मुंबई : भंडारा जिल्ह्यात 2 मेपर्यंत येलो अलर्ट, मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी. कल्याण-डोंबिवली क्षेत्रात 15 टक्के पाणी कपात राहणार. आठवड्यातून एका दिवशी म्हणजे दर मंगळवारी राहणार 24 तास राहणार पुरवठा बंद. नाशिक ठाणे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा. मोठी वाहतूक कोंडी. कराड बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला, दिग्गजांच्या पॅनलमध्ये लढत. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
‘भाजपच्या विचारसरणीत विष असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली होती.
या वादग्रस्त विधानावर खर्गे यांनी दिले स्पष्टीकरण
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे गुरुवारी भाजपवर त्यांनी टीका केली
मल्लिकार्जून खर्गे यांनी टीका करताना त्यांनी नरेंद्र मोदी यांना विषारी सापाची उपमा दिली.
टीका झाल्यानंतर आपल्या वक्तव्यावर त्यांनी दिले स्पष्टीकरण
BJP की विचारधारा विभाजनकारी, वैमनस्यपूर्ण तथा ग़रीबों व दलितों के प्रति नफ़रत व पूर्वाग्रह से भरी है।
मैंने इसी नफ़रत व द्वेष की राजनीति की चर्चा की। मेरा बयान न व्यक्तिगत तौर से प्रधानमंत्री मोदी जी के लिये था ना किसी और व्यक्ति विशेष के लिए..
— Mallikarjun Kharge (@kharge) April 27, 2023
दिल्लीतील नेबसराय भागात पतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. आरोपीने त्याच्या दोन मुलांवरही हल्ला केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर पतीने स्वत:च्या हाताची नसही कापली. या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मीने आणि आसाम सरकारने अमित शाह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली.
दिल्ली: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह की उपस्थिति में दिमासा नेशनल लिबरेशन आर्मी और असम सरकार के बीच समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए गए। pic.twitter.com/1KP2gFtnul
— ANI_HindiNews (@AHindinews) April 27, 2023
दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे सात जणांचा मृत्यू आणि 24 तासात 865 जण पॉझिटिव्ह
अमरावती जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसांचं थैमान
वरुड तालुक्यातील जामगाव खडका इथल्या कुंड नदीला महापूर
मध्यप्रदेश राज्यात जोरदार पाऊस, वरुडमध्ये नदी-नाल्यांना पूर
मुंबई विमानतळावर 18 किलो सोनं जप्त
केनियाच्या 9 महिला प्रवाशांना अटक
एअर इंटेलिजिन्स युनिटची मोठी कारवाई
शेजारील राज्यात कर्नाटकमधील कलबुर्गीत गारांसह जोरदार पाऊस झाला. पावसानंतर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली.
कर्नाटकात जोरदार पाऊस
#WATCH कर्नाटक: कालाबुरागी में आज बारिश के साथ ओलावृष्टि हुई। बारिश के बाद कई जगहों पर जलभराव देखा गया। pic.twitter.com/MJxB8GmHUx
— ANI_HindiNews (@AHindinews) April 27, 2023
पुण्यातील मंदिरात चोरी
दानपेटी फोडत चोरट्यांनी लंपास केले एक लाख रुपये
कोंढवा परिसरातील शत्रूंजय मंदिरात घडला प्रकार
सहा चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद
कोंढवा पोलिसांकडून एका आरोपीला अटक
मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ आणि मराठवाड्याला पुढील 2 दिवस “ऑरेंज अलर्ट”
पुणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता
पुणे हवामान विभागाने दिली माहिती
मे च्या पहिल्या आठवड्यात 2 दिवस देखील पावसाची शक्यता
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करण्याची अजित पवारांची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित अजित पवार यांची मागणी
वेल्हे तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे
वेल्हे तालुक्याचे नाव राजगड तालुका करा याबाबत ठराव सरकारकडे दिलेत
किल्ले राजगडावरून या तालुक्याचे नामकरण राजगड करण्याबाबतच्या प्रस्तावास सरकारने मान्यता द्यावी
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राधाकृष्ण विखे पाटील
आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय
प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध
वनहक्क कायद्याने आदिवासींची जमीन, देवस्थानच्या जमीन याबाबत राज्य सरकारने पाऊल टाकलंय
महसूल खात्यासंदर्भात बहुतांशी मागण्या
महामार्गासाठी भूसंपादन जमिनीला शेतकऱ्यांना जास्तीचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न
दूध उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली समिती त्यात किसान सभेलाही स्थान देण्यात आलंय
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर थेट क्रिकेटच्या मैदानात
पुण्यात आमदार रंगले क्रिकेट खेळण्यात
धंगेकरांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग
तब्बल एक तास आमदार रवींद्र धंगेकर यांनी खेळले क्रिकेट
पुणे जिल्हा परिषदेत मेगा भरती
पुणे जिल्हा परिषदेत 34 विभागात होणार मोठी भरती
जिल्हा परिषद भरणार तब्बल 900 पद
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात होणारं पदभरती
जिल्हा परिषद लवकरच काढणार नोटिफिकेशन
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
अनेक घरांवरचे छप्पर उडाले
ग्रामीण भागातील साध्या घरावरची पत्रे उडून अनेकांच्या घरात शिरले पाणी
घरातील साहित्य भिजल्याने अनेकांचे मोठे नुकसान
वादळी वाऱ्याने जिल्ह्याच्या अनेक भागातील विद्युत पुरवठा झाला खंडित
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा जमाबंदी आदेश लागू
1 मे ते 13 मे दरम्यान लागू असणार जमावबंदी आदेश
जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी काढले आदेश
जिल्ह्यात काही दिवसापासून सुरु असलेला महापुरुषांचा अवमान,आक्षेपार्ह पोस्ट पार्श्वभूमीवर काढले आदेश
राजाराम कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने 29 तारखेपर्यंत काढला होता जमावंबंदी आदेश
खूप दिवसाच्या खंडानंतर जिल्ह्यात पुन्हा असणार जमावबंदी आदेश
अचानक पाऊस आल्याने नागरिकांची धावपळ
मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना मात्र दिलासा
‘मुख्यमंत्री पद गेल्यानंतर उद्धव ठाकरेंचा तळतळाट आणि थयथयाट देशाच्या राजकारणात पाहिल्यांदा बघायला मिळतोय.’
‘आपलं मुख्यमंत्री पद गेल्यामुळे हे दुःख व्यक्त होतंय हे नैराश्य आहे. अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
‘जोडे पुसण्याची लायकी नसलेले राज्य चालवत आहे…’ अशी टीका ‘शिवसेना’ ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी केली होती…
काही मंदिरांमध्ये दुसऱ्यांदा चोरी, घटना cctv कॅमेऱ्यात कैद..
मंदिरांचे कळस, घंटा, पितळी नाग देखील चोरीला..
पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी..
झगमगच्या विश्वातून अशा घडलेल्या घटना ऐकायला मिळतात, ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसतो,
बलात्कार प्रकरणी ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटीला हायकोर्टाचा दणका… वाचा सविस्तर
मालेगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी असणार 4 बूथ,
मालेगाव, निमगाव, झोडगे आणि सौंदाणे येथे असणार मतदान केंद्र,
साहित्य वाटप आणि कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण
वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान,
जखमींना योग्य ती मदत करण्याचे प्रयत्न सुरु
नवी दिल्ली : भगतसिंह कोश्यारी यांच विधान सत्य मानता पण सत्यपाल यांचे मानत नाही
सत्यपाल मलिक हे बाजू मांडत आहे ती सरकारच्या बाजूची नाही
सत्यपाल मलिक हे त्यांचे मुखवटे फाडत आहे
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
पुणे : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे सत्र न्यायालयात केला अब्रू नुकसानीचा दावा
संजय शिरसाठ यांच्या विरोधात तीन रुपयांचा दावा
47 वकिलांनी दिलं वकीलपत्र
पुणे जिल्हा सत्र न्यायालयात संजय शिरसाठ यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल
ठाणे : आज दुपारी भरवण्यात येणार प्रदर्शन या प्रदर्शनाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असणार उपस्थित
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्या बद्दल केलेल्या व्यक्तव्या नंतर अनेक आंदोलन झाली
त्या आंदोलनानंतर खास ठाण्यात प्रभुश्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन
तर या प्रदर्शनात श्रीरामाच्या विविध कला आणि भावगुणांना प्रकट करण्यात येणारे चित्राचा समावेश असणार आहे
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देण्याचा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न
खोपोली : जवळपास सात ते आठ गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत
गाड्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे
काहीजण जखमी असल्याची माहिती आहे
अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे
पुणे : अमित ठाकरेंच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन
या बैठकीला मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार
मनसे शहर कार्यालयात बैठकांचे आयोजन करण्यात आले
अमित ठाकरे मनसे विद्यार्थी संघटनेचाही आढावा घेणार
मुंबई : राज्याच्या मुळावर येणारे प्रकल्प अडवून ठेवले होते
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं
आम्ही काही बोललो की विकासाच्या आड आलो म्हणतात
एअरबस प्रकल्प, फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात का आला नाही?
तिथल्या लोकांना रोजगार मिळणार आहे की नाही हे सांगा
दडपशाही करून सांगू नका, विश्वासात घेऊन सांगा
मी प्रकल्प करा म्हणून सांगितलं पण प्राथमिक अहवाल दिला होता
उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या सभेत हे भाष्य केले आहे
ठाणे : ठाणे-नाशिक रोडवर सुरु असलेल्या कामामुळे प्रवाशी आणि वाहनधारक यांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास
ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यात येत आहे
तर वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा पोलिसांचे आवाहन
महामार्गांवरील कामामुळे ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी
मुंबई : कामगार सेनेच्या सभेत उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन
कामगार सेना आणि शिवसेनेचे जून नातं आहे
उद्धव ठाकरे यांचे कामगार सेनेच्या सभेत मार्गदर्शन
आता सरकारच युनियन संपावायला लागले
उद्धव ठाकरे यांचा कामगार सभेतून सरकारवर हल्लाबोल
एका बेंगलोरमधील घर मालकासोबत काय झालंय पाहा. शेअर झालेले फोटो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. एक बॅचलर मुलगा ज्यावेळी घर खाली करुन गेला, त्यानंतर मालकाने जाऊन घरं पाहिलं, घर पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. त्या मुलाने घराची एकदम वाईट अवस्था केली आहे. मालकाने घर खाली केल्याचे काही फोटो काढले आहेत. संपूर्ण बातमी
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र देऊन मागणी करणार
संभाजीनगर निर्णयाप्रमाणे मराठी भाषेचा निर्णय व्हावा
– रेणुकामातेच्या श्री क्षेत्र माहूर गडावर चार लिफ्ट आणि स्कायवॉकचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १९ मे रोजी भूमिपूजन होत आहे.
– केंद्रीय मार्गनिधीतून लिफ्ट आणि स्कायवॉकसह रोप वे उभारण्याचे येथे नियोजन होते.
– मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’सोबत याविषयी करारही झाला होता.
– श्री क्षेत्र माहूर येथे रोप वे उभारणे काही कारणास्तव शक्य झाले नसले तरी लिफ्ट व स्कायवॉकच्या माध्यमातून भाविकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.
– केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते १९ मे रोजी याचे भूमिपूजन होत आहे. या कामाबद्दल नितीनजी याचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो, असे ट्विट माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे.
नागपूर येथे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हार मानण्याची गरज नाही, हिंमत हरण्याची गरज नाही असे प्रतिपादन केले.
आपण उभे राहिलो, लढत राहिलो तर आपणच विजयी होऊ हा विश्वास सर्वसामान्य समाजाचा आणि कॅन्सरग्रस्तांच्या कुटुंबीयांचा आहे. आपणही त्यांचे मित्र बनले पाहिजे आणि गरज पडेल तेव्हा त्यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे. जागृत राहा जेणेकरून ते शक्य तितक्या चांगल्या प्रकारे हे काम पूर्ण करता येईल, असे ते म्हणाले.
ज्यांनी हा प्रकल्प ज्यांच्यासाठी राबविला जात आहे त्यांच्यासाठी इमारतीच्या उभारणीपासून ते सुरू असलेल्या उपचारापर्यंतच्या सर्व बाबी लक्षात ठेवाव्यात. त्यासाठी काहीही करण्यासाठी उभे राहण्याची गरज आहे.
एकदा हॉस्पिटल उभारले की आपलं काम संपलं असे नाही. तर त्यांनी अशी व्यवस्था करत राहावं की रुग्णांना अधिक चांगली सेवा कशी देता येईल. त्यांना अधिक मदत कशी होईल याचा विचार करावा. वेळ आणि उपचाराचा खर्च कसा कमी करता येईल हे पहावे, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
– आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने तयारी सुरू केलीय.
– केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 हजार ईव्हीएम मशिन्स उपलब्ध करून दिले आहेत.
– नाशिकच्या सय्यद पिंपरी येथील निवडणूक आयोगाच्या गोदामात या ईव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्या आहेत.
– 11 हजार 720 बॅलेट्स आणि 6 हजार 600 कंट्रोल युनिट्सचा यात समावेश
– पुढील महिन्यात निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ येऊन करणार या यंत्रांची तपासणी करणार आहेत.
– खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस कारखाना येथे जाऊन मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अपर्ण करून पुढील सभेसाठी गेले होते.
– मात्र, भीमा पाटस कारखान्याच्या कामगारांनी संजय राऊत यांनी हार घातलेल्या मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याचे शुद्धीकरण केले.
– कामगारांनी या पुतळ्यावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले.
– त्यानंतर पुतळ्याला दुग्ध अभिषेक करण्यात आला.
– यावेळी कामगारांनी संजय राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.
आज हायकोर्टात हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे
अजित पवार यांच्या भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट
हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्यामध्ये काहीवेळ चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कशिश पार्क येथे मुख्यमंत्री कार्यालय, आयुक्त कार्यालय आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे.
कशिश पार्क येथे प्रशासकीय इमारत असून याच इमारतीत ही कार्यालये होणार आहेत.
– या कामासाठी एकूण 4 कोटी 60 लाख इतका खर्च येणार आहे.
– कार्यालयाच्या अंतर्गत कामांसाठी तसेच संगणक प्रणाली, इतर कामासाठी ठाणे महापालिकेने निविदा काढली आहे.
– ही निविदा 3 मे पर्यंत स्वीकारली जाणार आहे..
– त्यामुळे यापुढे राज्याचा कारभार ठाण्यातून देखील होताना दिसणार आहे.
सहकारी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन
झाडावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
वेळेवर उपचार न मिळाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू
Animal Viral Video | जंगलात गेल्यावर वाघाला पाहून फोटो काढताय, मग तुम्ही हा व्हिडीओ पाहा. पर्यटकांवर काय वेळ आली होती. नशीब चांगलं म्हणून नाहीतर...
आज गुंतवणुकीची आहे शेवटची संधी
आतापर्यंत कसा मिळाला आयपीओला प्रतिसाद
औषधी उत्पादनासह कंडोम निर्मितीत ही कंपनी अग्रेसर
या कंपनीतून अशी करता येईल कमाई, वाचा बातमी
उद्योगपती गौतम अडाणी कार्यक्रमस्थळी दाखल
सरसंघचालक मोहन भागवत अणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित
कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारून पराभव होणार- संजय राऊत
राज ठाकरे यांच्या उत्तरावर संजय राऊत यांचं प्रत्यूत्तर
शेंदूर फासलेल्या देवाच्या मागे लोकं जात नाही, संजय राऊत यांचा टोला
राऊतांनी भाजप नेत्यांवर आरोप केल्यास मी ठाकरेंवर आरोप करणार- नितेश राणे
भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यास राऊतांनी कोर्टात जावे- नितेश राणे
संजय राऊतांसारखी माणसं बाजारात विकतं मिळतात, नितेश राणेंची बोचरी टिका
पिकांचे नुकसान तर अनेक ठिकाणी झाडांची पडझड
विज कोसळल्याने जनावरं दगावली
वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडाले
-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची तयारी सुरू
-केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले 18 हजार ईव्हीएम यंत्र
-नाशिकच्या सय्यद पिंपरी येथील निवडणूक आयोगाच्या गोदामात ठेवण्यात आले यंत्र
-11 हजार 720 बॅलेट्स युनिट्स आणि 6 हजार 600 कंट्रोल युनिट्सचा समावेश
-पुढील महिन्यात निवडणूक आयोगाचे तंत्रज्ञ येऊन करणार यंत्रांची तपासणी
राष्ट्रवादी चे पदाधिकारी राज राजापूरकर यांच्या माध्यमातून ठाण्यात प्रभू श्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन…
आज दुपारी भरवण्यात येणार प्रदर्शन या प्रदर्शनाला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असणार उपस्थित..
राष्ट्रवादी चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्या बद्दल केलेल्या व्यक्तव्या नंतर अनेक आंदोलन झाली..
त्या आंदोलनानंतर खास ठाण्यात प्रभुश्रीरामाच्या चित्राचे प्रदर्शन..
तर या प्रदर्शनात श्रीरामाच्या विविध कला व भावगुणांना प्रकट करण्यात येणारे चित्राचा समावेश असणार आहे..
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देण्याचा राष्ट्रवादी पदाधिकारी यांचा प्रयत्न..
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स
जनतेच्या मनातील भावना मांडल्याची कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युचं आज होणार उद्घाटन
सोहळ्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
उद्योगपती गौतम अदानीही सोहळ्यास उपस्थित
117 खाटांचे अद्ययावत रुग्णालय
बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला
कर्जत-जमखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पावसात भिजून सभा
शिंदे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा
नेत्यांनी माझा विश्वासघात केला मात्र लोकांनी नाही
तर बाहेरून आलेल्या लोकांनी बसवण्याचं काम केलं , लगावला टोला
डॉलरला धोबीपछाड देण्यासाठी लढाई
आता डॉलरच सबकुछ राहणार नाही
रशियासह भारत, चीन आणि इतर देशांची आघाडी
भारतीय रुपयांने जागतिक बाजारात केली चढाई
चीनतर गेल्या कित्येक वर्षांपासून डॉलरविरोधात आघाडीवर
काय होऊ शकतो बदल, काय होतील परिणाम, वाचा सविस्तर
VIRAL VIDEO | गाडीची पार्किंग आपल्याला कायम राहावी, यासाठी मालकांनी नवा जुगाड शोधून काढला आहे. सद्या त्या गोष्टीचा एक व्हिडीओ चांगलाचं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं होणार उद्घाटन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
राऊतांनी भाजप नेत्यांवर खोटे आरोप करू नयेत
आम्ही ओरिजनल, खरे शिवसैनिक आहोत
संजय राऊतांसारखे चायनिज मॉडेल नाही
राऊतांनी भाजप नेत्यांवर आरोप केले तर मी ठाकरेंवर टीका करेन
पुलाचे काम पूर्ण न झाल्याने उद्घाटनाला आणखी दोन महिने लागणार
१ मेला होणार होते उड्डाणपुलाचे उद्घाटन
मात्र गर्डर बसवण्याचे काम अपूर्ण असल्याने पुल बांधण्यास लागणार आणखीन वेळ
१ मे ला महाराष्ट्र दिनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार होते उद्घाटन
सध्या पुलाचे काम ८० टक्के पूर्ण…
९ गर्डर च्या माध्यमातून १५० मीटर लांबीचा आणि ३२ मीटर रुंदीचा उभारण्यात येतोय उड्डाणपूल
चांदणी चौकात ३९७ कोटी खर्च करुन १७ किलोमीटर लांबीचे विविध रस्ते तयार करण्यात आले आहेत
WTC Final 2023 : टीम इंडियाच्या या खेळाडूकडे चांगल टॅलेंट आहे. मात्र, तरीही सिलेक्टर्सनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी साधा त्याचा विचारही केला नाही. या खेळाडूची तुलना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जायची. वाचा सविस्तर….
IPL 2023 मध्ये काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 21 रन्सनी हरवलं. त्यानंतर कोहलीने आपल्या टीमला खडेबोल सुनावले. वाचा सविस्तर….
IPL 2023 : टीम इंडियाच्या एका खेळाडूचा आयपीएलमधूनही पत्ता लवकरच कट होऊ शकतो. एका सीजनसाठी या प्लेयरला 5.50 कोटी रुपये मिळतात. त्याला त्याच्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवता येत नाहीय. त्याचं करियर धोक्यात आहे. वाचा सविस्तर….
– नाशिकच्या अंबड परिसरातील जाधव संकुल येथील घटना
– झोपेत असताना तीन वर्षीय चिमुकल्यावर अचानक घरातील लाकडी कपाट पडल्याने दुर्दैवी मृत्यू
– या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त
– शौर्य विश्वकर्मा या तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
– कपाट अंगावर पडल्यानंतर शौर्यला लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात २७ ते २८ एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. या ठिकाणी 30-40 किलोमीटर वेगाने वारेही वाहणार आहे.
भाजपमधील सहा ते सात लोकांची प्रकरणे माझ्याकडे
दादा भुसे यांच्यांकडूनही कोट्यवधींचा भ्रष्टाचार- संजय राऊत
भ्रष्टचाराची तक्रार ईडी, सीबीआयकडे करणार
भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज
Viral Video | पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हा माणूस पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी पक्षी विकत घेत आहे.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर मिलियनमध्ये लोकांनी पाहिला आहे. सविस्तर बातमी पाहा
नागपुरात आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट च उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार होतं, मात्र अमित शहा यांचा आजचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. यामुळे हे उद्घाटन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सोने-चांदीची पुन्हा चढाई
सकाळच्या सत्रात किंमतीत वाढ
एका दिवसांत शंभर रुपयांनी किंमती वधारल्या
चांदी देणार ग्राहकांना गोल्डन रिटर्न, वाचा बातमी
लाकडी कपाट अंगावर पडून तीन वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत
नाशिकच्या अंबड परिसरातील जाधव संकुल येथील घटना
झोपेत असताना तीन वर्षीय चिमुकल्यावर अचानक घरातील लाकडी कपाट पडल्याने दुर्दैवी मृत्यू
शौर्य विश्वकर्मा या तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मावळ तालुक्यातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांवर ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा‘ अंतर्गत स्वच्छता अभियान
तालुक्यातील गडकिल्ले व ऐतिहासिक स्थळांवर ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा‘ अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या सूचनेनुसार लोणावळा उपविभाग पोलीस उपअधीक्षक यांनी ‘टुरिझम पोलिसिंग‘ हा अभिनव उपक्रम राबविला आहे
चांदणी चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन लांबणीवर पडणार
पुलाचे काम पूर्ण न झाल्याने आणखीन दोन महिने लागणार उद्घाटनाला
१ मेला होणार होते उड्डाणपुलाचे उद्घाटन
नगर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला
भाजप आमदार राम शिंदे यांनी केलं पावसात केले भाषण
कर्जत-जमखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पावसात झाली सभा
शिंदे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा
नेत्यांनी माझा विश्वासघात केला मात्र लोकांनी नाही
तर बाहेरून आलेल्या लोकांनी बसवण्याचं काम केलं आमदार रोहित पवारांना टोला
पुलवमा हल्ला ते जम्मू काश्मीरामधील 370 कलम हटवणे, शासकीय कर्मचाऱ्यांचे विमा कंत्राट देण्यासाठी रिलायन्सने देऊ केलेली लाचेचे प्रकरण, वादग्रस्त शेतकरी कायदे, गोव्यातील राजकीय भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर व्यक्त केलेल्या मतांमुळे सत्यपाल मलिक चर्चेत आले आहे.
आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सत्यपाल मलिक यांची भेट घेणार आहे, मलिक यांना मुंबई भेटीचे आमंत्रण देणार आहेत.
