Sharad Pawar Resigns Live Update : शरद पवार यांनी 5 मे पर्यंत राजीनामा मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन, कुणाचा इशारा?

| Updated on: May 03, 2023 | 6:58 AM

Sharad Pawar Resign News Live Update : शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पाय उतार होण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कार्यकर्ते आता आक्रमक झाले होते. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी विनंती कार्यकर्ते करत आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलन करत आहेत.

Sharad Pawar Resigns Live Update : शरद पवार यांनी 5 मे पर्यंत राजीनामा मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन, कुणाचा इशारा?

Sharad Pawar Live | राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय घोषित केला आहे. शरद पवार यांनी निर्णय घोषित केल्यानंतर निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 May 2023 11:17 PM (IST)

    शरद पवार यांच्या निर्णयामुळे पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरुच; चंद्रपूरात अनेक पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

    चंद्रपूर :

    शरद पवार यांच्या राजीनाम्याने व्यथित होऊन चंद्रपूर जिल्ह्यात ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

    रा.काँ. चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी यांनी प्रदेशाध्यक्ष यांना दिला राजीनामा,

    शरद पवार अध्यक्ष नसतील तर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतील म्हणून त्यांनी राजीनामा परत घ्यावा अशी व्यक्त केली भावना

  • 02 May 2023 11:12 PM (IST)

    शरद पवार यांनी राजकारणात सक्रिय राहावं; नाना पटोले

    नागपूर :

    शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणा ही त्यांच्या पक्षांतर्गत विषय

    अध्यक्षपदाचा राजीनाम्यावर काही बोलावं अस वाटत नाही, जेव्हा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा काही बोलू

    नाना पटोले यांची प्रतिक्रिया

    महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे,  त्यामुळे महविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही

    त्यांच्या निर्णयासाठी पक्षातील कमेटी तयार झाली आहे ते निर्णय घेतील.

    शरद पवार यांचा राजकारणातील मोठा अनुभव आहे, त्यांनी राजकारणात सक्रिय राहावं अशी सगळ्यांची इच्छा आहे.

  • 02 May 2023 10:28 PM (IST)

    Cbi Seizes Rs 20 Crore In Cash | सीबीआयचे 19 ठिकाणी छापे, 20 कोटींहून अधिक रक्कम जप्त

    सीबीआयने 19 ठिकाणी छापे टाकून 20 कोटींहून अधिक रुपये जप्त केले आहेत. सीबीआयने राजेंद्र गुप्ता यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राजेंद्र कुमार गुप्ता हे वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सीचे माजी सीएमडी होते. ही कंपनी जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत होती. दिल्ली, चंदीगड, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबाद येथील 19 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

  • 02 May 2023 10:22 PM (IST)

    Kedarnath Snowfall | केदारनाथमध्ये बर्फवृष्टी, 3 मेपर्यंत यात्रा स्थगित

    केदारनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच ३ मे रोजी होणारी यात्रा थांबवण्यात आली आहे.

  • 02 May 2023 10:21 PM (IST)

    NIA Raids | NIA कडून जम्मू-काश्मीर इथे 12 ठिकाणी छापे

    एनआयएने जम्मू-काश्मीरमधील पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, बडगाम आणि पूंछ जिल्ह्यात 12 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने पाकिस्तान समर्थित दहशतवादी कट लक्षात घेऊन छापे टाकला आहे.

  • 02 May 2023 09:16 PM (IST)

    भारतीय दूतावास स्थलांतरित

    सुदानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, खार्तूममधील भारतीय दूतावास तात्पुरते पोर्ट सुदानमध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

  • 02 May 2023 07:57 PM (IST)

    Sharad Pawar Resign | तर राज्यभरात राजीनाम्यासह आंदोलन, राष्ट्रवादीला कुणाचा इशारा?

    शरद पवार यांनी 5 मे पर्यंत राजीनामा मागे घ्यावा. राजीनामा मागे न घेतल्यास 6 मे पासून राज्यभर आंदोलन करुन राजीनामा देणार, अशी भूमिका मेहबूब शेख यांनी घेतली आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ युवक राष्ट्रवादी काँग्रेसनेही तीच भूमिका घेत शरद पवार यांना भावनिक आवाहन केलं आहे.

  • 02 May 2023 07:49 PM (IST)

    Narayan Rane On Sharad Pawar | शरद पवार यांच्या निर्णयावर नारायण राणे यांची प्रतिक्रिया

    केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रमुख पदाच्या राजीनाम्यावरुन ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी हवेत. तसेच शरद पवार हे राजकारणातही हवेत, असं ट्विट नारायण राणे यांनी केलं आहे. राणे आणखी काय काय म्हणाले व्हीडिओत पाहा.

  • 02 May 2023 07:36 PM (IST)

    Marathi News | राज्यातील घडामोडींचा धावता आढावा, संध्याकाळी 7 च्या बातम्या

    राज्यात दिवसभरात कुठं काय काय झालं? एका क्लिकवर जाणून घ्या राज्यातील क्रीडा, मनोरंजन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील बातम्या, फक्त 4 मिनिटं 24 हेडलाईन्समधून.

  • 02 May 2023 07:28 PM (IST)

    Sharad Pawar News | शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्ते भावूक

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मुंबईत निवृत्तीची घोषणा केल्याने एकच खळबळ उडाली. या बाबत माहिती राज्यासह देशाच्या कानाकोपाऱ्यात पसरली. आपल्या साहेबांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झालेले दिसून आले. शरद पवार हे आम्हाला वडिलांसारखे आहेत. वडिलांना निवृत्त होण्याचा अधिकार नसतो,त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी या कार्यकर्त्याने शरद पवार यांना विनंती केली. यावेळेस या कार्यकर्त्याला अश्रू अनावर झाले. पाहा व्हीडिओ.

  • 02 May 2023 07:20 PM (IST)

    Shirdi Sai Baba Temple Pass | शिर्डी साई भक्तांसाठी महत्वाची बातमी

    शिर्डी साई भक्तांसाठी बातमी समोर आली आहे. मंदीर प्रशासनाने दर्शनसाठी सुरु असलेला काळाबाजार थांबवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता मंदीर दर्शनसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. पाहा व्हीडिओ

  • 02 May 2023 07:13 PM (IST)

    Mumbai Corona Update | मुंबईत कोरोनाची स्थिती काय?

    मुंबईत आज 2 मे रोजी 9 कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकूण बाधितांचा आकडा हा 47 इतका आहे. तर 191 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर एकही रुग्ण दगावलेला नाही. तर दिवसभरात एकूण 679 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. वरील आकडेवारी ही 2 मे संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

    मुंबई कोरोना अपडेट

  • 02 May 2023 06:55 PM (IST)

    शरद पवार यांनी निर्णयाचा फेरविचार करावा- आमदार दत्तात्रय भरणे

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

    कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेता त्यांनी निर्णयाचा फेरविचार त्यांनी करावा असे आवाहन

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केल

  • 02 May 2023 06:53 PM (IST)

    शरद पवार यांच्या राजीमान्यानंतर नारायण राणे यांनी घेतली फिरकी

    नारायण राणे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये

    नारायण राणे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले…

    माननीय शरद पवार साहेब, आपण

    राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या

    अध्यक्षपदी सुध्दा हवेत

  • 02 May 2023 06:48 PM (IST)

    शरद पवार यांच्या निर्णयानंतर आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे मोठे विधान

    पवार साहेबांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती होण्याचा घेतलेला निर्णय

    राज्याची जनता मान्य करणार नाही

    आम्ही प्रयत्न करून पवार साहेबांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यासाठी प्रयत्न करू

  • 02 May 2023 06:45 PM (IST)

    बारामतीकर म्हणतात, साहेब निर्णय मागे घ्या..

