Maharashtra Marathi Breaking News Live | महापालिकेचा अजब कारभार, ऐन पावसाळ्यात डांबरीकरण

| Updated on: Sep 23, 2023 | 7:13 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi Breaking News Live | महापालिकेचा अजब कारभार, ऐन पावसाळ्यात डांबरीकरण

मुंबई | 22 सप्टेंबर 2023 : राज्यसभेत काल महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे महिलांना राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं खातं उघडलं. अंतिम पंघालने जिंकलं पहिलं ब्रॉन्झ मेडल. दिल्लीतील विधीतज्ज्ञांशी चर्चा करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत दाखल. राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी. पिकांना नुकसान पण पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता. भाजपने अजित पवार यांची माफी मागितल्यानंतरही राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला सुरूच. यासह राज्य आणि देशातील राजकीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Sep 2023 08:43 PM (IST)

    Nalasopara | नालासोपारा इथे भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण

    नालासोपारा | मुंबई नजीकच्या नालासोपाऱ्यातून अजब प्रकार समोर आला आहे. नालासोपाऱ्यात भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार समोर आलाय. नालासोपारा पूवेर्तील कॅपिटल मॉल समोरील रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आलं. वसई विरारमध्ये अवघ्या महिनाभरातच रस्त्याची दुरावस्था होत आहे. काही दिवसापूर्वी भरलेले खड्डे पुन्हा उखडत आहे. त्यामुळे पालिकेची कामे निकृष्ट दर्जाची होत असून, नागरीकांच्या कररुपी पैशाचा चुराडा सुरु असल्याच आरोप होत आहे.

  • 22 Sep 2023 08:20 PM (IST)

    Icc World Cup Trophy In Pune | वर्ल्ड कप ट्रॉफी 26 सप्टेंबरला पुण्यात

    पुणे | आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी वर्ल्ड कप ट्रॉफीचा दौरा सुरु आहे. ही वर्ल्ड कप ट्रॉफी 26 सप्टेंबरला पुण्यात येणार आहे. या निमित्ताने वर्ल्ड कप रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कप रॅलीत क्रिकेट चाहत्यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी क्रिकेट चाहत्यांना केलं आहे.

  • 22 Sep 2023 07:58 PM (IST)

    Nashik News : मार्ग लवकरच निघेल मंत्री छगन भुजबळ यांचे मोठे भाष्य

    त्यांचे काही प्रश्न भारत सरकारशी निगडित, काही प्रश्न राज्य सरकारशी निगडित आहेत. पियूष गोयल आणि मंडळी लोकसभा अधिवेशनात गुंतलेली आहे. हा अडचणीचा भाग झालाय. मुख्यमंत्री यांच्या कानावर घातले आहे. काहीतरी मार्ग लवकरच निघेल असे कांदा प्रश्नावर मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

  • 22 Sep 2023 07:38 PM (IST)

    kalyan News : कल्याणमध्ये धक्कादायक घटना उघडकीस

    कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. कल्याणमध्ये लोको पायलटचा राहत्या घरात संशयित मृतदेह सापडलाय. कल्याण कोळशेवाडी पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. विनोद कुमार मीना असे या लोको पायलटचे नाव असल्याचे सांगितले जातंय.

  • 22 Sep 2023 07:28 PM (IST)

    Nashik News : इगतपुरीमध्ये जोरदार पावसाला सुरूवात

    इगतपुरी तालुक्यात शहरासह अनेक ठिकाणी गेल्या तीन तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागातील नागरिकांच्या घरात देखील पाणी गेल आहे तर मुख्य बाजारपेठ असलेल्या घोटी बाजारपेठेमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.

  • 22 Sep 2023 07:09 PM (IST)

    Pune News : 48 तासात राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार

    पुढील 48 तासात राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार असल्याचे सांगितले जातंय. रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील उर्वरित भागात मेघगर्जेनेसह मुसळधार पाऊस कोसळू शकतो. 25 व 26 तारखेला राज्यात विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव काळात छत्री घेऊनच बाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाचे केले.

