मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांची आज संभाजीनगर जिल्ह्यात सभा होणार आहे. संध्याकाळी होणाऱ्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या विविध भागात दोन दिवसात पावसाची शक्यता. भंडारा आणि गोंदियात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. गोंदियात ऑरेंज अलर्ट जारी. शेतकरी हवालदिल. रत्नागिरीत बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून होणार पुन्हा एकदा सुरुवात. रिफायनरीच्या सर्वेच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांचा आज वाढदिवस. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
रायगड पोलिसांनी पुण्यातून घेतले एकाला ताब्यात
शुभम काळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अलिबाग येथील न्यायालयासमोर केले हजर
देसाईगंज शहराजवळ चालत्या दुचाकीवर पडली वीज
भारत राजगडे, त्यांची पत्नी आणि दोन मुलींचा मृ्त्यू
तुळशी फाट्याजवळ आढळले चार मृतदेह
बीआरएसीची ही मराठवाड्यातील तिसरी सभा
बीआरएस पक्षाचे प्रमुख नेते तथा मुख्यमंत्री के. सी. आर सभेला मार्गदर्शन करणार
सभेमध्ये नगरसेवक, माजी आमदार यांचा जाहीर प्रवेश होणार
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
खारघर प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी
खारघर घटनेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप
तातडीने विधिमंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन बोलवून चर्चा व्हावी
प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून मागणी करत असल्याची थोरात यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर
गावदेवी जननीमातेच्या पुजेला उपस्थित राहणार
तापोळा महाबळेश्वर येथील रस्त्यांचे भूमिपूजन
शुभांगी पाटील ऑन कैलास पाटील
त्यांना फक्त हे दाखवायचं होत की मी किती काकांच्या विचारांसाठी निष्ठावान आहे
तुम्ही जर आर ओ पाटलांच्या विचारांशी निष्ठावान असतात तर गद्दारी केली नसती
जर एवढच होत कालच का आले नाहीत
हा तर सगळा दिखावा आहे
हे सगळ राजकरण
काल आले असते तरी स्वागत केलं असतं
राधाकृष्ण विखे पाटलांची शरद पवार आणि अजित पवारांवर खोचक टीका
शरद पवार सर्वाना कन्फ्यूज करतात मात्र अजित दादा त्यांना कन्फ्यूज करतात हीच मोठी गोष्ट
राजकारणामध्ये लोकांना कन्फ्यूज ठेवणं यात शरद पवारांची हातोटी आहे
मात्र अजित दादा हे शरद पवारांना कन्फ्यूज करतात हीच मोठी गोष्ट म्हटली पाहिजे
महाविकास आघाडीच्या वज्रमुठेला तडे गेले आहेत
त्यामुळं उसणं अवसान आणण्याचा हा प्रयत्न आहे
यापेक्षा महाविकास आघाडीमध्ये अर्थ उरलेला नाहीये
मुंबईतील गोरेगावमध्ये 25 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त
दिंडोशी पोलिसांकडून एका आरोपीला अटक
जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात 5 लाख रुपये किंमत
भागवत कराड
मोदींचा एकेरी उल्लेख करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची कीव येते
मोदी हे सर्वांचे पंतप्रधान आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकेरी शब्द वापरायला नकोत
संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता वैतागली आहे
महिलाही ते दिसताच टीव्ही बंद करा म्हणतात
शिंदे गट आणि भाजप एकजीव युती आहे
शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही
उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी सेना आणि हिंदुत्व सोडून गेले
शिंदे आणि भाजपची युती येणाऱ्या निवडणुकीतही कायम असेल
भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येईल की नाही हा वरच्या पातळीवरीचा प्रश्न आहे
मात्र भाजपचे एक प्रिन्सिपल आहे जो येतो त्याचे स्वागत करून आम्ही आमच्या विचारानुसार घडवतो
आम्ही सत्तेसाठी,खुर्चीसाठी विचार बदलत नाही
कोणत्याही पक्षाचा आमच्यात आला तर आम्ही त्यांना आमच्या विचारानुसार बदलतो
नारायण राणे याचे उत्तम उदाहरण आहे
दोन दिवसांपूर्वी ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारा टँकर पलटी…
विषारी वायूमुळे ग्रामस्थांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं गावकऱ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं…
वारंवार याच ठिकाणी अपघात होऊनही प्रशासनाकडून कुठलिही उपाययोजना नाही, ग्रामस्थांचा आरोप
शनिवारपासून या लसीकरणास पालिकेने सुरुवात केली आहे,
परंतु मागील दोन दिवसांत मात्र ज्येष्ठ नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद नाही
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करोना लसीकरण कार्यक्रमांतर्गत नाकावाटे घ्यावयाचा इन्कोव्हॅक लसीचा समावेश करण्यात आला आहे
नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस आहे
मित्राचे दिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बंडूकाका बच्छाव यांनी घडवून आणला योग..
