Maharashtra Marathi News Live | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दौऱ्यावर

| Updated on: Oct 13, 2023 | 7:15 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi News Live | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दौऱ्यावर

मुंबई | 12 ऑक्टोबर 2023 : बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचे सहा डबे घसरल्याने झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 200 प्रवाशी जखमी झाले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज सुनावणी होणार आहे. तर शिंदे -ठाकरे खटल्याप्रकरणातील नबाम रेबिया केसवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचं जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत भव्य स्वागत. मराठा क्रांती मोर्चाचा आज मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात मराठा तरुण मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. इस्रायल-हमास दरम्यानचं युद्ध सहाव्या दिवशीही सुरूच. यासह राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Oct 2023 06:53 PM (IST)

    विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा दौरा

    विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा दौरा होणार आहे. तेलंगणा आणि मिझोराम राज्यात राहुल गांधी यांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले. मिझोराममध्ये 15 आणि 16 ऑक्टोबरला राहुल गांधींची रॅली आहे. तेलंगणामध्ये 18- 19 आणि 20 ऑक्टोबरला राहुल गांधी यांची यात्रा असणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची 16 ऑक्टोबरला राजस्थानमध्ये जाहीर सभा

  • 12 Oct 2023 06:37 PM (IST)

    राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना झापले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व इतर एमएसआरडीसी अधिकारी यांची सह्याद्रीवर बैठक पार पडलीये. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना चांगले झापले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलंय.

  • 12 Oct 2023 06:16 PM (IST)

    Daund | केमिकल कंपनीला भीषण आग

    कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागलीये. केमिकल बॅलरचा स्फोट होऊन ही आग लागली आहे. दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. घटनास्थळी कुरकुंभ अग्निशमन दलाची गाडी दाखल झालीये. आग लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.

  • 12 Oct 2023 06:04 PM (IST)

    चंद्रशेखर बावनकुळे यांचा बारामती दाैरा

    अजित पवार भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा पहिलाच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा होणार आहे. भाजपच महासंपर्क अभियान उद्या बारामती मतदारसंघात आहे. उद्या चंद्रशेखर बावनकुळे काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

  • 12 Oct 2023 05:55 PM (IST)

    बिल्किस बानोच्या दोषींना सोडण्याच्या प्रकरणावर, SC ने आपला निर्णय राखून ठेवला

    बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. गेल्या वर्षी गुजरात सरकारने त्यांची सुटका केली होती. 2002 च्या गुजरात दंगलीत 11 खून आणि 3 सामूहिक बलात्काराच्या 14 प्रकरणांमध्ये दोषी आढळले होते.

  • 12 Oct 2023 05:45 PM (IST)

    इस्रायलमधून भारतीयांना घेण्यासाठी विमान आज रात्री जाईल – MEA

    इस्रायल आणि हमासच्या सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, इस्रायलमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत ऑपरेशन अजय चालवत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय नागरिकांना घेण्यासाठी एक भारतीय विमान आज रात्री जाईल आणि उद्या सकाळी त्यांना परत आणेल.

  • 12 Oct 2023 05:30 PM (IST)

    वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारत पाक सामन्याबाबत युवराज सिंग स्पष्टच म्हणाला…

    आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला होणाऱ्या आगामी सामन्याबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग म्हणाला की, भारत-पाकिस्तान सामना इतक्या वर्षांनी होत आहे, त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. एक लाख लोकांसमोर हा सामना होणार आहे. आशा आहे की भारत जिंकेल. पण हा एकमेव सामना नसून इतरही अनेक सामने आहेत.”

  • 12 Oct 2023 05:27 PM (IST)

    ठाकरे गटाच्या अर्जावर 20 तारखेनंतर निर्णय- शिंदे गटाचे वकील

    आमदार अपात्रेसंदर्भातील सुनावणी अडीच तासानंतर संपली. यावेळी शिंदे गटाच्या वकिलांनी बाजू मांडली. त्यानंतर पत्रकारांना संबोधिक करताना शिंदे गटाच्या वकिलांनी 20 तारखेनंतर निर्णय अपेक्षित असल्याचं म्हंटलं आहे. तर शिंदे गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याची टीका अनिल देसाई यांनी केली आहे.

