Maharashtra Breaking Marathi News Live | चंद्रपूर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार

| Updated on: Jun 05, 2023 | 7:07 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | चंद्रपूर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : ओडिशा येथे तीन ट्रेनचा काल शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 233 प्रवासी ठार झाले असून 900 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. नेपाळच्या पंतप्रधानांनीही ओडिशा दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज भेट घेणार आहेत. मुंडे आणि खडसे यांची भेट होणार असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. धाराशीव येथील तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी वितळविण्याचा मंदिर संस्थानचा मोठा निर्णय. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाऊन घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jun 2023 01:29 PM (IST)

    नांदेड आणि हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळणार, नाना पटोले याचं अश्वासन

    नांदेड आणि हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळणार असल्याचं नाना पटोले याचं अश्वासन

    टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकीत अश्वासन दिल्याची माहिती

    दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी नाना पटोले यांनी माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दिल्याची माहिती

    काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगांवकर यांनी दिली माहिती

  • 03 Jun 2023 10:57 PM (IST)

    चंद्रपूर पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार

    चंद्रपूरच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार केल्याचं समोर आलं आहे. निवडणुकीसाठी लागणारे साहित्य पुरवण्याची मागणी यात करण्यात आली आहे. खासदार बाळू धानोरकरांच्या निधनानंतर चंद्रपूरची जागा रिक्त झाली आहे.

  • 03 Jun 2023 10:55 PM (IST)

    उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात कोकण दौऱ्यावर?

    राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात कोकण दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. बारसू येथील कातळ शिल्पाची पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

  • 03 Jun 2023 10:47 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यात अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारा संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • 03 Jun 2023 10:46 PM (IST)

    बीएमसी निवडणूक लवकरच जाहीर होणार?

    सागर बंगल्यावर फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईतील आमदार खासदारांची बैठक झाली. जवळपास दोन तास खलबतं झाली.

  • 03 Jun 2023 10:38 PM (IST)

    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे नवे अध्यक्ष

    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांची बोर्डाच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंदूर येथे झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मौलाना राबे हसन नदवी यांच्या निधनानंतर गेल्या महिन्यात अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती.

  • 03 Jun 2023 10:28 PM (IST)

    रेल्वे अपघातानंतर 147 गाड्यांचे मार्ग बदलले

    बालासोर ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वेने आतापर्यंत 147 ट्रेन वळवल्या आहेत. ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील जखमींना पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया उद्या एम्स भुवनेश्वर आणि कटक येथील मेडिकल कॉलेजला भेट देणार आहेत.

  • 03 Jun 2023 10:16 PM (IST)

    ‘अपघातातील दोषींना सोडले जाणार नाही’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

    बालासोर रुग्णालयात रेल्वे अपघातातील जखमींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, अपघातातील दोषींना सोडले जाणार नाही आणि त्यांना कठोर शिक्षा केली जाईल.

  • 03 Jun 2023 10:06 PM (IST)

    ही राजकारणाची वेळ नाही- रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

    रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच रेल्वे मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागमी केली आहे. विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. माझ्या वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

  • 03 Jun 2023 09:59 PM (IST)

    नवी मुंबईतील वंडर पार्कमध्ये दुर्घटना; तीन महिला, मुलगा जखमी

    मुंबई :

    नवी मुंबईतील वंडर पार्कला लागले गालबोट

    संध्याकाळी नऊ वाजता स्काय व्हील या राईडमधून तीन महिला व एक मुलगा पडून जखमी

    जखमींवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू

    ही राईड जेव्हा वरती गेल तेव्हा ऑपरेटरने व्यवस्थित ऑपरेट न केल्याने ही दुर्घटना घडली

    मनसेचे शिष्टमंडळ दुर्घटना घडल्यानंतर घटनास्थळी दाखल

    कॉन्ट्रॅक्टर व महानगरपालिकेला धरले जबाबदार

    पालिकेने लक्षात जर दिलं नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ

  • 03 Jun 2023 09:50 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा पुढील महिन्यात पुन्हा एकदा कोकण दौरा; खासदार विनायक राऊत

    मुंबई :

    उद्धव ठाकरे यांचा पुढील महिन्यात पुन्हा एकदा कोकण दौरा

    बारसू येथील कातळशिल्पाची पाहणी उद्धव ठाकरे करणार

    उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी तज्ज्ञांकडून केली जाणार कातळशिल्पाची पाहणी

    खासदार विनायक राऊत यांची माहिती

  • 03 Jun 2023 09:42 PM (IST)

    आगामी काळातील सर्व निवडणुका ‘मविआ’ एकत्रच लढणार; विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण

    मुंबईः

    संजय राऊत-अजित पवार यांच्यातील वादानंतरही विनायक राऊत यांना मविआवर विश्वास

    लोकसभा-विधानसभा तसेच येणारी प्रत्येक निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार

    राऊत-पवार वादावर एकत्र बसून चर्चा केल्यावर सगळे प्रश्न सुटतात

    भरत गोगावले हे खूप मोठे विद्वान आहेत त्यांच्यावर काय बोलणार..

  • 03 Jun 2023 09:40 PM (IST)

    राज्यात आणि देशात भाजपा वाढवण्यात मुंडे आणि महाजन यांचा मोठा वाटा; विनायक राऊत यांची टीका

    मुंबई :

    राज्यात आणि देशात भाजपा वाढवण्यात मुंडे आणि महाजन यांचा मोठा वाटा

    मुंडे यांच्या कुटुंबाकडे भाजप दुलर्क्ष करत आहे

    माझ्या गावात पहिला रस्ता पंकजा मुंडे यांनी दिला

    दुर्लक्षित करुन दूर केलं जातं आहे.

  • 03 Jun 2023 09:30 PM (IST)

    जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे शिवसेनेचे खासदारच निवडणूक लढवणार ; निवडणुकीची भाकीत सांगितलं

    ठाणे :

    कामाचे उत्तर कामाने दिले पाहिजे शिव्या शाप किंवा थुंकून या सगळ्या गोष्टी होणार नाहीत

    श्रीकांत शिंदे याचा संजय राऊत यांना प्रत्युत्तर

    जिथे शिवसेनेचे खासदार आहेत तिथे शिवसेनेचे खासदारच निवडणूक लढवणार

    खासदार संजय राऊत  यांच्याकडून फक्त टीकाच

    महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बदलते आहे

  • 03 Jun 2023 09:25 PM (IST)

    खोटं बोल पण रेटून बोल ही आव्हाडांची प्रवृत्ती; बालाजी किणीकर यांचे प्रत्यत्तर

    अंबरनाथ :

    खोटं बोल पण रेटून बोल ही आव्हाडांची प्रवृत्ती

    महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड यांच्या शब्दाला किंमत नाही

    शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचं प्रत्युत्तर

    किणीकर मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आव्हाड यांनी केला होता आरोप

  • 03 Jun 2023 09:19 PM (IST)

    गेल्या 10 महिन्यांपासून राज्यात हीन दर्जाचे राजकारण : श्रीकांत शिंदे यांचा हल्लाबोल

    मुंबई :

    मला वाटतं जसं सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आणि वेगळी संस्कृती

    जिथे विरोधकदेखील एकमेकांचे नाव आदराने घेतं, तिथं आज सगळ्या पातळ्या सोडून टीका

    विरोधक सकाळपासूनच शिव्या शाप देण्याचे काम सुरू करतात ते रात्रीपर्यंत सुरूच

    महाराष्ट्राची संस्कृती दुषित करण्याचे हे काम सुरु आहे

    इतर राज्ये, युवावर्ग आपल्याकेड कसा पाहतो, त्याचा विचार होणे महत्वाचे

    गेल्या  10 महिन्यांपासून पातळी सोडून हीन दर्जाचे राज्यात राजकारण

  • 03 Jun 2023 09:12 PM (IST)

    शेती पिकाला बाजार भाव देऊ, अनेक अश्वासनं दिली तरीही शेतकऱ्यांची राखरांगोळी; ठाकरे गटाची टीका

    मुंबई :

    – सर्व शेतकऱ्यांचा सन्मान पाहून आनंद होत आहे

    –  ठाकरे गटाच्या उपनेते अद्वय हिरे यांचे मत

    – सन्मानाला संजय राऊत यांना बोलवल्याने विशेष आनंद

    – सध्याच्या पद्धतीच्या गुंडगिरी दडपशाहीच्या वातावरणातही संजय राऊत यांना कार्यक्रमाला बोलवलं

    – विपरीत परिस्थितीत शेतकरी शेती करत आहे.

