Maharashtra Breaking Marathi News Live | खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात; अनेक जण जखमी

| Updated on: Jun 05, 2023 | 7:06 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात; अनेक जण जखमी
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपकडून सरकारी तिजोरीची लूट सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेच्या 99 हजार कोटींच्या डिपॉझीटवर भाजपचा डोळा असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. कुठलेही बीलं काढलेले नसतांना तसेच कुठलेही कामं झालेली नसतातना पैसे खर्च होत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jun 2023 11:32 PM (IST)

    खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात; अनेक जण जखमी

    जळगाव :

    खामगाववरून सुरतला लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा पाळधी गावाजवळ अपघात

    चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या खाली बस उलटली

    ट्रॅव्हल्समध्ये 38 प्रवासी असून अनेक प्रवासी जखमी

    जखमी प्रवाशांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

    या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मदतीसाठी धावले

  • 04 Jun 2023 10:58 PM (IST)

    मी काढलेली संघर्ष यात्रा मोठं परिवर्तन करणारी ठरली; पंकजा मुंडे

    बीड :

    मी राजकीय वेशात आले नसते, मी ही शालू आणि साडी घालून नटून आले असते…

    मी काढलेली संघर्ष यात्रा मोठं परिवर्तन करणारी ठरली

    छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्या विचारांमुळेच आपण आज इथे आहोत

    मुंडे साहेब गेल्यानंतर सर्वांना अश्रू अनावर झाले होते

    डोळ्यातील अश्रुला यज्ञाची आग झाली

  • 04 Jun 2023 10:51 PM (IST)

    महाराष्ट्रातील मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री दिल्ली वारीतच जास्त व्यस्त; नाना पटोले यांची टीका

    भंडारा

    प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना इच्छा असते की त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा

    मुखमंत्री बनण्यासाठी बहुमत असणे आवश्यक

    महाराष्ट्रातील मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री दिल्ली वारीतच जास्त व्यस्त

    घोषणा देणारे मुखमांत्री व उपमुख्यमंत्री फक्त घोषणांचे पाऊस पाडत आहेत.

    डेप्युटेशन मिळालेले हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री

    ते दिल्लीचे चे हस्तक आहेत ते महाराष्ट्रातल्या जनतेचे हस्तक नाहीत.

  • 04 Jun 2023 10:26 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता; आरोग्य मंत्र्यांची फडणवीसांवर स्तुतीसुमने

    धाराशिव –
    सर्व सामान्य लोकांशी नाळ असलेला उप मुख्यमंत्री राज्याला लाभले
    त्यांच्यामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता
    आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमने उधळली
    धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे शासन आपल्या दारी उपक्रमाच्या उद्घाटन
    राज्यात सत्तांतर करण्यासाठी आपण देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दीडशेपेक्षा अधिक बैठका घेतल्या
    खळबळ जनक विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं
    त्यानंतर आता सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे विधान
  • 04 Jun 2023 09:56 PM (IST)

    लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना शाखा संपर्क अभियान; खासदार श्रीकांत शिंदे

    कांदिवली पूर्व दामूनगर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उद्घाटन

    खासदार श्रीकांत शिंदे व आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते उद्घाटन

    लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आज येथून शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू

    झोपडपट्टी भागातील लोकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

    मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम केलं

    ब्लॅक अँड व्हाईट ते कलर पर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा

  • 04 Jun 2023 09:49 PM (IST)

    भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी कधी काम करत नाही; प्रवीण दरेकर

    भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी कधी काम करत नाही जनतेसाठी 24 तास काम करते

    निवडणुका कधी लागतील आम्हाला माहित नाही परंतु निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही नेहमीच तयार

    आम्हाला निवडणुकीचा कुठल्याही चिंता नाही.

    केंद्र सरकारच्या केलेल्या कामाचा माहिती देण्यासाठी मेळावा घेतले

    ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार करण्याचे काम आज फक्त भारतीय जनता पक्षामध्ये

    प्रवीण दरेकर यांनी भाजपचा कार्यक्रम सांगितला

  • 04 Jun 2023 09:49 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे केळी पीक भुईसपाट; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

    अहमदनगर ;

    जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

    वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांसह घरांचे नुकसान

    शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील शेतकऱ्यांचे केळी पीक भुईसपाट

    काही घरांचे पत्रे उडाल्याची घटना घडली

    श्रीगोंदा तालुक्यातील चिखली या गावात पहिलाच मुसळधार पाऊस झाल्यामुळे ओढे वाहू लागले

    नगर तालुक्यातील जेऊर परिसरातही अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

  • 04 Jun 2023 09:48 PM (IST)

    ज्या-त्या वेळेची, ज्या-त्या वेळी शेतकऱ्याला मदत झाली तरच, फायदा होईल; अजित पवार यांची सरकारवर टीका

    नाशिक :

    शेतकऱ्याला सुरुवातीला वाटले भाव मिळेल म्हणून कांदा साठून ठेवला, पण भाव कमी झाले

    कांदा निर्यात थांबवल्यामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान

    शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून टेम्पोचे भाडे द्यावे लागते

    सरकार आणि सरकारचे मंत्री काय करत आहेत

    सरकार घोषणा करतात मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी होत नाही

    नुकसानीचे आजपर्यंत कोणाला पैसे भेटले नाहीत

    ज्या-त्या वेळेची, ज्या-त्या वेळी शेतकऱ्याला मदत झाली तरच, फायदा होईल

  • 04 Jun 2023 09:40 PM (IST)

    पुण्यात चंद्रकांत पाटलांच्यावतीने वारकऱ्यांना वारीसाठी साहित्य वाटप; मंत्रीही झाले पारायणात दंग

    पुणे

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच अनोखं रूप

    चंद्रकांत पाटील झाले हरिभक्त पारायण म्हणण्यात दंग

    कीर्तन सोहळ्याला हजेरी लावत चंद्रकांत पाटील झाले हरिभक्त पारायण म्हणण्यात दंग

    आज पुण्यात चंद्रकांत पाटलांच्यावतीने वारकऱ्यांना वारीसाठी साहित्य वाटप

    याचं कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी केला हरी नामाचा गजर

  • 04 Jun 2023 09:32 PM (IST)

    पुण्याजवळील बैलगाडा शर्यतीमध्ये उभारलेले प्रेक्षकांचे स्टॅन्ड कोसळले; एकाचा मृत्यू

    पुणे :

    पुण्याजवळील वडकी येथील बैलगाडा शर्यतीमध्ये उभारलेले प्रेक्षकांचे स्टॅन्ड कोसळले

    या घटनेत एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

    आज वडकी या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन

    मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शर्यत रद्द करण्यात आली

    अचानक आलेल्या पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ उडाली

    आणि दरम्यान बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळले

    लोखंडी पाऱ्यांचे रिल होते आणि मोकळ्या मैदानात लावल्यामुळेते रेलिंग खचले

    घटनेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान बाळासाहेब कोळी यांचे निधन झाले

  • 04 Jun 2023 09:27 PM (IST)

    शिवराज्याभिषेक 6 जूनच्या सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त; वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था

