Maharashtra News Live Update : पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचं पुन्हा बिनसलं, फोडाफोडीचा राष्ट्रवादीवर आरोप

| Updated on: May 29, 2022 | 8:01 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीचं पुन्हा बिनसलं, फोडाफोडीचा राष्ट्रवादीवर आरोप
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज रविवार 29 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. कुरिअर बॉय असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या चार आरोपींना मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट 11 कडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चार आरोपी मुंबईतील पॉश भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याच्या घरी कुरिअर बॉय म्हणून जातात आणि हात-पाय बांधून लुटतात.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 May 2022 07:27 PM (IST)

    पूजा करून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधिवत पूजा करून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.

    बळीराजाचे राज्य येऊ दे चांगला पाऊस पडू दे.

    अडचणीत आलेला देशातला शेतकरी आनंदी व समाधानी ठेवू दे असे साकडे त्यांनी तुळजाभवानी मातेला घातले.

    महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार याचे माझ्याकडे उत्तर नाही, आणी मुख्यमंत्री पदाबाबत मी याचा विचार केला नाही, महाराष्ट्राचे लोक मला मुख्यमंत्री कधी करायचे ते ठरवतील असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

  • 29 May 2022 05:37 PM (IST)

    राजू शेट्टी यांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल

    सांगली – महागाईच्या मुद्द्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करत जोरदार टीका

    केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या खिशावर डल्ला मारत आहे

    आधीच वाढवायचं आणि परत कमी करायचं ही जुनी पॉलिसी आहे

    केंद्र आणि राज्य सरकारने जास्त कर लावल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत

  • 29 May 2022 05:37 PM (IST)

    पुण्यात सेनेचा महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याचा इशारा

    – राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सेना नगरसेवकांचे प्रभाग फोडल्याचा सेनेचा गंभीर आरोप,

    – शिवाय काही प्रभागात भाजप – राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचाही आरोप,

    – यासंदर्भात सेनेचे स्थानिक पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांना तक्रार करणार

  • 29 May 2022 05:36 PM (IST)

    रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया

    खा.सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना याबाबतचा खुलासा दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले होते. चंद्रकांत पाटील यांचा खुलासा प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दुःख व्यक्त करून सुप्रिया सुळे व समस्त महिलांची दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी अशी समज चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेली आहे.

  • 29 May 2022 05:35 PM (IST)

    रत्नागिरी- धोपेश्वर रिफायनरीच्या समर्थनार्थ भाजपच्या स्वागत मेळाव्याला सुरुवात

    राजापूर शहरामध्ये होतोय भाजपचा स्वागत मेळावा

    माजी खासदार निलेश राणे भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची उपस्थिती

    रिफायनरी विरोधकांच्या मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपची समर्थनार्थ सभा

    मोठ्या संख्येने रिफायनरी समर्थक उपस्थित

  • 29 May 2022 05:02 PM (IST)

    राजेंद्र कोंढरे,समनव्यक, मराठा क्रांती मोर्चा

    राज्यसभेची उमेदवारी नाकारल्याने घराण्याचा अवमान होत नाही असे मत शाहू छत्रपतींचे असेल तर ज्या घराण्याने अठरा पगड जाती धर्माच्या मुलासाठी वसतीगृहे बांधून त्याच्या तजविजीसाठी शेकडो एकर जमीन दान केली .

    त्यांच्या वारसाला मराठा समाजाच्या शासकीय वसतिगृहांच्या जमिनीसाठी आजाद मैदानावर आमरण उपोषण करावं लागत तो पण या घराण्याचा या सरकारने केलेला सन्मान समजायचा का ?

    वंशजांचा पुरावा मागणाऱ्यांचा पाहुणचार केला म्हणून ???

  • 29 May 2022 03:34 PM (IST)

    राणा दाम्पत्याला विनापरवानगी स्वागत रॅली काढणे भोवले

    दोन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल….

    खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणांसह शंभर पेक्षा अधिक युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल..

    राजापेठ पोलीस स्टेशनमध्येही राणा दाम्पत्या सह कार्यकर्त्यांवर झाला गुन्हा दाखल.

    परवानगी न घेता स्वागत रॅली काढणे,मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणे व वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी केले गुन्हे दाखल.

    विना परवानगी क्रेन व वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यानें यापूर्वीही तीन कार्यकर्त्यांवर सिटी कोतवाली पोलिसांनी दाखल केले आहे गुन्हे….