    -शेती पिकाला बाजार भाव देऊ, अनेक अश्वासनं दिली पण राखरांगोळी होते आहे

  • 03 Jun 2023 08:54 PM (IST)

    गडचिरोली : दक्षिण भागात वादळ वाऱ्यासह अवकाळी पाऊस

    आलापल्ली-नागेपल्ली क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

    रात्री 8 वाजतापासून पावसाला सुरुवात

    अहेरीमध्ये वादळ वाऱ्याला सुरुवात, पावसाची शक्यता

    गेल्या दोन दिवसापासून नागरिक उकाड्याने हैराण झाले होते

  • 03 Jun 2023 08:43 PM (IST)

    ठाणे : खोटं बोल पण रेटून बोल ही आव्हाडांची प्रवृत्ती!

    महाराष्ट्रात जितेंद्र आव्हाड यांच्या शब्दाला किंमत नाही!

    शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांचे प्रत्युत्तर

    किणीकर मातोश्रीवर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आव्हाड यांनी केला होता आरोप

  • 03 Jun 2023 08:31 PM (IST)

    सातारा : पाटणजवळील केरळ गावात तरुणांनी बिबट्याची काढली छेड

    अशक्त बिबट्याचा छळ करणे त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी

    या प्रकरणी गोविंद पवार या युवकाला पाटण वनविभागाने ताब्यात घेतले

    बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी उपचार सुरू केले

  • 03 Jun 2023 08:24 PM (IST)

    मुंबई : भाजपच्या आमदार, खासदार यांची बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर बोलावली बैठक

    या बैठकीत बीएमसी निवडणुकीवर रणनीती ठरणार आहे

    सागर बंगल्यावर आमदार प्रवीण दरेकर, आमदार मंगल प्रभात लोढा पोहचले

  • 03 Jun 2023 08:06 PM (IST)

    भंडारा : माजी आमदार रामचंद्र अवसरे यांचे निधन

    भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांचे निधन

    भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ते निमंत्रित सदस्य होते

    2014 ते 2019 या कालावधीत ते भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार होते

    भंडारा शहरातील लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते

    उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला

  • 03 Jun 2023 07:55 PM (IST)

    ‘राज्य सरकारने राजीनामा मंजूर केल्याबद्दल मनापासून आभार’, डॉ. तात्यासाहेब लहाने यांची प्रतिक्रिया

    सांगली :

    ‘राजीनामा मंजूर केल्याबद्दल आपण शासनाचे मनापासून आभारी आणि ऋणी’, डॉ. तात्याराव लहाने यांची प्रतिक्रिया

    ‘अपमान सहन करून राहणे योग्य वाटले नाही,आमचे म्हणणं ऐकून घेतले नाही, एकतर्फी झाले आहे’

    ‘यापुढे खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून आयुष्यभर रुग्ण सेवा देणार’

    तात्यासाहेब लहाने यांचा राजीनामा राज्य सरकारने मंजूर केल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली प्रतिक्रिया

  • 03 Jun 2023 07:52 PM (IST)

    राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक जुळवाजुळव सुरू केली?

    चंद्रपूर :

    पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच चंद्रपूर लोकसभेची निवडणूक झाल्यास राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली प्राथमिक जुळवाजुळव

    राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रामुळे बळावली शक्यता

    जिल्हाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता निवडणूकीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येणार असल्याची दिली माहिती

    सोबतच ज्या साहित्याची गरज आहे त्याचा तात्काळ आढावा घेऊन मागणी करण्याची केली सूचना

    चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा 30 मे रोजी झाला होता मृत्यू

    रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभेची आणि पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच निवडणूक घ्यायची झाल्यास, आयोगाने सुरू केली तयारी

  • 03 Jun 2023 06:57 PM (IST)

    कल्याण पूर्वेमध्ये संजय राऊत यांचा रावणरुपी पुतळा जाळला

    कल्याण पूर्वेमध्ये संजय राऊत यांचा रावणरुपी पुतळा जाळला

    कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली

    संजय राऊत यांच्या विरोधात करण्यात आले आंदोलन

    पोलिसांकडून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न

  • 03 Jun 2023 06:49 PM (IST)

    सर्वोच्च न्यायालयाने केला आदेशात मोठा हस्तक्षेप

    अत्याचारीत पीडित महिलेच्या कुंडलीत मंगळ आहे का?

    लखनऊ विद्यापीठातील ज्योतिष विभागाची मदत घ्या

    अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश

    सर्वोच्च न्यायालयाने केला आदेशात मोठा हस्तक्षेप

    मुलीने आरोप केला आहे की गोविंद राय उर्फ मोनूने लग्नाचं आमिष दाखवून लैगिंक संबंध ठेवले.

    जेव्हा पीडित तरूणीने लग्नासाठी विचारलं तर तरूणाने तुझ्या कुंडलीत मंगल आहे असं सांगत लग्नास नकार दिला.

    त्यानंतर लखनऊच्या चिनहट पोलिस स्थानकात १५ जून २०२२ ला लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.

  • 03 Jun 2023 06:44 PM (IST)

    विक्रोळीमध्ये संजय राऊत यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

    काही काळ विक्रोळीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले

    शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आमदार सुनील राऊत

    यांच्या विक्रोळी मतदारसंघात संजय राऊत यांच्या विरोधात

    शिवसेना शिंदे गटाकडून निदर्शने करण्यात आली

  • 03 Jun 2023 06:33 PM (IST)

    अवकाळी पावसाच्या संकटातून या महाराष्ट्राला बाहेर काढा-छगन भुजबळ

    मी दरवर्षी पालखीचे दर्शन घेतो

    यावर्षी या दिंडीमध्ये फार उत्साह आहे गर्दी आहे

    दर्शन घेताना ही मनोकामना केली की,

    यंदा पाऊस चांगला पडूदे..

    अवकाळी पावसाच्या संकटातून या महाराष्ट्राला बाहेर काढा

    बेरोजगारी आणि शेतकरी हे प्रश्न बरेच किचकट झाले आहेत

    माझी खात्री आहे की ही दिंडी सुखरूप आणि शांततेने पोहोचेल

    आणि ज्या मनोकामना व्यक्त केल्या आहेत त्या पूर्ण होतील

  • 03 Jun 2023 06:27 PM (IST)

    जेजुरी येथे सलग नवव्या दिवशी ग्रामस्थांनी आंदोलन सुरू 

    गेल्या आठ दिवसांपासून जेजुरी येथील ग्रामस्थ आंदोलन करत आहेत

    आज माठ फोडून हे आंदोलन करण्यात आले

  • 03 Jun 2023 06:19 PM (IST)

    टीआरपीसाठी स्टंट करू नयेत संजय राऊतांवर हर्षवर्धन पाटील यांची टीका

    महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाला एक दर्जा आहे

    त्यांचा मान सर्वांनी राखावा. संजय राऊत यांचा हा टीआरपीसाठी केलेला हा स्टंट असू शकतो.