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली निवृत्ती जाहिर केलीय

    या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कार्यकर्ते भावनिक झाले आहेत

    बारामतीतही शरद पवार यांच्या निर्णयानंतर शांतता असून

    शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होतेय

  • 02 May 2023 06:42 PM (IST)

    आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांना केले भावनिक आवाहन

    शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत

    राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भावनिक होत मोठे आवाहन केले

    हा निर्णय मागे घेण्यासाठी शरद पवारांचे पाय धरणार असल्याचे म्हटले आहे.

    लंके हे मुंबईचे दिशेने रवाना झाले आहेत.

    शरद पवारांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हा धक्का दिला आहे.

    पुस्तक प्रकाशन सोहळ्यात असं काही घडलं याचा कोणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता

    असेही आमदार निलेश लंके म्हणाले आहेत.

  • 02 May 2023 06:37 PM (IST)

    धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 32 पदाधिकारी यांचे राजीनामे

    शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा केली

    त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील 32 पदाधिकारी यांनी एकत्र येत पदाचा राजीनामा दिला.

    जोपर्यंत शरद पवार राजीनामा मागे घेत नाहीत तोपर्यंत राजीनामा मागे न घेण्याची भुमिका स्पष्ट केली आहे.

  • 02 May 2023 06:35 PM (IST)

    शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया यांचा मोठा दावा

    भाजपला – राष्ट्रवादी सोबत युती करायची आहे

    शरद पवारांना पक्ष फुटताना बघायला लागला असता

    शरद पवारांवर दबाव होता

    राजीनामा देवून अजित पवारांना प्रमुख्य करायचं होतं

    भाजपाचं हे संपूर्ण दबावतंत्र चालेलं आहे

    अजित पवारांची क्षुल्लक कारणावरून चिडत होते

    राष्ट्रवादीत पूर्ण फूट आपल्याला आज दिसत आहे

    म्हणून शरद पवारांनी राजीनामा दिलेला आहे

  • 02 May 2023 06:30 PM (IST)

    बुलढाण्यात शरद पवार याच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्ये आक्रमक

    शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या राजीनामामुळे जिल्ह्यातील कार्यकारिणीचे राजीनामे सत्र सुरू..

    जिल्हाध्यक्ष पाठोपाठ जिल्हा उपाध्यक्ष आणि मलकापूर च्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

    बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष संतोष रायपुरे,

    यांनी आपले राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीकडे पाठविले आहेत

  • 02 May 2023 06:27 PM (IST)

    शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्या कार्यकर्त्यांची इच्छा- आमदार प्राजक्त तनपुरे 

    पवार साहेबांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशीच सर्व कार्यकर्त्यांची भावना…

    मुंबईत उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते आणि नेते त्यांची मनधरणी करतायत…

    पवार साहेब आपला निर्णय मागे घेतील आणि पुन्हा पक्षाचं नेतृत्व करतील, अशी अपेक्षा…

    राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया….

  • 02 May 2023 06:23 PM (IST)

    शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर जळगावात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाबाहेर मांडला ठिय्या

    राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमले कार्यकर्ते

    शरद पवार जोपर्यंत राजीनामाची घोषणा मागे घेणार नाही तोवर आंदोलन मागे घेणार नसल्याचा दिला इशारा.

  • 02 May 2023 06:19 PM (IST)

    स्वाती चव्हाण या शरद पवार यांच्या निर्णयानंतर ढसाढसा रडायला लागल्या

    माहेर बारामती असलेल्या स्वाती चव्हाण-दिवेकर या शरद पवारांच्या निर्णयाने गहिवरल्या

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीचा जाहिर केलाय

    त्यानंतर राज्यभरातून कार्यकर्ते भावूक झाले आहेत

    हा निर्णय मागे घेण्याची मागणी कार्यकर्त्ये करत आहेत आहेत.

    बारामती माहेर असलेल्या स्वाती चव्हाण-दिवेकर या देखील भावूक झाल्या आहेत.

  • 02 May 2023 06:16 PM (IST)

    राष्ट्रवादी आमदार चेतन तुपेनी घेतली शरद पवारांची घेतली भेट

    आम्ही साहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष राहावं असं सांगितलं

    पवार कुटुंबीय एकत्र आहे

    हा सगळ्यांना धक्का होता

    धक्का पचवणं सगळ्यांना अवघड झाल असल्याचे चेतन तुपे यांनी म्हटले.

  • 02 May 2023 06:13 PM (IST)

    शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे आंदोलन

    शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसलाय

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे

    या आंदोलनात शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे

  • 02 May 2023 06:10 PM (IST)

    शरद पवारांचा निर्णय माझ्यासाठी वेदनादायी आहे- सुप्रिया सुळे

    पवारांशी माझं बोलणं झालं आहे पवार म्हणाले हायपर होऊ नका

    मी विचाराअंती निर्णय घेतला गेला

    पवार साहेब माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही

    असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

    पवार साहेबांची आज मार्गदर्शनासाठी आवश्यक आहेत

    राज्यात जो संघर्ष सुरू आहे त्यात बुजुर्ग माणूस हवा

    अजित पवार हे स्पष्टवक्तेप आहेत

    सगळे भावनिक आहेत तर आपण शांत केलं पाहिजे म्हणून

    त्यांना वाटलं असेल म्हणून अजित पवार बोलले असतील

    पवार साहेब अजूनही मार्गदर्शन करतात मात्र त्यांचा आजचा निर्णय वेदना देणारा

  • 02 May 2023 06:10 PM (IST)

    शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी सोलापुरात कार्यकर्त्यांची निदर्शने

    सोलापूर :

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांची नाराजी

    शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी सोलापुरात कार्यकर्त्यांची निदर्शने

    सोलापुरातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकवटले

    शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा कार्यकर्त्यांची मागणी

    शरद पवार यांनी पक्ष स्थापनेपासून जे आदेश दिले ते आम्ही शिरसावंद्य मानले मात्र त्यांच्या राजनाम्याचा निर्णय आम्ही मान्य करणार नाही

    सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावुक

    प्रशांत बाबर ( माजी प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)

  • 02 May 2023 05:59 PM (IST)

    निवृत्तीच्या निर्णयानंतर शरद पवार फेरविचार करणार ; अजित पवार यांची निवृत्तीच्या घोषणेनंतरची प्रतिक्रिया

    राजीनाम्याबाबत विचार करायला वेळ द्या

    दोन तीन दिवसाता अंतिम निर्णय

    कार्यकर्त्यांना घरी जाण्याचे आवाहन

    राष्ट्रवादीतील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊ नये

    निवृत्तीच्या निर्णयानंतर शरद पवार फेरविचार करणार

    आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी घरी जाण्याचे आवाहन

    तुम्ही हट्टी तर मी डबल हट्टी

    देशभरातून शरद पवार यांना फोन येत आहेत

  • 02 May 2023 05:43 PM (IST)

    जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर धरणे आंदोलन

    जळगाव :

    जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक, पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर धरणे आंदोलन

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केल्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

    आमचे नेते पवार यांनी निवृत्ती ची घोषणा मागे न घेतल्यास आम्ही सर्व पदाधिकारी पदाचे राजीनामे देऊ असा इशारा

    जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा इशारा

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेविषयी नाराजी  केली व्यक्त

  • 02 May 2023 05:37 PM (IST)

    लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांनी आजारपणालासुद्धा निवृत्त केलं; शशिकांत शिंदे

    सातारा :
    शरद पवार साहेबांनी प्रकाशनादरम्यान घेतलेला निर्णय हा धक्कादायक
    सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हा निर्णय हा धक्कादायक
    वयोमानामुळे निवृत्तीच निर्णय घेणं याचा कोणाला विश्वास बसत नाही ते कधीच निवृत्त होऊ शकत नाही
    लोकांमध्ये राहिल्यामुळे त्यांनी आजारपणालासुद्धा निवृत्त केलं
    शरद पवार आणि अध्यक्षपदाचं हे समीकरण, ओळख आहे त्यामुळे त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे
  • 02 May 2023 05:31 PM (IST)

