Maharashtra Mumbai Marathi News Live | ठाण्यात अचानक पावसाचं आगमन, नागरिकांची तारांबळ

| Updated on: Nov 10, 2023 | 7:01 AM

Maratha Reservation Protest live news in Marathi : आज गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.

Maharashtra Mumbai Marathi News Live | ठाण्यात अचानक पावसाचं आगमन, नागरिकांची तारांबळ

मुंबई | 9 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वादावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. या संदर्भातील पहिली सुनावणी झाली होती. त्यानंतर आता गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे. दिवाळी निमित्ताने सरकारकडून दिला जाणारा आनंदाचा शिधा पिशव्या नसल्यामुळे मेळघाटमधील रेशन दुकानात पोहचलाच नाही. राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. त्यावेळी तारखेचा घोळ दूर होणार आहे. कल्याण लोकसभेसाठी मुख्यमंत्रीचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक झाले आहे. शेकडो युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्य, देश, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Nov 2023 09:26 PM (IST)

    ठाण्यात परतीच्या पाऊसाला सुरुवात

    ठाणे : ठाण्यात परतीच्या पाऊसाला सुरुवात झालीय. पावसाने ठाणेकरांना चांगलेच झोडपले आहे. ऐन दिवाळीसणा निमित्त खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या ग्राहकांची पावसामुळे तारांबळ उडाली. पण उकाड्याने हैराण झालेल्या ठाणेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे.  ठाण्यातील हवेत गारवा निर्माण झालाय. रस्ते ओलेचिंब झाले आहेत.

  • 09 Nov 2023 09:24 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस पुण्यात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरी पोहोचले

    पुणे | देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडेंच्या घरी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुलही उपस्थित होते. रामदास दाभाडे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दाभाडेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

  • 09 Nov 2023 07:36 PM (IST)

    मी या देशात जन्मलो ज्या देशात राम-सीता जन्मले – गीतकार जावेद अख्तर

    राज आमचे मित्र आहेत म्हणून या कार्यक्रमाला आलो आहे. लोक म्हणतील हा नास्तिक धार्मिक कार्यक्रमात आला. परंतू ते पुढे म्हणाले की, वो हिंदुस्थानी कैसा जो रामायण नही जानता. मी या देशात जन्मलो आहे. ज्या देशात राम जन्मले आहेत. राम आणि सीमा या हिंदुस्थानी संस्कृतीचा भाग आहेत असे गीतकार जावेद अख्तर यांनी मनसेच्या दीपोत्सवात सहभागी होताना सांगितले.

  • 09 Nov 2023 07:27 PM (IST)

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सवाचे उद्धघाटन

    मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास गीतकार लेखक सलीम-जावेद जोडी, अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.

  • 09 Nov 2023 06:50 PM (IST)

    युपी ATS ला मोठे यश, दोन रोहिंग्यांना अटक

    यूपी एटीएसला मोठे यश मिळाले आहे. दोन रोहिंग्यांना अटक करण्यात आली. भारतात प्रवेश केल्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. एटीएसने बंगळुरू येथून मुख्य नेता इब्राहिम खानसह 2 जणांना अटक केली.

  • 09 Nov 2023 06:35 PM (IST)

    संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार

    संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून ते 22 डिसेंबरपर्यंत चालणार असून 19 दिवसांत 15 बैठका होणार आहेत.

  • 09 Nov 2023 06:20 PM (IST)

    ‘ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव नाही’

    ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही व्यक्तीचं नाव सापडलेलं नाही, असं अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणात अजूनही तपास करत आहेत. या प्रकरणात 10 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर 14 आरोपी अटकेत आहेत

  • 09 Nov 2023 06:09 PM (IST)

    पाकिस्तानकडून गोळीबार, द्विपक्षीय करारांचे उल्लंघन – MEA

    पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, युद्धविरामाचे उल्लंघन आणि ड्रोनद्वारे सीमेपलीकडून घुसखोरी करणे किंवा गोळीबार करणे हे आमच्या द्विपक्षीय करारांचे उल्लंघन आहे. हा मुद्दा आम्ही नेहमीच पाकिस्तानसमोर ठेवतो.

