज्या पध्दतीने प्रेम दिलं, ताकद दिली..उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्याला वावगं ठरू नये
-
राज्यसभेची निवडणुक नक्की लढवणार
पण हे सगळं होत असताना हे कशामुळे घडलं
सत्तेचा चांगला उपयोग करून घेतला
राजगड जतन सुरु आहे
सांगली आणि कोल्हापूर महापूराच्यावेळी…मी चौदा त्यांच्या तुकड्या घेऊन कोल्हापूरात दाखल झालो
कार्यकाळ संपला आहे. पुढे काय करायचं
दोन निर्णय
राज्यसभेच्या संदर्भात – येत्या जुलैमध्ये ६ जागा रिक्त होणार आहेत
राज्यसभेची निवडणुक नक्की लढवणार
अपक्ष मी निवडणुक लढवणार आहे माझा अधिकार बनतो, बिनविरोध तिथं जाण्याचा, फक्त शिवशाहूंचा वंशज नाही, तर फक्त माझ्या कार्य पाहा. छत्रपती घराण्यातील व्यक्ती जर राजकारणविरहीत काम करु शकते, तर त्या व्यक्तीला आपण सपोर्ट का करु नये, त्याबाबत विचार करावा. इतर पक्षांनीही पाहावं, आरक्षण आंदोलनाचा फायदा कुणाला होतोय, गडकोट विकासाचा फायदा कुणाला होतोय, त्यामुळे माझ्या कार्याची दखल घेऊन मला राज्यसभेत पाठवावं, आणि आपण पाठवाल अशी माझी अपेक्षा आहे. परत मी स्पष्टपणे सांगतो, मी कुठल्या पक्षात जाणार नाही, अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय.
-
राष्ट्रपतींना रायगडला बोलावलं हा इतिहास आहे
आभरा व्यक्त करताना नरेंद्र मोदींना मी शाहू महाराजांच पुस्तक दिलं आणि मी अभिप्राय दिला
आय स्टँण्ड प्रिन्सिपल ऑफ शाहू महाराज हा मी वाचायला सांगितला होता
राजकारणविरहीत समाजाला वेळ द्यायचा तिथं मी चाललो
मी पुढाकार घेतला होता
देशातून नाही परदेशातून लोक कशी येतील
राजदूत कसे येतील
२५ देशाचे राजदूत आले होते नतनस्तक व्हायला
वेगवेगळ्या गडकोट किल्ल्यांसाठी मी दौरे केले
राष्ट्रपतींना रायगडला बोलावलं हा इतिहास आहे
पाच मेला किंबहुना आझाद मैदानला जाण्याचं धाडसं कोणी केलं नाही
मग सगळा समाज हा तिथून निघून गेला
-
इतकी वर्षे महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या घरण्यावर प्रेम केलं – संभाजी राजे
इतकी वर्षे महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या घरण्यावर प्रेम केलं
दोन दशकात गोंदिया जिल्हा सोडला तर सगळीकडे भिरलो
शिवाजी महाराजांचे विचार पोहचवण्यासाठी दौरे केले
पंधरा वीस वर्षात शेतकऱ्यांचे प्रश्व असतील
आमच्या घराण्यावर लोक एव्हढी का प्रयत्न करतात
की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं
पथमत: राष्ट्रपती महोदयांचं…देवेंद्र फडणवीसांचं आभार मानतो
नरेंद्र मोदी यांना एक पुस्तक दिलं होतं.
-
अमरावतीत दोन दिवसांत दोन पोलिसांच्या आत्महत्या…
अमरावतीत दोन दिवसांत दोन पोलिसांच्या आत्महत्या…
काल वलगाव मधील तर आज दर्यापूर मधील पोलिसाची घरावरून उडी मारून आत्महत्या….
खल्लार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बाळकृष्ण राठोड वय 52 यांची हेडकॉटर च्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या…
काल वलगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय अडोकार यांची आत्महत्या….