  • 22 Sep 2023 07:06 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आमदार प्रसाद लाड यांच्या गणरायाचे दर्शन

    आमदार प्रसाद लाड यांच्या गणरायाचे दर्शन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

  • 22 Sep 2023 06:55 PM (IST)

    नारी शक्ती वंदना विधेयक पास झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले आभार

    “लोकसभा आणि राज्यसभेत संमत झालेल्या नारी शक्ती वंदना विधेयकाबद्दल मी दोन्ही सभागृहातील खासदारांचे आभार मानतो. भविष्यात जेव्हा आपण इतिहासाकडे मागे वळून पाहतो तेव्हा विकसित भारताच्या इतिहासात या विधेयकाचे महत्त्वपूर्ण योगदान असेल.”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

  • 22 Sep 2023 06:45 PM (IST)

    अरुणाचल प्रदेशात 9 वर्षात 4 विमानतळांची निर्मिती- ज्योतिरादित्य सिंधिया

    केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितलं की, “स्वातंत्र्याच्या 66 वर्षात अरुणाचल प्रदेशात एकही विमानतळ उपलब्ध नव्हता, गेल्या 9 वर्षात या राज्यात 4 विमानतळ तयार झाले आहेत. ईशान्येकडील भागात आता 17 विमानतळ आहेत. आम्हाला तेजू विमानतळाने दिब्रुगढ, इंफाळ, गुवाहाटी आणि संपूर्ण प्रदेशाला जोडायचे आहे.”

  • 22 Sep 2023 06:30 PM (IST)

    क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा चीन दौरा रद्द

    भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला चीन दौरा रद्द केला आहे. कारण बीजिंगने अरुणाचल प्रदेशातील भारतीय खेळाडूंना मान्यता देण्यास नकार दिला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली आहे.

  • 22 Sep 2023 06:28 PM (IST)

    मुंबईतील हीरा पन्ना मॉलला आग, 14 जणांना वाचवण्यात यश

    जोगेश्वरीतील हीरा पन्ना मॉलला आग लागल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच 14 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

  • 22 Sep 2023 06:18 PM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जेडीएस एनडीएचा सहभागी

    लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा मुकाबला करण्यासाठी भाजपाने एनडीएचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. शुक्रवारी, जनता दल सेक्युलर (जेडीएस) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभाग नोंदवला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जेडीएस एनडीएचा भाग झाला.

  • 22 Sep 2023 05:40 PM (IST)

    1 ऑक्टोबर रोजी जुन्नर येथे ‘इंडीया’ आघाडीची सभा

    जुन्नर येथे आदिवासी चौथरा दिनानिमित्त इंडीया आघाडीची सभा होणार असून पक्ष फुटीनंतर प्रथमच शरद पवार यांची जुन्नर येथे सभा होत आहे. या सभेला केंद्रीय मंत्री शरद पवार, कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे उपस्थित रहाणार आहेत.

  • 22 Sep 2023 05:10 PM (IST)

    Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीपर्यंतच अस्तित्व

    लोकसभा निवडणुकीपर्यंतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर विकासनिधीच्या माध्यमातून मतं खरेदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर अमोल मिटकरी यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. ब्लॅकमेल करुन नाही तर मागणीनंतर विकास निधी दिल्याचा पलटवार त्यांनी केला.

  • 22 Sep 2023 04:41 PM (IST)

    OBC News : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं उपोषण स्थगित

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आमरण उपोषण 29 सप्टेंपर पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले तर उपोषण मागे घेण्यात येणार आहे. नागपूरमध्ये हे आमरण उपोषण सुरु आहे. ओबीसी महासंघाचे प्रमुख बबनराव तायवाडे यांनी ही माहिती दिली.

  • 22 Sep 2023 04:25 PM (IST)

    JDS News : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आणखी एक पक्ष

    राष्ट्रीय लोकशाही आघाडीत, एनडीएमध्ये आता जनता दल सेक्यलर पण सहभागी होत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक समीकरणे बदलणार आहेत.

  • 22 Sep 2023 04:11 PM (IST)

    Mumbai Fire | जोगेश्वरी हिरा पन्ना मॉलमध्ये भीषण आग

    मुंबई | जोगेश्वरी हिरा पन्ना मॉलमध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे धुराचे ढग आकाशात उठत आहेत. आगीमुळे गोंधळ उडालाय. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

  • 22 Sep 2023 04:08 PM (IST)

    Rain Update | इगतपुरी शहरात मुसळधार पावसाला सुरुवात

    इगतपुरी : इगतपुरी शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडतोय. सकाळपासून पाऊस नव्हता. पण दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. पाऊस चांगला कोसळत असला तरी  तालुक्यातील अनेक भागात अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.

  • 22 Sep 2023 03:58 PM (IST)

    Nashik News | येवल्यामध्ये कांदा व्यापाऱ्यांची थोड्याच वेळात बैठक

    नाशिक : येवल्यामध्ये कांदा व्यापाऱ्यांची थोड्याच वेळात बैठक होणार आहे. कांदाच्या लिलाव संदर्भात बैठकीत निर्णय होणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील कांदा व्यापारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे.

