Maharashtra Breaking Marathi News Live | काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नालेसफाईत घोटाळा झाल्याचा आरोप

| Updated on: Jun 07, 2023 | 7:08 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नालेसफाईत घोटाळा झाल्याचा आरोप
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी प्रभादेवी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार करणार मार्गदर्शन. हवामान खात्याचा विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jun 2023 02:55 PM (IST)

    आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदे यांची मोर्चेबांधणी

    अनेक दिवसांपासून श्रीकांत शिंदे मुंबईतील अनेक प्रश्नांवर भाष्य करताना पाहायला मिळतायत.

    तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे आज पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची पालिका मुख्यालयात भेट घेत आहेत.

    मुंबईतील विविध विषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

    श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत शाखा संपर्क अभियान सुरु केलं आहे, या दरम्यान लोकांशी संवाद साधत आहेत

    संवाद साधत असताना नागरिकांच्या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी श्रीकांत शिंदे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेत आहेत.

    श्रीकांत शिंदे मुंबईत अधिक लक्ष घालत असल्याने मुंबई महानगरपालिकेसाठी मोर्चेबांधणी करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

  • 06 Jun 2023 02:46 PM (IST)

    गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात जळगावात जोडे मारो आंदोलन

    भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.

    गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या निषेधार्थ जळगावात जोडे मारो आंदोलन

    पडळकर आणि मुनगंटीवार यांच्या फोटोला मारले जोडे

    शरद पवारांचा अपमान केल्यास जळगावात पाय ठेवू देणार नाही,

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा

  • 05 Jun 2023 11:59 PM (IST)

    जयंत पाटील यांच्या मतदारसंघात काँग्रेसची पोस्टरबाजी; नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले पोस्टर

    सांगली –

    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघात काँग्रेसची पोस्टरबाजी

    चक्क नाना पटोले यांचे झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर

    इस्लामपूर शहरातल्या चौकात आणि रस्त्यांवर  काँग्रेसचे नंदकुमार कुंभार यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून केला उल्लेख

    नाना पटोले यांच्या पोस्टरची इस्लामपूर शहरासह सांगली जिल्ह्यात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

    महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी आता जोरदार संघर्ष निर्माण होणार असल्याची चर्चा रंगली

  • 05 Jun 2023 11:50 PM (IST)

    कंपनीतील 15 लाख हिंदू मुलींची माहिती इस्लामिक राष्ट्रांना देणार ; राजस्थानमध्ये एका कंपनीला धमकी

    राजस्थानमधील जयपूर येथील अंडर गारमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी धमकीचा मेल

    मेलमध्ये 15 लाख हिंदू मुलींची माहिती इस्लामिक देशांना देणार असल्याची धमकी

    धमकीनंतर राजस्थान पोलिसांनी केली कारवाई

    आरोपी संजय सोनी याला अटक

  • 05 Jun 2023 11:45 PM (IST)

    आताच्या सरकारला एका वर्षात मस्ती आली; शशिकांत शिंदे यांची टीका

    सांगली

    “आताच्या सरकारला एका वर्षात मस्ती आली आहे, साडेतीन जिल्ह्यातला पक्ष सरकार पाडू शकतो हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे”

    राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांची भाजप-शिंदे सरकारवर टीका

    सांगलीत जोरदार हल्लाबोल

    सांगली शहरांमध्ये राष्ट्रवादी सांगली जिल्हा पक्षाच्यावतीने बूथ कमिटीची आढावा बैठक

    या आढावा बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य शशिकांत शिंदे सांगली दौऱ्यावर

  • 05 Jun 2023 11:35 PM (IST)

    काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; नालेसफाईत घोटाळा झाल्याचा आरोप

    मुंबईः

    काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

    संजय निरुपम यांनी पत्रातून नाले सफाईत घोटाळा झाल्याचा आरोप केला

    संजय निरुपम यांनी  मुंबईतील नालेसफाई घोटाळ्याची चौकशी करण्याची केली मागणी

    मान्सूनपूर्वी नालेसफाई पूर्णपणे आवश्यक

    मुंबईत नाल्यांची साफसफाई पूर्णपणे झालेली नाही

    नाले साफसफाई न करण्याला जबाबदार कोण ?  निरुपमांचा सवाल

  • 05 Jun 2023 11:27 PM (IST)

    वादळामुळे रस्त्यावर पडलेले झाड शिवप्रेमींनी केले बाजूला; वाहतूक सुरळीत

    पुणे :

    वादळामुळे रस्त्यावर पडलेले झाड शिवप्रेमींनी केले बाजूला

    भाजप आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून रायगडावर शिवप्रेमींचा प्रवास

    चाळीसगाव ते किल्ले रायगड शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी निघाले होते