  • 09 Nov 2023 05:58 PM (IST)

    हा तर गुन्हा-जितेंद्र आव्हाड

    राष्ट्रवादी नेमकी कुणाची याविषयीची सुनावणी निवडणूक आयोगात झाली. मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. शपथ पत्र जर खोटं असेल तर हा गुन्हा आहे. त्यामुळे यासंदर्भात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. कोर्टाची अशा प्रकारे दिशाभूल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • 09 Nov 2023 05:47 PM (IST)

    उपमुख्यमंत्र्यांना काँग्रेसने दाखवले काळे झेंडे

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना युवक काँग्रेसने काळे झेंडे दाखवले आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हे काळे झेंडे दाखवल्याचे समजते. मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी स्पष्ट केले.

  • 09 Nov 2023 05:28 PM (IST)

    मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध-देवेंद्र फडणवीस

    मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे की मराठा आरक्षण देण्याची कमिटमेंट आहे. याविषयीची कार्यवाही सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे राज्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू नये ही सरकारचीच नाही तर समाज आणि राजकीय नेत्यांची पण ही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 09 Nov 2023 05:17 PM (IST)

    शपथपत्रांमधील अनेकांचा मृत्यू

    राष्ट्रवादी कोणाची याविषयीची सुनावणी निवडणूक आयोगात सुरु झाली आहे. अजित पवार गटाने 2 हजारांपेक्षा जास्त शपथपत्र सादर केली आहे, ती खोटी आहेत. त्यातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला तर काही जण दुसऱ्या पक्षात असल्याचा युक्तीवाद शरद पवार गटाने केला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू संघवी हे शरद पवार गटाची बाजू मांडत आहे.

  • 09 Nov 2023 05:10 PM (IST)

    सरकार समाजांना आपआपसात लढवत आहे- नाना पटोले

    हे नालायक आणि असंवेदनशील सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला. सौम्य लाठीचार्जचा आदेश दिल्याचे राज्याचे गृहमंत्री सांगतात, तर मुख्यमंत्री कुणबी प्रमाणपत्र देतो, असे सांगतात. ज्या गोष्टी तुमच्या अधिकारात नाही, त्या गोष्टी का केल्यात, असा सवाल पटोले यांनी केला. हे सरकार जाणून बुजून मूळ प्रश्न बाजूला सारुन मुद्दा बगल देत आहेत. अनेक समाजाला खोटे आश्वासन देवून सरकार आपआपसात लढवत आहेत, का? हा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे. ही सरकारची चालबाजी आता चालणार नाही, असे ते म्हणाले.

  • 09 Nov 2023 05:05 PM (IST)

    काँग्रेसचा महाआक्रोश मोर्चा

    राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, सर्व प्रकारच्या पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी, शासकीय धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करून धानाला 700 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा, कृषी पंपाना सलग 12 तास वीज देण्यात यावी, यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेवून भंडाऱ्यात काँग्रेसचा महाआक्रोश मोर्चा निघाला आहे. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित या मोर्चाचं नेतृत्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे करीत आहेत. भंडारा शहरातील शास्त्री चौकातील हुतात्मा स्मारक इथून निघला असून हा मोर्चा 2 किमी अंतर पार करून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला आहे.

  • 09 Nov 2023 04:56 PM (IST)

    पालिका आयुक्तांच्या केबिनवर महिलांचा कब्जा

    नवी मुंबई : पाणी द्या. पाणी द्या अशी मागणी करत नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांच्या कॅबिनवर सारसोले गावातील महिलांनी कब्जा केला. नवी मुंबईत स्वतःच्या मालकीचे धरण असूनही काही ठिकाणी पाणी वेळेवर येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी या महिला आक्रमक झाल्या आहेत. पाणी द्या पाणी द्या अशा घोषणा देत त्यांनी आयुक्तांच्या केबिनचा ताबा घेतला.

