Mumbai Maharashtra Live News | देशात-राज्यात काय चालू आहे कळत नाही, राज ठाकरे याचं राजकीय परिस्थितीवर भाष्य
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

मुंबई | 19 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील आज माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. सरकारकडून दुष्काळ तपासणीचं काम सुरू करण्यात आलं आहे. 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यांचा कृषी विभाग सर्व्हे करणार आहे. आज तेराव्या दिवशीही इस्रायल आणि हमास युद्ध सुरूच आहे. तसेच वर्ल्ड कप सामन्यात आज भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना होणार आहे. पुण्यात हा सामना रंगणार आहे. यासह राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचं नारायण राणे यांना प्रत्युत्तर
जुन्नर | मराठा समाजाला आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्र मिळत असेल तर त्यामध्ये कुणीही माती कालवण्याचा प्रयत्न करू नये, गोर गरिब मराठ्यांच्या मुलांना आरक्षण मिळावे आणि येत्या 24 तारखेला आरक्षण नक्कीच मिळेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं. नारायण राणे हे नोकरी देणारे आहेत, त्यामुळे त्यांना आरक्षणाची गरज नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
Pune News | पुण्यात उद्या दोन्ही दादा पुन्हा एकत्र दिसणार
पुणे | पुण्यात उद्या दोन्ही दादा पुन्हा एकत्र दिसणार आहेत. पुण्याचे माजी आणि आजी पालकमंत्र्यांची उद्या एकत्रित बैठक पार पडणार आहे. मंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच चंद्रकांत पाटील यांच्यासोबत दिसणार आहेत. दोन्ही “दादांच्या” उपस्थितीत पार पुण्यात बैठक पडणार आहे.
-
-
जितेंद्र आव्हाड यांचे PA अभिजीत पवार यांची तडीपारची नोटीस रद्द
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार यांना तडीपार करण्यात आलं होतं. राजकीय सुडबुद्धीने तडीपारी झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने तडीपारी रद्द केलीय. तडीपारी रद्द झाल्यानंतर अभिजीत पवार यांचे ठाण्यात जंगी स्वागत झालं. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पेढे भरवून त्यांचं स्वागत केलं.
-
Raj Thackeray | राजकारणाचा विचका करून टाकला आहे : राज ठाकरे
पुणे | देशात काय सुरुय कळत नाही, राजकारणाचा विचका करुन टाकलाय, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राज ठाकरेंच्या हस्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन पार पडलं. यानंतर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
-
Sanjay Raut | सरकारच्या संगमताने सर्वकाही सुरु, संजय राऊत यांची टीका
नाशिक | “सरकारच्या संगमताने सर्वकाही सुरु आहे. नाशिकमधील तरुण पिढी ड्रग्जच्या विळख्यात आहे. राज्यात जे सुरु आहे त्यावरुन त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे केनिया करायचा आहे. तसेच पंजाबप्रमाणे नाशिकचा उडता नाशिक करायचं आहे” असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर सध्या चर्चेत असलेल्या ड्रग्ज प्रकरणावरुन हल्लाबोल केला आहे.
-
-
MNS On Uddhav Thackeray | मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
पुणे | मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ते माझे कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणायचे. त्यांनी ते वाक्य सत्यात उतरवलं होतं, मी आणि माझे दोन मुलं हेच बघितलं”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर धोत्रेंनी टीका केली आहे.
-
Dada Bhuse | मंत्री दादा भुसे ड्रग्स प्रकरणावरुन आरोप होत असताना आक्रमक
मुंबई | ड्रग्स प्रकरणी आरोप होत असताना पालकमंत्री दादा भुसे आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्स प्रकरणी दादा भुसे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यावरुन दादा भुसे आता सुषमा अंधारे यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार आहेत. त्यानुसार दादा भुसे उद्या दावा दाखल करणार आहेत.
