Maharashtra Breaking News Live : छगन भुजबळ म्हणजे ओबीसी समाज नाही- योगेश केदार
Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील.... राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी.... तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील आज घडणाऱ्या घडामोडी, महत्वाच्या बातम्या... वाचा एका क्लिकवर...
मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : राज्यात अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पुणे शहरात गारपीटसह पाऊस झाला. मुंबईत सोमवारी ढगाळ वातावरण आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात आज पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मराठी पाट्या न लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा जिंतूरमध्ये दाखल झाली आहे. राजकीय, प्रत्येक जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…
LIVE NEWS & UPDATES
-
नरेंद्र मोदी निवडून येणे देशाची नव्हे जगाची गरज- चंद्रकांत पाटील
नरेंद्र मोदी निवडून येणे देशाची नव्हे जगाची गरज. जगात सुरू असलेल्या युद्धात मोदींच्या मध्यस्थीची मागणी होत आहे. युक्रेन युद्धात मोदींच्यामुळे तीन दिवस युद्ध विराम देखील मिळाल्याचं उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
-
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला द्यावे- सुरेश धस
अवकाळी पावसाने विदारक परिस्थिती बनली आहे. वादळ आणि पावसात तुर, ज्वारी, आणि कापसाचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनानं तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला द्यावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे.
-
-
छगन भुजबळ मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करतायेत- योगेश केदार
छगन भुजबळ म्हणजे ओबीसी समाज नाही. ते मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करतायेत. ओबीसीमधल्या ही 12 बलुतेदारांचा एक मोठा गटही आमच्या सोबत आहे. त्यामुळे आमची मागणी ही ओबीसी मधून आहे. छगन भुजबळांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असं मराठा समन्वयक योगेश केदार यांनी म्हटलं आहे.
-
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : ज्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले त्या ठिकाणी त्वरित पंचनामे करा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
-
धुळ्याहून मंत्रालयाकडे निघालेली संघर्ष पदयात्रा पोलिसांनी रोखली
कोळी आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि विविध मागण्यांसाठी धुळ्याहून मुंबई मंत्रालयाकडे निघालेली संघर्ष पद यात्रा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात येताच मुंबईच्या वेशीवर पोलिसांनी रोखून धरली. मुंबईत जाण्यासाठी पोलिसांनी मोर्चेकरांना परवानगी नाकारल्याने मोर्चेकरांनी आनंद नगर जकात नाका या ठिकाणीच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. धुळ्याहून इथपर्यंत येताना सर्व ठिकाणी पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं, कुठेही आमची अडवणूक केली गेली नाही मात्र मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलीस बळाचा वापर करून आम्हाला इथे रोखल आहे. जर आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही तर आम्ही याच ठिकाणी बसून आमरण उपोषण सुरू करणार असल्याची भूमिका या संघर्ष पद यात्रेचे आयोजक शाना भाऊ सोनवणे यांनी घेतली आहे.
-
-
मराठा आरक्षणावर प्रश्न विचारताच तानाजी सावंत पत्रकारांवर भडकले
मराठा आरक्षणावर प्रश्न विचारताच आरोग्य मंत्री तानाजी सावंत भडकले. पुण्यात पत्रकाराच्या गालाला हात लावत शांततेत घे असा पत्रकाराला उलटा सल्ला तानाजी सावंत यांनी दिला. 2024 मध्ये आरक्षण नाही मिळालं तर तुम्ही राजीनामा देणार होतात या प्रश्नावर तानाजी सावंत चिडले.
-
विधानपरिषदेचे तीन आमदार अपात्र प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
विधानपरिषदेचे तीन आमदार अपात्र प्रकरणी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी ते कोर्टात करणार आहेत.
-
अवकाळी पावसाने मोठं नुकसान, सरकारने पाऊलं उचलावी – अंबादास दानवे
अवकाळी पावसामुळे राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. सरकारने त्वरित पावलं उचलावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.