  • 09 Nov 2023 04:50 PM (IST)

    पाच जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर एकूण 20 गुन्हे दाखल

    सोलापूर : जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करणार आहे. ड्रग्स ओळखण्याचे तंत्र आणि लॅब्स लागतात त्यासाठी प्रयत्न करतोय. जिल्ह्यातील समिती ड्रग्सविरोधात काम करेल. यामध्ये ज्या बंद पडलेल्या फॅक्टरी आहेत त्याची तपासणी करण्याबाबत ही समिती काम करेल. अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली. पाच जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर एकूण 20 गुन्हे दाखल झालेत. तसेच कार्तिक वारीनिमित्त विशेष पोलीस यंत्रणा सज्ज आहेत असेही ते म्हणाले.

  • 09 Nov 2023 04:35 PM (IST)

    राष्ट्रवादी कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात

    नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरवात झाली आहे. यासुनावणी दरम्यान शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तर अजितदादा गटाचे सुनील तटकरे, रूपाली चाकणकर उपस्थित आहेत. शरद पवार गटाकडून बाजू मांडायला सुरुवात झाली आहे. अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडत आहेत.

  • 09 Nov 2023 04:25 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग किंवा विलनीकरणासंदर्भात महत्वाची बातमी

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात मंत्री उदय सामंत, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, एस टी महामंडळाचे एमडी शेखर चन्ने आणि सेवा शक्ती संघटनेचे शिष्टमंडळ यांच्यात सुरु असलेली बैठक संपली. या बैठकीमध्ये सातवा वेतन आयोग किंवा विलनीकरण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत ३० नोव्हेंबरच्या आत बैठक घेण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून सरसकट ६ हजार रुपये देण्यात येणार आहे.

  • 09 Nov 2023 04:17 PM (IST)

    मुंबईपेक्षा या दोन शहरांची हवेतील गुणवत्ता घातक

    मुंबई : हवेची गुणवत्ता खालावल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेस खडे बोल सुनावले आहेत. मात्र, प्रदूषणाच्या बाबतीत उल्हासनगरने मुंबईला मागे टाकले आहे. उल्हासनगरसह बदलापूर या दोन शहरांतील प्रदूषणात वाढ झाली आहे. उल्हासनगर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा २०० च्या वर असल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर आहे.

  • 09 Nov 2023 04:03 PM (IST)

    मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट

    मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. खडसे यांना जळगाव येथून तातडीने मुंबईला हलविण्यात आले होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे एकनाथ खडसे यांना दाखल करण्यात आले होते. आजारी असलेल्या एकनाथ खडसे यांची मत्री छगन भुजबळ यांनी बॉम्बे हॉस्पिटल येथे भेट घेतली.

  • 09 Nov 2023 03:56 PM (IST)

    दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये मोठी कपात

    दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आलीये. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार. सायंकाळी 6 नंतरच्या पुणे मेट्रोच्या सर्व फेऱ्या लक्ष्मीपूजना दिवशी राहणार बंद राहणार आहेत. 12 नोव्हेंबर रोजी एक दिवसासाठी मेट्रोच्या फेऱ्या करण्यात आल्या रद्द

  • 09 Nov 2023 03:41 PM (IST)

    थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी

    थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी दिल्लीमध्ये होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर होणार ही सुनावणी. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत. सुनील तटकरे,  रूपाली चाकणकर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

  • 09 Nov 2023 03:30 PM (IST)

    उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

    उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात पुणे विमानतळावर पोहोचणार आहेत. पुणे विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  मराठा आरक्षणच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

  • 09 Nov 2023 03:17 PM (IST)

    सुजात आंबेडकर याची मोठी टीका

    कंत्राटी भरती म्हणजे सरकार म्हणत आहे की, आम्हाला हे सरकार चालवता येत नाही, म्हणून आम्ही हे सरकार भाड्याने चालवायला देत आहोत. राज्यात १२ ते २० कुटुंबांनी राज्यातील पाण्यावर ताबा ठेवला. या जोरावर त्यांनी साखर कारखाना, शेती उद्योग यावर ताबा ठेवत पैसा खिशात घातला, असे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे.

