Maharashtra Marathi News Live Updates | नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात महाराष्ट्र सदनात बैठक, नक्की कारण काय?

| Updated on: Aug 09, 2023 | 7:10 AM

Maharashtra Breaking News Live Updates : राज्य आणि देशातील विविध सामाजिक, राजकीय घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Marathi News Live Updates | नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात महाराष्ट्र सदनात बैठक, नक्की कारण काय?
marathi breaking news

मुंबई | 8 ऑगस्ट 2023 : भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महाराष्ट्रातील खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्लस्टर बैठका घेत आहेत. आज महाराष्ट्र आणि गोव्यातील 48 खासदारांची एकत्रित बैठक होणार आहे. सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मंत्री नितीन गडकरी, मंत्री राजनाथ सिंह बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 चा नारा दिला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Aug 2023 09:26 PM (IST)

    सर्प दंश झालेल्या रुग्णावर ग्रामीण रुग्णालयातच अघोरी प्रयोग

    पालघर :  सर्प दंश झालेल्या रुग्णावर ग्रामीण रुग्णालयातच एका इसमाकडून अघोरी उपचार करत असल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधित घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओतून आजही आदिवासी समाजाचा अशिक्षित पणाचा फायदा घेऊन अंधश्रद्धा पसरवली जात असल्याचे उदाहरण समोर आलं आहे.

  • 08 Aug 2023 09:15 PM (IST)

    Maharashtra Sadan Nda Mp Meeting | दिल्लीतील महाराष्ट्र सदनात थोड्यात वेळात NDA ची बैठक

    नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदनात एनडीए खासदारांच्या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, भारती पाटील, कपिल पाटील आणि भागवतराव कराड बैठकीसाठी हजर आहेत. तर अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे उपस्थित आहेत.

  • 08 Aug 2023 07:26 PM (IST)

    Mumbai Water Cut | मुंबईकरांसाठी खूशखबर, 9 ऑगस्टपासून पाणीकपात रद्द

    मुंबई | मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत 10 जुलैपासून 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. आता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसीने 9 ऑगस्टपासून 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय रद्द करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 08 Aug 2023 07:23 PM (IST)

    Pune News | पुणे दहशतवादी प्रकरण एटीएसकडे वर्ग

    पुणे :  अखेर पुणे दहशतवादी प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आलं आहे. याआधी महाराष्ट्र एटीएसकडून संबंधित प्रकरणात तपास सुरु होता. दहशतवादी प्रकरणात आतापर्यंत 5 जण अटकेत आहेत. त्यानंतर संबंधित प्रकरण आज एटीएसकडून एनआ एकडे वर्ग करण्यात आलं आहे.

  • 08 Aug 2023 05:54 PM (IST)

    Maharashtra Mla Disqualification Rahul Narvekar | आमदारांच्या अपात्रतेवर पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार

    मुंबई | राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आमदार अपात्रेसंदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांपासून सुनावणी सुरु होणार आहे. दररोज एक सुनावणी होणार आहे.

  • 08 Aug 2023 05:14 PM (IST)

    Eci Bypoll For 7 Seats | निवडणूक आयोगाकडून 7 जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

    नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने एकूण 6 राज्यांमधील पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील या 6 राज्यातील एकूण 7 विधानसभा पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहेत. या 7 विधानसभा मतदारसंघात 5 सप्टेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

    5 सप्टेंबर रोजी 7 विधानसभांसाठी पोटनिवडणूक

  • 08 Aug 2023 04:47 PM (IST)

    सांगलीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

    स्पा सेंटरच्या नावाखाली सांगलीत वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कारवाई करत पर्दाफाश केला. स्पा सेंटर चालविणारा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

  • 08 Aug 2023 04:26 PM (IST)

