Maharashtra News Live Update : नवनीत राणांची जामीनावर सुटका, छातीत दुखत असल्याने लीलावती रूग्णालयात दाखल

| Updated on: May 05, 2022 | 9:30 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : नवनीत राणांची जामीनावर सुटका, छातीत दुखत असल्याने लीलावती रूग्णालयात दाखल
बातम्यांचे सर्वात वेगवान अपडेट्सImage Credit source: tv9

मुंबई : आज गुरूवार 5 मे 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये सुरु असलेल्या पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन या क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या जुगार अड्ड्यावर वर्धा पोलीस दलातील गुन्हे अन्वेशन विभागाने छापा मारुन सहा जुगाऱ्यांना ऑनलाईन सट्टा लावताना रंगेहात अटक केली. ही कारवाई सालोड शिवारात असलेल्या फार्म हाऊसवर करण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 May 2022 07:02 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत आजपासून पुणे दौऱ्यावर

    – थोड्याच वेळात संजय राऊतांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा,

    – हडपसर परिसरात सेनाच्या जाहीर मेळाव्याचं आयोजन,

    – थोड्याच संजय राऊत पोहचणार,

  • 05 May 2022 06:42 PM (IST)

    भाजप नेते किरीट सोमय्या Live

    नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जेलचा अनुभव ऐकूण इंग्रजांचे जेल आठवले

    त्यांना जेलमध्ये अनेक अत्याचारांचा सामना करावा लागाल

    हे फक्त उद्धव ठाकरेंचं माफिया सरकार करू शकतं

    त्यांना कित्येक तास फरशीवर बसवलं

    कित्येक तास बसुही दिलं नाही

    नवनीत राणा यांचे पूर्ण चेकअप करण्याचे निर्देश डॉक्टरांनी दिले आहेत

    रवी राणा यांनाही मानसिक धक्का बसला आहे

  • 05 May 2022 06:03 PM (IST)

    आमदार रवी राणा Live

    नवनीत राणा यांना त्रास होत आहे

    नवनीत राणा यांना गेल्या सहा दिवसांपासून त्रास सुरू होता

    मात्र जेल प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, त्यांना रुग्णालयात दाखल केले नाही

    एका महिला अशा प्रकारची वागणूक देणे कितपत योग्य आहे

  • 05 May 2022 05:24 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Live

    मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी पवारांची इच्छा नाही

    देवेंद्र फडणवीस ब्राम्हण आहेत म्हणून मुख्यमंत्री नाही झाले

    त्यांच्यात कर्तुत्व होतं म्हणून ते मुख्यमंत्री झाले

    भारतीय जनता पार्टी नेहमी मेरिटवर चालते

    कुठल्या तरी एका मिटिंगला बोलवून घेतलं बोलणं हे हस्यास्पद आहे

    मात्र काम यांनी केलं पाहिजे ना

    मागासवर्ग आयोग नेमायला तुम्हाला विरोधक लागतात का

    आम्हाला नाही लागले मराठा समाजाला आरक्षण देताना

    तुम्ही काहीच करत नाही आणि भाजपला दोष देता

    मात्र कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसाल हे ओबीसी समाजाला माहिती आहे.

  • 05 May 2022 04:24 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

    – भाजपला नेमकं कोणत्या दिशेला जायचंय ते कळत नाहीय, भाजप हा पक्ष गोंधळलेला स्थितीत आहे,

    – देवेंद्र फडणवीस एकीकडे, रावसाहेब दानवे एकीकडे ते एकमेकांच्या तंगडीत तंगडी घालत आहेत,

    – भोंग्यांच्या प्रकरणामुळे भाजपने राज ठाकरे यांच्या हाताने हिंदुत्वाचा गळा घोटलाय,

    – राज ठाकरेंनी भूमिका हिंदूत्वाच्या विरोधात आहे,

    – साई मंदिरात, पंढरपूर मंदिरात काकड आरती होऊ शकली नाहीय,

    – पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकत जास्त आहे,

    – मात्र महाविकास आघाडी बहुतेक महापालिकांवर सत्तेवर येऊ शकते,

    – कोर्टाच्या निकालामुळे सर्वच पक्षांची धावपळ झालीय,

  • 05 May 2022 04:23 PM (IST)

    स्वतःच्या आईचा नराधम मुलाने केला खून

    सांगली – जेवणाच्या कारणावरून स्वतःच्या आईचा नराधम मुलाने केला खून,,, डोक्यामध्ये दगड वीट आणि लोखंडी फुकारी घालून मुलाने केला खून.

  • 05 May 2022 03:37 PM (IST)

    हरियाणा पोलिसांनी चार अतिरेकी पकडले

    पकडलेल्या बब्बर खालसा अतिरेक्यांचे नांदेड कनेक्शन आहे का याची तपास सुरू

    नांदेड जिल्ह्यात अतिरेकी रिंदाचे 50 साथीदार अॅक्टीव्ह

    17 जण जेल मध्ये आहेत

    नांदेड पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

  • 05 May 2022 02:51 PM (IST)

    किरीट सोमय्या लिलावती रूग्णालयात दाखल

    किरीट सोमय्या लिलावती रूग्णालयात दाखल

    किरीट सोमय्या नवनीत राणांच्या भेटीला

    नवनीत राणांची विचारपूस करण्यासाठी किरीट सोमय्या रुग्णालयात

  • 05 May 2022 02:17 PM (IST)

    अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर भाजपा किसान मोर्चाचे साखर आयुक्त कार्यालयासमोर पुणे बेमुदत धरणे आंदोलन

    अतिरिक्त उसाच्या प्रश्नावर भाजपा किसान मोर्चाचे साखर आयुक्त कार्यालयासमोर पुणे बेमुदत धरणे आंदोलन

    महाराष्ट्रातील गाळपाविना शिल्लक उभ्या असलेल्या उसाचे तातडीने नियोजन करावे

    एफ आर पी दोन टप्प्यात देण्याचा डाव रचण्यासाठी जाणीव पूर्वक अतिरिक्त उसाच्या समस्या आणखी तीव्र करण्याचा राज्य सरकार व साखर सम्राट यांचा प्रयत्न

    भाजप किसान मोर्चाचा आरोप

    माजी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे धरणे आंदोलन

  • 05 May 2022 02:17 PM (IST)

    सोलापूरच्या कचरा डेपोला भीषाण आग

    – सोलापूरच्या कचरा डेपोला भीषाण आग

    – तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला भीषण आग

    – सोलापूर शहरातील कचरा डेपोच्या परिसरात धुराचे लोट

  • 05 May 2022 02:12 PM (IST)

    नवनीत राणांची जामीनावर सुटका, छातीत दुखत असल्याने लीलावती रूग्णालयाकडे रवाना

  • 05 May 2022 02:00 PM (IST)

    शरद पवार यांच्या पक्षातले गृहमंत्री, आणि इतर मंत्री त्यांचं ऐकत नाही असं आहे का ?