  • 09 Nov 2023 03:03 PM (IST)

    नामदेवराव जाधव यांचे वादग्रस्त वक्तव्य

    नामदेवराव जाधव यांनी नुकताच वादग्रस्त विधान केले आहे. शरद पवार हे मराठा नेते नाहीत ते ओबीसी नेते आहेत, असे त्यांनी म्हटले. मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार आहेत. शरद पवारांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे

  • 09 Nov 2023 02:55 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात मराठा कुणबी दाखले अभिलेख तपासणीस सुरूवात

    सांगली : सांगली जिल्ह्यात मराठा कुणबी दाखले अभिलेख तपासणीस सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 10 लाख अभिलेखाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 2211 इतक्या कुणबीच्या नोंदी आढळल्या तर कुणबी नोंदी सापडलेल्याना दाखले देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

  • 09 Nov 2023 02:50 PM (IST)

    पेपर फुटी विरोधात कडक कायदा असावा – सुजात आंबेडकर

    नाशिक : वंचित बहुजन युवा आघाडीने एल्गार मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी सुजात आंबेडकर यांनी कंत्राटी भरती विरोधात आमचे आंदोलन असल्याचे म्हटले. कंत्राटी भरती याचा अर्थ हे सरकार तुम्ही भाड्यावर चालवायला दिले.स्पर्धा परीक्षा परत आणा, ही प्रामुख्याने मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे, याचा अर्थ तुम्ही गोरगरीब, वंचित नागरिकांकडून त्यांचा हक्क काढून घेत आहे. तर स्पर्धा परीक्षेसाठी राजस्थानच्या धर्तीवर वन टाईम रजिस्ट्रेशन सिस्टिम असावी आणि पेपर फुटी विरोधात कडक कायदा असावा,अशीही मागणी त्यांनी केली.

  • 09 Nov 2023 02:40 PM (IST)

    वंचित बहुजन युवा आघाडीचा एल्गार मोर्चा

    नाशिक : वंचित बहुजन युवा आघाडीने एल्गार मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकर करणार आहे.  कंत्राटी भरती रद्द करावी, खाजगीकरण बंद करावे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करावा या मागण्यासाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आलाय. नाशिकच्या शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली.

  • 09 Nov 2023 02:32 PM (IST)

    धुळ्यात 8 लाख 29 हजार कुणबी नोंदीच्या पुराव्यांची तपासणी

    धुळे :  धुळ्यात कुणबी मराठा नोंदी तपासणी कक्ष उभारण्यात आला आहे.  8 लाख 29 हजार पुराव्यांची तपासणी करण्यात आली आहे. विविध शासकीय कार्यालयांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. चार दिवसापासून तपासणी सुरू आहे, तपासणी अंती 31 हजार 453 नोंदी सापडल्या आहे. जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी ही तपासणी सुरू आहे. सातबारा उतारा,जन्म दाखला, यावर नोंदी मिळाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात नोंदी मिळत असल्याने ओबीसी संघटना आक्षेप घेणार असल्याचे म्हटले आहे.

