मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 :पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेला भिडे वाडा आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी पुणे महापालिका आता नवीन आराखडा तयार करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा आता जम्मू-काश्मीरमधील युवकांनाही मिळणार आहे. जम्मू-काश्मिरातील कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते अनावरण होणार आहे. आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे हा पुतळा बसवण्यात आला आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा टप्पा आजपासून सुरु होत आहे. आज छत्तीसगड राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्याकडे आला आहे. राज्य, देश, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढणार आहे. कर्मचाऱ्यांना जुलै २०२३ पासून वाढ मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात पगारात भत्ता मिळणार आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना चार टक्के वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. या पूर्वी केद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ झाली होती. त्यानुसार आता राज्यातील शासकीय कर्मचारी यांना वाढ मिळणार आहे.
पुणे : मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. उद्घव ठाकरे यांनी बेईमानी केली. शरद पवारांनी षडयंत्र करुन उद्धव ठाकरेना मुख्यमंत्री केले.त्यामुळे मराठा आरक्षण मिळाले नाही. ४५ पेक्षा जास्त लोकसभेला भाजप आघाडीला मिळतील. ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना ६ व्या क्रमांकावर जावे लागले. शरद पवार ५ व्या क्रमांकावर गेले. त्याचे चिंतन करण्यासाठी उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर गेले असतील.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू आणि अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार बालाजी किणीकर हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओक वर दाखल झाले आहेत.
मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना सोशल मीडियावरुन धमकी देण्यात आली आहे. राजू शेट्टी यांना तुमचा दत्ता सामंत करू अशी धमकी दिली आहे. स्वाभिमानी चे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी ही माहिती दिली आहे. स्वाभिमानीची ऊस परिषद पार पडली. या परिषेदत पाटील यांनी धमकीचा उल्लेख करत जालिंदर पाटील यांनी समचार घेतला.
मुंबई | मी ओबीसी आहे, मात्र माझा मराठा आरक्षणासाठी विरोध नाही, असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी राज्य सरकारवर केलाय.
मुंबई | धनगर समाजासाठी उद्या बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय होणार आहे. धनगर समाजाच्या विकासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत समिती गठीत करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. धनगर समाजाच्या योजनांच्या संनियंत्रणसाठी ‘शक्तीप्रदत्त समिती‘ स्थापन करण्यात येणार आहे.
गोंदिया | गोंदिया शहरात काँग्रेसचा आक्रोश मोर्चा काढत मोदी सरकार विरोधात नारेबाजी केली आहे. काँग्रेसने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदन दिलं. काँग्रेसने महागाई, कंत्राटी भरती तसेच वीज मीटर अशा अनेक मुद्दे घेऊन हा मोर्चा काढला.
मुंबई | मोठी बातमी समोर आली आहे. रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बेदखल करण्यात आलं आहे. तुपकर यांनी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेकडे पाठ फिरवली. तुपकर अजित पवार गटाच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जात आहे.
पुण्यात मनसे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुण्यातील सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटीचं ऑफिस फोडलं आहे. मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचं ऑफिस फोडल्याचं यावेळी सांगण्यात आलं. लोकसभेसाठी पुण्यातून वसंत मोरे यांचं नाव चर्चेत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील काही भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अधिका-यांनी सांगितले की एडीजीपीच्या आदेशात देशविरोधी घटकांकडून मोबाईल डेटा सेवेचा गैरवापर होण्याची शक्यता नमूद केली आहे. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते.
मराठा समाज मागास आहे, असा कोणत्याच आयोगाचा निर्णय नाही. त्यामुळे त्यांना कुणबीतून आरक्षण देता येणार नाही, असं सदावर्ते यांनी सांगितलं आहे. भूजबळांनी भूमिका घ्यावी असं सदावर्ते यांनी सांगितलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊतही आहेत. मराठा आरक्षण, ग्रामपंचायत निवडणुका याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पक्षांना फटका बसल्याने ही चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी मंगळवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि म्हटले की, पंतप्रधानांसाठी विमान खरेदी करण्यासाठी आणि संसद भवन बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत.’ छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात एका निवडणूक रॅलीत बोलताना गांधींनी भाजपवर आरोप केला.