    रायगड :
    शिवराज्याभिषेक 6 जूनच्या सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त
    तब्बल 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार
    हा सगळा बंदोबस्त गडावर, गडाच्या खाली, पायऱ्यांवर लावण्यात येणार
    माणगावाच्या बाजूने येणाऱ्या वाहनांना पाचाडला पार्किंगची व्यवस्था
    महाडच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ओजरला पार्किंगची व्यवस्था
    सर्व शिवभक्तांना पार्किंगच्या ठिकाणाहून गडापर्यंत जाण्यासाठी एसटीची व्यवस्था
    वाहतुकीची कुठेही कोंडी होऊ नये याकरता दक्षता
    शिवराज्यभिषेक दिनी 170 पोलीस अधिकारी,  1500 पोलीस अंमलदार, 200 होमगार्ड, 1 एसआरपीएपची तुकडी
  • 04 Jun 2023 09:20 PM (IST)

    सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्स शॉपी दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले; पोलिसांचा शोध सुरु

    सांगली –

    शहरातील रिलायन्स ज्वेलर्स शॉपी भरदिवसा दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

    कोटींचा सोन्याचे दागिने लुटण्यात आले

    गोळीबार करत कर्मचारी आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मारहाण

    या दरोड्यातील काही आरोपी व गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कारचे सीसीटीव्ही सापडले

    पोलिसांचा कसून शोध सुरु

  • 04 Jun 2023 09:18 PM (IST)

    काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवसानिमित्त लाडू तुला कार्यक्रम

    भंडारा

    काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वाढदिवसाच्या पूर्व संध्येला वेगवेगळे कार्यक्रम

    लाखनी तालुक्यातील सलेभाटा या गावात कार्यकर्त्यांकडून लाडू तुला कार्यक्रम

    संगीत महिफिलीत नाना पटोले यांचा वाढदिवस साजरा

    कार्यकर्त्यांकडून संपूर्ण गावाला जेवण

  • 04 Jun 2023 09:15 PM (IST)

    सुलोचनादीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा; विनोद तावडे यांच्याकडून श्रद्धांजली

    मुंबई :
    सुलोचनादीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा.
    सुलोचनादीदींच्या निधनाचे वृत्त वेदनादायी
    मराठी-हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका घरातील थोरामोठ्यांची आठवण करून देतात.
    त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले
    माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्याकडून श्रद्धांजली
  • 04 Jun 2023 09:10 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडकाl; अनेक दुकानांचे पत्रे उडाले

    पाचोड / औरंगाबाद
    कोळी बोडखा येथे जोरदार वादळात पंक्चर दुकान उडाले
    औरंगाबादमध्ये  जोरदार वादळी वारा

    अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

    पैठणच्या कोळीबोडखा येथे टपरी अक्षरशः भिंगरीसारखी उडाली

    पाचोड आठवडी बाजारातदेखील लोकांची तारांबळ उडाली

  • 04 Jun 2023 08:50 PM (IST)

    सुलोचना दींदींना विनोद तावडेंनी वाहिली श्रद्धांजली

    -सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे.

    -मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण -करून देतात.

    -आज त्यांच्या निधनाने आपल्या कुटुंबातीलच एक ज्येष्ठ आणि मायाळू व्यक्ती हरपली

    -सुलोचना दीदींच्या आत्म्यास शांती लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना!

  • 04 Jun 2023 08:43 PM (IST)

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 10 किलो सोने जप्त

    -डीआरआयने मोठी कारवाई केली आहे.

    -दोन गुन्ह्यात केलं एकूण 6.17 कोटी रुपयांचं सोन जप्त करण्यात आलं आहे.

    -या प्रकरणी चौघांना केली अटक केली

    -असून पहिल्या गुन्ह्यात शारजावरून आलेल्या 2 प्रवाशांनी लपवून 8 सोन्याच्या विटा कंबरेला बांधून आणलेल्या.

    -आठ विटांची किंमत 4.94 कोटी रुपये

    -दुसऱ्या गुन्ह्यात दुबई वरून आलेल्या प्रवाश्या कडून 1.23 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तर जप्त करण्यात आले आहेत.

    -महिलेच्या पर्सच्या वरील बाजूस शिताफीने सोन्याच्या तारा लपवण्यात आल्या होत्या.

  • 04 Jun 2023 08:34 PM (IST)

    सांदण दरीत अडकले तब्बल 500 पर्यटक

    -जगप्रसिद्ध सांदण दरीत 500 पर्यटक अडकले होते.

    -अचानक आलेले वादळ आणि पावसाने पर्यटक अडकले गेले होते.

    -दरीमध्ये पाण्याचा ओघ वाढल्याने पर्यटकांना बाहेर पडणे झाले मुश्किल झालं होतं.

    -वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घेतली धाव घेतली.

    -नागरिकांच्या मदतीने पर्यटकांना काढले सुखरूप बाहेर काढले.

  • 04 Jun 2023 08:24 PM (IST)

    अखेर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार

    -एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार आहेत.

    -रात्री 10 वाजता अमित शाह यांच्यासोबत बैठक असून यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार, आणि राजकीय विषयांवर होणार चर्चा होणार असल्याची माहिती

    -मुख्यमंत्री पुण्यातून तर देवेंद्र फडणवीस नागपूर मधून दिल्लीत दाखल होणार आहे.

  • 04 Jun 2023 08:19 PM (IST)

    सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला- देवेंद्र फडणवीस

    तीनशेहून अधिक मराठी-हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांच्या निधनाने एका सदाबहार व्यक्तिमत्वाला आज महाराष्ट्र मुकला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

    स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्याही काळात आघाडीच्या अभिनेत्री म्हणून त्यांनी मोठा कालखंड गाजवला आणि त्यानंतर सुद्धा सातत्याने विविध भूमिका त्यांनी साकार केल्या. जवळजवळ 50 हून अधिक वर्ष त्यांनी चित्रपटाचा पडदा गाजविला. व्यक्तिरेखा हुबेहूब जिवंत करणाऱ्या वात्सल्यमूर्ती आणि एका महान कलावंताला आज आपण सारे मुकलो आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शान्ति

  • 04 Jun 2023 08:04 PM (IST)

    बालासोर रेल्वे अपघाताची होणार सीबीआय चौकशी – रेल्वेमंत्री

    बालासोर रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपासासाठी हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या अपघातामध्ये 278 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर 1000 जणांपेक्षा अधिक लोक जखमी आहेत.

  • 04 Jun 2023 08:01 PM (IST)

    अभिनय क्षेत्रातील असामान्य व्यक्तीमत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    – मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात आपल्या सहजसुंदर अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी लाटकर यांचे निधन झाले.

    – त्यांच्या जाण्याने अभिनय क्षेत्रातील एक असामान्य व्यक्तीमत्व हरपले आहे.

    – परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच लाटकर कुटुंबातील सदस्य आणि सुलोचना दीदींच्या चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना.

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • 04 Jun 2023 07:50 PM (IST)

    सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली – शरद पवार

    – ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे.

    – सुमारे सहा दशके सुलोचना दीदींनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

    – रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारलेल्या सात्त्विक, सोज्वळ अशा वात्सल्यमूर्ती आईच्या भूमिका कोट्यवधी रसिकांच्या मनात घर करून आहेत.

    – त्यांच्या निधनाने सकस आणि निरागस अभिव्यक्तीपासून चित्रपटसृष्टी पारखी झाली आहे. पद्मश्री स्व. सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ट अभिनेत्री सुलोचना दीदी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • 04 Jun 2023 07:45 PM (IST)

    संजय राऊत यांनी उद्धव साहेबांना धृतराष्ट्र बनवले, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची टीका

    – महाभारतामध्ये संजय याने धृतराष्ट्राला रणांगणावरील माहिती देण्याचे काम केले.