    ट्रेन थांबली नसती तर आणखी लोकांना घातल्या असत्या गोळ्या

    ट्रेन थांबली नसती तर आणखी लोकांना गोळ्या घातल्या असता, असा मोठा खुलासा आरोप चेतन सिंग याने चौकशी दरम्यान केला. जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये त्याने गोळीबार केला होता. रेल्वे पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सुमारे 8 तास आरोपींच्या चौकशीदरम्यान चेतन सिंहने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, पाकिस्तानात जाऊन तेथील लोकांना मारण्याची आपली शेवटची इच्छा होती.चेतन सिंगची ही सर्व विधाने स्वत:ला मानसिक रुग्ण सिद्ध करण्यासाठी आणि वाचण्यासाठी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • 08 Aug 2023 04:04 PM (IST)

    लोकसभेत ठाकरे गट आणि शिंदे गटात खडाजंगी

    लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी पाहायला मिळाली. आज लोकसभेत ठाकरे गट आणि शिंदे गटातही जोरदार शाब्दिक चकमक झडली. यावेळी मंत्री नारायण राणे हे शिंदे गटाच्या मदतीला धावले. ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

  • 08 Aug 2023 03:51 PM (IST)

    दापोली येथील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाचे आदेश

    तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी राज्य महिला आयोगाने 3 तारखेला पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना तपास करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आज पोलीस अधिक्षकांकडून आयोग कार्यालयास अहवाल प्राप्त झाला.

  • 08 Aug 2023 03:50 PM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून तुपकर यांच्यावर निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन

    पक्षांतर्गत वादावर निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाच जणांची समिती स्थापन. 15 ऑगस्टपर्यंत समितीकडे मांडण्याचे रवी तुपकर समितीचे आदेश. समिती घेणार पक्षातील अंतर्गत वादावर निर्णय.

  • 08 Aug 2023 03:35 PM (IST)

    राहुल गांधी यांना तुघलक लेन निवासस्थान मिळणार

    तुघलक लेन निवासस्थान देण्याचा लोकसभा सचिवालयाचा निर्णय

  • 08 Aug 2023 03:14 PM (IST)

    औरंगाबाद शहरात ज्वेलर्स दुकानावर दरोडा

    बजाज नगर परिसरात असलेल्या मंगलमूर्ती ज्वेलर्समध्ये दुकान चालकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत दरोडा टाकला. दरोड्यात लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. ज्वेलर्सवरील दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर. ज्वेलर्सवरील धाडसी दरोडामुळे औरंगाबादच्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.

  • 08 Aug 2023 02:45 PM (IST)

    खुर्चीसाठी ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी केली

    ठाकरेंनी खुर्चीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत आघाडी केली . ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम केलं, श्रीकांत शिंदे यांची घणाघाती टीका.

  • 08 Aug 2023 02:40 PM (IST)

    काँग्रेसच्या काळात अनेक ठिकाणी बाँबस्फोट झाले, तेव्हा गप्प का होतात ?

    काँग्रेसच्या सत्ताकाळात मुंबई, मालेगाव, पुणे, हैद्राबादमध्ये बॉम्बस्फोट झाले, तेव्हा गप्प का होतात ? श्रीकांत शिंदे यांचा खडा सवाल.

  • 08 Aug 2023 02:36 PM (IST)

    काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची यादी A to Z वाचली तरी कमी पडेल.

    श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या भ्रष्टाचाराची यादी A to Z वाचली तरी कमी पडेल, अशी टीकाही त्यांनी केली.

  • 08 Aug 2023 02:32 PM (IST)

    इंडिया विरोधकांची नाही तर विनाशाची आघाडी आहे – श्रीकांत शिंदे

    इंडिया विरोधकांची नाही तर विनाशाची आघाडी आहे , अशी टीकाही श्रीकांत शिंदे यांनी केली.