पोलिसांच्या आत्महत्याने पोलिसांत खळबळ…
-
देशात अर्थीक संकट आहेत जो निर्णय घेतला
– शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची कविता वाचून दाखवली कष्टकरी वेदना वाचून दाखवल्या
देशात अर्थीक संकट आहेत जो निर्णय घेतला
श्रीलंकाना सारखं भारतात येऊ शकणार नाही
आपल्या देशात संविधान आल्यामुळे अस काही होणार नाही – पुरंदर विमानात झालं पाहिजे 2 जागा आहेत – लोहगाव विमानतळ आहे त्याच विस्तारि करणं त्यासाठी पुरंदर विमानतळ करावं लागलं – भंडारा गोंदिया बाबत काय झालं याबाबत स्थानिक पातळीवर विचारणा केली जाईल – देशद्रोहच कलम रद्द करावा यासाठी मी आधी बोलो होतो – अयोध्या दौरा हा राज्य विरोधत नसून तो व्यक्ती विरोधात आहेत
-
शरद पवारांच्या मंदिराच्या वक्तव्यावर साधभाऊ खोतांची परभणीत टीका
शरद पवारांच्या मंदिराच्या वक्तव्यावर साधभाऊ खोतांची परभणीत टीका ,
मंदिरे तुम्ही नाही तर श्रमिकांना बांधली असल्याचं केल वक्तव्य ,
एकीकडे तुम्ही देव मानत नाही म्हणता , दिसरीकडे मात्र तुमचा नातू भगवी शाल पांगरून अयोध्येला जातो ,
जयंत पाटलांना ही महागाई वरून दिलं प्रतिउत्तर देत गॅस दारवाढीचा परत केला समर्थन , एकीकडे डिजल-पेट्रोलवर लुटायच आणि गॅस महागला म्हणायचं , केंद्राने दर कमी केले मात्र राज्य कमी करत नसल्याचं सांगितलं .
संभाजी महाराजांना मंदिरात प्रवेश नाकारल्या प्रकरणी बोलताना , हे चूक असून मंदिर सर्वांसाठी आहे सर्वांना प्रवेश मिळायला हवं अस सांगितलं .
-
जागृत नागरिक, लेखक यांनी पुढाकार घेतला पाहिजे – शरद पवार
वास्तव विषयावर लिहियला पाहिजे
आ. ह. साळुंखेंनी आत्तापर्यंत चांगलं काम केलं आहे
जागृत नागरिक, लेखक यांनी पुढाकार घेतला पाहिजे
-
राज्यात एक कमिटी असते, ते ठरवतात, कुणाला संरक्षण दिलं पाहिजे – अजित पवार
राज ठाकरेना आलेल्या धमकी पत्राबद्दल बाळा नांदगावकरांनी वळसे पाटलांची भेट घेतली. आता या पत्राची सगळी चौकशी होईल. त्यातून काय ते समोर येईल. राज्यात एक कमिटी असते, ते ठरवतात, कुणाला संरक्षण दिलं पाहिजे, कुणाला गरज आहे, त्याप्रमाणे दिलीप वळसे पाटील ठरवतील.
-
कुणी कुठं कार्यालय काढावं हा ज्याचा त्याचा प्रश्न
येत्या दहा बारा दिवसात आमच्या पुढं द्या किंवा जाहीर करा.. तर त्याबद्दल काही निवडणूक आयोगाचं मत आहे, ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, तो सगळ्यांना मान्य असेल. राजद्रोहाचं कलमाचा वापर करु नये, असं सांगण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून.. शेवटी आपल्या संविधानाच कायद्यात, जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचं पालन आपण करत असतो. केंद्राला मिळाल्यानंतर तशा
कुणी कुठं कार्यालय काढावं हा ज्याचा त्याचा प्रश्न.. आपल्या नवी मुंबईतही वेगवेगळ्या राज्यांची सदनं आहे. आपल्या महाराष्ट्रात उभ्या भारतातून लोकं येतात.. काही वेगळ्या कल्पना मनात ठेवून त्यांनी हे केलं असावं.. आम्हाला वाटलं तर आम्हीही यूपीत जाऊन कार्यालय काढू.. त्यात घाबरुन जाण्याचं कारण नाही. कुणाला कुठेही कार्यालय काढता येतं, घर घेता येतं, त्यातून वेगळा प्रचार प्रसार करण्याचं कारण नाही…
मधल्या काळात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या खंजीर खुपसण्यावर.. नानाचं स्टेटमेन्ट हास्यपद.. ते स्वतः आता भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेत.. हेडलाईन करण्यासाठी खंजीर वगैरे चांगलं वाटत असेल.. महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष काम करत आहेत. राज्य स्तरावर निर्णय राज्यातले लोकं निर्णय घेतात. जिल्ह्याच्या पातळीवर वेगवेगळ्या गोष्टी घडतात. तिथल्या गोष्टी नीट राहण्यासाठी नेत्यांमध्ये समन्वय असण्याची गरज..