    ते देशातील सर्वोच्च विधिमंडळाचे सदस्य आहेत

    याचे राऊत भान ठेवून राऊतांनी वागल पाहिजे

    कटूता निर्माण होईल अशी वाक्य टाळावीत

  • 03 Jun 2023 06:15 PM (IST)

    राजकारणात जुगलबंदी रंगत असते- छगन भुजबळ

    राजकारणात जुगलबंदी रंगत असते

    एका घरामध्ये भांड्याला भांड लागत असतं

    घर एकत्र राहतं, ते महत्त्वाचं आहे

  • 03 Jun 2023 06:13 PM (IST)

    पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींना भेटून मनमोकळे करावे- छगन भुजबळ

    पक्ष त्यांच्या वरिष्ठत्त्वाचा आणि त्यांच्या वडिलांनी पक्षसाठी जे काम केले आहे,

    त्याचे मोजमाप करताना पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करत आहेत,

    असे त्यांना वाटत असावे, असे मला सातत्याने वाटते

    त्यांनी पक्षश्रेष्ठींना जाऊन भेटावे आणि मनमोकळे करावे

  • 03 Jun 2023 06:08 PM (IST)

    रेल्वे अपघात अत्यंत गंभीर आहे-  शरद पवार 

    नेहरूंच्या काळात अपघात झाल्यानंतर

    लालबहादुर शास्त्री यांनी नैतिकता बाळगत राजीनामा दिला होता,

    आजच्या राजकारण्यांनी त्यांना हवे तसे करावे- शरद पवार

  • 03 Jun 2023 06:04 PM (IST)

    शहादा शहरात किरकोळ कारणांमधून दोन गटात वाद

    वादानंतर शहरात तणावपूर्ण शांतता

    पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला

    रात्री क्रिकेट खेळण्याचा वादातून दोन गटात झाली होती हाणामारी

    आज पुन्हा एक गट रस्त्यावर उतरल्याने वातावरण तणाव पूर्ण

    शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  • 03 Jun 2023 05:57 PM (IST)

    अशी घटना घडू नये यासाठी सक्षम यंत्रणा उभारणार

    बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु

    बचाव कार्य जवळ जवळ पूर्ण

    या दुर्घटनेची कारणे शोधणार

    केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य

  • 03 Jun 2023 05:48 PM (IST)

    राजकारण न करता सर्वच पक्षांनी मदतीला पुढे यावे

    काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे आवाहन

    हा सर्वात मोठा अपघात आहे, जखमींना मदत करा

    पंतप्रधान आणि रेल्वे मंत्र्यांना प्रश्न विचारणार

    पण आता ती वेळ नाही, सध्या मदतीवर भर द्यावा

  • 03 Jun 2023 05:34 PM (IST)

    पंतप्रधानांनी घेतली जखमींची भेट

    रुग्णालयात जाऊन पीएम नरेंद्र मोदी यांनी केली विचारपूस

    हा सर्वात मोठा अपघात, दोषींवर कठोर कारवाई

    पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशातील बालासोरमध्ये

  • 03 Jun 2023 05:31 PM (IST)

    दोषींना कठोर शिक्षा होणारच, त्यांना सोडणार नाही

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातानंतर दिली प्रतिक्रिया

    स्थानिक यंत्रणा, सर्वच प्रशासनाने जलद मदत पोहचवली

    कठीण परिस्थितीत सर्वच जण धावले

  • 03 Jun 2023 05:23 PM (IST)

    राष्ट्रवादीकडून लाव रे तो व्हिडिओ

    राष्ट्रवादीच्या OBC चिंतन शिबीरात चिमटा

    नागपूरमध्ये सुरु आहे राष्ट्रवादीचे चिंतन शिबीर

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दाखविला व्हिडिओ

    ओबीसी आरक्षण न दिल्यास राजकीय संन्यास घेण्याचे वक्तव्य व्हायरल

  • 03 Jun 2023 05:16 PM (IST)

    मृताचा आकडा वाढण्याची शक्यता

    बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु

    रेल्वेगाडीचे डब्बे हटविण्याचे काम जोरात

    हे काम पूर्ण होण्यास तीन ते चार तास लागतील

    अग्निशामन दलाचे महानिदेशक सुधांशु सांरग यांची माहिती

    त्यानंतर मृताचा आकडा वाढण्याची शक्यता

  • 03 Jun 2023 05:08 PM (IST)

    या देशाच्या रेल्वेमंत्र्यांना कोणी ओळखत नाही

    या देशाचा रेल्वेमंत्री कोण, हे जनतेला माहिती नाही

    लालू प्रसाद यादव यांनी साधला निशाणा

    रेल्वे अर्थसंकल्प बंद करुन काय साध्य केले

    रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्याचे कामच काही लोकं करतात

    पंतप्रधानांचे नाव न घेता केली टीका

  • 03 Jun 2023 05:07 PM (IST)

    ओडिशातील रेल्वेच्या अपघाताची चौकशी व्हावी

    शरद पवार यांनी केली मागणी

    यापूर्वीच्या रेल्वे अपघातात झाला होता तेव्हा रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला होता

    पवार यांनी दिला सूचक इशारा

  • 03 Jun 2023 04:48 PM (IST)

    राऊत यांनी जीभेवर शस्रक्रिया करावी, महाराष्ट्राचे कान वाचतील – भाजपा आमदार देवयानी फरांदे

    – शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला.

    – राऊत शिरसाठ आणि श्रीकांत शिंदे या दोघांचे नाव घेताच थुंकले होते

    – संजय राऊत यांनी जीभेला त्रास होत असल्यामुळे मधून मधून मी असं करत असतो म्हटलं होतं

    – संजय राऊत यांच्या जीभेला त्रास होतोय, त्यामुळे त्यांच्या जीभेवर शस्त्रक्रिया करावी

    – म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या कानाला त्रास होणार नाही

  • 03 Jun 2023 04:38 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत पक्ष विस्तार –

    आप नेते आणि माजी आमदार कर्नल देवेंद्र सहरावत यांचा शिवसेनेत प्रवेश

    दिल्लीतील परिवहन कर्मचारी, ऑटो चालक, सफाई कर्मचाऱ्यांना जोडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

    दिल्ली ऑटो रिक्षा संघटनेचा शिवसेनेला पाठींबा

    दिल्लीतील असंघटीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना लक्ष केंद्रीत करणार

    या कार्यक्रमात माजी खासदार आनंदराव अडसूळ ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले

  • 03 Jun 2023 04:26 PM (IST)

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची रेल्वे मंत्र्यांच्या राजीनामा प्रकरणावर तिखट प्रतिक्रीया

    – काही लोकांचं विस्मरण इतकं जास्त असतं की ते गजनी छाप नेते असतात

    – या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा यांचेच काका मुख्यमंत्री होते तेव्हा राजीनामा दिला का?

    – २६/११ चा हल्ला झाला, तेव्हा गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का?

    – बस अपघात झाला तेव्हा परिवहन मंत्र्यांनी राजीनामा दिला का?

    – कोरोना मध्ये या महाराष्ट्रात हजारो लोकांचा मृत्यू झाला, मग अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिला का ?