    शरद पवारांचा निर्णय माझ्यासाठी वेदनादायी; सुषमा अंधारे

    मुंबईः

    शरद पवारांचा निर्णय माझ्यासाठी वेदनादायी आहे

    पवारांशी माझं बोलणं झालं आहे पवार म्हणाले हायपर होऊ नका

    मी विचाराअंती निर्णय घेतला गेला

    पवारसाहेब माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही

    असं सुप्रिया सुळे म्हणाल्या

    शरद पवार यांची आज मार्गदर्शनासाठी आवश्यक आहेत

    राज्यात जो संघर्ष सुरू आहे त्यात बुजूर्ग माणूस हवा

    अजित पवार हे स्पष्टवक्ते आहेत

    सगळे भावनिक आहेत तर आपण शांत केलं पाहिजे म्हणून

    त्यांना वाटलं असेल म्हणून अजित पवार बोलले असतील

    पवार साहेब अजूनही मार्गदर्शन करतात मात्र त्यांचा आजचा निर्णय वेदना देणारा

  • 02 May 2023 05:23 PM (IST)

    आमच्यासारख्यांना शरद पवार यांच नेतृत्व हवं हवसं; खासदार विनायक राऊत

    सिंधुदुर्ग :
    शरद पवार हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर देशाचे नेतृत्व करणारे नेते
    अत्यंत कठीण परिस्थितीत प्रकृतीची त्रासदायक कारणे असूनसुद्धा कुठेही मागे न हटता राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व केले.
    यशस्वी नेतृत्व करणारे नेते म्हणून त्यांचं नाव लौकिक
    एवढ्या लवकर त्यांनी निवृत्तीची घोषणा करणं हे योग्य होईल असं मला वाटत नाही.
    आमच्यासारख्यांना शरद पवार यांच नेतृत्व हवं हवसं
    खासदार विनायक राऊत यांची शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर प्रतिक्रिया
  • 02 May 2023 05:09 PM (IST)

    रामराजे निंबाळकर, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे सिल्वर ओकवर दाखल

    रामराजे निंबाळकर, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे सिल्वर ओकवर दाखल

    विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये, सुनील भुसार सिल्वर ओक वर दाखल

  • 02 May 2023 05:07 PM (IST)

    शरद पवार यांनी पुनर्विचार करावा – विजय वडेट्टीवार

    शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय धक्कादायक आणि धक्का देणारा

    अनेकांना राजकारणात घडवण्याचं काम त्यांनी केलं

    एक धर्मनिरपेक्ष विचारवंत म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं

    आगामी राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय

    त्यांनी पुनर्विचार करावा

  • 02 May 2023 05:06 PM (IST)

    शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर पुण्यात राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे आंदोलन

    पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर आंदोलन

    शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी

  • 02 May 2023 05:06 PM (IST)

    शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत, ते विचारपूर्वक निर्णय घेतात – दिपक केसरकर

    ते त्यांच्या निर्णयाशी ठाम राहतात

    भारताच्या राजकारणात जे पवारांचे स्थान आहे, हे देशाच्या राजकारणात धक्कादायक आहे

    अंतर्गत कलहातून निर्णय घेतील एवढे छोटे नेते ते नाहीत

    जीवनात आत काही वेळेला काही प्रेफरन्स असतात

    त्यांचे महाराष्ट्राला असलेले योगदान मोठे आहे

  • 02 May 2023 05:04 PM (IST)

    शरद पवारांसारखे नेते कधीही राजकारणातून निवृत्व होऊ शकत नाही – संजय राऊत

    माननीय शरद पवार यांच्या नेत्वृवाची गरज आहे

    एखाद्या पदावरून निवृत्त होणं राजकारणातून निवृत्त होणं

    अलीकडच्या घटनावरून हे अनपेक्षित असं काही नाही

    शरद पवारांनी हा निर्णय का घेतला यांचं विश्लेषण मी पाहिलं

    बाळासाहेबांनी 1990 पक्षातील घडामोडी लक्ष घेता राजीनामा दिला

    कार्यकर्त्यांचा रेटा त्यावेळी होता बाळासाहेब ठाकरे पुन्हा अध्यक्ष झाले

    पवार साहेब असा निर्णय घेतात

    शरद पवारांसोबत आज त्यांच्या पक्षासोबत बैठक सुरू

    इतर पक्षांनी तिथे जावून व्यत्यय आणणं योग्य नाही

    राष्ट्रवादीचं निर्विवाद नेत्वृव शरद पवार करत आहेत

    जिथे ठाकरे तिथे शिवसेना आहे, शरद पवार तिथे राष्ट्रवादी पक्ष

    राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडीवर मी काही बोलणार नाही

    शरद पवार मोकळे असतील तेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलू

    कार्यकर्त्यांच्या भावना मी माध्यमांद्वारे पाहत होतो

    बाळासाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा आम्ही पायापाशी बसलेलो होतो

    यांच्याविषयी मी काहीही भाष्य करणार नाही

    आत्मचरित्र्यांचं प्रकाशन होतं

    समाजकारणाविषयी खंड प्रकाशीत केलं

    सुप्रिया सुळे आणि प्रतिभा ताईंना कुणकुण नसावी

    शरद पवारांच्या डोक्यात काय याची कुणकुण कुणालाही नव्हती

    परंतु शरद पवारांचा राजीनामा अनपेक्षित नव्हतं

    ही खेळी असावी मला वाटत नाही, हा एक भावनिक निर्णय आहे

    महाविकस आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही

    आपल्या नेत्यांची मनधरणी करणं महत्वाचं, कार्यकर्त्याचा नेत्यावरचा अधिकार असतो

    आज राष्ट्रवादीचा दिवस आहे

    शरद पवारांच्या निर्णयानं कुठलाही फरक पडणार नाही

    शरद पवार हेचं पक्षांचे बॉस आहेत

  • 02 May 2023 04:59 PM (IST)

    हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यासाठी धक्का देणारा – प्रदिप गारटकर

    60 वर्षे काम करणारे नेते असा निर्णय घेतील असं कधी वाटलं नाही

    कोणती अडचण आली हे लक्षात येत नाही

    साहेबांच्या निर्णयामागे धोरण असतं

    या निर्णयामागे काहीतरी निश्चित असणार

    हा निर्णय अडचणीचा वाटतो

    साहेबांनी सातत्याने मार्गदर्शन करत रहावं

    हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती

  • 02 May 2023 04:58 PM (IST)

    शरद पवार यांच्या निर्णयावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

    काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची प्रतिक्रिया

    शरद पवार हे सक्षम नेते आहेत

    वयाच्या मर्यादेमुळे आणि त्याच्या प्रकृतीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत जे त्यांचा वारसा चालवण्यासाठी पात्र आहेत

    पण तरीही ते देशाचे नेते आहेत

  • 02 May 2023 04:40 PM (IST)

    नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालया बाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, या मागणीचा केला ठराव

    ठरावाची प्रत प्रदेश कार्यालयाला पाठवणार

  • 02 May 2023 04:38 PM (IST)

    शरद पवार साहेबांचा हा निर्णय अतिशय धक्कादायक – आमदार राजू कारेमोरे

    राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण

    दीर्घ अनुभव असलेले राजकीय नेतृत्व म्हणून शरद पवार साहेबांकडे बघितले जाते

    मोठ्या नेतृत्वाकडून मन वळवण्याचा प्रयत्न होणार

    पुन्हा शरद पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बनतील अशी अपेक्षा

  • 02 May 2023 04:37 PM (IST)

    शरद पवारांचा निर्णय हा अंतर्गत कलहामुळे – संजय शिरसाट

    शरद पवारांमध्ये भाकरी पलटण्याची ताकद असताना तेच पलटलेत

    पहाटेबाबत शरद पवारांनी लिहिलेले अर्धसत्य आहे

    पूर्ण सत्य देवेंद्र फडणवीस सांगू शकतील

    कुणालाही न सांगता असा तडकाफडकी राजीनामा देणे याचा अर्थ पक्षात फूट पडण्यासारखे आहे

