Maharashtra Marathi News Live : मराठा आरक्षण समिती गठीत करा, अंबादास दानवे यांची मागणी
Maharashtra Breaking news LIVE Updates | महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. आज मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणावर आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच. उपोषणाचा आज 13 वा दिवस. पाणी आणि औषधांचाही त्याग. पनवेलच्या चिंतामणीचं जल्लेोषात स्वागत. हजारो भाविकांनी घेतलं बाप्पाचं दर्शन. मुंबई-गोवा महामार्गावर पावसाच्या संततधार सरी सुरू. पावासामुळे वाहतूक धीम्यागतीने. आशिया कप 2023च्या सुपर-4 राऊंडमधील भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना आज खेळवला जाणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Ambadas Danve | अंबादास दानवे यांची मराठा आरक्षणाबाबत मोठी मागणी
मुंबई | मराठा आरक्षण संदर्भातील सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेते हे आपली भूमिका मांडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आरक्षण समिती गठीत करा. त्या समितीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नेमणूक करा, अशी मागणी विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
-
Manoj Jarange Patil | मराठा समाजाची परतफेड आरक्षण देऊन करा : मनोज जरांगे पाटील
मुंबई | मराठा आरक्षण मुद्द्यावरुन मुंबईत सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. या बैठकीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “त्यांचे काय सुरू आहे ते बैठक झाल्यावर कळेल. माझ्या तपासण्यापेक्षा आरक्षण बाबत तपासण्याच सुरू आहेत. आरक्षण हाच माझा उपचार. मराठा समाजाने 75 वर्ष तुम्हाला भरभरून दिलं. आता त्याची परत फेड आरक्षण देऊन करा”, असं जरांगे पाटील यांनी सरकारला उद्देशून म्हटलंय.
-
-
SambhajiRaje On Maratha Reservation | याआधी सर्वपक्षीय बैठक काय घेतली नाही? संभाजीराजेंचा सवाल
मुंबई | मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या जोरावर सरकारला चांगलंच अडचणीत आणलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुंबईत सर्वपक्षीय बैठक सुरु आहे. या बैठकीत संभाजीराजे यांनी आपली भूमिका मांडली.
“लोकांचा खेळ करु नका. कुणबीचे दाखले कायेदशीर बसत असेल तरच द्या. नाहीतर सरकारने नाहीतर स्पष्टपणे सांगावं”, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली. तसेच “सरकारनं याबाबत लवकर निर्णय घ्यायला हवेत. सरकारकडून दरवर्षी फक्त आश्वासन दिली जातात. याआधी सर्वपक्षीय बैठक काय घेतली नाही?”, असा सवालही संभाजीराजेंनी यावेळेस उपस्थित केला.
-
Amravati News : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आमदार रवी राणा यांच्यासोबत बाचाबाची
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये आमदार रवी राणा यांच्याशी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाल्याची घटना घडलीये. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चाकू हल्ला केल्याचा आमदार रवी राणा यांनी आरोप केलाय. यापूर्वी याच कार्यकर्त्यांने आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला केला होता.
-
Jalna News : मनोज जरांगे पाटील यांनी औषध उपचार घेण्यास दिला नकार
जरांगे पाटील यांनी औषध उपचार घेण्यास दिला नकार दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी पुन्हा एकदा आले आहेत. जरांगे यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. दोन दिवसांपासून पाणी आणि औषध उपचार ते घेत नाहीत. आताही जरांगे यांनी मेडिकल औषध उपचार घेण्यास टाळले आहे.
-
-
Pune News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मोठे आदेश
पुण्यातील मार्केट यार्डातील प्रस्तावित मच्छी मार्केट रद्द करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. या मच्छी मार्केटला भाजपसह मनसेचा विरोध होता. मार्केट यार्ड परिसरातील वाहनतळावर मच्छी मार्केट उभारण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दिली होती मंजूरी
-
Ahmednagar News : सुप्रिया सुळे घेणार आंदोलकांची भेट
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. रात्री 9 वाजता खासदार सुप्रिया सुळे चौंडे येथे येऊन आंदोलकांची भेट घेणार आहेत. आज सकाळी दुसऱ्यांदा उपोषणाला रोहित पवार यांनी भेट देली. आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी यशवंत सेनेची भूमिका आहे.