    – राजीनामा मागणे हे हास्यास्पद

  • 03 Jun 2023 04:07 PM (IST)

    अहमदनगरमध्ये संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन

    – अहमदनगरमध्ये शिवसेनेच्यावतीने दिल्ली गेट येथे संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

    – संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदेंबाबत जी कृती केली त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

    – संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

    – यावेळी शिंदे गटाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

    – यापुढे संजय राऊत यांनी काहीही वक्तव्य केल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे ( शिंदे गट ) शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिला.

  • 03 Jun 2023 04:02 PM (IST)

    महाराष्ट्राचे काहीही होऊ द्या, पण मी पराभूत होणार नाही – मंत्री गुलाबराव पाटील

    – मला पराभूत करण्यासाठी अनेकांनी चंग बांधलाय.

    – विरोधक म्हणतात शिंदे गटाचे 40 आमदारांचे काही पण होवो. पंरतु, मंत्री गुलाबराव पाटलांना पराभूत करायचं आहे.

    – पण माझं विरोधकांना आव्हान आहे. महाराष्ट्राचं काहीही होवो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात मी निवडून दाखवेल.

    – जळगाव ग्रामीण मतदारसंघात भगवा फडकविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

    – मला चोहोबाजूनं घेरणं सुरू आहे. माझी गत महाभारतातल्या अभिमन्यूसारखी केली जातेय.

    – परंतु मतदारसंघात काम करताना प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होतो, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

  • 03 Jun 2023 04:02 PM (IST)

    बालासोर – पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघातस्थळी दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोर येथील दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत.

    अपघात स्थळाचा घेणारा आढावा, जखमींचीही घेणार भेट

  • 03 Jun 2023 03:56 PM (IST)

    अहमदनगरला ग्रामदैवत विशाल गणपतीसह 16 मंदिरात वस्त्रसंहिता लागू

    – मंदिरे आणि धर्मपरंपरां यांच्या रक्षणार्थ वस्त्रसंहिता लागू केल्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाने भूमिका घेतली.

    – नगर शहरातील ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात आज पासून ड्रेस कोड बाबत नियम करण्यात आले.

    – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

    – तसेच शहरातील इतर छोट्या मोठ्या सोळा मंदिरातही ड्रेस कोडबाबत नियमावली करणार आहे.

    – या नियमावलीचे उद्यापासून सक्तीचे पालन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी दिली.

  • 03 Jun 2023 03:53 PM (IST)

    सोलापूर – वटपौर्णिमेच्या निमित्ताने शहरात चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी

    – वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी घातलेल्या दागिन्यांची चोरी होऊ नये, यासाठी सोलापूर पोलिसांचा उपक्रम

    – शहरातील आठ पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 20 ते 22 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली

  • 03 Jun 2023 03:44 PM (IST)

    भाजपने धाराशिव लोकसभा मतदार संघावर केला दावा

    2024 मध्ये धाराशिवमध्ये आपल्या हक्काचा भाजपचा खासदार व्हावा

    भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे मोठे वक्तव्य

    सध्या धाराशिव लोकसभा मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाचा आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे

  • 03 Jun 2023 03:39 PM (IST)

    ओडिशातील रेल्वे अपघातासंबंधी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

    बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात २८० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो जखमी आहेत.

    या दुर्घटनेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

    ओडिशा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत, असे ते म्हणाले.

  • 03 Jun 2023 03:14 PM (IST)

    मी थकणार नाही, थांबणार नाही, मी कोणासमोरही झुकणार नाही – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे यांनी केली भूमिका स्पष्ट

    मला कोणाकडूनही, कसलीही अपेक्षा नाही

  • 03 Jun 2023 03:12 PM (IST)

    मला या चर्चांचा, बातम्यांचा कंटाळा आला आहे – पंकजा मुंडे

    मला कुणाकडूनही , कसलीही अपेक्षा नाही

    पद मिळवण्यासाठी, मी कोणाकडेही जाणार नाही

  • 03 Jun 2023 03:07 PM (IST)

    मी अमित शहा यांची भेट घेणार आहे – पंकजा मुंडे

    अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे.

    माझ्या खांद्यावर अनेक बंदूका विसावण्याचा प्रयत्न करत आहेत

    मी कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेऊन चालवणार नाही

  • 03 Jun 2023 03:05 PM (IST)

    माझे शब्द ठाम असतात – पंकजा मुंडे

    सर्वच पक्षांमध्ये बदल असतात, माझ्या पक्षातही बदल झाले.

    मी मनात काही साठवून ठेवत नाही

    लोकांच्या हितासाठी भूमिका बदलायच्या असतात

  • 03 Jun 2023 03:03 PM (IST)

    5 वर्षांत अनेक अनुभव आले – पंकजा मुंडे

    माझ्या बोलण्याचा काही वेळा विपर्यास केला जातो

    मी लोकांसाठी राजकारणात आहे

  • 03 Jun 2023 02:56 PM (IST)

    कोल्हापुरात वटपौर्णिमेच्या पुजेच्या वेळी वडाच्या झाडाला आग 

    कापूर आणि उदबत्त्यांमुळे वडाच्या झाडाला आग

    मंदिर परिसरात घडली घटना

  • 03 Jun 2023 02:52 PM (IST)

    सुनीता धनगर यांच्या घरात सापडली 85 लाखांची रोकड

    सुनीता धनगर यांच्या घरात सापडले 32 तोळे सोनं

    सुनीता धनगर यांचे आडगाव, टिळकवाडी आणि उंटवाडीत फ्लॅट

    ACB च्या अधीकाऱ्यांनी दिली माहिती

  • 03 Jun 2023 02:47 PM (IST)

    जेव्हा बेईमानाचं नाव एकलं तेव्हा थुंकलो- संजय राऊत

    माझ्या इतंक चांगल संतूलन कोणाचेच नाही- संजय राऊत

    बिनडोक मानसाच्या कृतीमुळे आश्चर्य वाटलं नाही- संजय शिरसाट

    सावरकरही कोर्टात गद्दारांसमोर थुंकले होते – संजय शिरसाट

  • 03 Jun 2023 02:39 PM (IST)

    संजय राऊत यांची अजित पवारांवर खालच्या पातळीची टिका

    प्रत्येक राजकीय नेत्यांनी तारतम्य बाळगावं – अजित पवार

    संजय राऊत यांच्या बोलल्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाही- अजित पवार

    ज्याचं जळतं त्यालाच कळतं- संजय राऊत

  • 03 Jun 2023 02:31 PM (IST)

    नागपूरात आजपासून राष्ट्रवादीचे दोन दिवसीय चिंतन शिबीर 

    राष्ट्रवादीचा नागपूरात विदर्भस्तरीय ओबीसी मेळावा

    रेल्वेमंत्र्यांनी राजीना द्यावा – अजित पवार

    ओडीशातील अपघातावरून राजीम्याची मागणी

  • 03 Jun 2023 02:22 PM (IST)

    निवृत्तीनाथांच्या पालखीच्या ठिकाणी राऊत- भूसे एकाचवेळी उपस्थित

    संजय राऊत आणि दादा भूसे यांनी एकमेकांच्या समोर येणेही टाळले

    संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर

    संजय राऊत यांनी दादा भूसे यांच्याबद्दल बोलणे टाळले

  • 03 Jun 2023 02:14 PM (IST)

    संजय राऊत यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत दरी निर्माण होऊ शकते- प्रविण कुंटे पाटील

