Maharashtra News Live Update : केतकी चितळेवर शाईफेक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या केतकी विरोधात घोषणाबाजी
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
मुंबई : आज शनिवार 14 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा भाजपच्या दोन गटातील वाद विकोपाला गेला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षसह तिघांवर अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या दोन गटात सभागृहातच वाद निर्माण झाला. यानंतर दोन्ही गट एकमेकांसोबत भिडल्याने सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी महिला सदस्याच्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप ताले यांच्यासह तिघांविरुद्ध विनयभंगासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
केतकी चितळेला कळंबोली विभागाकडून ताब्यात; तपास करुन कारवाई करणार
गुन्हे शाखाचे डीसीपी लक्ष्मीकांत पाटील यांनी केतकी चितळेला घेतले ताब्यात तपास करुन आवश्यक ते पुरावे केतकी चितळे यांना कळंबोली विभागाकडून ताब्यात आता पुढील तपास करुन कारवाई होणार उद्या ठाणे कोर्टात हजर करणार
-
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ; पिंपरी चिंचवडमध्येही अजामीनपात्र गुन्हा दाखल
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
-पिंपरी चिंचवडमध्ये ही अजामीनपात्र गुन्हा दाखल
-केतकी चितळे सह नितीन भावेचा ह्या गुन्ह्यात समावेश
-केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकली होती
-बदनामीकारक आणि मानहानीकारक ही पोस्ट असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता आल्हाट यांनी केली
-त्यानुसार पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्रसह विविध कलमान्वये गुन्हा
-
-
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या वर राष्ट्रवादीच्या गुंडांकडून भ्याड हल्ला; चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते प्रा. विनायक आंबेकर यांच्या वर राष्ट्रवादीच्या गुंडांकडून भ्याड हल्ला
भाजपाच्यावतीने मी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतोः चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादीच्या या गुंडांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी.
हा हल्ला मविआ सरकारच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असल्याचे दर्शवतो.
आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोक्यातील ही हवा उतरवून जनताच त्यांना योग्य धडा शिकवेल.
-
केतकी चितळे विरोधात कुडाळ पोलीस स्थानकात राष्ट्रवादीची तक्रार
केतकी चितळे विरोधात कुडाळ पोलीस स्थानकात राष्ट्रवादीची तक्रार.
शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल सिंधुदुर्ग राष्ट्रवादी आक्रमक.
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू असल्याने तिच्यावर गुन्हा नोंद करण्याची कार्यकर्त्यांची मागणी.
-
केतकी चितळेला कळवा रुग्णालयामध्ये दाखल, थोड्याच वेळात युनिट एकमध्ये आणणार
केतकी चितळे कळवा रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल
थोड्याच वेळात गुन्हे शाखा युनिट 1 ठिकाणी आणणार आहे..
-
-
आदित्य ठाकरेंचा आयोध्या दौरा 10 जून ऐवजी 15 जून रोजी होणार
आदित्य ठाकरेंचा दौरा 10 जूनला होता.
राज्यसभेच्या निवडणुकांमुळे 10 जून ऐवजी 15 जून रोजी अयोध्या दौरा
-
केतकी चितळेचा गुन्हे शाखा युनिट एककडून घेण्यात आला ताबा
केतकी चितळेचा गुन्हे शाखा युनिट एककडून घेण्यात आला ताबा
गुन्हे शाखा युनिट 1 बाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला
-
नागपूर जिल्ह्यातील रामटेक वाईटोला ओपन खदानमध्ये 25 फूट खोल पाण्यात पडलेला मुलगा सापडला
नागपूर जिल्ह्यातील रामटेक वाईटोला ओपन खदानमध्ये 25 फूट खोल पाण्यात पडलेला मुलगा सापडला
अग्निशमन दल व आणीबाणी विभाग मनपा नागपूरच्या जवानांनी मृतदेहाचा घेतला शोध
प्रेम घनश्याम धामने असे मृतकाच नाव
रामटेक तालुक्यातील मनसरचा राहणार युवक काल पाण्यात बुडाला होता.