  • 22 Sep 2023 03:54 PM (IST)

    Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांचे उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

    मुंबई | किरीट सोमय्या यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

    • मी लालबागच्या राजाच दर्शन घेतलं आणि तिकडे मागणी केली की, उद्धव ठाकरे सेनेच्या राक्षशी प्रवृत्तीमुळे मुंबईकरांना कोव्हिड काळात जे सहन करावं लागलं, त्याला ठाकरे सेनेचे दोन डझन नेते कमाईत व्यस्त होते. या राक्षसी लोकांवर कारवाई करण्यासाठी मला शक्ती दे, असं मी देवाकडे मागणं मागितलं आहे.
    • सगळ्यात पहिली चोरी उद्धव ठाकरे यांनी केलीय.
    • संजय राऊत यांच्या निकटवर्तीयाला सुजित पाटकर यांच्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली.
    • सुजित पाटकर,अमोल किर्तीकर,सूरज चव्हाण, किशोरी पेडणेकर यांच्या खात्यात पैसे गेले.
    • रोमिल छेडा यांच्या ओक्स मॅनेजमेंट कंपनीला ऑक्सिजन प्लांटच टेंडर देण्यात आलं.
    • १४० कोटींच टेंडर देण्यात आलं. मात्र ऑक्सिजन फक्त ३८ कोटींचा पुरवण्यात आला.
    • ठाकरेंनी मुंबईकरांचा श्वास चोरला.
    • आदित्य ठाकरेंचे मित्र राहुल गोम्सलाही टेंडर देण्यात आलं.
    • ६६५ रुपयांची रेमडिसिव्हीर ४३०० रुपयांना विकत घेण्यात आले आणि घोटाळा झाला.
  • 22 Sep 2023 03:31 PM (IST)

    Rohit Pawar | रोहित पवार यांची आज कल्याणमध्ये जाहीर सभा

    कल्याण | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ल्यामधील कल्याणमध्ये रोहित पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी रोहित पवार लोकलमध्ये बसून कल्याणला निघाले आहेत. कल्याणच्या स्प्रिंग टाईम हॉटेलमध्ये सायंकाळी साडेचार वाजता त्यांची जाहीर सभा आहे.

  • 22 Sep 2023 03:29 PM (IST)

    पुण्यातील शिवसेना भवनात साकारला इर्शाळवाडी दुर्घटनेचा देखावा

    पुणे | रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही तासातच घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेचा अनोखा देखावा पुण्यातील शिवसेना भवनमध्ये साकारला असून या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांच्यासहित वैद्यकीय सेवा केंद्र, पोलीस अधिकारी, टीम सीएम पुणे ने उभारलेले जीवनावश्यक वस्तू पुरवठा केंद्र, बचावकार्य करणारे NDRF चे पथक, ऍम्ब्युलन्स यासोबत 150 प्रतिकृती साकारलेल्या आहेत. पुणेकर नागरिकांना हा देखावा सारसबागे जवळील शिवसेना भवनात बघता येणार आहे.

  • 22 Sep 2023 01:46 PM (IST)

    Dombivali News | विद्युत पुरवठा करण्यासाठी लावलेल्या मिटर बॉक्समुळे भीषण आग

    डोंबिवली पूर्वेतील रामनगर येथील अटलांटा इमारतीमध्ये विद्युत पुरवठा करण्यासाठी लावलेल्या मिटर बॉक्समुळे भीषण आग. आज दुपारी अचानक लागलेल्या आगी मुळे इमारतीत राहणाऱ्या राहिवाश्याची धावपळ. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल होत विद्युत पुरवठा बंद करत आग नियंत्रणात.

  • 22 Sep 2023 01:23 PM (IST)

    Aaditya Thackeray | मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

    मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पांढुरणा येथे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमानंतर एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेला आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती.

  • 22 Sep 2023 01:00 PM (IST)

    Shivsena MLA Disqualification | कागदपत्रांच्या नावाने शिंदे गटाने वेळ मारून नेली- अनिल परब

    कागदपत्रांच्या नावाने शिंदे गटाने वेळ मारून नेली होती. मात्र आता कोर्टाच्या आदेशानं अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. कोणतीही टंगळमंगळ न करता निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केलं. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी ते बोलत होते.