  • 12 Oct 2023 05:15 PM (IST)

    बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भाजपावर टीका

    बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले, ” भारतीय राज्यघटनेनुसार जातीवर आधारित जनगणना फक्त केंद्र सरकार करू शकते. बिहारमध्ये आम्ही जे केले ते जात-आधारित सर्वेक्षण होते. जातीवर आधारित जनगणना करण्याची इंडिया आघाडी सातत्याने मागणी करत आहे. भाजपा जातीवर आधारित जनगणनेला घाबरत आहे. जातीच्या जनगणनेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.’

  • 12 Oct 2023 04:50 PM (IST)

    Raj Thackeray : टोल प्रकरणी राज ठाकरे आक्रमक

    टोल नाक्याच्या मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरु आहे. सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरु आहे. यावेळी टॅक्स भरतो तर टोल कशासाठी आकारण्यात येतो, असा रोकडा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. टोल भरुनही रस्ते सरळ नाहीत. रस्त्यांबाबत ठाणे, नाशिककरांच्या अनेक तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टोल माफ करण्याचा आग्रह केला.

  • 12 Oct 2023 04:37 PM (IST)

    Vijay Wadettiwar | सरकारच्या जाहिरात उधळपट्टीवर नाराजी

    महायुती सरकारवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तोंडसुख घेतले आहे. बहुजनांच्या कल्याणासाठी असलेल्या निधीतून जाहिरातबाजी करण्यासाठी 31 कोटी खर्चाची मुभा दिल्याचा आरोप त्यांनी केला. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विषेश मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी 2022-23 सरकारने 1 कोटी 75 लाख रूपये निधी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. जाहिरातीवर खर्च केलेल्या 31 कोटीत किमान 31 विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती, ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके , त्यांच्यासाठी वसतीगृहे उभारता आली असता, असे त्यांनी सांगितले.

  • 12 Oct 2023 04:06 PM (IST)

    Raj Thackeray : टोलच्या मुद्यावरुन राज ठाकरे- मुख्यमंत्र्यांची भेट

    टोल नाक्याच्या मुद्यावरुन राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचत आहे. त्यांचा ताफा निघाला आहे. थोड्याच वेळात ते सह्याद्री अतिथीगृहावर पोहचतील. टोल नाक्याचा मुद्याला मनसेने हात घातला आहे. त्यावरुन मध्यंतरी वाद झाला होता. राज ठाकरे टोल नाक्यासंबंधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 12 Oct 2023 02:57 PM (IST)

    आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरु

    आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरु. याचिकांवरील सुनावणी एकत्र नको. प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या. याचिका एकत्र करू नका यावर शिंदे गटाचे वकील ठाम.

  • 12 Oct 2023 02:49 PM (IST)

    Gopichand Padalkar | चौंडीमध्ये शरद पवार आले म्हणून टोपी खाली पडेपर्यंत पळतायत…

    धनगर आरक्षणासाठी सरकारला तज्ज्ञ लोकं पाहिजे असतील तर ट्रॅव्हल्स भरून आणतो आणि पुरावे लागले तर ट्रक भरून आणतो. कोणाच्याही मागे पळू नका. शरद पवार आल्यावर चौंडीमध्ये लोक पवार साहेब आले म्हणून टोपी खाली पडेपर्यंत पळतायत.. पण मी म्हणतो, शरद पवार आला नाही तर महाराष्ट्रातील धनगरांचा कर्दनकाळ आला – गोपीचंद पडळकर (भाजप आमदार)

  • 12 Oct 2023 02:33 PM (IST)

    Gopichand Padalkar | जेव्हा धनगर एकत्र येतात तेव्हा प्रस्थापितांच्या बुडाला आग लागते

    धनगर जागर यात्रेला आज सुरुवात केली. मी जागर यात्रेची घोषणा केली आणि लबाड लंडग्याच्या पिलावळींनी लगेच अफ़वा उठवल्या. जेव्हा धनगर एकत्र येतात तेव्हा प्रस्थापितांच्या बुडाला आग लागते. धनगर समाजाची आरक्षणाची लढाई कोर्टात सुरु. 8,11 आणि 15 डिसेंबर हे तीन दिवस कोर्टात धनगर आरक्षणाची सुनावणी होईल. न्यायालयातील लढाई हा प्लॅन A आहे जर काही अडचण आली तर प्लॅन B म्हणजे रस्त्यावर लढाई असेल. प्रस्थापितांच्या विरोधात धनगरांना उठवण्यासाठी मी गावात आलोय – गोपीचंद पडळकर (भाजप आमदार)

  • 12 Oct 2023 02:21 PM (IST)