स्थानिक भोई लोक आणि प्रशासनाला यश न आल्याने मनपा अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली
-
नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान पोहचले 45 पार
नागपूर सह विदर्भातील काही जिल्ह्यात तापमान पोहचले 45 पार
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक 46. 5
तर नागपुरात 45.4 , चंद्रपूर 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट
नागरिकांना सावध राहण्याचा इशारा
-
केतकी चितळेवर शाईफेक, गोंधळाची परिस्थिती
नवी मुंबईत केतकी चितळेवर शाईफेक,
काही क्षण गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनीच केतकीला उठवून गाडीत बसवलं
-
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचा मुलगा प्रभाकर यांचा डॉ. शिवानी राजू पाटील सावर्डेकर यांच्याशी विवाह
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचा मुलगा प्रभाकर याचा डॉ शिवानी राजू पाटील सावर्डेकर याच्याशी शुभविवाह तासगाव येथे गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिकी शाळा मैदान येथे संपन्न होत आहे या लग्न सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या सह अनेक केंद्रीयमंत्री उपस्थित
राज्यातील मंत्री आमदार, खासदार उपस्थित
थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस हे ही उपस्थित राहणार आहेत
-
माळी महासंघ राज्यात करणार जनसंपर्क यात्रा; 15 मेपासून नागपूरातून दौऱ्याला प्रारंभ
माळी महासंघ राज्यात करणार जनसंपर्क यात्रा
15 मे ला नागपुरातून सुरू होणार दौरा
माळी समाजाला जागृत करण्यासाठी केला जात आहे दौरा
ओबीसीमधील सगळ्यात मोठा समाज असतानाही दुर्लक्षित
ओबीसीचे आरक्षण गेल्याने समाज नाराज
शिक्षण , सामाजिक , उद्योग , नोकरी त समाजाला चांगलं स्थान मिळाव
समाज एकत्रित येण्यासाठी राज्यभरात संपर्क अभियान केलं जाणार आहे
माळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली पत्रकार परिषद घेऊन माहिती
-
शरद पवारांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा
शरद पवारांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी
सदर पोस्ट ज्यांनी ज्यांनी व्हायरल केली आहे त्यांवर देखील कार्यवाही करण्यात यावी
माजी आमदार पंकज भुजबळ यांची मागणी
पंकज भुजबळ आणि नाशिक शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी घेतली नाशिक पोलीस आयुक्तांची भेट
अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाईची मागणी
केवळ शरद पवारच नव्हे तर कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांवर अशा प्रकारचे आक्षेपार्ह पोस्ट कोणी करू नये अशीदेखील मागणी
– हे सगळं वेळीच थांबलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल
-
केतकी चितळेने शरद पवारांची माफी मागावी; नवनीत राणांची मागणी; आम्ही या गोष्टीचा निषेध करतो
केतकी चितळेने शरद पवारांची माफी मागावी
नवनीत राणांची मागणी
आम्ही या गोष्टीचा निषेध करतो
खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया
शरद पवारांनी 50 वर्षा पेक्षा जास्त राजकिय संघर्ष या महाराष्ट्र साठी केला आहे.
पवार साहेब वडीलधारी आहेत
केतकीने त्यांची माफी मागितली पाहिजे.
-
असली हैं भाई असली हैं ऊद्धव ठाकरे असली हैं घोषणांनी आसंमत दुमदुमला
चेंबूरच्या टिळकनगरातू शेकडो सैनिक बाळासाहेबांचे टी-शर्ट घालून सभास्थळी रवाना…
असली हैं भाई असली हैं ऊद्धव ठाकरे असली हैं घोषणांनी आसंमत दुमदुमला
-विभाग युवा सेना प्रमुख कार्तिक स्वामी यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी सुरू…
-
अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अभिनेत्री केतकी चितळे यांच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल गुन्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या तक्रारीनुसार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
-
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी; शिवसैनिक वाहतुकीच्या कोंडीत
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी; शिवसेनापक्षाप्रमुखांच्या सभेसाठी येणारी अनेक वाहने अडकली वाहतूक कोंडीत
-
उपमुख्यमंत्री अजित पवार Live
‘अशी वक्तव्य करणाऱ्याला मनोरुग्णच म्हणता येईल
या गोष्टींना फार महत्व देऊ नका
केतकी चितळे आणि ओवैसीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
-
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार Live
शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
कोण केतकी चितळे माहिती नाही
माझ्याबाबत काय लिहिलं आहे हेही माहिती नाही
-
मेथीच्या भाजीच्या वादातुन घडले महाभारत.
मेथीच्या आळणासाठी (भाजी) आई-वडिलांना शिविगाळ करणाऱ्या दिराला मोठ्या वहिनीने हटकल्याने दिराने चक्क वहिनीच्या गालावर ब्लेडने हल्ला केलाची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे घडली आहे.
हा प्रकार घड़ताच आरोपी दिर तेथून फरार झाला असून. उपचरानानंतर जखमी वहिनीने करडी पोलिसात आरोपी दिरा विरुद्ध तक्रार दिली असून त्यावरून दिराविरुद्ध गुन्हा नोंदविला.करडी पोलिस आरोपी चा शोध घेत आहे.
-
अभिनेत्री केतकी चितळे विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार
सातारा जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिनेत्री केतकी चितळे विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार…
शरद पवार यांच्या बाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या महिलांनी दिली तक्रार….
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांनी केतकी चितळे वर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी….
-
पुण्यातील मुस्लिम शिवसैनिकांन हनुमान चालीसा केली सादर
पुण्याहून मुंबईकडे जाताना म्हटली हनुमान चालीसा
बसमध्ये दोन शिवसैनिकांनी हनुमान चालीसा केली सादर
शादाफ मुलाणी असं शिवसैनिकाचं नावं आहे
-
मोठ्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार
शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या हुंकार सभेत पक्षाचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही तोफ धडाडणार
शिवसेनेच्या जाहीर सभेच्या मोठ्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार
उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांचीही भाषणे होणार [3:55 pm, 14/05/2022] +91 99300 94880: News flash
शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या हुंकार सभेत पक्षाचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही तोफ धडाडणार
शिवसेनेच्या जाहीर सभेच्या मोठ्या व्यासपीठावर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच भाषण करणार
उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे यांचीही भाषणे होणार
-
कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची आक्रमक प्रतिक्रिया
– अभिनेत्री केतकी चितळे तसेच ती कविता लिहिणाऱ्या लेखकावर तात्का गुन्हे दाखल करण्याची कॉंग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची मागणी
– महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न
– सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते त्यानंतर आता केतकी चितळे हा मोहरा बाहेर काढलाय का?