-
बीडमध्ये अवकाळी पावसाने हाहा:कार; हाताशी आलेली पीके जमीनदोस्त
बीड : मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसाने बीड जिल्ह्यात अक्षरशः हाहा:कार माजला आहे. बीड जिल्ह्यात आधीच दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र जी पिके आली होती ती आता पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे.
-
सोलापुरात मनसे आक्रमक
सोलपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इंग्रजी पाट्या असलेले बोर्ड फोडले. दुकानावरील पाट्या इंग्रजीत असल्याने मनसेने इंग्रजी पाट्या असलेले बोर्ड फोडले आहेत. मराठी पाट्यावरून सोलापूर शहरात मनसे आक्रमक झाली आहे.
-
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका
मराठवाड्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतातील पिकांना बसला आहे. ही पिके जमीनदोस्त झाली आहे. तूर, कापूस आणि जोंधळ्याची पिके भुईसपाट झाली आहे. लाखो हेक्टरवरील पिके उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे.
-
अवकाळी पावसाने झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळणार – देवेंद्र फडणवीस
अवकाळी पावसासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीकं वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी नोंदणी शोधण्याची गरज नाही – छगन भुजबळ
मराठवाड्यात निजामशाही होती. तेथील लोकांना त्यावेळी कुणबी म्हणून आरक्षण मिळत होतं असं सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्या.शिंदे समितीला मराठवाड्यातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम सोपविले होते. ते योग्य होते. मात्र साऱ्या महाराष्ट्रात आता कुणबी नोंदी शोधण्याची गरज नाही. आता त्याचं काम संपलं आहे म्हणून समितीचं काम बंद करा असं आपण म्हटल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
-
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं – छगन भुजबळ
मराठ्यांना माझा विरोध नाही. त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. त्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशीच आपली मागणी कायम आहे असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
-
कागदपत्रांवर लिहून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध – छगन भुजबळ
जे खरोखर कुणबी आहेत त्यांनी आधीच सर्टीफीकीट मिळविली आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही. परंतू आता कागदपत्रांवर लिहून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
-
शिंदे समितीला बरखास्त करा असं सांगितलं नव्हतं – छगन भुजबळ
आपण शिंदे समितीला बरखास्त करा असं म्हणटं नव्हतं. आता समितीची काम संपले आहे म्हणून समिती बंद करा असं म्हटल्याचे घुमजाव छगन भुजबळ यांनी केले आहे.
-
Live Update : अमरावती जिल्ह्यातही पहाटे पासून अवकाळी पावसाची हजेरी
अमरावती जिल्ह्यातही पहाटे पासून अवकाळी पावसाची हजेरी… आज आणि उद्या पश्चिम विदर्भात गारपिटीसह पावसाचा इशारा… पावसामुळे कपाशीचे आणि तूर पिकाचे नुकसान… आज पश्चिम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा इशारा…
-
Live Update : कुर्ल्यामध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक
कुर्ल्यामध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक आक्रमक… कुर्ला फिनिक्स मॉलबाहेर पालिसांचा बंदोबस्त वाढला..
-
Live Update : आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ नुकसान
आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. मोठ्या प्रमाणत गारपीट झाल्याने नुकसान झालं आहे. नुकसान झाल्याचे पिकांचे पंचनामे करून भरपाईबाबत मंत्रालयात पाठपुरावा करणार… असं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागाने पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे
-
Live Update : ललित पाटील प्रकरणाच्या विरोधात आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक
ललित पाटील प्रकरणाच्या विरोधात आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. रवींद्र धंगेकर करणार ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. बुधवारपासून आमदार रवींद्र धंगेकर आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने रविंद्र धंगेकर आक्रमक झाले.
-
Live Update : मानखुर्दमधील एकता नगरमध्ये दहशतवादी आल्याचा फोन
मानखुर्दमधील एकता नगरमध्ये दहशतवादी फोन अल्याची माहिती मिळत आहे. 26/11 च्या रात्री मुंबईत दहशतवादी शिरल्याचा एका व्यक्तीकडून फोन पोलिसांना आला. व्यक्तीच्या माहितीनंतर पोलिसांकडून शोधमोहिम सुरु..