  • 08 Aug 2023 02:31 PM (IST)

    युपीएची लाज वाटत होती म्हणून इंडिया आघाडी नाव ठेवलं – श्रीकांत शिंदेची टीका

    युपीए नावाची लाज वाटत होती,म्हणून विरोधकांनी इंडिया आघाडी असं नाव ठेवलं. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला, श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

  • 08 Aug 2023 02:26 PM (IST)

    शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण

    शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मोदी सरकारने कोणतीही आश्वासने पूर्ण केलेली नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. वंदे भारत ट्रेनला योग्य स्टेशन्स दिली नाहीत, ट्रेन आता दौंड येथे थांबत नाही.

  • 08 Aug 2023 02:16 PM (IST)

    मोदी सरकारने आश्वासनं पूर्ण केली नाहीत – सुप्रिया सुळे

    भाजपाने ९ वर्षांत ९ राज्यांतील सरकारं पाडली. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. वाढत्या महागाईवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

  • 08 Aug 2023 01:55 PM (IST)

    बच्चू कडू यांच्या अडचणी वाढणार?

    मंत्रालय मारहाण प्रकरणी बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ

    सत्र न्यायालयात साक्षीदार तपासणीला सुरुवात

  • 08 Aug 2023 01:47 PM (IST)

    चिकाकर्त्या तथा अंनिसच्या राज्य सचिव अॅड. रंजना गवांदे यांची माहिती

    इंदुरीकर महाराजांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

    गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली

  • 08 Aug 2023 01:45 PM (IST)

    राहुल गांधींवर भाजपचं टीकास्त्र

    मला वाटलं राहुल गांधी बोलतील पण ते उशिरा उठले असतील

    हरकत नाही गौरव गोगाई यांनी चांगले मुद्दे मांडले

    निशिकांत दुबे यांचा हल्लाबोल

  • 08 Aug 2023 01:30 PM (IST)

    भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; पाहा संसदेत काय चाललंय…

    सोनिया गांधी यांना मुलाला सेट करायचंय

    भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचं वक्तव्य

  • 08 Aug 2023 01:18 PM (IST)

    अविश्वास ठरावावर संसदेच्या अधिवेशनात चर्चा

    अविश्वास ठरावावर संसदेच्या अधिवेशनात चर्चा

    निशिकांत दुबे उभे राहताच गदारोळ

  • 08 Aug 2023 12:53 PM (IST)

    निशिकांत दुबे उभे राहताच गदारोळ

    सरकारकडून 20 खासदार भाषण करणार. लोकसभेत 12 तास चर्चा होणार. लोकसभेत भाजपकडे बहुमत. निशिकांत दुबेंच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ. निशिकांत दुबे उभे राहताच गदारोळ.

  • 08 Aug 2023 12:48 PM (IST)

    मतं मिळविण्यासाठी भाजप द्वेषाचं हत्यार वापरतंय

    2022 मध्ये जेव्हा गुजरात मध्ये दंगल झाली होती तेव्हा वाजपेयी गुजरातमध्ये गेले होते. दंगलीवेळी जर वाजपेयी तिकडे जाऊ शकतात तर पंतप्रधान मोदी मणिपूर मध्ये का गेले नाहीत? वाजपेयी दंगलीवेळी गुजरात दौरा करू शकतात मग मोदी मणिपूर दौरा का करू शकत नाहीत? मतं मिळविण्यासाठी भाजप द्वेषाचं हत्यार वापरत आहे- गौरव गोगोई

  • 08 Aug 2023 12:41 PM (IST)

    मोदींची शी जिनपिंग सोबतची चर्चा गुप्त का ठेवण्यात आली?

    कोरोना काळात मोदीजी मतं मागत होते. मोदींची शी जिनपिंग सोबतची चर्चा गुप्त का ठेवण्यात आली? चर्चा गुप्त ठेवली गेलीये. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आता कुठे आहेत?