  • 09 Nov 2023 02:20 PM (IST)

    जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, नागरिकांची मागणी

    सांगली : जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, उमदी भागात नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

  • 09 Nov 2023 02:15 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात बैठक सुरू

    मुंबईच्या एक्सप्रेस टावरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात बैठक सुरू आहे. या बैठकीत मंत्री उदय सामंत, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर उपस्थित आहेत. यासह एसटी महामंडळाचे एमडी शेखर चन्ने यांच्यासह सेवा शक्ती संघटनेचे शिष्टमंडळ बैठकीत उपस्थित आहेत

  • 09 Nov 2023 02:05 PM (IST)

    सत्यजित तांबेंच्या संघटनेसाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

    सत्यजित तांबेंच्या संघटनेसाठी काम करणाऱ्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.  सत्यजित तांबे यांच्यावर कॉंग्रेसने ही कारवाई केली आहे. पक्षात काम करत नसताना कॉंग्रेस पदाधिकारी त्यांच्या संघटनेचे कसे काम करतात ? असा सवाल करत एनएस यूआईच्या अध्यक्षांनी नोटीस पाठवली आहे. पुण्यातीलही काही जणांना नोटीस जाण्याची शक्यता आहे.

  • 09 Nov 2023 01:59 PM (IST)

    शरीर सुखाची मागणी करणाऱ्याला परप्रांतीय वॉचमनला मनसेने दिला चोप

    शरीर सुखाची मागणी करणाऱ्याला परप्रांतीय वॉचमनला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. खारघरमध्ये ही घटना घडली. सोसायटीच्या गेटजवळ व्यवसाय करणा-या गरीब महिलेकडे वॉचमनने शरीरसुखाची मागणी केली. यानंतर मनसेच्या पदाधिका-यांनी त्या वॉचमनला चोप देऊन खारघर पोलिसांच्या हवाली केले.

  • 09 Nov 2023 01:41 PM (IST)

    नवी दिल्ली : कोरोना काळात उद्धव ठाकरे आजारी होते, त्यांचाही आजार राजकीय होता का ? सुनील तटकरे यांचे टीकास्त्र

    संजय राऊत म्हणतात अजित दादांना राजकीय आजार आहे. मग कोरोना काळात उद्धव ठाकरे आजारी होते, त्यांचाही आजार राजकीय होता का ? असा सवाल विचारत सुनील तटकरे यांनी टीकास्त्र सोडले.

    यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. अलीकडच्या काळात संसद रत्न या माझा उल्लेख ‘ती व्यक्ती तो व्यक्ती’ असा करतात, ज्यावेळी नैराश्य येत त्यावेळी अस वक्तव्य करावं लागतं. आता मी रायगडचा खासदार आहे, मणिपूर बाबत संसदेत प्रस्ताव आल्यावर त्यांनी पुन्हा तो व्यक्ती असा उल्लेख केला होता, मी शूद्र आहे म्हणून असा उल्लेख त्यांनी केला का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • 09 Nov 2023 01:27 PM (IST)

    नाशिक – राजस्थानी पणत्यांमुळे मातीच्या पणत्यांची मागणी घटली

    दिवाळीनिमित्त दिवे प्रज्वलित करण्यासाठी लागणाऱ्या पणत्या , लक्ष्मी मूर्ती आता बाजारात येऊ लागल्या आहेत. मात्र बाजारपेठेमध्ये गेल्या काही वर्षापासून राजस्थानी पणत्या विक्रीस येत असल्याने मातीच्या पणत्यांची मागणी घटल्याचे चित्र दिसत आहे.

  • 09 Nov 2023 01:23 PM (IST)

    मंत्रीमंडळात सगळं आलबेल – नितेश राणे

    कोणत्याही पद्धतीचं गँगवॉर झालेलं नाही. मंत्रीमंडळात सगळं आलबेल आहे, उगाच आग लावण्याचं काम करू नये  असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं.

    पत्रकार परिषदेत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली.

  • 09 Nov 2023 01:05 PM (IST)

    ठाकुर्ली- डोंबिवलीदरम्यान एसी लोकलवर दगडफेक

    ठाकुर्ली- डोंबिवलीदरम्यान एसी लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे एसी लोकलची काच फुटून मोठं नुकसान झालं आहे. टिटवाळा-सीएसएमटी या लोकलवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.