– मविआ सरकार चांगले काम करत असताना राज्यात भाजपकडून राज्यात अराजकता निर्माण करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न होतोय का याचा शोध घ्यावा
– गृहमंत्री वळसे पाटील यांना विनंती आहे की, ही कविता लिहिणारे, ती सोशल मीडियावर पोस्ट करणारे आणि त्याच्या मागे असणारे अदृश्य हात आहेत त्यांच्या तात्काळ गुन्हे दाखल करावे
-
नाशिक – उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले
शिवसैनीकांचा ताफा नाशिकमधून निघाला..
शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित
-
डेक्कन नदीपात्रातून शिवसैनिक निघणार मुंबईकडे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला पुण्यातूनही शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार
दोन बसेसच्या माध्यमातून शिवसैनिक मुंबईकडे जाणार
-
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार भवानीनगर येथे दाखल
– छत्रपती सहकारी साखर कारखान्यात पाहणी.. – कारखान्याच्या प्रस्तावित कामांची घेताहेत माहिती.
-
पोलीस कर्मचाऱ्याला बेड्या
-लोणावळा ग्रामीणच्या पोलीस कर्मचाऱ्याला दीड लाखांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगे हाथ पकडलय
-यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे यांचा सहभाग असल्याचं पुढे आलं आहे
-या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे, ASI कुतबुद्दीन गुलाब खान आणि खासगी व्यक्ती यासिन कासम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
-लोणवळ्यातील गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची मागणी करण्यात आली. पैकी, दीड लाख स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडू कूतबुद्दीनला बेड्या ठोकल्यात. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे हे फरार आहेत
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला पुण्यातूनही शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेला पुण्यातूनही शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार
दोन बसेसच्या माध्यमातून शिवसैनिक मुंबईकडे जाणार
डेक्कन नदीपात्रातून शिवसैनिक निघणार मुंबईकडे
-
अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल
– अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल,
– पुणे पोलिसांच्या सायबर सेलने केला गुन्हा दाखल,
– पुणे शहर राष्ट्रवादीकडून देण्यात आली होती तक्रार,
– वादग्रस्त पोस्टनंतर केतकी चितळेच्या अडचणीत वाढ,
– केतकी चितळे आणि इतरांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
-
नाशिक – शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
नाशिक – शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना
आजच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी शिवसैनिक मुंबईकडे रवाना
जिल्हाप्रमुख,शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघाले
-
ब्राह्मणवाद हा मनुस्मृती मधून जन्माला आला आहे – जितेंद्र आव्हाड
ज्या पद्धतीने टीका केली आहे ती त्यांच्या मानातील विकृती आहे या बाबत महाराष्ट्र भर सर्व स्थरावर टीका होत आहे .
आमच्या भगिनी ने जे लिहिले आहे ते अत्यंत घाणेरडे पनाचे आहे ..
शरद पवार हे मनाने खूप मोठे आहे ..
मी पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर वेगळे पनांने रिऍक्ट केले असते..
मी मर्यादा पाळतो मात्र कार्यकर्ते मर्यादा नाही पाळत तुम्ही खालच्या पातळीवर टीका करणार आणि कार्यकर्त्यांचे मस्तक भडकल्यावर नंतर काय.
मी कोणाला पाय लावून देणार नाही आणि पाय लावला तर सहन करून देणार नाही .कार्यकर्ता हा वेडा असतो त्याचे बापा प्रमाणे पवार साहेबां वरती प्रेम आहे.
इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही आमच्या बापा बाबत लिहू शकत नाही..
आम्ही देखील राजकीय टिकेवर सडे तोड उत्तर दिले.
ही वैचारिक लढाई आहे .या मध्ये मजा येते..
मीच बोललो होतो कारवाई करा पण जेव्हा गुन्हा दाखल होतो तेव्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागते..
ब्राह्मणवाद हा मनुस्मृती मधून जन्माला आला आहे.
ते ब्राम्हण वैगरे काही नाही पवार हे टिळक असतील असे अनेक लोकांच्या जवळ होते ..
-
मुख्यमंत्र्यांच्या सभेला सव्वालाख खुर्च्या आम्ही लावल्या आहेत. त्यापेक्षा अधिक लोक येणार आहेत – संजय राऊत
लोकांच्या मनातील प्रश्नांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आहे
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बोलणार आहेत
ऐतिहासिक सभा असणार आहे
विरोधकांनी राज्यातलं वातावरण संभ्रम केलं आहे
शिवसेनेला कधी अग्नीपरीक्षा दिली आहे
बाकीचे तात्पुरते आहे
शिवसेना हिंदुत्व या विषयावर बोलत आहे
त्यांच्या अस्तित्वाला प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे
सत्ताधाऱ्यांवरती बेछूट आरोप करण्यात येत आहेत.