    – आता कलियुगात मात्र संजय राऊत चांगले असणाऱ्या उद्धव साहेबांना धृतराष्ट्र बनवत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    – संजय राऊत यांनी आम्हाला अस्तित्व नसलेले पक्ष म्हणून हिणवले.

    – त्याच संजय राऊत यांच्या पक्षाची आज काय अवस्था झाली आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहेत.

    – काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांचे शिवसेना ही महाविकास आघाडी नसून महाचोरांची टोळी आहे.

    – महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा नसून वाटणीची चर्चा सुरू असल्याची टीका मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.

  • 04 Jun 2023 07:41 PM (IST)

    सरकार फक्त मिरवण्यासाठी आहे का? अजित पवार यांचा सरकारवर हल्लाबोल

    – शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही, खावटी कर्ज मिळत नाही.. मग सरकार फक्त मिरवण्यासाठी आहे का? अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

    – सरकार येत असतात, जात असतात. हे काय ताम्रपट घेऊन आले का? असा सवालही त्यांनी केला.

    – हे सरकार मागच्या काळातील कामे थांबवत आहे. कोरोना काळात अर्थ मंत्रालयात सांभाळत असताना अडचण यायची.

    – सगळ्यांचे पगार वेळेवर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागायची. तरीही त्या काळात महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, कोरोना मुक्त झाला पाहिजे याकडे आम्ही लक्ष दिले असे ते म्हणाले.

  • 04 Jun 2023 07:17 PM (IST)

    मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे वृद्धापकाळाने निधन

    हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे दुःखद निधन झाले.

    – मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

    – वयाच्या 94 वर्षी त्यांचे निधन झाले.

    – हिंदी आणि मराठी अशा सुमारे 400 सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.

    – पद्मश्री, महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते.

    – तसेच प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

    – त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट जगताला मोठा धक्का बसला आहे.

  • 04 Jun 2023 07:04 PM (IST)

    ‘फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’, नरहरी झिरवाळ यांनी केले अजित दादांचे कौतुक

    – बरेच लोकं म्हणतात की, दादा गरम आहे. त्यांना भेटायचं म्हणजे धाक वाटतो.

    – पण दादा म्हणजे शिस्त आहे. कधी कधी असे वाटतं की, दादा याच्याहीपेक्षा स्ट्रिक्ट झाले पाहिजे.

    – ‘फणसाच्या अंगी काटे, आत अमृताचे साठे’ अशी उपमा देत त्यांनी अजित पवार यांचे कौतुक केले.

    – अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे अशी आमची भावना आहे.

    – आम्ही पहाटे गेलो तेव्हा उपमुख्यमंत्री झालो. पण आता संधी आहे, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले.

  • 04 Jun 2023 06:48 PM (IST)

    चंद्रपूर : कार अपघातात चार जणांचा मृत्यू

    नागपूरवरून नागभीडकडे येणाऱ्या अल्टो कारने ARB ट्रॅव्हल्सला दिली धडक

    कारमधील एकूण सहापैकी चौघांचा जागीच मृत्यू – याची बातमी करतो. हेडिंग देतो.

    एक मुलगी आणि महिला गंभीर जखमी

    जखमींना उपचारासाठी नागपूरला हलविले

    मृत दोन महिला आणि दोन पुरुष कारमध्ये अडकले

    घटनास्थळी नागभीड पोलीस ठाण्याची चमू दाखल

  • 04 Jun 2023 06:35 PM (IST)

    अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

    वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकांसह घरांचे नुकसान

    शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील शेतकऱ्यांचे केळी पीक भुईसपाट

    तर काही घरांचे पत्रे उडाल्याची घटना

    चिखली या गावात पहिलाच मुसळधार पाऊस झाल्याने ओढे वाहू लागले

  • 04 Jun 2023 06:23 PM (IST)

    पंढरपूर : गिरवी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस

    वादळी वाऱ्यामुळे मोबाईलचा टावर कोसळला

    अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोलही उन्मळून पडले

    इलेक्ट्रिक तारा तुटल्याने मोठे नुकसान

    वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला

  • 04 Jun 2023 05:57 PM (IST)

    नितीन गडकरी यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी मागणी

    शिर्डी ते नाशिक दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन केले आहे

    मला सगळे भेटले मी गाडीतूनच सगळे फोन केले

    चांदणी चौकातली वाहतूक कोंडी दूर झाली आहे

    गडकरी यांना मी एक विनंती करतो कात्रज ते खडीमशीन चौक

    एलिव्हेटेट मोठा पुल दिला तर मोठा फायदा लोकांना होईल.

  • 04 Jun 2023 05:52 PM (IST)

    गडकरी यांच्या नेतृत्वात चांगले काम झाले आहे- एकनाथ शिंदे

    गडकरी यांच्या नेतृत्वात चांगले काम झाले आहे

    केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक आल्यावर काय चमत्कार होतो हे दिसत आहे

    मी मुद्दाम या कार्यक्रमासाठी आलो आहे

    कारण हे बांधताना कष्ट लागतात, लोकांना याचा फायदा होतो

  • 04 Jun 2023 05:48 PM (IST)

    9 उड्डाणपूलाचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूलाचे भूमीपूजन संपन्न- एकनाथ शिंदे

    9 उड्डाणपूलाचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूलाचे भूमीपूजन संपन्न- एकनाथ शिंदे

    मी आजच्या पायाभूत सुविधांच्या महत्वाच्या अशा प्रकल्पांना शुभेच्छा देतो

    अधिकाऱ्यांचे देखील अभिनंदन एकनाथ शिंदेंनी केले आहे

  • 04 Jun 2023 05:45 PM (IST)

    राज्यात 91 उड्डाणपूल बांधणार नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

    महाराष्ट्र फाटकमुक्त होणार, जनतेला चांगली सेवा मिळेल

    मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होत आहे

    पालखी मार्गाने जाणाऱ्या भक्ताची राहण्याची ,जेवणाची सोय होणार

    राज्यात 91 उड्डाणपूल आपण बांधणार आहोत

  • 04 Jun 2023 05:32 PM (IST)

    आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आश्रम सुरू करणार- राजू शेट्टी

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची घोषणा

    नांगरट साहित्य संमेलनात राजू शेट्टी यांची घोषणा

    कोल्हापूरातल्या जयसिंगपूर येथे आश्रम सुरू करणार

    किमान पदवीपर्यंत शिक्षण देता यावे यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेणार – शेट्टी

  • 04 Jun 2023 05:30 PM (IST)

    वसंतराव नाईक कृषी संशोधन पुरस्कार सोहळा

    वसंतराव नाईक कृषी संशोधन पुरस्कार सोहळा

    वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान

    राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील मान्यवरांचा अभिनंदन

    सोहळा राज भवन येथे पार पडणार आहे

    राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त

    महाराष्ट्रातील मान्यवरांचा पुरस्कार देण्यात येणार

  • 04 Jun 2023 05:26 PM (IST)