  • 22 Sep 2023 12:50 PM (IST)

    Chandrapur | ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांना अतिदक्षता कक्षात हलविलं

    ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांना अतिदक्षता कक्षात हलविण्यात आलं आहे. रवींद्र टोंगे यांची चिंताजनक प्रकृती बघता वैद्यकीय पथकाने हा निर्णय घेतला. मात्र अतिदक्षता कक्षातही रवींद्र टोंगे यांनी कुठलंही अन्नग्रहण न करण्याचा निर्धार केला आहे.

  • 22 Sep 2023 12:40 PM (IST)

    Shivsena MLA Disqualification | शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मोठी अपडेट

    शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. आमदारांची सुनावणी प्रक्रिया सोमवारी सुरू होणार आहे. गरज पडली तर ठाकरे आणि शिंदे गटांना बोलावणार असल्याची माहिती राहुल नार्वेकरांनी दिली. उद्याच विधीमंडळ दोन्ही गटांना नोटीस पाठवणार आहे.

  • 22 Sep 2023 12:35 PM (IST)

    Kolhapur | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीच्या अंगावरील दागिन्यांची भरदिवसा चोरी

    सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीच्या अंगावरील दागिन्यांची भरदिवसा चोरी झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. आयडियल स्पोर्ट्स क्लबच्या गणपतीच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. 500 ग्रॅम वजनाचा चांदीचा हार चोरीला गेला आहे. सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास जेव्हा मंडळाचे कार्यकर्ते घरी गेले, तेव्हा कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला.

  • 22 Sep 2023 12:20 PM (IST)

    Rahul Gandhi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओबीसीसाठी काय केलं? राहुल गांधी यांचा सवाल

    बजेटच्या निर्णय प्रक्रियेत ओबीसींची संख्या कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसींसाठी काय केलं? देशात 90 सचिवांमध्ये फक्त 3 ओबीसी कसे आहेत?. भाजपचे खासदार हे मूर्तींसारखे आहेत, त्यांना अधिकार नाहीत, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केलं.

  • 22 Sep 2023 12:15 PM (IST)

    शेतकऱ्यांना जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश- जयंत पाटील

    शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आपले जीवन संपवणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश आहे अशी टीका त्यांनी केली.

  • 22 Sep 2023 12:04 PM (IST)

    LIVE UPDATE | रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक, विजय बल्की बसणार आमरण उपोषणाला

    प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलनाला बसलेले ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांना प्रशासनाने मंडपातून रुग्णालयात हलवले आहे. ओबीसी आंदोलकांच्या निषेधच्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने रवींद्र टोंगे यांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले आहे. आता मंडपात दुसरे ओबीसी कार्यकर्ते विजय बल्की आमरण उपोषणाला बसणार आहेत. सरकारने ओबीसींच्या या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला आहे.

  • 22 Sep 2023 11:34 AM (IST)

    LIVE UPDATE | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर शिंदे, फडणवीस, शेलार यांच्या गणपतीचं देखील दर्शन घेणार आहेत. अमित शाह लालबागच्या राजचं देखील दर्शन घेणार आहेत. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह मुंबई विद्यापीठातील कार्यक्रमानंतर शाह दिल्लीला रवाना होणार आहेत.

  • 22 Sep 2023 11:25 AM (IST)

    LIVE UPDATE | महिलांचा आत्मविश्वास आकाशात भरारी घेतंय – पंतप्रधान मोदी

    महिलांचा आत्मविश्वास आकाशात भरारी घेतंय असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपण महत्त्वाच्या निर्णयाचे साक्षीदार आहोत….असं देखील मोदी म्हणाले. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून जनतेला संबोधित करत आहेत.

  • 22 Sep 2023 11:14 AM (IST)

    LIVE UPDATE | सत्तेसाठी अजित पवार यांनी लाचारी पत्करली – वडेट्टीवार

    सत्तेसाठी अजित पवार यांनी लाचारी पत्करली आहे… असं वक्तव्य विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे. ‘पडळकरांच्या वक्तव्यावर दादा उत्तर देऊ शकत नाही. अजित पवार यांचं देखील भाजपकडून खच्चीकरण सुरु आहे..’ पडळकरांच्या वक्तव्यावरून वडेट्टीवर यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • 22 Sep 2023 11:07 AM (IST)

    LIVE UPDATE | रवींद्र टोंगेंची प्रकृती बिघडली, उपोषणाचा आजचा १२ वा दिवस

    रवींद्र टोंगे यांची प्रकृती बिघडली आहे. आजचा त्यांच्या उपोषणाचा १२ वा दिवस आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. चंद्रपूर याठिकाणी ओबीसींच्या आरक्षण मागणीसाठी रवींद्र टोंगे यांचं उपोषण सुरु आहे.

