Mumbai Maharashtra News Live | राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींसह जगातील सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.
मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. पवार आज माढा आणि पंढरपुरातील मेळाव्याला संबोधित करणार आहेत. इस्रायलने गाजामध्ये पुन्हा एकदा हल्ला केला आहे. या हल्ल्यात 30 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इगतपुरीच्या अधरवड गावातही राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिलं जात नाही, तोपर्यंत ही बंदी असेल असं या गावकऱ्यांनी म्हटलं आहे. उद्या धम्मचक्र परिवर्तन दिन असल्याने नागपूरमध्ये आंबेडकरी अनुयायी जमण्यास सुरुवात. यासह राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Pune News | उद्या दसरा मेळावा, आदित्य ठाकरे आज पुण्यात
पिंपरी चिंचवड | मुंबईत उद्या दसरा मेळावा पार पडणार आहे. तत्पूर्वी आज उद्धव ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी पिंपरी चिंचवडमध्ये हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलं. आदित्य ठाकरेंनी देखील वाहनावरची पुष्प उचलत कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी केली. त्यांनी थेरगाव येथील नवरात्री मंडळात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. राज्याला संकटातून मुक्त कर, असं साकडं देवीच्या चरणी आदित्य ठाकरेंनी घातलं.
-
Thane News | ठाण्यात सकल मराठा समाजाची बैठक सुरु
ठाणे | मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आल्याने पुढील भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सकल मराठा समाजाची बैठक सुरु झालीय. सकल मराठा समन्वयक, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघाच्या बैठकीला सुरुवात झालीय.
-
-
Vijay Wadettiwar | निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका : विजय वडेट्टीवार
मुंबई | राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. निकषांच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नका, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
-
Ravikant Tupkar | रविकांत तुपकर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक
बुलडाणा | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहे.. सोयाबीनला 9 हजार तर कपाशीला 12 हजार रुपये प्रति क्विंटल दर द्यावा. तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी, यासह अनेक मागण्या घेऊन रविकांत तुपकर पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभे करणार आहेत. विदर्भ मराठवाड्याचा दौरा करून रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यात एल्गार रथ यात्रा काढणार आहे. तर 20 नोव्हेंबर ला बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा भव्य एल्गार मोर्चाची हाक तुपकर यांनी दिली आहे.
-
Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांना सिल्लोडच्या बोरगाव सारवणी गावात ग्रामस्थांनी रोखलं
सिल्लोड | मंत्री अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरमध्ये ग्रामस्थांनी गावात येण्यापासून रोखलं आहे. सिल्लोडच्या बोरगाव सारवणी गावातील ग्रामस्थांनी सत्तरांना रोखलं. ग्रामस्थांनी यावेळेस चले जाव अशा घोषणा दिल्या. गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सत्तार यांना माघार घ्यावी लागली.
-
-
प्लास्टिकच्या फुलांचा फटका थेट शेतकऱ्यांना
प्लास्टिकच्या फुलांचा फटका शेतकरी व्यापाऱ्यांना बसल्याचे दिसतंय. थेट आता प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आणण्याची मागणी केली जातंय. फुल मार्केटमध्ये फुलांची आवक वाढली आहे.
-
गिरीश जाधव यांनी दिला अत्यंत मोठा इशारा
शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला काळे झेंडा दाखवून निदर्शन करणार असल्याचा उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी इशारा दिलाय. केंद्राची सत्ता मिळाल्यास महागाईवर नियंत्रण आणून, सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन येतील असे आश्वासन मोदींनी दिलं होते, असे म्हणत त्यांनी हा इशारा दिलाय.
-
15 हजार शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होणार
कल्याण डोंबिवलीतून शिंदे व ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी 15 हजार शिवसैनिक निघणार मुंबईच्या दिशेने. शिंदे गटाचे 12 हजार तर ठाकरे गटाचे 4 हजार कार्यकर्ते मुंबई मेळाव्यात राहणार उपस्थित. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने दोन्ही गटातील कार्यकर्ते करणार रेल्वेचा प्रवास करत आहेत.