-
निलम गोऱ्हे यांचा धक्कादायक खुलासा
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांचे उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप.ललित पाटील याने शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही. आपल्या पक्षातील लोकं काय धंदा करतात हे बघणं उद्धव ठाकरेंसोबतच सर्वज्ञानी संजय राऊत यांचीही जबाबदारी आहे, असे निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
-
अजित पवार यांनी केले मोठे भाष्य
आपल्या प्रयत्नाने केंद्रात स्वतंत्र कौशल्य विभाग सुरु झाला. महाराष्ट्रात ५११ केंद्रांचे उद्घाटन करत पंतप्रधानांच्या स्वप्नपूर्तीमध्ये योगदान देत आहे. पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजनेची घोषणा केली आहे. त्याचा फायदा शिल्पकार, मच्छीमार, अशा १८ पगड जातींना त्याचा फायदा होईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
-
महादेव जानकर यांनी केले त्या प्रकरणावर मोठे भाष्य
माझी आणि शरद पवार यांची आज कुठलीही भेट झाली नाही. मागच्या महिन्यात विमानतळावर आमची भेट झाली होती. मात्र तिथं कुठलीही राजकीय चर्चा झाली नव्हती. त्यावेळी इतरही काही लोक उपस्थित होते, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
-
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत घेतली पत्रकार परिषद
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी तेल अवीवमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. नेतान्याहू म्हणाले, “ही फक्त आमची लढाई नाही तर ही संपूर्ण जगाची लढाई आहे. ही आमची सर्वात वाईट वेळ आहे. आम्हाला एकत्र उभे राहून जिंकण्याची गरज आहे.”
#WATCH तेल अवीव में इजरायली पीएम बेंजामिन नेतन्याहू और ब्रिटिश पीएम ऋषि सुनक ने संयुक्त प्रेस वार्ता की
नेतन्याहू ने कहा हैं, "यह केवल हमारी लड़ाई नहीं है बल्कि यह पूरी दुनिया की लड़ाई है… यह हमारा सबसे काला समय है, यह दुनिया का सबसे काला समय है। हमें एक साथ खड़े होने और… pic.twitter.com/CXXpTh13It
— ANI_HindiNews (@AHindinews) October 19, 2023
-
छत्तीसगड निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचारकांची यादी जाहीर
छत्तीसगड निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपने 40 प्रचारकांची यादी जाहीर केली जे पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि इतर प्रचार करणार आहेत.
भाजपा ने 40 प्रचारकों की सूची जारी की जो छत्तीसगढ़ चुनाव के पहले चरण के लिए पार्टी उम्मीदवारों के लिए प्रचार करेंगे।
पीएम नरेंद्र मोदी, बीजेपी प्रमुख जेपी नड्डा, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह और अन्य लोग प्रचार करेंगे। pic.twitter.com/tEuod2zHs8
— ANI_HindiNews (@AHindinews) October 19, 2023
-
पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्या विकास केंद्राचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र लोकार्पण केलं.
#WATCH प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए महाराष्ट्र में 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल विकास केंद्रों का शुभारंभ किया। pic.twitter.com/mBI93hZp79
— ANI_HindiNews (@AHindinews) October 19, 2023
-
गावातच रोजगाराची मोठी संधी मिळेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. विकासाचे नवीन मॉडेल्स राबविण्यात येत आहे. राज्यातील ग्रामीण भागात कौशल्य विकास केंद्रांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे गावातच रोजगाराची मोठी संधी मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-
511 गावांमध्ये कौशल्य विकास केंद्रांचे लोकार्पण
राज्यात 511 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्रांचं लोकार्पण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचं उद्धघाटन झाले. प्रमोद महाजन कौशल्य केंद्राचं लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रोजगार वाढीला चालना देण्यासाठी, स्थानिक उद्योगांना, लघूउद्योगांना चालना देण्यासाठी नवीन योजना सुरु झाली आहे.
-
उद्या पुण्यात मनसेचा मेळावा
उद्या पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा आहे. पुण्यातील एस एम जोशी सभागृहात हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात राज ठाकरे हे मार्गदर्शन करतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आतापासूनच कामाला लागल्याचे समोर येत आहे. टोल प्रकरणात मनसेच्या भूमिकेपुढे राज्य सरकार दोन पावलं मागे आली आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणाला लक्ष करतात. काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-
मराठा आरक्षण प्रकरणात सरकार संवेदनशील- केसरकर
मराठा आंदोलक सुनील कावळे यांनी आत्महत्या केली. मंत्री दीपक केसरकर यांनी सायन रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मराठा आंदोलकांना भावनेच्या भरात असे कोणतेही पाऊल टाकू नये. त्यांनी कुटुंबियांकडे पहावे, असे आवाहन केसरकर यांनी केले. मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकार संवेदनशील आहे. कावळे कुटुंबियांना दहा लाखांची मदत त्यांनी जाहीर केली.