मालेगावमध्ये आदिवासी कुटुंबातील शुभमंगल सावधान..
बारा बलुतेदार मंडळाकडून लग्नाचे आयोजन…
खानापूर मतदार संघातील शिवसेना UBT पक्षाचे उमेदवार K P पाटील यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी संजय राऊत यांची आज मुंबईत भेट घेतली आणि उमेदवार अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली.
मराठी मतांत विभागणी होऊ नये यासाठी शिवसेना UBT पक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीची विनंती मान्य केली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा….
घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधिशामार्फत करण्यात यावी
काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची मागणी..
बँकेने वर्षभरात केलेल्या व्यवऱ्हाचा लेखाजोखा आजच्या पत्रकार परिषदेत बँकेच्या मुख्य संचालकांनी मांडला.
बँकेला मागील तीमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा झाल्याचं बँकेचे एक्झिक्युटिव्ह आशिष पांडे यांनी सांगितलं
जत शहरामध्ये पोलीस ठाण्यासमोरील मोबाईल टॉवरवर चक्क चढला पीडित पती.
सासरच्या मंडळीकडून आणि पोलिसांच्याकडून दखल घेत नसल्याने पतीने स्वीकारला मार्ग..
शरद पवार वज्रमूठ सभेला येणार नाहीत
तिन्ही पक्षांचे दोन-दोन नेते उपस्थित राहणार
शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने राज्यातल्या सभांना उपस्थित राहणार नाहीत
महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही यामुळे भूमिका मांडली पण त्याचा वेगळा अर्थ काढू नका – शरद पवार
काल पवार यांनी महाविकास आघाडी पुढे राहील की नाही माहिती नाही असे विधान केलं त्यानंतर चर्चा सुरू झाल्या,
आज याबाबत शरद पवार यांनी ‘टीव्ही ९’ शी बोलताना महाविकास आघाडीमध्ये एकता राहवी ही भूमिका असल्याचं स्पष्ट केलं.
विद्यापीठात धुडगूस घालण्याऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकार कारवाई करणार का? रोहित पवारांचा सवाल
1 मे रोजी मुंबईमध्ये मविआची ‘वज्रमुठ’ सभा,
तिन्ही पक्षाचे दोन – दोन नेते संबोधित करणार – सूत्र
कोणत्याही ‘वज्रमुठ’ सभेला शरद पवार जाणार नाहीत – सूत्र
पुणे याठिकाणी पुन्हा मोबाईल चोरी उघड
शिवाजी नगर पोलिसांची कारवाई
आठ राज्यात पुणे पोलिसांची मोठी कारवाई
गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक आंध्र प्रदेशातून शिवाजी नगर पोलीसांनी 51 मोबाईल फोन केले जप्त
पुणे : विद्यापीठात झालेल्या गोंधळ वरून आनंद दवे यांची मागणी
हा विद्येच्या माहेरघर चा, संस्कृती चा अपमान आहे
विद्यापीठात अश्लील गाण्या च रेकॉर्डिंग होणं हे महा पाप
याला भाजप चे निवडून आलेले विश्वस्तच जवाबदार आहेत
पंढरपूर : कर विभागातील दोन लिपिकांनी जमा केलेला कर भरलाच नाही.
अपहार प्रकरणी दोन लिपिकांना केले निलंबीत.
कर विभागातील अनेक कर वसुलीची पुस्तके गायब.
झोपडपट्टी सेवा शुल्क वसुलीसाठी नेमले होते दोन शिपाई.
या अपहरामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता.
कर विभाग प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी कारवाई केल्याची माहिती दिली.
भंडारा : उन्हाच्या तडाखा वाढला अवकाळी पावसानंतर 38.00 डिग्री सेल्सियस तापमान,
नागरिक घेऊ लागले काळजी. रस्ते झाले शुकशुकाट.
शहराच्या विविध भागात शुकशुकाट दिसू लागला असून नागरिकांनी शीतपेये- लिंबू पाण्याचा आधार घेणे सुरू केले आहे
पंढरपूर नगरपालिकेत लाखो रुपयांचा अपहार….
कर विभागातील दोन लिपिकानि जमा केलेला कर भरलाच नाही….
अपहार प्रकरणी दोन लिपिकांना केले निलंबीत….
कर विभागातील अनेक कर वसुलीची पुस्तके गायब….
झोपडपट्टी सेवा शुल्क वसुलीसाठी नेमले होते दोन शिपाई….
या अपहरामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता….
कर विभाग प्रमुख बाळासाहेब कांबळे यानि निलंबन केल्याचि दिलि माहिति….