  • 08 Aug 2023 12:33 PM (IST)

    मणिपूरमध्ये इंटरनेट नसल्याने बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या नाहीत

    मणिपूरातील महिलांच्या अत्याचाराचा व्हिडीओ बघून दुःख झालं. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर मोदींचा विशेष आशीर्वाद का? ड्रग्स तस्करी करणारा नेता भाजपशी संबंधित. मणिपूरमध्ये इंटरनेट नसल्याने बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या नाहीत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आता कुठे आहेत? – गौरव गोगोई

  • 08 Aug 2023 12:26 PM (IST)

    मणिपूरातील डबल इंजिन सरकार अपयशी ठरल्याचं पंतप्रधान मोदींनी मान्य करावं

    मणिपूरातील परिस्थिती बघून दुःख झाले. एका भारताची गोष्ट करणाऱ्या सरकारने दोन मणिपूर बनवले. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवलं गेलं नाही? मणिपूरातील डबल इंजिन सरकार अपयशी ठरल्याचं पंतप्रधान मोदींनी मान्य करावं. मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयामुळे मणिपूर मध्ये तणाव! – गौरव गोगोई

  • 08 Aug 2023 12:22 PM (IST)

    मोदींनी जगभरात दौरे केले तर मणिपूर दौरा का नाही?

    मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी गप्प का? पंतप्रधान गप्प असल्यानेच अविश्वास ठराव आणला गेलाय. पंतप्रधान मोदी मणिपूरला का गेले नाहीत? मोदींनी जगभरात दौरे केले तर मणिपूर दौरा का नाही? पंतप्रधानांनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का हटवलं नाही? – गौरव गोगोई

  • 08 Aug 2023 12:20 PM (IST)

    संसदेत अविश्वास ठराव: भाजप अध्यक्षांची यादी

    अमित शहा, निर्मला सीतारामन, किरण रिजिजू, ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी, लॉकेट चॅटर्जी, बंदी संजय कुमार, रामकृपाल यादव, राजदीप रॉय, विजय बघेल, रमेश बिधूडी, सुनीता दुग्गल, हीना गावित, निशिकांत दुबे, राज्यवर्धन राठोड.

  • 08 Aug 2023 12:10 PM (IST)

    संसदेतील अविश्वास ठराव : काँग्रेस अध्यक्षांची यादी

    अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसकडून राहुल गांधी, गौरव गोगोई, मनीष तिवारी, दीपक बैज, अधीर रंजन चौधरी, बेनी बेहनन, हिबी इडन, टी. एन. प्रतापन, डीन कुरियाकोस उपस्थित

  • 08 Aug 2023 12:08 PM (IST)

    अविश्वास ठरावावरील चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी काय म्हणाले

    हा अविश्वास प्रस्ताव आमच्या विरोधात नसून विरोधकांमधील अविश्वासासाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाजप संसदीय बैठकीत सांगितले. ज्याप्रमाणे शेवटच्या चेंडूवर षटकार मारला जातो, त्याचप्रमाणे विरोधकांविरुद्धची ही संधी समजा, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 08 Aug 2023 12:01 PM (IST)

    राहुल गांधी थोड्याच वेळात संसदेत बोलणार

    सोनिया गांधी आणि राहुल गांधी संसदेत दाखल झाले असून 12 वाजता कामकाज सुरू होणार आहे. सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर संसदेत चर्चा होणार आहे.

  • 08 Aug 2023 11:50 AM (IST)

    नवी दिल्ली | 9 ऑगस्टपासून भाजपची नवी रणनीती

    9 ऑगस्टपासून भाजपची नवी रणनीती सुरू होणार आहे.  संपूर्ण देशभरात करप्शन क्विट इंडिया, परिवारवाद क्विट इंडिया अभियान राबवले जाणार आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक गावातून अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारत देश बनवायचा आहे , प्रत्येक घरात संपर्क करायचा आहे, असं वक्तव्य मोदी यांनी केलं. प्रत्येक गावात 75 वृक्षांचं रोपण केलं जाणार. तर हाच कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात राबवला जाणार आहे.

  • 08 Aug 2023 11:40 AM (IST)

    कोकण रेल्वेच्या 12 स्थानकांच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन

    रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेची 12 रेल्वेस्थानकं आणि परिसराचं सुशोभीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाइन करण्यात आलं.

