Maharashtra Breaking Marathi News Live : ‘शरद पवार यांच्या भाषणातील बारकावे लक्षात घेतले पाहिजेत’, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 02, 2023 | 10:27 PM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Maharashtra Breaking Marathi News Live : 'शरद पवार यांच्या भाषणातील बारकावे लक्षात घेतले पाहिजेत', उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. दोन दिवसानंतर अधिवेशनाचं सूप वाजणार असल्याने आज दिवसभरात अधिवेशनात महत्त्वाचं कामकाज पार पडणार असून अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर, संध्याकाळी भाजपच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होणार असून या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. या शिवाय राज्यात काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी सुरूच आहेत. येत्या 4 ते 5 दिवसात मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Aug 2023 05:47 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लोबोल

    मुंबई :

    “शरद पवार यांच्या भाषणातील बारकावे लक्षात घेतले पाहिजेत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील कालच्या कार्यक्रमावर दिली. “भाजप सरकार चालवू शकत नाही हे मणिपूर आणि हरियाणाच्या घटनांमधून सिद्ध होतंय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दिली. “महिलांवर अत्याचार सुरु असताना हिंदूराष्ट्र कसा होणार?” असा सवाल त्यांनी केला.

  • 02 Aug 2023 01:58 PM (IST)

    विठ्ठल दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेणारे रॅकेट उघड

    हैद्राबादमधील तीन भाविकांकडे दोन हजाराची मागणी श्री विठ्ठल दर्शन रॅकेटमधील पेड दर्शन साखळीतील सहभागींचा शोध सुरु दर्शनास सोडत असताना भाविकांची चौकशी केली असता प्रकार उघडकीस

  • 02 Aug 2023 01:32 PM (IST)

    इंदापूरातील विहीर दुर्घटना प्रकरणी विहीर मालक ताब्यात

    विहिर मालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता अडकलेले मजूर हाती लागल्यानंतर गुन्हा दाखल होणार खाणीलाच विहीर करण्याचं होतं काम सुरू

  • 02 Aug 2023 01:31 PM (IST)

    यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा आरोपी अद्याप मोकाट

    यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा आरोपी 48 तास उलटूनही अद्याप मोकाट अमरावती पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडे नोटीस केली सुपूर्द यशोमती ठाकूर यांना ट्विटर हँडलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आरोपी फरार

  • 02 Aug 2023 01:23 PM (IST)

    परीक्षेला पोहोचायला एक मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

    पुण्यात परीक्षा केंद्रावर पोहचायला एक मिनिट उशीर झाल्याने 25 ते 30 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं वनविभागाच्या स्पर्धा परीक्षेसाठी पोहचायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवलं वनविभागाच्या राज्यभरातील 7000 जागांसाठी आज परीक्षा

  • 02 Aug 2023 01:20 PM (IST)

    आर्थिक विवंचनेतून नितीन देसाईंनी आत्महत्या केल्याचे समोर

    नितीन देसाईंनी एडलवाईज कंपनीकडून 180 कोटींचे कर्ज घेतले होते व्याजासह 180 कोटींचं कर्ज 249 झालं कर्जवसुलीसाठी मालमत्ता जप्तीचा प्रस्ताव कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता

  • 02 Aug 2023 01:14 PM (IST)

    बुलढाण्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

    माटरगाव जिल्हापरिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन शिक्षक आणि पालक ही विद्यार्थ्यांसोबत, शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना बसायला पुरेसे बेन्च नसल्याचीही तक्रार

  • 02 Aug 2023 01:08 PM (IST)

    Nitin Desai यांचा मृत्यू कसा झाला? पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सिनेविश्वात खळबळ

    ‘आज सकाळी ९ वा. दरम्यान एनडी स्टुडीओमध्ये नितीन देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकलेला आढळून आला. खालापूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फॉरेन्सीक टीम, सायबर फॉरेन्सीक टीम, डॉग स्कॉड आणि फिंगर प्रिंट टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांकडून प्रत्येक पैलू तपासून घेण्यात येत आहेत.’ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. नितीन देसाई यांच्या निधनामुळे चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे. स्वतः उभ्या केलेल्या स्टुडीओमध्ये जीवन संपवल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

  • 02 Aug 2023 12:57 PM (IST)

    दाढी ठेऊन आणि बुरखा घालून मुस्लिम लोकं प्रवास करायला घाबरत आहेत- अबु आझमी

    रेल्वेमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मुस्लिम लोकं दाढी ठेऊन आणि बुरखा प्रवास करायला घाबरत असल्याची चिंता अबु आझमी यांनी व्यक्त केली. मुस्लिम धर्मियांना बदनाम करणाऱ्यावर कारवाई होत नसल्याचेही ते म्हणाले.