आज मुख्यमंत्री बोलतील
खुलासा करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही
आम्ही आमच्या चालीने चालतो
सरकारला अस्थिर करायचं
महागाई आणि बेरोजगारी हे गंभीर मुद्दे आहेत
त्याच्यावरती त्यांचं तोंड बंद आहेत
पोलिसांनी योग्य गुन्हा दाखल झाला आहे
न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे
त्यांनी तिकडल्या मंदिरात जाऊन वाचले आहे
महाराष्ट्रात गोंधळ निर्माण केला जात आहे
केंद्रात जाऊन हनुमान चाळीसा म्हणा
सरकार कशाला पाहिजे उमटली सुध्दा आहे
माझा प्रश्न समोरच्यांना आहे
आव्हान कुठे द्यायचं हे मला माहित आहे
विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. बाकी काही नाही
ज्याला तुम्ही टोमणे म्हणता, त्याला आम्ही ठाकरी भाषा म्हणतो
पूर्वी अत्रेंची भाषा होती
औरंगाबादचं संभाजीनगर हे त्यावेळी बाळासाहेबांनी केलं आहे. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे
आम्ही त्याच राजकारण करू इच्छित नाही
राज ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर
आम्ही आत्ता आंगावर शाल नाही घेतली.
आंदोलनातला सहभाग आहे आमचा
त्यांनी कधी सभा पाहिली नाही.
त्यांच्या लोकांच्या भावना आहेत. त्यांचा विरोधाचा विषय काय माहित नाही
त्यांचं कारण आहे की, लोकांना आता मोकळीत मिळायला सुरूवात झाली आहे
सव्वालाख खुर्च्या आम्ही लावल्या आहेत. त्यापेक्षा अधिक लोक येणार आहेत
-
शिवसेनेने औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याचा विधानसभेत ठराव घ्यावा
शिवसेनेने औरंगाबाद शहराचं नाव बदलण्याचा विधानसभेत ठराव घ्यावा
नाव बदलण्याचा ठराव जर केंद्राकडे पाठवला तर आम्ही नाव बदलण्याचे प्रयत्न करू
शिवसेना संभाजीनगर शहराचे नाव बदलण्याचं फक्त राजकारण करत आहे
शहराचे नाव बदलण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत नाही
शिवसेनेने तातडीने शहराचे नाव बदलण्याचा विधानसभेचा ठराव द्यावा
भाजपचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची मागणी
-
अमरावतीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या बुधभुषणम् ग्रंथाचा प्रकाशन सोहळा निमित्ताने राज्यमंत्री बच्चू कडू भाषण..
अमरावतीमध्ये भारतातील सर्वात मोठ्या बुधभुषणम् ग्रंथाचा प्रकाशन सोहळा निमित्ताने राज्यमंत्री बच्चू कडू भाषण..
अयोध्याच्या मंदिरासाठी निधी जमा होतो तर मग संभाजी महाराज यांच्या साठी सन्मान निधी का बरं सुरू करू नये..
याची सुरुवात मी माझ्या प्रहार कडून आज सर्वात आधी निधी देऊन सुरू करू..
अमरावती येथे जे छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहलेल्या ग्रंथांच भव्य महाकाय ग्रंथ अजय लेंडे यांनी जे साकारलं आहे त्या भव्य ग्रंथाची रथयात्रा सिंदखेड राजा येथून सुरू करणार असून यामध्ये मी स्वतः एक दिवस पैदल चालणार आहे…
कोरोना नंतर भोंग्याचा आवाज येन, हनुमान चालीसा वाचन त्यानंतर औरंगाबाद येथे कबरीवर फुल टाकणे हे देशाचे प्रश्न नाही पण राजकारनाच हे अपयश समोर येत आहे..
कुठं मोदींच राज्य म्हटल्या जात,कुठं उद्धव ठाकरे साहेबांच राज्य म्हटलं जातं,कुठे औरंगजेबाच राज्य म्हटलं जातं परंतु छत्रपतींच्या राज्याला रयतेच राज्य म्हटल्या जात…
-
मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून दोघे ठार
मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून दोघे ठार…
36 वर्षीय महिला व 10 वर्षीय मुलाचा समावेश दोघेही मायलेक होते.
घटनास्थळी पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी
मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु..
ढीगाऱ्याखाली अडकल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी, शेतातील विहीर बघण्यासाठी गेले असतांना झाली दुर्दैवी घटना..
मृत महिला व मुलगा हे नांदगाव तालुक्यातील रहिवासी नुकतेच मोरशेवडी येथे नातेवाईकांकडे आले होते.
