Maharashtra Marathi News LIVE Updates : विधान परिषद कार्यालय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेणार

| Updated on: Oct 04, 2023 | 7:02 AM

Maharashtra Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुम्ही हा ब्लॉग फॉलो करा.

Maharashtra Marathi News LIVE Updates : विधान परिषद कार्यालय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेणार
election commission of indiaImage Credit source: tv9 marathi

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्रातील नांदेड शहरात घडलेल्या एक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलय. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. चोवीस तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर राज्य सरकारवर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. महाराष्ट्र सरकारला या घटनेची गंभीर दखल घ्यावी लागेल. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलय. राज्यात सध्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच मिळून सरकार आहे. हे तिन्ही पक्ष सत्तेत असले, तरी महाराष्ट्रात भाजपच बॉस आहे, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलय. सूत्रांनी ही माहिती दिलीय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Oct 2023 09:30 PM (IST)

    Ajit Pawar | अजित पवार नाराज नाहीत, सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण

    मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्याने ‘देवगिरी’ येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते उपस्थित नव्हते, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार हे आजारी असल्यामुळे सकाळी सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहू शकले नाहीत. संध्याकाळी पार पडलेल्या बैठकीत पक्षाचं संघटन कसं मजबूत करता, येईल यावर चर्चा केली. अजित पवार आजारी असल्याने ते मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित नव्हते. याबाबत चुकीच्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

  • 03 Oct 2023 07:56 PM (IST)

    शिवसेना विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरण

    मुंबई | शिवसेना विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषद कार्यालय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेणार आहे. पक्ष कुणाचा याबाबतची कागदपत्र विधान परिषद कार्यालय केंद्रीय निवडणूक आयोग मागणार आहे. निलम गोऱ्हे, बजोरिया आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करण्याची ठाकरे गटाची मागणी आहे.

  • 03 Oct 2023 07:34 PM (IST)

    ठरलं! महायुतीतील 12 आमदारांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित : सूत्र

    पुणे | महायुतीच्या विधानपरिषदेच्या आमदारांसाठीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधानपरिषदेच्या आमदारांसाठीचा 6-3-3 असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार भाजप 6, शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांना प्रत्येकी 3 जागा असं जागावाटप होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

  • 03 Oct 2023 07:28 PM (IST)

    Pune Police | पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची मोठी कारवाई

    पुणे | ससून ड्रग्स प्रकरणातील हलगर्जीपणा 9 पोलीस कर्मचाऱ्यांना भोवला आहे. हलगर्जीपणा केल्याने पुणे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी 9 पोलिसांना निलंबित केलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या गेटवरुन 2 कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

  • 03 Oct 2023 07:23 PM (IST)

    Nanded | नांदेडमधील मृतांचा आकडा हा 35 वर

    नांदेड | नांदेड शासकीय रुग्णालयात आज आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडमधील मृतांचा आकडा हा 35 वर पोहचला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

  • 03 Oct 2023 07:11 PM (IST)

    Mumbai Guardian Minister | पालकमंत्री आता दर बुधवारी जाणून घेणार मुंबईकरांच्या समस्या

    मुंबई | मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर हे आता दर बुधवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. एकूण 3 तास 45 मिनिटं पालकमंत्री संवाद साधतील. दीपक केसरकर हे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी12 ते 12.45 या वेळेत संवाद साधतील. तर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दुपारी 1 ते 4 दरम्यान उपस्थित असतील.

  • 03 Oct 2023 06:55 PM (IST)

    Asian Games : नीरज चोप्राचं गोल्ड मेडल पक्कं! नेमकं काय झालं जाणून घ्या

    पाकिस्तानचा भालाफेकपटू अरशद नदीमने एशियन गेम्स स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. 4 ऑक्टोबरला होणाऱ्या स्पर्धेपूर्वीच जखमी झाला आहे. यानंतर आता भारताचा नीरज चोप्रा ही स्पर्धा जिंकणार हे निश्चित मानले जात आहे

  • 03 Oct 2023 06:35 PM (IST)

    दादर जलतरण तलावात मगरीचं पिल्लं आढळल्याने खळबळ

    दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावात आज मगरीचे पिल्लं आढळले. जलतरण तलावातून पकडलं असून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे असं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं.