    यवतमाळ शहरात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

    रविवारी मान्सूनपूर्व पावसाने यवतमाळ जिल्हात केले आगमन

    जिल्ह्यात जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस बरसला

    उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा

  • 04 Jun 2023 05:24 PM (IST)

    सांगलीत मुसळधार पावसाची दमदार हजेरी 

    विजेचा कडकडाटसह अवकाळी पाऊस सुरू

    अचानकपणे आलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित

    अवघ्या काहीवेळ पडलेल्या मुसळधार पावसामुळे साचले पाणी

  • 04 Jun 2023 05:22 PM (IST)

    रिलायन्स ज्वेलरी दुकानावर दरोडा, शॉपमधील कर्मचाऱ्यांना ठेवले बांधून

    ग्राहक म्हणून आले होते चोरटे

    शॉपमधील सोन्याचे दागिने लंपास

    शॉप मॅनेजर यालाही केली मारहाण

    कर्मचाऱ्यांना धमकावून सोने केले लंपास

    सीसीटिव्ही डीव्हीआर नेला सोबत

    ग्राहकांवर देखील केला गोळीबार

    एक ग्राहक झाला जखमी, विश्राम बाग पोलीस दाखल

  • 04 Jun 2023 04:58 PM (IST)

    वसईत एसबीआय बँकेचे एटीएम तोडून 20 लाखांची लूट

    – वसई पूर्वेच्या गोलानी नाका येथील दीप टॉवर इमारतीमधील एसबीआयचे एटीएम पहाटे साडे तीनला चोरट्यांनी लुटले

    – एक चोरटा एटीएम मधील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

    – नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    – नायगाव, वालीव, विरार, नालासोपारा क्राईम ब्रँचच्या टीम शोधासाठी रवाना

  • 04 Jun 2023 04:45 PM (IST)

    नगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा, टोल नाका कोसळला

    – नगर जिल्ह्याला जोरदार पावसासह सोसाट्याचा वाऱ्याने झोडपले

    – जोरदार वादळामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरातील टोलनाका कोसळल्याची दुर्घटना

    – कल्याण – निर्मल महामार्गावरील पत्र्याचा टोल नाका जोरदार वाऱ्यामुळे कोसळला

    – टोल नाक्यावरील कर्मचारी सुखरूप असून टोल नाक्याचे मात्र मोठे नुकसान

  • 04 Jun 2023 04:31 PM (IST)

    जळगाव जिल्ह्याला पावसाने झोडपले, केळी पिकांचे सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान

    – यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय.

    – यावल चोपडा मार्गावर तसेच किनगाव डांभुर्णी, यावल फैजपुर या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळल्याने  वाहतुकीचा खोळंबा

    – फैजपुर, न्हावी, आमोदा, डोंगर कठोरा, वाघझीरा, नायगाव गावांसह तालुक्यातील इतर ठिकाणी गारपिटचा तडाखा बसला

    – सुमारे एक हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधीत झाले असून केळी उत्पादकांचे सुमारे सहा ते सात कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज

  • 04 Jun 2023 04:17 PM (IST)

    महाराजांनी सांगितल्यामुळे शिंदे गटात – मंत्री संजय राठोड यांचे मोठे विधान

    – शिवसेनेत फूट पडली त्यावेळी उद्धव ठाकरे यांना सोडून जायचे नाही असे मी ठरवले होते.

    – पण, बाबू महाराज यांनी मला सांगितले आपल्याला पोहरादेवी गडाचा विकास करायचा असेल तर शिंदे गटासोबत जावे लागेल.

    – त्यानुसार मी शिंदे गटात गेलो असा दावा शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी केला.

  • 04 Jun 2023 04:00 PM (IST)

    अहमदनगर: नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुसाट्याचा वारा

    जोरदार वारा वादळामुळे पाथर्डी तालुक्यातील खरवंडी परिसरातील टोलनाका कोसळला

    कल्याण- निर्मल महामार्गावरील पत्र्याचा टोल नाका जोरदार वाऱ्यामुळे कोसळला

    सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, तर टोल नाक्यावरील कर्मचारी देखील सुखरूप

    टोल नाका कोसळला, टोल नाक्याचं मोठा नुकसान

    तर अनेक ठिकाणी हलका पाऊस

  • 04 Jun 2023 04:00 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात पावसात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

    – वाशिम जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या जोरदार पावसाने अनेक लग्न सोहळ्यात विघ्न

    – मंडप उडून गेला त्यामुळे वऱ्हाडी मंडळींसह नवरी नवरदेवलाही पावसात भिजावे लागले

    – रिसोड वाशिम महामार्गही झाडं कोसळल्याने काही काळ बंद

    – वीज कोसळून 35 वर्षीय शेतकरी संदीप दत्ता काळदाते यांचा मृत्यू झाला

  • 04 Jun 2023 03:52 PM (IST)

    यवतमाळ शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

    गेल्या काही दिवसात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ

    रविवारी मान्सूनपूर्व पावसाने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात हजेरी लावली

    यवतमाळ उमरखेड घाटंजी आर्णी महागाव पावसाची हजेरी, पाऊस बरसल्याने गारवा निर्माण झाला

  • 04 Jun 2023 03:45 PM (IST)

    अंबरनाथ: संपूर्ण अंबरनाथ शहरात उठलं धुळीचं वादळ

    अंबरनाथ शहरात धुळीच्या वादळासह सोसाट्याचा वारा

    मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची दाट शक्यता

    संपूर्ण अंबरनाथ शहरात उठलं धुळीचं वादळ

  • 04 Jun 2023 03:40 PM (IST)

    खेड/पुणे: आंबोली, कोहिंडे या भागात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस

    खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आंबोली, कोहिंडे या भागात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस

    उकड्यापासून नागरिकांची सुटका

    मात्र एक तास पडलेले पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले

  • 04 Jun 2023 03:35 PM (IST)

    पुणे: हडपसरमध्ये गेल्या 1 तासापासून पावसाची हजेरी, नागरिकांचे हाल

    पुण्यातील हडपसर भागात पावसानं नागरिकांचे हाल

    रस्त्यावर गुडघ्याइतकं साचलं पाणी

    रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना नागरिकांचे हाल

    हडपसर भागात गेल्या 1 तासापासून पावसाची हजेरी पाहायला मिळाली

  • 04 Jun 2023 03:26 PM (IST)

    पुणे: सिंहगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा झाला

    सिंहगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला

    विश्व हिंदू परिषदेच्यावतीनं राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं

    भंडारा उधळत शिवाजी महाराजांच्या जयघोषात सिंहगड किल्ला दुमदुमला

    350 व्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन किल्ले सिंहगडावर करण्यात आलं

  • 04 Jun 2023 03:23 PM (IST)

    नंदूरबार: वादळात गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू

    तळोदा चिनोदा रस्त्यावर वादळात गाडीवर झाड पडल्याने एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

    दुपारी अचानक आलेल्या वादळात रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर झाड पडल्याने दुर्घटना

    वादळी वाऱ्यामुळे तळोदा तालुका आणि परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 04 Jun 2023 03:18 PM (IST)

    वाशिम: वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात लग्न समारंभ अर्ध्यातच

    जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील रुई येथे वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात

    लग्न समारंभ अर्ध्यातच राहिलं, लग्न मंडपातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली

  • 04 Jun 2023 03:12 PM (IST)

    जालन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस!

    जालन्यातील बदनापूरमध्ये अचानक वादळी वारा आणि पाऊस झाला.