    गाडगेनगर पोलीसांनी कलम 135,341,143,291 135 केले गुन्हे दाखल…

  • 29 May 2022 03:15 PM (IST)

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली दिलगीरी

    सुप्रिया सुळेंबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याबद्दल दिलगीरी व्यक्त

    12 महिला आमदार आणि 5 महिला खासदार असणाऱ्या पार्टीचा मी प्रदेशाध्यक्ष आहे

    ज्या पक्षानं महिला सबलीकरणासाठी प्रयत्न केलेत

    मी ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे त्यांना अपमानित व्हावं लागलं यासारखं आयुष्यात कोणतं दुःख नाही

    मी समस्त माता भगिनींचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो

  • 29 May 2022 01:14 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांना नाही गांभीर्य

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांना नाही गांभीर्य

    कार्यक्रमाची नियोजित वेळ सकाळी 11 वाजेची असताना गिरीश महाजन 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचले

    जळगावातील मातोश्री आनंदाश्रमात आश्रयितांसाठी करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं आयोजन

    कार्यक्रमाला उशीरा पोहोचल्यामुळे गिरीश महाजन यांना उपस्थितांमध्ये मागे बसावं लागलं

  • 29 May 2022 12:50 PM (IST)

    सातारा विसापुर शहिद विजय शिंदे लष्करी इतमामने अंत्यस्कार विधीस सुरवात

    सातारा विसापुर शहिद विजय शिंदे लष्करी इतमामने अंत्यस्कार विधीस सुरवात

  • 29 May 2022 12:23 PM (IST)

    या घराण्याविषयी जीव असल्याने आम्ही इथं येतो – संजय राऊत

    या घराण्याविषयी जीव असल्याने आम्ही इथं येतो

    आमचा सन्मान केला जातो

    उद्धव ठाकरेंनी छत्रपती शाहू महाराजांची चर्चा झाली

    आत्मीयतेची ही भेट आहे

    या भेटीमागे कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही

    राजकीय चर्चा नाही

    शुभेच्छा आणि आर्शिवाद

    त्यांचे आर्शिवाद घेऊनचं काम करतो

    शाहू महाराजांचा असा अपमान करू नका

    चुकीचं बोलणार नाहीत ते

    कोल्हापूरातील न्यू पॅलेज भेट घेतली

  • 29 May 2022 11:42 AM (IST)

    काही माणसं ज्या पध्दतीचं राजकारण करीत आहेत, ते उघड पडतंय – देवेंद्र फडणवीस

    आभार मानणयाकरीता ज्यावेळी मला भेटले होते

    मी कोणत्याही पक्षाची तिकीट घेणार नाही

    या पदावर बसवलं

    तसंच मला सगळ्य़ा पक्षांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवावं

    काही माणसं ज्या पध्दतीचं राजकारण करीत आहेत, ते उघड पडतंय

  • 29 May 2022 11:02 AM (IST)

    शहीद सुभेदार विजय शिंदेंवर अंत्यसंस्कार

    शहीद सुभेदार विजय शिंदेंवर अंत्यसंस्कार

    साताऱ्यातील मुळगावी अत्यंसंस्कार

    लडाखमधील अपघातात जवानाचा मृत्यू झाला आहे

  • 29 May 2022 10:28 AM (IST)

    खत बियाणे, खरितपुर्ण हंगामाला लागतं ते सगळं उपलब्ध केल आहे – अजित पवार

    काय काळजी घेतली पाहिजे याबाबत त्यांना ज्ञान देऊ

    बारामतीमध्ये एखाद्याने आरोप केला, तर निष्पन्न झालं पाहिजे

    आम्हाला कोणाला विसरत नाही,

    खत बियाणे, खरितपुर्ण हंगामाला लागतं ते सगळं उपलब्ध केल आहे

    कमतरता होणार नाही याची काळजी सुध्दा घेतली आहे.

  • 29 May 2022 10:23 AM (IST)

    संभाजीराजेंना पुढे करून कपटी राजकारण सुरू होतं – संजय राऊत

    संभाजीराजेंना पुढे करून कपटी राजकारण सुरू होतं

    सत्य जिवंत आहे,

    शाहू घराण्यांनी आपली परंपरा कायम ठेवली आहे

    आम्हाला संभाजी राजेविषयी देखील प्रेम आहे

    शिवसेनेचं मन साफ आहे, आम्ही तेव्हाही भूमिका स्पष्ट केली होती.