  • 03 Oct 2023 06:20 PM (IST)

    Asian Games 2023: भारताच्या पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत जिंकलं सुवर्णपदक

    भारताने आणखी एका सुवर्णपदकाची कमाई केली आहे. महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत. पारुल चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

  • 03 Oct 2023 06:09 PM (IST)

    मालेगाव 2008 बॉम्बस्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना विचारले 60 प्रश्न

    मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणात, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह सर्व 7 आरोपींची सीआरपीसी 313 अंतर्गत आजपासून चौकशी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी तीन साक्षीदारांशी संबंधित 60 प्रश्न विचारण्यात आले. आरोपींनी प्रश्नाचे कोणतेही उत्तर दिले नाही आणि आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

  • 03 Oct 2023 05:40 PM (IST)

    ‘काही चुकांमुळे आपण चौथ्या नंबरवर पोहचलो आहोत’, नाना पटोले यांचं वक्तव्य

    अहमदनगर (शिर्डी) : काँग्रेसकडून शिर्डीत अनुसूचित जाती शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली आहे.

    नाना पटोले यांच्या भाषणातील मुद्दे :

    हा फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेच महाराष्ट्र आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिले आहेत. मात्र केंद्रात बसलेले सरकार संविधान संपवू पाहत आहेत. काँग्रेसवाल्यांना तिकीट दिले जाणार. ज्यांना निवडणुका लढवायच्या त्यांनी आतापासूनच लोकांमध्ये जावे. आता राजकारणासोबत संघटना मजबूत करण्यावर भर द्या. काही चुकांमुळे आपण चौथ्या नंबरवर पोहचलो आहोत.

  • 03 Oct 2023 05:21 PM (IST)

    Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस अचानक दिल्लीला रवाना, काय घडतंय?

    मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दोन्ही नेते वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

  • 03 Oct 2023 05:02 PM (IST)

    Devendra Fadnavis News : उपोषण मागे घ्या, फडणवीस यांचे आवाहन

    टेंभू प्रकल्पावरुन आक्रमक झालेले रोहित पाटील यांना उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाची तातडीने दखल घेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. एका महिन्यात टेंभूला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

  • 03 Oct 2023 04:42 PM (IST)

    Devendra Fadnavis News : विरोधकांचे चीन कनेक्शन, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

    विरोधकांचा सध्या एकच संकल्प आहे, तो म्हणजे मोदींचा विरोध करणे. त्यांच्याकडे विकासाचा कार्यक्रम नाही. आपलं दुकान बंद होईल म्हणून ते एकत्र आले आहेत. या विरोधकांच्या पाठीमागे एक शक्ती आहे. ज्यांना अराजकता निर्माण करायची आहे. चीनच्या पैश्यावर हे लोक अराजकता करत आहेत. त्यांना चीनकडून फंडींग मिळत असल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  • 03 Oct 2023 04:24 PM (IST)

    Devendra Fadnavis News : भाजप हा मोठा पक्ष 

    भाजप हा आघाडीतील मोठा भाऊ आहे. हे सरकार तीन पक्षाचं असलं तरी भारतीय जनता पक्ष आपल्या धोरणापासून, ध्येयापासून दूर जाणार नाही. या दोन्ही पक्षांना आपण सोबत घेऊन जाऊन. या दोन्ही पक्षांना समजून घेऊ. भाजपला त्याग करावा लागेल.  सगळ्यांनी मेहनत घेतली तर आपण यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडू असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

  • 03 Oct 2023 04:05 PM (IST)

    Devendra Fadnavis News : राहुल गांधी यांच्याविषयी विश्वासहर्ता नाही

    राहुल गांधी, इंडिया आघाडी यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. हे लोक निवडणूक लढविण्यापूर्वीच आपआपसात लढत आहेत. आपली लढाई इंडिया आघाडीशी नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीत एकही राष्ट्रीय नेता नसल्याचा चिमटा त्यांनी काढला. जगामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉस म्हणतात, असे त्यांनी सांगितले.

