Maharashtra Breaking Marathi News Live | मुंबईत ‘या’ भागात 4-5 मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

| Updated on: Apr 30, 2023 | 6:59 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला जळगावातील पाचोऱ्यात घडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Breaking Marathi News Live | मुंबईत 'या' भागात 4-5 मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील 147 बाजार समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यापैकी 95 बाजार समितीचा निकाल आज लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आजही राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. महिला पहिलवानांचं आंदोलन आणि तक्रारीनंतर अखेर भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर दोन एफआयआर दाखल, पोक्सो अंतर्गत केसही दाखल. जेईई मेन्स 2023च्या सेशन-2चा निकाल जाहीर. ब्रिटनमध्ये राजेशाही धोक्यात, 45 टक्के लोकांचा राजेशाहीला विरोध. यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Apr 2023 09:12 PM (IST)

    मध्य रेल्वेची अप धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत

    मुंबई :

    मध्य रेल्वेची अप धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत कल्याणकडून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या

  • 29 Apr 2023 08:29 PM (IST)

    Mumbai Water Supply | मुंबईतील या भागात 4 आणि 5 मे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा

    मुंबईतील वांद्रे पश्चिम आणि खार पश्चिमसह संपूर्ण ‘एच पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रात 4 मे सकाळी 10 ते 5 मे पहाटे 4 वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरून सहकार्य करावे, अंस आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

  • 29 Apr 2023 08:24 PM (IST)

    MI vs RR, IPL 2023 | रविवारी मुंबई विरुद्ध राजस्थान आमनेसामने

    रविवारी 30 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.  या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. सामन्याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर

    बातमीची लिंक | IPL 2023 MI vs RR Live Streaming | मुंबई-राजस्थान आमनेसामने, कोण करणार ‘हल्लाबोल’?

  • 29 Apr 2023 08:22 PM (IST)

    ईपीएफओची वेबसाईट वारंवार क्रॅश

    सदस्यांना नाही चेक करतायेत बॅलन्स

    गेल्या तीन दिवसांपासून सदस्य झाले हैराण

    तरीही तुमचे पीएफ बॅलन्स पाहता येणार

    अशी आहे एकदम सोपी पद्धत, वाचा ही बातमी 

  • 29 Apr 2023 07:39 PM (IST)

    या देशामुळे अवघ्या जगाची लोकसंख्या आटोक्यात

    या देशाचे अवघ्या जगाने मानावे आभार

    त्याच्यामुळे कमी झाला पृथ्वीवरचा लोकसंख्येचा भार

    अमेरिका, चीनसारखी राष्ट्रे आहेत प्रमुख ग्राहक

    पण हा देश असं विकतो तरी काय खास, वाचा बातमी 

  • 29 Apr 2023 06:51 PM (IST)

    करायला गेले गणपती अन् झाला मारुती

    स्वस्त कच्चा तेलाने व्यापाराचे गणित बिघडवलं

    रशियासोबतच्या व्यापारात भारताला बसला फटका

    चीननंतर रशियासोबत पण तोच का आला अनुभव

    कुठे झाली चूक, काय चुकले गणित, वाचा सविस्तर 

  • 29 Apr 2023 05:47 PM (IST)

    कमी पगारात असे व्हा श्रीमंत

    30 हजारांच्या पगारात व्हा करोडपती

    या Formula येईल कामी

    या हिट फॉर्म्युलाची बातच न्यारी

    श्रीमंती येईल घरी-दारी, वाचा बातमी 

  • 29 Apr 2023 04:53 PM (IST)

    नोटबंदीतील या गोष्टीचा पडला विसर

    केवळ 500, 1000 वर नाही झाली कारवाई

    या नोटा पण झाल्या चलनातून बाद

    कितीवेळा झाली नोटबंदीची देशात कमाल

    कोणत्या नोटा झाल्यात या मोहिमेत बाद, वाचा बातमी 

  • 29 Apr 2023 02:22 PM (IST)

    Maharashtra APMC Election Result | कन्नड बाजार समितीत संजना जाधव यांचा हर्षवर्धन जाधव यांना ‘दे धक्का’

    संजना जाधव आणि नितीन पाटील पॅनलचे 15 सदस्य विजयी,

    हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलच्या सर्वच सदस्यांचा उडाला धुव्वा,

    कन्नड बाजार समितीवर शिंदे गट आणि संजना जाधव पॅनलने फडकवला झेंडा,

    18 पैकी 15 जागांवर मिळवला विजय,

    संजना जाधव यांच्या पॅनलने हर्षवर्धन जाधव पॅनलला चारली धूळ

  • 29 Apr 2023 12:41 PM (IST)

    किरीट सोमैय्या हल्ला प्रकरण, आणखी 8 शिवसैनिकांना अटक

    – पुणे महापालिका कार्यालयात 5 फेब्रुवारी 2022 रोजी बाजप नेते किरीट सोमैय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला होता.

    – याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी 8 शिवसैनिकांना अटक केली आहे.

    – निलेश रामचंद्र राऊत, अजिंक्य प्रकाश पगारे, संदीप गणपत गरुड आणि विक्रम उर्फ (विकी) कैलास धोत्रे या चार जणांना येरवडा तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

    – तर अनिल नारायण दामजी, संजय गवळी उर्फ लक्ष्मण नागप्‍पा फरीद खाने, अक्षय सिताराम माळकर यांना अटक होऊन बेलद्वारे सोडण्यात आले.

    – राजेश मोरे हे अजून पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले नाहीत पण त्यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे, अशी माहिती किरीट सोमैया यांनी दिली.

  • 29 Apr 2023 12:30 PM (IST)

    Social Media वर चाचा झाले एकदम फेमस

    एक प्रेरणादायी कहाणी पळवेल तुमची निराशा

    पैशांची नाही गरज, मन जिंकणार या काकांचे उत्तर!

    मुंबईतील रेल्वे स्टेशनवर रुमालाची करतात विक्री

    74 वर्षीय ‘चाचा’ ची वाचा ही  प्रेरणादायी कहाणी 

  • 29 Apr 2023 12:26 PM (IST)

    हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब…, चित्र वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका

    – भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

    – हिरवा साप गळ्यात घेऊन फिरणारे जनाब सर्वज्ञानी संजय राऊत हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टिका करू लागलेत.

    – राऊतांना काँग्रेसची हुजरेगिरी करावी लागतेय, यापेक्षा दुर्देव काय असणार ?

    – त्यांची निष्ठा आता काँग्रेसच्या चरणी वाहतेय.

    – सत्तेसाठी खुर्च्या उचलणारे राऊत आता काँग्रेस नेत्यांच्या चपलाही उचलायला लागलेत, यात आश्चर्य ते काय ? अशी टीका वाघ यांनी केली.

  • 29 Apr 2023 12:24 PM (IST)

    Aadhaar Card करा अपडेट

    आता माहिती अद्ययावत करणे एकदम सोपे

    घरबसल्या असे करता येईल तुम्हाला बदल

    इतके लागेल शुल्क तर ही आहे अंतिम तारीख

    समजून घ्या सर्व प्रक्रिया, एका क्लिकवर 

  • 29 Apr 2023 11:55 AM (IST)

    मुंबईत होणऱ्या वज्रमुठ सभेसाठी आज महाविकास आघाडीची मातोश्रीवर बैठक

    सभेत कोणते नेते भाषण करणार यावर बैठकीत चर्चा होणार

    1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा

    या सभेची संपूर्ण जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर असणार आहे

  • 29 Apr 2023 11:32 AM (IST)

    Bajar Samiti Election Result 2023 : भुजबळांच्या शेतकरी विकास पॅनलचा उमेदवार विजयी

    नाशीकच्या पिंपळगाव बाजार समितीच्या तीन जागांचा निकाल हाती

    दिलीप बनकर यांच्या शतकरी विकास पॅनलचे तीनही उमेदवार विजयी

  • 29 Apr 2023 11:25 AM (IST)

    224 परप्रांतियांच्या बारसूत जागा- विनायक राऊत

    बारसूमध्ये जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये मोदी आणि शहा नावांच्या 20 ते 22 जणांचा समावेश- विनायक राऊत

    बारसूमधला प्रकल्प भूमाफियांचं भल कपण्यासाठी- विनायक राऊत

    बारसू रिफायनरीचा वाद चिघळत चाललायं

  • 29 Apr 2023 11:20 AM (IST)

    मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

    मुंबई-पुणे महामार्गावर झाली मोठी वाहतूक कोंडी

    सलग सुटट्ययांमुळे नागरिक पडले बाहेर, बोर घाटात मोठी वाहतूक कोंडी

  • 29 Apr 2023 11:16 AM (IST)

    अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतपिकांसह फळबागांना फटका

    नेवासा तालुक्यात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

    गाराच्या पाऊसाने प्रचंड नुकसान

    अनेकांच्या घराची छते उडाली

  • 29 Apr 2023 11:00 AM (IST)

    मुंबईत 1 मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा

    – मुंबईत 1 मे रोजी होणार महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा

    – सभेआधी मविआ नेत्यांची एकत्रित बैठक

  • 29 Apr 2023 10:56 AM (IST)

    24 परप्रांतियांच्या बारसूत जागा – विनायक राऊत

    24 परप्रांतियांच्या बारसूत जागा आहेत, विनायक राऊत यांनी केला आरोप

    ही जागा भूमाफियांचे भलं करणारी आहे, यामुळे स्थानिकांचं, ग्रामस्थांचं भलं होणार नाहीये.