    संजय राऊत यांनी विचारपूर्वक बोलावे- प्रविण कुंटे पाटील

    संजय राऊत यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह- प्रविण कुंटे पाटील

  • 03 Jun 2023 01:55 PM (IST)

    जेजुरी: जेजुरीच्या आंदोलनाला मनसेचे वसंत मोरे यांची भेट

    विश्वस्त निवडीतील राजकीय हस्तक्षेपाचा केला निषेध

    देवस्थानात राजकीय हस्तक्षेप ही दुर्दैवी बाब

    राजकारण करणाऱ्यांना खंडेरायानं सुबुद्धी द्यावी

    मागण्यांकडे दुर्लक्ष होत असेल तर जेजुरीकरांनी आता धर्मादाय आयुक्तालयासमोर जागरण गोंधळ घालावा

    उद्या शिष्टमंडळ मुंबईत घेणार राज ठाकरेंची भेट

  • 03 Jun 2023 01:45 PM (IST)

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर

    पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत त्यांच्या राज्यभर मोठं काम आहे स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी सर्व राजकीय नेते व लाखो सहकारी येतात

    त्यामुळे या विषयाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये- गोपीचंद पडळकर

    पंकजा ताईंच्या बाबतीत कोणीही चुकीच्या स्टेटमेंट करू नये

    पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते आहे त्यामुळे इतर पक्षाची लोक ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्या लोकांना माझी विनंती आहे त्यांच्या बाबतीत संभ्रम पसरवण्याचा चुकीचं काम कोणी करू नये- गोपीचंद पडळकर

  • 03 Jun 2023 01:36 PM (IST)

    औरंगाबाद: औरंगाबाद मधील क्रांती चैकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन, संजय राऊत यांचा निषेध

    संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद मधील क्रांती चैकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन

    यावेळी शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त

    संजय राऊत हे मनोरुग्ण झाले असून त्यांना वेड्याच्या दवाखान्यात दाखल करून त्यांच्या उपचाराचा खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी केली

  • 03 Jun 2023 01:25 PM (IST)

    नाशिक: शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमच्या सामने

    शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी

    कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

    पोलिसांनी घेतलं एका कार्यकर्त्याला ताब्यात

  • 03 Jun 2023 01:18 PM (IST)

    जालना: अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन

    संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ जालन्यातही अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन

    यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली

  • 03 Jun 2023 01:12 PM (IST)

    जेजुरी: मागण्या मान्य न झाल्यास जेजुरी गाव बंद ठेवण्याचा इशारा

    मानकरी, खांदेकरी, व्यापारी व ग्रामस्थांच्या बैठकीत झाला निर्णय…

    जेजुरीत पाळला जाणार कडकडीत बंद…

    विश्वस्त निवडीत स्थानिकांना प्राधान्य न दिल्यामुळे वाद..

    ग्रामस्थांकडून सुरु आहे गेल्या नऊ दिवसांपासून आंदोलन..

    मागण्यांबाबत ग्रामस्थांची आक्रमक भुमिका..

  • 03 Jun 2023 01:03 PM (IST)

    भंडारा: गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजनेमुळे हजारो शेतकरी होणार समृद्ध

    मोठ्या प्रमाणावरील शेतजमीन सिंचनाखाली येणार.

    भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर अशा चार तालुक्यातील ११६ गावांतील २१ हजार ७२७ हेक्टर क्षेत्राला या योजनेच्या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ होणार

    कोरडवाहू जमिनीवरील पीक पाण्याअभावी वाया जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसत होता. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्याने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.

  • 03 Jun 2023 12:56 PM (IST)

    लाचखोर शिक्षणाधिकारीच्या घराची झडती

    नाशिक महानगरपालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झाडाझडती घेतली. तब्बल आठ तास चाललेल्या या तपासणीत सुनिता धनगर यांच्या घरातून ८५ लाख रुपये रक्कम आणि ३२ तोळे सोनं आढळल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली.

  • 03 Jun 2023 12:50 PM (IST)

    देवयानी फरांदे यांची राऊतांवर टीका

    भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    संजय राऊत यांच्या जीभेला त्रास होतोय, त्यामुळे त्यांच्या जिभेवर शस्त्रक्रिया करावी

    त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या कानाला त्रास होणार नाही

    आमदार देवयानी फरांदे यांची ट्विट करत मागणी

  • 03 Jun 2023 12:42 PM (IST)

    भंडाऱ्यात 140 विकास कामांचे भूमिपूजन रद्द

    भंडारा शहरातील विविध विकास कामांसाठी 60 कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील विविध प्रभागात तब्बल एकाच दिवशी दिवसभर 140 विकास कामांचे आज भूमिपूजन होणार होते. मात्र उडीसा येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे भूमिपूजन कार्यक्रम रद्द करण्यात आले.

  • 03 Jun 2023 12:37 PM (IST)

    भुसे, राऊत निवृत्तीनाथ पालखीच्या दर्शनाला

    दादा भुसे आणि संजय राऊत एकाच वेळी निवृत्तीनाथ पालखीच्या दर्शनाला

    दोन्ही कडील कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

    एकमेकांकडे न बघताच दोन्ही नेते शेजारून निघाले

  • 03 Jun 2023 12:27 PM (IST)

    पुणे फायनान्स हब होणार- फडणवीस

    पुणे शहारात मोठे गुंतवणूक येत आहे.

    बजाज फिनसर्व कंपनी पुण्यात ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार

    ४० हजार जणांना रोजगार मिळणार

    देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

  • 03 Jun 2023 12:22 PM (IST)

    पुण्यात संजय राऊत विरोधात आंदोलन

    संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक

    पुण्यातील गुडलक चौकात संजय राऊत यांच्या विरुद्ध आंदोलन सुरू

    संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु

  • 03 Jun 2023 12:12 PM (IST)

    राऊत यांच्यावर संजय शिरसाट यांचा खळबळजनक आरोप

    संजय राऊत सारख्या लोकांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे

    संजय राऊत यांनी गल्ली मधील कुत्रे भुंकतात

    संजय राऊत यांनी आतापर्यंत एकतरी निवडणूक लढवली का

    संजय राऊत यांच्यासंदर्भात लवकरच माहिती उघड करणार- शिरसाट

  • 03 Jun 2023 12:10 PM (IST)

    संजय राऊत यांच्यांवर संजय शिरसाट यांची टीका

    राऊत स्वत:ची तुलना सावकरांशी करत आहेत

    जनता संजय राऊत यांना योग्य वेळी धडा शिकवणार

    संजय राऊत यांनी कधी आंदोलन केली का?

    बापाचा पक्ष असल्यासारखे राऊत बोलतात

  • 03 Jun 2023 12:02 PM (IST)

    विशालगडावर नवीन नियम

    विशालगडावरील कायदा सुव्यवस्था आणि विद्रूपीकरण रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा आदेश जारी

    किल्ले विशाल गडावर पशू आणि पक्षांची हत्या करून त्यांचे अन्न शिजवण्यास बंदी

    अंमली पदार्थांचा व्यवसाय करण्यास बंदी

    पुरातत्व विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश

  • 03 Jun 2023 11:58 AM (IST)

    अहमदनगर | काजवा महोत्सव पाहून घरी परतणाऱ्या पर्यटकांवर काळाचा घाला…

    अकोले तालुक्यातील नवलेवाडी शिवारात कोल्हार – घोटी राज्यमहामार्गावर कारचा भीषण अपघात….

    पहाटेच्या सुमारास घडली घटना, अपघातात एका महिलेचा मृत्यु, चार जण जखमी….