-
Live Update : धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. साक्री शिंदखेडा धुळे शिरपूर येथे कापूस हरभरा गहू या पिकांचा नुकसान झालं आहे. शेतात ठेवलेल्या चाऱ्याचं देखील नुकसान झालं आहे.
-
सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी – जयंत पाटील
पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
-
एखादा शब्द वापरला तर काय झालं – जरांगे पाटील
मी जातीयवाद करत नाही, माझ्या वाक्याला जातीचा रंग देऊ नका – मनोज जरांगे पाटील
-
विरार रेल्वे स्थानकात शॉर्टसर्किट होऊन भीषण आग
विरार रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर लाईटच्या केबल मध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. आज सकाळी 9:30 च्या सुमारासा ही दुर्घटना घडली. वेळीच सावधगिरी बाळगून प्रवासी बाजूला गेल्याने मोठी दुर्घटना टळली.
रेल्वे प्रशासन आणि वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी धाव घेऊन आग विझवली.
-
भुजबळ जातीवाचक बोलत आहेत, त्यांना सरकारने रोखलं पाहिजे – मनोज जरांगे पाटील
भुजबळ जातीवाचक बोलत आहेत, त्यांना सरकारने रोखलं पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकारने या जुन्याट नेत्याला रोखलं पाहिजे. भुजबळांमुळे वातावरण दूषित होत असल्याची टीकाही जरांगे पाटील यांनी केली.
-
वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते – स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा इशारा
वेळ पडली तर भुजबळांची गाडीही फुटू शकते असा इशारा देण्यात आला. शासकीय विश्रामगृहात जाऊन स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा भुजबळांना इशारा दिला.
आमच्या आंदोलनाला कोणी नख लावू नका, अशी विनंती ओबीसी नेत्यांना करण्यात आली.
-
महाराष्ट्र सामाजिकरित्या दुभंगला आहे – संजय राऊत
महाराष्ट्र सामाजिकरित्या दुभंगला आहे. राज्यात जाती-जातीमध्ये आरक्षणावरून वाद सुरू आहे. आरक्षणावरून राज्यात विष कालवलं जात आहे, असे संजय राऊत म्हणाले.
-
विधानपरिषदेतील २ सेना आमदारांची अपात्रतेच्या कारवाईतून सुटका होण्याची शक्यता
विधानपरिषदेतील २ सेना आमदारांची अपात्रतेच्या कारवाईतून सुटका होण्याची शक्यता आहे. मनिषा कायंडे, विप्लव बजोरियांचा कार्यकाळ काही महिन्यांतच संपणार.
-
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आज आंबेगाव तालुक्यात दौरा
पुणे- सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आज आंबेगाव तालुक्यात दौरा आहे. आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत. वळसे पाटील यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी असणार आहेत. शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
-
राज्य मागासवर्ग आयोगाची 1 डिसेंबर रोजी बैठक
राज्य मागासवर्ग आयोगाची 1 डिसेंबर रोजी बैठक पार पडणार आहे. 1 तारखेच्या बैठकीत समाज घटकाचे सर्वेक्षण करणारे प्रश्नावली ठरणार आहेत. हे प्रश्न ठरवून सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे. त्यानंतर अहवाल शासनाला सादर केला जाईल. सर्वेक्षणासाठी लागणारा मनुष्यबळही मागण्यात येणार आहे.
-
चंद्रपुरात अवकाळी पावसाचा जोर वाढला
चंद्रपुरात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवल्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. अचानक आलेल्या पावसाने गारठ्यात वाढ झाली आहे. विदर्भात दोन दिवस यलो अलर्ट दिला असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतातील गहू आणि चण्याच्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे.