    शरद पवार यांच्या पक्षातले गृहमंत्री, आणि इतर मंत्री त्यांचं ऐकत नाही असं आहे का?

    एनसीपीचे नेते भिडे यांना का वाचवायचा प्रयत्न करत आहेत, हे याचा शोध घेणे, एनसीपी मध्ये नेमकं काय सुरुये हे शोधन हा शोध पत्रकारीतेचा भाग आहे

    शरद पवार यांची वेगळी लाईन आणि मंत्र्यांची एक वेगळी लाईन…

    ही केस लढणाऱ्या वकीलांना सल्ला आहे की भिंडेच्या विरोधात जी कारवाई झालीये त्याची सर्व माहिती कोर्टात सादर करावी,ऑबजेक्शन घेतील वकील

    जिल्हा न्यायालयाने जर मान्य केलं नाही तर सुप्रीम कोर्टात रिट पिटीशन दाखल करावी

  • 05 May 2022 01:42 PM (IST)

    तपास अधिकारी यामध्ये अडचणीत येऊ शकतो, त्यामुळे त्याने नीट चौकशी करावी – प्रकाश आंबेडकर

    ज्या तपासी अधिकाऱ्याने संभाजी भिडे यांना क्लीनचीट दिली

    त्याने सुप्रीम कोर्टात जे प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं, त्यात म्हटलं होतं संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे नुसते आरोपी नाहीत तर कॉन्स्पिरेटर पण आहेत, त्यांच्यामुळे दोषी सुद्धा आहेत

    तपास अधिकाऱ्यांने लक्षात घ्यावं 49 लोकांवर केसेस दाखल झाल्यात त्यामुळे त्यांना कोर्टात हजर रहावं लागेल

    तपास अधिकारी यामध्ये अडचणीत येऊ शकतो, त्यामुळे त्याने नीट चौकशी करावी

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोर आज साक्ष होतीये

    या केस मधल तथ्य बाहेर आलेले नाही, अस मोठं विधान शरद पवार यांनी केलं होतं

    त्याच बरोबर याबाबतचे सगळे कागदपत्रे आपल्याकडे आहेत असेही ते म्हणाले होत, त्यांनी ती सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत

    तपास अधिकाऱ्याला नंतर वाचवायला कोणी येणार नाही, त्यामुळे त्याने आत्ताच खर काय आहे ते सांगाव

    राष्ट्रवादीतले अनेक नेते हे संभाजी भिडे यांच्या पाया पडताना दिसतात

    जो माणूस संभाजी भिडे यांच्या पाया पडतो तो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय, असे एनसीपी मध्ये एक नाही अनेक आहेत ते सगळयांना माहिती आहे

    हे नेते कोण आहेत, हे चौकशीत समोर येईल

    शरद पवार यांच विधान आहे हे सगळं फॉर्ड आहे या नंतर एनसीपीतले काही नेते संभाजी भिडे यांच्यासोबत दिसतायेत

  • 05 May 2022 01:40 PM (IST)

    आमदार गणेश नाईक मोठे व एक दिशा देणारे नेतृत्व आहे – रामचंद्र घरत

    कोणीतरी 27 वर्षे एकत्र आल्याचा आरोप करतो मला धमकी व तसेच दमदाटी केली हे चुकीचे आरोप न्याय देवता सहन करणार नाही. आज खऱ्या अर्थाने नाईक साहेबांना न्याय मिळाला आहे

    विरोधकांनी राजकारण केल्याशिवाय नवी मुंबईत काहीच केले नाही आहे. गेली पंचवीस वर्ष आमदार गणेश नाईक सत्तेत आहेत त्यांच्यावर अमाप लोकांचे प्रेम आहे विरोधकांनी राजकारण करू नये अशी विनंती करतो

    कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष असणारच कारण आमदार गणेश नाईक मोठे व एक दिशा देणारे नेतृत्व आहे. न्याय मिळाल्याने अनेक कार्यकर्ते मध्ये उत्साही झालेले आहे, व जल्लोष करताना कार्यकर्ते दिसत आहेत.

  • 05 May 2022 01:30 PM (IST)

    आदित्य ठाकरे आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचा सात कोटींचा ट्रांजेक्शन समोर आलं आहे

    संजय राऊत उद्धव ठाकरे यांचा भंगार या भुंग्याला हिम्मत आहे तर सुप्रीम कोर्टात जाऊन एफिडेविट फाईल करा पहाटे पाच वाजता वाजणारे भोंगे उतरवले हे या भुंग्याला कळत नाही का

    फक्त भोंगे उतरवायचा काम नाही माझ्या गणेशोत्सवामध्ये हे भोगे उतरत होते

    तुम्ही पूर्ण हिरवे झालेले  आहात ना . आम्ही भगवा रंग आणि हिंदुत्वाचे रक्षण करणार आहोत

    खूप मोठी जबाबदारी मला दिली आहे महाराष्ट्र हा भ्रष्टाचार मुक्त करण्याचा काम हे मला जनतेने दिला आहे आणि ते मी करत आहे

    आदित्य ठाकरे आणि नंदकिशोर चतुर्वेदी यांचा सात कोटींचा ट्रांजेक्शन समोर आलं आहे

    नंदकिशोर चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या 15 कंपन्यांसोबत ट्रांजेक्शन केलं आहे