नाशिक : संजय राऊत संपादक आहे, त्यांच्याकडे माहिती येत येते
माझ्याकडे तरी अशी माहिती नाही
१६ आमदारांचा विरोधात केस सुरू आहे. ते १६ आमदार विरोधात निकाल जाईल, आमदारकी जाईल शिंदे साहेब गेले पदावरून, तर मग दुसरे मुख्यमंत्री येईल
निकाल शिंदे यांच्या विरोधात आला तर दुर्दैवाने मुख्यमंत्री पद गेले तरी त्यांचे जे सरकार आहे त्यांना १६५ आमदारांचा सपोर्ट आहे.
१६ जरी गेले १४९ शिल्लक राहील
–
पुणे : विद्यापीठात धुडगूस घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सरकार कारवाई करणार का? रोहित पवारांचा सवाल
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विद्यापीठात आंदोलन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजी नगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील जबिंदा मैदानावर जोरात तयारी
सगळीकडे बीआरएसच्या झेंड्यानी बनले गुलाबी वातावरण
के सी राव यांच्या वेगवेगळ्या योजनांचे लावले मोठमोठे बॅनर
सभेसाठी हजारो खुर्च्यांची मांडणी
नवी दिल्ली : विनेश फोगाटसह 7 महिला पहलवानांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली
कुस्ती महासंघांचे अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
२१ एप्रिलला दिल्लीच्या कॅनोट प्लेस इथं गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही गुन्हा दाखल केला नाही असा याचिकेत उल्लेख केला आहे
पुणे : शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच वक्तव्य,
2019 मध्ये या चर्चा सुरू असताना आम्ही स्वतः उद्धव ठाकरेंना महापौर बंगल्यावर हे बोलून दाखवलं होतं,
आम्हा सर्वांची इच्छा होती की राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हावं.
अपघातात 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती
रत्नागीरी येथील कळेशी बांध येथे अपघात झाल्याची माहिती
जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर
शेतकरी परिवर्तन पॅनलकडून प्रचाराला सुरूवात
महाकाली मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरूवात
निवडणूकीत भाजपचं शेतकरी परिवर्तन पॅनल
मराठा समाजाचा मुख्यामंत्री केलाय याची संजय राऊत यांना पोटदुखी – संजय सिरसाट
मराठा मोर्चाला संजय राऊत मुका मोर्चा म्हणाले होते – संजय सिरसाट
मिरचीला चांगला भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान
2 लाख 13 हजार क्विंटलपेक्षा जास्त मिरचीची विक्री
एप्रिल अखेर पर्यंत मीरचीची आवक सुरू राहाणार
चंद्रशेखर बावनकुळे यांची ठाकरे गटावर बोचरी टिका
आमच्या मशालीने आम्ही भाजपला खाक करून टाकू, संजय राऊत यांचा पलटवार
आमची अमर ज्योत आहे आणि ती अशीच भडकत राहाणार – संजय राऊत
अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे नेते राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार
राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे योग्य कारवाईची मागणी करणार
हे सरकार भजपला राजकीय दृष्ट्या पाठबळ देण्यासाठी कमकुवत- संजय राऊत
महाविकास आघाडीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही- संजय राऊत
2024 ला महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळतील- संजय राऊत
महाविकास आघाडीची मशाल न विझणारी आहे- संजय राऊत
ब्रेक –
– पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज विविध विषयांवर बैठका,
– झोपडपट्टी पुर्नवसन विभागाच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची बैठक
– तर शहरातील विविध विकासकामांचा चंद्रकांत पाटील घेणार आढावा
– सर्किट हाऊसमध्ये बैठकीचे आयोजन
– खबरदारी म्हणून सर्किट हाऊस परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
KKR vs CSK 2023 : मन जिंकून घेणाऱ्या ‘त्या’ शॉटवर केविन पीटरसनही स्वत:ला रोखू शकला नाही. अजिंक्य रहाणे सुद्धा असा शॉट मारु शकतो, यावर अनेकांना विश्वास बसत नव्हता. पण काल रात्री इडन गार्डन्सवर असं घडलं. वाचा सविस्तर….
IPL 2023 : टेस्ट स्पेशलिस्ट अजिंक्य रहाणे असाच खेळत राहिला, तर टीम इंडियातील दिग्गज बॅट्समनच नक्कीच टेन्शन वाढणार. वाचा सविस्तर….
RCB vs RR 2023 : वरवर राजस्थान टीममधील एका प्लेयर चांगला खेळला असं दिसतय. पण त्याच्या हेतूबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय. वाचा सविस्तर….
मुंबईशिवाय आणखी एका राज्यात सचिनने विकत घेतलाय आलिशान बंगला, त्याची किंमत आहे….
सचिन सध्या ज्या कारमधून फिरतो, त्याची किंमत, वाचा सविस्तर…..