-
शरद पवारांवर सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे – छगन भूजबळ
– शरद पवारांवर सोशल मीडियातून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे
– ताबडतोब कारवाई झाली पाहिजे
– अभिनेत्री अथवा कुणीही असो, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
– हे चीड आणणारे, यामागे मनुवाद आहे का? तपासलं पाहिजे
– लहान समाजाचं दुःख त्या कवितेतून मांडलाय
– कडक कारवाई झाली पाहिजे
– अशा लोकांना ताबडतोब सोशल मीडियाने कायमस्वरूपी बॅन केलं पाहिजे
ऑन नवनीत राणा
– नवनीत रानाला आमच्या शुभेच्छा
– पंतप्रधानांच्या घरी जाऊन बोलल्या तरी काही हरकत नाही, वाईट वाटायचं कारण नाही
– फक्त त्याच राजकारण करू नये, भक्तिभावाने करावं
ऑन उद्धव सभा
– उद्धव ठाकरे दिवसभर काम सुरू असत
– अतिशय चांगलं काम ते करतायत
– आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेला शुभेच्छा
– महागाई आणि इतर प्रश्न सोडून भगव्याचं राजकारण
– प्रत्येकाच्या मनात आपआपले देव
– विरोधकांचा याचा राजकारणात वापर करून इतर प्रश्न लापवण्यासाठी वापर केला जातोय
*ऑन आदित्य ठाकरे दौरा
– आदित्य ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावरून छगन भुजबळांची नाराजी
– आदित्य ठाकरेंनी आधी चौकशी करावी
– आदिवासी पाड्यांवर अगोदर काम सुरुय
– काम अगोदरचं सुरू झालेलं असत
– मग दाखवायचं हे काम शिवसेनेने केलं हे चुकीचं
– जिल्हाप्रशासन आणि अन्य खात्यांवर अन्याय करण्यासारखं
– श्रेय कुणीही घ्या, पण काम अगोदरच सुरू झालेला असत
– कुठल्याही कामाला 2- 3 महिने जावे लागतात
– मंत्र्यांना मिसलीड केलं जातं
– स्थानिक नेत्यांनीही आपल्या नेत्यांना मिसलीड करू नये आणि तिथे नेऊन बसवू नये
– कृषी विभागाच्या निधीतील एक रुपयाचाही निधी परत जाऊ न देण्याच्या सूचना दिल्यात
-
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आक्रमक, केतकी चितळेला लवकरच जंगी चोप देणार, रुपाली पाटलांचा इशारा
– केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टनंतर राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील आक्रमक,
– केतकी चितळेला लवकरच जंगी चोप देणार, रुपाली पाटलांचा इशारा,
– महिला असली तरी तू छपरी आहे, वाईट मनोवृत्तीची असल्याची टीका,
– तुला 100 चपलेने मारून 1 मोजले पाहिजेत, केतकीवर घणाघाती टीका
-
अवैध दारू विक्री वर पोलिसांची मोठी धाड देशी-विदेशी दारुचा साठा जप्त
अवैध दारू विक्री वर पोलिसांची मोठी धाड देशी-विदेशी दारुचा साठा जप्त
चंद्रपूर जिल्ह्यातून आष्टी मार्गे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली तस्करी करित होते दारू
आटोच्या साह्याने अवैध दारू विक्रेते नेहमी दारू तस्करी करीत होते
आष्टी पोलिसांनी अवैध दारु तस्करी वर कारवाई करीत एक आरोपीसह मुद्देमाल जप्त केलेला आहे
-
तुकाराम महाराजांच नाव वापरून वारकरी सांप्रदायाचाही अपमान केल्याचा आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाकडून पुणे सायबर पोलीसांत केतकी चितळेविरोधात तक्रार दाखल केली.जाणार
शरद पवारांवर केलेल्या विद्रोही कवीतेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा सांस्कृतीक विभाग आक्रमक
केतकी चितळेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी
तुकाराम महाराजांच नाव वापरून वारकरी सांप्रदायाचाही अपमान केल्याचा आरोप
येरवड्यातील मनोरुग्णालयात तपासणी करा उपचाराचा खर्च आम्ही करू
शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात दिली जाणार तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील करणार तक्रार …
-
केतकी चितळे यांच्यावर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाचं अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून समर्थन!
केतकी चितळे यांच्या वर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणाचं अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून समर्थन!
राष्ट्रवादी बरोबरच आमचं वैचारिक शत्रूत्व कायम आहे आणि आम्ही भविष्यात सुद्धा तेवढ्याच ताकदीने करू
पण कोणत्याही व्यक्तीच्या आजारावर उपहासत्मक लिहिणं त्यांच्या मरणाची वाट पाहणे ही विकृतीच आहे
आणि या आजाराला शिक्षा झालीच पाहिजे
असं सांगत आनंद दवेंची केतकी चितळेवर टिका …
शरद पवारांवर केलेल्या टिकेवरती ब्राह्मण महासंघाचाही आक्षेप …
-
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आता मुंबई मधील उत्तर भारतीयांचा पाठिंबा..