  • 09 Nov 2023 12:59 PM (IST)

    Dj Baned | आंबेडकर जयंती प्रदूषण मुक्त असायला हवी, याचिकेत मुख्य मागणी

    मुंबई | पुण्यातील डीजे बंद करा यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत आंबेडकर जयंती प्रदूषण मुक्त असली पाहिजे, ही मुख्य मागणी आहे. ध्वनी प्रदूषण नसलं पाहिजे, अनेकांचे जीव यामुळे गेले आहेत त्यामुळे लेझर लाइट बंद झाली पाहिजे, असं ही या याचिकेत म्हटलंय. हा फक्त आंबेडकर जयंतीचा विषय नसुन हनुमान जयंती, शिवजयंती ,उरुस,यात्रा यामधील ध्वनी प्रदूषण बंद झाल पाहिजे, असंही या याचिकेत नमूद केलंय. सुनील माने आणि अजय भोसले यांच्या वतीने असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

  • 09 Nov 2023 12:43 PM (IST)

    Shambhuraje Desai Live | संजय राऊत यांचा गँगवॉर शब्द हास्यास्पद, शंभूराज देसाई यांची टीका

    मुंबई | मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊतांचा गँगवॉर शब्द हास्यास्पद असल्याचं शंभूराज म्हणाले. तसेच इतरांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही,अशी प्रतिक्रियाही शंभुराज यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दिली.

  • 09 Nov 2023 12:20 PM (IST)

    Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांच्यावर समाजासमाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप

    नाशिक | मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात स्वराज संघटना आक्रमक झाली आहे. भुजबळ समाजासमाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप स्वराज संघटनेकडून करण्यात आला आहे. तसेच भुजबळां विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणीही स्वराज संघटनेने केली आहे. स्वराज संघटनेने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे.

  • 09 Nov 2023 12:07 PM (IST)

    Sharad Pawar | निवडणूक आयोगात आज सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

    नवी दिल्ली | नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता सुनावणी होणार आहे. शरद पवार याआधीही पहिल्या दिवशी झालेल्या सुनावणीवेळी उपस्थित राहिले होते.

  • 09 Nov 2023 11:52 AM (IST)

    पाकीटं नेमकी कसली दिली गेली? – सुषमा अंधारे

    देवेंद्र फडणवीस गृहखातं संभाळण्यासाठी अपयशी. तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृह खातं माझ्याकडे द्या. सुषमा अंधारे यांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप. राज्याचे गृहमंत्री फक्त पक्ष फोडण्यात मग्न. गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी, तुम्ही नापास झालात. गृह खात्याकडे फडणवीसांच दुर्लक्ष. गृहखात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. तुमच्या अब्रूची लक्तरं पुन्हा एकदा महाराष्ट्रात टांगली गेली. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चेहरे देखील स्पष्ट दिसत आहेत. पाकीटं नेमकी कसली दिली गेली? – सुषमा अंधारे

  • 09 Nov 2023 11:40 AM (IST)

    मराठवाड्यातील सर्व आठ जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक..

    छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील सर्व 8 जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे आणि या बैठकीत मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती या विषयी चर्चा केली जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदींचा शोध हा या आठवड्याच्या शेवटी पूर्ण होणार असून, आरक्षण आणि पाणीटंचाई या विषयावर सर्व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी चर्चा करणार आहेत.

  • 09 Nov 2023 11:28 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनाविना गोंविदबागेत यंदाचा दिवाळी पाडवा?

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनाविना गोंविदबागेत यंदाचा दिवाळी पाडवा? दरवर्षी बारामतीत दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटूंबीय एकत्र येत असतात, शिवाय दिवाळीनिमित्त नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत असतात, यंदा मात्र दिवाळी पाडव्याला अजितदादा नागरिकांना भेटणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अजितदादा आणखी काही दिवस नागरिकांना भेटणार नाहीत, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटूंबियांची पहिलीच दिवाळी साजरी होत आहे.