-
शरद पवार यांनी तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घ्यावी – नारायण राणे
शरद पवार पॅलेस्टाईनची बाजू घेत आहेत आणि इस्रायलची बाजू घेतली म्हणून पंतप्रधानांवर टीका करीत आहेत. शरद पवार यांनी तुष्टीकरण सोडून देश प्रथम भूमिका घ्यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर 1993 च्या दंगलीतील आरोपींना वाचविल्याच्या आरोप झाल्याचेही राणे यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News | इचलकरंजी जर्मनी गँगला सहाव्यांदा मोका
इचलकरंजी येथील जर्मनी गँगला सहाव्यांदा मोका लावण्यात आला आहे. शाहपूर पोलिसांनी ही कारवाई केली. जर्मनी गँगने व्यापऱ्याचे अपहरण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अकरा लाख रुपये लंपास केले होते. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी 18 जणांना अटक करून त्यांच्यावर कारवाही केली आहे.
-
Maharashtra News | सरकारने आता तरी आरक्षण द्यावे – मनोज जरांगे पाटील
सुनील कावळे या अंबड तालुक्यातील तरुणांने जीवन संपवले. हे सरकारचे पाप आहे. आता तरी सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
-
Maharashtra News | राज्यात चार धर्मादाय सहआयुक्त पदांची निर्मिती
राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबईमधून शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आली.
-
Maharashtra News | सदानंद थरवळ यांचा राजीनामा
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ४३ वर्षे सोबत असलेल्या सदानंद थरवळ यांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. पदाचा राजीनामा दिला असला तरी मी शिवसेनेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News | धाराशिवचे पाणी पुन्हा लातूरला
धारशिवचे पाणी विशेष बाब म्हणून लातूरला मंजूर करण्यात आले. यासाठी लातूर जिल्यातील औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार पवार यांनी बैठक घेतली होती.
-
Maharashtra News : शिंदे-नार्वेकर गुप्त बैठकीवर विरोधकांचा टोला
शिंदे-नार्वेकर गुप्त बैठकीवर विरोधकांनी टोला लगावला आहे. सभ्य लोकं दारं खुली ठेऊन चर्चा करतात असा टोला सुष्मा अंधारे यांनी लगावला आहे. तर वेळापत्रक ठरवण्यासाठी गुप्त बैठक झाली असेल असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. गुप्त बैठक झाली असेल तर ते चिंताजनक आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
Maharashtra News : मंत्रिमंडळ बैठकीत सुतगिरणी धारकांना मोठा दिलासा
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुतगिरणी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जावरील व्याज पुढील पाच वर्ष सरकार भरणार असल्याचा निर्णय बैठकित घेण्यात आला.
-
Lalti Patil Case : ललित पाटील प्रकरण, पुणे पोलिसांची टीम मुंबईत दाखल
ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणी चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी ललितवर मोक्का लागण्याची शक्यता आहे.
-
Mahrashtra News : गव्हाच्या हमीभावात 150 रूपयांची वाढ
गव्हाच्या हमीभावात 150 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.
-
Kolhapur News : कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
कोल्हापूरचा नवरात्रोत्सव हा देशात प्रसिद्ध आहे. दरवर्षी देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दूरवरून दर्शनासाठी येतात. आज देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
-
Navratri News : अकोल्यात अंबाबाईच्या दर्शनासाठी नागरीकांची गर्दी
अकोल्यात अंबाबाईच्या दर्शनासाठी नागरीकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवानिमीत्त्य मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
-
Mumbai News : मुंबईत 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्त्या
मुंबईत 45 वर्षीय व्यक्तीची आत्महत्त्या झाल्याचे समोर आले आहे. सुनील काळे असे आत्महत्त्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील कावळे हे मराठा आंदोलनात सक्रिय होते. मुंबईतील पश्चिम द्रुतागती मार्गावर सुनील कावळे यांनी गळफास घेतला. ते जालन्यातील अंबड गावचे रहिवासी आहेत.