  • 03 Oct 2023 03:58 PM (IST)

    Pune News | पुण्यातील कोंढवा परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

    पुण्यातील कोंढवा परिसरात कचऱ्याचे साम्राज्य. कोंढवा परिसरात अनेक ठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग. सर्व प्रशासकीय इमारती बाहेर देखील साचला कचरा. अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या घंटागाड्या सुद्धा येत नसल्याचा नागरिकांचा आरोप. कोंढवा परिसरातील कचरा प्रश्नी महापालिकेच दुर्लक्ष

  • 03 Oct 2023 03:42 PM (IST)

    Rohit Patil | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पाटलांशी फोनवरून साधला संवाद

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पाटलांशी फोनवरून साधला संवाद. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडण्यासंदर्भात रोहित पाटलांना विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित मान्यता एक महिन्याच्या आत देतो असं फोन करून पाटील यांना आश्वासन दिले आहे.

  • 03 Oct 2023 03:22 PM (IST)

    Eknath Shinde | चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार

    नांदेड रुग्णालयात औषधांचा जास्तीचा साठा होता, औषधांची कमी नव्हती. चौकशी अंती दोषींवर कडक कारवाई होणार. संबंधित अधिकाऱ्यांचा घटनास्थळी जाऊन आढावा. नांदेडमध्ये घडलेली घटना सरकारने गांभीर्याने घेतली – मुख्यमंत्री

  • 03 Oct 2023 03:16 PM (IST)

    Harbour Local | हार्बर लोकल लाईन वरील गाड्या 25- 30 मिनिटे उशिरा

    हार्बर लोकल लाईन वरील रेल्वेचा घोळ कायम. हार्बर लोकल लाईन वरील गाड्या 25- 30 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. पनवेलच्या दिशेने येणाऱ्या गाड्या उशिराने असल्याने नागरिक रेल्वे ट्रॅक वरून चालत येण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकातील दोन प्लॅटफॉर्म शिफ्ट केल्याने नागरिकांचा गोंधळ कायम. 4 आणि 5 प्लॅटफॉर्म बदली करून त्या जागी प्लॅटफॉर्म 1A आणि 1B असे करण्यात येणार आहे.

  • 03 Oct 2023 03:04 PM (IST)

    बीड जिल्ह्यात 100 किलोच्या हाराने मनोज जरांगेंचं स्वागत

    बीड जिल्ह्यामधील तेलगावमध्ये 100 किलोच्या हाराने मनोज जरांगे पाटील यांची जंगी स्वागत करण्यात आलं आहे. त्यासोबतच जेसीबीच्या साहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली.

  • 03 Oct 2023 02:52 PM (IST)

    गिरीष महाजन आणि आरोग्य विभागाच्या मंत्र्यांनी राजीनाम द्यावा- एकनाथ खडसे

    नांदेड आणि संभाजीनगर मध्ये एका दिवसामध्ये रुग्णांचे झालेल्या मृत्यू हे धक्कादायक असून दुर्दैवी आहे. एका दिवसात झालेले मृत्यू हे हलगर्जीपणामुळे झाले गिरीश महाजन या विषयाचे कितीही समर्थन करत असले तरी त्यांच्या कालखंडात झालेले मृत्यू हे नाकारता येऊ शकत नाही. महाजन आणि आरोग्य विभागाच्या मंत्र्यांनी राजीनाम द्यावा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केलीय.

  • 03 Oct 2023 02:31 PM (IST)

    सोयाबीन पिकावर रोग पडल्याने पंचनामे करण्याचे आदेश- धनंजय मुंडे

    मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पीकविम्याचा आढावा घेण्यात आला आहे. सोयाबीन पिकावर रोग पडल्याने त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देण्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

  • 03 Oct 2023 02:00 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर | गलहाटी धरणात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर | गलहाटी धरणात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. गलहाटी धरण परिसरातील नागरिकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गोदावरी नदीतील पाणी धरणात सोडण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे.