  • 05 May 2022 01:02 PM (IST)

    चंद्रपुरात मनसेने आयोजित केली महाआरती आणि हनुमान चालीसा पठण,

    चंद्रपुरात मनसे ने आयोजित केली महाआरती आणि हनुमान चालीसा पठण,

    शहरातील पाणी टाकी परिसरातील संकट मोचन हनुमान मंदिरात केली महाआरती,

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील भोंगे व त्यांचे नियमन करण्याची व्यक्त केली गरज,

    सामान्य नागरिकांना होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या त्रासाबाबत राज ठाकरे यांनी स्पष्टपणे विचार मांडल्याचे मत,

    सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याविषयी मनसे कार्यकर्त्यांचा आग्रह,

    महाआरतीदरम्यान पोलिसांनी ठेवला बंदोबस्त

  • 05 May 2022 12:22 PM (IST)

    अहमदनगरच्या विशाल गणपती मंदिरात मनसेकडून महाआरती

    अहमदनगरच्या विशाल गणपती मंदिरात मनसेकडून महाआरती…

    मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकऱ्यांच्या हस्ते आरती…

    शहरातील अनधिकृत भोंगे जोपर्यंत उतरवले जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार…

    कालपासून शहरातील अनेक मशिदीमध्ये भोंग्यांविना अजान…

  • 05 May 2022 12:18 PM (IST)

    – ओबीसी आरक्षणाबाबत आलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी

    – ओबीसी आरक्षणाबाबत आलेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी – राज्यसरकारच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने विरोधात निकाल दिला

    – ओबीसींवर झालेल्या अन्यायाला उद्धव ठाकरे जबाबदार – ओबीसींवरील अन्याय दूर करण्यासाठी आगामी निवडणुकीत सर्व पक्षांनी ओबीसींना पक्षीय आरक्षण द्यावं – ओबीसी आणि मराठा आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार अपयशी – राज्य सरकारने चुकीच्या हातात न्याय प्रक्रियेचं काम दिल्याने फटका

    – मराठी आणि हिंदुत्वाला तिलांजली देण्याचं काम सेनेने केलं – शिवसेनेकडे आता हिंदुत्वावर बोलण्यासारखं काही नाही

    – सध्या राज्यात मनसे आणि सेनेचं भावकीचं भांडण सुरूय

    – भाजप – मनसे एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी चांगलं – कोणत्या मुद्द्यावर एकत्र यावं ते त्यांनी मिळून ठरवावं

    ऑन दानवे वक्तव्य – मुख्यमंत्री कर्तुत्वाने होतो, जातीने नाही – इच्छा व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार, दानवेंनी व्यक्त केलेल्या मतबाबत काही चुकीचं नाही

    – संभाजी भिडेंना क्लिनचीट मिळाली – आता महविकास आघाडीचं सरकार आहे, तेव्हा फडणवीसांवर टीका करण्यात आली

    – मागील एक वर्षात राज्य सरकारनं मराठा समाजाचा खुळखुळा केला, खेळणे बनवलं – वेगेगळ्या मराठा संघटनांच्या नेत्यांना वेगवेगळं बोलवायचं, तोंड चोंबडेपणा करायचा

    – ऑन गुणरत्न सदावर्ते – काही करून प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी समजात स्थान असेल, अशा व्यक्तींवर टीका टिपण्णी करतात – छत्रपतींबदल गरळ ओकण्याचं काम केलं

    – प्रतिक्रिया व्यक्त करत असताना कुणी कायदा हातात घेऊ नये

  • 05 May 2022 12:17 PM (IST)

    2 इसमाना अंबरनाथ शहरात 15 दिवसा पर्यत प्रवेश करण्यास बंदी

    आज रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या इसमां पैकी कलम 151 (1) फौजदारी प्रक्रीया संहिता अन्वये 60 इसमांवर कारवाई करण्यात आली ,तसेच कलम 151 (3) अन्वये 69 इसमांवर कारवाई करण्यात आली. तसेच कलम 68 महाराष्ट्र पोलीस कायदान्वये 45 इसमांवर आणि कलम 107 फौजदारी प्रक्रीया संहिता अन्वये 2 इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.

    कलम 151 (3) फौजदारी प्रक्रीया संहिता अन्वये कारवाई केलेल्या एकुण 69 इसमांपैकी 55 इसमाना मा.न्यायालयाने 5000 रुपये ते 15,000 रुपयाच्या पीआर बॉन्ड भरून चांगली वर्तवणुक व शांतता राखण्याच्या अटीव 2 इसमाना अंबरनाथ शहरात 15 दिवसा पर्यत प्रवेश करण्यास बंदी र मुक्त केले आहे. तसेच 12 इसमाना मा.न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, ठाणे यांनी पुढील 30 दिवसांपर्यंत संबधीत पोलीस ठाणेस हजेरी लावण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच मा.न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, उल्हासनगर यांनीघातलेली आहे.

    सध्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात कलम 37 (1) (3) महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 144 प्रमाणे प्रतिबंधक आदेश लागु करण्यात आलेले आहेत. त्यानुसार कोणीही विनाकारण जमाव जमवु नये याची नागरिकांनी दक्षता घ्यावी तसेच कायदा व सुव्यवस्थेचे भान राखुन आपआपल्या परिसरात शांतता राखावी व जातीय सलोखा अबाधित ठेवावा असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात येत आहे.