  • 02 Aug 2023 12:44 PM (IST)

    यशोमती ठाकूर यांना ट्विटरवर जीवे मारण्याची धमकी, सभागृहात मुद्दा मांडला

    सद्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सूरू आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलेले आहे. सभागृहातही हा मुद्दा उठवला गेला मात्र शुक्रवारीच या वर बोलण्याची संधी दिल्याने आज तो मुद्दा अध्यक्षांनी मांडण्यास नकार दिला. यशोमती ठाकूर यांना काल ट्विटरवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी यशोमती ठाकूर यांची सुरक्षा वाढवण्याचे आश्वासन दिले तसेच धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

  • 02 Aug 2023 12:26 PM (IST)

    समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कंपण्यांच्या अनुभवाची तपासणी करावी- पृथ्वीराज चव्हाण

    समृद्धी महामार्गावर गर्डर क्रेनमुळे झालेल्या अपघातात तब्बल विस जणांचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असलेल्या संबंधीत ठेकेदार कंपण्यांवर कारवाई करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या मार्गावर पुरेशा सोयी उपलब्ध होईपर्यंत किमान चार पाच महिने हा महामार्ग बंद ठेवावा अशी मागणीही त्यांनी केली. या काळात आवश्यक त्या सोयी करून हा महामार्ग सूरू केल्यास अनेकांचे जीव वाचतील असेही ते चव्हाण म्हणाले.

  • 02 Aug 2023 12:12 PM (IST)

    घाईने आणि तातडीने कामे करण्याचा आदेश दिल्यामुळे निरपराध लोकांचा बळी जातोय- नाना पटोले

    समृद्धी महामार्गावरचे काम घाईने आणि तातडीने पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने निरपराध लोकांचा उपघातात बळी जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते सभागृहात बोलत होते. राज्याच्या जनतेचा जीव घेऊन जर समृद्धी होत असेल तर ही चिंतेची बाब असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातील जनता रस्त्यावरही सुखरूप नाही असा आरोप नाना पटोले यांनी केला.

  • 02 Aug 2023 11:59 AM (IST)

    मणिपूरमधील घटनेच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन

    मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराचे देशभरात पडसाद उमटले असून या घटनेविरोधात महाराष्ट्रात ठाकरे गटही आता रस्त्यावर उतरला आहे. तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात येत आहे.

    मंत्रालय परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू आहे.

  • 02 Aug 2023 11:44 AM (IST)

    संभाजी भिडे जिथे असतील तिथून अटक करा – विजय वडेट्टीवार यांची मागणी

    संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे. ते जिथे दिसतील तिथून त्यांना अटक करा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. संभाजी भिडे हे ओबीसी आणि बहुजनांविरोधात आहेत. त्यांनी राष्ट्रध्वजाचाही अपमान केला आहे, अशी शब्दांत त्यांनी भिडे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

  • 02 Aug 2023 11:38 AM (IST)

    लोकसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित

    विरोधी पक्षनेत्यांकडून लोकसभेत सतत गोंधळ घालण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

  • 02 Aug 2023 11:10 AM (IST)

    प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या

    प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवलं आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नितीन देसाई यांनी ‘लगान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं होतं. 2000 मध्ये त्यांनी ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’ या चित्रपटांसाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. वाचा सविस्तर..

  • 02 Aug 2023 09:55 AM (IST)

    येरवडा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न

    येरवडा कारागृहात आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. बंदी धनंजय दिघेने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. जेलमध्ये आरोपीच्या हातात ब्लेड पाहायला मिळालं.  दिघेने स्वत:च्याच हातावर ब्लेडने वार केले.  आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. येरवडा पोलीस ठाण्यात दिघेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 02 Aug 2023 09:52 AM (IST)

    इचलकरंजी शहरातील सर्वपक्षीय नेते जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला

    इचलकरंजी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी यांची सुळकूळ योजनेसाठी भेट घेतली आहे. त्यावर शासनाकडे अहवाल पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल, असं जिल्हाधिकारी यांनी शिष्टमंडळाला सांगितलं. इचलकरंजी शहराला दूध गंगेतून सुळकुड योजना ही पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेला कागलकर नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. तर इचलकरंजी हे गाव पाकिस्थानमध्ये नाही असे खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला टोला आहे.  इचलकरंजीला सुळकुड योजनेतूनच पाणी आणण्याचा सर्वपक्षीय एकमुखी निर्णय घेण्यात आलाय.

  • 02 Aug 2023 09:35 AM (IST)

    ‘तो’ अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द

    केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी नेमलेल्या रोहिणी आयोगाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्यायाधीश जी रोहिणी यांच्यासह चार जणांचा 2017 मध्ये हा आयोग बनवण्यात आला होता. अहवालत नेमकं काय याची मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे. पण पुढच्या आठ महिन्यांवर लोकसभा निवडणूक आल्या असलताना हा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या काही घटकांना आरक्षणात प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे. कालच बिहार सरकारच्या जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा झाल्याने देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याची मा35गणी केली जात आहे.