    Gadchiroli Updates | कोरची तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय वाऱ्यावर

    गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय वाऱ्यावर. कार्यालयीन वेळानंतरही अधिकारी व कर्मचारी दिवसभर अनुपस्थित. कार्यालयातील टेबल रिकामे. कुरखेडा तालुक्यातून या विभागाचे सांभाळले जाते कामकाज. कार्यालयात कार्यरत अंदाजे १५ पेक्षा अधिक कर्मचारी असून फक्त परिचर उपस्थित. अधिकारी व कर्मचारी सतत गैरहजर असल्यामुळे अनेक विकासात कामांवर फुल स्टॉप

  • 12 Oct 2023 02:00 PM (IST)

    भाजपा विरोधात जे येतील त्यांना सोबत घेणार – शरद पवार

    भाजपाविरोधात जे सोबत येतील त्यांना घेऊन इंडिया आघाडी लढणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमची तीन पक्षाची आघाडी आहे. काही आणखी शेतकरी कामगार पक्षा सारखे पक्षही येतील असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • 12 Oct 2023 01:05 PM (IST)

    देशात खासगीकरण वाढले, शाळाही दत्तक देऊ लागले – शरद पवार

    देशात कंत्राटी नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शाळाही दत्तक देऊ लागल्याने खाजगी लोक त्याचा गैरवापर करतील अशी भीती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोला येथे बोलताना व्यक्त केली आहे.

  • 12 Oct 2023 12:45 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी करा – नितेश राणे

    नारायण राणेंना 2 वेळा मारण्याचा प्रयन्त झाला आहे. एकनाथ शिंदे प्रमाणे राणेंनाही मारण्याचा डाव उद्धव ठाकरे यांचा होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नितेश राणे यांनी केली आहे.

  • 12 Oct 2023 12:20 PM (IST)

    मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईकडील मार्गिकेवर एक तासांचा ब्लॉक

    मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेवर दुरुस्ती कामासाठी एक तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईला येणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तासभर हे काम चालणार असल्याने जुन्या मुंबई – पुणे महामार्गाचा वापर करावा लागणार आहे.

  • 12 Oct 2023 12:00 PM (IST)

    Amravati News : अमरावतीत कंत्राटी नोकर भरती विरोधात मोर्चा

    अमरावतीत कंत्राटी नोकर भरती विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे. सरकारने कंत्राटी नोकर भरतीची निर्णय घेतला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने तरूण सामिल झाले आहेत.

  • 12 Oct 2023 11:50 AM (IST)

    Pandharpur News : पंढरपूरमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटात राडा

    पंढरपूरमध्ये जमिनीच्या वादातून दोन गटात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. जमिनीच्या बांधांवरून दोन गटात तुफान हानामारी झाली आहे. शेतामध्ये पेरणी करण्यावरून दोन गटात वाद झाल्याची माहिती आहे.

  • 12 Oct 2023 11:40 AM (IST)

    Maharashtra News : जरांगेंच्या टिकेला उत्तर देण्यासाठी भूजबळांची तयारी?

    छगन भुजबळांनी आज मुंबईत समता परिषदेची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता छगन भूजबळांनी बैठकीचे आयोजन केले होते. मुंबईतील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या हॉलमध्ये ही बैठक पार पडत आहे.

  • 12 Oct 2023 11:24 AM (IST)

    Nagpur Winter Session : 7 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशन

    यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरात 7 डिसेंबरपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी आढावा बैठक घेतली आहे. मंत्र्यांचे बंगले आणि आमदारांच्या सुरक्षेबाबत सुचना दिल्या.

  • 12 Oct 2023 11:16 AM (IST)

    Maharashta News : माजी राज्यमंत्री गावंडेंच्या घरी पवारांची हजेरी

    माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या घरी शरद पवार पोहोचलेले आहेत. पवारांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी केलं जातंय. शरद पवार आज अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत.

  • 12 Oct 2023 11:13 AM (IST)

    Maharashtra News : नबाम रेबीया प्रकरणी आज सुनावणी नाही

    नबाम रेबीया प्रकरणी आज होणारी सुनावणी रद्द करण्यात आली. या प्रकरणी नवीन तारिख देण्यात येणार आहे. ठाकरे गटाकडून या संबंधी पुनर्विचार याचीका दाखल करण्यात आली होती.

  • 12 Oct 2023 10:56 AM (IST)

    नवाब मलिकांच्या जामिनाला सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत नवाब मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचा जामीनाला सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

  • 12 Oct 2023 10:48 AM (IST)

    सांगलीमध्ये  ‘स्वाभिमानी’ची जनआक्रोश यात्रा

    सांगलीमध्ये  ‘स्वाभिमानी’ संघटेनची जनआक्रोश पदयात्रा सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टींची पदयात्रा सुरू आहे.

  • 12 Oct 2023 10:38 AM (IST)

    खोके सरकारला आधारकार्ड चेक करण्यात रस – सुप्रिया सुळे

    दीड वर्षांत खोके सरकारने काय केलं. राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय पण गृहमंत्र्यांना त्याबद्दल बोलण्यात रस नाही. या सरकारला फक्त आधारकार्ड चेक करण्यात रस आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

  • 12 Oct 2023 10:34 AM (IST)

    सगळे पक्ष शरद पवार चालवतात का ? सुप्रिया सुळे यांचा सवाल

    सगळे पक्ष शरद पवार चालवतात का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला केला .

  • 12 Oct 2023 10:27 AM (IST)

    भाजपाकडून राष्ट्रवादीवर सतत खोटे आरोप – सुप्रिया सुळे

    शरद पवार हे ६० वर्ष त्यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहेत. भाजपाने एकीकडे आरोप केले तर दुसरीकडे सोबत येण्याची ऑफर देत होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 12 Oct 2023 10:21 AM (IST)

    शरद पवार यांना भाजपसोबत जाण्याची कधीही इच्छा नव्हती, भुजबळांनी कबुली दिली – सुप्रिया सुळे

    भाजपासोबत चला असा काही नेत्यांचा आग्रह होता. पवार साहेबांनी त्यांची विचारधारा कधीच सोडली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. भाजपवाल्यांनी आमच्या पक्षवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले, असेही त्या म्हणाल्या.

  • 12 Oct 2023 10:16 AM (IST)

    मेट्रो-6 च्या कारशेडच्या कामाला येणार वेग

    मेट्रो-6 चं कारशेड आता कांजूरमार्गमध्येच होणार. कारशेडच्या कामासाठी 506 कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात येणार. मेट्रो-6 च्या कारशेडच्या कामाला आता वेग येणार.

  • 12 Oct 2023 10:11 AM (IST)

    धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मेंढरं घेऊन रास्ता रोको आंदोलन

    लातूर जिल्ह्यातल्या चाकूर येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मेंढरं घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कार्यकर्ते मेंढरासह रस्त्यावर उतरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी चाकूरच्या मुख्य रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले.

  • 12 Oct 2023 10:07 AM (IST)

    एकनाथ शिंदेंचा घातपात करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्लान होता – संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घातपात करण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्लान होता, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

  • 12 Oct 2023 09:59 AM (IST)

    Maharashtra News | टोलसंदर्भात आज बैठक, राज ठाकरे उपस्थित राहणार

    राज्यातील टोल नाक्यावरील टोल संदर्भात सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. अविनाश जाधव,रवीन्द्र मोरेसह अन्य काही जण उपस्थित राहणार आहेत.

  • 12 Oct 2023 09:47 AM (IST)

    Maharashtra News | मुंबईत मराठा समाजाकडून आंदोलन

    मुंबईत मराठा समाजाकडून आंदोलनास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनामुळे गिरगाव चौपाटीवर बंदोबस्त तयार ठेवला आहे. पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे.

  • 12 Oct 2023 09:34 AM (IST)

    Maharashtra News | सोशल मीडियावर खोटी बातमी, गुन्हा दाखल

    चित्रपट निर्माते अशोक पंडित यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल सोशल मीडिया वापरकर्त्यावर एफआयआर दाखल केले आहे. चित्रपट निर्माते आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांच्या आरोग्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

  • 12 Oct 2023 09:21 AM (IST)

    Maharashtra News | कोल्हापूरमधील या गावांमध्ये बंद

    कोल्हापूर हद्दवाडीत समावेश असलेल्या 18 गावांमध्ये आज बंद पाळण्यात येणार आहे. मनपात जाण्यास या गावांचा विरोध आहे. या गावांमधील सर्व व्यवहार आज थांबले आहे.

  • 12 Oct 2023 09:07 AM (IST)

    Maharashtra News | पुणे मनपाच्या या गावासंदर्भात बैठक

    पुणे महानगरपालिकेतून वगळण्यात आलेल्या देवाची उरुळी आणि फुरसुंगी या गावांच्या प्रश्नांसंदर्भात मुंबईत आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीची आयोजन करण्यात आले आहे.