  • 09 Nov 2023 10:48 AM (IST)

    ललित पाटील प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांचं मोठं वक्तव्य

    ललित पाटील पलायन प्रकरणी तपासला गती मिळाली नाही. मी या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तपास सुरू आहे तो होऊ द्या. पण 9 महिन्यात ललित ने ज्याला पैसे दिले. त्या पैशांची रिकव्हरी करा. जे पोलीस आणि ससून रुग्णालयाचे आधिकारी आहेत. त्यांना अटक करा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

  • 09 Nov 2023 10:30 AM (IST)

    नाशिक मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

    नाशिक मराठवाडा पाणी प्रश्न पेटला आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.  नाशिकहून मराठवाड्याला पाणी सोडण्यास स्थगिती देण्याची सुप्रीम कोर्टात मागणी करण्यात आली आहे.  लहानू मेमाणे, नामदेव डांगले आणि शरद शिंदे यांनी याचिका दाखल केली होती. भाजप नेत्या अमृता पवार यांच्या पुढाकाराने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. मेंढीगिरी अहवालाची पुनर्रचना करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर 2023 रोजी कार्यकारी संचालकांनी दिलेल्या आदेशाला देखील न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. मराठवड्यापेक्षा नाशिकमध्ये जास्त दुष्काळ असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे.  कपिल सिब्बल न्यायालयात नाशिकची बाजू लढण्याची शक्यता आहे.

  • 09 Nov 2023 10:15 AM (IST)

    समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात

    समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ ही घटना घडली आहे.  भरधाव ट्रकने खाजगी ट्रॅव्हलला धडक दिली आहे. सकाळी चार वाजताची घटना आहे.  खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकासह एक प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. चालक हरिश ठाकरे असं ट्रॅव्हल्स चालकाचं नाव आहे. तर दोघे जण जखमी आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सचा चालक टायरची हवा चेक करण्यासाठी थांबला होता. खाजगी ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावर थांबली होती. तेल्हा हा अपघात झाला.

  • 09 Nov 2023 09:54 AM (IST)

    Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात

    समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात. भरधाव ट्रकने खाजगी ट्रॅव्हलला दिली धडक. सकाळी चार वाजताची घटना. खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकासह एक प्रवाशाचा मृत्यू. चालक हरीश ठाकरे असे ट्रॅव्हल्स चालकाचे नाव. दोघे प्रवासी जखमी. खाजगी ट्रॅव्हल्सचां चालक टायरची हवा चेक करण्यासाठी थांबला होता. खाजगी ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावर थांबली होती. जिल्ह्यातील मेहकर जवळील घटना.

  • 09 Nov 2023 09:13 AM (IST)

    Maratha reservation | मराठवाड्यात कुणबीच्या किती हजार नोंदी आढळल्या ?

    मराठवाड्यात कुणबीच्या एकूण 13 हजार 498 नोंदी आढळल्या.

    सर्वाधिक नोंदी बीड जिल्ह्यात.

    तर सर्वात कमी नोंदी लातूर जिल्ह्यात.

    एका नोंदीच्या आधारे 20 प्रमाणपत्रे देण्याची सोय.

    उपलब्ध नोंदीच्या आधारे मराठवाड्यात मिळणार 2 लाख 69 हजार 960 प्रमाणपत्रे.

    छ. संभाजीनगर :- 932

    जालना :- 2764

    परभणी :- 1466

    हिंगोली :- 3130

    बीड :- 3994

    नांदेड :- 389

    लातूर :- 364

    धाराशिव :- 459

  • 09 Nov 2023 08:52 AM (IST)

    Maharashtra News : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ब्लॉक

    मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा ब्लॉक घेकला जाणार आहे. पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरीजोअरचं काम सुरू असणार आहे. त्यामुळे नियोजित वेळेत सर्व प्रकरारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

  • 09 Nov 2023 08:44 AM (IST)

    Maharashtra News : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आज बैठक

    एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मंत्री गोपिचंद पडळकर हे देखील या बैठकीला उपस्थित राहातील.

