Maharashtra Breaking News Live | छगन भुजबळ यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी
Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : आज पहिला श्रावणी सोमवार आहे. त्यानमित्ताने पहाटेपासूनच भाविकांनी राज्यातील विविध मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी गर्दी केली आहे. ठाकरे गटाचा भोसरीसह खेळ- आळंदी विधानसभेवर दावा. शिरुर-हवेली जुन्नरही लढण्याची तयारी. महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये एन्काऊंटरमध्ये टॉपचा अतिरेकी ठार. यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Chhagan Bhujbal Threaten Call | छगन भुजबळ यांना धमकीचा फोन
नाशिक | ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भुजबळ यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आलाय. छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर धमकीचा फोन आलाय. भुजबळांकडून नाशिक पोलीस आयुक्तांकडे आलेल्या फोन संदर्भात माहिती देण्यात आली. याप्रकरणी नाशिक पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय.
-
MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुंबई | राज्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 30 ऑगस्टला मुंबईत बैठक बोलावली आहे. आज झालेल्या तलाठी पेपरच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री स्वतः सगळ्या भरती परीक्षेचा आढावा घेणार आहेत. कंपनीच्या संचालकांना बैठकीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार बच्चू कडू आणि एमपीएससी समन्वयक बैठकीत उपस्थित राहणार आहेत. परीक्षांचा घोळ टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 30 ऑगस्टला बैठक आयोजित केली आहे.
-
-
पंढरपूर येथील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम ढकलला पुढे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. पंढरपूर येथे 26 ऑगस्ट रोजी होणार शासन आपल्या दारी हा कार्यक्रम 10 सप्टेंबर रोजी आता पार पडणार आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 10 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित राहणार आहेत.
-
Pune News | राज ठाकरे उद्या पुण्याच्या दौऱ्यावर
पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर असणार आहेत. राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यात दोन विवाह सोहळ्याला हजेरी लावणार. राज ठाकरेंचा गेल्या आठवड्यातच पुणे दौरा झालेला होता. राज ठाकरे उद्या खाजगी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे उद्या दुपारनंतर पुण्यात येतील.
-
चंद्रकांत पाटील यांनी केली कात्रज कोंढवा रस्त्याची पाहणी
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्याची नुकताच पाहणी केलीये. कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेचे 100 कर्मचारी, 25 वार्डन आणि पुणे वाहतूक पोलीस शाखेचे 50 कर्मचारी तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेली स्मशानभूमी चर्चा करून बाजूला स्थलांतरित करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
-
-
Pune News | पुण्यात युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन सुरू
पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. तलाठी भरतीत झालेल्या सर्व्हर डाऊन प्रकरणी कंपनी आणि राज्य सरकारविरोधात हे आंदोलन केले जात आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे बघायला मिळतंय. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
-
Pune News | चक्क ज्योतिषाकडून मुहूर्त काढत आरोपींकडून घरावर टाकला दरोडा
पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क ज्योतिषाकडून मुहूर्त काढत आरोपींकडून घरावर दरोडा टाकण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील बरमातीत 1 कोटी रूपयांची चोरी झालीये. महिलेचे हात पाय बांधत आरोपींनी दरोडा घातला आहे. 95 लाख 30 हजारांच्या रोख रकमेसह 20 तोळे सोन्यावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. एकुण 5 आरोपींना पुणे ग्रामीण पोलीसांकडून अटक देखील करण्यात आलीये.
-
Pune Crime | ज्योतिषाकडून मुहूर्त काढत दरोडेखोरांची चोरी, आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश
पुणे | ज्योतिषाकडून मुहूर्त काढत आरोपींकडून घरावर दरोडा टाकल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय. पुणे जिल्ह्यातील बरमातीत 1 कोटी रूपयांची चोरीचं प्रकरण उघडकीस आलं आहे. महिलेचे हात, पाय बांधत आरोपींनी चोरी केली. 95 लाख 30 हजारांच्या रोख रकमेसह 20 तोळे सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी एकूण 5 आरोपींना पुणे ग्रामीण पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. 5 अरोपींसह एका ज्योतिषाला पुणे पोलिसांनी अटक केली. सचिन जगधने, रायबा चव्हाण, रवींद्र भोसले, दीपक जाधव आणि ज्योतिष रामचंद्र वामन चव्हाण असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ज्योतिष असणाऱ्या इसमाला 8 लाख रूपयांचा मोबदला देण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. आरोपींकडून 60 लाख 97 हजार रोख रकमेसह 26 तोळे सोने पोलिसांकडून जप्त करण्यात आलं आहे. आरोपींना 25 ऑगस्ट पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
Pune News : महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, वाचा…
पुण्यात महिलेकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. अंजली कामठे असं अत्याचार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. 17 वर्षाचा मुलगा हा आरोपीच्या घराशेजारी राहायला आहे. अल्पवयीन तरुणाला जबरदस्ती करत पोलिसात जाण्याची धमकी देत शरीरिक संबंध करायला भाग पाडलं. तसंच शरीर संबंध करतानाचे व्हिडिओही मुलाला काढायला लावले, असे गंभीर आरोप या महिलेवर करण्यात आले आहेत.