  • 12 Oct 2023 08:59 AM (IST)

    Mns | घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वाद

    घाटकोपरमध्ये सुरु असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती वादावर ‘मारु घाटकोपर’ची पाटी पुन्हा BMC ने लावून देण्याची मागणी करणारे भाजपचे माजी नगरसेवक प्रविण छेङा यांच्या विरोधात मनसेची बॅनर बाजी. मराठी कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाईची मागणी करणाऱ्या गुजराती भाषक लोकप्रतिनिंधींनी गुजरातेत जावून निवङणूक लढवावी असे फलक झळकवत महाराष्ट्र नवनिर्माण विदयार्थी सेनेच्या अॅङ.अभिषेक सावंत यांची घाटकोपर येथे बॅनरबाजी.

  • 12 Oct 2023 08:43 AM (IST)

    Toll protest | टोल दरवाढी विरोधात मनसे काढणार लॉंग मार्च

    टोल दरवाढी विरोधात मनसे लॉंग मार्च काढणार. यामध्ये ठाणे आणि मुंबई या ठिकाणी असणारे नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार. ठाण्यातील डॉक्टर, इंजिनियर आदींसह नागरिक सहभागी होणार. हलक्या लहान वाहनांना टोल माफी मिळावी यासाठी आंदोलनाची सुरुवात ठाण्यातून होणार. त्यासाठी विविध सोसायटीमध्ये जाऊन मनसे नेते अविनाश जाधव, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे सह इतर पदाधिकारी सोसायटी कमिटीच्या लोकांना भेटत आहे.

  • 12 Oct 2023 08:27 AM (IST)

    Israel-Hamas war पार्श्वभूमीवर आजपासून भारताच ऑपरेशन ‘अजय’

    Operation Ajay | काय आहे हे ऑपरेशन ‘अजय’. गरज पडल्यास भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा वापर होणार. आतापर्यंत दोन्ही बाजूला हजारो मृत्यू झाले आहेत. जाणून घ्या ऑपरेशन ‘अजय’बद्दल सविस्तर….

  • 12 Oct 2023 08:14 AM (IST)

    Mumbai-Pune Express way | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज विशेष ब्लॉक

    पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 1 असा हा एक तासांचा हा ब्लॉक असेल. आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातोय. या दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू असेल.

  • 12 Oct 2023 08:06 AM (IST)

    Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाचा आज धडक मोर्चा, वर्षा बंगल्यावर धडकणार

    मराठा क्रांती मोर्चाने आज धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे. सकाळी 8.30 वाजता गिरगाव चौपाटीवरील शहीद तुकाराम ओंबळे स्मारक येथून हा मोर्चा निघणार असून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हा मोर्चा धडकणार आहे. मराठा म्हणूनच आरक्षण द्या आणि कायद्यात टिकणारं आरक्षण द्या, अशी मागणी या मोर्चात करण्यात येणार आहे.

  • 12 Oct 2023 07:46 AM (IST)

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीत पोहोचले, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत

    मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे अखेर महाराष्ट्र दौरा संपून गावी परतले आहेत. मध्यरात्री 2 वाजता जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवली सराटी येथे पोहोचले. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं फुलं उधळून जंगी स्वागत केलं. जरांगे पाटील यांनी येत्या 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटीत सभा आयोजित केली आहे. त्याच्या तयारीसाठी ते अंतरवलीत परतले आहेत.

  • 12 Oct 2023 07:32 AM (IST)

    Shiv Sena : शिंदे-ठाकरे खटल्यातील नबाम रेबिया केसवर आजपासून सुनावणी; निर्णय बदलणार?

    शिंदे – ठाकरे खटल्यातील नबाम रेबिया केसवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 7 न्यायामूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. आधी ही सुनावणी पाच न्यायामूर्तींच्या खंडपीठासमोर झाली होती. नबाम रेबिया केसचा पुनर्विचार करण्यासाठी ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आपला जुना निर्णय बदलणार की निर्णय कायम ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

  • 12 Oct 2023 07:27 AM (IST)

    Shiv Sena : ‘त्या’ आमदारांचं काय होणार?, कुणाचं पारडं जड? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांचं? आज सुनावणी

    शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्र आणि अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्याची ठाकरे गटाची मागणी होती. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Published On - Oct 12,2023 7:23 AM

Follow us
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.