-
पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ एक टँकर उलटला
पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ एक टँकर उलटला. या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. पुणे महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण आठ अग्निशमन वाहनं कार्यरत आहेत. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीची मदत येईपर्यंत धोका लक्षात घेऊन टँकरवर पाण्याचे स्प्रे मारण्यात आले. तर पोलिस विभागाकडून वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. रस्ता व्यवस्थित सुरू होण्यासाठी अजून दोन तास लागणार आहेत.
-
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना तडाखा
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. गारपीट झाल्याने द्राक्ष बागांचं नुकसान झालं. द्राक्ष पिकावर घडकुज, घडगळ यासह डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गहू, मका, भात या पिकांचं देखील नुकसान झालंय. तर नाशिक शहरात देखील दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळतेय. दिवसभरात 14 मिमी पावसाची नोंद झाली.
-
कोकण पदवीधर मतदार संघासाठी मनसे निवडणूक रिंगणात
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आता अधिक रंग चढणार आहे. कारण कोकण पदवीधर मतदार संघासाठी आता मनसे निवडणूक रिंगणात उभी राहणार आहे. स्वबळावर मनसे कोकण पदवीधर मधून निवडणूक लढणार आहे. मनसेचे नेते अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणुकीतील उमेदवार म्हणून मनसेकडून प्रमोट केलं जातंय. कोकण पदवीधर मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला यात आता मनसे आपली ताकद आजमावणार आहे. भाजपला आपण नक्कीच टक्कर देवू आणि जिंकू देखिल येवू असा विश्वास अभिजित पानसे यांनी व्यक्त केलाय.
-
नागपूर महानगरपालिका आता थकीत वसुलीसाठी रस्त्यावर उतरणार
नागपूर महानगरपालिका आता थकीत वसुलीसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांनी दिले मालमत्ता कर वसुलीचे आदेश दिलेत. नागपूर महानगरपालिकेचे बजेट सादर करताना आयुक्तांनी मालमत्ता कर विभागात तीनशे कोटीचे उद्दिष्ट दिले होते. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. आता मालमत्ता कर वसुलीवर भर द्यायला सुरुवात केली आहे. पाच लाखापेक्षा जास्त मालमत्ता कर थकीत असलेल्या मालमत्ता धारकांकडे उपायुक्त स्वतः जाऊन कर वसुली करणार असल्याचा सुद्धा पुढे येत आहे.
-
चाळीसगावच्या कन्नड घाटात भीषण अपघात; सात जण जखमी
चाळीसगावच्या कन्नड घाटात रात्रीच्या अंधारात भीषण अपघात घडला आहे. धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीररित्या जखमी झाले आहे. अक्कलकोट येथून दर्शन घेऊन हे सर्व मालेगाव कडे प्रवास करत होते. जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
-
Marathi News | अहमदनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका
अहमदनगर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
-
Pune News | ५ महिन्यांपासून राज्याला आरोग्य संचालकाची प्रतिक्षा
राज्याच्या आरोग्य विभागाला गेल्या पाच महिन्यांपासून आरोग्य संचालक नाही. आरोग्य संचालकाची अजूनही आरोग्य खात्याकडून नियुक्ती झालेली नाही. यामुळे अनेक फाईली आरोग्य संचालकांच्या सही विना पडून आहेत.
-
Pune News | ससूनमध्ये अजूनही डीन नाही
मॅटने निर्णय देवून डॉक्टर विनायक काळे यांची ससूनच्या डीनपदी नेमणूक करण्यात आलेली नाही. राज्याच्या वैद्यकीय विभागाने अजून विनायक काळे यांची ऑर्डर काढली नाही. डॉक्टर संजीव ठाकूर हे ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात वादात सापडले होते.
-
Marathi News | शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने एक तास धुमाकूळ घातला. डोलखांब भागातील साखरपाडा, ढाढरे, शिरोशी, रसाळपाडा, पाचघर या गावांमधील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भाजीपाला शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Published On - Nov 27,2023 7:15 AM