-
Jalna News : हर्षवर्धन जाधव झाले आक्रमक, थेट म्हणाले
आरक्षण वाढवून दिले नाही तर जे मराठ्यांच्या पोटचे आहेत त्यांनी या नेत्यांना मतदान करू नये. आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल न मिळाल्यास या नेत्यांना उपटून टाकेल. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला. मी हे राजकिय नेत्यांना बोलत आहे. बाहेर पाच लाख लोक असताना पार्लमेंटमध्ये नॉन वेज गप्पा होतात. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास नेत्यांना आम्ही ठोकुन काढू, असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले आहे.
-
मध्य प्रदेश निवडणुकीसंदर्भात जेपी नड्डा यांच्या घरी बैठक सुरू, अमित शाहही उपस्थित
मध्य प्रदेश निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, शिवराज सिंह चौहान, खासदार प्रदेशाध्यक्ष बीडी शर्मा, संघटन मंत्री बीएल संतोष उपस्थित आहेत.
-
अटक करण्यात आलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या कोठडीत ३ दिवसांची वाढ
बँक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत मुंबई न्यायालयाने 14 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.
-
भास्कर जाधव यांची चंद्रशेखर बानकुळेंवर टीका
भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. वेस्ट इंडिजवाल्यांनी ठाकरे कुटुंबियांवर बोलू नये असं त्यांनी सांगितलं. बावनकुळे उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करतात. मग आम्ही त्यांच्यावर टीका का करू नये? असंही त्यांनी सांगितलं.
-
राष्ट्रवादीच्या दोन गटांची विधानपरिषदेत लढाई
राष्ट्रवादीच्या दोन गट आता विधापरिषदेत आमनेसामने येणार आहेत. विधानसभेपाठोपाठ विधानपरिषेदतही आमदार अपात्रतेसाठी अर्ज करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नीलम गोऱ्हेंकडे आमदार अपात्र करण्यासाठी दोन केल्याची माहिती आहे.
-
ठाकरे गटाच्या आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्याचे आदेश
ठाकरे गटाच्या आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. 14 सप्टेंबरला 12 वाजता हजर राहण्यास सांगितलं आहे. विधीमंडळ सचिवानी ही नोटीस बजावली आहे. 14 तारखेपासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे.
-
एसटी बँकेचे कर्मचारी आक्रमक
मुंबई | स्टेट काॅपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी यांचं एसटी बँक संचालकांविरोधात आंदोलन सुरू झालंय. डीसीपी अकबर पठान यांच्या मध्यस्तीनंतर पाच आंदोलक संचालक मंडळास जाब विचारण्यासाठी बँकेच्या आत पोहोचले आहेत. तर आनंदराव अडसूळ यांचं बँकेच्या प्रवेशव्दारावरच ठिय्या आंदोलन सुरु आहे.
-
‘भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे वेस्ट इंडिजचे एम्ब्रॉस’, भास्कर जाधव यांची टीका
कोल्हापूर | “भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे हे वेस्ट इंडिजचे एम्ब्रॉस आहेत. त्यांना उद्धव ठाकरे काय कळणार? आम्ही टीका केली की ते म्हणतात व्यक्तिगत टीका करतात. मात्र ते टीका करतात ते कसे चालते?”, असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपची मोठी रणनीती
मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप सक्रीय होणार. मुंबईत जनसामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी १५ दिवस कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मोदींच्या वाढदिवस निमित्ताने रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, स्वच्छता मोहीमांचा धडाका बघायला मिळणार आहे. खासदारांपासून आमदार, नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, मंडल अध्यक्षांना कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमात सामील करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत हे कार्यक्रम सुरु राहणार आहेत.
-
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात, मोठी वाहतूक कोंडी
मुंबई | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एका ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलर दुभाजकावर जाऊन मोठा अपघात झालाय. संबंधित घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास वसईच्या चिंचोटी ब्रिज जवळ गुजरात मुंबई लेनवर हा अपघात झालाय. विशेष म्हणजे आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर ट्रेलरचे मोठे नुकसान झालंय. ट्रेलरच्या अपघातामुळे दुपारी गुजरात-मुंबई लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. चिंचोटी वाहतूक पोलिसांनी घटनास्थली धाव घेऊन, क्रेनच्या मदतीने ट्रेलरला बाजूला काढून आता वाहतूक सुरळीत झालीय.