    बसेसचा ताफा पुण्याच्या मुळशीजवळील ताम्हिणी घाटात आला त्याचवेळी झाड उन्मळून पडले

    महाराष्ट्र भरातून रायगडकडे जाणाऱ्या हजारो शिवप्रेमींनी ते झाड केले बाजूला

  • 05 Jun 2023 11:23 PM (IST)

    तीन दिवसांपूर्वी मालाड मालवणी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई ; लोढा यांची माहिती

    मुंबई :

    तीन दिवसांपूर्वी मालाड मालवणी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

    मंगल प्रभात लोढा यांची माहिती

    देशी खेळांसाठी आपण ही जमीन राखीव ठेवणार असल्याचे केले स्पष्ट

    गोराईमध्ये 136 एकर एमटीडीसीची जमीन

    तिथे वॉर म्युझियम प्रस्तावित

    तिथे नौदल व आरमार यांची माहिती देणारे म्युझियम उभारण्यात येणार

    उद्या 350 वा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त या कामाची सुरुवात

    जे अतिक्रमण या जमिनीवर असेल ते तात्काळ उद्या हटवण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार

  • 05 Jun 2023 11:12 PM (IST)

    कलेची जादू सलुनच्या ब्लोअरमध्ये नाही तर कारागिराच्या बोटांवर; अमोल कोल्हेंचे सूचक वक्तव्य

    नारायणगाव/पुणे :

    कलेची जादू सलुनच्या ब्लोअरमध्ये नाही तर कारागिराच्या बोटांवर

    खासदार अमोल कोल्हेंनी केले सूचक वक्तव्य

    खासदार कोल्हे यांनी त्यांच्याच मतदार संघातील नारायणगावमधील सलूनमध्ये केली दाढी

    फक्त केस कापण्याची कला सुचविण्यासाठी हा खटाटोप नाही तर यातुन कोल्हेंनी वेगळच काय सुचवायचं का अशी चर्चा

  • 05 Jun 2023 11:00 PM (IST)

    भाजपने मोदी सरकारच्या 9 वर्षाचा लेखाजोखा मांडला; पुस्तकाचे प्रकाशन

    नवी दिल्ली:

    भाजपने मोदी सरकारच्या 9 वर्षाचा लेखाजोखा मांडला

    सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते प्रकाशन

    काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल

    राहुल गांधींनी प्रेमाचे नाही तर तिरस्काराचे दुकान उघडल्याची टीका

  • 05 Jun 2023 10:53 PM (IST)

    नंदुरबार : रोडरोमीओस मारहाण

    मानवत येथे विद्यार्थिनीची काढली छेड

    छेड काढणाऱ्या रोडरोमीओस अटक

    पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

    पोलिसांनी चिडीमार विरोधी पथक स्थापन करण्याची मागणी

  • 05 Jun 2023 10:26 PM (IST)

    वांद्रे येथे पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम

    भाम्ला फाउंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन

    या कार्यक्रमात अनेक कलाकार उपस्थित आहेत

    कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले

  • 05 Jun 2023 10:21 PM (IST)

    मुंबई : अजित पवार उद्या मुंबईत

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार उद्या मुंबईत

    उद्या सकाळी 9.30 पासून राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहणार

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते उद्या राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांना भेटणार

  • 05 Jun 2023 10:07 PM (IST)

    सांगली : 14 कोटी रुपयांचे दागिने लुटले

    रिलायन्स ज्वेलर्स शॉपीवर सिनेस्टाईल दरोडा

    विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पाहणी केली

    जिल्हा पोलिसांकडून तपासाचा घेतला आढावा

    संशयित दरोडेखोरांपर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील

    काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले

  • 05 Jun 2023 10:05 PM (IST)

    सांगतील रिलायन्स शॉपीवर सिनेस्टाईल दरोडा टाकणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार, विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून महत्त्वाची माहितीो

    सांगली :

    रिलायन्स ज्वेलर्स शॉपीवर सिनेस्टाईल दरोडा टाकून 14 कोटींचे दागिने लुटण्यात आले

    याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी रिलायन्स ज्वेलर्सची पाहणी करत जिल्हा पोलिसांच्याकडून तपासाचा घेतला आढावा

    संशयित दरोडेखरांच्यापर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील, त्या दृष्टीने तपास सुरू, काही महत्त्वाचे धागेदोरे देखील पोलिसांच्या हाती लागल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची माहिती

  • 05 Jun 2023 09:38 PM (IST)

    यवतमाळ नगरपालिकेत नगरसेवकांचा राडा

    यवतमाळ :

    पाणी प्रश्नांवर यवतमाळ नगरपालिकेतील नगरसेवक आक्रमक

    गेल्या 10 दिवसांपासून शहरातील बांगर नगर वंजारी फैल विठ्ठलवाडी भागात पाणी टंचाई

    नगरसेवकांनी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या दरवाजाला लाथ मारून केला राग व्यक्त