  • 09 Nov 2023 08:40 AM (IST)

    Maharashtra News : मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात आज बैठक

    मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयात आज बैठक होणार आहे. मराठा आरक्षणप्रश्नी 8 जिल्हाधिकाऱ्यांची ही बैठक असणार आहे. आतापर्यंत ज्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यावर चर्चा होणार आहे.

  • 09 Nov 2023 08:36 AM (IST)

    Maratha Reservation : सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार ही केवळ अफवा- मुख्यमंत्री

    सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार ही केवळ अफवा असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. भुजबळ आणि ओबीसी नेत्यांच्या मनातील शंका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूर केली आहे.

  • 09 Nov 2023 08:33 AM (IST)

    Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे

    सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. आरक्षणाची डेडलाईन 24 डिसेंबर की 2 जानेवारी यावर चर्चा करणार आहे. उदय सामंत, संदिपान भुमरे आणि अतुल सावे आज जरांगे पाटील यांना भेटणार आहेत.

  • 09 Nov 2023 08:23 AM (IST)

    Maratha Reservation : कोल्हापूरात साडेपाच हजार कुणबी नोंदी आढळल्या

    कोल्हापूरात साडेपाच हजार कुणबी नोंदी आढळल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे रत्नागिरीमध्ये 69 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदी शोधण्याचं काम सूरू आहे. कोल्हापूरात कागल आणि करवीर तालूक्यात सर्वाधीक नोंदी आढळल्या आहेत.

  • 09 Nov 2023 08:10 AM (IST)

    Maharashtra News : ठाकरे गटाच्या नेत्यांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक

    ठाकरे गटाच्या नेत्यांची आज मातोश्रीवर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. आज दूपारी १२.३० वाजता उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. आरक्षणासह विविध मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. उद्धव ठाकरे कार्यकर्ते आणि नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • 09 Nov 2023 08:00 AM (IST)

    Maharashtra News | कोरेगाव भिमा अभिवादन सोहळा यंदा 2 दिवसांचा

    कोरेगाव भिमा येथील अभिवादन सोहळा यंदा 2 दिवसांचा असणार आहे. आंबेडकरी अनुयायांकडून भिमा कोरेगाव विजयस्तंभाला दरवर्षी अभिवादन करण्यात येते. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या दोन दिवस अभिवादन सोहळा पार पडणार आहे.

  • 09 Nov 2023 07:52 AM (IST)

    Maharashtra News | कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या 5566 कुणबी नोंदी

    कोल्हापूर जिल्ह्यात सापडल्या 5566 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. कागल आणि करवीर तालुक्यात सर्वाधिक नोंदी मिळाल्या आहेत. कुणबी नोंदी शोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

  • 09 Nov 2023 07:41 AM (IST)

    Maharashtra News | वाळू ठेकेदारांना सरकारकडून नोटीसा

    पुणे जिल्ह्यातील वाळू ठेकेदारांना सरकारकडून नोटीसा दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यातील एकूण 15 वाळू ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस दिली गेली आहे. एका ठेकेदाराचा परवाना शासनाकडून रद्द करण्यात आला आहे. नियमबाह्य वाळू विक्री प्रकरणी ही कारवाई केली आहे.

  • 09 Nov 2023 07:25 AM (IST)

    Maharashtra News | दरोडा टाकण्याचा प्रयत्न, नऊ जणांना अटक

    यवतमाळ येथे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 9 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी पाठलाग करून 9 जणांना घेतले ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच दुचाकी आणि दरोडा टाकण्याचे साहित्यासह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 09 Nov 2023 07:10 AM (IST)

    Maharashtra News | मुंबईत दोन दुकानांना आग

    मुंबईतील दादरमधील कस्तुरचंद्र मिल कंपाऊंडमधील दोन दुकानांमध्ये लागली. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत दोन्ही दुकांनाचे मोठे नुकसान झाले. आग कशामुळे लागली ते स्पष्ट झाले नाही.

Published On - Nov 09,2023 7:07 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.