  • 08 Aug 2023 11:30 AM (IST)

    भाजपच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं वक्तव्य

    भाजपच्या संसदीय समितीची बैठक संपली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. विश्वासदर्शक ठराव म्हणजे विरोधी पक्षांनी एकमेकांवरचा विश्वास किती मजबूत आहे हे तपासण्यासाठी त्यांनी हा ठराव दाखल केला आहे, असं ते म्हणाले. काल राज्यसभेत विधेयकाबाबत जे मतदान झालं ते 2024 च्या पूर्वीचे सेमी फायनल आहे असं काहींनी म्हटलं होतं. मात्र आम्ही जिंकल्यामुळे आम्हाला सहकार्य केलेल्या खासदारांना मी धन्यवाद देतो, असंही मोदी म्हणाले.

  • 08 Aug 2023 11:20 AM (IST)

    किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला भ्रष्टाचाराचा मोठा आरोप

    भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या पुन्हा एकदा मैदानात परतले आहेत. आता किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे, वाचा सविस्तर..

  • 08 Aug 2023 11:10 AM (IST)

    नवी दिल्ली | काँग्रेसचे दोन नेते दिल्लीत दाखल

    काँग्रेसने दोन नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 08 Aug 2023 10:55 AM (IST)

    कोयता घेऊन दहशत, दोघांना केली अटक

    दौंड शहरामध्ये हातात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांविरोधावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राकेश जगताप आणि सचिन नलावडे यांना पोलिसांनी अटक केलीय.

  • 08 Aug 2023 10:43 AM (IST)

    शरद पवार यांची पुणे शहरात सभा

    शरद पवार यांची पुणे शहरात जाहीर सभा होणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही सभा होणार असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. यासंदर्भातील तारीख लवकरच निश्चित होणार असल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.

  • 08 Aug 2023 10:26 AM (IST)

    मुलुंड कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा – सोमय्या

    कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मुलुंड येथील कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस, आयकर विभाग, ईडी कार्यालय यांना तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

  • 08 Aug 2023 10:15 AM (IST)

    पश्चिम रेल्वे मार्गावर बिघाड, रेल्वे उशिराने

    चर्चगेट स्थानकाजवळ पॉईंट बिघाडामुळे पश्चिम एक्सप्रेस रेल्वे उशिराने धावत होत्या. हा बिघाड सकाळी ९.२२ वाजता दुरुस्त करण्यात आला आहे. त्यानंतर गाड्या वेळेवर सुरू झाल्या आहेत

  • 08 Aug 2023 10:04 AM (IST)

    एडलवाईज कंपनीच्या एमडींची चौकशी

    कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणामध्ये एडलवाईज कंपनीच्या एमडींना सर्व कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

  • 08 Aug 2023 10:00 AM (IST)

    धमकीचा कॉल करणाऱ्यास अटक

    मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला धमकीचे कॉल करणाऱ्या व्यक्तीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश खेमानी असे धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश खेमानी यांची मानसिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगण्यात आले.

  • 08 Aug 2023 09:56 AM (IST)

    आता राज्यपालांचं अस्तित्त्व कुठे?- संजय राऊत

    भाजप माणसं विकत घेत असतील आम्ही नाही. दंगली घडत असताना राज्यपाल कुठे, मविआंचं सरकार असताना आता राज्यपालांचं अस्तित्त्व कुठे? असा सवाल करत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

  • 08 Aug 2023 09:38 AM (IST)

    मी कुठेही जाणार नसून संघटनेत राहून शेतकऱ्यांसाठी लढणार- तुपकर

    आमचं दुखणं काय ते राजू शेट्टींसमोर मांडलं, मी कुठेही जाणार नसून संघटनेत राहून शेतकऱ्यांसाठी लढत राहणार असल्याचं रविकांत तुपकर यांनी सांगितलं. बुलढाण्यामध्ये ते बोलत होते.