-
सगळे राजकारणी सत्तेला भुकेले आहे – माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना विनंती आहे की सवादांच्या माध्यमातून सुटू शकतो. त्यांनी चर्चेचे दरवाजे खुले ठेवावेत. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. जरांगे पाटील यांना हात जोडून विनंती आहे की त्यांची मागणी सरकार आणि समाजापर्यंत पोचली आहे. त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. जीव धोक्यात येईल अस टोकाचे पाऊल उचलू नये. आज महाराष्ट्रातले सगळे राजकारणी सत्तेला भुकेले आहे. त्यामुळे सगळे आग लावायला लागले आहेत अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
-
ओबीसी नेत्यांचे उद्यापासून साखळी उपोषण, लेखी आश्वासनावर ओबीसी नेते ठाम
नागपूर : मराठा समाजातून ओबीसींना आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी नेते साखळी उपोषण सुरु करणार आहेत. आमची मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यता येईल असा इशारा ओबीसी नेते नरेश बरडे, राजू ठाकरे यांनी दिला आहे. राज्य सरकारने लेखी आश्वासन देईपर्यंत हे आंदोलन सुरु राहील. उद्यापासून आणखी तीव्र आंदोलन करणार असून नागपूरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरु होईल. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यातही आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
-
आरक्षण नाही तर शिक्षण नाही; गावकऱ्यांनी घेतली कठोर भूमिका
वसमत : जालना येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठींबा म्हणून वसमत तालुक्यातील अकोली येथे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुणीही शाळेत जाणार नाही असा निर्णय येथील शालेय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. मात्र, एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही. त्याचबरोबर गावातून बाहेर गावी शिकायला जाणारे विद्यार्थीही गावातच आंदोलनाठिकाणी बसून होते.
-
बबनराव घोलप यांच्या राजीनाम्यावर माजी खासदार वाकचौरे यांची मोठी प्रतिक्रिया
नाशिक : माजी आमदार आणि शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याबाबत मला माहित नाही. मी अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे. 2009 ला त्यांच्याच आशीर्वादाने मी निवडून आलो. शिवसेनेत परत यावे हे उद्धव ठाकरे यांच्या आणि माझ्याही मनात होतं. पुन्हा शिवबंधन बांधून उद्धव ठाकरेंच्या आदेशाने मी कामाला सुरुवात केलीय. उद्धव ठाकरेंचा आदेश शिरसावंद्य मानून भविष्यात वाटचाल सुरू राहणार अशी प्रतिक्रिया माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली.
-
नाना पटोले यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका
गोंदिया : चंद्रशेखर बावनकुळे कधी विदेशात गेले नाही का? त्यांनी त्याचा हिशोब दिला का? प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी पागलपणाच्या गोष्टी भाजपकडून केल्या जात आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखी पागल व्यक्तीबाबत आम्ही कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. जालना लाठचार्जसाठी सरकार दोषी आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
-
भाजप मंत्र्याविरोधात भाजप खासदारांचे आंदोलन
भंडारा : राज्याचे भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर काल धनगर समाज बांधवांनी भंडारा उधडाला होता. त्यामुळे विखे पाटील यांच्या अंगरक्षकांनी आणि समर्थकानी धनगर समाज बांधवांना जबर मारहाण केली होती. त्याच्या निषेधार्थ भाजपचे राज्यसभेचे खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली भंडारा इथे धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्यांनी नामदार राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.
-
अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खड्डे भरो आंदोलन
अमिताभ बच्चन यांच्या जनक बंगल्याबाहेरील जुहू येथील खड्ड्यांवर रांगोळी काढून ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन करीत मुंबई महानगर पालिकेचा निषेध केला आहे. जोपर्यंत बीएमसी खड्डे बुजवत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
-
मोठी बातमी : त्या आमदारांबाबत 14 सप्टेंबर पासुन सुनावणी – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
शिवसेना शिंदे गट 40 आमदाराचे आणि उद्धव ठाकरे गट 14 आमदारांची सुनावणी 14 सप्टेंबर पासुन विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. जी कारवाई होईल ती नियमानुसार घटनेतील सर्व तरतुदी नुसार केली जाईल, सर्व आमदाराचे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, सुनावणी अंती योग्य निर्णय घेतला जाईल, सुनावणी होतील त्यात सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
-
मराठा आरक्षण प्रकरणात मुख्यमंत्र्याचं विरोधकांना आवाहन
मराठा आरक्षण प्रकरणात आज सर्व पक्षीय बैठक आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटायला हवा, त्याअनुषंगाने सरकार योग्य दिशेने काम करत आहे. कोणावर ही अन्याय न करता, मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार बांधील आहे. यासाठी सर्व घटकांना आणि विरोधी पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले भीमाशंकराचे दर्शन
श्रावणी सोमवार निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन घेतले. परंपरेप्रमाणे भीमाशंकर चरणी मनोभावे पूजा केली. लाखो भाविक श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनाला येतात. मी सुद्धा आनंद दिघे यांच्या पासून येतोय असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील बळीराजावरील संकट दूर कर, पाऊस पडू दे. दुष्काळाचे आलेलं संकट दूर होऊ दे, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
-
Pune News : मावळ लोकसभेसाठी मनसेची तयारी
मावळ लोकसभा मतदारसंघात आता मनसेकडूनही तयारी सुरू केली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता.