    उद्धव ठाकरेंबद्दल लिहिलेलं आहे ते योग्यच आहे

    जनतेचे काम होत नव्हते तर पवारांसारख्या व्यक्तीला खंत वाटणारच

  • 02 May 2023 04:35 PM (IST)

    शरद पवारांचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक नाही

    शरद पवार यांचे मित्र विठ्ठल मणियार यांची प्रतिक्रिया

    सर्व विचारांती शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलाय

    शरद पवार आजचा निर्णय मागे घेतील असं मला वाटत नाही

    पुढील अध्यक्ष शरद पवार सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेणार

    अजित पवारांच्या बाबतीत सुरू असलेल्या चर्चा आणि राजीनाम्याचा काही संबंध नाही

  • 02 May 2023 04:29 PM (IST)

    आदरणीय शरद पवार साहेब हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर देशाचे नेतृत्व करणारे नेते – विनायक राऊत

    अत्यंत कठीण परिस्थितीत प्रकृतीची त्रासदायक कारणे असूनही राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व केले

    यशस्वी नेतृत्व करणारे नेते म्हणून त्यांचं नावलौकिक

    एवढ्या लवकर त्यांनी निवृत्तीची घोषणा करणं हे योग्य होईल असं मला वाटत नाही

    आमच्या सारख्यांना शरद पवार यांच नेतृत्व हवंहवंस, यात कोणतीही शंका नाही.

  • 02 May 2023 04:24 PM (IST)

    छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, श्रीनिवास पाटील सिल्वर ओकवर दाखल

  • 02 May 2023 04:16 PM (IST)

    पवार साहेबांचा हा निर्णय अतिशय धक्कादायक – बाळासाहेब थोरात

    या निर्णयापासून त्यांनी परावृत्त करण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आलीय

    या कमिटीद्वारे त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न होणार

  • 02 May 2023 04:13 PM (IST)

    शरद पवारांच्या राजीनाम्याचे मालेगावात पडसाद

    माजी आमदारासह कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरु

  • 02 May 2023 04:12 PM (IST)

    लोकशाही आणि राज्यघटना वाचविण्याचं युद्ध सध्या सुरू –  बाळासाहेब थोरात

    अशा वेळी पवार साहेबांचं अनन्य साधारण महत्व

    सोनिया आणि राहुल गांधींना या लढ्यात साथ देणारी व्यक्ती शरद पवार आहेत

    लोकशाही वाचविण्यासाठी त्यांचं महत्व मोलाचं

    त्यांनी बाजूला जाऊन चालणार नाही

  • 02 May 2023 04:06 PM (IST)

    रत्नागिरीचे आमदार शेखर निकम सिल्वर ओकवर दाखल

    शरद पवार यांची भेट घेण्यासाठी निकम सिल्वर ओकवर दाखल

  • 02 May 2023 04:05 PM (IST)

    शरद पवारांचा हा निर्णय अंतर्गत निर्णय – देवेंद्र फडणवीस

    पक्ष हा निर्णय पुढे चालला आहे

    आम्ही परिस्थितीवर नजर ठेवू आहोत

    हे कशासाठी होत आहेत समजतील तेव्हा आम्ही बोलणार

    मलाही एक पुस्तक लिहियाचं आहे

    आम्ही योग्य वेळी त्या गोष्टी सांगू

  • 02 May 2023 04:04 PM (IST)

    शरद पवारांच्या निर्णयानंतर पुणे शहर राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा

    पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्यांचा राजीनामा

    कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही

    पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये, कार्यकर्त्यांची मागणी

  • 02 May 2023 03:50 PM (IST)

    शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांची प्रतिक्रिया

    Saroj Patil on Sharad Pawar

    मला अतिशय दुःख वाटतंय, त्यांनी राजीनामा परत घ्यावा.

    पवारांच्या आजच्या निर्णयाने महाराष्ट्राचे खूप नुकसान होईलच पण  राष्ट्रवादी पक्षही दुबळा होईल.

    शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील यांची प्रतिक्रिया

  • 02 May 2023 03:48 PM (IST)

    शरद पवार यांचा निर्णय हा अंतर्गत कलहामुळे – संजय शिरसाठ

    Sanjay Shirsath on Sharad Pawar

    शरद पवार यांचा निर्णय हा अंतर्गत कलहामुळे.

    शरद पवारांमध्ये भकरी पलटण्याची ताकद असताना तेच पलटलेत.

    पहाटेबाबत शरद पवारांनी लिहिलेले अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य देवेंद्र फडणवीस सांगू शकतील.

    कुणालाही न सांगता असा तडकाफडकी राजीनामा देणे याचा अर्थ पक्षात फूट पडण्यासारखे आहे.

    उद्धव ठाकरे बद्दल लिहिलेलं आहे ते योग्यच आहे. जनतेचे काम होत नव्हते तर पवारांसारख्या व्यक्तीला खंत वाटणारच.

    शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया

  • 02 May 2023 03:46 PM (IST)

    त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आम्ही राजकारण करतोय – सुहास कांदे

    Sushan Kande on Sharad Pawar

    शरद पवारांची महाराष्ट्राला गरज होती आणि आहे.

    राजकारणात त्यांना देव म्हटले तर काहीही वावगे ठरणार नाही.

    मी त्यांना विनंती करतो की त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा.

    त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आम्ही राजकारण करतोय.

    त्यांच्या निवृत्तीनंतर काय निर्णय घ्यावा हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे.

    सुहास कांदे यांची प्रतिक्रिया

  • 02 May 2023 03:44 PM (IST)

    पवार साहेबांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी – महादेव जानकर

    शरद पवारांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात राहावं.

    आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे.

    पवार साहेबांनी निवृत्ती घेणं म्हणजे आमची हानी आहे.

    राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचं पवारांना आवाहन

  • 02 May 2023 03:43 PM (IST)

    शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजीनामा सत्र

    शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राजीनामा सत्रला सुरुवात

    धाराशिव जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला राजीनामा

  • 02 May 2023 02:26 PM (IST)

    पुण्यातील राष्ट्रवादीटचे कार्यकर्ते बसणार उपोषणाला

    पुणे पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं उपोषण

    पुण्यातील कार्यकर्ते बसणार उपोषणाला

    पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते बसणार उपोषणाला

    पुण्यातील पक्ष कार्यालयासमोर उपोषण.

  • 02 May 2023 02:22 PM (IST)

    पवारांचे मानाचे स्थान कायम राहील – पृथ्वीराज चव्हाण

    Prithviraj Chavan On Sharad Pawar Decision to Resign

    शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.

    ते यापुढेही राजकारणात सक्रिय राहतील, त्यांचं मानाचे स्थान कायम राहील.

    काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

  • 02 May 2023 02:14 PM (IST)

    प्रफुल्ल पटेल यांच्याकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन

    शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्ते पॅनिक

    हात जोडून विनंती करतो. शांत राहा – प्रफुल्ल पटेल यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

  • 02 May 2023 02:03 PM (IST)

    अजित पवारांकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न

    शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्ते नाराज झाले आहेत

    शरद पवार यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    कार्यकर्ते पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती करत आहेत.

    अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न

  • 02 May 2023 01:53 PM (IST)

    Sharad Pawar Live | पवारांसमोर बोलताना जितेंद्र आव्हाड भावुक

    पवारांसारखा पुरोगामी माणूस राज्यात पुन्हा होणं नाही – आव्हाड

    तुम्ही थांबलात तर आम्ही थांबतो – आव्हाड

  • 02 May 2023 01:48 PM (IST)

    Sharad Pawar Live | पवार यांचं अध्यक्षपदावर राहणं आवश्यक – जयंत पाटील

    पवारांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा हवा – पाटील

  • 02 May 2023 01:19 PM (IST)

    शरद पवार Live | अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती

    समिती ठरवेल ते शरद पवार यांना मान्य असेल – अजित पवार

    शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय घोषित

    पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांची घोषणा

  • 02 May 2023 01:04 PM (IST)

    शरद पवार Live | शरद पवार यांचा निवृत्तीचा निर्णय घोषित

    पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांची घोषणा

    निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    खासदारकीची ३ वर्ष शिल्लक – शरद पवार

    ३ वर्ष राज्य, केंद्रच्या प्रश्नांवर लक्ष घालणार – शरद पवार

  • 02 May 2023 12:56 PM (IST)

    Salman Khan याच्या सुरक्षेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

    ‘सलमान खान याला मुंबईत किंवा भारतात कुठेही फिरायला….’,

    भाईजानच्या सुरक्षेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य… वाचा सविस्तर

  • 02 May 2023 12:52 PM (IST)

    शरद पवार Live | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार – शरद पवार

    कुठे थांबायचं हे मला कळतं – शरद पवार

    अध्यक्ष पदावरुन निवृत्त घ्यायचा निर्णय घेतो – शरद पवार

  • 02 May 2023 12:38 PM (IST)

    शरद पवार Live | शरद पवार यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा

    लोक माझे सांगती पुस्तक प्रकाश सोहळा

    विद्यार्थी चळवळीत मला अधिक रस होता – पवार

    प्रत्येक प्रसंगातून आपण शिकत असतो – पवार

    नववीत असताना आयुष्यातील पहिला मोर्चा काढला – पवार

    माझं घर काँग्रेसच्या नव्हे, शेकापच्या विचारांचं होतं – पवार

  • 02 May 2023 12:25 PM (IST)

    अमरावती | आज राणा दाम्पत्य विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम बिग्रेड सह अनेक संघटनाचा मोर्चा…

    भीम बिग्रेडचे राजेश वानखडेवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप…

    काही वेळातच होणार धिक्कार मोर्चाला सुरुवात…

    मोर्चात विविध पक्षाचे कार्यकर्ते सहभागी…

    14 एप्रिलला राणा दाम्पत्या समोर दिले होते भीम बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी नारे…

    राणा दाम्पत्या विरोधातील मोर्चात अनेक आंबेडकरी संघटना सहभागी

    मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त..

  • 02 May 2023 12:16 PM (IST)

    गोंदिया | बिर्शी विमानतळावर ठेकेदारांची दबंगिरी….

    कामगाराच्या खात्यात जमा झालेले 75 टक्के पैसे मागतात परत

    पैसे न दिल्यास कामावरून काढण्याची धमकी

    6 ग्रामपंचायत बिर्शी विमानतळावर काढणार मोर्चा?

  • 02 May 2023 12:13 PM (IST)

    उद्धव ठाकरे ६ मे रोजी सकाळी ९ वाजता बारसूला होणार रवाना

    ६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता ठाकरे यांची बारसूत पत्रकार परिषद

  • 02 May 2023 12:06 PM (IST)

    नवी दिल्ली | जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच

    आंदोलन स्थळी शेतकरी नेते राकेश टिकेत दाखल

    टिकेत यांचा खेळाडूंना पाठिंबा

    कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात गेल्या दहा दिवसांपासून जंतर-मंतरवर आंदोलन

  • 02 May 2023 11:54 AM (IST)

    6 मेला बारसूमध्ये जाणारच, हिंमत असेल तर अडवून दाखवा- उध्दव ठाकरे यांचे नारायण राणेंना आव्हान

    बारसू म्हणजे काही पाकव्याप्त काश्मिर नाही- उध्दव ठाकरे

    हे जनतेच्या मनातले सरकार नाही- अजित पवार

    हे दगा फटका करून आलेले सरकार आहे – अजित पवार

  • 02 May 2023 11:48 AM (IST)

    बाळासाहेबांचे विचार असते तर गद्दारी केली नसती- उद्धव ठाकरे

    मुंबई तोडणाऱ्यांना सोडणार नाही- उद्धव ठाकरे

    निवडणूका आल्या की मुंबई तोडणार हा मुद्दा काढून मत मागतात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    अनेकांची पोटदुखी वाढत आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरे दवाखाण्यात उपचार घ्यावा, एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

  • 02 May 2023 11:38 AM (IST)

    वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

    पवारांच्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन आज

    लोक माझे सांगती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात अजित पवारांची उपस्थिती

  • 02 May 2023 11:32 AM (IST)

    लोक माझे सांगती पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुरू

    शरद पवारांच्या यांच्या पुस्तकात अनेक गुपित उघड

    शरद पवार यांनी पुस्तकाच्या माध्यमातून पहाटेच्या शपथ विधीवर व्यक्त केले मत

  • 02 May 2023 11:29 AM (IST)

    Railway Senior Citizen : ज्येष्ठांमुळे रेल्वे मालामाल

    ज्येष्ठ नागरिकांचा डावलला हक्क

    ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे तिकिटांवरील सवलत केली बंद

    सवलत बंद झाल्याने रेल्वेची झाली जोरदार कमाई

    कोट्यवधींचा झाला फायदा, नागरिकांचा मात्र रोष, वाचा बातमी 

  • 02 May 2023 11:26 AM (IST)

    पुस्तक वाचल्यानंतर मी प्रतिक्रीया देईल- अजित पवार

    मी काही बोललो तर त्याची बातमी होते- अजित पवार

    कालच्या वज्रमुठ सभेत मी योग्य ते मुद्दे मांडले- अजित पवार

  • 02 May 2023 11:18 AM (IST)

    लोक माझे सांगती या पुस्तकावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया देणे टाळले

    मी अद्याप पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे प्रतिक्रीया देऊ शकत नाही- देवेंद्र फडणवीस

    मीसुद्धा एक पुस्तक लवकरच लिहीणार आहे- देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस आज गडचीरोली दौऱ्यावर

  • 02 May 2023 11:13 AM (IST)

    अजित पवार यांचा पहाटेचा शपथ विधी अत्यंत चुकीचा- शरद पवार यांच्या पुस्तकात माहिती

    माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेण्यात आले- लोक माझे सांगती पुस्तकात गोप्यस्फोट

    अजित पवार यांच्या ‘त्या’ निर्णयाला राष्ट्रवादीचा पाठींबा नव्हता- लोक माझे सांगती पुस्तकात शरद पवारांच्या पुस्तकात माहिती

  • 02 May 2023 11:07 AM (IST)

    गडचीरोलीमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रयत्न- देवेंंद्र फडणवीस

    गडचीरोलीमध्ये शेतकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत- देवेंंद्र फडणवीस

    गडचीरोलीमध्ये 70 टक्के वन

    दोन कोटी रूपयांचे पिक विमा अद्याप प्रलंबित

  • 02 May 2023 10:57 AM (IST)

    सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत यांचा राणे पितापुत्रावर निशाणा

    नितेश राणेंना राजकारणातली अक्कलदाढ अजून यायची आहे.

    नितेश राणेंना फक्त उद्धव ठाकरेंवर व शिवसेनेवर भुंकण्यासाठी भाजपने पाळल आहे.

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 2024 ला नितेश राणेंचा बाजार उठवणार.

    नारायण राणेंनी स्वतःचा इतिहास,भूतकाळ आठवावा. रिफायनरी विरोधात तेव्हा केवढ्या गमजा मारल्या होत्या, केवढे मोठे मोर्चे काढले होते.

    राणे सत्तेच्या लाचारीसाठी केवळ रिफायनरीचे समर्थन करत आहेत.

    नारायण राणेंमध्ये हिंम्मत असेल तर त्यांनी रिफायनरी होत असलेल्या पाच गावात पाय ठेवून दाखवावा.