  • 03 Oct 2023 01:45 PM (IST)

    कंत्राटी भरती संदर्भात मोठी बातमी

    आता राज्य सरकार वैद्यकीय विभागातही कंत्राटी भरती करणार आहे. कंपनीमार्फत पदं भरायल मंजूरी देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि त्याला सलग्न शासकीय रुग्णयालयात गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदं भरण्यासाठी एजन्सीला मान्यता देण्यात आली आहे. 5 हजार 56 पदं कंत्राटी पद भरण्यात येणार आहेत.

  • 03 Oct 2023 01:30 PM (IST)

    आंबेगाव | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या वडिलांकडून विष प्राशन

    आंबेगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना मारहाण केल्याप्रकरणी धसका घेत प्रभाकर बांगर यांच्या वडिलांनी विष प्राशन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल बांगर यांना बेदम मारहाण केली होती. गोपाळा भाऊ बांगर यांनी राहत्या घरात विष प्राशन केलं. त्यांनी उपचारासाठी मंचर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुढील उपचारासाठी त्यांना पिंपरी चिंचवड इथल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

  • 03 Oct 2023 01:15 PM (IST)

    सरकारकडे पक्ष फोडायला पैसे, पण सर्वसामान्यांच्या औषधांसाठी नाही- सुप्रिया सुळे

    “सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत. पण गोरगरीब आणि सामान्य लोकांच्या औषधांसाठी पैसे नाहीत,” असा घणाघात खासदार सुप्रिया सुळे यांनी नांदेड, संभाजीनगरमधील घटनेवरुन केला आहे. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “हे सरकार अंधाधुंदपणे काम करत आहे. नांदेड आणि संभाजीनगरमध्ये झालेली घटना भयंकर आहे. सोयाबीनला भाव नाही हे शिंदे सरकारच्या ट्रिपल इंजिनचं अपयश आहे. सध्या महाराष्ट्र अडचणीत आहे. 21 व्या शतकात औषधं कशी कमी पडतात?”

  • 03 Oct 2023 12:57 PM (IST)

    इगतपुरीत पाणीटंचाई

    पावसाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या इगतपुरीतच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शिवाजी नगर, पंढरपूर वाडी, सह्याद्रीनगर येथील रहिवाशांना गेल्या बारा दिवसांपासून पाणीपुरवठा नाही. रहिवाशांनी नगर पालिका कर्मचाऱ्यांना बाहेर काढत नगर पालिका बंद केली आहे. नगरपालिकेच्या मुख्य गेटसमोर नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.

  • 03 Oct 2023 12:48 PM (IST)

    घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांची प्रतिक्रिया

    घाटी रुग्णालयात जे 10 मृत्यू झाले, ते बाहेरील रुग्णालयातून आमच्याकडे रेफर केलेले होते. आमच्याकडे 40 हार्ट चे पेशंट होते त्यातले आम्ही 38 वाचवले 10 रुग्ण दगावले. किडनीचे 27 रुग्ण आहेत त्यातला 1 रुग्ण दगावला 26 वाचले. आमच्याकडे औषधांचा तुटवडा नाही, आम्हाला लोकल मधून औषधे खरेदी करण्याची परवानगी आहे, आणि काही सामाजिक संस्था आम्हाला मदत करतात, असं म्हणत घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 03 Oct 2023 12:45 PM (IST)

    सोलापूरमध्ये धनगर समाजातर्फे जन आक्रोश मोर्चा

    सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये आज धनगर समाजातर्फे जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे.  मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येतोय. धनगर मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात मेंढरांना आणण्यात आलं आहे.

  • 03 Oct 2023 12:30 PM (IST)

    नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा

    नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचं आरोप केले आहेत. मात्र शासकीय रुग्णालयाचे डीन यांनी औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात रुग्णालयाकडून रुग्णांच्या नातेवाइकांना मोठ्या प्रमाणावर बाहेरून औषध आणण्यासाठी सांगण्यात येत आहे.