काँग्रेसनेही काही काही ठिकाणी भाजपसोबत संधान बांधलं, मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही.. जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं, आपल्या वक्तव्यांचा वेडावाकडा अर्थ निघेल असं काही बोलू नये…
प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार.. पण तिघांना एकत्र राहूनच बहुमत मिळेल..
-
राजद्रोहाचं कलमाबाबत केंद्राला सूचना केल्यात, केंद्राने सूचना दिली, तर त्याप्रमाणे आम्ही करु – अजित पवार
राजद्रोहाचं कलमाबाबत केंद्राला सूचना केल्यात, केंद्राने सूचना दिली, तर त्याप्रमाणे आम्ही करु
—
कुणी कुठं कार्यालय काढावं,ज्याचा त्याचा अधिकार असतो, दिल्लीत महाराष्ट्र सदन आहे, महाराष्ट्रात खूप लोकं येतात, नॉर्थ, साऊथ, बिहारचे असते, मनात काही कल्पना ठेऊन यूपी सरकारने हा निर्णय घेतला असेल, आम्हाला वाटलं तर आम्हीही यूपीत महाराष्ट्राचं कार्यालय काढू शकतो, कुणालाही कुठंही कार्यालय काढता येतं, प्रॉपर्टी घेता येते, घरंही घेता येतं.
—-
खंजीर खुपसला, नानांचं स्टेटमेंट हास्यास्पद आहे, नानाच कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे सगळ्यांना माहित आहे, नानांनीच भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणायचं का? आघाडीचं सरकार आहे, त्यात सर्वांनी एकत्र काम करायचं असतं, राज्य पातळीवर राज्याचे नेते निर्णय घेतात, आघाडीत जे पक्ष आहेत, त्यांच्या समन्वय असला तर हा प्रश्न तयार होत नाही. स्थानिक पातळीवर काँग्रेसनेही भाजपशी संधान बांधलंय, पण मी त्याला महत्त्व देऊ इच्छित नाही, काँग्रेसला काँग्रेस वाढवण्याचा अधिकार, राष्ट्रवादीला राष्ट्रवादी वाढवण्याचा अधिकार, शिवसेनेला शिवसेना वाढवण्याचा अधिकार, पण हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर संगनमतांनी निर्णय घेतले तरच राज्याच्या हिताचे निर्णय घेता येतात. पवार साहेबांनी सांगितलंय की, राज्यात एकत्र असलो तरी स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत.
-
उष्णतेच्या लाटेमुळे माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही उष्णाघाता वाढता धोका, 300 पेक्षा जास्त श्वानांना उष्माघात
– उष्णतेच्या लाटेमुळे माणसांप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही उष्णाघाता वाढता धोका
– तापमान वाढल्याने पाळीव प्राण्यांना वाढता उष्माघाताचा धोका
– उकाडा वाढल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढले
– नागपूरात गेल्या महिनाभरात ३०० पेक्षा जास्त श्वानांना उष्माघात
– रोज १० पेक्षा जास्त पाळीव श्वानांवर व्हेटरनरी रुग्णालयात उपचार
– महिनाभरात ३०० पेक्षा जास्त श्वानांवर व्हेटरनरी रुग्णालयात उपचार
– उपचाराअभावी काही श्वानांचा मृत्यूही!