  • 05 May 2022 12:16 PM (IST)

    जात धर्मापेक्षा देवेंद्र फडणवीस सीएम होणे, हे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे

    – जात धर्मापेक्षा देवेंद्र फडणवीस सीएम होणे, हे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे – अजित पवारही योग्यच बोललेत. – ओबीसी आरक्षणाला सरकार नख लावणार याची आम्हाला भिती होती. आरक्षण घालवण्याचे राज्य सरकारचे सोची समजी असं षडयंत्र आहे. ज्या विकास गवळीने याविरोधात याचिका केली तो काँग्रेसचा आहे.तो कुठल्या काँग्रेस नेत्याच्या जवळचा आहे. – राज्य सरकारचा विलंब हा कटाचा भाग आहे – निवडणुकीसााठी हम तय्यार है. पळपुटे तर सत्ताधारी आहेत – सेना आणि काँग्रेस प्रवक्त्यांच्या हिरव्या उचक्या वाढतायेत. हिंदू मंदिरांवरील भोंगे मुद्दामहून काढली जातायत – शक्तीपीठे,तीर्थस्थाने आणि प्रार्थनालयात फरक आहे. शक्तीपीठ,तीर्थस्थानात साऊंड सिस्टीम गरजेची.याठिकाणी साऊंड सिस्टीम काढाल तर आम्ही विरोध करू – संजय राऊतांचे अस्तित्वच दुस-या पक्षाच्या खांद्यावर आहे. त्यांनी यावर बोलू नये

  • 05 May 2022 12:15 PM (IST)

    महानिर्मिती 400 KV खारघर तळेगाव लाईनमध्ये ब्रेकडाऊन झाल्यामुळे बत्ती गुल

    महानिर्मिती 400 KV खारघर तळेगाव लाईनमध्ये ब्रेकडाऊन झाल्यामुळे बत्ती गुल

    वाशी आणि कोपेरखैरणे परिसरात लाईट नाही

    त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास

  • 05 May 2022 12:15 PM (IST)

    भावना गवळीने आधीच येऊन पैसे जमा करावे नाहीतर कुणीतरी कोर्टात जाणार कारवाई होणार

    – हनुमान चालिसा म्हणणारा ज्याला कुणी ठाकरे सरकार त्रास देणार त्यांच्याकडे मी जाणारच.. राणा दांपंत्यांची भेट घेणार, हनुमानाचं नाव घेतलं तर एवढी भीती वाटली… यांच्या पोटात पाप आहे…

    – भावना गवळीने आधीच येऊन पैसे जमा करावे नाहीतर कुणीतरी कोर्टात जाणार कारवाई होणार…

    – प्रदिप शर्मा आणि वाझे यांची नियुक्ती ऊद्धव ठाकरेंनी केली, फाईल गायब केली, दोघे सेनेचे पदाधिकारी… हाच हेतू होता का ठाकरेंचा

    – संजय राऊतांविरोधात मुलूंड पोलिय ठाण्यात मेदा सोमय्यांच्या मार्फत गुन्हा दाखल केला जाणार, क्रिमिनल केस दाखल करणार… अवमान याचिका हायकोर्टात दाखल करणार…

    – मी मर्सिडीज बेबी असं काही बलणार नाही, ७ कोटींची इंट्री नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडून आली आहे… नंदकिशोरला ऊत्तर द्यावंच लागणार, ७ कोटींची हिशोब देयावा लागणार…

    – ७ कोटींचा हिशोब अदीत्या ठाकरेंना द्यावाच लागणार, मामा श्रीधर पाटणकर यांची सात कोटींची संपत्ती अटॅच, अदीत्य ठाकरे यांनाही हिशोब द्यावा लागणार… इडीला विनंती करणार की याची सखेल चौकशी करावी…

  • 05 May 2022 12:14 PM (IST)

    उन्हामुळे नागपूरातील २१ सिग्नल दुपारी बंद

    – उन्हामुळे नागपूरातील २१ सिग्नल दुपारी बंद

    – नागपूर वाहतूक पोलीसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

    – १२ ते ४ या वेळात ट्राफीक सिग्नल राहणार बंद

    – सिग्नलवर थांबल्याने दुचाकीचालकांना उन्हाचा त्रास

  • 05 May 2022 11:22 AM (IST)

    धर्माधर्मात वाद निर्माण करायचा प्रयत्न आहे – रामदास आठ

    – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांचे पत्रकार परिषदेतील मुद्दे

    – सर्वधर्मियांनी एकोप्याने नांदले पाहिजे अशी भारतीय संविधानाची भूमिका आहे

    – मुस्लिम समाजाचे आहेत भोंगे तुम्ही करताय सोंगे

    – धर्माधर्मात वाद निर्माण करायचा प्रयत्न आहे

    – हा विषय सामाजिक नसून धार्मिक आहे

    – भोंग्याबाबत नियमावली होऊ शकते मात्र त्यावरून वाद करु नये

    – धार्मिक परंपरा जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे

    – राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर विविध रंगी झेंडा घेतला होता मात्र अचानक त्यांनी भगवा रंग घेतला

    – राज ठाकरेंनी भगवा रंग घेतला असेल तर त्यांनी दोन समाजात वाद निर्माण करु नये

    – पोलिसांनी बळजबरीने भोंगे काढण्याचा प्रयत्न करु नये

    – पोलिस आमच्यावर दबाव आणून भोंगे काढायला लावतात असे मुस्लिम समाजातील लोकांनी निवेदन दिले

    – मुस्लिमही आपलेच आहेत ते काय बाहेरून आले नाहीत

    – पोलिसांनी हे प्रकरण शांततेने हाताळावे

    – ओबीसी आरक्षम मिळत होते मात्र सुप्रीम कोर्टात व्यवस्थीत बाजू मांडली नाही त्यामुळे आरक्षण स्थगित झाले

    – प्रमोशन मध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय राज्यावर सोपवला आहे त्याबाबत उध्दव ठाकरेंनी निर्णय घ्यावा

    – भूमीहीनांना जमीन देण्याबाबत निर्णय घ्यावा

    – देशात 22 लाख एकर जमीन पडून आहे. त्यापैकी भूमीहिनांना 5 एकर जमीन द्यावी.

    – मराठा समाजाच्या आरक्षणावर मार्ग काढावा. जर मार्ग काढता येत नसेल तर सत्ता सोडून द्यावी.