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आता मुंबई मधील उत्तर भारतीयांचा पाठिंबा… मनसेने उत्तर भारतीयांविरोधात घेतलेली भूमिका हा भूतकाळ… आता नवीन पद्धतीने राज ठाकरे यांच्या नवीन भूमिकेचं समर्थन करावं अशी मुंबई मधील उत्तर भारतीयांच मत…
-
महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं म्हणून आरती केली
आरती सुध्दा केली
महाराष्ट्राचं संकट दूर व्हावं म्हणून आरती केली
देवाच्या नावाखाली त्यांनी मला अटक केली
आज त्यांनी माझ्या प्रश्नांचं उत्तर द्याव
आक्रमण असा पवित्रा नवनीत राणा यांनी घेतला आहे
जयश्री रामचा नारा दिला जात आहे
काय झालं तरी निवडणूक लढण्याची घोषणा करणार आहेत का ? असा सवाल नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला आहे
-
मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, ते आज हनुमान चाळीसा म्हणणार का
मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे, ते आज हनुमान चाळीसा म्हणणार का
मोदींचा विश्वास घात त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंच हिंदुत्व नकली आहे
राणा दाम्पत्याकडून महाआरतीचं आयोजन
-
अभिनेत्री केतकी चितळे यांना महाराष्ट्र राज्यातून तडीपार करा – सचिन खरात
अभिनेत्री केतकी चितळे यांना महाराष्ट्र राज्यातून तडीपार करा… सचिन खरात
शरद पवार साहेब यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळे यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याचे दिसत आहे,शरद पवार रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारावर काम करून महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजाला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक प्रवाहात आणण्याचे काम करत आहे यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे. परंतु अभिनेत्री केतकी चितळे यांनी जे पोस्ट केली याची महिला आयोगाने दखल घ्यावी आणि मध्यन्तरी चितळे यांनी आंबेडकरी समाजाविषयी चुकिचे वक्तव्य केले होते त्यामुळे वारंवार अशी वक्तव्य करत असल्यामुळे त्यांना तात्काळ महाराष्ट्र राज्यातुन तडीपार करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे.
-
जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
चंद्रपूर :–जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार,
जाईबाई जेंगठे (65) असे हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव,
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामधील सीताराम पेठ जंगलातील घटना, तेंदूपाने तोडण्यासाठी गेली होती महिला,
माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळावर दाखल,माहिती पसरताच घटनास्थळावर एकच गर्दी,
मयत महिलेचे शव विच्छेदनासाठी करण्यात आले रवाना
-
औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाणी संघर्ष यात्रा
औरंगाबादेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाणी संघर्ष यात्रा
औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून सुरू होणार पाणी संघर्ष यात्रा
औरंगाबाद शहरात दहा दहा दिवस पाणी मिळत नसल्यामुळे पाणी संघर्ष यात्रा
औरंगाबाद शहरातील 55 वार्डात जाणार पाणी संघर्ष यात्रा
55 वारडातून मुख्यमंत्र्यांना पाठवणार 25 हजार पत्रे
पाण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलनात्मक पाऊल
-
शरद पवारांबाबत ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात
नाशिक- शरद पवारांबाबत ट्विट करणारा पोलिसांच्या ताब्यात
– दोन दिवसांपूर्वी केले होते ट्विट
– वादग्रस्त ट्विटनंतर नाशिक ग्रामीणच्या दिंडोरी पोलिसांची कारवाई
– पोलिसांकडून सुरू आहे चौकशी
– जितेंद्र आव्हाड यांनी ही केला होता निषेध
– बागलाणकर या हेडिंग खाली केले होते ट्विट
-
ओबीसी आरक्षणाबाबत आता कर्नाटक सरकारही कोर्टात जाणार
ओबीसी आरक्षणाबाबत आता कर्नाटक सरकारही कोर्टात जाणार
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारनंतर कर्नाटक राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
मुख्यमंत्री बसवराज बोमई यांची माहिती
कर्नाटक राज्यात कायदेशीर आणि घटनात्मक ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी
कर्नाटक राज्य सरकार लवकरच याचिका दाखल करणार
-
उद्धव ठाकरेंचं भाषण देशातील लोकं ऐकतील, लोकांना भाषणाची उत्सुकता आहे – उद्धव ठाकरे
ऑनलाईन बैठका घेतल्या
विराट सभा या कालातराने होतात
महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल
काही लोकं राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे
आमची फटकेबाजी आहे
आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही
लोक आपोआप जमतात
आज मुख्यमंत्र्याच्या भाषणाची उत्सुकता आहे
उद्धव ठाकरेंचं भाषण देशातील लोकं ऐकतील, लोकांना भाषणाची उत्सुकता आहे
आज ऐतिहासिक सभा होईल, काही लोकं राज्यातली शांतता अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत
काही व्यक्ती हिमालया एवढ्या असतात
महाराष्ट्रात असे शुद्र कीटक वाढत जातात
देशाने मान्य केलेली भाषा मला बोलायला आवडते
कॉंग्रेस पक्षाने उठून उभे राहिले पाहिजे
तो सिनेमा नक्की पाहीन
-
राणा दाम्पत्य जे विचार मांडत आहेत, तो महाराष्ट्राच्या माणसाचा विचार नाही – रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर बाईट ऑन नवनीत राणा –
कोरोना महामारी नंतर महाराष्ट्र नुकतच संकटातून बाहेर आला आहे… अशा वेळेस महागाई, बेरोजगारी, असंघटित कामगार असे अनेक प्रश्न असताना, खासदार नवनीत राणा यांनी पुढे येणे गरजेचे होते…
त्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला काही आर्थिक मदत आणून देणं गरजेचे होते.. मात्र, नवनीत राणा हनुमानचालिसा पठण करत आहेत.. एकसंध आणि शांत असलेल्या महाराष्ट्राला अशांत करण्याचा हा प्रयत्न आहे… ही विकृत मनोवृत्ती आहे, असं मला वाटतं…
राणा दाम्पत्य जे विचार मांडत आहेत, तो महाराष्ट्राच्या माणसाचा विचार नाही..
