Maharashtra Breaking Marathi News Live | आधी शासन घरी होते, आता शासन आपल्या दारी : श्रीकांत शिंदे

| Updated on: Jun 17, 2023 | 7:09 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | आधी शासन घरी होते, आता शासन आपल्या दारी : श्रीकांत शिंदे
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : गुजरातमध्ये बिपरजॉय वादळाचा चांगलाच तडाखा बसला आहे. गुजरातमध्ये ताशी 115 किलोमीटर ते 125 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. मात्र, कोणताही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही. टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता, विराट कोहलीने पोस्ट शेअर करत संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी घेतली खासदारांची बैटक. खासदारांच्या कामगिरीवर व्यक्त केली नाराजी. संजय राऊत धमकी प्रकरणांमध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Jun 2023 10:08 PM (IST)

    आधी शासन घरी होते, आता शासन आपल्या दारी

    मुंबई : मुंबईतील एका कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, माझ्यासमोर निवेदनाच्या माध्यमातून समस्या मांडल्या. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणून आपल्या विभागात मोठे कार्यक्रम होतं आहे. शासन थेट आपल्या दारी येत आहे. म्हणून शिंदे साहेबांनी आम्हाला पाठवलं. अगोदर शासन आपल्या घरी होतं आता शासन आपल्या दारी आहे, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

    गेल्या अडीच वर्षात काहीच कारभार झाला नाही. यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या अडचणी सोडवल्या गेल्या नसतील. मात्र, या समस्या आता एकनाथ शिंदे साहेबाना सांगू. नक्की मार्गी लागतील. लोकांना हवे तसे काम करण्याचं काम हे सरकार करतं आहे, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

  • 16 Jun 2023 09:45 PM (IST)

    सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या साखळी उपोषणाला यश

    मुंबई : श्री यशोमंगल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितच्या साखळी उपोषणाला यश मिळाले. रहिवाशांच्या 12 दिवस सतत साखळी उपोषणानंतर म्हाडाने आपल्या आदेश मागे घेतला. म्हाडाच्या मनमानी कारभारामुळे रहिवासीयांनी 12 दिवस सतत साखळी उपोषण केले. भाजप मुंबई अध्यक्ष यांच्या उपस्थितीनंतर रहिवाशांनी उपोषण मागे घेतले. इमारतीतील रहिवासीयांना माहिती न देता त्यामधील रिकामे गाळे म्हाडाने संक्रमण शिबिर जाहीर केला होता.

  • 16 Jun 2023 09:33 PM (IST)

    प्लास्टिक दुकानाला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

    नागपुरातील धरमपेठ परिसरात या प्लास्टिक वस्तू विकणाऱ्या टपरवेयर या दुकानात आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नाला यश मिळाले. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र टपरवेयर या दुकानातील लाखो रुपयांचा प्लास्टिकचा साहित्य जळून खाक झाला आहे.

  • 16 Jun 2023 08:54 PM (IST)

    Devendra Fadnavis | मराठवाड्याचं पाणी बारामतीत अडलं होतं ते द्यायला आलोय : देवेंद्र फडणवीस

    धाराशीव | “मराठवाडा दु्ष्काळग्रस्त राहणार नाही, मराठवाड्याचं पाणी बारामतीत अडलं होतं ते द्यायला आलोय, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस धाराशीवमधील एका कार्यक्रमात बोलत होते, यावेळेस त्यांनी हे विधान केलंय.

  • 16 Jun 2023 08:48 PM (IST)

    Naresh Mhaske | शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा टीझर प्रसिद्ध

    मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिंदेच्या शिवेसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्क यांनी हा टीझरचा व्हीडिओ ट्विट केला आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन हे 19 जून रोजी मुंबईतील गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये करण्यात आलं आहे.

    शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा टीझर

  • 16 Jun 2023 08:41 PM (IST)

    Devendra Fadnavis | नरेंद्र मोदी सरकारचं कोरोना काळात मोठं काम : देवेंद्र फडणवीस

    “नरेंद्र मोदी सरकारने कोरोना काळात मोठं काम केलं. मोदीजींनी लस तयार केली नसती तर काय अवस्था झाली असती, आमच्यावर अमेरिका आणि रशियासमोर कटोरा घेऊन उभं राहण्याची वेळ आली असती. आम्हाला लस द्या, असं म्हणत गयावया करायला लागली असती. करोडो लोकं भारतात मुरुन गेले असते पण भारताला लस मिळाली नसती. मोदीजींनी लस तयार केली आणि भारत उभा आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

  • 16 Jun 2023 08:32 PM (IST)

    Devendra Fadnavis Live | सत्तेसाठी आता लाचार होणार का? फडणवीस यांचा ठाकरेंना सवाल

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सावरकरांचा अपमान ठाकरे सहन करणार का?  तसेच आता सत्तेसाठी लाचार होणार का? ठाकरेंनी सांगावं, असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय.

  • 16 Jun 2023 08:21 PM (IST)

    ED summons | तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांच्या बंधूना ईडीचं समन्स

    तामिळनाडू |  ईडीने तामिळनाडूचे उर्जामंत्री व्ही.सेंथिल बालाजी यांचे बंधू आरव्ही अशोक कुमार यांना समन्स बजावलंय. ईडीने मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात कुमार आणि त्यांचे स्वीय सहाय्यक बी शनमुगम आणि इतरांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी बोलावलं आहे.

    सेंथिल बालाजी यांचे बंधू आरव्ही अशोक कुमार यांना ईडीचं समन्स

  • 16 Jun 2023 07:57 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाराशिवच्या आमदाराकडून चांदीची गदा भेट

    धाराशिव येथून एक मोठी बातमी पुढे येतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांदीची गदा भेट देण्यात भेट देण्यात आलीये. आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्याकडून ही गदा देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये भाजपचे महाजनसंर्पक अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चांदीची गदा देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.

  • 16 Jun 2023 07:44 PM (IST)

    द्वारकाधीश मंदिर लोकांना दर्शनासाठी खुलं

    द्वारकाधीश मंदिर आज संध्याकाळपासून सार्वजनिक दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. वादळामुळे ते बंद करण्यात आले होते. आज तब्बल तीन दिवसांनंतर मंदिरात ध्वजारोहण करण्यात आले. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी धर्मध्वजाचे पूजन केले आणि त्यानंतर नैवेद्य दाखवला आला.

  • 16 Jun 2023 07:36 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस करणार भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज धाराशिवमध्ये भाजपचे महाजनसंर्पक अभियानाचे आयोजन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस करणार आहेत भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती या अभिनयामध्ये दिसत आहे.