    छत्रपतींना समर्थन नसतं

    देशात खूप विषय आहेच

    त्या विषयावर आपण बोलूया

  • 29 May 2022 09:32 AM (IST)

    कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, गुलाबराव पाटलांचा नवनीत राणांना टोला

    कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शिवसेना नेते – गुलाबराव पाटील

    खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनि म्हंटले होते यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी ” कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही” असा टोला लगावत नवनीत राणा यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

  • 29 May 2022 07:44 AM (IST)

    अमरावतीत राणा दाम्पत्याने अभिवादन केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे आज शुद्धीकरण..

    अमरावतीत राणा दाम्पत्याने अभिवादन केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे आज शुद्धीकरण..

    इर्विन चौकातील पुतळ्याचे गुलाब जेलने करणार भीम बिग्रेडचे कार्यकर्ते 11 वाजता करणार शुद्धीकरण….

    काल राणा दाम्पत्य अभिवादन करायला आले असता भीम बिग्रेड झाली होती आक्रमक…

    राणा दाम्पत्याने संविधान म्हणून दाखवण्याची केली होती भीम ब्रिगेडने मागणी….

  • 29 May 2022 07:21 AM (IST)

    लडाखमध्ये वीरमरण आलेले सैन्य दलातील सुभेदार विजय शिंदे यांच पार्थिव पुणे विमानतळावर दाखल

    लडाखमध्ये वीरमरण आलेले सैन्य दलातील सुभेदार विजय शिंदे यांच पार्थिव पुणे विमानतळावर दाखल

    विमानतळावर सैन्य दलाकडून मानवंदना

    त्यानंतर त्यांच मुळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील विसापूर या गावी नेलं जाणार आहे…

  • 29 May 2022 07:11 AM (IST)

    लडाखमध्ये वीरमरण आलेले सैन्य दलातील सुभेदार विजय शिंदे यांच पार्थिव थोड्याच वेळात पुणे विमानतळावर आणलं जाणार

    लडाखमध्ये वीरमरण आलेले सैन्य दलातील सुभेदार विजय शिंदे यांच पार्थिव थोड्याच वेळात पुणे विमानतळावर आणलं जाणार

    विमानतळावर सैन्य दलाकडून मानवंदना दिली जाणार आहे

    त्यानंतर त्यांच मुळ गाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील विसापूर या गावी नेलं जाणार आहे…

  • 29 May 2022 07:05 AM (IST)

    बेस्ट पाठोपाठ आत्ता एसटी महामंडळ विद्युतवर धावणाऱ्या बसगाडय़ा ताफ्यात दाखल करणार आहे.

    बेस्ट पाठोपाठ आत्ता एसटी महामंडळ विद्युतवर धावणाऱ्या बसगाडय़ा ताफ्यात दाखल करणार आहे.

    – अशा १५० बसेस शिवाई नावाने येत्या तीन महिन्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट एसटी महामंडळाने ठेवले आहे.

    यातील पहिली बस एसटीच्या वर्धापनदिनी येत्या १ जूनला पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

    पुण्यातील स्वारगेट येथे सकाळी ९.३० वाजता लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

    एसटी महामंडळाने वर्षभरात भाडेतत्त्वावर एक हजार बस दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

    या बस विद्युतवर धावणाऱ्या असतील. वातानुकूलित तसेच साध्या प्रकारातील बसचा यात समावेश असेल.

    याव्यतिरिक्त केंद्र सरकारच्या फेम योजनेंतर्गत विदयुतवर धावणाऱ्या १५० वातानुकूलित शिवाई बसही ऑगस्टपर्यंत दाखल करण्यात येतील.

    जुलै २०१९ मध्ये यसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती.

  • 29 May 2022 07:05 AM (IST)

    राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या या आठवडय़ात अचानक ५००च्या वर गेली असताना नवी चिंता निर्माण झाली आहे.

    राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या या आठवडय़ात अचानक ५००च्या वर गेली असताना नवी चिंता निर्माण झाली आहे.

    करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे उत्परिवर्तन असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

    या प्रकारांचे सात रुग्ण पुणे शहरात सापडल्याने दक्षता घेण्यात येत आहे.

    पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असणाऱ्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार ही माहिती पुढे आली आहे.

    राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या दैनंदिन अहवालातून याबाबत माहिती दिली आहे.

    भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे प्रकार आढळले असून फरिदाबाद येथील इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) या संस्थेने त्यास दुजोरा दिला आहे.

  • 29 May 2022 07:04 AM (IST)

    पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर आज ११ तासांचा मेगा ब्लाॅक

    पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर आज ११ तासांचा मेगा ब्लाॅक…

    – काल शनिवार, (२८ मे) रात्री ११ पासून १४ तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. पोईसर पुलाच्या कामासाठी बोरिवली ते कांदिवलीदरम्यान दोन्ही जलद मार्गावर हा ‘ब्लॉक’ असेल.