-
नवी दिल्ली : दिल्लीत यंदाही फटाक्यांवर बंदी कायम
राजधानी दिल्लीमध्ये यंदाही फटाक्यांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीही राजधानीत फटाके फोडता येणार नाहीत.
-
मला उपचार नकोत, मला न्याय हवा – मनोज जरांगे पाटील
मराठा आरक्षण हेच माझ्यावरचे उपचार आहेत, तीच माझी ताकद आहे. मला उपचार नकोत, मला न्याय हवा आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत.
राजकीय पक्षांचं मराठा समाजावर किती प्रेम आहे, ते आता समजेल, असं ते म्हणाले. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, जरांगे यांची मागणी कायम.
-
मराठा समाजाने राजकीय पक्षांना भरभरून दिलं आहे – मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाने राजकीय पक्षांना आत्तापर्यंत भरभरून दिलं आहे. आता कोणते पक्ष आमच्या पाठी उभे राहतात ते पाहू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
दुसऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी आमच्यावर किती दिवस अन्याय करणार ? असा सवाल त्यांनी विचारला.
-
मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासंदर्भात आजची बैठक घेण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. सर्वांनी मिळून यावर तोडगा काढावा, त्यात राजकारण आणू नये, असेही त्यांनी सांगितले.
-
LIVE UPDATE | मुख्यमंत्री शिंदे लांडेवाडीत दाखल, भीमाशंकराचं घेणार दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लांडेवाडीत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते भीमाशंकराचं दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री आढळरावांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्याठिकाणी कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी जमली आहे.
-
Entertainment Update | Jawan ने चौथ्या दिवशी रचला विक्रम; शाहरुख खान पुन्हा ठरला बॉक्स ऑफसीचा ‘किंग’
‘जवान’ सिनेमाबद्दल असलेली क्रेझ सध्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तुफान कमाई करताना दिसत आहे. पण चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत. वाचा सविस्तर…
-
LIVE UPDATE | मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर बैठक सुरु
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर बैठक सुरु झाली आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची बैठक सुरु झाली आहे.
-
LIVE UPDATE | मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस; त्यांची प्रकृती चिंताजनक
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा १४ वा दिवस आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वैद्यकीय उपचार घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिला आहे.
-
LIVE UPDATE | पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेचा आजचा शेवटचा दिवस
पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेचा आजचा शेवटचा दिवस आहे. सध्या पंकजा मुंडे परळी वैद्यनाथाची महापूजा करत आहेत. त्यानंतर पंकजा मुंडे एक तास शिवजप करणार आहेत. आज शि शक्ती परिक्रमा यात्रेचा समारोप आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
पुण्यात युवक काँग्रेसचं आंदोलन
पुण्यात नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसचं आंदोलन करण्यात येत आहे. नोंदणी आणि मुद्रांक विभागातील संथ गतीने चालत असलेल्या सर्व्हरच्या समस्येसह इतर मागण्यांसाठी युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन छेडण्यात आलं आहे. आमदार रवींद्र धंगेकर आंदोलनाला उपस्थिती लावणार आहेत. वेळोवेळी तक्रार करूनही नोंदणी महानिरीक्षक नोंदणी कार्यालयातील सुरू असलेल्या कारभारावर लक्ष देत नसल्याचा आरोप आंदोलकांचा आहे.
-
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चौंडीमध्ये उपोषण
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी चौंडी इथं सुरू असलेल्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. तर खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेपाच वाजता चौंडे येथे येऊन घेणार आंदोलकांची भेट घेणार आहेत. आज सकाळी दुसऱ्यांदा रोहित पवार यांनी उपोषणाला भेट दिली. आरक्षण भेटल्याशिवाय उपोषण सोडणार नाही यशवंत सेनेची भूमिका आहे.