-
Maratha reservation | ‘…तर सरकारला झेपणार नाही असं आंदोलन’
“मराठयांना आरक्षण नाही मिळाले, तर सरकारला झेपणार नाही असं आंदोलन असेल. सरकारच कर्तव्य आहे. जनतेला शांत करून लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. जिथे मराठा आहे तिथे आम्ही जाणार. संपूर्ण महाराष्ट्र हा बालेकिल्ला किल्ला आहे. पवारांचा बालेकिल्ला अस काही नाही, सरकारला पेलणार नाही, झेपणार नाही याचं कारण सरकारला माहीत आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
World cup 2023 | तिकीट ब्लॅकने विकणाऱ्या दोघांना पुण्यातून अटक
पुण्यामध्ये २७ वर्षानंतर विश्वचषकाचे सामने होत आहेत. आज भारत विरुद्ध बांगलादेश असा क्रिकेटचा सामना रंगणार असून याच दरम्यान ब्लॅकने तिकीट विक्री करणाऱ्या दोघांना पिंपरीच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पकडलं आहे. रवी लिंगप्पा देवकर आणि अजित सुरेश कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून सहा हजारांची पाच तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. ती जास्त दराने विकली जात होती. एक तिकीट 12 हजार रुपये ब्लॅकने विकल जात होतं.
-
Nashik News | नाशिक पोलीस एक्शन मोडवर
नाशिक ड्रग्स प्रकरणानंतर नाशिक पोलीस एक्शन मोडवर. शहरातील शाळा महाविद्यालय परिसरात पोलिसांकडून तपासणी सुरू. परिसरातील पान टपऱ्या, दुकानांची कसून तपासणी. कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांचीही कसून चौकशी. संशयास्पद हालचालींवर पोलिसांची नजर. पोलिसांकडून ऑपरेशन स्कुल-कॉलेज
-
Sushma Andhare | फडणवीसांनी मला धमकी देऊ नये – सुषमा अंधारे
माझ्याकडील सर्व पुरावे मी माध्यमांसमोर ठेवले आहेत. फडणवीसांनी मला धमकी देऊ नये. राज्याच्या यंत्रणेवर आक्षेप. केंद्राच्या यंत्रणेने तपास करावा. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
-
चिपळूणमध्ये कोसळलेल्या पुलाच्या पाहणीसाठी मनसे नेते दाखल
मनसेचे नेते चिपळूणमध्ये कोसळलेल्या पुलाच्या पाहणीसाठी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला होता.
मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे हे या ठिकाणी पोहोचून पाहणी करत आहेत.
-
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून देसाई नापास – सुषमा अंधारे
राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंध असल्याने देसाईंना प्रश्न विचारते, असे अंधारे म्हणाल्या.
-
मी कोणाचीही माफी मागणार नाही – सुषमा अंधारे
मी कोणाचीही माफी मागणार नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. शंभूराज देसाईंसोबत माझं वैयक्तिक भांडण नाही, ड्रग्ज प्रकरणात देसाईंचं दुर्लक्ष झालं का , असा सवालही त्यांनी विचारला.
-
माझी लढाई फक्त भाजपसोबत – सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
माझी लढाई शिंदे गटासोबत किंवा अजितदादा गटासोबत नाही. माझी लढाई फक्त भाजपासमोबत आहे, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला.
मला शिंदे गटाविरोधात किंवा अजित पवार गटाविरोधात प्रश्न विचारू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले
-
पैसे देऊन ललित हॉस्पिटलमधील कर्मचारी, पोलिसांना मॅनेज करायचा ; ललित पाटील प्रकरणात नवा खुलासा
ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर, पोलिसांना पैसे दिले होते, ललित पाटील प्रकरणात नवा खुलासा झाला आहे.
तसेच दीड तासात परत येतो असे सांगून तो रुग्णालयातून बाहेर पडून फरार झाला, अशी धक्कादायक माहिती चौकशीतून समोर आली आहे.
-
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईची पाचव्या माळेची व पाचव्या दिवशी पालखी मिरवणूक निघाली
करवीर निवासिनी अंबाबाईची आज पाचव्या दिवसाची आणि पाचव्या माळेची मिरवणूक निघाली. कोल्हापूरकरांनी जागोजागी अंबाबाई देवीच्या पालखीचे स्वागत केले.
-
पुण्यातील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त
पुणे पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सुमारे ४५० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी , कर्मचारी बंदोबस्तामध्ये असतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पार्किंग व्यवस्था वेगवेगळ्या दिशेने करण्यात आल्या आहेत.