  • 03 Oct 2023 12:15 PM (IST)

    सुनील राऊत यांचा संजय शिरसाट यांच्यावर निशाणा

    संजय शिरसाट यांनी आम्हला शिकवू नये. जो माणूस एक ईडीची नोटीस आली आणि 10-50 कोटी साठी मिंधे गटात पळाला तो काय शिकवणार? खरी निष्ठा आमच्याकडे आहे. संजय शिरसाठ म्हणजे संजय राऊत नाही!, असं म्हणत सुनील राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहेय

  • 03 Oct 2023 11:58 AM (IST)

    Maharashtra News : शिंदे आणि ठाकरे गटाला आज विधीमंडळ नोटीस पाठवणार- सूत्र

    शिंदे आणि ठाकरे गटाला आज विधीमंडळ नोटीस पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधीमंडळातील विश्वासनिय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. शिवसेना कुणाची आहे हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला आता वेग आलेला आहे. दोन्हा नेत्यांना पुरावे सादर करण्यासाठी नोटीस बजावली जाणार आहे. शिंदे आणि ठाकरे लवकरचं एकमेकांसमोर येऊ शकतात.

  • 03 Oct 2023 11:53 AM (IST)

    Shivsena Dussehra Melawa : दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आक्रमक

    दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाकरिता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाकडून आज पुन्हा एकदा पालिकेला पत्र पाठवलं जाणार आहे. ठाकरे गट पालिका सहआयुक्तांना दोन दिवसांचा अल्टिमेटम देणार आहे.

  • 03 Oct 2023 11:46 AM (IST)

    Dhangar Reservation : धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध

    धनगर समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्यास राज्यातीर 18 आदिवासी आमदारांचा विरोध आहे. नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेखाली 18 आमदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. नरहरी झिरवाळ यांच्यासह 18 आमदार हे दिल्लीला रवना झालेले आहेत. आरक्षण प्रश्नी निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली जाणार आहे.

  • 03 Oct 2023 11:37 AM (IST)

    Nagpur : नापूरात अश्लील डान्स पार्टीवर छापा

    नापूरातील पाचगाव परिसरातील अश्लील डान्स पार्टीवर छापा मारण्यात आला. यामध्ये 13 डांन्सरसह 37 जणांना अटक करण्यात आलेली आहे. नागपूर ग्रामिण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

  • 03 Oct 2023 11:31 AM (IST)

    Weather Forecast : मान्सुनचा परतीचा प्रवास सुरू

    मान्सुनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्रातून मान्सुन 4 ऑक्टोबरपासून परतण्यास सुरूवात होणार. यंदा देशात सरासरीच्या 94.4 टक्के इतका पाऊस झाला आहे.

  • 03 Oct 2023 11:22 AM (IST)

    Andhericha Raja : अंधेरीच्या राजाची मिरवणूक आजही सुरूच

    काल निघालेली अंधेरीच्या राजाची मिरवणूक आजही सुरूच आहे. आज वर्सोवा चौपाटीवर गणपतीचे विसर्जन होणार आहे. अंधेरी पश्चिम येथील आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती आयोजित या गणेशोत्सव मंडळाचे यंदा 58 वे वर्ष आहे. नवसाला पावणारा अंधेरीचा राजा अशी या गणपतीची ख्याती असून 1974 पासून त्याचे दरवर्षी  संकष्टीला विसर्जन होते.

  • 03 Oct 2023 11:14 AM (IST)

    Mumbai News : पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी

    पनवेल-सायन महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पनवेल सायन महामार्गावर वाहानांची वर्दळ वाढली आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार अशी तीन दिवस सलग सुट्टी होती. त्यामुळे मुंबईत परतणाऱ्यांची आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्यांची गर्दी होतांना दिसत आहे.

  • 03 Oct 2023 11:09 AM (IST)

    सुप्रिया सुळे यांच्याकडून लोकसभा मतदार संघाची चाचपणी

    शरद पवार गटाच्या नेते सुप्रिया सुळे यांच्याकडून अमरावती लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यात येत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्याकडून मोर्चे बांधणी केली जात आहे.