  • 02 May 2023 10:57 AM (IST)

    अमरावती – राणा दाम्पत्य विरोधात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भीम बिग्रेडसह अनेक संघटनाचा मोर्चा…

    भीम बिग्रेडचे राजेश वानखडेवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप…

    14 एप्रिलला राणा दाम्पत्यासमोर दिले होते भीम बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी नारे…

    राणा दाम्पत्याविरोधातील मोर्चात अनेक आंबेडकरी संघटना सहभागी होणार..

    मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त..

  • 02 May 2023 10:55 AM (IST)

    अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

    महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

    वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    दोन महिन्यांपासून अरुण गांधी हे कोल्हापुरात होते वास्तव्यास.

    तुषार गांधी हे कोल्हापूरच्या दिशेने येण्यास निघाले.

  • 02 May 2023 10:39 AM (IST)

    हिंगणघाट तालुक्यातील खापरी, जांगोणा परिसराला अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

    – काही घरांचं छप्पर उडल्याने अंशतः नुकसान

    – विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि गारा पडल्या

    – खापरी, जांगोणा, पिपरी, शेकापुर, बामर्डा आदी भागाला अवकाळी पावसाचा फटका

    – वडनेर ते शेकापूर रस्त्यावरील तात्पुरता ढोले टाकून बनवलेला पूल क्षतिग्रस्त

  • 02 May 2023 10:32 AM (IST)

    Gold Silver Price Today : सोने-चांदीची आनंदवार्ता

    सोने-चांदीच्या किंमतींना लागला ब्रेक

    विक्रमी भावापेक्षा इतके झाले सोने-चांदी स्वस्त

    खरेदीदारांना साधता येईल सुवर्णसंधी

    19 एप्रिलपासून दरवाढीचे सत्र बंद

    आजचा सोने-चांदीचा भाव काय, वाचा बातमी 

  • 02 May 2023 10:31 AM (IST)

    पंढरपुर – आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिरातील भाविकांसाठी उठवली मोबाईल बंदी

    – आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपूर देवस्थान प्रशासन सज्ज

    29 जुन रोजी आहे आषाढी एकादशीचा सोहळा .

    – आषाढी यात्रेच्या नियोजनाची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची झाली नुकतीच बैठक

    – भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसह मोबाईल बंदी बाबत बैठकीत झाली चर्चा

    – भाविकांना मोबाईल वापराचा मार्ग सुकर होण्यासाठी मंदिरे समितीने आषाढी यात्रा कालावधी पुरती उठवली मोबाईल बंदी

    – मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिली माहिती

  • 02 May 2023 10:21 AM (IST)

    कालच्या सभेने बाळासाहेबांनाही त्रास झाला असेल – नितेश राणे

    बीकेसीच्या सर्वात लहान कोपऱ्यात कालची मविआची सभा झाली.

    काही दिवसांनी मंगल कार्यालयताही सभा घेतील.

    अजितदादा करमुक्त, त्यांच्यावर टीका करणार नाही

  • 02 May 2023 10:18 AM (IST)

    काही दिवसानंतर अजित दादाच आता आमच्याकडे येणार – गुलाबराव पाटील यांचा गौप्यस्फोट

    अजित पवार आमच्याकडे आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू – गुलाबराव पाटील

    शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांनी केला मोठा राजकीय गौप्यस्फोट

  • 02 May 2023 10:11 AM (IST)

    इचलकरंजी ब्रेकिंग – रत्नागिरी प्रशासनाने राजू शेट्टी यांना 31 मे पर्यंत जिल्हाबंदीची नोटीस लागू केली

    सोशल मीडियावर पोस्ट, चित्र अथवा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबाबतही शेट्टी यांच्यावर बंदी घातली आहे

    शिरोळ येथील राहत्या घरी मध्यरात्री पोलिसांनी राजू शेट्टी यांना नोटीस बजावली

    मी असल्या नोटीशींना भीक घालत नाही, मी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार – राजू शेट्टी

  • 02 May 2023 10:07 AM (IST)

    Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीने मैदानात राडा घातला, पण त्याच्या एका कृतीने जिंकलं मन

    Virat kohli Fight IPL 2023 : विराट कोहलीने मैदानात भांडणाशिवाय दुसरं असं काय केलं?. विराट कोहली आक्रमक असला, तरी आपल्या चाहत्यांच्या बाबतीत तो तितकाच मोठ्या मनाचा आहे. वाचा सविस्तर…..

  • 02 May 2023 10:06 AM (IST)

    Virat kohli Fight IPL 2023 : गौतम गंभीर, -उल-हकशिवाय विराट कोहली LSG च्या आणखी एका खेळाडूला भिडला

    Virat kohli Fight IPL 2023 : विराट गौतम गंभीर, नवीन-उल-हकशिवाय अजून कोणाला भिडला? वाचा सविस्तर…..

  • 02 May 2023 10:06 AM (IST)

    Virat vs Gambhir IPL Fight | विराट कोहली-गौतम गंभीरला मिळाली भांडणाची शिक्षा, दोघांवर Action

    Virat vs Gambhir IPL Fight | विराट कोहली-गौतम गंभीरला भांडणाची काय मिळाली शिक्षा? वाचा सविस्तर….

  • 02 May 2023 10:04 AM (IST)

    मिशा काढा, अन्यथा हजामत करायला पाठवतो – संजय राऊत यांचा बांगरांना टोला

    आता गद्दार मिशा काढणार का ? संजय राऊत यांचा सवाल

    मिशा काढा, अन्यथा हजामत करायला पाठवतो , संजय राऊत यांचा बांगरांना टोला

    कालच्या वज्रमूठ सभेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला

    एपीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश

    राजकारणात इतका जळफळाट नको

  • 02 May 2023 09:59 AM (IST)

    सभेला मोठा प्रतिसाद- संजय राऊत यांचा दावा

    काल झालेल्या वज्रमूठ सभेला मोठा प्रतिसाद मिळाला- संजय राऊत

    राजकारणात इतका जळफळाट नको

    उद्धव ठाकरे ६ मे रोजी कोकणात जाणार आहे

    कोकणातील जनता उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी तयार

    महाविकास आघाडीच्या सभेला भाजप घाबरली

  • 02 May 2023 09:56 AM (IST)

    Fatima Bhutto : पाकिस्तानातील हा ‘निकाह’ वादात

    माजी पंतप्रधान झुल्फिकार भुट्टो यांच्या नातीचा निकाह

    परदेशी नागरिकाशी बांधली लग्नाची गाठ

    या जोडप्याने दिला सौहार्दचा पैगाम

    पण हिंदू कनेक्शनसमोर आल्यानंतर तुफान वाद

    भुट्टो कुटुंबातील अनेकांची आतापर्यंत झाली आहे हत्या, वाचा सविस्तर 

  • 02 May 2023 09:51 AM (IST)

    पिंपरीत स्मार्ट सिग्नल

    पिंपरीकडून हिंजवडीकडे जायचं म्हणजे एक दिव्य

    वाकडच्या मुख्य चौकात बसवला स्मार्ट सिग्नल

    चौकात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीम बसविण्यात आली आहे.

    ही सिस्टीम कॅमेराने नियंत्रित होते. ज्या लेनवर गाड्यांची संख्या अधिक आहे, ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व्हरला कळवले जाते. त्यानंतर सर्व्हर सिग्नलचा कालावधी त्यानुसार बदलतो

  • 02 May 2023 09:46 AM (IST)

    पोलिसांवर राजू शेट्टींचा गंभीर आरोप

    बारसू आंदोलन स्थळावरील पोलिसांवर राजू शेट्टींचा गंभीर आरोप

    पोलिसांनी आंदोलन महिलांच्या गळ्यातील डूल काढून घेतले

    मारहाण आणि अत्याचाराचे व्हिडिओ माझ्याकडे असल्याचा शेट्टी यांचा दावा

    कायदा सुव्यवस्था राखायला गेला होता की चोऱ्या करायला गेला होता- राजू शेट्टी यांचा सवाल

  • 02 May 2023 09:39 AM (IST)

    भाविकांसाठी उठवली मोबाईल बंदी

    आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिरातील भाविकांसाठी उठवली मोबाईल बंदी

    आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपूर देवस्थान प्रशासन सज्ज

    29 जून रोजी आहे आषाढी एकदशीचा सोहळा

    आषाढी यात्रेच्या नियोजनाची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची झाली नुकतीच बैठक

  • 02 May 2023 09:30 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्यांवर टीका

    बाबरी मशीद पडत असताना आम्ही त्या ठिकाणी होतो- फडणवीस

    बाबरी मशीद पडत असताना उद्धव ठाकरे कुठे होते?