-
शिवसेना आमदार रमेश लटके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मुंबई, दि. 12 :- “मुंबईतील अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. शिवसेना कार्यकर्त्यापासून मुंबई महापालिकेत नगरसेवक, विधानसभेत आमदारपर्यंतचा त्यांचा प्रवास ध्येयनिष्ठ, पक्षनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ लोकसेवकाचा प्रेरणादायी जीवनप्रवास आहे. संमिश्र लोकवस्तीच्या अंधेरी-पूर्व मतदारसंघातून सलग मिळवलेला विजय त्यांची लोकप्रियता, जनतेशी जूळलेली घट्ट नाळ दाखवणारा आहे. आमदार रमेश लटके यांचं निधन ही त्यांच्या मतदारसंघाची, महाविकास आघाडीची हानी आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
-
संभाजीराजेंना प्रवेश का नाकारला? मंदिरातील पुजारी आणि तुळजापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
संभाजीराजेंना प्रवेश का नाकारला? मंदिरातील पुजारी आणि तुळजापूरकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
SLUG : Tuljapur Band
Feed send By AVI
– छत्रपती संभाजीराजेंना तुळजाभवानी मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश नाकारल्याचे प्रकरण
– छत्रपती घराण्याचा अवमान केल्याबद्दल आम्ही तुळजापूर बंद ठेवून निषेध करतोय
– आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मूक मोर्चा काढणार आहोत
– जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि मंदिर प्रशासनातील अधिकारी मुजोरी करतायत
– मंदिर प्रशासनाकडून 36 नियमांचा फार्स दाखवत गाभाऱ्यात प्रवेश नाकारला
– जर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही तर याविरोधात आम्ही
Chaupal : शिवप्रेमी आणि तुळजापूरकर ग्रामस्थ
-
छत्रपती संभाजीराजे आज राजकीय भूमिका करणार जाहीर, पत्रकार परिषदेची तयारी पुर्ण
छत्रपती संभाजीराजे आज राजकीय भूमिका करणार जाहीर
हॉटेल रँमी ग्रँड या ठिकाणी होणार पत्रकार परिषद
पत्रकार परिषदेची तयारी पुर्ण !
-
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिक मधील 15 डॉ गुन्हा दाखल
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेट प्रकरणी रुबी क्लिनिक मधील 15 डॉ गुन्हा दाखल
किडनी रॅकेट प्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला होता त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे
रुबी क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह पंधराजण वर गुन्हा दाखल
कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली
-
किरीट सोमय्या लाईव्ह
भाजप नेते किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
किरीट सोमय्यांनी घेतली राणा दाम्पत्याची भेट
कोर्टाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारचे गाल सुजलेत – सोमय्या
सोमय्यांचे पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र
-
संजय राऊत लाईव्ह
संजय राऊतांचा पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा
अर्थ व्यवस्था कोसळली – राऊत
श्रीलंकेसारखी अवस्था भारतात होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे
राज्यात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही – राऊत
महाराष्ट्रात सुरक्षीत वातावरण – राऊत
-
कोकण गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी आज हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
कोकण गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी आज हवामान विभागाचा पावसाचा अंदाज
पुण्यात कालपासून ढगाळ वातावरण
आजही दिवसभर ढगाळ वातावरण राहणार
असानी चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर पाहायला मिळतोय
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहिल
पुणे हवामान वेधशाळेचा अंदाज !