  • 16 Jun 2023 07:24 PM (IST)

    नगरपालिका निवडणुका लवकर व्हायला हव्यात हिच आमची भूमिका- अजित पवार 

    अजित पवार यांनी नुकताच नगरपालिका निवडणुकांबद्दल मोठे भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले की, नगरपालिका निवडणूका लवकर व्हाव्यात हिच आमची भूमिका आहे. यावेळी अजित पवार यांनी काही उदाहरण देखील दिले आहे. अजित पवार म्हणाले की, विलासराव देशमुख गावचे सरपंच होते ते मुख्यमंत्री झाले. आर आर आबा देखील ग्रामीण भागातून येत उपमुख्यमंत्री झाले.

  • 16 Jun 2023 07:20 PM (IST)

    पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊ अजित पवार यांचे मोठे भाष्य

    अजित पवार यांनी नुकताच मोठे भाष्य केले आहे. अजित पवार म्हणाले की, सध्या समाजात तेढ निर्माण करण्याचे काम गेल्या 8 ते 10 दिवसात महाराष्ट्रात घडत आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून अंतर पाडायला शिकवले नाही. सर्वधर्म समभाव हाच आपला विचार आहे. राजकारणाच्या वेळेस जरूर राजकारण करू, मात्र देशाचा विषय असेल तेव्हा पक्षाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र येऊ असे अजित पवार म्हणाले आहेत.

  • 16 Jun 2023 07:15 PM (IST)

    भाजप नेते मोहित कंबोज यांना अत्यंत मोठा दिलासा

    नुकताच भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांना अत्यंत मोठा दिलासा मिळालाय. मोहित कंबोज यांच्यावरीच सर्व गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. सर्व तपास यंत्रणांकडून सुरू असणारी चौकशी देखील संपली आहे. हा एक प्रकारचा मोठा दिलासा कंबोज यांना नक्कीच म्हणावा लागेल. CBI कडून मोहित कंबोज यांना अखेर क्लीन चीट मिळालीये. मोहित कंबोज यांच्या विरोधात आता कोणतीही केस नाहीये. मुंबई हायकोर्टाच्या स्पेशल CBI चा अहवाल सादर करून घेतला आहे.

  • 16 Jun 2023 07:10 PM (IST)

    शाळेतील अजान प्रकरणात कारवाई करण्याची मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली

    उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी एक पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी नुकताच केलीये. कांदिवली येथील कपोल शाळेमधील एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलाय. ज्यानंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. आता याच प्रकरणात थेट भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई पोलीस झोन 11 चे डीसीपी अजय कुमार बन्सल यांना पत्र लिहून कांदिवली येथील कपोल शाळेतील अजान प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • 16 Jun 2023 07:01 PM (IST)

    द्वारकादास मंत्री बँकेचा बीड नगरपरिषदेला दणका

    द्वारकादास मंत्री बँकेनं बीड नगरपरिषदेला मोठा दणका दिला आहे. इमारत बांधण्यासाठी या बँकेकडून कर्ज घेण्यात आलं होतं. नगरपरिषदेनं कर्ज न फेडल्याने तारण ठेवलेलं नाट्यगृह सील केलं आहे.

  • 16 Jun 2023 06:53 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेवर भाजपा आमदाराची नाराजी

    शिवसेना आणि भाजपा यांच्यात आता नाराजीचा सूर आणखी तीव्र होत चालला आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर पालिकेने कारवाई केली आहे. बॅनर काढण्यामागे अदृश्य शक्ती असल्याचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. गणपत गायकवाड यांनी बॅनर काढणाऱ्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ दिला.

  • 16 Jun 2023 06:43 PM (IST)

    अयोध्येत कलम 144 ची मुदत वाढवली

    अयोध्येत कलम 144 ची मुदत वाढवण्यात आली आहे. आता कलम 144 अयोध्येत 8 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहणार आहे. जिल्हा दंडाधिकारी नितीश कुमार यांनी यासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

  • 16 Jun 2023 06:37 PM (IST)

    हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ चित्रपट उशिरा सुरू झाल्याने चाहत्यांनी केली तोडफोड

    हैद्राबादच्या रामचंद्रपुरम सीमावर्ती भागात असलेल्या ज्योती थिएटरमध्ये चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकाच्या म्हणण्यानुसार, चित्रपट आज सकाळी 6:30 वाजता सुरू होणार होता, परंतु तांत्रिक बिघाडामुळे हा शो सकाळी 7.30 वाजता सुरू झाला, त्यामुळे काही लोकांनी तोडफोड केली.

  • 16 Jun 2023 06:31 PM (IST)

    दक्षिण काश्मीरमधून 5 दहशतवाद्यांना अटक

    दक्षिण काश्मीरमधील उधमपूरचा रहिवासी दीपक कुमार उर्फ ​​दीपूच्या हत्येप्रकरणी जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी कुपवाडा जिल्ह्यातील जामगुंड भागात 5 दहशतवाद्यांना ठार केले.

  • 16 Jun 2023 06:24 PM (IST)

    चर्चगेट वसतिगृह प्रकरणातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत

    मुंबईतील चर्चगेटमधल्या वसतिगृहातील विद्यार्थिनीचं प्रकरणात मदतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले वसतिगृहातील अधीक्षिकेचं निलंबनही करण्यात आलं आहे. डॉ. निपुण विनायक समितीच्या अहवालाच्या आधारे निलंबन करण्यात आलं आहे. उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

  • 16 Jun 2023 06:13 PM (IST)

    मुंबईच्या कांदिवलीत कपोल शाळेत अजान शिकवण्याचा प्रयत्न

    मुंबईतल्या कांदिवलीतील कपोल शाळेत अजान शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या विरोधात शिवसेना, भाजपा आणि मनसे कार्यकर्त्यांनी शाळेविरोधात आंदोलन केलं. कपोल शाळेतील एक शिक्षकावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.

  • 16 Jun 2023 06:08 PM (IST)

    अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं; दीपक केसरकरांची खुली ऑफर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारमध्ये यावं अशी खुली ऑफर शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. दादांसोबत कसं राजकारण सुरु आहे हे अख्ख्या महाराष्ट्रांनी पाहिलं आहे, अशी बोचरी टीका केली. दुसरीकडे, अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, त्यामुळे ते प्रत्येकाला आपल्यासोबत हवे असतात असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दीपक केसरकर यांना दिलं आहे.

  • 16 Jun 2023 06:02 PM (IST)

    बिपरजॉयमुळे गुजरातला मोठा तडाखा

    बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातला मोठा तडाखा बसला आहे. या चक्रीवादाळात 80 हजार विद्युत पोल पडले. तर अनेक डीपी, सबस्टेशनला याचा फटका बसला आहे. आतापर्यंत 54 हजार लोकांना सुरक्षित स्थळी निवारा देण्यात आला आहे. जीवितहानी झाली नसली तरी गुरंढोरांचा मृत्यू झाला आहे.