-
वसई विरारमध्ये बसला दे धक्का!
वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसला दे धक्का करण्याची वेळ. वसई पश्चिम नवघर माणिकपूर बस थांब्यावर आज सकाळी पावणे बारा वाजता बस बंद पडली होती. चालक, वाहक यांनी स्वताच बसला धक्का मारून बस चालू करण्याची वेळ आली. परिवहन सेवेच्या अशा दुरावस्थेतील बस मुळे प्रवाशात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
-
तलाठी परीक्षेतील गोंधळावरून बच्चू कडू आक्रमक
तलाठी परीक्षेत झालेल्या गोंधळावर आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. 30 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परीक्षा गोंधळा संदर्भात भेटणार आहे. परिक्षेत असा गोंधळ घालणाऱ्या कंपनीवर कारवाई झाली पाहिजे. सरकारने जर मागे पुढे पाहिलं तर त्यांच्या विरोधात उभं राहू, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
-
या सरकारला काही गांभीर्य आहे की नाही ? रोहित पवार यांचा सवाल
तलाठी परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा गोंधळ सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे.
तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही. कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे? असे ट्विट त्यांनी केले आहे.
-
तलाठी परीक्षेच्या वेळेत बदल, दुपारी 2 वाजता होणार परीक्षा
तलाठी परीक्षेच्या वेळेत 1आता बदल करण्यात आला असून दुपारी 2 ते 4 या वेळेत पेपर घेण्याचा निर्णय येण्यात आला आहे. आधी 12.30 वाजता परीक्षा होणार होती.
मात्र परीक्षेदरम्यान सर्व्हर डाऊन झाल्याने तलाठी पदासाठीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
-
कांद्याच्या प्रश्नावर शरद पवारांचा सल्ला घेणार – छगन भुजबळ
कांद्याच्या प्रश्नावर शरद पवार यांचा सल्ला घेणार, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. कांद्याच्या प्रश्नावर शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली होती.
-
नाशिक : विंचूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
नाशिकच्या विंचूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. कांद्याच्या निर्यातशुल्कातील वाढीविरोधात शेतकरी आक्रमक. रास्तारोको आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांचा खोळंबा.
-
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ अपघात, दोघांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ कंटेनर पलटून अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर कामोठे रुग्णालयात उपचार सुरी आहेत. या अपघातात चार कारचे मोठे नुकसान झाले आहे.
-
Maharashtra News : गुलाबराव पाटील यांनी वाजवला डमरु
जळगाव जिल्ह्यातील गेल्या काही दिवसापासून मोठ्या संख्येने कावड यात्रा निघत आहे. धरणगाव शहरात देखील कावड यात्रा निघाली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हातात डमरू घेवून वाजवला.
-
Maharashtra News : तलाठी भरती परीक्षा, औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांना फटका
तलाठी भरती प्रक्रियेमध्ये सर्वर डाऊन झाल्यामुळे औरंगाबाद अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर ताटकळत बसावे लागले आहे. औरंगाबाद शहरातील पीएस महाविद्यालयांमध्ये तलाठी भरती परीक्षा आज पासून सुरू झालेली आहे.
-
Maharashtra News : बाजार समिती बंदला पाठिंबा
नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंदला किसान सभेने पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यातील बाजार समित्या बंद ठेऊन रस्त्यावर उतरा असे आवाहन किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केले आहे.
-
Maharashtra News : तलाठी परीक्षा, सर्व्हेर डाऊन, विद्यार्थी आक्रमक
सर्व्हर डाऊन असल्याने तलाठी पदासाठीच्या परीक्षेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे लातूर शहरातल्या परीक्षा केंद्रावर अनेक जिल्ह्यातून आलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. लातूर शहरतल्या अंबाजोगाई रस्त्यावर असलेल्या परीक्षा केंद्रावर किमान १५० परीक्षार्थी ताटकळत बसून आहेत .
-
Sanjay Raut : लोकसभा लढवण्यास तयार – संजय राऊत
पक्षाने आदेश दिल्यास आपण दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दक्षिण मुंबई हा शिवसेनाचा गड असून या ठिकाणावरुन साधा शिवसैनिकसुद्धा दोन ते अडीच लाख मतांनी निवडणून येईल.
-
पवारांच्या नावामुळे काही लोकं निवडून आले – संजय राऊत
पवारांच्या नावामुळे काही लोकं निवडून आले, पवार साहेब देशाचे आणि राज्याचे प्रमुख नेते आहेत. ईशान्य मुंबईत आमचा एक साधा शिवसैनिक जरी उभा राहिला तरी तो निवडून येईल असं संजय राऊत यांनी सांगितलं.