-
साईनाथ बाबर अध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच शहर कार्यकारीणी मेळावा
ब्रेक
मनसेचा रविवारी शहर कार्यकारिणी मेळावा
मेळाव्यात पक्ष संघटनात्मक बांधणीवर होणार चर्चा
मनसे नेते अनिल शिदोरे करणार मनसैनिकांना मार्गदर्शन
साईनाथ बाबर अध्यक्ष झाल्यानंतर पहिलाच शहर कार्यकारीणी मेळावा
मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना केलं जाणार मार्गदर्शन
-
खासदार संभाजीराजेंचे अवमान प्रकरण
– खासदार संभाजीराजेंचे अवमान प्रकरण
– सकल मराठा मोर्चा आणि मंदिर पुजाऱ्यांना 149 ची नोटीस दिली
– पोलिस प्रशासनाकडून आंदोलनस्थळी असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस
-
सहकारी गृहनिर्माण सोसायटी नोंदणीबाबत राज्याच्या सहकार विभागाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी
सहकारी गृहनिर्माण सोसायटी नोंदणीबाबत राज्याच्या सहकार विभागाने मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय
सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेअन्ससाठीची आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार
त्यानंतर पुढील चार महिन्यांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी कन्व्हेअन्स करून न दिल्यास सोसायटीने केवळ अर्ज व सोसायटीचा ठराव दिल्यावर ‘डीम्ड कन्व्हेअन्स’ची प्रक्रिया पूर्ण करून जमीन सोसायटीच्या नावावर केली जाणार
सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचा कन्व्हेअन्सचा त्रास कायमचा दूर होण्याची शक्यता
सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी उपनिबंधकांना दिले याबाबतचे आदेश
-
बंगालच्या उपसागरातील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टी भागात
रत्नागिरी- बंगालच्या उपसागरातील वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टी भागात
सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ हवामान
तळ कोकणापासून रत्नागिरी जिल्हा पर्यंत अनेक ठिकाणी पावसाची रिमझिम
तर संगमेश्वर खाड़ीपट्टा भागात धुके
विचित्र वातावरण अनुभव आहेत रत्नागिरीकर
-
पहिल्यांदा उत्तर भारतीयांच्या स्वाभिमानासाठी आंदोलन होत आहे
पहिल्यांदा उत्तर भारतीयांच्या स्वाभिमानासाठी आंदोलन होत आहे
देशात आज पहिल्यांदा आंदोलन आहे
महाराष्ट्रातील लोकांशी माझे संबंध आहे
महाराष्ट्रात चांगले कुस्तीचे आराखडे आहेत
राजनैतिक यात्रा आहे
राज ठाकरेंनी लोकांना त्रास दिला आहे
बृजसिंग यांचं राज ठाकरे विरोधात आंदोलन
सगळ्यात जास्त संख्या गुजरातची आहे
राज ठाकरे आयोध्येला नक्की येणार
संतांशी माफी मागावी
-
पुण्यात पीओपी मुर्ती उत्पादनावर महापालिकेची बंदी
पुण्यात पीओपी मुर्ती उत्पादनावर महापालिकेची बंदी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सूचना प्राप्त
पीओपी मुर्ती बनवल्यास होणार कारवाई
पुण्यात गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर मुर्त्यांना मागणी असते,
मात्र प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आलाय…
गणेशोत्सव काळात याची अंमलबजावणी होण्याची शक्यता …
-
तुळजापूर बंदला पुजारी व्यापारी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजापूर बंदला पुजारी व्यापारी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान प्रकरण तुळजापूर शहर 100 टक्के बंद
जिल्हाधिकारी, मंदीर तहसीलदार व व्यवस्थापक यांच्या कारवाईच्या मागणीसाठी तुळजापूर शहर बंद
छत्रपती संभाजीराजे यांना तुळजापूर मंदिर संस्थानकडून गाभाऱ्यात दर्शन देण्यासाठी अडवल्याने गावकरी संतप्त
तुळजाभवानी गाभाऱ्यात जिल्हाधकारी यांनी प्रवेश बंदी केली आहे त्यामुळे महाराज यांना अडविले
महाराज यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांना फोन करून सुद्ध गाभाऱ्यात सोडले नाही
छत्रपती घराण्यातील कोणतेही सदस्य जेव्हा तुळजाई नगरीतील भवानी मातेच्या दर्शनास येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत मातेचे दर्शन घेतात
शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याने संभाजी महाराज नाराज व संतप्त
तुळजाभवानी मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली तरी देखील नागरिक जिल्हाधिकरी यांच्यावर कारवाईच्या मागणीवर ठाम
-
नव्याने शेती नावावर झालेले शेतकरी कृषी सन्मान योजनेपासून वंचित,
बुलडाणा
नव्याने शेती नावावर झालेले शेतकरी कृषी सन्मान योजनेपासून वंचित,
2019 नंतर खाते फोड झाल्यानंतरचया शेतकऱ्यांना लाभ नाही,
शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यास तहसीलदार संघटनेचा आहे नकार,
मग 2019 नंतर चे शेतकरी नाहीत का असा प्रश्न निर्माण होतो,
-
बुद्धापौर्णीमाला ज्ञानगंगा मध्ये होणाऱ्या निसर्ग पर्यटनासाठी बुकिंग फुल,
बुलडाणा
बुद्धापौर्णीमाला ज्ञानगंगा मध्ये होणाऱ्या निसर्ग पर्यटनासाठी बुकिंग फुल,
येत्या 16मे ल होणार प्रनिगणना,
कोरोनामुळे वन पर्यटन बंद होते, मात्र आता वन्यजीव विभाग सक्रिय ,
ज्ञानगंगा अभयारण्यात उभारली 43 मचान ,
-
जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ,
बुलडाणा
जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायत सदस्यांना दिलासा,
जात प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ,
राज्य शासनाने दिली 8 महिन्यांची मुदतवाढ,
मुदत संपल्यानंतर ही या सदस्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते,
त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते,
-
मागील वर्षीच्या नगरसेवक निधीतील कामांना मनपा आयुक्तांकडून ब्रेक
– मागील वर्षीच्या नगरसेवक निधीतील कामांना मनपा आयुक्तांकडून ब्रेक
– रखडलेल्या कामांसाठी महापालिकेत नगरसेवकांच्या वाऱ्या
– नगरसेवक प्रभाग विकास निधीतील सुमारे 20 कोटींची थांबवली कामे
– महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता अनेक कामांना पूर्ण विराम
-
पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील कपिल बिअर बार मध्ये गोळीबार…
– पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील कपिल बिअर बार मध्ये गोळीबार…
– नारायणगावातील सात जणांनी दहशत निर्माण करण्यासाठी बेकायदा जमाव जमवत केला गोळीबार
– मन्या पाटे आणि गणपत गाडेकर यांच्यासह पाच जणांनी गोळीबार करुन पाच जणांवर केला चाकु हल्ला..पाच जण जखमी..
– गोळीबार आणि चाकु हल्ला करुन आरोपी फरार नारायणगाव पोलीसांकडुन आरोपींचा शोध सुरु
– नारायणगाव पोलीसांत गुन्हा दाखल..
-
नागपूरसह विदर्भात कंडोमचा वापर वाढला, राष्ट्रीय सर्व्हेतून समोर आली बाब
– नागपूरसह विदर्भात कंडोमचा वापर वाढला, राष्ट्रीय सर्व्हेतून समोर आली बाब
– राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सेवेच्या सर्वेक्षणाच्या पाचव्या अहवालात स्पष्ट झाली बाब
– अवांछिक गर्भधारणेबाबात लोकांमध्ये वाढली जागरुकता
– विदर्भात तीन टक्क्यांनी वाढला कंडोमचा वापर
– नविन सर्वेक्षणानुसार मोठ्या शहरासोबतच लहान शहरं आणि खेड्यातंही वाढला कंडोमचा वापर
– सुरक्षित संभोगासाठी लोकांचा कंडोम वापराकडे कल वाढला
-
नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च एक हजार कोटींने वाढला
– नागपूर मेट्रो प्रकल्पाचा खर्च एक हजार कोटींने वाढला
– नागपूर मेट्रो प्रकल्प पुर्ण होण्यास अडीच वर्षे उशीर
– मेट्रोच्या गुंतवणूकीत १२ टक्क्यांनी वाढ होऊन खर्च ९७२० कोटींवर गेलाय
– मेट्रो प्रकल्प डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं
– सध्या ५० टक्के मार्गावरंच धावते नागपूर रेल्वे
-
कोरोना प्रादुर्भावानंतर जिल्हा प्रशासनाकडून वारीची तयारी सुरू
कोरोना प्रादुर्भावानंतर जिल्हा प्रशासनाकडून वारीची तयारी सुरू
काल विभागीय आयुक्तांनी सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांची घेतली बैठक
पालखी मार्गावरील उर्वरित रस्त्याचं काम पुर्ण करण्याच्या सूचना
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेत आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना दिल्यात
यंदा लाखोंच्या संख्येने वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतील..