    या वेळी या वादळी वाऱ्यामुळे नागरपंचायच्या कार्यालयावर लावण्यात आलेला बोर्ड खाली पडला यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी खाली उभ्या असलेल्या दुचाकींचे नुकसान झाले.

  • 04 Jun 2023 03:00 PM (IST)

    राऊत ज्यांच्यावर थुंकत आहेत त्यांनीच राऊतांना खासदार केलं आहे – मंत्री गुलाबराव पाटील 

    थोडी जरी लाज शिल्लक असेल तर राऊतांनी राजीनामा द्यावा- गुलाबराव पाटील

    संजय राऊत यांचे मानसीक संतूलन बिघडलं आहे- प्रताप चिखलीकर

  • 04 Jun 2023 02:53 PM (IST)

    मवीआ आणि घटक पक्षांना सांभाळून घेत जागा वाटप करावं लागेल- छगन भुजबळ 

    लोकसभेच्या जागांवरील दाव्यावरून छगन भुजबळांचं वक्तव्य

    जागा वाटपाच्या चर्चा मीडियावर नको, भुजबळांचा पुनरूच्चार

    सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन सुत्र ठरविले जाईल

  • 04 Jun 2023 02:47 PM (IST)

    भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास

    शिंदे आणि भाजपची युती सिमेंटपेक्षा जास्त मजबूत – सुधीर मुनगंटीवार

    एकवेळ सिमेंटची भिंत तुटेल पण आमची युती तुटणार नाही- सुधीर मुनगंटीवार

  • 04 Jun 2023 02:38 PM (IST)

    निवडणूकीसाठी आमचीही तयारी सुरू- ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव

    निवडणूकीसाठी आमचे आमच्या पद्धतीने काम सुरू आहे- भास्कर जाधव

    राजकारणात काही गोष्टी या दाखवायच्या नसतात- भास्कर जाधव

    आमचे मित्र पक्ष अभ्यास करित आहेत आणि आम्ही गप्प आहोत असं समजण्याचं कारण नाही- भास्कर जाधव

  • 04 Jun 2023 02:33 PM (IST)

    मुंबई महापालिका निवडणूकीत भाजप फक्त 28 जागाच जिंकणार- भास्कर जाधव

    लोकसभा निवडणूकीत चांगलं काम करा, आमदारकीसाठी विचार करू- अजित पवार

    कोअर कमेटीच्या बैठकीनंतर निवडणूकीबाबत निर्णय घेऊ- नाना पटोले

    काँंग्रेसकडून लोकसभा निवडणूकीसाठी सर्वे

  • 04 Jun 2023 02:13 PM (IST)

    राज्याच्या तिजोरीची सरकारकडून लूट सुरू- नाना पटोले यांचा आरोप

    राज्याच्या तिजोरीची सरकारकडून लूट सुरू- नाना पटोले यांचा आरोप

    वेळ पडली तर आम्ही या प्रकरणी कोर्टात जावू- नाना पटोले

    राज्यातल्या शतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही- नाना पटेले

    99 हजार कोटींच्या डिपॉझीटवर भाजपाचा डोळा आहे- भास्कर जाधव

  • 04 Jun 2023 02:08 PM (IST)

    भाजपात प्रचंड दुफळी माजली आहे – सुषमा अंधारे 

    नरेंद्र मोदी की अमित शाह, भाजपामध्ये संघर्ष- सुषमा अंधारे

    पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

  • 04 Jun 2023 01:50 PM (IST)

    महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून द्या, परभणी प्रहार जनशक्ती पक्षाची राष्ट्रपतींकडे मागणी

    दिल्ली येथे सुरू असलेल्या महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनाला परभणी प्रहार जनशक्ती पक्षाने पाठिंबा दिला.

    राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष घालून महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून द्यावा.

    परभणी प्रहार जनशक्ती पक्षाची निवेदनाद्वारे मागणी

  • 04 Jun 2023 01:42 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे मोठं नुकसान

    राज्यात पुन्हा अवकाळीचा कहर

    सावदा, फैजपूर भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट

    काही मिनिटांच्या गारपिटीने मोठं नुकसान

    काही भागात केळीच्या बागा जमीनदोस्त

    जळगाव जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आला.

    वादळी वाऱ्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर झाडं कोलमडून पडली.

    जामनेर तालुक्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.

  • 04 Jun 2023 01:39 PM (IST)

    इगतपुरी शहरात वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

    इगतपुरीमध्ये मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

    अर्ध्या तासापासून सुरू आहे पाऊस

    नगरपरिषद रोड, शेळके सदन येथील झाडं कोसळले

    सुदैवाने जीवितहानी नाही

    उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

  • 04 Jun 2023 01:36 PM (IST)

    ठाकरे गटाच्या वतीने हिंगोलीत संतोष बांगर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन

    संतोष बांगर यांनी बबन थोरात, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

    या निषेधार्थ ठाकरे गटाच्या वतीने हिंगोलीत संतोष बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

    50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत केलं आंदोलन

    भविष्यात संतोष बांगर यांना जोडे मारू

    विनायक भिसे यांचा संतोष बांगर यांना इशारा

  • 04 Jun 2023 01:30 PM (IST)

    मुसंडी चित्रपटाला वरिष्ठ IPS पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभेच्छा

    मुसंडी या नावातच ऊर्जा आहे त्यामुळे हा चित्रपट प्रेरणादायी आहे

    चित्रपटाचा विषय गंभीर आणि आशयपूर्ण आहे.

    स्पर्धा परीक्षेतील मुलं शहरात येतात तेव्हा अनेक आमिष आणि आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते

    अनेकजण यात हरतात, खचतात तर अनेकजन यशस्वी होतात

    मुसंडी चित्रपटात एका मुलीचा संघर्ष यात दाखवण्यात आलाय

    मुसंडी चित्रपटात एमपीएससी परीक्षेतील मुलांचे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो स्वागतार्ह आहे

    ग्रामीण भागातील टीमने खूप चांगला संघर्ष दाखवलेला आहे.

    मराठी माणसाने हा चित्रपट पाहायलाच हवा

  • 04 Jun 2023 01:19 PM (IST)

    अपघातावेळी दोन्ही रेल्वेचा वेग अधिक, रेल्वे बोर्डाची पत्रकार परिषद

    ओडिशा अपघाताची माहिती देण्यासाठी रेल्वेची पत्रकार परिषद.

    अपघातावेळी सिग्नल यंत्रणेत बिघाड होता, अशी प्राथमिक माहिती.

    फक्त कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला.

    कोरोमंडल एक्सप्रेसचा वेग 126 किमी प्रतितास एवढा होता.

  • 04 Jun 2023 01:14 PM (IST)

    ओडिशा रेल्वे अपघात: सुषमा अंधारे यांनी मागितला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा

    कालच्या रेल्वे अपघातानंतर नंतर काही व्हिडिओ समोर आले.

    विश्वगुरू म्हणून त्यांचे भक्त त्यांची आरती ओवाळत असतात.

    ते अँब्युलन्स देत नसतील तर ते कसले विश्वगुरू

    सिग्नल दिले गेले नाहीत म्हणून हा भीषण अपघात झाला

    पंतप्रधान यांनी ठोस भूमिका घ्यायला हवी होती

    १० लाख रुपये माणसाच्या जीवनाची किंमत नाही, हे मोदी यांनी लक्षात घ्यावे

    मोदी अभिनय करतात आणि उत्तम मांडणी करू शकतात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला पाहिजे

  • 04 Jun 2023 01:06 PM (IST)

    मुर्तीकार संघटना राज ठाकरेंच्या भेटीला

    मुर्तीकार संघटना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला..