  • 03 Oct 2023 10:46 AM (IST)

    LIVE UPDATE | पनवेल सायन महामार्ग ठप्प; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    पनवेल सायन महामार्ग ठप्प झाला आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. रुग्णवाहिकेला सुद्धा वाट काढावी लागत आहे. सलग चार दिवस सुट्टी असल्यामुळे अनेक पर्यटक प्रवासी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.

  • 03 Oct 2023 10:30 AM (IST)

    LIVE UPDATE | शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी रस्सीखेच

    शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. शिवाजी पार्क मैदानाकरता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गट पालिका सहाय्यक आयुक्तांना २ दिवसांचा अल्टिमेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 03 Oct 2023 10:15 AM (IST)

    LIVE UPDATE | नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरुन संजय राऊत यांची सरकारवर टीका

    नांदेडमधील रुग्णांच्या मृत्यूवरुन संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार अस्तित्वातच नाही. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्याचा राजीनामा घ्यावा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 03 Oct 2023 09:57 AM (IST)

    लोकल उशीरा येत असल्याने खारघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी

    सकाळपासून लोकल ट्रेन २० ते ३० मिनिटे उशीरा येत असल्याने खारघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र ट्रेन उशीरा का चालत आहेत, यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

    ट्रेन उशीरा आल्याने चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला असून अनेक प्रवासी ट्रॅकवर उतरून पुढे चालत निघाले.

  • 03 Oct 2023 09:45 AM (IST)

    ठाणे लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये पेच ?

    ठाणे लोकसभेच्या जागेवरून आता शिंदे गट आणि भाजपमध्ये आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे तो गड आपल्याच ताब्यात ठेवावा असं शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे.

    तर भाजपही या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.

  • 03 Oct 2023 09:38 AM (IST)

    नांदेड रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरूच – अशोक चव्हाण

    नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ जणांचा मृत्यू झाल्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. मृतांमध्ये ४ बालकांचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  • 03 Oct 2023 09:22 AM (IST)

    महायुती सरकारमधील पालकमंत्रीपदाचा तिढा कायम

    महायुती सरकारमधील पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गट – अजित पवार गटामुळे पालकमंत्रीपदाचा गुंता वाढला आहे.

    अजितदादा गटाकडून पुणे, रायगड आणि साताऱ्याच्या पालकमंत्री पदावर दावा करण्यात आला आहे. मात्र या तिन्ही जिल्ह्यांचं पालकमंत्री पद देण्यास शिंदे गट आणि भाजपाने विरोध दर्शवला आहे.

  • 03 Oct 2023 09:13 AM (IST)

    तीन इंजिनं लागूनही राज्याचं आरोग्य व्हेंटिलेटरवर असेल तर काय उपयोग ? – राज ठाकरे

    नांदेड रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय ? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाही पण महाराष्ट्राचं काय ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

    सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

  • 03 Oct 2023 09:08 AM (IST)

    बदल हवा तर आमदार नवा – समरजित घाटगेंचा नवा नारा

    कागलमध्ये बदल हवा तर आमदार नवा, कोल्हापूरच्या कागलमध्ये समरजित घाटगेंनी दिला नवा नारा. घाडगेंनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

  • 03 Oct 2023 08:59 AM (IST)

    Sangali News | रोहित पाटील यांची प्रकृती खालवली

    सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील 17 गावांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे आणि टेंभू योजनेत या गावांना समाविष्ट केले पाहिजे, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान रोहित पाटील यांची तब्येत खालावल्याने त्यांना रात्री सलाईन लावण्यात आले होते.

  • 03 Oct 2023 08:49 AM (IST)

    sambhaji nagar | संभाजीनगरमध्ये 24 तासांत 10 जणांचा मृत्यू

    छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. ठाणे, नांदेडनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्ण दगावल्यामुळे खळबळ उडाली आहे.

  • 03 Oct 2023 08:40 AM (IST)

    Maharashtra News | सोलापूर उजनी धरण ५० टक्के भरले

    सोलापूर जिल्हासाठी वरदान ठरलेले उजनी धरण ५० टक्के भरले आहे. धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सध्या उजनी धरणात ८८ टीएमसी पाणीसाठा असून २४.३४ टीएमसी उपयुक्त जलसाठा झाला आहे.