    – एनडीए 400 च्य पुढे जाईल

    – 2024 पर्यंत सरकार पडले तर आम्ही भाजपसह सरकार बनवायला तयार आहोत

    – कॉंग्रेस पक्षाने अपमान सहन न करता सत्तेतून बाहेर पडावे

    – कॉंग्रेसच्या आमदारांना निधी मिळत नसल्याने ते नाराज आहेत

    – सरकार पडावे अशी आमची इच्छा आहे मात्र सरकार पडत नाही

    – नवनीत राणावर सरकारने अन्याय केला. त्यांच्यावर राजद्रोह दाखल करणे चुकीचे आहे. कायद्याचा गैरवापर केला जात आहे

    =============

    ऑन राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करतात ? :

    – राज ठाकरे बाळासाहेबांची कॉपी करु शकत नाहीत.

    – बाळासाहेबांनी मुस्लिम समाजाला पाठिंबा होता.

    – भोंगे काढावेत अशी बाळासाहेबांची भूमिका नव्हती

    – दहशतवादी मुस्लिमांना विरोध होता

    – बाळासाहेबांची कॉपी करणे एवढे सोपे नाही.

    =============

    – ऑन मनसे इन NDA

    – मनसे सांगतो मनसेचा आम्हाला फायदा नाही

    – राज ठाकरे एनडीएत गरज नाही. बीजेपी स्ट्रॉंग आहेत मनसेची गरज त्यांना नाही.

    – भूमीहीनांना जमीन मिळावी यासाठी 10 तारखेला निदर्शने मोर्चे होणार

    ———————-

    – रामदास आठवले ऑन भिडे गुरुजी क्लीन चीट

    – भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली गेली.

    – त्या दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही

    – संभाजी भिडे यांना क्लिन चीट मिळाली असेल. कारण त्यांच्याविरोधात पुरावे नसतील.

    – संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे

    – याविरोधात आम्ही पुन्हा कारवाईची मागणी करणार

  • 05 May 2022 11:21 AM (IST)

    भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली गेली

    – भीमा कोरेगाव दंगल ही जाणीवपूर्वक घडवली गेली.

    – त्या दंगलीचा आणि एल्गार परिषदेचा काहीही संबंध नाही

    – संभाजी भिडे यांना क्लिन चीट मिळाली असेल. कारण त्यांच्याविरोधात पुरावे नसतील.

    – संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे

    – याविरोधात आम्ही पुन्हा कारवाईची मागणी करणार

  • 05 May 2022 11:21 AM (IST)

    जे हिरेटज डिक्लेर आहे, अशा जागा मुंबईतून विकल्या जात आहे – अशिष शेलार

    जे बांधकाम सरकारी जागेवर आहे

    जे हिरेटज डिक्लेर आहे अशा जागा मुंबईतून विकल्या जात आहे

    मुंबईतल्या ब्रॅंडस्टॅंड येथे ताज हॉटेलच्या बाजूला महाराष्ट्र राज्य सरकारची जागा आहे

    समुद्र किनारी एक एकर जागा आहे

    ती सध्या भाडेपट्ट्यावर आहे

    ती एक ट्रस्टला दिली होती

    १९८० त्यांचा करार संपला अशी मोक्याची जागा

    विकास आराखड्याप्रमाणे ती जागा राज्य सरकारच्या महसूल खात्याअंतर्गत असतानाही एका रूस्तमजी नावाच्या विकासला विकण्यात आली…

    जागेचा आजचा दर, एक हजार तीन कोटी रूपये होणार आहे

    दोनशे कोटी रूपयात विकण्यात आली आहे

    रूस्तमजी विकासकाचे कोणत्या मंत्र्याचे अधिक संबंध आहेत

    ही जागेची विकण्याची परवानगी का दिली

    विकासकाला देण्याचा निर्णय घेण्यात आला

    जी जागा महाराष्ट्र सरकारच्या मालकिची…

    विकासकाने विकण्याची परवानगी

    किमान चार पाच करोडमध्ये एक हजार कोटीच्या जागेला

    एक हजार कोटीचं नुकसान झालं

  • 05 May 2022 11:20 AM (IST)

    जे बांधकाम सरकारी जागेत आहे, हेरीजेट वास्तूमधल्या जागा विकल्या जागा विकल्या जात आहेत..

    जे बांधकाम सरकारी जागेत आहे, हेरीजेट वास्तूमधल्या जागा विकल्या जागा विकल्या जात आहेत..

    वांद्रेतील बॅन्ड स्टॅंड, वांद्रे ताज हॉटेलच्या बाजूला महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ५०८१ यार्ड… जवळजळ १ एकर पाच गुंढे जागा.. समुद्र किनारी जी भाडेपट्ट्यावर लीजवर 1905 पासून एका ट्रस्टला दिली गेली होती.. ज्या ट्रस्टचं लीज 1980 ला संपला, अशी मोक्याची जागा त्यावेळाला सरकारनं समाजातील आजारी पडलेल्या लोकांना विश्रांतीची जागा या हेतून दिलेला होती.. हेतू रुग्णांना विश्रांतीसाठी बरं होण्यासाठीची जागा अशी होती.. रिहॅबिलिटेशन सेंटर असं आरक्षणही या जागेवर टाकण्यात आलं होतं. २०३४त्या विकार आराखड्याप्रमाणे

    ही जागा राज्य सरकारच्या महसूल खात्याकडे.. लीज संपलेलं असलेलंय.. एका इम्पिरीयल इन्फा प्रा. लि. रुस्तमजी या विकासकाला कवडीमोल भावात विकली…

    ज्या जागेत नेट प्रॉफिट आजच्या तारखेत रुस्तमजी नावाच्या बिल्डरी १००३ कोटी रुपयांचा होणार आहे.. हा एवढा फायदा होणाऱ्या भूखंडाला केवळ २३४ कोटी रुपयांत विकण्याचा सगळ्या परवानग्या त्या ट्रस्टला आणि कलेक्टरने महसूल खात्याच्या मार्फत दिल्या गेल्यात…

    या रुस्तमची विकासकाचे मविआसोबत कुणल्या मंत्र्याशी लागेबंधे आहेत? विकासकाला 1090 फूट मालकीवर का दिली गेली?