  • 02 Aug 2023 09:25 AM (IST)

    राजधानी दिल्लीकडे साऱ्यांचं लक्ष

    आजपासून सुप्रीम कोर्टात कलम 370 रद्द केलेल्या विरोधात एकत्रित याचिकांवर सुनावणी होणार आहे.  सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्यासह पाच जणांच्या खंडपिठासमोर सुनावणी होणार आहे. पाच ऑगस्ट 2019 ला सरकारनं जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केला होता. त्या विरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल केल्या गेल्या होत्या. सोमवार आणि शुक्रवार सोडता दररोज सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होणार आहे. दोन याचिकर्त्यांनी आतापर्यंत आपल्या याचिका मागे घेतल्या आहेत.

  • 02 Aug 2023 09:12 AM (IST)

    हिंजवडीमधील रस्त्यांची चाळण; प्रवाशांचे हाल

    सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पुण्यातील हिंजवडीमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अखेर संतापलेल्या स्थानिक नागरिक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने रस्ते दुरुस्तीचं काम केलंय. आयटीपार्क असून ही सर्वच यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आलीय.

  • 02 Aug 2023 09:04 AM (IST)

    IND vs WI 3rd ODI : टीम इंडियाचा विंडिजवर 200 धावांनी विजय, वन डे सीरिज 2-1 ने जिंकली!

    टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमधील तिसऱ्या (IND vs WI 3rd ODI) आणि एकदिवसीय सामन्यामध्ये कॅरेबियन संघाचा पराभव झाला आहे. वाचा सविस्तर….

  • 02 Aug 2023 08:53 AM (IST)

    प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

    प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवू शकतात. अमेठी लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याविषयी चाचपणी सुरु आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता.

  • 02 Aug 2023 08:34 AM (IST)

    आज महायुतीच्या आमदारांची हॉटेल ताजमध्ये बैठक

    भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांची आज मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होईल, आगामी काळातील निवडणुकीची रणनिती ठरवण्याच्या दृष्टीने महायुतीच्या आमदारांची ही महत्वाची बैठक होत आहे.

  • 02 Aug 2023 08:22 AM (IST)

    जयपूर एक्सप्रेस फायरिंग, चौथ्या मृतदेहाची ओळख पटली

    जयपूर एक्सप्रेस फायरिंग घटनेतील चौथ्या मृतदेहाची ओळख पटली आहे. सैयद सैफुदिन (43) असं मृत व्यक्तीच नाव आहे. ते हैदराबादच्या बाजारघाट येथे राहत होते. मूळच्या कर्नाटक बिदरचे रहिवासी असलेले सैफुदिन हे पंधरा वर्षापासून हैदराबादमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुली आहेत. हैदराबादमध्ये मोबाईल दुरुस्तीचे त्यांचे छोटे दुकान होते. जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते अजमेर शरीफ वरुन परतत होते. त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी द्या, तिन्ही मुलींना पंचवीस लाख रुपये द्यावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबासह आलेले हैदराबादचे आमदार जाफर हुसेन यांनी केली आहे.

  • 02 Aug 2023 08:00 AM (IST)

    चला, मासे खा… खवय्यांची चंगळ; आजपासून मासेमारीला सुरुवात

    आजपासून कोकण किनारपट्टीवर मासेमारीला सुरवात होणार आहे. 20 टक्याहून अधिक मच्छिमार आजच्या मच्छिमारीच्या मुहुर्तावर मासेमारी हंगामाला सुरुवात करणार. मच्छिमारीचा मुहुर्त साधण्यासाठी मच्छिमारांना अजूनही पोषक वातावरण नाही. समुद्र अजूनही खवळलेला असून खोल समुद्रात वेगवान वारे देखील वाहत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार 31 जुलैपर्यत मच्छिमारांना मासेमारी करण्यास बंदी असते.

  • 02 Aug 2023 07:35 AM (IST)

    संभाजी भिडे यांच्या कोकण दौऱ्याला विरोध, कोकणात तणाव वाढणार?

    संभाजी भिडे यांच्या कोकण दौऱ्याला विरोध करण्यात आला आहे. 8 विविध संघटनांनी हा विरोध केला आहे. उद्या 3 ऑगस्ट रोजी भिडे यांची चिपळूण येथे सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 02 Aug 2023 07:32 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

    महाविकास आघाडीच्या आमदारांची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत

  • 02 Aug 2023 07:26 AM (IST)

    मुंबईत पाच दिवस भरतीचे, उंचच उंच लाटा उसळणार

    पुढील पाच दिवस मुंबईतील समुद्राला मोठी भरती येणार आहे. रोज पाच दिवस समुद्रात पावणे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

Published On - Aug 02,2023 7:21 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.