    शिवतीर्थवर घेणार थोड्याच वेळात भेट

    पीओपीपासून बनवलेल्या मूर्तींवर बंदीची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी.

    यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी.

    न्यायालयाने आणि तांत्रिक समितीने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सध्या होत नसल्याचा आरोप

    राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर निर्णय घ्यायला सांगावं अशी मूर्तिकारांची मागणी.

    उद्या पर्यावरण दिवस आहे त्यापार्श्वभूमीवर ही भेट घेण्यासाठी मूर्तिकार पोहोचले आहेत.

  • 04 Jun 2023 12:58 PM (IST)

    मालेगाव | नाशिकच्या मालेगाव आणि शहर परिसरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी…

    वादळी वारा आणि विजाचा कडकडाटासह दमदार पाऊस…

    पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मिळाला दिलासा..

    पूर्व मान्सून पावसाने उकाड्याने हैराण मालेगावकरांना दिलासा

  • 04 Jun 2023 12:47 PM (IST)

    पावसाळ्यापूर्वी मातोश्री कलानगर परिसरात शिंदे यांचं मिशन अंब्रेला

    शिंदेंच्या शिवसेनेकडून बांद्रा कलानगर ते सांताक्रुझ परिसरात एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो असलेल्या छत्री वाटपाचा कार्यक्रम सुरू…

    शिंदे गटाच्या नेत्या पल्लवीताई सरमळकर यांच्या हस्ते छत्रीचे वाटप

  • 04 Jun 2023 12:40 PM (IST)

    ओडिशातील रेल्वे अपघात प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

    वकील विशाल तिवारींची सर्वोच्च न्यायालयात याचिका

    सुरक्ष कवच सिस्टिम तात्त्काळ लागू करण्याची मागणी

  • 04 Jun 2023 12:37 PM (IST)

    जेजुरीतील ग्रामस्थांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

    जेजुरी देवस्थानातील विश्वस्तांच्या निवडीला ग्रामस्थांचा विरोध

    विश्वस्तांच्या निवडीच्या मुद्यावर ग्रामस्थांची राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा

    जेजुरीच्या विश्वस्त निवडीचा वाद

  • 04 Jun 2023 12:33 PM (IST)

    पुणे | यंदा पालखी सोहळ्यात दर तीन किलोमीटरला असणार नीवारा केंद्र

    महिलांसाठी असणार हिरकणी केंद्र, वाढता उन्हाळा पाहता प्रशासनाच्यावतीने उपाय योजना

    पुणे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी जिल्ह्यातील पालखी विसावा आणि मुक्कामाच्या स्थळांची पाहणी करून घेतला तयारीचा आढावा

  • 04 Jun 2023 12:28 PM (IST)

    गोंदिया | वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर वनविभागाची गदा…..

    संतप्त झालेल्या ग्रामसभेने केले होते आमरण उपोषण सुरू……

    जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू….

    तीन लोकांची प्रकृती खालावली…

  • 04 Jun 2023 12:27 PM (IST)

    पुणे | बामधनमध्ये ‘नो व्हेईकल डे’, खासदार सुप्रिया सुळे यांची कार्यक्रमाला उपस्थिती

    सुप्रिया सुळे यांनी देखील चालवली सायकल

  • 04 Jun 2023 12:20 PM (IST)

    जळगाव | जिल्हयातील फैजपूर, चाळीसगाव परिसरात मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह पावसानी हजेरी लावली आहे….

    फैजपूर येथे वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे….

    चाळीसगाव तालुक्याला देखील वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले आहे…..

    झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे….

  • 04 Jun 2023 12:19 PM (IST)

    पावसाळी अधिवेशनात धर्मांतरविरोधी कायदा आणला जाण्याची शक्यता – नितेश राणेंचा दावा

    पुणे – घोरपडीमध्ये लव्ह जिहादविरोधात मोर्चा

    पक्ष नाही तर हिंदू म्हणून मोर्चात एकत्र – राणे

    राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणला जाण्याची शक्यता – नितेश राणे

    धर्मांतरविरोधी कायद्यावर राज्य सरकारचा अभ्यास सुरु – राणे

  • 04 Jun 2023 12:10 PM (IST)

    ६ जूनला रायगडावर होणाऱ्या शिवराज्यभिषेकाच्या तयारीचा आढावा

    संयोगीताराजे छत्रपतींकडून काल रात्री उशिरापर्यंत सोहळ्याच्या तयारीचा आढावा

    शिवभक्तांसाठी समितीकडून जोरदार तयारी

  • 04 Jun 2023 12:04 PM (IST)

    हिंगोली | नांदेड आणि हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला सोडून देण्याचं नाना पटोले याचं अश्वासन

    दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी नाना पटोले यांनी माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर दिल्याची माहिती

    काँग्रेसचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी दिली माहिती

    टिळक भवन येथे पार पडलेल्या बैठकीत अश्वासन दिल्याची माहिती

  • 04 Jun 2023 12:00 PM (IST)

    नंदूरबार जिल्ह्यात वादळी वारा आणि हलक्या पावसाची शक्यता

    गुजरातमध्ये कमी दाबाच्या प्रभावामुळे नंदूरबार जिल्ह्यात वादळी वारा आणि हलक्या पावसाची शक्यता

    सकाळी दहा वाजेपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि जोरदार वादळी वारा

    अचानक वादळी वारा आल्यामुळे अनेक घरांचे नुकसान होण्याची शक्यता

    शहरी भागात अचानक वारा सुरू झाल्याने एकच धावपळ

    हलक्या पाऊसामुळे आणि वाऱ्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेला नागरिकांना दिलासा

    शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात केलेल्या लागवडीला या पावसाचा काही प्रमाणात फायदा

  • 04 Jun 2023 11:49 AM (IST)

    ओडिशाच्या बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर LIC चा मोठा निर्णय

    ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी भीषण अपघात

    या अपघातात 288 जणांनी जीव गमावला, तर 747 लोक जखमी

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी घटनास्थळी दिली भेट

    दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान कार्यालयाकडून 2 लाख

    रेल्वेकडून 10 लाख रूपयांची मदत

    एलआयसी ऑफ इंडिया देखील या अपघातग्रस्तांसाठी सरसावली

    बाधित लोकांना मदत करण्यासाठी क्लेमचा त्वरीत निपटारा करत आर्थिक मदतीचं आश्वासन

  • 04 Jun 2023 11:40 AM (IST)

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खारघर येथे सायकल रॅली

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खारघर येथे सायकल रॅली

    एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी

    एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदीच्या समर्थनासाठी सायकल रॅली

    खारघर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजन

    भाजप नेते नरेश ठाकूर आणि भाजप आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित

  • 04 Jun 2023 11:34 AM (IST)

    परळीत संजय राऊत यांच्या ‘त्या’ कृतीचा शिवसेनेकडून जोडे मारून निषेध

    संजय राऊत यांच्या त्या कृतीचा परळी शिवसेनेच्या वतीने निषेध

    संजय राऊत यांच्या प्रतिमेस परळी बी़ड येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे जोडे मारून निषेध