  • 05 May 2022 11:06 AM (IST)

    बाळासाहेबांच्या फटकारांनी कुणालाही सोडलं नाही

    बाळासाहेबांच्या फटकारांनी कुणालाही सोडलं नाही

    व्यंगचित्रांच्या कुचल्यापुढे आणि नतमस्तक होतो

    ज्यांच्यामध्ये क्षमता होती असं आम्हाला वाटतं त्यांनी भोंग्याचा राजकारण सुरू केलं आहे

    कालपासून लाखो लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे

    मशिदी राजकारण सुरू केलं,

    बाळासाहेबांनी व्यंगचित्रामधून पुढे आहे

    महाराष्ट्रात आज वेगळं चित्र पाहायला आहे

    आज जागतिक व्यंगचित्र दिवस आहे

    बाळासाहेब हे प्रसिध्द व्यंगचित्रकार होते

    एक कार्टुन अनेकांना घाबरवत

    मोठ्या नेत्यांना त्यांनी घाबरवलं

  • 05 May 2022 10:58 AM (IST)

    अनेक मनसैनिकाना शहर हद्द सोडण्याच्या नोटीस

    नाशिक – अनेक मनसैनिकाना शहर हद्द सोडण्याच्या नोटीस

    नोटीस नंतर मनसैनिक बॅगा घेऊन निघाले..

    सरकारच्या दबावात पोलीस कारवाई करत असल्याचा मनसैनिकांचा आरोप

    14 जणांना हद्दपारीची नोटीस, तर 100 हुन अधिक कार्यकर्त्याना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस

  • 05 May 2022 10:58 AM (IST)

    शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्छ आहे – अजित पवार

    शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्छ आहे

    काय आता भूमिका घेतली पाहिजे

    आता त्याला किती काळ द्यावा लागेल

    निकाल असा लागल्यामुळे ते बोलू शकतात

    आम्ही सगळ्यांनी एकमताने निर्णय दिला

    नाही झालं योग्य सरकारने केलं

    ज्यावेळी आरक्षण होतं, त्यावेळी कुठूनतरी प्रमाणपत्र आणायचं असं सगळं चालतं होतं

    मुख्यमंत्री कोणत्याही जातीचा होऊ शकतो

    १४५ चं बहुमत आणा आणि मुख्यमंत्री व्हा

  • 05 May 2022 10:52 AM (IST)

    नियम लावायचा म्हटलं तर, सगळ्यांना कम्पलरी आहे – अजित पवार

    तुम्ही कोणता मुद्दा घ्यायचं

    नियम लावायचा म्हटलं तर, सगळ्यांना कम्पलरी आहे

    सर्व धार्मिक स्थळांना नियम सारखे राहतील

    त्या अटीचं उल्लंघन झालंय असं आपण म्हणू

    कुणी कारण नसताना, कायदा नियम मोडण्याचा प्रयत्न करू

    कायद्याने सरकार चालत असते…

    सगळ्यांना नियमसारखे

    काकड आरती रोज असते

  • 05 May 2022 10:45 AM (IST)

    अल्टीमेटमची भाषा कुणी करू नये – अजित पवार

    अल्टीमेटमची भाषा कुणी करू नये

    त्याच्यामध्ये लेखी परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पिकर वापण्यात येणार नाही

    सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी परवानगी देण्यात आली आहे

    जे कुणी कायदा सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कारवाई होईल

    आणि यानंतर तिथल्या प्रमुख्याने आव्हान केलं

    कायदेशीर कारवाई केली नाही

    परंतु काही दिवस तिथलं मोठ्या प्रमाणावर मशिदी आणि मंदीरावरती उतरण्याचं काम देखील केलं आहे

    आपल्या राज्यात आम्ही महापुरुषांची नावे घेतो, तसेच त्यांच्या विचाराने आपलं राज्य चाललं आहे

    आपल्या राज्यात जेवढी धार्मिक स्थळ आहेत.

    अजूनही काही परवानग्या घ्यायच्या बाकी असतील तर त्या घ्याव्यात

    महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था राहावा यासाठी मी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतो

  • 05 May 2022 10:15 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू

    राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू

    मस्जिदिवरील भोंग्यांचा आवाज येताच कंट्रोल रूमवर पडणार फोन कॉल्सचा पाऊस

    भोंग्यांचा आवाज येताच अनेक नागरिक करणार 100 नंबरवर कॉल

    100 नंबरवर कॉल करून देणाऱ्या भोंग्याच्या त्रासाची तक्रार

    लवकरच होणार मनसे कडून नव्या आंदोलनाची सुरुवात

  • 05 May 2022 10:15 AM (IST)

    मनसे ,शिवसेने सभा घेतल्या नंतर MIM घेणार भव्य सभा..

    मनसे ,शिवसेने सभा घेतल्या नंतर MIM घेणार भव्य सभा..

    आम्ही सभा घेणार,खासदार इम्तियाज जलील यांचे वक्तव्य..

    औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी सभा घेतली ,शिवसेना घेणार असेल तर मग MIM ही सभा घेणार – जलील..

    औरंगाबादेत मनसे, शिवसेना नंतर MIM घेणार सभा..

    मी सभा घेणार,असता कोण थांबणार मला -जलील यांचे खुले आव्हान..

  • 05 May 2022 10:14 AM (IST)

    वसंत मोरे यांची फेसबुक पोस्ट

    – पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मी तिरुपती बालाजीला आहे. पण मी सध्या पुणे शहराचे नाहीतर माझ्या प्रभागाचे नेतृत्व करतोय, साहेबांच्या आदेशा नंतर मी माझ्या भागातील मस्जिद प्रमुखांसोबत लोकप्रतिनिधी म्हणून बोललो आणि त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली आणि आजची नमाज भोंग्याविना केली आणि भविष्यात ही सहकार्य करू असे सांगितले. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक आभार…!