-
Parbhani news | काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का
काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसलाय. वरपुडकरांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्यत्व अपात्र ठरले आहे. आमदार वरपुडकर हे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तथा अध्यक्ष होते. विभागीय सहनिमंत्रकांचा आदेश, सहकार व राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ.
-
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं पुन्हा कर्ज माफ करण्याचे आश्वासन
छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल ने राज्य में दोबारा सत्ता में आने पर किसानों का कर्ज माफ करने का वादा किया। pic.twitter.com/AtHtDdbdyB
— ANI_HindiNews (@AHindinews) October 23, 2023
-
खासदार राहुल शेवाळे मानहानी प्रकरण, दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण
खासदार राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे. कोर्टाने हा निकाल राखून ठेवला आहे. मानहानी प्रकरणात कोर्ट 26 ऑक्टोबरला निकाल देणार आहे. मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे.
-
ललित पाटीलचा एन्काउंटर केला जाईल, काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप
ड्रग्स माफिया ललित पाटील याचा एन्काउंटर करून तपास थांबवला जाईल असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला आहे. दुसरीकडे, धंगेकर यांच्याकडे काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांना द्यावी, असं प्रत्युत्तर दादा भुसे यांनी दिलं आहे.
-
भाजपाकडून शरद पवार यांच्यावर जोरदार टीका
भाजपाने ट्वीट करत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया शरद पवार यांनीच रोवला असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार अजूनही साडेतीन जिल्ह्यांचेच नेते असा टोलाही ट्वीटमधून हाणला आहे. अनेकांची घरं फोडण्याचं कामंही केल्याचं सांगितलं आहे.
फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया महाराष्ट्रात कुणी रचला असेल तर तो @PawarSpeaks यांनीच. अनेकांची घरं फोडली, काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल… https://t.co/zyMkmjpATL
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 23, 2023
-
मुंबईत इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू, अनेक जखमी
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर येथील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आज सकाळी लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. बीएमसीने ही माहिती दिली आहे.
#WATCH मुंबई: कांदिवली पश्चिम के महावीर नगर की पावन धाम वीणा संतूर बिल्डिंग में आग लगी, आग पर काबू पा लिया गया है। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/REWViXft8t
— ANI_HindiNews (@AHindinews) October 23, 2023
-
भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन
भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. बेदी काही दिवसांपासून आजारी होते. बिशन सिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर येथे झाला होता. 1966 ते 1979 दरम्यान भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले होते.
-
ललित पाटीलचा एन्काऊंटर करून तपास थांबवला जाईल – आमदार रवींद्र धंगेकर
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा एन्काऊंटर करून या प्रकरणाचा तपास थांबवला जाईल असा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला. ललित पाटील प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे. त्याला गती देण्याची गरज आहे. ससूनचे डिन, बंड गार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही अटक करा अशी मागणीही आमदार धंगेकर यांनी केलीय.
-
धुळे शहरात मंत्र्यांना प्रवेश बंदी, काळे फासण्याचा इशारा
धुळे : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला धुळ्यातील मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सत्ताधारी मंत्री आणि मोठ्या नेत्यांना धुळे शहरात बंदी घालण्यात आली आहे. कुठल्याही मंत्र्यांना शहरात फिरू देणार नाही. मंत्री शहरात आल्यानंतर त्यांना घेराव घालू वेळप्रसंगी काळे देखील फासण्यात येईल असा इशारा जिल्हा मराठा क्रांती युवा मोर्चाने दिलाय.