    रेखा लाहोटी या 41 वर्षीय महिलेचा मृत्यू…

    कार चालकाच नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली….

    पुणे येथील पर्यटक आले होते काजवे पाहण्यासाठी

  • 03 Jun 2023 11:50 AM (IST)

    थुंकल्याच्या कृतीवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

    सावरकर देखील गद्दारांसमोर थुंकले होते – संजय राऊत

    जेव्हा बेईमानांचं नाव ऐकलं तेव्हा मी थुंकलो- संजय राऊत

  • 03 Jun 2023 11:44 AM (IST)

    अजितदादांवर पलटवार करताना संजय राऊतांची जीभ घसरली

    प्रत्येक राजकीय नेत्यानं तारतम्य बाळगावं – अजित पवार

    राऊत बोलल्यानं आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत – अजित पवार

  • 03 Jun 2023 11:41 AM (IST)

    नाशिक | मनपाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्या घर झडतीत मोठे घबाड आले हाती..

    85 लाख रुपये रक्कम आणि 32 तोळे सोने आढळले..

    काही मालमत्तांचे कागदपत्रे देखील सापडले

    सुनिता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली माहिती

    लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली माहिती

  • 03 Jun 2023 11:39 AM (IST)

    शिवसेनेच्या जोडोमारो आंदोलनावर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

    जनता गद्दारांना निवडणुकीत जोडे मारण्याची वाट पाहतेय – संजय राऊत

    स्वप्नातही त्यांना लोक थुंकत असल्याचा भास – संजय राऊत

    गद्दर शिवराज्यभिषेक सोहळा करतात, हे हास्यास्पद – संजय राऊत

    शिंदे गटानं स्वतःलाच जोडे मारुन घ्यावेत – संजय राऊत

  • 03 Jun 2023 11:33 AM (IST)

    मुंबई | दादरमध्ये शिवसेनेचं संजय राऊत यांच्याविरोधात आंदोलन सुरु

    आमदार सदा सरवणकर यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरु

    संजय राऊत यांच्याविरोधात जोडेमारो आंदोलन सुरु

  • 03 Jun 2023 11:28 AM (IST)

    सांगली | अल्पवयीन मुलीचं अपहरण, मिरजेत आणून अत्याचार

    अत्याचार करुन अल्पवयीन मुलीला जीवेमारलं

    नराधम युवक प्रसाद मोतुगडे माळी याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल

    अपहरण पोक्सो ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

  • 03 Jun 2023 11:24 AM (IST)

    Odisha Train Accident | पंतप्रधान नरेंद्र मोदी बालासोर याठिकाणी जाणार

    रेल्वे अपघात स्थळी पंतप्रधान मोदी भेट देण्याची शक्यता

    कटक येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची पंतप्रधान मोदी भेट घेणार

  • 03 Jun 2023 11:21 AM (IST)

    सिद्धिविनायक मंदिराला मुंबई महापालिकेची नोटीस

    अनधिकृतपणे लाडू बनवण्याचा कारखाना सुरु असल्याचा नोटीसीत उल्लेख

    महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर बजावली नोटीस

    मंदिरात ज्वलशील पदार्थ असल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता

  • 03 Jun 2023 11:11 AM (IST)

    संजय राऊत त्रंबकेश्वर गावात दाखल

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला केलं अभिवादन

  • 03 Jun 2023 10:57 AM (IST)

    धावत्या रेल्वेतून मानवी तस्करी प्रकरण रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलीस यांच्या अंगलगाट येणार

    मुलांचे पालक भुसावळात दाखल

    मुलांच्या आई-वडिलांनी भुसावळ रेल्वे पोलिसांना विचारला जाब

  • 03 Jun 2023 10:55 AM (IST)

    माथेरानमध्ये माकडांचा संशयास्पद मृत्यू

    माकडांच्या मृत्यूमुळे स्थानिकांमधून हळहळ व्यक्त
    उष्माघात की विषप्रयोग? याबाबत साशंकता व्यक्त
  • 03 Jun 2023 10:52 AM (IST)

    शिर्डी भरवीर समृद्धी महामार्गावर पहिला भीषण अपघात

    अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी झाल्याची माहिती

    वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

    मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घटना घडल्याची माहिती

    चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाली पलटी

    दुसऱ्या टप्प्यातील या महामार्गाचे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन

  • 03 Jun 2023 10:52 AM (IST)

    मोबईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षांचा मुलगा जखमी

    शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथील घटना

    साहील नाना म्हस्के असे जखमी झालेल्या चिमुकल्यांचे नाव

    चिमुकल्यांच्या डोळ्याला आणि पायाला गंभीर इजा

    पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

  • 03 Jun 2023 10:48 AM (IST)

    संजय शिरसाट आणि श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्यानंतर संजय राऊत थुंकताहेत

    गेल्या वर्षभरापासून संजय राऊत हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांचे तळवे चाटत आहेत

    त्यामुळेच त्यांना मळमळ होत असल्याने ते थुंकण्यातून बाहेर पडतंय

    आमदार संजय गायकवाड यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र

  • 03 Jun 2023 10:46 AM (IST)

    महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीला सुरूवात

    शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात

    राज्यातील 45 कुस्ती संघटना बैठकीला उपस्थितीत

    वारजे कुस्ती संकुलात बैठक सुरू

  • 03 Jun 2023 10:45 AM (IST)

    राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी दाखल

    धानोरकर कुटुंबीयांच्या सात्वनासाठी अजितदादा दाखल

    खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आ. प्रतिभा आणि कौटुंबिक सदस्यांची घेणार भेट

  • 03 Jun 2023 10:39 AM (IST)

    धनंजय मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा

    करोडो स्मृती साहेबांच्या मनात राहिलेल्या आहेत

    आणि त्या शेवटच्या श्वासापर्यंत या आठवणी मनात राहतील

    गोपीनाथ मुंडेंवर आजही जनतेचं प्रेम

  • 03 Jun 2023 10:37 AM (IST)

    गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतीदिन

    गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

    धनंजय मुंडे, एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर दाखल

    मुंडे आणि खडसेंकडून गोपीनाथ मुंडेंना अभिवादन

  • 03 Jun 2023 10:33 AM (IST)

    समीर वानखेडेंना फेक ट्विटर अकाऊंटवरुन धमकी

    धमकी प्रकरणी समीर वानखेडे पोलीस तक्रार करणार

  • 03 Jun 2023 10:31 AM (IST)

    धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत उमेदवारीवरून चुरस

    नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये धुळे लोकसभेची जागा ही काँग्रेससाठी अनुकूल ठेवलीय

    येथे काँग्रेस विचारसरणीचा मतदार मोठ्या संख्येत

    पक्षांनं ही जागा पूर्ण ताकदिनिशी लढवण्याचा बैठकीत निर्णय

    उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक

    पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

  • 03 Jun 2023 10:27 AM (IST)

    नगर कल्याण महामार्गावरील धोत्रे भीषण अपघात

    तीन वाहनांचा विचित्र अपघात 3 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी

    आयशर टेम्पो आणि दोन कारचा झाला अपघात

    जखमींना उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात केले दाखल

    अपघाताचे कारण अस्पष्ट

    पारनेर पोलीस घटनास्थळी दाखल

    अपघातामुळे नगर कल्याण महामार्गावर काही काळ झाली वाहतूक ठप्प

  • 03 Jun 2023 10:13 AM (IST)