    उद्धव ठाकरे यांनी उत्तर द्यावे- फडणवीस यांची मागणी

    आम्ही योग्य वेळी निवडणुका घेऊ आणि त्यांना त्यांची जागा दाखवू- फडणवीस

  • 02 May 2023 09:27 AM (IST)

    मोदी यांना लोकांचा पाठिंबा

    नरेंद्र मोदींना जितक्या शिव्या देणार तितके लोक त्यांना पराभूत करतील

    या लोकांनी मोदी यांना जितक्या शिव्या दिल्या तितके लोकांचा पाठिंबा मिळत आहे

    मोदी यांना शिविगाळ करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार

  • 02 May 2023 09:25 AM (IST)

    रिफायनरीच्या माध्यमातून दुपट्टी चेहरा उघड-फडणवीस

    रिफायनरीच्या माध्यमातून ही लोक उघड पडली आहे.

    रिफायनरली स्थानिकांचे समर्थन आहे.

    रिफायनरी करा हेच पत्र देतात आणि त्यानंतर तेच विरोध करतात

    आम्ही ही लोक शोधली आहे, त्यांचा खरा चेहरा उघड करु

  • 02 May 2023 09:22 AM (IST)

    फडणवीस यांची टीका

    कालची सभा निराश लोकांची

    देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका

    सरकार गेल्यामुळे आले नैराश्य

  • 02 May 2023 09:08 AM (IST)

    राजू शेट्टी यांना नोटीस

    रत्नागिरी प्रशासनाने राजू शेट्टी यांना ३१ मे पर्यंत जिल्हाबंदीची नोटीस लागू केली

    सोशल मीडियावरही पोस्ट, चित्र अथवा व्हिडिओ प्रदर्शित करण्याबाबतही शेट्टी यांच्यावर बंदी घातली आहे

    शिरोळ येथील राहत्या घरी मध्यरात्री पोलिसांनी राजू शेट्टी यांना नोटीस बजावली

    राजू शेट्टी यांनी मी असल्या नोटीशींना भीक घालत नाही मी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार

  • 02 May 2023 09:01 AM (IST)

    दोन किलो गांजा जप्त

    कुडाळ शहरात अनंत मुक्ताई हॉटेलसमोर दोन किलो गांजा जप्‍त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून एका आरोपीसह दोन किलो गांजा जप्त केला.

  • 02 May 2023 08:56 AM (IST)

    फेसबुक बनावट अकाउंट चा फटका आता थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांना

    फेसबुक बनावट अकाउंट चा फटका आता थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांना

    पुणे जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट

    पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट

    राजेश देशमुख यांनी याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली आहे

    सायबर चोरट्यांनी “माही वर्मा” या नावाने हे बनावट अकाउंट तयार केले असून त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले

    या अकाउंटवरुन देशमुख यांच्या मूळ अकाऊंट वरील अनेकांना पाठवण्यात आली आहे “रिक्वेस्ट”

    याआधी २ वेळा राजेश देशमुख यांचे नाव वापरून काही अज्ञातांनी फेसबुक अकाऊंट तयार केले होते

    नागरिकांनी अशा बनावट अकाऊंटवर कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे केले आवाहन

  • 02 May 2023 08:50 AM (IST)

    नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

    नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

    जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत आज होणार महत्त्वाची बैठक

    नवले पुलावरील अपघातांच्या कारणांचा अहवाल अखेर तयार

    नवले पुलावर सतत होणाऱ्या अपघाताची तीव्रता लक्षात घेत यापूर्वीच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती

    या समितीने आता एक अहवाल तयार केला असून तो अहवाल प्रशासनासमोर देखील ठेवण्यात आला आहे

    पोलीस उपयुक्तांसोबतच सेव्ह लाइफ फाउंडेशन या खाजगी संस्थेने नवले पुलावर होणाऱ्या अपघातांच्या कारणासाठीचा एक अहवाल तयार केला आहे

    संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी रम्बल स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, दोन्ही बाजूस पट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढविणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना या अहवालात सुचवण्यात आल्या आहेत

    याच अनुषंगाने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे

  • 02 May 2023 08:45 AM (IST)

    राष्ट्रीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाला शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी पाठिंबा

    जंतर-मंतरवर सुरू असलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाला शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी पाठिंबा दिला आहे आज टिकेत हे आंदोलन स्थळी भेट देणार असून गेल्या आठवड्याभरापासून कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या आंदोलनातून कुस्तीपटू करत आहेत ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान येत्या आठवड्यातही आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कुस्तीपटूंनी स्पष्ट केल आहे

  • 02 May 2023 08:45 AM (IST)

    हिंगोली-आमदार संतोष बांगर यांची मुच काढण्याची व्यवस्था आम्ही करू

    हिंगोली-आमदार संतोष बांगर यांची मुच काढण्याची व्यवस्था आम्ही करू

    त्यांनी मुच काढली तर आम्ही गांधी चौकात खांद्यावर बसवून त्यांची मिरवणूक काढू

    आमदार संतोष बांगर यांनी विधानसभेत फक्त निवडून दाखवाव आम्ही राजकारण सोडून देतो

    उद्धव बाळा साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनायक भिषे यांच बांगर यांना आव्हान

  • 02 May 2023 08:44 AM (IST)

    प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न

    राजधानी नवी दिल्लीमध्ये दिल्ली सरकारने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रदूषणात 30 टक्क्यांनी घट झाली असा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 2016 साली धोक्याच्या दिवसांची संख्या 22 होती मात्र 2022 मध्ये ही संख्या कमी होऊन धोकादायक दिवस सहा असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे. तर प्रदूषण कमी झाल्यामुळे नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 02 May 2023 08:44 AM (IST)

    Petrol Diesel Price :  ठाणे, पुण्यात इंधन स्वस्ताई

    जागतिक बाजारात कच्चे तेल वधारले

    पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय

    पेट्रोल-डिझेलच्या भावात नाही मोठी वाढ

    गेल्या 11 महिन्यांपासून भावात उलथापालथ नाही

    कोणत्या शहरात वाढले इंधनाचे दर

    एका एसएमएसवर जाणून पेट्रोल-डिझेलच्या किंमती, वाचा बातमी 

  • 02 May 2023 08:24 AM (IST)

    पिसाळलेल्या कोल्ह्याने दहशत माजवली

    पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात पिसाळलेल्या कोल्ह्याने दहशत माजवली असून चार ते पाच व्यक्तींना चावा घेत या कोल्ह्याने नागरिकांना जखमी केलंय,

    – शेतात काम करणाऱ्या शेतकय्रांवर या कोल्ह्याने हल्ला करत नागरिकांना जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या कोल्ह्याचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागापुढे असणार आहे..

  • 02 May 2023 08:12 AM (IST)

    गुंतवणुकीच्या नावाखाली पुण्यातील ३२ जणांची ८६ लाख रुपयांना फसवणूक

    गुंतवणुकीच्या नावाखाली पुण्यातील ३२ जणांची ८६ लाख रुपयांना फसवणूक

    पुण्यातील दांपत्याने गुंतवणुकीचे आमिष दाखवून केली अनेकांची फसवणूक

    रियल व्हॅल्यू एंटरप्राईजेस या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक करा आणि अल्पावधीत आकर्षक परतावा मिळवा हे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक

  • 02 May 2023 08:02 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचे दिवसभरातील कार्यक्रम

    मा.मुख्यमंत्री महोदय यांचे मंगळवार, दि.२ मे २०२३ रोजीचे कार्यक्रम

    दुपारी १२.०० वा. राज्याच्या बंदर धोरणाबाबत सादरीकरण. ● स्थळ :- मा.मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, मंत्रालय, मुंबई

    दुपारी ०१.०० वा. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक ● स्थळ :- मा.मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, मंत्रालय, मुंबई

    दुपारी ०३.०० वा. १)संत सावळाराम स्मारक बांधण्याबाबत २)२७ गाव संघर्ष समिती यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक. ● स्थळ :- मा.मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, मंत्रालय, मुंबई

    दुपारी ०३.३० वा. भिवंडी-कल्याण-शीळ फाटा रस्त्याचे रूंदीकरण आणि भूसंपादन बाधितांना मोबदला मिळणेबाबत बैठक ● स्थळ :- मा.मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष, मंत्रालय, मुंबई

    सायंकाळी ०५.३० वा. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या ई फाईलिंग युनिट वितरण उपक्रमाच्या कार्यक्रमास उपस्थिती ● स्थळ :- स्वामी नारायण मंदिर सभागृह, दादर, मुंबई

  • 02 May 2023 07:53 AM (IST)

    कडक उन्हामुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी घटली

    पुणे

    कडक उन्हामुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी घटली

    खडकवासला परिसर मात्र गजबजला

    सुट्टीच्या दिवशी देखील तीव्र उन्हामुळे पर्यटकांची गडाकडे पाठ

    दिवसभरात गडावर 440 चारचाकी व 690 दुचाकी वाहने आल्याची नोंद

    इतर वेळी सुट्टीच्या दिवशी 1000 जास्त वाहने आणि पर्यटक गडावर येत असतात

    याउलट खडकवासला आणि पानशेत धरणाच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढताना पाहायला मिळाली

  • 02 May 2023 07:46 AM (IST)

    मान्सून काळात आपत्ती ओढवल्यास जिल्ह्यात आपदा मित्र सज्ज

    -मान्सून काळात आपत्ती ओढवल्यास जिल्ह्यात आपदा मित्र सज्ज

    -500 आपदा मित्र मान्सूनकाळात बचावासाठी सज्ज

    -जिल्हा प्रशासनाने केली आणखी वाढीव साहित्याची मागणी

    -जिल्ह्यातील जोरदार पर्जन्यवृष्टीचा प्रदेश असलेला इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर या भागात राहणार लक्ष

  • 02 May 2023 07:46 AM (IST)

    जिल्ह्यातील तीन धरण समुहांत 30 टक्क्यांहून कमी पाणी

    नाशिक ब्रेकिंग

    -जिल्ह्यातील तीन धरण समुहांत 30 टक्क्यांहून कमी पाणी

    -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात चार प्रकल्प मिळून 44 टक्के पाणीसाठा

    -जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये 41 टक्के पाणीसाठा

    -सर्व नागरिकांनी थेंब थेंब पाण्याचे नियोजन करणे गरजेचे

  • 02 May 2023 07:46 AM (IST)

    स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी मिळणार गती

    -स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यासाठी मिळणार गती

    -नाशिक विभागात 1313 गावांमध्ये उपलब्ध झाली जागा

    -लवकरच या गावांमध्ये अत्याधुनिक स्वयंचलित केंद्रे राहणार उभी

    -पीक विमा योजना, कृषी हवामान सल्ला आणि मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य यासाठी ठरणार उपयुक्त

  • 02 May 2023 07:45 AM (IST)

    शहरातील धोकादायक 1186 वाड्यांना देण्यात आल्या नोटीसा

    नाशिक ब्रेकिंग

    -शहरातील धोकादायक 1186 वाड्यांना देण्यात आल्या नोटीसा

    -पावसाळापूर्वीच वाडा खाली करण्याचा महापालिकेने दिल्या सूचना

    -वाडा खाली न केल्यास वीज आणि पाणीपुरवठा तोडण्याचा देण्यात आला इशारा

    -याची संपूर्ण जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली

  • 02 May 2023 07:45 AM (IST)

    नाशिक शहरात होणार 120 किलोमीटरचे इनर रिंगरोड

    नाशिक ब्रेकिंग

    -नाशिक शहरात होणार 120 किलोमीटरचे इनर रिंगरोड

    -यासाठी लवकरच शिखर समिती होणार गठीत

    -आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कनेक्टिव्हिटी बळकट करण्यासाठी प्रयत्न

    -सुमारे 1 हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज

  • 02 May 2023 07:36 AM (IST)

    मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यामध्ये होणार वाढ

    मुंबई – पुणे सिंहगड एक्स्प्रेस पंधराऐवजी सोळा डब्यासह धावणार

    प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

    कालपासून मुंबई पुणे एक्सप्रेसला 16 डबे सूरू

    सिंहगड एक्सप्रेसला आता एक वातानुकूलित चेअर कार, 13 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कारसह एकूण 16 डबे असणार आहेत.

  • 02 May 2023 07:33 AM (IST)

    Virat Kohli Gautam Gambhir : विराट कोहलीच्या आधी मोहम्मद सिराजनेच केला होता खरा मॅटर, ‘तो’ व्हिडीओ आला समोर!

    LSG vs RCB Video : विराट आणि गौतमचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. मात्र त्याआधी सामन्यामध्ये आरसीबीचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. वाचा सविस्तर…..

  • 02 May 2023 07:32 AM (IST)

    Virat vs Gambhir IPL Fight | गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात या खेळाडूमुळे वाद, कोण आहे तो?

    विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं वाजलं. मात्र या दोघांच्या वादासाठी एक खेळाडू कारणीभूत ठरलाय. व्हीडिओत बघा कोण आहे तो. वाचा सविस्तर…..

  • 02 May 2023 07:31 AM (IST)

    पीएमपीएल बस मधून आता करता येणार धार्मिक स्थळांची सफर

    पीएमपीएल बस मधून आता करता येणार धार्मिक स्थळांची सफर

    पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील धार्मिक स्थळांसाठी विशेष बस सेवा सुरू

    दर शनिवार आणि रविवार धार्मिक स्थळांसाठी असणार विशेष बस सेवा

    तसेच शासकीय सुट्ट्यांच्‍या दिवशी या सहलींचे आयोजन केले जाणार

    कालपासून पीएमपीएल प्रशासनाकडून ही विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे

    उपक्रमासाठी ‘पी.एम्.पी.’च्‍या ७ ‘इलेक्‍ट्रीक वातानुकूलित बसगाड्यांचा उपयोग केला जाणार

    एक दिवसाच्‍या सहलीसाठी प्रवाशांकडून 700 ते 1000 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.

    बसच्‍या आसन क्षमतेनुसार संपूर्ण 33 प्रवाशांचे सामूहिक तिकीट काढल्यास 5 प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार.

    त्यासोबतच बसमध्ये एक गाईड सुद्धा देण्यात येणार आहे, जो प्रत्येक धार्मिक स्थळांची प्रवाशांना माहिती देईल.

  • 02 May 2023 07:29 AM (IST)

    मुंबई-पुणे महामार्गावर 40000 वाहनांवर कारवाई

    मुंबई-पुणे महामार्गावर 40000 वाहनांवर कारवाई

    पाच महिन्यात 40909 वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून महामार्गावर कारवाई

    महामार्गावर नियम मोडणाऱ्या अनेक वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

    एकूण 7 कोटी 22 लाख 69 हजार रुपयांचा दंड वसूल

    1 डिसेंबर 2022 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत 40 हजार 909 वाहनांवर करण्यात आली कारवाई

Published On - May 02,2023 7:28 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.