  • 16 Jun 2023 05:50 PM (IST)

    कोस्टल रोडचं 76 टक्के काम पूर्ण

    मुंबईच्या कोस्टल रोडचं काम प्रगतिपथावर असून 76 टक्के काम पूर्ण झालं आहे. वरळी ते मरीन ड्राईव्ह हे अंतर कमी होईल. कोस्टल रोड झाल्याने 70 टक्के वेळ वाचेल. तर 30 टक्के इंधनाची बचत होणार आहे. या रोडवर इतरही अनेक सुविधा मिळतील. कोस्टल रोडवर टोल नसेल तसेच सिग्नल पण नसेल. वाहनांना विना अडथळा हे अंतर लवकर कापता येणार आहे.

  • 16 Jun 2023 05:41 PM (IST)

    स्वस्तात सोने खरेदीची लवकरच मोठी संधी

    सोने खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्वस्तात सोने खरेदीचा खास मोका आणला आहे. त्यासाठी ग्राहकांना केवळ तीन दिवसांची प्रतिक्षा करावी लागेल. त्यांना सुवर्णरोख्यात गुंतवणूक करता येईल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आणण्याचे ठरले होते. अर्थ मंत्रालयाने सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना 2023-24 ची पहिली मालिका 19 ते 23 जून जून तर दुसरी मालिका 11 ते 15 सप्टेंबर या दरम्यान जाहीर करण्यात येणार आहे. या काळात सुवर्णप्रेमींना स्वस्त सोने खरेदी करता येईल.

  • 16 Jun 2023 05:36 PM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेसचे सीएसएमटी स्टेशनबाहेर आंदोलन

    राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आंदोलन करण्यात आले. शासकीय वसतिगृहात मुलीच्या मृत्यप्रकरणात हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

  • 16 Jun 2023 05:26 PM (IST)

    मालवणी आगारात एसटी बसने घेतला पेट

    मालवणी आगारातील एका एसटी बसला अचानक आग लागली. ही बस चार्जिंगसाठी आगारातील चार्जिंग पॉईंटवर उभी करण्यात आली होती. पण बसने अचानक पेट घेतला. जीवितहानी झाली नाही. पण एसटी बसची आग भडकली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

  • 16 Jun 2023 05:15 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांना खुर्चीवरुन हटवणार – ममता बॅनर्जी

    नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवरुन हटवणार असल्याचा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. दक्षिण 24 परगणा येथील सभेत बोलताना त्यांनी विरोधी खेम्यातून पंतप्रधानांवर थेट हल्लाबोल केला. पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांनी कंबर कसली आहे.

  • 16 Jun 2023 05:09 PM (IST)

    घटनेविरोधातील सर्व तरतूदी हटविणार- कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर

    गेल्या भाजप सरकारने केलेली दुरुस्ती घटनेच्या कलम 25 विरोधात आहे. त्यामुळे आम्ही घटनेविरोधातील ही तरतूद हटवली आहे. घटनेविरोधातील जेवढ्या दुरुस्ती केल्या असतील, त्या सर्व बदलविण्यात येतील. धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्यावर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी ही प्रतिक्रिया दिली.

  • 16 Jun 2023 04:39 PM (IST)

    तुळजापूर पंपगृहाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जलपूजन

    धाराशिव ब्रेकिंग : तुळजापूर तालुक्यातील पांगदरवाडी येथे बांधण्यात आलेल्या पंपगृहाचे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकास निधीतून पंपगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.

  • 16 Jun 2023 04:22 PM (IST)

    जाहीराती शिवाय सरकारने काही दिलं नाही – जयंत पाटील

    राज्यातील सरकारने जाहीराती शिवाय जनतेला काही दिलेले नाही. दारोदारी जाऊन या सरकारचा आता जनतेला कंटाळा यायला लागला आहे , कोण 26 टक्के आहे आणि खूप 23 टक्के आहे याचा वाद आता दारोदारी पसरला आहे, त्यामुळे या सरकारने ही आता घरी बसावं आणि काम करावे असे राष्ट्रीवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मागचं सरकार घरी बसुन काम करीत होते, आमचे सरकार दारी जाऊन काम करीत आहे अशी टीका केली होती त्यावर पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

    त्यामुळे या सरकारला ही माझी विनंती आहे गृहमंत्री राज्यातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत महाराष्ट्रातील होत असलेल्या दंगली बाबत गृहमंत्र्यांनी गंभीरतेने घ्यावे, त्यामुळे दंगलमुक्त महाराष्ट्र होईल हे केल्याने महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित होईल असेही ते म्हणाले.

  • 16 Jun 2023 03:57 PM (IST)

    अहमदनगर शहरात दुकानांना भीषण आग

    अहमदनगर शहरात पारिजातक चौकातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या पाच ते सहा दुकानांना भीषण आग लागली आहे. आगीमुळे दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

    अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • 16 Jun 2023 03:54 PM (IST)

    राज्यातील धरणांमध्ये केवळ 24 टक्केच पाणीसाठा शिल्लक

    पुणे विभागातील धरणांमध्ये सर्वात कमी म्हणजे अवघे 12 टक्के पाणीसाठा आहे. तर औरंगाबादमध्ये 27 टक्के, अमरावतीत 37 टक्के पाणीसाठी आहे.

    नाशिकमध्ये 25 टक्के तर कोकणातील धरणांमध्ये 31 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

  • 16 Jun 2023 03:41 PM (IST)

    बीपरजॉय वादळाचा परिणाम दिल्लीतही, राजधानी कोसळल्या पावसाच्या सरी

    राजधानी दिल्लीत आज पाऊस पडला. कडाक्याच्या उन्हामुळे दिल्लीकर त्रासलेले असताना अवचित आलेल्या पावसामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला. बीपरजॉय वादळाचा परिणाम राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतातही दिसून आला. दिल्लीसह नोएडा, गुडगाव भागातही पावसाच्या सरी कोसळल्या.

  • 16 Jun 2023 03:30 PM (IST)

    मीरा रोड हत्याकांड प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 22 जून पर्यंत पोलीस कोठडी

    मीरा रोडमधील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील आरोपी मनोज सानेची पोलीस कोठडी 22 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. मनोज सानेला 16 जून पर्यंत पोलीस कोठडी होती. आज त्याला पुन्हा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.

    नया नगर पोलीसांनी या गुन्हयातील तपासासाठी न्यायालयाकडून आणखीन सहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपी मनोज सानेला ठाणे 22 जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

  • 16 Jun 2023 03:15 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिवच्या दौऱ्यावर

    उस्मानाबादचे नामकरण करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा धाराशिवचा हा पहिलाच दौरा आहे. देवेंद्र फडणवीस यांचं तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जंगी स्वागत करण्यात आलं.

    फडणवीस यांना देशाचं नेतृत्व करता येऊ दे, असं साकडं तुळजाभवानी मातेसमोर पुजाऱ्यांनी घातलं.