-
निवडणुकीआधी महाराष्ट्रासह देशात दंगली घडतील- संजय राऊत
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणूक आणि देशातील राजकीय परिस्थिती यावर भाष्य केलं आहे. निवडणुकीआधी महाराष्ट्रासह देशात दंगली घडू शकतात. जातीच्या धर्माच्या आधारावर या दंगली घडतील, असं संजय राऊत म्हणालेत.
-
संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलकांनी आज ठाणे बंदची हाक दिली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ यात्रेतच अडकले आहेत. तंत्रमंत्र आणि जादूटोणा यातच त्यांचा वेळ चालला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
-
Shiv Sean : आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणातील सुनावणी 14 सप्टेंबरला दुपारी १२ वाजता होणार आहे. एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. दोन्ही गटातील आमदारांची ही सुनावणी एकाच दिवशी होणार आहे.
-
Amit Thackeray : अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर
मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार आहे. पुण्यात उद्या लोकसभा निवडणुकी संदर्भात अमित ठाकरे बैठका घेणार आहे. पक्ष बांधणी, उमेदवार निवड, प्रचार अशा विविध मुद्यावर उद्या बैठक पार पडणार आहे. पुणे लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
-
Maratha Reservation : आज ठाणे बंद
सकल मराठा समाजाकडून ठाणे बंदची हाक सोमवारी दिली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवास्थानी बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या बंदला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे.
-
bhimashankar temple : भीमाशंकरात भाविकांची गर्दी
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे आज चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त लाखो भाविकांची गर्दी झाली. देशभरातून आलेल्या भक्तांची पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या आहे.
-
Kashmir News : बारामुल्लामधून 3 दहशतवाद्यांना अटक
काश्मीरच्या बारामुल्लामधून लष्कर-ए-तयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. 3 हातबॉम्ब आणि 30 एके-47 राफल जप्त करण्यात आल्या आहेत. घातपाताचा मोठा कट उधळला.
#WATCH | Baramulla, J&K: Security forces tightened and traffic movement halted in Baramulla as a suspicious object likely an IED detected on Srinagar Baramulla National Highway at Hanjiwera Pattan. J&K Police, Army and BDS are present on the spot. Further details awaited pic.twitter.com/wIAE7haXUI
— ANI (@ANI) September 11, 2023
-
Maratha Reservation : सकल मराठा मोर्चाकडून ठाणे बंदची हाक
जालना येथे झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सकल मराठा मोर्चाकडून ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसेने या बंदला पाठिंबा दिलाय. बंदच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
-
Satara news : साताऱ्याच्या पुसेसावळी गावात दोन गटांमध्ये राडा
साताऱ्याच्या पुसेसावळी गावात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दगडफेक आणि तोडफोड झाली. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन हा वाद झाला.
-
Pune news : पुण्यात आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात
पुणे शहरात आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात. शहरात आतापर्यंत एकूण 94 हजार लाभार्थ्यांना मिळाला आनंदाचा शिधा. गणेशोत्सव आणि दिवाळीनिमित्त पुणे शहरातील 3 लाख 20 हजार लाभार्थ्यांना दिला जाणार आनंदाचा शिधा. 19 सप्टेंबर पर्यंत शंभर टक्के शिधा वाटप होणार पूर्ण. जिल्हा प्रशासनाने दिली माहिती. रवा ,पाम तेल, साखर ,चणाडाळ अशा चार खाद्यपदार्थांचा आनंदाचा शिधामध्ये समावेश
-
cm eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर, भीमाशंकरचं दर्शन घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. श्नावणी सोमवारच्या निमित्ताने आज सहकुटुंब घेणार भीमाशंकरला जाऊन दर्शन घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांचं पुण्यात आगमन होणार आहे.
-
maharashtra government : खरीप हंगामातील पिकाची नोंदणी 15 ऑक्टोंबर पर्यंत करा, राज्य सरकारचे आदेश
15 ऑक्टोबरपर्यंत ॲपद्वारे खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील 25 हजार शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे पिकाची नोंदणी केली आहे. जिल्ह्याभरातून 24000 हेक्टरच्या क्षेत्रफळांची नोंद करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक पाहण्याची नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाइन ॲपद्वारे पिकाची नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना मुभा मिळणार आहे.
-
maratha reservation : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच; आज 13 वा दिवस
मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरूच आहे. जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 13 वा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी औषध आणि पाण्याचा त्याग केला आहे. त्यातच आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून आजच्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
-
maratha reservation : मराठा आरक्षणावर सरकार गंभीर, आज महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे.
Published On - Sep 11,2023 7:18 AM