  • 08 Aug 2023 09:19 AM (IST)

    राहुल गांधी आज 12 वाजता लोकसभेमध्ये बोलणार

    खासदारकी परत मिळाल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी आज 12 वाजता लोकसभेमध्ये बोलणार आहेत. यावेळी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी मोदी सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

  • 08 Aug 2023 09:06 AM (IST)

    संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा

    संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळासोबत मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समजत आहे. त्यामुळे संप सकाळी 11 वाजता मागे घेतला जाणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहे.

  • 08 Aug 2023 08:53 AM (IST)

    दिल्लीत शरद पवारांनी घेतली पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, दिला महत्त्वाचा सल्ला

    दिल्लीत शरद पवारांनी घेतली पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, मी कधीच कॉम्प्रोमाईज करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जाऊ द्या असा सल्ला पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. मनात कसलाही संभ्रम न ठेवता काम करा.

  • 08 Aug 2023 08:43 AM (IST)

    मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, संपूर्ण सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली

    मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

  • 08 Aug 2023 08:41 AM (IST)

    बेस्टचे कंत्राटी कामगार संप मागे घेण्याची शक्यता

    आज अकरा वाजता बेस्टचे कंत्राटी कामगार संप मागे घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे बेमुदत संप मागे घेण्यात येणार आहे. बेस्टच्या शिष्ठमंडळानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

  • 08 Aug 2023 08:36 AM (IST)

    एडलवाईज कंपनीची रायगड पोलिस चौकशी करणार

    एडलवाईज कंपनीची रायगड पोलिस चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे पोलिसांनी आदेश दिले आहेत.

  • 08 Aug 2023 08:33 AM (IST)

    पुण्यातील महिलांनी लंडनमध्ये साजरा केला साडी वॉकथॉन

    पुण्यातील महिलांनी लंडनमध्ये साडी वॉकथॉन केला आहे. २८ राज्यातील ५०० महिलांचा सहभाग होता. नॅशनल हंडलम डे निमित्त लंडन येथे पुण्यासह भारत देशातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.

  • 08 Aug 2023 08:20 AM (IST)

    Nitin Desai death case | नितीन देसाई मृत्यू प्रकरण, आज हायकोर्टात तातडीची सुनावणी?

    Nitin Desai death case | नितीन देसाई यांच्यावर 252 कोटी रुपयांच कर्ज होते. 2016 आणि 2018 मध्ये त्यांनी एडलवाईज कंपनीकडून हे कर्ज घेतलं होतं. वाचा सविस्तर….

  • 08 Aug 2023 08:12 AM (IST)

    विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे जिल्हा परिषद प्रशासन झुकले

    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या समस्यांबाबत 2 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करणाऱ्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासनावर टीकेची झोड उठली आणि जिल्हा परिषदचे सीईओ भाग्यश्री विसपुते यांनी गुन्हे मागे घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.

  • 08 Aug 2023 07:39 AM (IST)

    रविकांत तुपकर यांच्याबाबत आज काय निर्णय होणार?

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शिस्तपालन आणि कोअर कमिटीची पुण्यात आज बैठक होणार आहे. बैठकीत रविकांत तुपकर यांच्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र रविकांत तुपकर बैठकीला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज पुण्यात कोअर कमिटीची बैठक पार पडणार आहे.

  • 08 Aug 2023 07:36 AM (IST)

    आम्ही स्वत:ला विरोधी पक्ष मानत नाही. – आदित्य ठाकरे

    “आम्ही स्वत:ला विरोधी पक्ष मानत नाही. पुढच सरकार आमचच आहे, असा आम्ही विचार करतो. लोकसभा निवडणुकीत इंडियाचा मोठा विजय होईल. संपूर्ण देश राहुल गांधी यांचं स्वागत करतोय” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

  • 08 Aug 2023 07:31 AM (IST)

    महाराष्ट्रातील खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आज बैठक

    भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महाराष्ट्रातील खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी क्लस्टर बैठका घेत आहेत.

Published On - Aug 08,2023 7:30 AM

Follow us
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.