-
पाण्याची पाइपलाइन फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीचं पाणी
भांडूप पश्चिम इथे भल्या पहाटे पाण्याची पाइपलाइन फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीचं पाणी झाले आहे. मुंबई मेट्रोचं काम सुरू असताना पाईप लाईन फुटली असल्याची माहिती मिळाली आहे. मनपाचे अधिकारी अद्याप न आल्याने स्थानिक हैराण झाले आहेत.
-
दिलीप वळसे पाटील यांचं त्या विधानाबाबत स्पष्ट
मी खंत व्यक्त करीत होतो, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे.
-
तलाठी पदासाठीची परीक्षा खोळंबली
तलाठी पदासाठीची परीक्षा खोळंबली, सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षेसाठी आलेले उमेदवार केंद्राबाहेर दिसत आहेत. किमान 150 विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. सकाळी 9 वाजता परीक्षा होणार होती. नियोजनाचा अभाव असल्याचा परीक्षार्थींनी आरोप केला आहे.
-
नितेश राणेंनी संजय राऊतांना टोला लगावला
अनेक तारखा गेल्या परंतु सरकार पडलं नाही. नितेश राणेंनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
-
पाण्याची पाइपलाइन फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीचं पाणी
भांडूप पश्चिम इथे भल्या पहाटे पाण्याची पाइपलाइन फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणीचं पाणी झाले आहे. मुंबई मेट्रोचं काम सुरू असताना पाईप लाईन फुटली असल्याची माहिती मिळाली आहे. मनपाचे अधिकारी अद्याप न आल्याने स्थानिक हैराण झाले आहेत.
-
तलाठीच्या परीक्षेत सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थी खोळंबले
तलाठीच्या परीक्षेत सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थी खोळंबले असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी नऊचा पेपर होता, पण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नागपूरातील तलाठी परिक्षा असलेल्या अनेक केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
-
Sunny deol : सनी देओलच्या बंगल्याच्या लिलावाला स्थगिती
अभिनेता सनी देओलच्या बंगल्याचा आता लिलाव होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदाने अभिनेता सनी देओलच्या मालमत्तेच्या लिलावावर स्थगिती दिली आहे. संपूर्ण लिलाव स्थगित करण्यात आला आहे. सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून 56 कोटींचे कर्ज घेतले होते, जे तो फेडू शकला नाही.
-
Nashik Lasalgaon | नाशिकमध्ये शेतकऱ्यांच आंदोलन
नाशिक लासलगाव येथे निर्यात शुल्क रद्द झाले पाहिजे, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक आहेत. लासलगाव बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.
-
Sanjay Raut | संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार?
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत 2024 लोकसभा निवडणूक लढवू शकतात. ईशान्य मुंबईतून संजय राऊत निवडणूक लढवू शकतात. सध्या भाजपाचे मनोज कोटक या मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांच्याआधी किरीट सोमय्या खासदार होते.
-
People rescue : धरण क्षेत्रात अडकलेल्यांची सुटका
कोल धरणात पाणी पातळी वाढल्याने 10 लोक बोटीमध्ये अडकले होते. सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. मंडीमध्ये हे लोक अडकले होते.
#UPDATE | Ten people who were stuck in a boat at Kol Dam reservoir due to a rise in water level, were rescued around 3 am in the morning: District Administration, Mandi
(Pics source – District Administration, Mandi) https://t.co/BjyPVGrhW2 pic.twitter.com/9Tdy8NG8GM
— ANI (@ANI) August 21, 2023
-
high court : खासगी विनाअनुदानीत शाळा स्वतः शैक्षणिक शुल्क ठरवू शकते, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
खासगी विनाअनुदानीत शाळा स्वतः शैक्षणिक शुल्क ठरवू शकते. शाळेच्या शुल्कात समानता आणली जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे स्पष्ट केलं. 2011 चा महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे न्यायालयाने निकाल देताना लक्ष वेधलं आहे.
-
Nashik : कांदा रडवणार… लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. मोदी सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादल्याच्या निषेधार्थ कांदा लिलाव बेमुदत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लासलगाव येथे झालेल्या नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा लिलाव बेमुदत बंदमुळे बाजार समितीमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. तर दररोज 30 ते 40 कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.
-
patna kota express : पटणा-कोटा एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची तब्येत बिघडली, दोघांचा मृत्यू
पटणा-कोटा एक्सप्रेसमध्ये अचानक प्रवाशांची तब्येत बिघडली. सहाजणांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. या सर्वांना जुलाब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
-
shravan 2023 : पहिल्या श्रावणी सोमवार निमत्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, दर्शनासाठी रांगाच रांगा
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. नाशिक जिल्ह्यासह देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला आहे. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविक कुटुंबासह दाखल झाले आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.
Published On - Aug 21,2023 7:23 AM