सिल्व्हर ओकवर थोड्याच वेळात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीला रवाना झाले आहेत. ते थोड्याच वेळात सिल्व्हर ओकवर पोहचतील. संजय राऊत हे पण सोबत आहेत. मराठा आरक्षण, मुंबईतील धारावी पूनर्विकास प्रकल्प, ग्रामपंचायत निवडणूका यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
बीडमधील जाळपोळप्रकरणात 160 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोन हजार जणांची चौकशी केल्याचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माहिती दिली. हॉटेल आणि इतर मालमत्ता जाळणाऱ्यांविरोधात कडक करावाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी-कर्मचारी समायोजन समितीतर्फे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.आरोग्य विभागातील नर्सेस तसेच इतर कर्मचाऱ्यांना शासकीय नोकरीत समावेश करून घ्यावे या मागणीसाठी आंदोलन झाले.मागील दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. मात्र वारंवार सरकार आश्वासन देऊनही कर्मचाऱ्यांना सेवेत घेत नाही. राज्यात 40 हजार कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. याउलट देशातील इतर छोटी राज्य देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत भरती करून घेत आहे. त्यामुळे आता आम्ही काळ्याफिती लावून काम बंद आंदोलन करत आहे. सरकारने तात्काळ याची दखल घेतली नाही तर आम्ही संपाचे हत्यार उपसू असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन समितीतर्फे देण्यात आला आहे.
जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात ऊस परिषदेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.ऊस परिषदेत राजू शेट्टी या वर्षीच्या दराची मागणी करणार आहे. तर मागील हंगामातील उसाच्या चारशे रुपये हप्त्यावर देखील भाष्य करण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यावर्षी किती रुपये ऊस दर मागणार याकडे कारखानदारासह ऊस उत्पादकांचाही लक्ष लागले आहे. राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज नांदणी गावातून सुरुवात झाली. लवकरच ते कार्यक्रम स्थळी येतील.
बुलढाणा : विहिरीत उडी घेऊन 21 महिन्याच्या चिमुकल्यासह 26 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. यामध्ये माय लेकांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा सुद्धा मृत्यू झाला आहे. चिखली तालुक्यातील भरोसा येथील घटना असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घ्यावी. सध्या मराठवाड्यात केवळ 38 टक्के पाणी साठा आहे. गेल्या वर्षी हा पाणीसाठा 88 टक्के इतका शिल्लक होता. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. कर्नाटक सरकारप्रमाणे संपूर्ण राज्य दुष्काळी घोषीत करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. आमदारांची दिवाळी साजरी करण्यासाठी राज्य सरकार पुढे आहे. मग शेतकऱ्यांची दिवाळी कदी साजरी होणार असा सवाल त्यांनी विचारला.
दिवाळीनंतर ओबीसी मोठं आंदोलन करणार आहे. त्यासाठी समाज रस्त्यावर उतरणार आहे. आज ओबीसी संघटनेतील नेत्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पाऊणतास या विषयावर चर्चा केली. केवळ समिती नेमून कोणी मागास ठरविण्यात येऊ शकत नाही, त्यांना आरक्षण देता येत नाही अशी भूमिका घेण्यात आली. दिवाळीनंतर आंदोलनाची दिशा समोर येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील भंडार्ली उत्तरशिव गोठेघर ग्रामस्थकडून म्हाडा इमारतींचा ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पोलिसांनी आंदोलनकर्त्याना बाहेर काढत मध्यस्थी करत म्हाडाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर गावकरी शांत झाले आहेत. तर शाळेच्या आरक्षित भूखंडावर उभी असलेली म्हाडाची इमारत पाडा अन्यथा राज्यभरात आंदोलन करू डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने इशारा दिलाय.
जायकवाडीला पाणी सोडण्यासंदर्भातली पुढील सुनावणी पाच तारखेला होणार आहे. २० तारखेपर्यंत सरकारने आपली बाजू स्पष्ट करावी असे न्यायालयाचे आदेश दिलेत. मराठवाड्याला पाणी सोडण्याला नाशिकच्या स्थानिक आमदारांनी विरोध दर्शविला होता. यानंतर नाशिकहून पाणी सोडण्याबाबत आमदारांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. आता पाणी प्रश्नावरील पुढील सुनावणीकडे आता लक्ष लागले आहे.
मालेगांव येथून चाळीसगावात एमडी ड्रग विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बिलाखेड बायपासच्या उड्डाण पुलाखाली हा तरुण एमडी ड्रग विकण्यासाठी उभा असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी सापळा रचून एमडी ड्रग विकण्यासाठी आलेलेल्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून जवळपास १२ ग्राम एमडी जप्त करण्यात आले असून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी भरारी पथके आणि पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षक यांनाही सुरक्षा व्यवस्थेबाबत पत्र देण्यात आले आहे. विद्यापीठाची परीक्षा १०० परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.