  • 16 Jun 2023 03:09 PM (IST)

    पवारांच्या धमकी प्रकरणाता माझा काही संबंध नाही – सौरभ पिंपळकर माध्यमांसमोर

    पवारांचा दाभोळकर होईल असं ट्विट मी केलं नाही, सौरभ पिंपळकरने माध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देण्यात आलेल्या  धमकी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही.

  • 16 Jun 2023 02:58 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दार कायमचे बंद- चंद्रशेखर बावनकुळे

    उद्धव ठाकरे यांना त्यांची चुक सुधारायची असेल तर त्यांनी वरिष्ठांशी बोलावं असे वक्तव्य भाजप नेते केशवप्रसाद मौर्य यांनी केले आहे. यावर मौर्य यांचे हे वय्यक्तीक मत असल्याचे सांगत उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे पुर्णपणे बंद झाले अल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगीतले. याशिवाय कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून आपली भूमीका मांडावी असे आवहान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

  • 16 Jun 2023 02:45 PM (IST)

    दोन गटात वाद निर्माण करण्याचा भाजपचा अजेंडा- अबु आजमी यांचा आरोप

    मुंबईतील कपोल शाळेत अजान शिकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मनसे, भाजप आणि शिवसेनेने केल्यानंतर यावर समाजवादी पक्षाचे नेते अबु आजमी यांनी भाजपवर निशाना साधला आहे. दोन गटात वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप आजमी यांनी केला आहे. तसेच शाळेत मुस्लिम कर्मचारी नसल्यास अजान वाजवायला नको अशी भुमीकाही त्यांनी घेतली आहे.

  • 16 Jun 2023 02:38 PM (IST)

    मुंबईच्या एका शाळेत अजान शिकवण्याचा प्रयत्न, मनसेचा आरोप

    मुंबईच्या कांदिवलीतील कपोला शाळेत अजान शिकवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिवसेना, भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे या तीनीही पक्षांकडून शाळेसमोर आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर घोषणाबाजी केल्याचेही समोर येत आहे. या प्रकरणी कपोला शाळेतील एका शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 16 Jun 2023 02:30 PM (IST)

    स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे प्रेरणास्थान – मनिषा कायंदे

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचा धडा अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय कर्नाटक सरकार घेतल्यानंतर त्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये ठाकरे गट हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष असल्याने सावरकरांबद्दल त्यांंची नेमकी काय प्रतिक्रीया आहे हे जाणून घेण्यास अनेक जण उत्सुक आहेत. अशातच स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे प्रेरणास्थान असल्याचे ठाकरे गटाच्या प्रवक्ता मनिषा कायंदे यांनी सांगीतले. याशिवाय कर्नाटक सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असेही त्या म्हणाल्या

  • 16 Jun 2023 02:21 PM (IST)

    कर्नाटकाच्या जनतेनं आधीच आधीच काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता- शरद पवार

    सावरकर आणि हेडगेवार यांचे धडे पाठ्यपूस्तकातून वगळण्याचा निर्णय कर्नाटकात काँग्रेस सरकारने घेतला आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली. निवडणूकीच्या जाहिरनाम्यातच काँग्रेसने सावरकरांचे धडे वगळण्याचे आश्वासन दिले होते असे शरद पवार म्हणाले. कर्नाटकाच्या जनतेनं आधीच आधीच काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता असे म्हणत शरद पवार यांनी या निर्णयाचे समर्थन केले.

  • 16 Jun 2023 02:12 PM (IST)

    सावरकरांना पाठ्यपूस्तकातून हटवणं हाच महाविकास आघाडीचा कर्नाटक पॅटर्न का?- फडणवीस

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धडे अभ्यासक्रमातून वगळल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय सांनी मविआला लक्ष्य केले आहे. सावरकरांना पाठ्यपूस्तकातून हटवणं हाच महाविकास आघाडीचा कर्नाटक पॅटर्न का? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे.

  • 16 Jun 2023 01:57 PM (IST)

    आमच्या ज्ञानात भर पडली – शरद पवार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यावेळी वंचित ही पायात पाय घालण्यासाठी तयार केलेली टीम बी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

  • 16 Jun 2023 01:51 PM (IST)

    काँग्रेसने आश्वासन दिले होते – शरद पवार

    सावकरांचे धडे वगळण्याचे आश्वासन काँग्रेसने निवडणुकीत दिले होते. धडे वगळल्यामुळे सामजिक सलोखा बिघडणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. कर्नाटक सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडे अभ्यासक्रमातून वगळले आहे, त्यावर विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार बोलत होते.

  • 16 Jun 2023 01:44 PM (IST)

    इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार

    इंदोरीकर महाराज लिंगभेदविरोधी वक्तव्य प्रकरणावरुन अडचणीत आले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने इंदोरीकर यांच्याबाजून निर्णय दिला होता. त्यानंतर अनिसने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टात केस चालवण्याचा निर्णय दिलाय आहे.

  • 16 Jun 2023 01:40 PM (IST)

    बीड पोलीस दलात नवीन वाहने

    बीड जिल्हा पोलीस दलात अत्याधुनिक दहा वाहने दाखल झाली आहेत. पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयाच्या मैदानात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दलास ही वाहने सुपूर्द करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून पोलीस दलात नवीन अत्याधुनिक वाहन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी 90 लाखांचा निधी पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून या दहा गाड्या पोलीस दलाला उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • 16 Jun 2023 01:32 PM (IST)

    भूस्खलानामुळे दोन जणांचा मृत्यू

    बिपरजॉय चक्रीवादळामुळे राजकोटमध्ये भूस्खलानामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 24 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाले आहेत. सुमारे एक हजार गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. 800 झाडे पडली आहेत. राजकोट वगळता कुठेही मुसळधार पाऊस पडत नाही.

  • 16 Jun 2023 01:26 PM (IST)

    नागपुरात पावसाची प्रतिक्षा

    जूनचा पंधरवाडा लोटला तरीही नागपूरसह विदर्भात पावसाचा पत्ता नाही. उलट नागपूरात उकाडा वाढल्याने दिवसभर घामाच्या धारा वाहतात. तापमान सरासरीपेक्षा ५ अंशांनी जास्त आहे. त्यामुळे तापमान वाढल्याने महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचा उन्हाचा त्रास होऊ लागलाय. हा त्रास कमी व्हावा म्हणून जूनच्या पंधरवाड्यानंतरंही महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील बिबट्या आणि वाघांसाठी कुलर्स सुरु आहेत. शिवाय बिबट्यांच्या पिंजऱ्यात गारवा रहावा म्हणून दिवसांतून तीन ते चार वेळा पाणी शिंपडलं जातंय. सध्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात चार बिबटे आणि दोन वाघ आहे. या वाघ आणि बिबट्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जातेय.

  • 16 Jun 2023 01:22 PM (IST)

    अमरावतीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

    अप्पर वर्धा धरणात जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अप्पर वर्धा धरणावर आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मोठा एल्गार सुरु केला आहे. अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन तोडण्याचा इशारा दिला आहे. शेतजमिनीचा वाढीव मोबदला अन् नोकरीसाठी लागणारे दाखले न मिळाल्याने 27 दिवसांपासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी शेतकरी करत आहेत.

  • 16 Jun 2023 01:14 PM (IST)

    पुणे शहरात पावसाचा अंदाज

    पुणे शहरासह उपनगरांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पुणे शहरात आज हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यात आज मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. शहरात ढगाळ वातावरण असल्यामुळे गारवा वाढला आहे.

  • 16 Jun 2023 01:12 PM (IST)

    कोल्हापूरमध्ये शेतकरी आक्रमक

    कोल्हापूर जिल्ह्यातील उपसा बंदीवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. उपसाबंदी मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची सिंचन भवनावर धडक मोर्चा काढला. यानंतर सिंचन भवानीच्या दारात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांनी चर्चेला सुरुवात केली आहे. इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वात खाली शेतकरी एकवटले आहेत.

  • 16 Jun 2023 01:05 PM (IST)

    फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

    कर्नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर यापेक्षा दुसरे काही अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकाच लांगुलचालन करण्याकरिता कर्नाटकच सरकार निर्णय घेत आहे, अशी टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच का ? असा सवाल उपस्थिती करत कर्नाटकच्या निर्णयावर उद्धव ठाकरेजी आता तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.

  • 16 Jun 2023 12:53 PM (IST)

    लोकल महिला अत्याचार प्रकरणात आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर

    लोकल महिला अत्याचार प्रकरणात आरोपीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. आरोपीनं आणखी काही महिलांची छेड काढल्याचं समोर आलं आहे. आरोपी नवाझ करीमला ६ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. रेल्वेत तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

  • 16 Jun 2023 12:45 PM (IST)

    कोल्हापूर | जिल्ह्यातील उपसा बंदी वरून शेतकरी आक्रमक

    कोल्हापूर जिल्ह्यातील उपसा बंदी वरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. उपसा बंदी मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांची सिंचन भवनवर धडक दिली आहे.. अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वातखाली शेतकरी एकवटले आहेत.

  • 16 Jun 2023 12:43 PM (IST)

    लोकांच्या मनातून सावरकर काढू शकत नाहीत – देवेंद्र फडणवीस

    ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात, ते सावरकरांचं नाव पुसायला निघाले आहेत, ते धर्मांतराला पूर्णपण समर्थन द्यायला निघाले आहेत.. आता तुमचं मत काय? असा थेट प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे..

    सत्तेसाठी तुम्ही समझोता केला. यातून स्पष्ट होत आहे.. पण असे निर्णय घेतल्यानंतर जनतेच्या मनातून सावरकर काढू शकत नाहीत असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 16 Jun 2023 12:31 PM (IST)

    शाळेत ध्वनिमुद्रित अजान वाजवणे आम्ही कदापी सहन करणार नाही – योगेश सागर

    कांदिवली कपोल शाळेजवळ शिवसेनेनंतर आता भाजप आमदार योगेश सागर यांच्यासोबत कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे. कपोल शाळेबाहेर भाजप कार्यकर्ते जय श्री राम आणि दुर्गा बन तू काली बन कभी ना बुरखा वाली… अशा घोषणा देत विरोध केला आहे..

    आमदार योगेश सागर म्हणाले की, या शाळेच्या आजूबाजूला एकही मशीद नाही, या शाळेत मुस्लीम समाजातील एक-दोन मुले शिकत असतील, मात्र शाळेच्या आत ध्वनिमुद्रित अजान वाजवणे आम्ही कदापी सहन करणार नाही, ज्या शिक्षकाने वाजवले आहे, त्याला निलंबित करावे अशी आमची मागणी आहे..

  • 16 Jun 2023 12:21 PM (IST)

    कांदिवली कपोल शाळेजवळ शिवसेनेपाठोपाठ भाजप कार्यकर्त्यांची गर्दी

    कांदिवली येथील कपोल शाळेत अजान शिकवण्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. कांदिवलीतील महावीर नगर येथील कपोल शाळेत आज सकाळी मुलांना अजान शिकवली जात असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी तेथे पोहोचून गोंधळ घातला.. कपोल शाळेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी सध्या तमाम शिवसैनिक कांदिवली पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत.

    कांदिवली कपोल शाळेजवळ शिवसेनेपाठोपाठ आता भाजप कार्यकर्त्यांची गर्दी केली आहे. कपोल शाळेबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी नारे देत विरोध केला आहे.

  • 16 Jun 2023 12:17 PM (IST)

    इंदोरीकर महाराजांना दणका, ‘त्या’ विधानावरून कोर्टाचे महत्त्वाचे आदेश

    इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून लिंगभेदावर भाष्य केलं होतं. सम आणि विषम तारखेला शरीर संबंध ठेवल्यास मुलगा आणि मुलगी होत असल्याचं इंदोरीकर महाराज म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.

    इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असे आदेश औरंगाबाद कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होणार असून इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीत चांगली वाढ झाली आहे.

  • 16 Jun 2023 12:08 PM (IST)

    सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवारांवर स्तुतीसुमनं

    अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

  • 16 Jun 2023 11:57 AM (IST)

    भंडाऱ्यात चारित्र्यावर संशय घेत सासऱ्याकडून सूनेची हत्या

    चारित्र्याच्या संशयातून सासऱ्याने सुनेवर कुऱ्हाडीनं वार करत तिची हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील रोहना गावात घडली. प्रणाली सतिश ईश्वरकर असं मृत सुनेचं नावं आहे. तर बळवंत ईश्वरकर असे आरोपी सासऱ्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेवेळी मृतक प्रणाली हिचा पती घराबाहेर गेला होता. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा अधिक तपास तकरीत आहे.

  • 16 Jun 2023 11:50 AM (IST)

    संजय राऊत यांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय – संजय शिरसाट

    सतत माध्यमात राहणं आणि चर्चेत राहण्यासाठी त्यांची ही वक्तव्ये आहेत. संजय राऊतांना हत्ती बेडूक करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय सुरू आहे ते पाहणं गरजेचं आहे. मी राऊतांना चॅलेंज करतो की आमच्या वर्धापन दिनी कोण कोण तुमच्या गटातून येणार आहेत त्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. अजित दादा किती दिवस एनसीपीत राहतील, ते तिथे नाराज आहेत. शरद पवार यांनी का काँग्रेस सोडली मग ते राहतील कशावरून? संजय राऊत बोलले ते ठिक पण अजित दादांनी संजय राऊतांप्रमाणे वक्तव्य करू नये, ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात.

    श्रीकांत शिंदे यांचा सरकारमध्ये कोणताही हस्तक्षेप नाही. भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत, त्यांना पक्षाकडून समज देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये कुत्र्यांची नसबंदी हा हास्यास्पद प्रकार आहे. ऊबाठा गटाचे माझी महापौर हे पक्षाची पत प्रतिष्ठा धुळीला नेत आहेत. चिल्लर काम करत आहेत, एकदिवस जनता यांची नसबंदी करेल.

  • 16 Jun 2023 11:39 AM (IST)

    इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा – औरंगाबाद हायकोर्ट

    इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात लिंगभेद बाबत वक्तव्य केलं होतं. सम विषम तारखेला शरीरसंबंध ठेवल्यास मुलगा मुलगी होते, असे वक्तव्य केले होते. सुरुवातीला हे प्रकरण खालच्या कोर्टात होते. त्यांनी गुन्हा दाखल करा म्हटले, नंतर सेशन कोर्टात गेले. त्यांनी गुन्हा रद्द केला आणि त्यानंतर हाय कोर्टात याचिका करण्यात आली. यानंतर आता कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आज सुनावणी झाली, हायकोर्टाच्या आदेशाने आता गुन्हा दाखल होणार आहे.

  • 16 Jun 2023 11:35 AM (IST)

    महिला अत्याचाराबाबत सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

    राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सरकार महिलांबाबत असंवेदनशील आहे. मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेच अनधिकृत पोस्टर लागत आहेत. मंत्रालय ते एअर इंडिया लागत आहे. मी खरं तर फोटो काढून ट्विट करणार होते, पण म्हटले जाने दो यार?

  • 16 Jun 2023 11:30 AM (IST)

    शासनाच्या योजना आणि दाखले पोहचवण्यासाठी प्रयत्न – श्रीरंग बारणे

    शासनाच्या योजना, विविध दाखले नागरिकांपर्यंत वेळेत पोहचत नाही, दाखले मिळत नाही, त्या योजना आणि दाखले पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते दाखल्याचे वाटप होणार आहे. मुख्यमंत्री स्वतः जाऊन नागरिकांमध्ये काम करत आहेत. निवडणूक खूप लांब आहे. सरकार आल्यापासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी लोकांमध्ये जाऊन प्रश्न सोडवण्याच काम केलं. निवडणुका जवळ नाहीत, त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलाही उपक्रम करत नाही. विरोधी पक्षाचा उमेदवार समोर विरोधात असणारच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून या प्रक्रियेत मी असणार आहे.

  • 16 Jun 2023 11:24 AM (IST)

    नाशिकमधील कथित चाईल्ड ट्रॅफिंकिंग प्रकरण

    कथित चाईल्ड ट्रॅफिंकिंग प्रकरणातील मुलांना घरी सोडण्यात येत आहे. जिल्हा बाल आणि कल्याण समितीचे यांच्या आदेशाने मुलांना घरी सोडण्यात येत आहे. बिहारला मुले रवाना होत आहे. नाशिकरोड रेल्वे स्थानक येथून या मुलांना रेल्वेने सोडण्यात येत आहे.

  • 16 Jun 2023 11:14 AM (IST)

    केशव प्रसाद मौर्य करणार दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती

    उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करणार आहेत. केशव प्रसाद मौर्य तीन दिवसापासून पुणे दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती पार पडत आहे.

  • 16 Jun 2023 11:12 AM (IST)

    फेविकॉलच्या जोडमध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये – अनिल बोंडे

    फेविकॉल जोडप्रकरणी खासदार बोंडे यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. फेविकॉलच्या जोडमध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये, असे बोंडे म्हणाले. खासदार जलील आणि मुख्यमंत्री के सी आर यांनी त्यांचे पक्ष सांभाळावेत. फडणवीस यांच्या बद्दल वक्तव्य करू नयेत, असेही बोंडे पुढे म्हणाले.

  • 16 Jun 2023 11:08 AM (IST)

    लावणीच्या जुगलबंदीद्वारे वारकऱ्यांची सेवा, टाळ आणि घुंगरांचा झाला मिलाप

    चौफुला येथील न्यु अंबिका कला केंद्राच्या कलावंतांनी वारकऱ्यांसाठी लावणी नृत्य सादर केलं. जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज यवतहून वरवंडच्या दिशेने निघाला. यावेळी केडगाव चौफुल्यावर या सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्राच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. या कला केंद्रातील कलावंतांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

  • 16 Jun 2023 11:06 AM (IST)

    अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग अधिवेशनाला सुरुवात

    राज्यस्तरीय शिबिरास शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ खडसे उपस्थित

  • 16 Jun 2023 10:46 AM (IST)

    शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान

    पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. तालुक्यात एकूण ३९ ठिकाणी मतदान केंद्रे असून सुमारे १० हजार ८०० शेतकरी सभासद मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २० जागेसाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत.

  • 16 Jun 2023 10:42 AM (IST)

    जळगावमधील अमळनेर शहरामध्ये राष्ट्रवादीचा भव्य रोड शो

    जळगावातील अमळनेर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा भव्य रोड शो, राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भाईदास पाटील व आजी-माजी आमदार खासदार रोड शोमध्ये सहभागी झाले आहेत.

  • 16 Jun 2023 10:32 AM (IST)

    पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला

    पुणे ग्रामीण पोलीस दलात नोकरी करत असलेले करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे एव्हरेस्टवर तिरंगा फडकवला. त्यांच्या कामगीरीबद्ल कोंढेंज ग्रामस्थांच्यावतीने त्यांची गावातून घोड्यावरून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढून व औक्षण करून त्याचे स्वागत केले. यानंतर भैरवनाथ मंदिर मैदानावर त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

  • 16 Jun 2023 10:29 AM (IST)

    गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याला दीडशे वर्षाची परंपरा

    गहिनीनाथ गडाच्या पालखी सोहळ्याला दीडशे वर्षाची परंपरा आहे. 18 जून रोजी निघणाऱ्या पालखी सोहळा रथाला केशव शिंदे यांच्या बैलजोडीला जुंपण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने बैलजोडी सज्ज ठेवली आहे.

  • 16 Jun 2023 10:26 AM (IST)

    सोलापूरात लवकरचं हेल्मेटसक्ती

    सोलापुरात शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करणार येणार आहे. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आदेश लवकरच जिल्हाधिकारी काढतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

  • 16 Jun 2023 10:17 AM (IST)

    राऊत बंधूवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, संदीप देशपांडे यांची मागणी

    मयूर शिंदे यांना काल अटक झाली आहे. हा बनाव संजय राऊत कुटुंबियानी रचला आहे. या गँगस्टर लोकांसोबत तुमचे फोटो कसे आहेत ? निलेश पराडकर हे फरार आहेत. या राऊत बंधूनी अनेक गँगस्टर लोकांना संरक्षण दिलं आहे. राज्य सरकारला विनंती आहे, की यासंदर्भात मोक्का अंतर्गत कारवाई करावी असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.

  • 16 Jun 2023 10:07 AM (IST)

    पन्हाळा तालुक्यातील शाहू कुस्ती संकुलाला आग

    पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं शाहू कुस्ती संकुलाला आग लागली होती. आगीत महिला कुस्तीपटूंची राज्य राष्ट्रीय पातळीवर पदके, मॅट तसेच इतर साहित्य जळून खाक झालं आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोतोलीतल्या शाहू कुस्ती संकुलात महिला कुस्तीगरांना प्रशिक्षण दिलं जाते. आगीत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पदके जळाल्याने महिला कुस्तीगीरांचं मोठ नुकसान झालं आहे.

  • 16 Jun 2023 10:00 AM (IST)

    ‘आदिपुरुष’मध्ये ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने साकारली शूर्पणखाची भूमिका

    ओम राऊत दिग्दर्शित‘आदिपुरुष’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सैफ अली खानने लंकेश आणि सनी सिंहने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेले प्रेक्षक त्यातील काही भूमिका पाहून थक्क झाले आहेत. आदिपुरुषमधील शूर्पणखेच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. या भूमिकेसाठी ओम राऊत यांनी एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची निवड केली आहे. वाचा सविस्तर..

  • 16 Jun 2023 09:55 AM (IST)

    अहमदनगर | फेसबुक पोस्टवरून भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद

    अहमदनगर | कर्जत येथे भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये फेसबुकच्या पोस्टवरून वाद झाला आहे. सोमनाथ यादव आणि सुधीर यादव आणि भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटारे यांच्यात हा वाद झाला. तर पोटारे यांचा मुलगा श्रीकृष्णा पोटारे याला धक्काबुक्की केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला आहे. सचिन पोटरे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 16 Jun 2023 09:49 AM (IST)

    अहमदाबाद | आज दुपारपर्यंत चक्रीवादळाची तीव्रता होईल कमी

    आज दुपारपर्यंत बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल आणि ते कमकुवत होईल. तर संध्याकाळपर्यंत त्याचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होईल, अशी माहिती एमईटीच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी दिली.

  • 16 Jun 2023 09:42 AM (IST)

    मणिपूर | परराष्ट्र राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर जमावाकडून हल्ला

    मणिपूर | जमावाने परराष्ट्र राज्यमंत्री आर. के. रंजन सिंह यांच्या कोंगबा, इंफाळ इथल्या निवासस्थानावर हल्ला केला. मणिपूरमध्ये हिंसाचार अद्याप सुरूच असून काही घरे जमावाकडून पेटवून देण्यात आली.

  • 16 Jun 2023 09:35 AM (IST)

    ‘आदिपुरुष’ चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया; कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या खटकल्या?

    गेल्या काही दिवसांपासून ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा होती, अखेर तो चित्रपट आज (16 जून) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा पहिला शो पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. हा चित्रपट त्यांना कसा वाटला, याविषयी प्रेक्षक ट्विट करत आहेत. या चित्रपटात रामायणाची कथा नव्या स्वरुपात मांडण्यात आली आहे, वाचा सविस्तर..

  • 16 Jun 2023 09:28 AM (IST)

    राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला; 23 जूनपासून सक्रिय होण्याचा नवा अंदाज

    मोसमी पाऊस कोकणात दाखल झाला असला तरी त्याचा पुढील प्रवास खोळंबला आहे. नैऋत्य मोसमी वारे 15 जूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज फोल ठरला आहे. आता 23 जून पासून मोसमी वारे महाराष्ट्रासह मध्य भारतात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • 16 Jun 2023 09:21 AM (IST)

    बिपरजॉय चक्रीवादळ धडकल्यानंतर मांडवीमध्ये कालपासून पाऊस सुरूच

    ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ काल गुजरातच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर कच्छ जिल्ह्यातील मांडवीमध्ये पाऊस सुरूच आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी रात्री गुजरात किनाऱ्यावर धडकलं. ताशी सुमारे शंभर किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा तसंच त्याबरोबर सुरू झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा कच्छ आणि सौराष्ट्रला बसला.

    पहा व्हिडीओ

  • 16 Jun 2023 09:14 AM (IST)

    ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रचंड खर्च, जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष- अजित पवार

    अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचं संकट उद्भवलं आहे. अनेक प्रश्न प्रलंबित असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या कामाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. मात्र ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमावर प्रचंड खर्च केला जातोय. या कार्यक्रमाचा जनतेला फायदा होतो की नाही हे तर बघायलाच हवं. मी पण मिटींग घ्यायचो, जनता दरबार घ्यायचो. पण मी लोकांचे प्रश्न सोडवायचो. यांचं फक्त राजकारण सुरू आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

  • 16 Jun 2023 09:07 AM (IST)

    पुणे शहरासह उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण

    पुणे शहरात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात आज मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेनं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरात गारवा वाढला आहे.

  • 16 Jun 2023 09:00 AM (IST)

    M S Dhoni चा CSK टीममधील विश्वासू सहकारी अमेरिकेत ‘या’ टीमकडून खेळणार

    अमेरिकेत टी20 मेजर लीग क्रिकेट टुर्नामेंट सुरु होतेय. धोनीचा हा सहकारी चेन्नई सुपर किंग्सचा कणा होता. चेन्नई टीममधील बरेच खेळाडू अमेरिकेतील T20 लीगमध्ये खेळताना दिसतील. वाचा सविस्तर…..

  • 16 Jun 2023 08:54 AM (IST)

    शासन आपल्या दारीचा जनतेला फायदा होतो का? – अजित पवार

    शासन आपल्या दारीचा जनतेला फायदा होतो का? असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. सरकारी यंत्रणा जनतेच्या कामासाठी वापरा. शिंदेंच्या दौऱ्यामुळे सरकारी यंत्रणा त्यांच्या मागे लागते, याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. सरकारकडून अनेक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. काही जणांकडून शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. समाजात तेढ निर्माण करण्याचा काही जणांचा कट आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

  • 16 Jun 2023 08:40 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पोलिसांकडून वाहन चोरीचे तब्बल 22 गुन्हे उघड

    पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलिसांनी चांगली कामगिरी केली. वाहन चोरीचे तब्बल 22 गुन्हे उघड करत 22 वाहन हस्तगत केली आहेत. याप्रकरणी दोन सराईत वाहन चोरांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार गवारे आणि महेश दनाने अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 15 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

  • 16 Jun 2023 08:35 AM (IST)

    जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये चकमक

    जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथील जुमागंड भागात दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. नेमके किती दहशतवादी आहेत? त्या बद्दल अजून ठोस माहिती मिळालेली नाहीय. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून लवकरच माहिती देण्यात येईल.