    शिवसैनिकांकडून संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

    संजय राऊत मुर्दाबादच्या घोषणा देऊन निषेध आंदोलन

    शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

  • 04 Jun 2023 11:31 AM (IST)

    कोल्हापुरात नवीन राजवाड्यात यंदा पहिल्यांदाच साजरा होणार शिवराज्याभिषेक

    कोल्हापुरात नवीन राजवाड्यात यंदा पहिल्यांदाच साजरा होणार शिवराज्याभिषेक सोहळा

    शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे यांच्या उपस्थितीत होणार शिवराज्याभिषेक

    संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

    तर मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा

    ६ जून रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला होणार सुरुवात

  • 04 Jun 2023 11:24 AM (IST)

    गडचिरोलीत सिंघम पोलिसाला राग नडला

    गडचिरोली चामोर्शी येथील पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना 14 दिवसाची पोलीस न्यायालयीन कोठडी

    चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नेते अतुल पवार यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

    या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशाला पोलीस निरीक्षकांनी खांडवे यानी धमकावले होते

    पोलीस निरीक्षकाला अटक करून 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली

  • 04 Jun 2023 11:17 AM (IST)

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

    ११ महिन्यांत साडे नऊ हजार पेक्षा जास्त (९ हजार ६९९) रुग्णांना ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित

    संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्णांना केली सढळ हस्ते मदत

    गंभीर आणि दुर्धर आजार असणाऱ्या गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन

  • 04 Jun 2023 11:08 AM (IST)

    पुण्यात आज लव्ह जिहादच्या विरोधात घोरपडी गावात मोर्चा

    पुण्यात आज लव्ह जिहादच्या विरोधात घोरपडी गावात मोर्चा

    बीटी कवडे रोड ते जयहिंथ चौकापर्यंत निघणार मोर्चा

    मोर्चात आमदार नितेश राणे होणार सहभागी

    पुण्यातील पीडीत तरुणी आणि कुटुंबासोबत नितेन राणे घेणार पत्रकार परिषद

    पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचीही घेणार भेट कारवाईसंदर्भात देणार निवेदन

  • 04 Jun 2023 10:57 AM (IST)

    संजय राऊत यांना आम्ही फार सिरीयसली घेत नाही- चित्रा वाघ

    भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय

    103 दिवस जेल मध्ये राहिल्यावर डोक्यावर परिणाम नक्की होतो

    ज्यांना आम्ही सर्व ज्ञानी म्हणतो त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय

    त्याचाच परिणाम आता पाहायला मिळतोय कुठे थुंकणं, कुठे बोलणं,

    सकाळपासून जी गटारगंगा चालू होते ती दिवसभर चालू राहते

    त्यांना आणि त्यांच्या कृत्यांना आम्ही फार सिरीयसली घेत नाही

  • 04 Jun 2023 10:55 AM (IST)

    प्लास्टिक वापरासंदर्भात जनजागृतीसाठी रॅलीचं आयोजन

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खारघरमध्ये सायकल रॅली

    एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी या समर्थनासाठी सायकल रॅली

    खारघर रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून आयोजन

    रॅलीमध्ये एक हजार सायकलस्वार सहभागी झाले होते

    भाजप नेते नरेश ठाकूर आणि भाजप आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते

  • 04 Jun 2023 10:50 AM (IST)

    लव्ह जिहादच्या विरोधात मोर्चा; आमदार नितेश राणे सहभागी होणार

    पुण्यात आज लव्ह जिहादच्या विरोधात घोरपडी गावात मोर्चा

    बीटी कवडे रोड ते जय हिंद चौकापर्यंत निघणार मोर्चा

    मोर्चात आमदार नितेश राणे होणार सहभागी

    पुण्यातील पीडीत तरुणी आणि कुटुंबासोबत नितेन राणे घेणार पत्रकार परिषद

    पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचीही घेणार भेट कारवाईसंदर्भात देणार निवेदन

  • 04 Jun 2023 10:45 AM (IST)

    ओरिसा रेल्वे अपघाताबाबत महत्वाची घडामोड

    ओरिसा रेल्वे अपघात प्रकरण आता न्यायालयात

    ओरिसामधील अपघातानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

    प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी याचिका दाखल

    वकील विशाल तिवारी यांनी दाखल केली सर्वोच्च न्यायालयात याचिका

    “रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे खात्याने सुरक्षा कवच सिस्टीम तात्काळ लागू करावी,

    असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत”

    अशी मागणी याचिकेत करण्यात आलीये

  • 04 Jun 2023 10:39 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत दाखल होणार

    संध्याकाळी सव्वा सात वाजता दिल्लीत दाखल होणार

    7:45 वाजता महाराष्ट्र सदनात पोहोचणार

    रात्री आठ नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता

    मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा tv9 मराठी कडे

  • 04 Jun 2023 10:35 AM (IST)

    पंतप्रधान मोदी यांना जो बायडन यांचं आमंत्रण; काय कारण?

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांचं आमंत्रण

    22 जून रोजी पंतप्रधान मोदी बायडन यांची भेट घेणार

    अमेरिकेत बायडन कुटुंबाकडून आयोजित खाजगी कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रण

    बायडन दांपत्याशी पंतप्रधान मोदी चर्चा करणार

  • 04 Jun 2023 10:30 AM (IST)

    भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; बालकाचा मृत्यू, जखमी रूग्णालयात दाखल

    सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या गाडीला अपघात

    सोलापुरातील कोंडी गावानजीक झाला अपघात

    मुंबईहून तुळजापूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या दोन गाड्यांची पाठीमागून धडक बसल्याने अपघात

    या अपघातामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू

    दहा ते बारा लोक जखमी झाले आहेत

    जखमींवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

  • 04 Jun 2023 10:17 AM (IST)

    सुषमा अंधारे यांचा शायरीतून पंतप्रधान मोदींवर निशाणा

    सुषमा अंधारेंनी ओडिसातील भीषण तिहेरी रेल्वे अपघाताचा व्हीडीओ केला ट्टीट

    मृत व्यक्तींना टेम्पोत भरतानाचा हा व्हिडीओ आहे

    बुलेट ट्रेनच्या गप्पा मारणाऱ्यांना अँम्बुलन्स देता येत नाही

    तरीही 56 इंच छाती असल्याच सांगतात

    शायरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

    अंधारे म्हणतात…

    समंदर नफरतोंका और लाशों का सफीना है हथेली खूनसे रंगी है माथेपर पसीना है। सियासत किस क़दर इंसा को बेशर्म कर देती है बुलेटट्रेन की बात करनेवाले एंबुलेंस तक नहीं दे पा रहे हैं; फिर भी वो छाती ठोक कर कहते हैं 56इंच का सीना है।

  • 04 Jun 2023 10:07 AM (IST)

    पुण्यातील जम्बो कोवीड सेंटरमधील मृत्यू प्रकरणी महत्वाची बातमी

    पुण्यातील जम्बो कोवीड सेंटरमधील मृत्यू प्रकरण; मानवी हक्क आयोगात सुनावणी होणार

    पुण्यातील जम्बो कोवीड सेंटरमध्ये झालेल्या कोव्हीड मृत्यूंसंदर्भात मानवी हक्क आयोगात सुनावणी होणार