भंडारा
– जिल्ह्याच्या देवरी देव येथिल गाई म्हशीच्या गोठ्याला आग लागून 13 जनावरें भाजली.
– वीज वितरण कंपनीचे केवल जोडणीचे कामे सुरू असताना अचानक शॉर्टसर्किट होऊन गोठ्याला भीषण आग लागली.
– संपुर्ण जनावरें भाजली असून जीवित हानी झाली नसली तरी 8 जनावरें अती गंभिर असून महावितरण विभागाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड
-रावेत येथील अनधिकृत फ्लेक्स पडून पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाला आली जाग
-शहरात न्यायालयात प्रलंबित असलेल्या 433 अनाधिकृत होर्डिंग व्यतिरिक्त 72 नव्याने अनधिकृत होर्डिंगज आढळून आले होते
-यापैकी 33 होर्डिंग हे धारकांनी स्वतःहून काढले आहे तर 4 होर्डिंग महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात आले उर्वरित होर्डिंग्ज येत्या दोन दिवसात काढणार असल्याची महापालिका प्रशासनाची माहिती
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर 177 झाडांपैकी 53 झाडांचे प्रत्यारोपण तर 124 झाडं कापली जाणार
आरे कारशेड परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
वृक्षतोडीदरम्यान अडथळा येऊ नये यासाठी एका पर्यावरणप्रेमीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
येत्या वर्षाच्या शेवटपर्यंत मेट्रो-3 चा पहिला फेज सुरु करण्याचा एमएमआरसीएलचा मानस
22-23 एप्रिल रोजी गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद
आज (24 एप्रिल) शाळा आणि महाविद्यालये राहणार बंद
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहिती
परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी
खाजगी कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांचा आरोप
सप्टेंबर महिन्यात होणारी परीक्षा नेमकी कशी होणार यासंदर्भात आयोग निर्णय घेणार
राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशातील रीवा इथं राहणार उपस्थित
रीवा इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात होणार सहभागी
पंतप्रधान सुमारे 17 हजार कोटींच्या प्रकल्पांची करणार पायाभरणी
सकाळी 7.47 वाजताच्या सुमारास जाणवले भूकंपाचे धक्के
3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
दाक्षिणात्य अभिनेत्री समंथाचं करिअर संपुष्टात आल्याची निर्मात्याने केली होती टीका
निर्माते चिट्टीबाबू यांनी समंथाचं करिअर आणि आजारपणाबद्दल केलं होतं वक्तव्य
चिट्टीबाबू यांना समंथाचं अप्रत्यक्ष उत्तर, वाचा सविस्तर..
सलमान खानच्या चित्रपटाने शनिवारी आणि रविवारी केली दमदार कमाई
शनिवारी 25 कोटी रुपये तर रविवारी 26.25 कोटी रुपयांचा जमवला गल्ला, वाचा सविस्तर..
शनिवारी शासकीय सुटी असूनही शहरातील पाच दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात आली
या कार्यालयांत सुमारे 125 दस्तांची नोंदणी होऊन एक कोटी 20 लाख रुपयांचा महसूल प्राप्त
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची माहिती
29 एप्रिल रोजी होणार मतमोजणी, बाजार समितीची निवडणूक तब्बल 24 वर्षांनंतर
18 जागांसाठी 17 हजार 812 जण मतदान करणार आहेत
सेवा सहकारी संस्था गटातून सर्वाधिक 11 उमेदवार निवडून येणार आहेत
तर ग्रामपंचायत गटातून चार जण, व्यापारी-आडते गटातून दोनजण आणि हमाल मापाडी गटातून एक उमेदवार निवडून येणार
चौघांनी केली 6 लाख 89 हजाराची रोकड लंपास
पोलिसांनी दोन दिवसात चौघांना गोव्यातून ठोकल्या बेड्या
चोरट्यांकडून 5 लाख रुपये आणि मोटारसायकल हस्तगत
राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय
4 हजार 733 विद्यार्थ्यांना विविध आजारांचे निदान
3 हजार 282 विद्यार्थ्यांवर करण्यात आले औषधोपचार
1451 विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी पालकांना पाल्यावर योग्य उपचार करण्याचे करण्यात आले मार्गदर्शन
पालिकेच्या शाळांसह इतर खासगी शाळेतील 0 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची करण्यात आली तपासणी
36 हजार नागरिकांना सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा
सद्यस्थितीत तीन तालुक्यांमध्ये 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू
येवला तालुक्यात सर्वाधिक 13 टँकर सुरू
वाढत्या उन्हासोबत येत्या काळात टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
चंद्रशेखर राव यांच्या सभेसाठी संभाजीनगरात मोठा बंदोबस्त
सभेला हजारो लोक येण्याची शक्यता, संभाजीनगर बनले गुलाबी नगरी
सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल