Maharashtra Breaking Marathi News Live | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात मुसळधार पाऊस
Maharashtra Breaking and Marathi News Live : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला जळगावातील पाचोऱ्यात घडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यातील 147 बाजार समितीसाठी आज मतदान होणार. पुणे जिल्ह्यातील बाजार समितीच्या मतदानामध्ये चुरस वाढणार. पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या 143 जागांसाठी आज मतदान, 321 जण रिंगणात. जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगरसह 21 बसस्थानकांचा विस्तार होणार. 102 कोटींचा सुधारित प्रस्ताव मंजूर. गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस. भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचा हैदराबाद येथे मुख्यमंत्री केसीआर यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिति पक्षात जाहिर प्रवेश. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
Jalgaon Rain | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात मुसळधार पाऊस
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने झोडपून काढलं. काल फत्तेपूर परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जनावरांच्या चारासह शेतातील पिकाचे, फळ बागांचे नुकसान झालंय.
-
नोटाबंदीची मागणी जोरात
या नोटेविरोधात नागरीकांचा मोठा रोष
अर्थतज्ज्ञांनी आता उठविला आवाज
म्हणाले देशाचं होतंय मोठं नुकसान
मोदींच्या नोटबंदीची पुन्हा रंगली चर्चा, बातमी वाचा
-
-
श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर
मुकेश अंबानी यादीत फेकले गेले मागे
मार्क झुकरबर्गने केली कमाल
एकाच दिवसात केली एवढी कमाई
मुकेश अंबानी यांना झुकरबर्गने मागे ढकलले, वाचा बातमी
-
दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक
९९.५१ टक्के झाले मतदान
३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
दौंडचे आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या पॅनलमध्ये लढत
दौंड बाजार समितीच्या निकालाकडे लक्ष
-
मंचर बाजार समिती अपडेट
मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 97.81 टक्के मतदान
1558 पैकी 1524 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
15 जागांसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
उद्या सकाळी होणार मतमोजणी प्रक्रिया
3 जागाची निवडणूक ही बिनविरोध
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला
-
-
बीड वडवणी बाजार समिती निवडणूक
बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
18 जागेवरही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
राज्यातील पहिली बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात
विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
भाजपच्या राजा मुंडे यांच्या पॅनलचा दारुण पराभव
-
नकोशा कॉल्सपासून आता होणार सूटका
देशातील कोट्यवधी ग्राहकांना मिळणार गिफ्ट
स्पॅम एसएमएसला पण होणार अटकाव
देशातील बोगस कंपन्यांवर कारवाई
दूरसंचार विभागाने शोधली नामी युक्ती
1 मे पासून बदलणार हा नियम, असा होईल फायदा, वाचा बातमी
-
आंदोलकांचा गैरसमज दूर करावा – अजित पवार
प्रकल्पामुळे फायदा होत असल्यास लोकांना समजावून सांगावं
प्रकल्पाला विरोध नाही, पर्यावरणाचा ऱ्हास नको
रिफायनरीला विरोध का? प्रशासनानं जाणून घ्यावं
चर्चेतून मार्ग निघू शकतो
लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची माहिती द्यावी
ठाकरे गटातील राजन साळवींचा प्रकल्पाला पाठिंबा
प्रकल्पातून हजारो लोकांना रोजगार मिळेल
बारसूतील लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या
वेळ पडली तर बारसूला जाणार
भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावू नका
बॅनर लावून काही फायदा होणार नाही
सासुरवाडीत माझ्यावर प्रेम ऊतू चाललंय असं दिसतंय
मुख्यमंत्री पदासाठी 145चा आकडा लागतो
-
जालना: 5 कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी आज 2 बाजार समितीची निवडणूक पार
जालना जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी आज दोन बाजार समितीची निवडणूक पार