-
आमदार संतोष बांगर यांनी तुळजाभवानी मातेचरणी केली एक किलो चांदी अर्पण
हिंगोली : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदारसंघातील कळमनुरी येथील तुळजाभवानी मातेच्या चरणी एक किलो चांदी अर्पण केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आझाद मैदान येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला आमदार बांगर हजारो शिवसैनिकांसह निघणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
-
नाशिकमधून १५ हजार शिवसैनिक आझाद मैदानावर रवाना होणार
मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल. या मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे यानंतर नाशिकमध्ये देखील जय्यत तयारी करण्यात येतेय. उद्या सकाळी नाशिक जिल्ह्यातून जवळपास १५ हजार शिवसैनिक मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या शिवसैनिकांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलीय. या शिवसैनिकांना जेवण, पाणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने देखील काळजी घेतली जाईल, असे देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
-
ठाकरे गटाच्या दुसऱ्या मेळाव्याची जय्यत तयारी, शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन सूचना जारी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा शिवतीर्थ, म्हणजे शिवाजी पार्कवर होणार आहे. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा नियमितपणे शिवतीर्थवर होतो. मात्र गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यंदाही ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कवर येणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर शिवतीर्थावरील शिवसैनिकांना कोणत्या सूचनांचे पालन करावे लागणार, यासाठी मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.
-
मराठा आरक्षण देत नाही म्हणून मंत्र्यांना धुळे शहरात प्रवेश बंदी
मराठा आरक्षण देत नाही म्हणून मंत्र्यांना धुळे शहरात प्रवेश बंदी करण्यात आलीये. प्रवेश बंदी करणार महाराष्ट्रातलं धुळे शहर आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला धुळ्यातील मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय द्यावा अन्यथा सत्ताधारी मंत्री आणि मोठ्या नेत्यांना धुळे शहर बंदी असणार आहे. कुठल्याही मंत्र्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश काटे यांनी दिला आहे. मराठा क्रांती मोर्चा ,मराठा क्रांती युवा मोर्चा, मराठा क्रांती महिला मोर्चा यांच्याकडून पत्रक काढून हा इशारा देण्यात आलाय.
-
दिल्लीतील प्रदूषण होणार कमी? केजरीवाल सरकारची नियमावली जाहीर
केजरीवाल सरकारकडून प्रदूषणाबाबत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये दिल्लीकरांना 26 ऑक्टोबर पासून सिग्नलवर गाड्या बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नवरात्री आणि दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी असणार आहे. फटाके वाजणार नाहीत याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर असून 26 ऑक्टोबरपासून रेडलाईट ऑन, गाडी ऑफ अभियान राबवले जाणार आहे. तर 30 ऑक्टोबरपासून पराली जाळण्याच प्रमाण वाढल्यानंतर प्रदूषण वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे दिल्ली शेजारील सर्व राज्यांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
-
विरोधी पक्ष नेत्यांना मनसेचा टोला, शिल्लक सेना प्रमुखही चांगले…
राहुल गांधी चांगले वक्ते नाहीत, असे किमान स्पष्ट बोलण्याची हिंमत विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दाखवली तरी … आता दसऱ्याला होणाऱ्या टोमणे मेळाव्यात शिल्लक सेना प्रमुखही चांगले वक्ते नाहीत असे स्पष्ट बोलण्याचे धाडस विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दाखवणार का … ? असा सवाल मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी करत विरोधकांवर हल्लाबोल केलाय.
-
एकदा जातनिहाय जनगणना होऊन जाऊ द्या – अजित पवार
2021 ला जनगणना व्हायला हवी होती पण ती झाली नाही. असे अजित पवार यांनी म्हटले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जातनिहाय जनगणना कशी केली याची माहिती मागवली असल्याचे त्यांनी म्हटले. 62 टक्के आरक्षण ओलांडली आहे. तरीही त्यात राहून मराठा समाजाला आरक्षण कसे देतां येईल याबाबत मार्ग काढतोय, असे अजित पवार यांनी म्हटले.
-
आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक आहोत – अजित पवार
इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर येथील कार्यक्रमात म्हटले आहे. आरक्षणासाठी आम्ही सकारात्मक आहोत. उद्या आरक्षण टिकलं नाही तर हेच लोक बोलतील. राज्यातील जनगणना व्हायला हवी. आम्ही बिहारमधून माहिती मागवली आहे. पैसा खर्च झाला तरी चालेल पण जनगणना गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.
-
ललीत पाटील याच्यासह चौघांच्या पोलिस कोठडीत 27 ऑक्टोबरपर्यंत वाढ
ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील याच्या सह चार आरोपींच्या पोलिस कोठडीत अंधेरी कोर्टाने 27 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
-
सोलापूरमध्ये अजित पवार यांना मराठा तरुणाने काळे निशाण दाखविले
सोलापूर जिल्हातील माढ्यातील पिंपळनेरचे आमदार बबनराव शिंदे यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू होताच मराठा तरुणाने काळे कापड दाखवून केला निषेध. रिधोरेच्या सोमनाथ गायकवाड या मराठा तरुणाला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.
-
उद्या खूप काही बोलायचं आहे, दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे यांचे वक्तव्य
दसऱ्यानिमित्त दरवर्षी लोकांचा उत्साह वाढत आहे. मी नेहमीच स्पष्ट बोलतेय, उद्या खूप काही बोलायची मनामध्ये तयारी करतेय असे वक्तव्य भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. भगवान गडावरील उद्याच्या दसऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
-
Maratha Reservation : मराठा मोर्चाची पत्रकार परिषद
मराठा मोर्चाकडून पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. मराठा समाजाचा छळ थांबवावा असे आवाहन मराठा आंदोलकांकडून करण्यात आले आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावे अशी मागणी या पत्रकार परिषदेत केली आहे.
-
Maharashtra News : सरकारमधील लोकांना दिवाळी आधी दंगली घडवाच्या आहेत का?- संजय राऊत
सरकारमधील लोकांना दिवाळी आधी दंगली घडवाच्या आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. सरकारमधील लोकं मराठा आरक्षणावरून वातावरण खराब करताहेत असं म्हणत राज्य सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
-
Maharashtra News : उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरात दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरात दाखल झाले आहेत. विठ्ठल शिंदे कारखाण्याच्या गळप हंगामाच्या शुभारंभाला ते हजर राहाणार आहेत. त्यांच्या हस्ते पहिल्या बैलगाडीचं आणि वजन काट्याचं पूजन करण्यात आलं आहे.
-
Maharashtra News : संघाच्या विजयादशमीची तयारी अंतिम टप्यात
उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव आहे. या निमीत्त्य संघाच्या रेशीमबाग मैदानावर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मोहन भागवत यांच्या भाषणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदा संगितकार शंकर महादेवन हे मुख्य अतिथी असणार आहेत.
-
Maharashtra News : नागपूरात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त्य गर्दी
नागपूरात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त्य मोठी गर्दी पाहायला मिळतेय. उद्या धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे. त्या निमीत्त्य दिक्षाभूमीवर आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे.
-
Maharashtra News : काम कमी घोषणा जास्त, अशी सरकारच्या कामाची पद्धत- विजय वडेट्टीवर
काम कमी घोषणा जास्त, अशी सरकारच्या कामाची पद्धत असल्याची टिका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. ओबीसी योजनांच्या अंमल बजावणासाठी सरकारकडे फक्त 5 अधिकारी आहेत. ओबीसी समाजाच्या योजना कागदावर पण जाहिरातीसाठी सरकार तत्पर असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
-
आमदार रवींद्र वायकर चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत दाखल
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत दाखल झाले. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना समन्स बजावलं होतं.
जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात वायकर यांची चौकशी करण्यात येणार आहे.
-
जालना : अंबडमध्ये ओबीसी समाजाच्या मोर्चाला सुरूवात
जालन्याच्या अंबडमध्ये ओबीसी समाज आता रस्त्यावर उतरला आहे.
मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र या मागणीला ओबीसी समाजाकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे.
-
ड्रग्ज प्रकरणात राज्य सरकार नापास – सुप्रिया सुळे
ड्रग्ज प्रकरणात राज्य सरकारला अपयश मिळालं आहे. याप्रकरणाकडे गृहमंत्र्यांचं दुर्लक्ष झालं अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
सरकार फक्त फोडाफोडीच्या राजकारणात, खोक्याच्या धंद्यात व्यस्त असल्याचे टीकास्त्रही त्यांनी सोडलं.
-
बारामतीमध्ये अजित पवार यांना मराठा तरूणांचा घेराव
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा तरूणांनी घेराव घातला. मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही भूमिका स्पष्ट करा अशी मागणी आंदोलनकांनी केली.
इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाईल, अशी सरकारची भूमिका असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
-
दसऱ्यापूर्वी अहमदनगमध्ये फुलांचे दर घसरले
दसऱ्यापूर्वी अहमदनगरमध्ये फुलांच्या बाजारात दर घसरले, झेंडूला केवळ 15-30 रुपये किलो दर मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
-
26 ऑक्टोबरला मुंबईत काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक
मुंबई 26 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. काँग्रसचे राज्यातील प्रमुख नेते या बैठकीस उपस्थित राहतील. आगामी लोकसभा आणि स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची असेल.
-
Lalit Patil | ललित पाटीलची पोलिस कोठडी आज संपणार
ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याच्यासह इतर आरोपींची पोलिस कोठडी आज संपणार. थोड्याच वेळात त्यांना अंधेरी कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.
-
Eknath Shinde | शिंदे गटाच्या नेत्यांची बॅनरबाजी
ठाण्यापासून मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत शिंदे गटाच्या नेत्यांची बॅनरबाजी. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम दृतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग या सर्व मार्गांवर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांकडून जबरदस्त होर्डिंग आणि बॅनरबाजी. सर्वत्र शिवसेनेचे झेंडे लावून बॅनर लावण्यात आलेले आहेत
-
Manoj jarange patil | आज किंवा उद्या शंभर टक्के आरक्षण मिळेल – मनोज जरांगे पाटील
सरकारच्या वतीने आम्हाला बोलण्यात आलं नाही, पण आम्हाला असे वाटते आज किंवा उद्या शंभर टक्के आरक्षण मिळेल. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही शब्द दिलेला आहे आणि त्यांनी काल दिलेला शब्द मराठ्यांना अपेक्षित होता. मुख्यमंत्री जरांगे पाटलांना धीर धरण्याचे बोलले होते, त्यावर जरांगे पाटील यांनी आता एक तासही वाढवून मिळणार नाही असे म्हटले आहे.
-
Maratha Reservation | पुण्याच्या ‘या’ गावात नेत्यांना गावबंदी
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढारी, नेत्यांना, आमदार खासदार यांना गावबंदी. पुढाऱ्यांना बंदी घालणारे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वेताळे पहिले गाव आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमदार खासदार यांना गावबंदी करण्याचा गावकऱ्यांचा एकमताने ठराव.
-
Maratha Reservation | ‘सरकारने मराठा आरक्षणासाठी काय केलं?’
सरकारमधील लोक मराठा आरक्षणावरुन वातावरण खराब करत आहेत. सरकारने मराठा आरक्षणासाठी काय केलं?. मराठा आरक्षणासाठी 3 युवकांनी जीवन संपवलं. सरकारने काय केलं? असा सवाल खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला.
-
LIVE UPDATE | पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबरला मध्य प्रदेश दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबरला मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. चित्रकुटमधील रघुवीर मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी पूजा करणार आहेत. तुलसी पीठ मंदिरामध्ये जाऊन मोदी दर्शन घेणार आहेत. श्रीराम संस्कृत महाविद्यालयालाही मोदी भेट देणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी यांचे मध्य प्रदेश दौऱ्यात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
LIVE UPDATE | राज्यातील अनेक शहरात हवेची गुणवत्ता खावावली
राज्यातील अनेक शहरात हवेची गुणवत्ता खावावली आहे. मागील २४ तासांत हवेची निर्देशांक मध्यम श्रेणीत असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाची आकडेवारी जाहीर…
-
LIVE UPDATE | शिवसेनेच्या दोन्ही गटाचा उद्या दसरा मेळावा
शिवसेनेच्या दोन्ही गटाचा उद्या दसरा मेळावा आहे. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा आणि आझात मैदानावर शिंदे यांचा दसरा मेळावा आहे. उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
-
LIVE UPDATE | आदिवासींचं आंदोलन ७ व्या दिवशीही सुरुच
पोंभूर्णामध्ये आदिवासींचं आंदोलन ७ व्या दिवशीही सुरुच आहे. इको पार्कमध्ये असलेले पुतळे आदिवासींची अवमान करणारी आहे. यावर आदिवासी समाजाने पुतळ्यांवर आक्षेप घेतला आहे. शिवाय इतर मागण्यांसाठी देखील आदिवासींचं आंदोलन सुरु आहे.