    त्यामुळे बोरिवली-गोरेगावदरम्यान धिम्या मार्गावरून लोकल धावतील. शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १.३० वाजेपर्यंत ‘मेगा ब्लॉक’ असेल.

    विरारच्या दिशेने जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस अंधेरी-बोरिवलीदरम्यान पाचव्या मार्गावरून धावतील.

    तर मुंबई सेन्ट्रलच्या दिशेने येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस बोरिवली-गोरेगावदरम्यान अप लोकल मार्गावरून धावतील.

  • 29 May 2022 07:04 AM (IST)

    आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लाॅक आहे

    आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लाॅक आहे….

    मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ असेल.

    या कालावधीत सीएसएमटीतून सुटणाऱ्या धिम्या लोकल विद्याविहापर्यंत जलद मार्गावर चालवण्यात येतील.

    त्यामुळे भायखळा, परेल, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला स्थानकांत लोकलला थांबा असेल.

    त्यानंतर पुन्हा धिम्या मार्गावर लोकल वळवण्यात येतील.

    सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या धिम्या लोकलही विद्याविहारपासून जलद मार्गावर धावतील.

    हार्बरवरही सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० पासून ते दुपारी ४.४० पर्यंत ‘मेगा ब्लॉक’ होणार आहे.

    त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगावदरम्यान दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    पनवेल-कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

  • 29 May 2022 07:00 AM (IST)

    गोमेकॉत गांजा सापडल्याने मोठी खळबळ

    गोमेकॉत गांजा सापडल्याने मोठी खळबळ

    गोवा मेडिकल कॉलेजच्या होस्टेल मध्ये सापडला गांजा

    7 ग्रॅम गांजा सापडल्याने खळबळ

    गोवा पोलिसांनी 3 विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात, अधिक तपास सुरू

  • 29 May 2022 06:59 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा..

    बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा..

    – बारामतीतील विकासकामांची पाहणी..

    – पहाटे सहा वाजल्यापासून अजितदादांच्या दौऱ्याला सुरुवात..

    – बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीची अजित पवार यांच्याकडून पाहणी..

    – विकासकामांबाबत अधिकारी वर्गाला अजितदादांच्या सुचना

  • 29 May 2022 06:58 AM (IST)

    मंकीपॉक्स महामारी ठरणार ? WHO च्या इशाऱ्याने जगात खळबळ

    मंकीपॉक्स महामारी ठरणार ? WHO च्या इशाऱ्याने जगात खळबळ

    जगात आतापर्यंत मंकीपॉक्सचे 219 रुग्ण

    20 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण

    सुदैवाने भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण नाही

  • 29 May 2022 06:58 AM (IST)

    DMK देशातील सर्वात श्रीमंत पक्ष

    DMK देशातील सर्वात श्रीमंत पक्ष

    तामिळनाडू मधील एम के स्टॅलिन यांचा DMK पक्ष सर्वात श्रीमंत

    लोकशाही सुधारणा संस्थेच्या अहवालात माहिती स्पष्ट

    सध्या भारतात 31 प्रादेशिक राजकीय पक्ष

    31 पक्षांच्या उत्पनाचा आणि खर्चाचा संस्थेकडून अभ्यास

    गेल्या आर्थिक वर्षात DMK चा खर्च 218 कोटी

    देशातील 31 राजकीय पक्षांचे उत्पन्न 529 कोटी रुपये

  • 29 May 2022 06:42 AM (IST)

    राणा दाम्पत्य आज तब्बल 36 दिवसांनी आपल्या घरी परतले

    राणा दाम्पत्य आज तब्बल 36 दिवसांनी आपल्या घरी परतले. यावेळी घराजवळ राणा दाम्पत्य येताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. सोबतच फटाक्यांची आतषबाजी केल्या गेली.. यावेळी कार्यकर्त्यांनी तब्बल दिडशे किलोचा हार राणा दाम्पत्यांना घातला. यावेळी नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले होते.. त्यानंतर हनुमान चालीसा पठण करण्यात आले आणि शेवटी कार्यकर्त्यांनी राणा दाम्पत्यांचं दुग्धअभिषेक केला यावेळी पंडित शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्रोपचार म्हटले…शेवटीं 36 दिवसांनी राणा दाम्पत्य आपल्या घरात गेले तेव्हा आमदार रवी राणा यांच्या आईने औक्षणन करून ओवाळणी केली…

Published On - May 29,2022 6:35 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.