ऑन केतकी चितळे –
कवियत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका नक्कीच निंदनीय आहे… प्रत्येक संकट काळामध्ये शरद पवारांनी महाराष्ट्राला मदत केली आहे, योगदान दिले आहे.. केलेली टीका अशोभनीय आणि निंदनीय आहे…
-
सातारा जिल्ह्यात 1 लाख टन ऊस अजूनही शिल्लक
सातारा जिल्ह्यात 1 लाख टन ऊस अजूनही शिल्लक…
वाई, जावली या दोन तालुक्यात ऊस शिल्लक राहण्याचे अधिक प्रमाण…
जिल्ह्यातील किसन वीर खंडाळा आणि प्रतापगड हे कारखाने बंद असल्याने जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा मोठा प्रश्न…
मे अखेरीपर्यंत हा ऊस तोडला जाणार असल्याची साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती
-
मागच्या दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलेलं नाही
मोठी गर्दी झालेली आहे
कार्यकर्ते एकवटले आहेत
एक इतिहास रचला जात आहे
मुंबईत चुकीचं राजकारण होत आहे
हनुमान चाळीसा विरोधात महाराष्ट्रात होत आहे
मागच्या दोन वर्षात मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलेलं नाही
राणा दाम्पत्य हे रस्त्यावर उतरलेलं आहे
हनुमान चाळीसा त्यांनी वाचली नाही
भाषण सुरू होण्यापुर्वी त्यांनी हनुमान चाळीसा वाचावी
-
राणा दाम्पत्याकडून दिल्लीत महा आरतीचं आयोजन
राणा दाम्पत्याकडून दिल्लीत महा आरतीचं आयोजन
औरंगाजेबला जाऊन लोक हार घालतात
उद्धव ठाकरेंनी त्या लोकांना अटक करावे
उद्धव ठाकरे कितीवेळा धर्मासाठी जेलात गेले आहेत.
मला जिथं जिथं हनुमान चाळिसा म्हणण्याची संधी मिळेल मी तिथे म्हणणार आहे
आमची श्रध्दा आहे..
मला असं वाटतंय त्यांनी हे आवाहन मोठं केलं
घर तोडेपर्यंत कारवाई केली आहे..
देवाचं नाव घेणं नौटकी असेल
राणांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला
-
तळेगांव दाभाडे स्टेशन परिसरातील सिद्धार्थनगर भागात नगरपालिका ठेकेदाराचा अजब कारभार
-तळेगांव दाभाडे स्टेशन परिसरातील सिद्धार्थनगर भागात नगरपालिका ठेकेदाराचा अजब कारभार
-नगरपालिका प्रशासनाने बिल अदा न केल्याने,भाजी मंडईतील सार्वजनिक शौचालयाला ठोकले टाळे
-ह्या संदर्भात नगरपालिका अधिकारी यांना विचारपूस केली असता नागरिकांना नगरपालिका प्रशासनाची उडवाउडवीची उत्तरे
-
रस्त्याची कामे निकृष्ट झाल्यास ठेकेदार अधिकारी जेलमध्ये जाणार
नाशिक – रस्त्याची कामे निकृष्ट झाल्यास ठेकेदार अधिकारी जेलमध्ये जाणार
महापालिका आयुक्तांचा ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना इशारा
मुंबई मनपातील ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरील फौजदारी कारवाईचा दिला दाखला
महापालिकेतील अधिकारी यांच्यासह प्रमुख ठेकेदारांची बैठक घेत कानउघडणी
-
दापोली पोलीस स्टेशनला लागली आग
रत्नागिरी – दापोली पोलीस स्टेशनला लागली आग
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
आगीत कोणतीही जीवितहानी अद्याप नाही
आगीवार नियंत्रण मिळवण्यास यश
-
ओबीसी आरक्षणाबाबत नागरिकांची मते, समर्पित आयोग 28 मे ला जाणून घेणार
ओबीसी आरक्षणाबाबत नागरिकांची मते, समर्पित आयोग 28 मे ला जाणून घेणार
नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये आरक्षणासाठी गठित केलेल्या समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम घोषित झाला
28 मे, रोजी आयोग नागपूर मध्ये येणार आहे.
नागरिकांनी आपली मते या आयोगासमोर वेळेत मांडावीत
या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदन स्विकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावार कार्यक्रम जाहीर केला आहे.
-
पुणे शहरात होर्डिंगची १६० कोटींची थकबाकी
– पुणे शहरात होर्डिंगची १६० कोटींची थकबाकी,
– शहरात २ हजार २०० पेक्षा होर्डिंग व्यावसायिकांनी २०१४ पासून शुल्क भरले नाही,
– महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने तब्बल १५९ कोटी १० लाख २२ हजार ८७९ रुपयांची वसूली काढली आहे.
– ही रक्कम वसूल करण्यासाठी स्थायी समितीसमोर लेखापरीक्षण अहवाल सादर,
– याबाबत महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
-
नागपूरच्या झिरो माईल परिसरात लागली अचानक कारला आग
नागपूरच्या झिरो माईल परिसरात लागली अचानक कारला आग
रात्रीची घटना , आगीच कारण अद्याप अस्पष्ट
कुठलीही जीवित हानी नाही
रस्त्याने जाणार्यांनी बघितला बर्निंग कार चा थरार ..