20 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज तर 21 तारखेला संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल…
-
शिवनेचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
मुंबईतील अंधेरी पूर्व विधान सभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते तीथेच त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहीती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसलांय. आमदार रमेश लटके यांचे पार्थिव मुंबईत आणन्याची तयारी सुरू असून लवकरच त्यांचे पार्थिव मुंबईत आणलं जाईल.
-
ऑनलाईन साहित्य खरेदीनंतर सामान पोहोचवण्याच्या बहाण्याने लष्करातील अधिकाऱ्याला 12 लाखाचा गंडा
ऑनलाईन साहित्य खरेदीनंतर सामान पोहोचवण्याच्या बहाण्याने लष्करातील अधिकाऱ्याला 12 लाखाचा गंडा
सायबर चोरट्यांनी मारला डल्ला
ऑनलाईन खरेदीनंतल कॉल सेंटर इथून बोलतोय पत्ता आणि बँकेचा पासवर्ड सांगा असा बहाणा करत गंडा घातला
सायबर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं लक्षात येताचं अधिकाऱ्यानं लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली
-
राज्यातील 29 हजार विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासकडे पाठ
राज्यातील 29 हजार विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासकडे पाठ
आतापर्यंत राज्यातील 90 हजार विद्यार्थ्यांपैकी 61हजार विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश घेतला आहे
आरटीईच्या नियमित फेऱ्या संपल्या आहेत
दोन वेळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मुदत वाढवून देण्यात आली होती
राज्यात 906 आरटीई प्रवेश देणाऱ्या शाळा आहेत
त्यांची क्षमता ही 1 लाख 1 हजार 906 इतकी आहे…
-
नागपूर, भंडारा, हिॅगणघाट वर्ध्यातील रेतीचोरीबाबत भाजप एनजीटी कडे तक्रार
– ‘नागपूर, भंडारा, हिॅगणघाट वर्ध्यात मोठ्या प्रमाणात रेतीचोरी’
– रेती चोरीत राजकीय हस्तक्षेप असल्याचा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
– ‘लिलाव न होता रेतीचोरी, रेतीचोरीसाठी राज्य सरकारचे अलिखित आदेश’
– नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलचा भंग करुन रेती उपसा सुरु आहे
– नागपूर, भंडारा, हिॅगणघाट वर्ध्यातील रेतीचोरीबाबत भाजप एनजीटी कडे तक्रार
– ‘२००० हजार टन रेतीचा सर्रास होतेय अवैध उपसा’
– ’राजकीय दबावामुळे तीन्ही जिल्ह्यातील एसपी, कलेक्टर शांत’
– भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप
-
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला – नितेश राणे
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. काही महिन्यांपूर्वी आंगणेवाडी जत्रेसाठी कोकणात जाणाऱ्या फ्लाइटमध्ये त्यांची भेट झाल्याचे मला आठवते. डाएटिंगमुळे इतकं वजन कमी झाल्याबद्दल मी त्याचं कौतुक केलं.. तो पक्षाच्या पलीकडचा मित्र होता.
-
खासदार छत्रपती संभाजीराजे आज पुण्यात जाहीर करणार भूमिका
खासदार छत्रपती संभाजीराजे आज पुण्यात जाहीर करणार भूमिका
12 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन
राज्यभरातून कार्यकर्ते येण्याची शक्यता
संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढावा अशी मागणी कार्यकर्ते करतायेय…
-
1 जूनपासून महामंडळाची पुणे नगर मार्गावर ई बस धावणार
1 जूनपासून महामंडळाची पुणे नगर मार्गावर ई बस धावणार
शिवाई ई बस नावाने 1 तारखेपासून प्रारंभ होणार
ईव्ही ट्रान्स कंपनीच्या 150 बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार
1 जून एसटीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून शुभारंभ करण्याचा प्रयत्न
आर्थिक तोट्यात महामंडळ आहे त्यामुळे ई बसचा प्रयोग राबवला जातोय
पुणे नगर मार्गानंतर इतर ठिकाणी बसेस सुरू केल्या जातील…
Published On - May 12,2022 6:30 AM