  • 29 Apr 2023 10:40 AM (IST)

    नितेश राणेंनी लगावला संजय राऊतांन टोला

    तुमच्या तोंडून मराठी माणूस आणि त्यांचं हित हे शब्द ऐकायला चांगले वाटत नाही, नितेश राणेंचा टोला

    बारसूत बळाचा वापर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले नाही

    बारसूतील आंदोलन चिघळवण्याचे आदेश मातोश्रीवरून, नितेश राणेंचा आरोप

  • 29 Apr 2023 10:34 AM (IST)

    नितेश ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंवर टीका

    आदित्य ठाकरे यांची वाघाची डरकाळी नव्हे, त्यांचा आवाज तर म्यांव, म्यांव

    नितेश ठाकरेंनी केली आदित्य ठाकरेंच्या आवाजाची नक्कल

    संजय राऊतांवरही केले आरोप

  • 29 Apr 2023 10:27 AM (IST)

    या सिमेंट कंपनीने केले मालामाल

    कंपनीला फटका, पण लुटवला बक्कळ पैसा

    शेअर बाजारात तर या बाजीगरचीच चर्चा

    इतका दिला गुंतवणूकदारांना लाभांश

    तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का हा शेअर, वाचा सविस्तर 

  • 29 Apr 2023 10:22 AM (IST)

    बारसूतील आंदोलकांवर निर्घृण लाठीचार्ज झाला – संजय राऊत

    मुख्यमंत्र्यांना अधिकारी खोटी माहिती देत आहेत

    लाठीचार्ज झालाच नाही, शिंदेना अधिकाऱ्यांची खोटी माहिती

    जिल्हाधिकारी खोटी माहिती देत असतील तर त्यांना हटवा

    फडणवीसांकडून मॉरिशिअसमधून लाठीचार्जचे आदेश , राऊतांचा मोठा आरोप

    बारसूवरून मविआत मतभेद नाहीत

  • 29 Apr 2023 09:54 AM (IST)

    राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट

    राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. २९ व ३० एप्रिल रोजी तसेच १ व २ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे. त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे…सविस्तर वाचा

  • 29 Apr 2023 09:43 AM (IST)

    बनावट सोने ठेऊन बँकेची फसवणूक

    बनावट सोने गहाण ठेऊन बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जतमध्ये घडला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोरडी शाखेत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कर्जदारांसह सराफाविरोधात बँकेची 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 29 Apr 2023 09:35 AM (IST)

    अजितदादा भावी मुख्यमंत्री बॅनर

    अजितदादा पवार भावी मुख्यमंत्री असे मिरा भाईंदर शहरात बॅनर

    मिरा भाईंदर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आशिफ शेख महाराष्ट्र प्रदेश सचिव राकापा यांच्यांकडून बॅनरबाजी

    बॅनरची मिरा भाईंदर शहरात जोरदार चर्चा

    एकच वादा अजित दादा, अजित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा बॅनरवर उल्लेख.

  • 29 Apr 2023 09:33 AM (IST)

    सोने-चांदीच्या किंमतीत घसरण

    वायदे बाजारातही सोने गडगडले

    फ्यूचर कॉन्ट्र्क्टचे दर आले आटोक्यात

    सोने-चांदीत आठवड्यापासून दरवाढ नाही

    ग्राहकांना मिळाला मोठा दिलासा

    आजचा सोने-चांदीचा भाव काय, एका क्लिकवर जाणून घ्या 

  • 29 Apr 2023 09:27 AM (IST)

    ठाण्यात बारसल्या पावसाच्या सरी

    ठाण्यात बारसल्या पावसाच्या सरी

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात देखील बारसल्या पावसाच्या सरी

    ऐन उन्हाळ्यात पडत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा

    मुंबईतील अनेक भागांत पाऊस

  • 29 Apr 2023 09:16 AM (IST)

    परतूर अपघात, एक ठार

    परतूर तालुक्यातून जाणाऱ्या दिंडी महामार्गावर क्रूझर आणि मोटार सायकलचा अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात परतूर – आष्टी रोडवर झाला असून या अपघातात शरद साबळे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • 29 Apr 2023 09:14 AM (IST)

    मुंबईत मुसळधार पाऊस

    मुंबई उपनगरातील अनेक भागात आज सकाळी मुसळधार पाऊस

    मुंबई उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाला.

    या भागात सुमारे 15 मिनिटे मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.

  • 29 Apr 2023 09:07 AM (IST)

    प्रज्ञावंतांना मिळणार एनएमएमएस शिष्यवृत्ती

    राज्यातील 11 हजार 682 प्रज्ञावंतांना मिळणार एनएमएमएस शिष्यवृत्ती

    आठवीच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

    केंद्र सरकारने कोटा निश्चित केल्याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.

    1 लाख 70 हजार विद्यार्थ्यांनी केली होती नोंदणी

  • 29 Apr 2023 09:05 AM (IST)

    पे अँड पार्क योजना पुन्हा गुंडाळणार

    पिंपरी चिंचवड महानगपालिका शहरात पे अँड पार्क योजना पुन्हा गुंडाळणार

    चार ठिकाणी वाहनचालकांचा अत्यल्प प्रतिसाद

    25 दिवसांत केवळ 32 हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने ही योजना बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आलीय

  • 29 Apr 2023 08:48 AM (IST)

    ठाणे शहरात स्वस्तात इंधन

    नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल महाग

    पेट्रोल-डिझेलच्या भावात नाही मोठी वाढ

    गेल्या 11 महिन्यांपासून भावात उलथापालथ नाही

    तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय

    भाव जाणून घ्या एका एसएमएसवर,  वाचा बातमी 

  • 29 Apr 2023 07:49 AM (IST)

    वादळीवाऱ्यामुळे झाड कोसळले, नगरमध्ये झाडाखाली दबून एकाचा मृत्यू

    कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मण गाव शिवारातील घटना

    जोरदार पावसाने नगरला झोडपले, गारपिटीही कोसळली

    पावसामुळे नगरमध्ये पिकांची नासाडी, शेतकरी हवालदिल

  • 29 Apr 2023 07:22 AM (IST)

    भुसावळसह अनेक तालुक्याला गुरुवार आणि शुक्रवारी सलग दोन दिवस गारपीटसह वादळी वाऱ्याने झोडपले

    गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड.

    अंदाजे हजारो हेक्टर जास्त शेतजमिनीचे नुकसान

    जळगावच्या साकेगावात तर जिल्हापरिषदेच्या शाळेचे पूर्ण छतच उडून गेले

    तसेच इतरही नुकसान झाले

    अजूनही गाव खेड्यात विद्युत पुरवठा खंडित, वळवाच्या पावसाने हिरावले अनेकांचे छप्पर

    शेतकऱ्यांना तिसऱ्यांदा फटका

  • 29 Apr 2023 07:15 AM (IST)

    पिंपरी चिंचवड : पे अँड पार्क योजना पुन्हा गुंडाळणार ?

    – पिंपरी चिंचवड महानगपालिका शहरात पे अँड पार्क योजना पुन्हा गुंडाळणार ?

    – चार ठिकाणी वाहनचालकाचा अत्यल्प प्रतिसाद

    – 25 दिवसात केवळ 32 हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने ही योजना बंद करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आलीय

    – नागरिक रत्याच्याकडेला कोठेही वाहन पार्क करतात. त्यावर पोलीस प्रशासन कारवाई करत नाही तसेच वाहनचालक पे अँड पार्कचे शुल्क भरण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याने ही योजना बंद करण्याची मागणी पे अँड पार्क संस्थेने आयुक्तांकडे केली आहे

  • 29 Apr 2023 07:10 AM (IST)

    चलो बारसू, माजी खासदार राजू शेट्टी यांची हाक, वातावरण तापणार

    बारसू रिफानरी विरोधात ग्रामस्थांचं आंदोलन सुरू असतानाच आता त्यात राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे

    राजू शेट्टी यांनी बारसूच्या जनतेच्या पाठी उभं राहण्यासाठी चलो बारसूची हाक दिली आहे

    राजू शेट्टी आंदोलनात उतरल्याने बारसूचं आंदोलन पेटणार असल्याचं सांगितलं जात आहे

  • 29 Apr 2023 07:05 AM (IST)

    पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गहूंजे गावावत मालवाहू टेम्पोला अपघात, एक जखमी

    गहूंजे गावच्या हद्दीत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोचा अपघात

    चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी

    या अपघातात टेम्पो चालकासह अन्य एक जण गंभीर जखमी झालाय, तर शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या

    पुण्यावरून मुंबईकडे जात असताना मध्यरात्री झाला अपघात

Published On - Apr 29,2023 7:03 AM

Follow us
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.