या आधी बस ला आग लागल्याच्या घटना आल्या नागपुरात समोर
-
महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर
– महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर,
– शहरातील किमान ३२ प्रभागात सुधारणा करण्यात आल्याचा दावा,
– शहरात ५८ प्रभागातून १७३ नगरसेवक निवडून येणार आहेत.
– यातील ५७ प्रभाग तीन नगरसेवकांचे तर एक प्रभाग दोन नगरसेवकांचा असणार,
– येत्या काही दिवसात आरक्षण सोडत जाहीर होईल.
-
पावसाळ्यात नागपुरात 70 जागी साचते पाणी याची आपत्ती व्यवस्थापनाच्या पुस्तकात नोंद
पावसाळ्यात नागपुरात 70 जागी साचते पाणी याची आपत्ती व्यवस्थापनाच्या पुस्तकात नोंद
महापालिका मात्र करते फक्त नदी नाल्यांची सफाई करते
मात्र या ठिकानांकडे लक्ष नाही
पावसाळ्यात या भागात साचते पाणी
या वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज
मात्र या ठिकानांकडे महापालिका लक्ष केंद्रित करणार का ?.
-
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 23 मे रोजी औरंगाबादेत विराट मोर्चा
देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 23 मे रोजी औरंगाबादेत विराट मोर्चा
25 हजार महिलांच्या उपस्थितीत होणार विराट मोर्चा
औरंगाबाद शहरातील पैठण गेट पासून महापालिकेवर धडकणार मोर्चा
मोर्चानंतर देवेंद्र फडणवीस महापालिकेच्या भ्रष्टाचाराचाही करणार पर्दाफाश
25 हजार महिला हांडे घेऊन मोर्चात होणार सहभागी
भाजप आमदार अतुल सावे यांची माहिती
मोर्चासाठी भाजप संपूर्ण ताकात पणाला लावण्याची शक्यता
औरंगाबादेत विराट मोर्चा काढून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याची शक्यता
-
नागपुरात महावितरण चे नियोजन फसले
नागपुरात महावितरण चे नियोजन फसले
नागपूरकरांना गर्मीच्या काळात वीज जाण्याच्या समस्या चा करावा लागतो सामना
विजेची मागणी 630 मेगा वॅट पर्यंत वाढली
दोन वर्ष पूर्वी 400 मेगा वॅट विजेची मागणी होती आता ती 630 पर्यंत पोहचली
नियोजन मात्र 10 टक्के वाढीव मागणी
नागरिकांना बसतो आहे फटका
-
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लुटला भीम गीतांचा मनमुराद आनंद प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना आलिंगन देत केले कौतुक जळगावात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. या राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही भीम गीतांचा मनमुराद आनंद लुटला.
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लुटला भीम गीतांचा मनमुराद आनंद
प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांना आलिंगन देत केले कौतुक
जळगावात प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला. या राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही भीम गीतांचा मनमुराद आनंद लुटला.
-
औरंगाबाद महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता
औरंगाबाद महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता
औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करणार – निवडणूक आयोगाचे प्रतिज्ञापत्र..
न्यायालयीन खटले आणि प्रभाग रचनेस विलंब झाल्याने औरंगाबाद महानगरपालिकेचे निवडणुकीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे करणार जाहीर..
राज्य निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्रात केले नमूद..
मुदत संपूनही औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार नसल्याचे चित्र..
औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीची तयारी अपूर्ण राहिल्याने निवडणूक लांबणीवर..
-
महापालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे यांचा रस्ता अडवणाऱ्या तरुणावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
महापालिका आयुक्त अस्तिकुमार पांडे यांचा रस्ता अडवणाऱ्या तरुणावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल
तर अस्तिकुमार पांडे यांच्या विरोधात अट्रासिटी अंतर्गत तक्रार दाखल
औरंगाबाद शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पाणी प्रश्नावरून औरंगाबाद महापालिकेत आता एफआयआर वोर सुरू
-
आम आदमी पार्टी नागपुर महापालिकेत संपूर्ण 156 जागी निवडणूक लढणार
नागपूर ब्रेकिंग –
आम आदमी पार्टी नागपुर महापालिकेत संपूर्ण 156 जागी निवडणूक लढणार
पंजाब विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशा नंतर आम आदमी पक्षानं आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित
नागपूरात पक्षाच्या विभागीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
आगामी महापालिका निवडणुकीत आप स्थानिक मुद्यांवर पक्ष केंद्रीत करणार आहे.
शिवाय त्या त्या शहरातील झालेला भ्रष्टाचार उघड करणार आहे.
स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनाच आम्ही प्रवेश देणार
कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
-
इंधनासाठी एसटीचे प्रवाशी वेठीस..
मालेगांव..
इंधनासाठी एसटीचे प्रवाशी वेठीस..
खासगी पेट्रोल पंपावर ST ची गर्दी..
30 मिनिट अतिरिक्त वेळ..
Published On - May 14,2022 6:34 AM