    जोडे मारावं असं काय केलंय, समजून घेण्याचा विषय आहे – संजय राऊत

    गद्दारांना जनता निवडणुकीत जोडे मारुन दाखवेल

    शिंदे गटानं स्वतःला जोडे मारुन घ्यावे

    शिंदे गटाला काम ना धंदा, ना कार्यकर्ते

    त्याच्या आंदोलनाकडे कशाला पहायचं

    शिंदे गटाला स्वप्नातही वाटतंय लोकं जोडे मारतायत

    धरणात …पेक्षा थुंकणं बरं

    अजित पवारांवर पलटवार करताना राऊतांची जीभ घसरली

    गद्दार शिवराज्याभिषेक सोहळा करतात हे हास्यास्पद

    माझ्यामुळे अनेकांचं संतुलन बिघडलंय

    गद्दार हे सूर्याजी पसाळेंची औलाद

    नाशिकचा एक गद्दा निघून गेला

    आता नाशिकची निवडणूक शिवसेनाच जिंकू शकते हे त्रिकालवादी सत्य

    पक्ष फुटला तरी आम्ही कुणाशी सूत जुळवण्याचा प्रयत्न केला नाही

    सुनील तटकरे त्या जिल्ह्याचे खासदार आहेत

    स्थानिक खासदारांचा सन्मान राखणार नसाल तर कसं होणार

    संपूर्ण सोहळा एका पक्षाचा कार्यक्रम म्हणून साजरा झाला

    प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकांची तयारी करत असतो, आमचीही सुरु आहे

    ओरिसा रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

    तीन गाड्या तीन रुटवरुन आल्या आणि एकमेकांना टक्कर झाली

    स्वतः रेल्वेमंत्री ओरिसाचे आहेत, चांगले मंत्री आहेत

    पण नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • 03 Jun 2023 10:07 AM (IST)

    औरंगाबादमध्ये बीबी का मकबऱ्यात कामाला असलेल्या मुलाची हत्या

    हत्या करतानाचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

    जुन्या भांडणाच्या रागातून केली हत्या

    गणेश पटारे असं खून करणाऱ्या आरोपीचे नाव

    तर विशाल शिंदे असं मयत आरोपीचे नाव

  • 03 Jun 2023 09:56 AM (IST)

    खामगाव महामार्गावरील वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक

    बुलढाणा : खामगाव महामार्गावर दहशत माजवून चोरी, लुटमार करण्याच्या उद्देशाने धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या आवळ्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे, सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.

  • 03 Jun 2023 09:45 AM (IST)

    वारजेत होणार महाराष्ट्र पुस्तक परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा

    वारजेत होणार महाराष्ट्र पुस्तक परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा

    सर्वसाधारण सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लावणार हजेरी

    महाराष्ट्र कुस्तीगीर समितीची बैठक देखील आज होणार आहे.

    बैठकीनंतर सर्वसाधारण सभेचे आयोजन

    सर्वसाधारण सभेला जिल्ह्यातील 45 कुस्ती संघाचे अध्यक्ष हजेरी लावणार

  • 03 Jun 2023 09:37 AM (IST)

    धाराशिव बार्शी परंडा येथे एसटी बसचा मोठा अपघात

    धाराशिव बार्शी परंडा येथे एसटी बसचा मोठा अपघात

    भूम रोडवर खासगाव कुंभारवाडाजवळ इथे अपघात झाला

    बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली

    २५ प्रवाशांना परंडा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल

  • 03 Jun 2023 09:31 AM (IST)

    गुन्हा दाखल न केल्याने ग्रामस्थ आक्रमक

    मंगळवेढ्यातील एका व्यक्तीचा पाच महिन्यांपूर्वी खून होऊन देखील गुन्हा दाखल न केल्याने ग्रामस्थ आक्रमक

    जानेवारी 2023 मध्ये अनैतिक संबंधातून निंबोळी गावातील कामू पाटील यांचा खून झाला होता

    मात्र पाच महिने उलटले तरीही मंगळवेढा पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करून घेतला नाही

    त्यामुळे अखेर निंबोळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली

  • 03 Jun 2023 09:28 AM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळविण्याचा मंदिर संस्थानचा मोठा निर्णय

    तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळविण्याचा मंदिर संस्थानचा मोठा निर्णय

    जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांनी घेतला निर्णय

    तुळजाभवानी देवीला भाविकांनी अर्पण केलेले सोने चांदी वितळवीन्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून होणार सुरुवात

    सोने चांदी वितळविण्यापूर्वी होणार मोजमाप, पुजारी मंडळ अध्यक्ष यासह 10 जणांची समिती

    देवीला नवसपूर्ती म्हणून अनेक भाविक सोने चांदी स्वरूपात दान करताना

    जवळपास 180 किलो सोने व हजार किलो चांदी सदृश्य वस्तू जमा असल्याची माहिती

    15 वर्षानंतर तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळविले जाणार

    शिवकालीन व पुरातन दागिने वगळता भाविकांनी अर्पण केलेले सोने चांदी वितळले जाणार

  • 03 Jun 2023 09:27 AM (IST)

    दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

    सुट्टी असल्यामुळे भाविकांची देवदर्शन व कुलाचार पुजा करण्याकडे ओढा वाढला

  • 03 Jun 2023 09:25 AM (IST)

    शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्या निवासस्थानी एसीबीची कारवाई सुरू

    शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांच्या निवासस्थानी एसीबीची कारवाई सुरू

    झडतीत एसीबीच्या हाती मोठं घबाड मिळाल्याची माहिती

    काल ५० हजारांची लाच घेताना महापालिकेच्या शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना रंगेहाथ अटक करण्यात आली होती

    मुख्याध्यापकाला सेवेत रुजू न करून घेणाऱ्या संस्थेच्या विरुद्ध कारवाईसाठी पत्र देण्यासाठी लाच मागितली होती

  • 03 Jun 2023 08:58 AM (IST)

    संजय राऊत आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर, नितेश राणे यांच्या टीकेला उत्तर देणार?

    खासदार संजय राऊत आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

    संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यामुळे पुन्हा त्या वादग्रस्त प्रकरणाला मिळणार उजाळा

    काही दिवसापूर्वी संदल मिरवणुकीत काही तरुण मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्याने झाला होता वाद

    या मिरवणुकीत धूप दाखवण्याची परंपरा असल्याचे संजय राऊत यांनी केले होते वक्तव्य

    याच वक्तव्याला आवाहन देत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती टीका

    त्याला आज उत्तर देणार का हे पाहणं आज महत्वाचं असेल

  • 03 Jun 2023 08:55 AM (IST)

    पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा शाळांसाठी महत्वपूर्ण निर्णय

    पुणे महापालिकेच्या  20 शाळांमध्ये अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅब उभारण्यात येणार

    पालिकेच्या 10 शाळांमध्ये अ‍ॅस्ट्रॉनॉमी लॅब आणि 10 शाळांमध्ये सायन्स लॅब

    पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा निर्णय

    पुणे महापालिकेकडून 4 कोटी रुपयांचा 50 लक्ष रूपयांचा निधी मंजूर

    दोन्ही प्रकारच्या लॅबसाठी प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपयांची तरतूद

  • 03 Jun 2023 08:45 AM (IST)

    नदीपात्रातच मृतदेहांचं दफन, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

    वैनगंगा नदी पात्रातच मृतदेहावर दफनविधी,  नदीचे पात्र ओसरले अन सांगाडे दिसू लागलेत; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

    दफनविधीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये मृतदेहाचे दफन न करता चक्क नदीपात्रामधील रेतीत मृतदेह दफन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघळकीस आलाय

