Maharashtra Marathi News | मंत्री गिरीश महाजन जालन्यातील आंदोलनस्थळी, उपोषण सोडावं, सरकारचा प्रस्ताव

| Updated on: Sep 04, 2023 | 7:21 AM

Maharashtra Breaking News : महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर. मराठा आंदोलकांवर जालना येथे लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.

Maharashtra Marathi News | मंत्री  गिरीश महाजन जालन्यातील आंदोलनस्थळी, उपोषण सोडावं, सरकारचा प्रस्ताव

मुंबई | 3 सप्टेंबर 2023 : आज तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांवरील हल्ल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता. मुंबईत मराठा समाजाचा आज मोर्चा पार पडणार. जगभरात नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून मॅरेथॉनला सुरुवात. बुलढाण्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड उपस्थित राहणार. भिवंडीत इमारतीचा भाग कोसळला. आठ महिन्याच्या बाळासह महिलेचा मृत्यू. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Sep 2023 07:35 PM (IST)

    Girish Mahajan Jalna | मंत्री गिरीश महाजन जालन्यातील आंदोलनस्थळी, उपोषण सोडावं, सरकारचा प्रस्ताव

    जालना | मंत्री गिरीश महाजन हे जालन्यातील आंदोलनस्थळी पोहचले आहेत. त्यांच्यासोबत आमदार नितेश राणे हे देखील आहेत. गिरीश महाजन हे आंदोलनस्थळी सरकराचा प्रस्ताव घेऊन गेले आहेत. गिरीश महाजन यांनी आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. सरकार तुमच्या मागण्यांची दखल घेईल, असा शब्द गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांना दिला. सोबतच आंदोलनकांनी उपोषण सोडावं, असं आवाहनही यावेळेस करण्यात आलं.

  • 03 Sep 2023 07:32 PM (IST)

    मनोज जरांगे-गिरीश महाजन यांच्यात चर्चा

    जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी संवाद साधला. उपोषण करणं हे तुमच्या तब्यतीसाठी चांगले नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. यावेळी नितेश राणेसुद्धा उपस्थित होते.

  • 03 Sep 2023 06:21 PM (IST)

    सोयाबीन, कापसाला जीवदान

    पुण्याच्या इंदापूर परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गोंदियामध्येही दीर्घ कालावीनंतर पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातली पावसाचं पुनरागमन झालं. एका महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी सुखावला आहे.

  • 03 Sep 2023 03:40 PM (IST)

    आलापल्ली- सिरोंचा मार्गाची दुरवस्था

    गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली- सिरोंचा मार्गाची दुरवस्था झाली आहे. 50 किलोमीटर मार्ग कापण्यासाठी दोन तास लागत आहेत. चारचाकीच नव्हे तर दुचाकी वाहनही चालवणे घातक ठरत आहे. या मार्गाचे काम 2018 मध्ये मंजूर झाल्यावरही कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत.

  • 03 Sep 2023 03:15 PM (IST)

    तहसील कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाचा ठिय्या

    परळी : मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांकरिता परळी तहसील कार्यालयाबाहेर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय. शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते यांनी आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे.

  • 03 Sep 2023 02:44 PM (IST)

    जालनाच्या पोलीस अधीक्षकांना मी सक्तीच्या रजेवर पाठवलंय- एकनाथ शिंदे

    जालनामध्ये घडलेल्या घटनेची गरज लागल्यास न्यायालयीन चौकशी होणार असून तिथले पोलीस अधीक्षक तुषार दोषा यांना मी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाला. बुलडाण्यामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

  • 03 Sep 2023 02:23 PM (IST)

    2004 आणि 2014 ला अकोला पूर्वचे आमदार

    माजी आमदार हरिदास भदे यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश केलाय. 2004 आणि 2014 अकोला पूर्वचे आमदार होते. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडून आले होते.

  • 03 Sep 2023 02:12 PM (IST)

    जालना लाठीचार्ज प्रकरणी मोठी कारवाई

    जालनामध्ये झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी आता मोठी कारवाई झालेली आहे. जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी आता सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.

  • 03 Sep 2023 12:52 PM (IST)

    Maratha Reservation : पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द

    पुण्याहून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या बसेस रद्द करण्यात आलेल्या आहेत. परिस्थिती तणावपूर्ण असल्यामुळे बसेस रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पूण्यातून संभाजीनगर आणि जालन्याला जाणाऱ्या प्रवाश्यांचे त्यामुळे हाल होत आहे. बस स्थानकावर प्रवाश्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 03 Sep 2023 12:33 PM (IST)

    Maratha Reservation : जालन्यात महिलांवरही लाठीचार्च झाला- आदित्य ठाकरे

    जालन्यात महिलांवरही लाठीचार्च झाला असा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हे सरकार नेमके कोणाचे आहे असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला. लाठी काठी घेऊन शासन आपल्या दारी असा टोलाही आदित्य यांनी लगावला.

  • 03 Sep 2023 12:23 PM (IST)

    Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लेह-लडाखच्या दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लेह-लडाखच्या दौऱ्यावर आहेत. लडाखच्या वॉर मेमोरियमचे फडणवीस यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. महाराष्ट्र सरकाच्या पुढाकाराने हे संग्रहालय उभारण्यात येत आहे.

  • 03 Sep 2023 12:15 PM (IST)

    Maratha Reservation : सोलापूरात मराठा संघटना आक्रमक

    सोलापूरात मराठा संघटना आक्रमक झाल्याची माहिती समोर आली आहे. मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. सोलापूर हैद्राबाद महामार्ग आणि सोलापूर पुणे महामार्गावर आंदोलकांकडून रास्तारोको करण्यात आले. या आंदोलना दरम्यानच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

  • 03 Sep 2023 11:45 AM (IST)

    jalna lathi charge : नाशिक बंदची हाक

    मराठा क्रांती मोर्चाकडून आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. जालना येथील लाठीचार्ज घटनेच्या निषधार्थ नाशिक बंदची हाक दिली आहे. नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाला सुरुवात झाली.

  • 03 Sep 2023 11:28 AM (IST)

    jalna lathi charge : धुळे शहरात आंदोलन

    धुळे शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरातील मुख्य चौक शिवतीर्थ येथे रास्ता रोकोचे आयोजन केले होते. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने कराची वाला खुंट येथे हे आंदोलन झाले.

  • 03 Sep 2023 10:58 AM (IST)

    jalna lathi charge : बुलढाणा जिल्ह्यात आंदोलन

    बुलढाणा जिल्ह्यात मेहकर येथे मराठा समाजाकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि जालना येथील आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे.

  • 03 Sep 2023 10:42 AM (IST)

    jalna lathi charge : सोलापुरात आंदोलन

    सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन केले गेले. सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर काही वेळात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जालन्यातील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला.

  • 03 Sep 2023 10:30 AM (IST)

    jalna lathi charge : राज ठाकरे यांचा मनोज जरांगेसोबत संवाद

    जालना येथील मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन संवाद साधला. तुमच्या लढाईत आम्ही, तुमच्यासोबत असल्याचे राज ठाकरे यांनी त्यांना सांगितले.

  • 03 Sep 2023 10:26 AM (IST)

    jalna lathi charge : जालनात आजही बसेस बंद

    जालना बसस्थानकात आज देखील शुकशूकाट दिसत आहे. जालना बस स्थानकातून रविवारी एकही बस सुटणार नाहीत. संपूर्ण मराठवाड्यात बस सेवा आजही बंद राहण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील इतर भागातून मराठवाड्याकडे येणाऱ्या बसेस आजही बंद आहे.

  • 03 Sep 2023 10:09 AM (IST)

    Sanjay Raut : जालनातील प्रकार गृहमंत्र्यांचे अपयश

    जालना येथील आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. या प्रकरणी त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

  • 03 Sep 2023 09:58 AM (IST)

    Sanjay Raut : मंत्रालयातून अदृश्य फोन गेला नंतर लाठीमार-संजय राऊत

    मंत्रालयातून अदृश्य फोन गेला आणि नंतर पोलिसांनी आमानूष लाठीमार केला. लहान मुले, महिला यांच्यावर निर्घृण लाठीमार केला. शाळेतून घरी येत असलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 03 Sep 2023 09:48 AM (IST)

    Maratha Kranti Morcha News : काही ठिकाणी बंदची हाक, तर काही शहरात आंदोलन

    जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्याप्रकरणात राज्यभर पडसाद उमटले आहेत. नाशिकमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. तर सोलापूरमधील सकल मराठा समाजाने जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन जाहीर केले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

  • 03 Sep 2023 09:30 AM (IST)

    Maratha Kranti Morcha News : सहाव्या दिवशी पण आमरण उपोषण सुरुच

    जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांचे सहाव्या दिवशी पण आमरण उपोषण सुरु आहे. पोलीसा लाठीमार प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले आहेत. जालना शहर पूर्वपदावर येत आहे.

  • 03 Sep 2023 09:19 AM (IST)

    Nana Patole News : आमची सर्वधर्म समभावाची भूमिका-नाना पटोले

    तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे पूत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावरुन देशभरात राजकारण तापले आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणत्याही धर्मावर टिप्पणी करत नाही, कोणाच्या भावना दुखावत नाही, आम्ही सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन चालतो, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोल यांनी दिली.

  • 03 Sep 2023 09:13 AM (IST)

    Congress News : काँग्रेसची जनसंवाद यात्रा

    नागपूरमध्ये जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जनसंवाद यात्रा सुरु झाली आहे. नागपूर दक्षिण मतदारसंघात यात्रेची सुरुवात करण्यात आली. यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मत वडेट्टीवार यांनी सांगितले.

  • 03 Sep 2023 08:43 AM (IST)

    मनसे नेते बाळा नांदगावकर संभाजीनगरमध्ये दाखल

    मनसे नेते बाळा नांदगावकर संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलन आणि जखमींची भेट घेणार आहेत. लाठी चार्ज करणे हवेत गोळीबार करणे ही गोष्ट चुकीची आहे. आज तिथे जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेणार आहेत. मला सर्व माहिती असली तरी प्रत्यक्षात पाहणं हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन झाली होती.

  • 03 Sep 2023 08:20 AM (IST)

    चंद्रपुरात काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सुरुवात

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभरात आजपासून जनसंवाद यात्रा सुरू होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 15 ही तालुक्यात ही यात्रा निघणार असून आज सकाळी चंद्रपूर शहरात या जनसंवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सुभाष धोटे यांनी या जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. चंद्रपूरचं आराध्य दैवत असलेल्या महाकाली मंदिरात आरती करून काँग्रेसने या यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेदरम्यान काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात दररोज 25 किमीची ही पदयात्रा काढत आहेत.

  • 03 Sep 2023 08:18 AM (IST)

    ५२५ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले जाणार

    समान पाणीपुरवठा योजनेसाठी पुणे शहरातील तब्बल ५२५ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदले जाणार आहेत. त्यामुळे पुणेकरांची खड्ड्यांमधून सुटका काही लवकर होणार नाही असं चित्र दिसत आहे. शहरात समान पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल १ हजार ८०० किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. कोरोना आणि यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. यानंतर योग्य पद्धतीने खोदाईची दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करुन खड्डे बुजवावे लागले होते. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.

  • 03 Sep 2023 08:01 AM (IST)

    Jalna Lathi Charge : मराठा संघटनांकडून आज नाशिक बंदची हाक, लाठीमारच्या घटनेचा नोंदवणार निषेध

    जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आंदोलक आंदोलन करणार आहेत. नाशिकमध्ये काल देखील अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. आंदोलकांवर पोलिसांची नजर.

  • 03 Sep 2023 07:45 AM (IST)

    Nashik : सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांचे अपहरण, नाशिकमध्ये खळबळ

    नाशिकमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण झाले आहे. पारख हे गजरा ग्रुपचे चेअरमन आहेत. इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून त्यांचे अपहरण करण्यात आले आहे. चारचाकी आणि दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी त्यांचं अपहरण केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • 03 Sep 2023 07:34 AM (IST)

    half marathon : जगभरात नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात; साडे सात हजार स्पर्धकांचा भाग

    जगभरात नावाजलेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत देश-विदेशातून स्पर्धक झाले सहभागी झाले आहेत. यावर्षी 7,500 स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.

  • 03 Sep 2023 07:15 AM (IST)

    Jalna Lathi Charge : ठाकरे गटाचं पहाटे पहाटे आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना अडवलं

    जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाने पहाटे पहाटेच आंदोलन सुरू केलं आहे. मरीन ड्राईव्ह येथे पहाटे 6 वाजताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले. मात्र, पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यास मनाई केली. आंदोलकांना आझाद मैदानात जायला सांगितलं. मात्र, आंदोलक मरीन ड्राईव्ह येथेच आंदोलन करण्यावर ठाम होते.

  • 03 Sep 2023 07:06 AM (IST)

    Maratha kranti morcha : लाठीमारविरोधात मराठा समाज आक्रमक; आज मुंबईत मोर्चा

    मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईत मोर्चा आयोजित केला आहे. सकाळी 11 वाजता हा मोर्चा सुरू होईल. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे.

Published On - Sep 03,2023 7:02 AM

Follow us
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.