बीड: मराठ्यांच्या या आंदोलनात गुंड प्रवृत्तीचे लोक होते, त्यामुळे हिंसा घडली. या प्रकरणात आमचे कुटुंब भयभीत झाले आहेत. पोलिसांनी काही आरोपी पकडले आहेत. सीसीटिव्ही पाहून पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई झाली पाहिजे. मराठा आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. यात मास्टर माईंड आहे, पोलिसांनी तो शोधावा.
रोहित पवार यांचं स्टेटमेंट हे राजकीय आहे. इथ सर्व राजकीय नेत्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण दिसत नाही, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के म्हणाले.
न्यायमुर्ती जालन्यात गेले तर गैर काय ? ते पण माणूसच असं मत विधान परिषदेचे नेते अंबादास दानवेंनी व्यक्त केलंय तर न्यायमुर्ती गेले त्याला आमचा विरोध असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय, त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमधील मित्र पक्षात कमालीचे मत मतांतर पाहायला मिळत आहे.
सत्ताधाऱ्यांमध्ये दम असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नाहीत, असे म्हणत आमचा पक्ष एक नंबर हा दावा करणे हास्यास्पद आहे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे. एक नंबरला पक्ष आहे, दावा हा खोटा आहे. त्यांनी दोन महिन्यात स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणूक घेऊन दाखवाव्यात, असे आव्हानही दिलंय.
मार्मिकच्या दिवाळी अंकामधून भाजपवर जोरदार टिका करण्यात आली आहे. 9 वर्षांपूर्वी उदासवाणा आकाशकंदील बदलवून मोदींकडे सत्ता सोपवली, तो आकाशकंदील चायनीज बनावटीचा असावा इतका तकलादू निघाला. हौसेनं लावलेले हे आकाशकंदील आता बदलण्याची वेळ आली आहे. असं या दिवाळी अंकात म्हंटलं आहे.
जातीच्या नावाखाली राज्य फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अस्थिरतेच्या नावाखाली उद्योग शेजारच्या राज्यात नेण्याचा डाव असल्याचेही ते म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणूक आम्हीच जिंकलो म्हणणारे अडाणी आहेत असं वक्तव्य संजय राऊक यांनी केलं आहे. महापालिका आणि सिनेट निवडणूका घेऊन दाखवा मग बघू कोण जिंकतं, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
आंध्रप्रदेशच्या विजयवाडा बस स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. चालकाचे बसवरून नियंत्रण सुटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
हिंगोलीच्या सेनगावमध्ये पीक विमा कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी पीक विमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ही तोडफोड केली.
दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांची मोठी कारवाई करत 9 बंदुका (माऊझर) एक देशी कट्टा आणि 85 जिवंत काडतुसे जप्त केली . एका हत्या प्रकरणाचा तपास कत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली.
दापोली – मुरुड किनाऱ्यावरील साई रिसॉर्टला 30 नोव्हेंबर पर्यंत दिलासा मिळाला आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत साई रिसॉर्ट पाडू नये असे आदेश खेड सत्र न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.
जालन्यामध्ये ओबीसी आरक्षण बचाव समितीचा एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये. सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दिवाळीच्या निमित्ताने परगावी जाणासाठी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची झुंबड उडाली आहे. मात्र रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या आहेत.
दिवाळीसाठी अधिकच्या गाड्या सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांतर्फे करण्यात आली आहे.
दिवाळीनंतर ओबीसी समाजातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे.
भुजबळांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत ओबीसी नेत्यांनी हा निर्णय घेतला. मराठा-कुणबी दाखल्यांवरून ओबीसी नेत्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
भुसावळ-नाशिक-पुणे हुतात्मा एक्सप्रेस नाशिककरांना परत द्या, या मागणीसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाबाहेर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रबंधक यांना भुसावळ-नाशिक-पुणे या ‘हुतात्मा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडीचे मॉडेल देऊन मनसेनं निषेध आंदोलन केलं.
पूर्वी नाशिकहून-पुणे धावणारी ‘हुतात्मा एक्सप्रेस’ आता नाशिकला येणार नसून अमरावती, भुसावळ , मनमाड, दौंड मार्गे पुणे अशी धावणार आहे. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेस नाशिककरांसाठी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मनसेने दिला.
हिंगोलीत सेनगाव येथील पिक विमा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. टेबल खुर्च्यांची तोडफोड. 12 तारखेपर्यंत विमा नाही मिळाला तर मुंबईतील कार्यालय फोडणार स्वाभिमानीचा शेतकरी संघटनेच्या पद अधिकाऱ्यांचा इशारा.
सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक संपली. भुजबळांच्या निवासस्थानी पार पडली बैठक. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी ओबीसी नेत्यांची भूमिका. कुणबी दाखले दिल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होणार. असं झाल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई सुरु करणार ओबीसी नेत्यांची भूमिका. दिवाळी संपल्यानंतर राज्यभर आंदोलन करणार – प्रकाश शेंडगे
पुढील महिन्यात भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचे होणार भूमिपूजन. भिडेवाड्याची जागा एक महिन्यामध्ये ताब्यात मिळणार आहे त्यानुसार वास्तू विशारद यांच्याकडून आराखडा तयार करून घेण्याची सूचना. सुप्रीम कोर्टाने भिडे वाड्याची संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश जागा मालक व भाडेकरूंना दिले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती.
सोलापुरात ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी. सोलापुरातील स्मार्ट सिटीच्या प्रकल्पात एका उद्यानात अभ्यासिका दाखवत कंत्राटदाराने भ्रष्टाचार केल्याचा आरोप. प्रत्यक्षात अभ्यासिकेच्या ऐवजी माकडांचा पिंजरा असल्याचा ठाकरे गटाचा दावा. ठाकरे गटाच्या वतीने प्रत्येकात्मक अभ्यासिकेचा सांगाडा आणत निदर्शने. महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठाकरे गटाची निदर्शने
माळशिरस तालुक्यातील संगम या गावी उजनीचा कालवा फुटला असून लाखो लिटर पाणी पाणी वाया गेलं आहे. जवळ असणाऱ्या उसाच्या फडात पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्यांच्या उसाच्या पिकाचे नुकसान झालं आहे.
कचोरी ताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार वाटतं. दिवा पण फडफडून विझणार वाटतं, असं ट्विट करत शीतल म्हात्रे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवरायांचा पुतळा सैनिकांना सदैव प्रेरित करणार, वीर सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान, देशासाठीचं त्यांचं वीरमरण विसरून चालणार नाही. आजचा दिवस एतिहासिक असून सर्वांना शुभेच्छा
भडक वक्तव्य करण्याची भुजबळ यांची जुनी सवय, ओबीसींच्या आरक्षणाला तीळमात्र धक्का लागणार नाही. मुंख्यमंत्र्यांसोबत आरक्षणासंदर्भात चर्चा करणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न योग्य प्रकारे हाताळल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण द्या ही जी मागणी केलेली आहे. त्याला आमच्या सरसकट विरोध आहे आणि म्हणूनच आम्ही आज साडेदहा वाजता छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर जात आहोत त्या ठिकाणी आमची बैठक आहे. या बैठकीनंतर आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात जर रस्त्यावर उतरावे लागेल तर आम्ही रस्त्यावरही उतरू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे.
कोणाचंही आरक्षण काढून कोणालाही आरक्षण देणार नाही. भुजबळ यांनी जाती-जातींमध्ये संभ्रम करू नये. भुजबळ यांनी काल केलेलं वक्तव्य चुकीचं, कुणबी प्रमाणपत्राबाबत नियमावली ठरवली असून उद्या आमची भूमिका शिंदेसमोर मांडणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
मनसे नेते अमित ठाकरे यांचा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. अमित ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पुणे लोकसभेसाठी मनसेने तयारी सुरु केली आहे. अमित ठाकरे आज आणि उद्या पुण्यात प्रभाग निहाय आढावा बैठक घेणार आहेत. अमित ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी देखील बैठका घेणार आहेत. पुणे लोकसभेची जबाबदारी मनसेकडून अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आज आणि उद्या पक्ष कार्यालयात बैठका घेणार आहेत. थोड्याच वेळात अमित ठाकरे पक्ष कार्यालयात दाखल होणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सुसाट असल्याचं दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणुकीत महायुतीला २२८ पैकी १५३ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपसोबत अजित पवार गट गेल्यामुळे पुणे जिल्ह्यात युतीची ताकद वाढली आहे. या निकालाचे महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणाम होणार आहे.
सरकारचं शिष्टमंडळ भेटीला येणार आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची वाट पाहू. शांततेत आंदोलन सुरु असताना उसवण्याच्या प्रयत्न झाला, असं मनोज जरांगे म्हणालेत.
पंजाब आणि हरियाणा राज्यात पराली जाळण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 48 तासांमध्ये 2 हजार पेक्षा जास्त ठिकाणी पराली जाळण्याचं समोर आलं आहे. परिणामी राजधानी दिल्लीत प्रदूषण वाढलं आहे. त्यामुळे 13 तारखेपासून सम विषम नंबरच्या गाड्यांना रस्त्यावर परवानगी देण्यात आली आहे. तर दहावीपर्यंतच्या शाळांना दहा तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांच्या पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांना सिरियामधून सूचना मिळत असल्याची माहिची देखील समोर येत आहे.
ललित पाटीलच्या भावाने नाशिक मधील कंपनीत आता पर्यंत २०० किलो मॅफेड्रोन उत्पादित केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ललित पाटीलकडून कच्च्या मालाची शिवाजी शिंदे याला व्हॉट्सऍपवर ऑर्डर दिली होती. शिवाजी शिंदे या आरोपीने पोलीस तपासात माहिती मोठी माहिती दिली आहे. आज ललित पाटीलला कोर्टात हजर केलं जाणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात सर्व पक्षीय ओबीसी नेते छगन भूजबळ यांच्या शासकीय बंगल्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज १०.३० वाजता सर्व ओबीसी नेत्यांची छगन भूजबळ यांच्या बंगल्यावर बैठक आहे. जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबत होणार चर्चा…
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्याने स्वतःला संपवलं आहे. प्रशासनाच्या जाचाला कंटाळून कर्मचऱ्याने टोकाचं पाऊल उचल्याचे आरोप होत आहेत.
अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. आज आणि उद्या घेणार पुण्यात आढावा. प्रभागनिहाय आढावा घेवून लोकसभेसाठी करणार तयारी. अमित ठाकरेंवर आहे पुणे लोकसभेची जबाबदारी. आज-उद्या बैठकीचं सत्र. मनसेने लोकसभा निवडणुकीची तयारी केली सुरु. महापालिका निवडणुकीसाठीही करणार चाचपणी.
जायकवाडी पाणी प्रश्नावर आज उच्च न्यायालयात सुनावणी. गेल्या आठवड्यात सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने दिला होता नकार. जायकवाडी धरणात नाशिक आणि नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यास विरोध. जायकवाडी धरणातील मृत पाणीसाठा वापरण्याची याचिकेत मागणी.
1 ऑक्टोबर 2023 पासून नियम लागू पण अंमलबजावणी नाही. सरकारकडून नवीन नियम 1 डिसेंबर 2023 पासून संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय. अंमलबजावणी करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना 2 महिन्यांचा अतिरिक्त वेळ. नवीन नियमांच्या अंमलबजावणीनंतर एका आयडीवर मर्यादित सिम खरेदी करता येणार. अतिरिक्त सीम खरेदीवर कडक कारवाई होणार.
बहुचर्चित एक कोटींच्या लाचप्रकरणातील आरोपी सहायक अभियंता अमित गायकवाड याला जामीन मंजूर. अडीच कोटींच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी एक कोटींची लाच घेताना गायकवाड याला शुक्रवारी अटक करण्यात आली होती, तर या प्रकरणातील तत्कालीन उप अभियंता गणेश वाघ अद्याप फरार.
राज्यतील कारागृहातील कैद्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहातील कैद्यांच्या दर महाखर्चात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. कैद्यांना १ नोव्हेंबरपासून ८ हजार रुपये मिळणार आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कांबळेची आज पोलीस कोठडी संपणार आहे. तिला आज न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे. प्रज्ञा कांबळे हिच्या वकिलांनी ही मानसिक रुग्ण असल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला आहे.
श्री राम मंदिर अयोध्येतील पूजलेल्या अक्षतचा मुंबईत राम भक्तांनी जल्लोषात स्वागत केले. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्री राम मंदिर अयोध्येतून पुजलेले अक्षत देशातील प्रत्येक प्रांतात घेऊन येत आहेत. आता ते मुंबईत आले आहेत.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित करण्यात येणार आहे. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आम्ही पुणेकर या संस्थेतर्फे हा पुतळा बसवण्यात येणार आहे.
छत्तीसगड विधानसभेसाठी राज्यात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. बस्तर राजनांदगावसह वीस जागांसाठी मतदान होणार आहे. हा परिसर नक्षलग्रस्त असल्यामुळे मतदानासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.