मुंबई भेटीत सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील
दुपारी 1 वाजता संगमनेर इथं होणार बैठक
आज तोडगा निघण्याची शक्यता
कोणत्या शहरात सर्वात महागले इंधन
कुठे आहे सर्वात स्वस्त दर
कच्चा तेलाची सुरु आहे आगेकूच
तुमच्या शहरातील इंधनाचा भाव घ्या जाणून
भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, वाचा बातमी एका क्लिकवर
VIRAL VIDEO | एका पोलिस कर्मचाऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये कचरा वेचणाऱ्या मुलाला पोलिस कर्मचाऱ्याने नवीन कपडे आणि चप्पल गिफ्ट केली आहे. वाचा संपूर्ण स्टोरी
आज दिल्लीत होणार राऊत-मलिक यांची भेट
दुपारी 12 वाजता होणार भेट
सत्यपाल मलिक यांनी दिलेल्या एका मुलाखतीची सध्या देशात चर्चा
संजय राऊत सत्यपाल मलिक यांना मुंबई भेटीचे आमंत्रण देणार
मुंबई भेटीत सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणण्यासाठी संजय राऊत प्रयत्नशील
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यपाल मलिक आणि संजय राऊत भेटीला महत्व
मध्यरात्रीच्या सुमारास अनेक भागात पावसाचा शिडकावा
पुढचे दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
अवकाळी आणि गारपिटीच्या शक्यतेने शेतकरी हवालदिल
312 घरांचं आणि गुरांच्या गोळ्यांचं नुकसान
321.51 हेक्टरवरील शेतपिकांचं नुकसान, 65 जनावरांचा मृत्यू
प्रशासनाने केले पंचनामे
शिर्डी ग्रामस्थ पाळणार बंद
शिर्डी ग्रामस्थांचा CISF नियुक्तीला विरोध
साई मंदिरात CISF सुरक्षा नियुक्त करू नये, शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांची मागणी
राष्ट्रीय बँकाच्या अधिका-यांची संस्थान प्रशासनाशी चर्चा
तुटवडा असलेल्या इतर बँकाकडे नाणे वर्ग करणार
साईबाबा संस्थानचे 13 राष्ट्रीय बँकेत आहेत खाते
बँकाकडे कोटयवधीची नाणी साचल्याने चार बँकांनी नाणी घेण्यास दिला होता नकार
पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील दहा गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई
सैफअली वाहिद बागवान (वय 20, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव
त्याला एक वर्षासाठी कोल्हापूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार
बागवान याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल
अमित ठाकरेंच्या उपस्थितीत संवाद बैठकीचे आयोजन
या बैठकीला मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित रहाणार
सकाळी 11 वाजता मनसे शहर कार्यालयात बैठकांचे आयोजन
यावेळी अमित ठाकरे मनसे विद्यार्थी संघटनेचाही आढावा घेणार
Priyanka Gandhi : राजकीय नेत्यांकडून एखादी कृती केल्यानंतर ती त्यांच्या चाहत्यांना अधिक आवडते, असं अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे. सध्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियांका गांधी यांची एक गोष्ट चांगलीचं व्हायरल झाली आहे. वाचा संपूर्ण बातमी
तीन मुख्य संशयित आरोपींना पोलिसांनी केली अटक
सहा अल्पवयीन संशयितांना देखील घेतले ताब्यात
सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सावतानगर भागात घडली होती खुनाची घटना
सीसीटीव्ही च्या आधारे पोलिसांनी केली कारवाई
ममता बोदलकर 65 असे मृत महिलेचे नाव, महिला शेतात काम करत असताना वाघाने दबा धरून केला हल्ला,
सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ वाघाने याच भागात मांडले बस्तान
घटना पाहण्यासाठी हल्लास्थळी गेलेल्या नागरिकांवर देखील वाघाने केली चाल
अखेर वनपथक पोचल्यानंतर शव रुग्णालयाकडे केले रवाना
सावली वनविभागाचे पथक करत आहे घटनेचा अधिक तपास
स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना महिला कार्यकर्त्यांचा विरोध
आज होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
बृजभूषण सिंह यांचे शहर भर लागले पोस्टर, बृजभूषण सिंह कोल्हापुरात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार
बृजभूषण सिंह यांच्यावर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांचा आक्षेप, राजमाता जिजाऊ संघटनेचा इशारा
आठवड्यातून एका दिवशी म्हणजे दर मंगळवारी राहणार 24 तास राहणार पुरवठा बंद
पालिका आयुक्ताने दिले सूचना
ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी नदीतील पाणी साठ्यात 32 टक्के तुट येणार असल्याने ही तुट भरून काढत पाणी कपातीचा निर्णय
भंडाऱ्याच्या खेमराजचं फूड आणि स्किन केअर पोहचलं विदेशात
वडिलोपार्जित शेतीतील साडेतीन एकरात खेमराजनं नाविन्यपूर्ण एलोविराची शेती केली
राज्यातील कानाकोपऱ्यात त्यांचे प्रॉडक्ट विकल्या जात असून आता तर अमेरिका, जर्मनी, रशिया, दुबई सह अन्य देशातही यांच्या प्रॉडक्टला मोठी मागणी वाढली आहे
अर्जुनी मोरगाव तालुक्यात दिसला हत्तींचा कळप
मागील वर्षी केलं होतं शेतीचं मोठा नुकसान
वनविभागाने जारी केला अलर्ट
भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी
अधूनमधून अवकाळी पाऊस बरसत असल्याने भाजीपाला पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.