  • 03 Oct 2023 08:21 AM (IST)

    Pune News | पुणे पोलिसांच्या मंडळांना नोटिसा

    गणपतीत टाकलेले मांडव न काढणाऱ्या गणेश मंडळांना पुणे पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर दोन दिवसांत मंडळांनी मांडव काढून रस्ता रिकामा करणे आवश्‍यक आहे. मात्र,अद्याप अनेक मंडळांचे मांडव रस्त्यावर उभे आहेत.

  • 03 Oct 2023 08:14 AM (IST)

    Nashik News | नाशिकमध्ये आजपासून कांदा लिलाव

    नाशिकमध्ये तब्ल 13 दिवसांनंतर आजपासून कांद्याचे लिलाव सुरु होणार आहे. जिल्हाभरातील बाजार समित्यांमध्ये आजपासून व्यवहार पुर्ववत होणार आहे. व्यापाऱ्यांनी बंद मागे घेतल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक, पिंपळगाव, मनमाड, चांदवड, उमराने या बाजार समितीत व्यवहार सुरु होणार आहे.

  • 03 Oct 2023 08:00 AM (IST)

    Loksabha Election 2024 | शिंदे गट ठाणे लोकसभेसाठी आग्रही 

    ठाणे जर शिंदे गट मागणार असेल तर कल्याण आपल्याकडे राहावे यासाठी भाजप देखील येत्या काळात आग्रही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेकडून हा गड आपल्याच  ताब्यात ठेवावा, असे वरिष्ठ नेत्यांचे एकनाथ शिंदेंकडे मत व्यक्त. त्यानुसार शिंदे गटानेही आता ठाणे लोकसभेसाठी तयारी सुरू केली. ठाण्यात शिवसेनेची चांगली ताकद असल्याचा शिंदे गटातील नेत्यांचा दावा.

  • 03 Oct 2023 07:45 AM (IST)

    Maratha Reservation | मराठवाड्यातील अनेक गावात नेत्यांना गावबंदी

    मराठा अरक्षणावरून गावातील नागरिक आता आक्रमक झाले आहेत. मराठवाड्यातील अनेक गावात नेत्यांना गावबंदी केली आहे. अनेक गावातून नेत्यांची हकालपट्टी सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील वावना गावातून भाजपच्या शिष्टमंडळाची हकालपट्टी. मतदानावर बहिष्कार घालण्याची गावकऱ्यांनी घेतली शपथ. मराठा आरक्षण मिळेपर्यंत मतदानवर बहिष्कार आणि नेत्यांना गावबंदी कायम राहील असं गावकऱ्यांनी म्हटलय.

  • 03 Oct 2023 07:38 AM (IST)

    Crime News | छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांना धक्काबुक्की, मारहाण

    छत्रपती संभाजीनगरमध्ये बाजाजनगर परिसरात गुंडाकडून महिलांना धक्काबुक्की मारहाण. बजाजनगरातील पंचगंगा सोसायटीत घडली मारहाणीची घटना आणि धक्काबुक्की. मारहाण धक्काबुक्कीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. काही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू. कॉलनीतील कारणावरून झाली मारहाण आणि धक्काबुक्की.

  • 03 Oct 2023 07:29 AM (IST)

    Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी

    मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी. आज पुण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक आहे. सकाळी 11 वाजता कौन्सिल हॉलला बैठकीचं आयोजन करण्यात आलय. बैठकीत मराठा ,कुणबी मराठा,वायंदेशी मराठा यांच्याबाबत चर्चा होणार. राज्य मागासवर्गीय आयोगाची आज पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आजच्या बैठकीय काय महत्वाची चर्चा होते हे पाहणं महत्वाच आहे. आयोगाकडे आतापर्यंत आलेल्या मागण्यावर होणार चर्चा. आयोगाचे अध्यक्ष आणि सगळे सदस्य राहणार उपस्थित.

Published On - Oct 03,2023 7:28 AM

Follow us
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.