-
कोर्टाने मागितलेलं वेळापत्रक शिंदे – नार्वेकर ठरवत असतील – जितेंद्र आव्हाड
कोर्टाने मागितलेलं वेळापत्रक शिंदे – नार्वेकर ठरवत असतील, अशा शब्दात शिंदे आणि नार्वेकरांच्या गुप्त बैठकीवर जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला.
-
दादरकडून सायनच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर पहाटेपासून ट्रॅफिक जाम
मुंबईतल्या माटुंगा किंग सर्कल पुलाच्या खाली एक भला मोठा सिमेंट रेती वाहणारा डंपर डिव्हायडरला येऊन धडकला होता. त्यामुळे पहाटे आठ वाजल्यापासून दादरकडून सायनच्या दिशेला जाणारी ट्रॅफिक पूर्णपणे जाम झाली आहे. तीन तास उलटून गेल्यानंतरही डंपरला हटवण्यात ट्रॅफिक विभागाला यश मिळालं नाही. गाडीच्या अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर दोघेही जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
-
ड्रग्जविरोधात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक- सुप्रिया सुळे
ड्रग्जविरोधात सरकारने कडक कारवाई करणे आवश्यक आहे. मी गृहमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी या सगळ्याचा तपास करावा. ड्रग्जबाबतीत सरकारने कडक शासन करावं. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
-
शिंदे-नार्वेकरांमध्ये गुप्त बैठक झाली असेल तर हे चिंताजनक- सुप्रिया सुळे
“शिंदे-नार्वेकरांमध्ये गुप्त बैठक झाली असेल तर ही चिंताजनक गोष्ट आहे. आम्ही ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. भेट घेऊन फैजल यांना खासदारकी देण्याची मागणी करणार आहोत,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
-
नाशिक शहरातील 8 कॅफे सिल
नाशिक शहरातील आठ कॅफे सिल करण्यात आले आहेत. अश्लील कृत्य आणि अंमली पदार्थ विक्रीच्या संशयातून हे 8 कॅफे सिल करण्यात आले आहेत.
-
ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर- संजय राऊत
“आतापर्यंत 700 ते 800 कोटींचं ड्रग्ज जप्त झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्र्यांसारखं वागावं. ललित पाटीलचा फडणवीसांकडून मोहरा म्हणून वापर केला जातोय. ललित पाटील फक्त मोहरा आहे. नाना पटोलेंकडून दोन मंत्र्यांवर आरोप करण्यात आले होते. गृहमंत्र्यांनी त्या दोन मंत्र्यांची चौकशी करावी,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
-
गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्ज पाठवलं जातंय- संजय राऊत
“आतापर्यंत आम्ही सूडाने वागलो नाही. पण ज्या पद्धतीने तुम्ही वागत आहात, तर मीसुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला सुद्धा कुटुंब आहे, मुलंबाळं आहेत. राजकारण हे सूडाने केलं जात नाही. गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्ज पाठवलं जातंय. ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गृहमंत्र्यांनी सत्य शोधावं,” असं खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
-
‘जयंत पाटील हे आमच्या संपर्कात’; अजित पवार गटातील नेत्याचा दावा
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा अजित पवार गटातील नेते धर्मराव आत्राम यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
-
पुणे पोलिसांची ललित पाटील प्रकरणात मोठी कारवाई
ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललीत पाटीलला आश्रय देणारी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. ललित पाटील फरार होण्यापूर्वी राहिला त्या प्रज्ञा कांबळेला अटक करण्यात आलीये. प्रज्ञा कांबळे हिच्याकडे ललित पाटीलने मिळवलेली बेनामी संपत्ती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललितची बेनामी संपत्ती प्रज्ञा कांबळेकडे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा
आयकर विभागाकडून पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू आहे. छापेमारीसाठी आयकर आधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा उपलब्ध आहे. आयकर विभागाचे अधिकार ४० वाहनांमधून छापासत्रासाठी दाखल झाले आहेत.
-
पुण्यातील प्रसिद्ध नीळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाकडून छापेमारी
नीळकंठ ज्वेलर्सच्या मालकांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. बाणेर, हडपसर आणि मगरपट्टा परिसरातील नीळकंठ ज्वेलर्सच्या शाखांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. अद्याप या छापेमारीचं कारण समोर आलेलं नाही.