घनसावंगी बाजार समितीमध्ये 95 टक्के मतदान झाले
परतूर बाजार समितीच्या निवडणुकीत 94 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला
घनसावंगी बाजार समिती ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार
परतूर बाजार समिती मा. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार
-
जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समितीचे आज मतदान संपले
दुपारपर्यंत 73 टक्के मतदान
जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 213 जागांसाठी 446 उमेदवार रिंगणात
एकाच दिवशी या ठिकाणी हे मतदान पार पडले
मतमोजणी दोन टप्प्यात होणार
दि.29 एप्रिल रोजी भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा,जामनेर या 6 बाजार समितीची मतमोजणी होणार
दि. 30 एप्रिल रोजी जळगाव, अमळनेर, पाचोरा,बोदवड, यावल, धरणगाव या 6 बाजार समितीची मतमोजणी होणार
-
मुंबई: महाविकास आघाडी कडून वज्रमूठ सभेसाठी मोर्चे बांधणी
महाविकास आघाडी कडून वज्रमूठ सभेसाठी मोर्चे बांधणी
मातोश्री जवळ कलानगर चौकात वज्रमूठ सभेचा मोठं बॅनर
महाविकास आघाडी कडून 1 मे रोजी वांद्रे कुर्ला संकुल येथे वज्रमूठ जाहीर सभेचे आयोजन
संविधान वाचवण्यासाठी वज्रमूठ सभेत मोठे संख्येने सामील व्हा असे बॅनरच्या माध्यमातून आव्हान
-
बीड: वडवणी कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक
वडवणीत 98 टक्के मतदान
वडवणीत मतमोजणीला सुरुवात
थोड्याच वेळात निकालाची प्रतीक्षा
कोण बाजी मारणार याकडे लक्ष
राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके आणि भाजपच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
-
नाशिक – बाजार समिती मतदान प्रक्रिया पूर्ण
नाशिक जिल्ह्यात 12 बाजार समित्यांसाठी शांततेत मतदान
3 वाजे पर्यंत अंदाजे 90 टक्के मतदान
यंदा बाजार समिती निवडणुकीला ग्लॅमर
मतदारांना थेट पंचतारांकित हॉटेल मधून नेले मतदान केंद्रावर
घोटी, दिंडोरी, कळवण, सिन्नर आणि देवळा मध्ये आजच होणार मतमोजणी
उद्या उर्वरित 7 बाजार समित्यांसाठी मतमोजणी
-
अमरावती: कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शांततेत मतदान
अमरावती जिल्ह्यात सहाही कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शांततेत मतदान
जिल्ह्यात कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नाही
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरुवात होईल
अमरावती वगळता तिवसा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, मोर्शी व चांदुर रेल्वे या बाजार समितीची मतमोजणी आज सायंकाळी ५ वाजता सुरवात होईल
रात्री 11 वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल
अमरावती वगळता आज रात्री उशिरा सर्व पाचही बाजार समितीचे निकाल हाती येणार
आमदार रवी राणा,आमदार यशोमती ठाकूर, खासदार अनिल बोंडे यांची प्रतिष्ठा पणाला
-
संभाजी ब्रिगेडनं घेतली आक्रमक भूमिका
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी महाराज उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवा
14 मे पर्यंत पुतळा बसवला नाही तर उद्यानात घुसून पुतळा बसवणार
संभाजी ब्रिगेडनं घेतली आक्रमक भूमिका
पुतळा जाणीवपूर्वक बसवला जात नाही
संभाजी ब्रिगेडचा आरोप
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिलं निवेदन
उद्यानात14 मे पर्यंत पुतळा बसवण्याची केली मागणी
-
पोलीस बंदोबस्तात मतदारांचा ताफा त्रंबकेश्वर मध्ये दाखल
नाशिक : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदारांची करण्यात आली होती पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था
याच हॉटेल पासून बस मधून मतदार त्रंबकेश्वर मध्ये दाखल
मतदारांचे बस आणताना पोलिसांचा बंदोबस्त
-
पुण्यातून धावणार ‘भारत पर्यटक ट्रेन’
पुणे : आजपासून भारत पर्यटक ट्रेनला पुण्यातून सुरूवात
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेअंतर्गत पुण्यातून धावणार पर्यटक ट्रेन
जगन्नाथ पुरी, कोलकत्ता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना नागरिकांना देता येणार भेट
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने ट्रेनचे उद्घाटन
भारत गौरव पर्यटक ट्रेन दहा दिवस दाखवणार देशातील मुख्य धार्मिक स्थळे
-
वाशिम, मानोरा बाजार समितीत 46 टक्के मतदान.
वाशिम : जिल्ह्यातील दोन बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
सकाळी 8 वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दुपारी 12 वाजेपर्यंत 46. 8 टक्के मतदान
तर मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत दुपारी बारा वाजेपर्यंत 46 टक्के मतदान झाले आहे.
-
शहरात गणेश कॉलनी परिसरात रस्त्यावर साचले पाणी
छत्रपती संभाजीनगर : शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
-
साई मंदिराला CISF सुरक्षा नको
शिर्डी : ग्रामस्थांनी दिलीये १ मे रोजी शिर्डी बंदची हाक
शिर्डी ग्रामस्थ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीला
पालकमंत्र्यांच्या भेटीनंतर ठरवणार पुढील दिशा
CISF संदर्भात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी ग्रामस्थांची मागणी
-
नाना पटोले यांना जनता नाकारेल – परिणय फूके
भंडारा : नाना पटोले यांच्या हा बालेकिल्ला नाही आहे मागील वेळी काही फरकाने ते जिंकले
लोकांनी नाना ला आता नाकारले आहेत
200 टक्के विजय भाजपच्या असणार आहे
भाजपच्या काही लोकांनी भंडारामध्ये काँग्रेसच्या पॅनल मधून निवडणूक लढत आहे त्यांच्यावर आम्ही कुठल्याच प्रकारचे कारवाई करू नये
परिणय फूके यांची प्रतिक्रिया
-
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा दोन गटात राडा
चाळीसगाव : जमावाला पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सौम्य लाठीचार्ज
महाविकास आघाडी व भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये तिसऱ्यांदा वाद झाला आहे
मतदान केंद्रामध्ये जाण्यावरून उमेदवारांमध्ये वाद झाला आहे
-
भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील मतदान केंद्रावर मतदार राजाची भर उन्हात रांगच रांग
भंडारा : मोठ्या संख्येने महिला वर्ग मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल भाजपचे माजी मंत्री परीने फुके यांची प्राणप्रतिष्ठा पणाला
-
सत्तेचा गैरवापर तरीही निवडणुकांमध्ये यश महाविकास आघाडीलाच – एकनाथ खडसे
– जळगाव जिल्ह्यामध्ये सत्तेचा गैरवापर करत मतदान प्रक्रिया सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला.
– मतदान केंद्रावर चक्क मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जात असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला.
– निवडणुका पारदर्शीपणाने पार पाडल्या जात नाहीत. पोलिसांचा दबाव, पैशांचा पाऊस, सत्तेचा दुरुपयोग करून अशा वातावरणात निवडणुका पार पाडल्या जात आहेत.
– सत्तेचा दुरुपयोग केला जात असल्याचं चित्र यावरून दिसून येत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत बाजार समिती निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीलाच यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला.
-
मुख्यमंत्रीपदाचा भाजपने लिलाव केला, नाना पटोले यांचा आरोप
– भाजपाने,बेशम आणि निर्लज्जपणाची हद पार केली आहे.
– खारघर हत्याकांड अमित शाह यांनी घडवून आणला.
– भाजपा देशासाठी हानीकारक आहे
– लोकसभेमध्ये 70 टक्के खासदार हे काँग्रेसचे आहेत त्यांना प्रलोभन आणि दबाव आणून आपल्याकडे आणले
– कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाचा भाजपने लिलाव केला
– काँग्रेसने देश उभा केला. काँग्रेसला बेशरम म्हणण्यापेक्षा त्यांनी आपला चेहरा आरशामध्ये बघावा
– शेतकऱ्यांना आम्ही भरीव मदत देऊ, आनंद शिधा देऊ असे विधानसभेच्या पटलावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलले, मात्र केले काही नाही
– महाविकास आघाडीचे बडे नेते आमच्या संपर्कात आहे असे उदय सामंत आणि विखे पाटील म्हणतात. त्यांच्याकडे बोलण्याचेच काम दिले आहे का ?
-
कुटुंबासाठी हपापलेपणा कोण करत आहे ? मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर द्यावे – सुषमा अंधारे
– केवळ कुटुंबापुरता हपापलेपणाचा चष्मा घालून वापरणारी माणसे यांना धनसेवा हीच ईश्वरसेवा वाटते. हे वाक्य सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आरशासमोर बघून म्हटले आहे का ?
– कारण केवळ कुटुंबापुरता विचार करणाऱ्या माणसांच्याबद्दल जर आपण बोलत असाल तर मुळात वकूब असणाऱ्या माणसांनी मग ती एकाच कुटुंबातनं असली तरी ते चालू शकतात
– म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी वकूब असणारी माणसे आहेत.
– प्रबोधनकार ठाकरे यांच्यानंतर वंदनीय बाळासाहेब हे तितकच वकुबाचे नाव होतं आणि त्यानंतरची चौथी पिढी आदित्य ठाकरेही तितकाच वकूब निर्माण करत आहेत.
– आत्ताच्या नव्या जनरेशन मध्ये पण तरीसुद्धा स्वतःच्या कुटुंबापुरता विचार करणारी हातातलेली माणसं असं जेव्हा मुख्यमंत्री महोदय म्हणतात तेव्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे की भरत गोगावले यांचे सुपुत्र राजकारणात येतात.
– स्वतः मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब राजकारणात येतात. तिकडे रामदास कदम साहेबांचे पुत्र राजकारणात येतात. मग कुटुंबासाठी आपापलेपणा कोण करत आहे याचे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले पाहिजे असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
-
जिया खान आत्महत्या प्रकरणात कोर्टाने दिला निकाल
अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणात कोर्टाने निकाल दिला आहे.
सूरज पांचोलीला दिलासा मिळालाय.
सूरज पांचोलीची निर्दोष सुटका झाली आहे.
सूरज पांचोली अभिनेता आदित्य पांचोलीचा मुलगा आहे.
सबळ पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली आहे.
-
सुषमा अंधारे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, शेतात दोन दोन हेलिपॅड, इतकी अवस्था कधीपासून चांगली ?
– सर्वसामान्य माणसाच्या शेतामध्ये कधी हेलिपॅड आणि हेलिकॉप्टर उतरलेले नाहीत.
– पण, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या गावात राहतात त्या गावात नीट रस्ते नाही.
– त्या गावात मुख्यमंत्र्यांच्या शेतावर उतरायला मात्र अगदी दोन दोन हेलिपॅड आहेत.
– कधीपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था इतकी चांगली झाली याच्यावर मुख्यमंत्री महोदय आम्हाला मार्गदर्शन करतील का आसा खोचक टोला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा
– मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 साली छटपूजे संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून दिल्ली हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
– राज ठाकरे यांनी छटपूजे संदर्भात चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.
– या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एखाद्या व्यक्तीच्या भाषणाने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत असे म्हटले आहे.
– राज ठाकरे यांच्याविरुद्धचे समन्सही दिल्ली हायकोर्टाने रद्द ठरवले.
– धर्म आणि श्रद्धा ही माणसाइतकी नाजूक नसते, तसेच राज ठाकरे यांच्या भाषणाने धार्मिक भावनांचा भंग होऊ शकत नाही असे निरीक्षणही दिल्ली हायकोर्टाचे नोंदवले आहे.
-
उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यातच बॅनरबाजी करून शिवसेनेने दिले आव्हान
– मुंबईच्या बांद्रा परिसरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे.
– मात्र त्याआधीच शिवसेनेने बांद्रा परिसरातच बॅनरबाजी करून उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.
– सेनाभवन ते बीकेसी परिसरात महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेची बॅनरबाजी केली आहे.
– तर शिवसेनेने विलेपार्ले, एयर पोर्ट ते बीकेसी परिसरामध्ये महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांची जोरदार बॅनरबाजी करत उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिलंय.
– उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या सामन्यातून 1 मे निमित्ताने होत असलेल्या या बॅनरबाजीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
– बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न होतोय का अशी चर्चाही सुरु झाली आहे.
-
बारसू रिफायनरी विरोधात आज भव्य मोर्चा निघणार
बारसूच्या माळराणावर आज मोर्चाचे आयोजन
खासदार विनायक राऊत मोर्चाचं नेतृत्व करण्याची शक्यता
बारसूमध्ये पोलीसांचा बंदोबस्त तैनाद
-
राज्यात आज 147 बाजार समित्यांच्या निवडणूका
30 तारखेला 88 बाजार समित्यांसाठी निवडणूक होणार
253 कृषी उत्पन्न बाजार समीत्यांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनवीरोध
मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त
-
जोडे पुसायची लायकी असणारे लोक आता सत्तेत बसले आहेत- उध्दव ठाकरे
उध्दव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात
2019 मध्ये जोडे पुसायला कोण गेलं होतं? एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर पलटवार
गद्दारांना जनता आता जोडे पुसायला ठेवणार- संजय राऊत
-
आता अंतराळात पेट्रोल पंप
उपग्रहांसाठी होणार मोठी मदत
अंतराळातच भरता येणार इंधन
अमेरिकन कंपनीने घेतला पुढाकार
आता मानवाला दूरचा पल्ला गाठता येणार, वाचा सविस्तर
-
सेनेचा स्थापना दिवस माहिती नसणारे राऊत आम्हाला सेना शिकवतात- नितेश राणे
उद्धव ठकरे महाविकास आघाडीसाठी ओझं झाले आहे- नितेश राणे
1 मे रोजीची मविआची सभा शेवटची सभा ठरणार- नितेश राणे
संजय राऊत शिवसेना नाव वापरून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अपमान करीत आहेत- नितेश राणे
-
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार उतरले
धाराशिवमध्ये 144 जागांसाठी 327 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
13 हजारांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार
धाराशिवमध्ये मविआ विरूध्द महायुती निवडणूक लढविणार
-
एकाच दिवसात संजय राऊत यांच्या भोंग्याचा डेसिबल कमी झाला- नितेश राणे
राऊतांनी आज फडणवीसांचे कौतुक केले- नितेश राणे
इतक्या लवकर हा बदल घडेल अशी अपेक्षा नव्हती- नितेश राणे
संजय राऊत आता थेट शरद पवारांच्या भुमीकेवर प्रश्न निर्माण करत आहेत- नितेश राणे
-
नागपूरातील कॅन्सर हाॅस्पिटल उभारणे हे राजकारणा पलिकडचे काम- संजय राऊत
कॅन्सर हाॅस्पिटलच्या निर्माणाबद्दल संजय राऊत यांनी केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
भाजपला शिंदे गटाचं ओझं झालंय, संजय राऊत यांची टीका
बारसू प्रकल्पाप्रकरणी सरकारने भूसंपादन आणि सर्वेक्षण मागे घ्यायला हवे- संजय राऊत
-
एकाच दिवसांचा राऊतांच्या भोग्यांचा डेसिबल कमी झाला – नितेश राणे
माझ्या पत्रकार परिषदेमुळे राऊतांच्या भोग्यांचा डेसिबल कमी झाला.
नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली टीका
संजय राऊत ना आता ठाकरेंचे राहिले ना पवारांचे
-
छत्रपती संभाजी नगर – सिडकोच्या अतिक्रमण हटाव पथकाला वैतागून तरुणाने पेटवले दुकानातील साहित्य
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील बजाज नगर परिसरातील घटना
माणिक ज्ञानोबा शिंदे असं वैतागून साहित्य पेटवणाऱ्या दुकानदाराने नाव
ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानातील साहित्याला लावली आग
अनेक वेळा विनवण्या करूनही अतिक्रमण पथक ऐकत नसल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल
शेती विकून उभारले होते ऑटो स्पेअर पार्टचे दुकान
-
नवी दिल्ली – खासदार संजय राऊत तेलंगणाला जाणार
तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांची राऊत भेट घेणार
मे महिन्यात संजय राऊत तेलंगणाला जाण्याची शक्यता
आगामी निवडणुकांबाबत होणार महत्त्वपूर्ण चर्चा, सूत्रांची माहिती
-
कराड – पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील रिसवड गावात गव्याचा हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू
उपचारादरम्यान झाला मृत्यू
मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हिराबाई गोपीनाथ पवार, त्या 42 वर्षांच्या होत्या.
शेतात काम करत असताना गव्याने केला हल्ला…
वनविभागाच्या हलगर्जीपणा मुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा हल्ल्यात वाढ….
-
भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालं आहे – संजय राऊत
भारतीय जनता पक्षाला शिंदे सरकारचं ओझं झालं आहे, हे ओझं किती काळ वाहायचं हा भाजपचा प्रश्न आहे.
ठाकरेंवर टीका करणाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल
-
LSG IPL 2023 : चक्रीवादळात फसला, खाण्या-पिण्यासाठी भटकण्याची वेळ, डिप्रेशनमध्ये गेला, आता बनला KL Rahul चा प्राण
LSG IPL 2023 : 4 वर्ष या खेळाडूसाठी खूप कठीण होती. त्याने बऱ्याच संकटांचा सामना केला. चक्रीवादळात अडकला होता. ज्या अपार्ट्मेंटमध्ये तो उतरलेला, तिथलं छप्पर उडून गेलं होतं. खाण्या-पिण्यासाठी भटकण्याची वेळ त्याच्यावर ओढवलेली. वाचा सविस्तर….
-
पंढरपूर – जोरदार वावटळीने झोळी उडाली, झोपलेल्या बालिकेचा दगडावर आपटून मृत्यू
सांगोला तालुक्यातील जवळा येथे मरीआई गाडीवाले कुटुंबातील दोन वर्ष वयाची कस्तुरी साधू चव्हाण हिला पालातील झोळीत झोपवले होते.
दुपारी अचानक जोरदार वावटळ आल्याने झोळी उडून दगडावर आपटली यात कस्तुरीचा डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला.
यामुळे हळहळ व्यक्त होत आहे
-
Pak vs NZ 1st ODI : अखेर पाकिस्तानने 103 दिवसानंतर वनडेमध्ये मिळवला कडक विजय, फखर जमांच तुफानी शतक
Pakistan vs New Zealand : वनडेमध्ये पाकिस्तानचा हा 500 वा विजय आहे. पाच वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये पाकिस्तानने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. फखर जमांची सेंच्युरी या सामन्याच वैशिष्ट्य ठरलं. वाचा सविस्तर…..
-
RR vs CSK IPL 2023 : ….आणि एमएसचा संयम सुटला, धोनी चिडल्याचा VIDEO व्हायरल
RR vs CSK IPL 2023 : मॅचमध्ये एका प्रसंगात धोनीला स्वत:वर नियंत्रण ठेवता आलं नाही. धोनी वैतागल्याच अपवादाने घडलय. काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात धोनी चिडल्याच दिसून आलं. वाचा सविस्तर….
-
IPL 2023 : CSK च्या टीममधील महाराष्ट्राच्या प्लेयरला MS Dhoni का संधी देत नाहीय?
RR vs CSK : 20 वर्षाच्या या खेळाडूने सीजनच्या पहिल्या सामन्यात खेळताना कमाल केली होती. राजस्थान रॉयल्सने सीएसकेवर 32 धावांनी विजय मिळवला. वाचा सविस्तर…
-
मतदानाची गती संथ
संपूर्ण पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील 32 गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून मतदान सुरू झालय…. सुरुवातीच्या काळात मतदान संत गतीने सुरू असून सासवड आणि परिसरामध्ये वरुण राजाने सकाळपासूनच आगमन केलय.
-
इंदापूर बाजार समितीसाठी आज मतदान
इंदापुरात मतदान केंद्रावर करण्यात आलं मतपेटीचे पूजन
4332 मतदार बजावणारा मतदानाचा हक्क
इंदापुरात एकूण 10 मतदान केंद्रावरती पार पडणार मतदान प्रक्रिया
सकाळी आठ वाजता होणार मतदानाला सुरुवात
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 जागांसाठी आज मतदान होतय
या निवडणुकीत आतापर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत
-
सोने-चांदीचा आजचा भाव काय
सोने-चांदीत आठवड्यापासून दरवाढ नाही
ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा
शंभर रुपयांनी किंमतीत चढउतार
चांदी देणार ग्राहकांना जोरदार परतावा, वाचा बातमी
-
सिग्नलवर स्ट्रीट लाईटच्या पोल कोसळला
नागपूरात गुरुवारच्या रात्री अचानक सोसाट्याचा वादळी वाऱ्याने रेशीमबाग चौकातील सिग्नलवर स्ट्रीट लाईटच्या पोल कोसळला. सुदैवाने कुठली जीवित हानी झाली नाही. मात्र दोघाना किरकोळ दुखापत तर एका दुचाकीच नुकसान झालय. त्यानंतर पडलेला हा पोल हटवण्यात आलाय.
-
जळगावमध्ये कृउबा निवडणुकीत गोंधळ
जळगावमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बाचाबाची
मराठा महाविद्यालयाच्या केंद्रावर झाला गोंधळ
बोगस मतदानाची तक्रार
-
अहमदनगरमध्ये दोन गट समोरसमोर भिडले
अहमदनगर तालुका बाजार समितीच्या मतदानावेळी दोन गट समोरसमोर भिडले
भाजपची मतदारांना घेऊन येणारी बस थेट मतदान केंद्रावर आणल्याने राढा
भाजप आणि महाविकास आघाडीच्या दोन गटात एकमेकांच्या समोरासमोर
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले समर्थक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बचाबाची
-
पोलीस आणि मतदारांमध्ये मोठी बाचाबाची
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रावर मोठी गर्दी
मतदान केंद्रात जाण्यासाठी मतदारांचा गोंधळ
मतदान केंद्राच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त
पोलीस आणि मतदारांमध्ये मोठी बाचाबाची
-
पुणे शहरात पावसाला सुरूवात
शहरातील अनेक भागात पावसाची हजेरी
आज आणि उद्या शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याकडून शहरासाठी ऑरेंज अलर्ट जारी
शहरातील हडपसर ,स्वारगेट, कात्रज या सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस
-
मोदी सरकारचा नवीन रेकॉर्ड
पेट्रोल-डिझेलच्या भावात नाही वाढ
गेल्या 11 महिन्यांपासून रोखली दरवाढ
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फेरबदल नाही
तुमच्या शहरातील इंधनाचा भाव घ्या जाणून
भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, बातमी एका क्लिकवर
-
संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार
महावितरणच्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा महापालिकेचा निर्णय
रविवारी सकाळी देखील कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात लागू झाल्यास कशा पद्धतीने नियोजन करायचे, याची लिटमस टेस्ट यातून होणार
-
अमरावती जिल्ह्यातील 12 पैकी 6 कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान आज
माजी कृषी मंत्री भाजप खासदार डॉ अनिल बोंडें,काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर,आमदार रवी राणा यांची प्रतिष्ठा पणाला
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार रवी राणांचे बंधू सुनील राणा निवडणुकीच्या रिंगणात.
अमरावती, मोर्शी, तिवसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी कडे सगळ्यांचे लक्ष..
अमरावती,तिवसा, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे,अंजनगावसुर्जी व मोर्शी या बाजार समितीसाठी आज मतदान.
-
बीडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
बीडमध्ये विजांचा कडकडाट , गेवराई आणि वडवणी तालुक्यात अवकाळी पाऊस
ग्रामीण भागातील ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली
अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ
-
पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या १४३ जागांसाठी आज मतदान, ३२१ जण रिंगणात
जिल्ह्यातील हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, मंचर, खेड, जुन्नर, नीरा या ८ बाजार समित्यामध्ये निवडणूक
१४३ उमेदवारापैकी ९ उमेदवार बिनविरोध
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही तब्बल २० वर्षांच्या खंडानंतर यंदा पहिल्यांदाच होत आहे
हवेलीसह अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये दुरंगी लढत होत आहे.
बारामती येथील बाजार समितीचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बाजार समितीत संचालक मंडळाच्या एकूण प्रत्येकी १८ जागा आहेत. बारामतीत मात्र १७ जागा आहेत.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणार मतदान
18 जागांसाठी 57 उमेदवार रिंगणात
तर शहरात एकूण 4 मतदान केंद्र
31 मतदान सतरा हजार 764 मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सकाळी 80ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ
-
राज्यातील 147 बाजार समितीसाठी आज मतदान, उमदेवारांचं भवितव्य होणार मतपेटीत बंद
पुणे जिल्ह्यातील बाजार समितीच्या मतदानामध्ये चुरस
जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समिती साठी पार पडणार मतदान
राज्यातील एकूण 18 बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पडली आहे पार
तर 28 एप्रिल 29 एप्रिल आणि 1 मे रोजी होणार मतमोजणी
राज्यातील अनेक बडे नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला
Published On - Apr 28,2023 7:17 AM