    नदी पात्र ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत

    हा प्रकार चंद्रपूर जिल्हातील सावली तालुक्यात घडला आहे

    विशेष म्हणजे या नदी पात्रातून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो

    चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना जोडणारी वैनगंगा नदी आहे

    नदीच्या पूर्व दिशेच्या काठावर गडचिरोली जिल्ह्याचा गडचिरोली तालुका, तर नदीच्या पश्चिम दिशेच्या काठावर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका आहे

    सध्या उन्हाळा असल्यामुळे वैनगंगा नदीचं पाणी कमी झालं आहे तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे

  • 03 Jun 2023 08:35 AM (IST)

    कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

    कोल्हापुरात पंचगंगा, भोगावती नद्यांवरील उपसाबंदी मागे

    राधानगरी धरणाच्या घटलेल्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने दोन्ही नद्यांवर उपसाबंदीचा आदेश दिला होता

    चार ते सहा जून दरम्यान करण्यात आली होती उपसाबंदी

    मात्र इरिगेशन फेडरेशन, पाटबंधारे विभाग आणि महावितरणच्या संयुक्त बैठकीत उपसा बंदी मागे घेण्याचा निर्णय

    पाटबंधारे विभागाने उपसा बंदी मागे घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा

  • 03 Jun 2023 08:25 AM (IST)

    कचऱ्यापासून हायड्रोजनची निर्मिती होणार, ‘या’ शहरात प्रकल्प उभा राहणार

    पुण्यात देशातील पहिला हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प राहणार उभा

    शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून आता हायड्रोजन निर्मिती

    पुण्यातील हडपसर येथे प्रकल्पाचे काम सुरू

    केंद्राच्या मदतीने पुणे पालिका प्रशासन करणार 350 टन कचऱ्यापासून 9 मेट्रिक टन हायड्रोजनची निर्मिती

    पुण्यात दररोज जमा होतो सुमारे 500 टन कचरा

    प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण दिवाळीपासून हायड्रोजन निर्मितीला पुण्यात होणार सुरुवात

    पुण्यातील बड्या उद्योजकांना हायड्रोजन गॅसचा केला जाणार पुरवठा

  • 03 Jun 2023 08:16 AM (IST)

    राज्यात यंदा सरासरी किती पाऊस पडणार? ‘या’ विभागात सर्वाधिक पाऊस

    राज्यात यंदा सरासरीच्या केवळ 95 टक्के पाऊस होणार

    जून-जुलै या दोन महिन्यात राज्यात कमी पाऊस

    तर ऑगस्ट महिन्यात साधारण पावसाची शक्यता

    पण राज्यभर यंदा पावसाचे प्रमाण वाढणार

    10 जून पर्यंत राज्यात मान्सून होणार दाखल

    हवामान तज्ञांचा अंदाज

    विदर्भासाठी मात्र गुड न्यूज विदर्भात यंदा 100 टक्के

    पावसाची शक्यता

  • 03 Jun 2023 07:58 AM (IST)

    पुण्यात काँग्रेसने भाजप खासदार बृजभूषण सिंहाच्या विरोधात लावले बॅनर

    पोलीस आणि मनपाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तात्काळ बॅनर्स काढले

    बॅनर काढल्यानं पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणाव

    काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचं मांडला होता ठिय्या

    कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं काँग्रेस बृजभूषण सिंहाविरोधात आक्रमक

  • 03 Jun 2023 07:53 AM (IST)

    गोपीनाथ गडावरील कार्यक्रम स्थळाचा मुंडे भगिनींकडून आढावा

    दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आज परळीतील गोपीनाथ गड येथे होत आहे

    दरम्यान रात्री उशिरा भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोन्ही बहिणीने कार्यक्रम स्थळाचा आढावा घेतला आहे.

    पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन गोपीनाथ गडावर करण्यात आले असून कीर्तनाने कार्यक्रमाल सुरुवात होईल.

    त्यानंतर पंकजा मुंडे या मुंडे समर्थकांना मार्गदर्शन करणार आहेत.

    मागील दोन दिवसात झालेल्या घडामोडी मध्ये पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यांने त्यांच्या नाराजीची चर्चा होत आहेत.

    अशातच आजच्या भाषणातून त्या नाराजी उघड करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.

  • 03 Jun 2023 07:44 AM (IST)

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर

    संजय राऊत यांच्या त्र्यंबकेश्वर दौऱ्यामुळे पुन्हा त्या वादग्रस्त प्रकरणाला मिळणार उजाळा

    काही दिवसापूर्वी संदल मिरवणुकीत काही तरुण मंदिरात जाण्याचा प्रयत्न केल्याने झाला होता वाद

    या मिरवणुकीत धूप दाखवण्याची परंपरा असल्याचे संजय राऊत यांनी केले होते वक्तव्य

    याच वक्तव्याला आवाहन देत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली होती टीका

    अशी कुठलीही धूप दाखवण्याची परंपरा नाही असे म्हणत संजय राऊत यांनी ते सिद्ध करून दाखवावे असे म्हणत नितेश राणे आणि आचार्य तुषार भोसले यांनी राऊत यांना दिले होते आवाहन

  • 03 Jun 2023 07:43 AM (IST)

    तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी वितळविण्याचा मंदिर संस्थानचा मोठा निर्णय

    जिल्हाधिकारी तथा संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी घेतला निर्णय

    तुळजाभवानी देवीला भाविकांनी अर्पण केलेले सोने चांदी वितळवीन्याच्या प्रक्रियेला सोमवारपासुन होणार सुरुवात

    सोने चांदी वितळवीण्यापूर्वी होणार मोजमाप, पुजारी मंडळ अध्यक्ष यासह 10 जणांची समिती

    देवीला नवसपूर्ती म्हणून अनेक भाविक सोने चांदी स्वरूपात करताना दान

    जवळपास 180 किलो सोने व हजार किलो चांदी सदृश्य वस्तू जमा असल्याची माहिती

    15 वर्षानंतर तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने चांदी वितळविले जाणार

    शिवकालीन व पुरातन दागिने वगळता भाविकांनी अर्पण केलेले सोने चांदी वितळले जाणार

  • 03 Jun 2023 07:42 AM (IST)

    मस्तच ! पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली

    मे महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये दुप्पट वाढ, मे महिन्यात पुणे शहरात 4052 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री

    केंद्र सरकारकडून मिळत असलेले अनुदान कमी होत असल्याने मे महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची दुपटीने खरेदी

    तर देशात देखील इलेक्ट्रिक वाहनांची दीड लाखांच्यावर विक्री

  • 03 Jun 2023 07:28 AM (IST)

    भाजप नेत्या पंकजा मुंडे आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना भेटणार

    पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

    खडसे-मुंडे भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे

    एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याची शक्यता, मात्र, भेटीचं कारण गुलदस्त्यात

  • 03 Jun 2023 07:26 AM (IST)

    मुंबईच्या काही भागात सोमवारी पाणी पुरवठा बंद

    जोगेश्वरी, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले या भागात सोमवारी पाणी पुरवठा बंद

    या भागातील रहिवाशांना आदल्या दिवशी पाणी साठवून ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

    दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा राहणार बंद

  • 03 Jun 2023 07:23 AM (IST)

    ओडिशा अपघातातील मृतांचा आकडा 233 वर, नेपाळच्या पंतप्रधानांकडून दु:ख व्यक्त

    ओडिशा अपघातानंतर कालपासून सुरू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरूच आहे

    या अपघातातील मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे

    ओडिशातील अपघातावर नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दाहाल यांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केलंय

Published On - Jun 03,2023 7:20 AM

Follow us
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.