-
LIVE UPDATE | इस्रायल आणि हमास युद्धाचे पुण्यात पडसाद
इस्रायल आणि हमास युद्धाचे पुण्यात पडसाद पाहायला मिळत आहेत. पुण्यात इस्रायलच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीते स्टिकर्स पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे लष्कर, समर्थ, कोंढवा, खडक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु आहे.
-
Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबरला मध्यप्रदेश दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबरला मध्यप्रदेश दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी चित्रकुटमधील रघुवीर मंदिरामध्ये पंतप्रधान मोदी पूजा करणार आहे. तुलसी पीठ मंदिरामध्ये जाऊन मोदी दर्शन घेणार आहेत. मध्यप्रदेश विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.
-
Maharashtra News | गोंदिया शहरातील मुख्य बाजारात आग
गोंदिया शहरातील मुख्य बाजाराला आग लागली आहे. आगीत काही गोदामे जळून खाक झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 7 अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनस्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अजून समोर आले नाही.
-
Maharashtra News | नागपुरात संघाच्या उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात
नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाची तयारी पूर्ण अंतीम टप्प्यात आली आहे. मंगळवारी सकाळी ७.४० ला रेशीमबाग मैदानात संघाचा विजयादशमी उत्सव सुरु होणार आहे. त्यापूर्वी ६.२० ला स्वयंसेवकांचं पथसंचलन होणार आहेय
-
Maharashtra News | चंद्रपुरात आदिवासांचे आंदोलन
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे आदिवासींनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी सातव्या दिवशीही हे आंदोलन सुरु होते. पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे हे आदिवासींची अवमान करणारे आहे ,असा आक्षेप घेत आदिवासी बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू आहे.
-
Maharashtra News | सांगलीत राजकीय नेत्यांना गावबंदी
मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात येऊ दिले जाणार नाही या मनोज जरांगे-पाटील यांच्या आवाहनाला आता सांगली जिल्ह्यातून प्रतिसाद मिळायला सुरवात झाली आहे. खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारे हिंगणगादे हे सांगली जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.
-
MNS : मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल, तपास सुरू
मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव खेडेकर हे मनसेचे राज्य सरचिटणीस आहेत. खेड नगर परिषदेच्या ठरावाच्या मूळ कागदपत्रात महत्त्वाच्या तपशीलाच्या अतिरिक्त अधिकाराच्या मजकुराची नोंद करून खोटा दस्तावेज तयार करून खरा असल्याचे भासवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Maratha Reservation : चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष… इगतपुरीतील गावात नेत्यांना गावबंदी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या इगतपुरी तालुक्यातील अधरवड गावच्या नागरिकांनी राजकारण्यांना थेट गावात यायची बंदी घातली आहे. गावकऱ्यांनी सर्व पक्षातील नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली असून जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाज अधरवड गावाने घेतली आहे. अधरवडमध्ये चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष… असे फलकही लावण्यात आले आहेत.
-
Accident : कराडमध्ये पोलिसाच्या गाडीने चौघांना उडवले, एकाचा मृत्यू
कराड- ढेबेवाडी मार्गवर भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्याकडेला थांबलेल्या तरुणांना ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या भरधाव गाडीने धडक दिली. या गाडीने एकूण चार तरुणांना उडवले. त्यात सुजल कांबळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गाडी चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कराड तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
Sharad Pawar : शरद पवार आज सोलापूरमध्ये, सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. शरद पवार आज माढा आणि पंढरपुरात मेळावा घेणार आहेत. तसेच माढ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published On - Oct 23,2023 7:24 AM