    मानवी हक्क आयोगानं पीएम आरडीए, पुणे महापालिका आणि लाईफलाईन मँनेजमेंटला समन्स बजावलं

    12 जूनला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना

    सुजीत पाटकरांकडे जम्बो कोव्हीड चालवण्याचं कंत्राट होतं

    किरीट सोमय्या याचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत

    आता मानवी हक्क आयोगात सुनावणी होणार

  • 04 Jun 2023 08:59 AM (IST)

    मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज

    येत्या 48 तासांत औरंगाबादसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

    जालना, परभणी, लातूर, नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज

    महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज

    नागपूर वेधशाळेनं वर्तवला अंदाज

  • 04 Jun 2023 08:55 AM (IST)

    ओडिसातील रेल्वे अपघातप्रकरणी AIIMS दिल्लीचं वैद्यकीय तज्ज्ञांचं पथक तयार

    वैद्यकीय उपकरणांसह घटनास्थळी तज्ज्ञांची टीम रवाना होणार असल्याची माहिती

    1000 हून अधिक जखमी आणि 100 हून अधिक गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी पथक तयार

  • 04 Jun 2023 08:49 AM (IST)

    ओडिसा रेल्वे अपघातानंतर चेन्नईत पोहोचलेले सर्व प्रवासी सुखरुप

    7 प्रवाशांना किरकोळ दुखापत, 2 जणांना एक्स-रेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं

    मुख्यमंत्री स्टॅलिन हे कंट्रोल रूमद्वारे सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत असल्याची माहिती

    तमिळनाडूचे आरोग्य मंत्री एम. ए. सुब्रमण्यम यांची माहिती

  • 04 Jun 2023 08:42 AM (IST)

    पवना धरणात बुडून चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    चावसर गावच्या हद्दीत पवना धरण पाणलोट क्षेत्रात घडली घटना

    लक्ष्मण बबन साठे असं मृत व्यक्तीचं नाव

    लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

  • 04 Jun 2023 08:35 AM (IST)

    ओडिशात रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसचे प्रवासी चेन्नई रेल्वे स्थानकावर पोहोचले

    प्रवाशांना विशेष ट्रेनने तमिळनाडूतील चेन्नई रेल्वे स्थानकावर पोहोचवण्यात आलं

    प्रवाशांच्या मदतीसाठी पोलीस, टीडीआरएफ आणि कमांडो तैनात

    रेल्वे स्थानकाबाहेर रुग्णवाहिका, टॅक्सी आणि बसेसही उपलब्ध

  • 04 Jun 2023 08:28 AM (IST)

    ओडिसा रेल्वे अपघातप्रकरणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून शोक व्यक्त

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याकडून शोक व्यक्त

    अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांसोबत आमच्या प्रार्थना- जो बायडन

  • 04 Jun 2023 08:21 AM (IST)

    ओडिसा तिहेरी रेल्वे अपघात प्रकरण

    रेल्वे रुळांवरून बोगी काढण्याचं काम सुरू

    रुळावरून मालगाडीच्या दोन बोगी काढल्या

    एका बाजूने ट्रॅक जोडण्याचं काम सुरू

    लवकरात लवकर काम पूर्ण करणार असल्याची रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती

  • 04 Jun 2023 08:14 AM (IST)

    ओडिसातील भीषण तिहेरी रेल्वे अपघात प्रकरण

    रेल्वे रुळांवरून डबे हटवण्याचं काम सुरू

    अपघातातील मृतांचा आकडा शनिवारी 288 वर

    जखमींची संख्या 900 हून अधिक

  • 04 Jun 2023 08:07 AM (IST)

    पुण्यात आज लव्ह जिहादच्या विरोधात घोरपडी गावात मोर्चा

    बीटी कवडे रोड ते जयहिंद चौकापर्यंत निघणार मोर्चा

    मोर्चात आमदार नितेश राणे होणार सहभागी

    पुण्यातील पीडित तरुणी आणि कुटुंबीयांसोबत नितेन राणे घेणार पत्रकार परिषद

    पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचीही घेणार भेट

    कारवाईसंदर्भात देणार निवेदन

  • 04 Jun 2023 07:57 AM (IST)

    सुप्रिया सुळे यांनी चालवली सायकल

    पुण्यातील बावधन येथे पार पडला नो व्हेईकल डे.

    खासदार सुप्रिया सुळे यांची नो व्हेईकल डे ला उपस्थिती.

    नो व्हेईकल डे ला उपस्थिती लावत सुप्रिया सुळे यांनी चालवली सायकल.

    मतदार संघातील लोकांसोबत सुप्रिया सुळे यांनी घेतला सायकल चालवण्याचा आनंद.

  • 04 Jun 2023 07:56 AM (IST)

    बजाज फिनसर्व्हची पुण्यात मोठी गुंतवणूक

    – बजाज फिनसर्व्ह कंपनीची पुण्यात मोठी गुंतवणूक.

    – राज्य सरकारसोबत 5 हजार कोटींचा गुंतवणूक करार.

    – पुण्यातील मुंढव्यात 19 एकर जागेत कंपनीचे मुख्यालय उभारले जाणार.

    – कंपनीच्या माध्यमातून 20 हजार तरुणांना रोजगार मिळणार.

  • 04 Jun 2023 07:31 AM (IST)

    अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द

    अमित शाह यांचा मुंबई दौरा रद्द

    10 जुनचा दौरा रद्द. शाह मुंबई ऐवजी पुणे किंवा संभाजीनगर दौरा करणार.

    मुंबई दौरा रद्द करण्याचे कारण गुलदस्त्यात.

    पंतप्रधान मोदीही महाराष्ट्र दौऱ्यावर, भाजपच्या लोकसभा मिशन अंतर्गत मोदींची जाहीर सभा होणार.

    जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मोदींची जाहीर सभा होणार.

  • 04 Jun 2023 07:27 AM (IST)

    पुण्यात चालकानं प्रवाशाच्या कानाचा घेतला चावा

    पुण्यात रिक्षाच्या भाड्याच्या वादातून झालेल्या भांडणात चालकानं प्रवाशाच्या कानाचा घेतला चावा.

    प्रवाशाच्या कानाचा तोडला लचका.

    संतोष चव्हाण असं प्रवाशाच नावं आहे.

    त्यांनी काल स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रकार आला उघडकीस.

    1 तारखेच्या रात्री घडली होती घटना.

  • 04 Jun 2023 07:26 AM (IST)

    पाणीकपात का ? पुणेकरांचा सवाल

    खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पाणीकपात का ? पुणेकरांचा सवाल.

    पुणे शहराला दीड टीएमसी एवढ्या पाण्याची गरज लागते.

    खडकवासला धरणात अजूनही 6 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

    पाणीसाठा जरी असला तरी पावसाचा अंदाज घेऊनच पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेऊ.

    महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचं स्पष्टीकरण.

  • 04 Jun 2023 07:24 AM (IST)

    अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    येत्या 8 तारखेपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रीयेला होणार सुरुवात.

    8 जून ते 18 जूलैपर्यंत चालणार प्रवेश प्रक्रीया.

    8 जून ते 12 जून दरम्यान पार पडणार कोटा प्रवेश प्रक्रीया यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पसंतक्रम नोंदवता येणार आहे.

    8 तारखेपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेला होणार सुरुवात.

Published On - Jun 04,2023 7:23 AM

Follow us
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.