  • 05 May 2022 10:14 AM (IST)

    भोंगे वाजवणाऱ्या मस्जिदना पोलिसांनी नोटीसी द्याव्यात

    भोंगे वाजवणाऱ्या मस्जिदना पोलिसांनी नोटीसी द्याव्यात

    मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी

    मस्जिदिना नोटीसी देण्यासाठी प्रकाश महाजन घेणार पोलीस आयुक्तांची भेट

    एमआयएमच्या सभेला आमची हरकत नसल्याचा खुलासा

  • 05 May 2022 10:14 AM (IST)

    नागपूरात स्टार बसला लागली आग

    नागपूरात स्टार बसला लागली आग

    नागपूच्या संविंधान चौकातील घटना

    बसमध्ये ४५ प्रवांसी होते

    थोडक्यात बचावला प्रवाशांचा जीव

  • 05 May 2022 10:13 AM (IST)

    राज ठाकरेंनी पुढचा आंदोलनाचा टप्पा दिल्याप्रमाणे आंदोलन होणार,

    – नॉटरीचेबल असणारे पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर झालेत रीचेबल,

    – पोलीस कारवाईमुळे मला समोर येता आलं नसल्याचं बाबर यांचं स्पष्टीकरण,

    – मात्र शहरातील सर्व घडामोडींवर काल माझं लक्ष होतं बाबर यांची टीव्ही 9 ला प्रतिक्रिया,

    – राज ठाकरेंनी पुढचा आंदोलनाचा टप्पा दिल्याप्रमाणे आंदोलन होणार,

    – आंदोलनाची यापुढील दिशा लवकर स्पष्ट करणार, बाबर यांची माहिती.

  • 05 May 2022 10:13 AM (IST)

    गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल

    गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये दाखल

    छत्रपती घरण्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारा मराठा आरक्षणास बाधा निर्माण करणारा सदावर्तेची होणार पोलिस स्टेशनला चौकशी

    अमर पवार यांनी केला होता गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल

  • 05 May 2022 09:47 AM (IST)

    सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान महापालिकेची टीम राणा दाम्पत्याच्या घरी पोहचणार

    सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान महापालिकेची टीम राणा दाम्पत्याच्या घरी पोहचणार

    काल देखील पालिकेची टीम राणा दाम्पत्याच्या या खार इथल्या घरी पोहचली होती , नोटीस चिटकऊन ही टीम परतली होती

    २ मे रोजी राणा दाम्पत्याच्या खार इथल्या घरी महापालिकेने नोटीस दिली होती ,

    ४ तारखेला पालिका अधिकारी पाहणी साठी घरी येतील या अशायची नोटीस तेव्हा देण्यात आली होती

    नवीन राणा यांच्या घराच्या मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम झाल्याचा, नियमांचे उल्लंघन झक्याची तक्रार पालिकेला प्राप्त झाली होती , त्यानंतर पालिकेने ही नोरीस दिली होती

  • 05 May 2022 08:53 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात राञी आलेल्या वादळामुळे वातावरण झाले थंड

    गडचिरोली जिल्ह्यात राञी आलेल्या वादळामुळे वातावरण झाले थंड

    काल रात्री दोन वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत छत्तीसगड सीमावर्ती भागात वसलेल्या तालुक्यात वादळ होता

    या वादळामुळे अहेरी मुलचेरा एटापल्ली सिरोंचा भामरागड या तालुक्याचे वातावरण थंड झाले व तापमान घसरले आहे

    महाराष्ट्र लागुन असलेल्या तेलंगणा राज्यातील काही भागात पाऊस पडला

  • 05 May 2022 08:45 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू

    राज ठाकरे यांच्या भोंगा आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू

    मस्जिदिवरील भोंग्यांचा आवाज येताच कंट्रोल रूमवर पडणार फोन कॉल्सचा पाऊस

    भोंग्यांचा आवाज येताच अनेक नागरिक करणार 100 नंबरवर कॉल

    100 नंबरवर कॉल करून देणाऱ्या भोंग्याच्या त्रासाची तक्रार

    लवकरच होणार मनसे कडून नव्या आंदोलनाची सुरुवात

  • 05 May 2022 08:45 AM (IST)

    पुण्यातील कोंढवा परिसरात भोंग्याविना झाली अजान

    – पुण्यातील कोंढवा परिसरात भोंग्याविना झाली अजान,

    – कोंढवा पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे मुस्लिम समाजाकडून पालन,

    – याच कोंढवा परिसरात सर्वाधिक मज्जीद आहेत,

    – मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी घेतली विशेष खबरदारी,

    – कालही भोंग्याविनाच झाली होती अजान

  • 05 May 2022 08:43 AM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे

    -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे त्याचा मोठा फटका पिंपरी चिंचवड मधील उमेदवारांना ही होणार आहे

    -पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे

    -आरक्षनाविना निवडणूक होणार असल्याने नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून अर्थात ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी हिरावली आहे

    -ओबीसी आरक्षण नसल्याचा सर्वाधिक फटका कुणबी, माळी समाजाला बसला आहे. कारण, मागील निवडणुकीत 35 जण ओबीसी प्रवर्गातून निवडून आले होते. त्यात सर्वाधिक भाजप नगरसेवकांचा समावेश

    -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत 46 प्रभाग तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी तर 22 जागा अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते तर 38 जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या

  • 05 May 2022 08:43 AM (IST)

    चंद्रपुरात दुकानातील नोकरच निघाले आरोपी

    चंद्रपुरात दुकानातील नोकरच निघाले आरोपी,

    शहरातील सुलभ प्रोविजन या दुकानातून बँकेत नेली जात होती रक्कम,

    व्यवसायाची रक्कम घेऊन जात होता दिवाणजी, 1 लाख 78 हजार रु. ची रक्कम घेऊन जात असलेल्या दिवाणजीला रस्त्यात अडवून रकमेची बॅग लांबवली,

    अत्यंत वर्दळीच्या मुख्य मार्गालगत एका गल्लीत लुटली रक्कम,

    तक्रार  प्राप्त होताच शहर पोलिसांनी सुरू केला तपास, प्राथमिक माहिती आणि सीसीटीव्हीतील पोशाखावरून दुकानातील नोकरावर बळावला संशय,

    पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस करताच उलगडली साथीदारांची नावे, रुपेश लांडगे या नोकराने ताज कुरेशी आणि रितीश वालकोंडावार या दोघांच्या संगनमताने रचला कट,

    पोलिसांनी 3 आरोपींसह रोख रक्कम घेतली ताब्यात

  • 05 May 2022 08:43 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या भाषणाचीही न्यायिक यंत्रणेकडून तपासणी सुरू

    राज ठाकरे यांच्यावरील गुन्हा दाखल प्रकरण

    औरंगाबाद पोलिसांकडून पुराव्यांची पडताळणी सुरू

    व्हिडीओ आणि ऑडिओची पडताळणी सुरू

    राज ठाकरे यांच्या भाषणाचीही न्यायिक यंत्रणेकडून तपासणी सुरू

    पुरावे पडताळणीचे काम पूर्ण होताच राज ठाकरे यांना पाठवणार नोटीस

  • 05 May 2022 07:27 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

    – नागपूर जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

    – राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

    – निधन, राजीनामा किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी पोटनिवडणूक

    – 5 मे 2022 रोजी तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक

    – 13 मे ते 20 मे दरम्यान सुटीचे दिवस वगळून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील

    – अर्जाची छाननी 23 मे 2022 रोजी, ५ जूनला मतदान

    – 6 जून रोजी मतमोजणी होईल.

  • 05 May 2022 07:27 AM (IST)

    मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे आणि मशिद ट्रस्टींची महत्वपुर्ण बैठक

    – राज ठाकरेंच्या भोंगा मुद्यावरुन पुण्याच्या ग्रामीण भागात हिंन्दु -मुस्लिम ऐक्यासाठी मनसे आणि मुस्लिम बांधवांची एकत्र बैठक…!

    – मशिदीवरील भोंगे बंद ठेवण्याबाबत मनसे आणि मशिद ट्रस्टींची महत्वपुर्ण बैठक

    – खेड तालुक्यातील १४ मशिदीवर नियमांचे पालन करुन अजान पठन करण्याचे मुस्लिम बांधवांचे मनसेला वचन…

    – मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्या समवेत मुस्लिम बांधवासह मशिद ट्रस्टींचे अध्यक्ष यांची बैठक पडली पार.

  • 05 May 2022 07:23 AM (IST)

    शिर्डी साईबाबांची काकड आरती स्पीकरविनाच…

    शिर्डी साईबाबांची काकड आरती स्पीकरविनाच… पोलिस प्रशासनाकडून स.६ ते १० वाजेपर्यंत स्पीकर परवानगी…. आवाजाची मर्यादाही पाळावी लागणार…. वेळेच्या निर्बंधांमुळे साईबाबांच्या काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीवर परिणाम…. साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी…. आज काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये संभ्रम….

  • 05 May 2022 07:22 AM (IST)

    ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता

    – ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता

    – पाणीपुरवणा योजनेतील वीज बिलाचे ४७ लाख रु. थकीत

    – वीज बिल थकीत असल्याने कनेक्शन कधीही कट होऊ शकते

    – महावितरणच्या नागपूर परिमंडळात पाणीपुरवठा योजनेचे ४१५८ कनेक्शन

    – वीज बिलाची वसूली न झाल्यास पाण्याचे कनेक्शन कट होऊ शकतात

  • 05 May 2022 07:22 AM (IST)

    नागपूरातील महात्माफुले मार्केटमधील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

    – नागपूरातील महात्माफुले मार्केटमधील इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग

    – रात्री ८ः३० च्या सुमारास लागली आग

    – आगीत दुकानातील इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जळून खाक

    – आगीमुळे १० लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज

    – अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने दोन तासांत आग नियंत्रणात

  • 05 May 2022 06:43 AM (IST)

    मालेगावात हिंदू-मुस्लीम बांधावामध्ये सलोख्याचे चित्र..

    मालेगावात हिंदू-मुस्लीम बांधावामध्ये सलोख्याचे चित्र..

    मशिदीत रमजान ईद व अक्षयतृतीयेच्या निमित्ताने हिंदू मुस्लीम बांधवांचा शुभेच्छापर कार्यक्रम..

    हिंदू मुस्लीम बांधावामध्ये सलोखा पहावयास मिळाला..

    हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत शिरखुरमाचा वाढवला गोडवा..

  • 05 May 2022 06:42 AM (IST)

    बुधवारी दिवसभरात 292 मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

    मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी मनसेने पुकारलेल्या आंदोलना प्रकरणात पोलिसांची बुधवारी दिवसभरात 292 मनसे कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर 58 जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले

  • 05 May 2022 06:42 AM (IST)

    औरंगाबादच्या सेवन हिल परिसरातील पेट्रोल पंपावर राडा

    औरंगाबादच्या सेवन हिल परिसरातील पेट्रोल पंपावर राडा

    दोन गटात तुफान हाणामारी

    पेट्रोल टाकल्यानंतर गाडी पुढे घेण्याच्या कारणावरून झाला राडा

    दोन्ही गटाची एकमेकांना तुफान मारहाण

    पुंडलिक नगर पोलिसांनी 6 ते 7 तरुणांना घेतलं ताब्यात

  • 05 May 2022 06:31 AM (IST)

    कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांना क्लिनचीट

    पुणे

    कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांना क्लिनचीट

    भीमा-कोरेगाव येथे दंगल झाल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात पोलिस तपासात कोणताही पुरावा आढळला नाही

    त्यामुळे त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही

    पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली राज्य मानवी आयोगाला माहिती

  • 05 May 2022 06:30 AM (IST)

    खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये आतापर्यंत 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक

    खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये आतापर्यंत 9.11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक

    गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन

    जलसंपदा विभागाकडून पुण्याला 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार

    शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो

    सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकूण 9.11 टिएमसी म्हणजेच 34 टक्के पाणीसाठा शिल्लक

    गेल्या वर्षी 4 मेपर्यंत हा पाणीसाठा 40 टक्क्यांपेक्षा जास्त होता

Published On - May 05,2022 6:26 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.