  • 16 Jun 2023 08:30 AM (IST)

    ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मुंबईमध्ये प्रभाव

    महाराष्ट्रात मुंबईमध्येही ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा प्रभाव पहायला मिळतोय. समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. हा गेटवे ऑफ इंडियाचा व्हिडिओ आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळ धडकलं असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालय,

  • 16 Jun 2023 08:19 AM (IST)

    राजस्थान सरकार जनतेला मोबाईल देणार

    सरकार मोबाइल देऊ शकते. बाजारात अनेक प्रकारचे मोबाईल आहेत. आम्ही लोकांना, तुम्ही तुमच्या पसंतीचा मोबाईल विकत घ्या म्हणून पर्याय देऊ. त्यासाठी एक ठराविक रक्कम सरकार देईल – राजस्थान मुख्यमंत्री अशोक गहलोत

  • 16 Jun 2023 08:15 AM (IST)

    संत सोपानगरीतून पालखी जेजुरीकडे रवाना

    संत सोपानगरीतून पालखी आज जेजुरीकडे रवाना झालीये. दोन दिवसांचा मुक्काम उरकून पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. आज सकाळपासूनच सासवडमध्ये वारकरी जेजूरीच्या दिशेने रवाना होत आहेत. पालखीनं गावातून नगरप्रदक्षिणा केल्यानंतर पालखीनं जेजूरीच्या दिशेनं महामार्गावर प्रस्थान केलय.

  • 16 Jun 2023 08:12 AM (IST)

    पुण्यामध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

    शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. बी.कॉमचे शिक्षण घेतलेल्या तरुणीला नोकरी निमित्त मुलाखतीसाठी बोलवून जबरदस्ती करण्यात आली. याप्रकरणी महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

  • 16 Jun 2023 08:09 AM (IST)

    पावसाने नाशिककरांची चिंता वाढवली

    नाशिककरांना पावसाची प्रतिक्षा करावी लागतेय. पावसाने दडी मारल्याने पाणीसाठा कमी होतोय. सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ 24 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्यावर्षी 26 टक्के पाणीसाठा होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 23 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

  • 16 Jun 2023 08:00 AM (IST)

    मिशन लोकसभा… रत्नागिरीत शिंदे गटाची जोरदार मोर्चेबांधणी

    आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेनेचा शिंदे गट कामाला लागला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. कोकणातील पक्ष बांधणी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार रत्नागिरीमध्ये दाखल झाले आहेत. सचिन जोशी आणि भाऊ चौधरी यांनी रत्नागिरीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तालुकानिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे.

  • 16 Jun 2023 07:52 AM (IST)

    राज्यासह देशात मान्सून रखडला, अजून एक आठवडा प्रतिक्षा करावी लागणार

    राज्यात आणि देशात मान्सून रखडला आहे. पावसासाठी एक आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनचा प्रवास 23 जूनपासून सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्वानुमानानुसार 22 जूनपर्यंत पावसाची शक्यता ऋण श्रेणीमध्ये आहे. त्यामुळे आता आणखी एक आठवडा पावसाची वाट पाहावी लागणार का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

    सर्वसाधारणपणे 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होतो. मात्र मान्सूनची ही रेषा दक्षिण कोकणाच्या पुढे अजूनही सरकलेली नाही. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रवासासाठी 18 ते 21 जूनदरम्यान अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 23 जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाच्या तुरळक भागांमध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीआहे.

  • 16 Jun 2023 07:35 AM (IST)

    पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी

    पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. प्रशांत जगताप यांच्या भावाला गोळीबार करून जीव मारण्याची दिली धमकी देण्यात आली आहे. तडीपार आरोपीने ही धमकी दिली आहे. या प्रकरणी आरोपी श्रीधर उर्फ सोन्या विठ्ठल शेलार याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत जगताप यांचे बंधू अभिजीत जगताप यांना गोळीबार करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.

  • 16 Jun 2023 07:28 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी-चिंचवडमध्ये

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे दुपारी पुण्यात दाखल होतील. पिंपरी चिंचवडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. पिंपरी चिंचवडमधील निगडी येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महात्मा बसेश्वर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या निमित्ताने शिवसेना-भाजप मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिवसेना भाजपचे अनेक बडे नेते हजेरी लावणार आहेत.

  • 16 Jun 2023 07:25 AM (IST)

    बिपरजॉय वादळामुळे गुजरातला मोठा फटका, 950 गावातील बत्तीगुल

    बिपरजॉय वादळामुळे गुजरातला मोठा फटका बसला आहे. या वादळामुळे गुजरातमधील 950 गावातील बत्तीगुल झाली आहे. विजेचे खांब कोसळल्याने या गावातील वीज गेली आहे. तर आतापर्यंत गुजरातमध्ये 500 हून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. या वादळामुळे अनेकजण जखमी झाले आहेत.

  • 16 Jun 2023 07:21 AM (IST)

    विदर्भ तापला, तापमानात सरासरीपेक्षा 5 अंशानी वाढले

    मान्सून येण्याच्या दिवसांत विदर्भात उकाडा वाढला आहे. विदर्भातील तापमानात सरासरीपेक्षा 5 अंशांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे मान्सून न आल्याने शेतकरी चिंतित झाला आहे. मान्सून लांबल्याने खरीप पेरणीचं नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. येत्या 20 जून नंतर विदर्भात मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चार दिवस कळ सोसावी लागणार आहे. बिपरजॉय वादळामुळे मान्सूनवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत आहे.

  • 16 Jun 2023 07:17 AM (IST)

    पुण्यात पीएमपीच्या ताफ्यात लवकरच नव्या 900 बस येणार

    पुण्यात पीएमपीच्या ताफ्यात लवकरच नव्या 900 बस येणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यापैकी 100 ई बस तर 200 सीएनजी बस असणार आहेत. पुढील सात महिन्यात नव्या बस पीएमपी ताफ्यात दाखल होणार आहेत.

  • 16 Jun 2023 07:14 AM (IST)

    गुजरातमध्ये बिपरजॉय वादळाचा तडाखा, प्रचंड नुकसान, रेल्वे सेवा ठप्प

    बिपरजॉय वादळ काल रात्री 10.30 ते 11 च्या दरम्यान कच्छ किनारपट्टीवर धडकले. त्याचा फटका 940 गावांना बसला आहे. या गावांमध्ये वृक्ष उन्मळून पडले. विजेचे खांब कलथले. त्यामुळे या गावांमधील बत्तीगुल झाली आहे. या वादळामुळे 22 जण जखमी झाले आहेत. वादळात 23 पक्षांचा मृत्यू झाला आहे. 524 झाडे पडली आहेत. आज कच्छ परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता हे वादळ पाकिस्तानच्या किनाऱ्यावर सरकले आहे.

Published On - Jun 16,2023 7:09 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.