  • 22 Sep 2023 10:59 AM (IST)

    पंचधातूची मूर्ती चोरणाऱ्या आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक

    नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांनी पंच धातूची मूर्ती चोरणाऱ्या आरोपीला 2 तासांच्या आत अटक केली. श्रीराम, सीता व लक्ष्मणाची पंचधातूची 7 किलो वजनाची मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून  व खबरीच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आला.

  • 22 Sep 2023 10:38 AM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचं घेणार दर्शन

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबईत येणार असून लालबागच्या राजाचं घेणार दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन तेथेही गणरायाचे दर्शन घेतील.

  • 22 Sep 2023 10:33 AM (IST)

    राज्यसभेत काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर का केला ? शरद पवारांचा सवाल

    शरद पवार यांच्यासोबत काढलेला फोटो शेअर केल्यानंतर खुद्द शरद पवार यांनीच प्रफुल्ल पटेल यांना जाब विचारला आहे. राज्यसभेत काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर का केला ? असा सवाल त्यांनी पटेल यांना विचारला.

  • 22 Sep 2023 10:16 AM (IST)

    ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत मुंबईत २९ तारखेला होणार बैठक

    ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची २९ तारखेला बैठक होणार आहे. दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक पार पडेल.

    या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील.

    ओबीसींचं आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारतर्फे ही बैठक बोलावण्यात आली आहे.

  • 22 Sep 2023 10:12 AM (IST)

    शिंदेंनी ठाकरे बाप-लेकाला कामाला लावलं – रामदास कदम यांची टीका

    मी आदित्य ठाकरेंबाबत  बोलणार नाही, तेवढी त्यांची उंची नाही अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी बाप लेकाला चांगलच कामाला लावलय, दोघेही पळत आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

  • 22 Sep 2023 10:09 AM (IST)

    महादेव बेटिंग ॲपप्रकरणी ईडीचा मुंबई व दिल्लीत छापा

    महादेव बेटिंग ॲपप्रकरणी ईडीने काल दिल्ली व मुंबईत काल छापा मारला असून अडीच कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    बेटिंग ॲपच्या संचालकांच्या लग्नात २०० कोटी रुपयांची उधळपट्टी झाली होती. लग्नसोहळ्यासाठी अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.

  • 22 Sep 2023 09:57 AM (IST)

    Maharashatra News | पत्नीने केली पतीची हत्या

    श्रीरामपूर दरोडा आणि हत्या प्रकरणास नाट्यमय वळण लागले आहे. तालुक्यातील एकलहरे गावात दरोडा आणि एकाची हत्या झाली होती. या प्रकरणी नईम पठाण याची हत्या त्यांच्या पत्नीनेच घडवल्याचे स्पष्ट झाले. पतीला मारल्यानंतर दरोड्याचा तिने बनाव केला. पोलिसांनी नईमची पत्नी बुशरा हिला अटक केली आहे.

  • 22 Sep 2023 09:43 AM (IST)

    Sanjay Rajut | निर्णयासाठी दिल्ली गाठावे लागले – राऊत

    विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णयासाठी दिल्ली गाठवे लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊन काहीच हालचाली त्यांच्याकडून होत नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  • 22 Sep 2023 09:30 AM (IST)

    Maharashatra News | धुळे जिल्ह्यात दुधात भेसळ

    धुळे शहरासह जिल्ह्यात दुधाची भेसळचा प्रकार सुरु झाला आहे. यामुळे भेसळ रोखण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे. शहरासह परिसरातील 30 दूध विक्रेत्यांकडे कारवाई करण्यात आली. यावेळी 27 हजार लिटर दुधाची तपासणी करण्यात आली. कारवाई 946 लिटर दूध 80 लिटर दही नष्ट करण्यात आली.

  • 22 Sep 2023 09:20 AM (IST)

    Maharashatra News | गव्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

    गव्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गडहिंग्लज आजरा मार्गावर घडली. मुंगूसवाडी गावाजवळ ही घटना घडली. गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या उस्मान कानडीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • 22 Sep 2023 09:04 AM (IST)

    Maharashatra News | काम न करणाऱ्यांचे राजीनामे घेऊ

    काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊ, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. पुणे शहरात भाजप पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

  • 22 Sep 2023 08:59 AM (IST)

    Loksabha Election 2024 | यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून संजय राठोड लढणार?

    यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात संजय राठोड यांना ऑफर, अन्यथा भाजपच लढणार हा मतदारसंघ. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात भाजपने सर्वेक्षण केले, त्यात ही लोकसभा अडचणीची ठरत असल्याची सूत्रांची माहिती. यवतमाळ वाशीम लोकसभा जिंकायची असेल, तर संजय राठोड यांना उमेदवारी द्या, असा छुपा सर्वे भाजप पुढे आला आहे तसा संदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असल्याची सूत्रांची माहिती.

  • 22 Sep 2023 08:53 AM (IST)

    Kolhapur News | गव्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू

    कोल्हापूरात गव्याच्या हल्ल्यात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. गडहिंग्लज आजरा मार्गावरील मुंगूसवाडी नजीक ही घटना घडली. बुधवारी सायंकाळी गव्याने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या उस्मान कानडीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गडहिंग्लज आजरा मार्गावर गेल्या काही दिवसापासून गवा रेड्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाकडे बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी आहे.

  • 22 Sep 2023 08:34 AM (IST)

    Covid Scam | सूरज चव्हाण, अमोल किर्तिकर यांच्या अडचणी वाढणार

    कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल किर्तिकर यांच्या अडचणी वाढू शकतात. अमोल किर्तिकर यांच्या खात्यात 52 लाख रुपये तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये आल्याच सूत्रांच म्हणणं आहे. दोघेही EOW च्या रडारवर आहेत.

  • 22 Sep 2023 08:15 AM (IST)

    Nashik Crime | नात्याला काळिमा फासणारी घटना

    वडील मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. पावणे सहा वर्षाच्या मुलीवर बापाने बलात्कार केला. उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयित बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पत्नी कामावर गेल्यानंतर बापाने लैंगिक अत्याचार केला

  • 22 Sep 2023 08:00 AM (IST)

    onion price : नाशिकमधील कांदा लिलाव आजही बंद, सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच

    नाशिकमधील कांदा लिलाव आजही बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी सलग तिसऱ्या दिवशीही संप पुकारला आहे. त्यामुळे कांदा लिलाव बंद आहे. परिणामी कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 22 Sep 2023 07:45 AM (IST)

    Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनी घेतली उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनवर यांची भेट; प्रकृतीची विचारपूस

    आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली चौंडी येथील उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर यांची भेट. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन केली तब्येतीची विचारपूस. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रुपनवर यांचं उपोषण सुरू आहे. तब्बेत खालावल्याने आण्णासाहेब रुपनवर यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

  • 22 Sep 2023 07:31 AM (IST)

    Reservation : आरक्षण नाही,तर मतदान नाही, सांगलीतील ग्रामस्थांचा इशारा

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीच्या बेडग गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे. आरक्षण नाही, तर मतदान नाही, अश्या आशयाचा डिजीटल फलक देखील गावात सकल मराठा समाजाच्यावतीने लावण्यात आला आहे. मराठा आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाजातील लोकप्रतिनिधींनी थेट दिल्लीमध्ये जाऊन आता आंदोलन करावं आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. नसेल तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालू, असा इशारा बेडग ग्रामस्थांनी दिला आहे.

  • 22 Sep 2023 07:17 AM (IST)

    Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक आता राष्ट्रपतींकडे; शिक्कामोर्तब होताच होणार कायदा

    लोकसभेपाठोपाठ महिला आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर झालं आहे. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत 100% मंजूर झालं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार आहे. त्यावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब होताच या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होणार आहे.

  • 22 Sep 2023 07:12 AM (IST)

    World Championship : 19 वर्षाच्या रेसलरची कमाल, पहिलंवहिलं मेडल जिंकलं

    वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये 19 वर्षाच्या अंतिम पंघालने कमाल केली आहे. तिने महिलांच्या 53 किलोग्रॅमच्या कॅटेगिरीत ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे. वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशीपमधील भारताचं हे पहिलं मेडल आहे.

  • 22 Sep 2023 01:00 AM (IST)

    Shivsena MLA Disqualification | कागदपत्रांच्या नावाने शिंदे गटाने वेळ मारून नेली- अनिल परब

    कागदपत्रांच्या नावाने शिंदे गटाने वेळ मारून नेली होती. मात्र आता कोर्टाच्या आदेशानं अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. कोणतीही टंगळमंगळ न करता निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केलं. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी ते बोलत होते.

Published On - Sep 22,2023 7:09 AM

Follow us
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.