-
नाशकात विमानसेवा लांबणीवर पडण्याची चिन्हे
नाशिकमधून दिल्ली आणि बंगळूर विमानसेवा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. विमान तळावर स्लॉट मिळत नसल्याने सेवा लांबणीवर पडणार आहे. येत्या 29 ऑक्टोबरपासून नाशिकच्या ओझरहून दिल्ली आणि बंगळूर साठी विमानसेवा सुरू होणार होती. दिल्ली विमानतळावर सध्या देखभाल दुरूस्तीचे काम सुरू असल्याने नवीन कंपन्यांना शेड्युल स्लॉट मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. सध्या इंडिगो कंपनीकडून नागपूर, हैदराबाद, अहमदाबाद, गोवा, इंदूरसाठी फ्लाईट सुरू आहे.
-
रांजणगाव गणपती मंदिरात गुंड गजानन मारणेचा सत्कार
रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार केला गेला आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती इथे गजानन मारणे याचा दर्शन घेतल्यानंतर सत्कार करण्यात आला. या सत्काराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देवस्थानच्या अध्यक्षाचे पती दत्तात्रय पाचुंदकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर दहशत पसरविण्याचा तर हेतू नाही ना अशी दबक्या आवाजात रांजणगावमध्ये चर्चा होत आहे.
-
एकनाथ खडसे आणि कुटुंबाला दंडाची नोटीस, सूत्रांची माहिती
एकनाथ खडसे आणि त्यांच्या परिवाराला अवैध गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी 137 दंडाची नोटीस बजावल्याची सूत्रांची माहिती आहे. नोटीसीमध्ये एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, रोहिणी खडसे तसेच भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचंही नाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. विभाग विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने एसआयटी स्थापन करण्यात आली होती. एसआयटीच्या पथकाने शासनाकडे अहवाल सादर केल्याने शासनाने अहवाल स्वीकृत 137 कोटी रुपयांची नोटीस बजावल्याची ही प्राथमिक माहिती सूत्रांची माहिती आहे. एक लाख 18 हजार ब्रास उत्खनन झाल्याच्या अनुषंगाने ही नोटीस बनवण्यात आली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही या संदर्भात तक्रार केली आहे.
-
पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेटचा मृत्यू
पुण्यात एनडीएमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या कॅडेटचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) प्रशिक्षण घेणारा महाराष्ट्रातील कॅडेट प्रथम महाले यांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कमांड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 16 ऑक्टोबरला इंटर स्कॉड्रन बॉक्सिंग स्पर्धेदरम्यान प्रथम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला पुण्यातील कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. याच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
Sharad Pawar : शरद पवार घेणार लोकसभा मतदारसंघांचा आढावा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. अहमदनगर, हिंगोली, बीड, वर्धा, अमरावती, भिवंडी आणि जालना लोकसभा मतदारसंघाचा शरद पवार आढावा घेणार आहेत.
-
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील घेणार हरिभाऊ राठोड यांची भेट, संयुक्त पत्रकार परिषदही
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आरक्षणावर चर्चा होणार आहे. त्यानंतर दोन्ही नेते संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.
-
Rohini Khadse : रोहिणी खडसे महाराष्ट्राचा दौरा करणार, महिला वर्गाला वळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली
शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या दौरा करणार असून या निमित्ताने महिला वर्गाला राष्ट्रवादीकडे वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
-
Central Government : केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवल बंदी, सामान्यांना दिलासा
केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढल्याने केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेत साखरेची निर्यात सुरूच राहणार आहेत.
-
Drought : दुष्काळाचा सर्व्हे सुरू, महिनाभरात अहवाल सादर करणार
शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. राज्य सरकारकडून दुष्काळ तपासणीचं काम सुरू झालं आहे. 15 जिल्ह्यातील 42 तालुक्यांचा कृषी विभाग त्याचा सर्व्हे करणार आहेत. पिकांची व आर्द्रतेची स्थिती पडताळणीच काम हाती घेण्यात आलं आहे. त्याचा अहवाल महिना अखेरीस राज्य सरकारला सादर होणार आहे. त्यानंतर दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published On - Oct 19,2023 6:56 AM