    जीवन प्राधिकरण कार्यालयात नगरसेवकांचा राडा

    काँग्रेस नगरसेवक छोटू पावडे, सेना नगरसेवक उद्धव साबळे, छोटू सवाई यांचा गदारोळ

    अधिकारी-कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

  • 05 Jun 2023 09:22 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात डबा बैठक आयोजित

    नागपूर : 

    देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात डबा बैठक आयोजित

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील डबा बैठकीची परंपरा भाजपात

    या बैठीत देवेंद्र फडणवीस हे जेवणाचा डबा घेऊन सहभागी होणार

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं नियोजन

  • 05 Jun 2023 09:20 PM (IST)

    ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पुण्यात श्रद्धांजली

    पुणे :

    ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पुण्यात श्रद्धांजली

    काँग्रेस पक्षाकडून पुण्यात श्रद्धांजली वाहत शोकसभेचं आयोजन

    तिरंगा मेणबत्ती लावत अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली

    अपघातातील जखमी प्रवाशांसाठी काँग्रेसकडून प्रार्थना

    पुण्यातील हडपसर भागात श्रद्धांजली सभेचं करण्यात आलं आयोजन

    श्रद्धांजली सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती

  • 05 Jun 2023 09:12 PM (IST)

    मालेगावातील गिरणा धरणावर ‘जल समाधी’ आंदोलन तात्पुरते स्थगित

    मालेगाव : 

    – मालेगावातील गिरणा धरणावर ‘जल समाधी’ आंदोलन तात्पुरते स्थगित
    – मच्छीमार मेळाव्यात आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केल्या उद्विग्न भावना
    – मच्छीमारांवर अन्याय सहन करणार नाही, आमदार कांदे यांची प्रतिक्रिया
    – मच्छिमारांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, कांदे यांचा इशारा
    – स्थानिक मच्छिमारांनी कुठलीही पावती न फाडता मच्छीमारी करावी, असे केले आवाहन
    – मच्छिमारांवर गुन्हे दाखल करू नये, मच्छीमारी करण्यापासून रोखू नये, गुन्हे दाखल करायचे असतील तर पहिले माझ्यावर करा, आमदार कांदे यांची भूमिका
  • 05 Jun 2023 08:58 PM (IST)

    Manohar Joshi Health Update | मनोहर जोशी यांच्या तब्येतीत सुधारणा

    राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष राहिलेल्या मनोहर जोशी यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनोहर जोशी यांच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. मनोहर जोशी यांना आयसीयूतून शिफ्ट करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत.

  • 05 Jun 2023 08:39 PM (IST)

    Deepali Sayyed On Sanjay Raut | दीपाली सय्यद यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

    संजय राऊत यांना डॉक्टरांची गरज आहे असं म्हणत दीपाली सय्यद यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या थुंकीप्रकरणानंतर दीपाली सय्यद यांनी राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत यांना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाने त्रास झाला. त्यांनीच त्यांना रुग्णालयात दाखल करुन इलाज करावा. राऊंतावर इलाज होणं गरजेच आहे नाहीतर दुसरंच काही वेगळं होऊन जाईल”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

  • 05 Jun 2023 08:32 PM (IST)

    Nashik Lok Sabha | नाशिकातील लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच

    लोकसभा निवडणुकांना मोजून 1 वर्षाचा कालावधी बाकी आहे. मात्र त्याआधीच कोण कुठून लढणार, तसेच प्रत्येक पक्षाने मतदारसंघावर आपली दावेदारी ठोकायला सुरुवात केली आहे. नाशिक लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. नाशकातील लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. नाशकातील लोकसभेची एक जागा काँग्रेसला द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केली आहे.

  • 05 Jun 2023 08:26 PM (IST)

    Omraje Nimbalkar Rana Patil | ओमराजे निंबाळकर-राणा पाटलांमध्ये पुन्हा खडाजंगी

    ओमराजे निंबाळकर-राणा जगजितसिंह पाटील यांच्या दोघांमध्ये पुन्हा खडाजंगी झाली आहे. धाराशीव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दोन्ही नेते आपसात भिडले. तेरणा प्रकल्पाच्या बंद पाईपलाईनच्या मुद्दयावरुन या दोन्ही नेत्यांमधीला वादाला तोंड फुटलं. मात्र तानाची सावंत यांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला.

  • 05 Jun 2023 08:19 PM (IST)

    J P Nadda | भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडून मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या कामगिरीवरील पुस्तकाचे प्रकाशन

    केंद्र सरकारला 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. नड्डा यांनी 2014 च्या आधीच्या आणि नंतरच्या काळात खूप फरक असल्याचं म्हटलं. नड्डा यांनी यावेळेस मोदी सरकारच्या 9 वर्षातील कामगिरीचा पाढा वाचला. तसेच मोदी सरकारच्या कामांचं कौतुक केलं.

  • 05 Jun 2023 08:00 PM (IST)

    एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट

    पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे

    जयंत पाटलांची भेट घेत विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे

    स्किल टेस्ट रद्द करा यासह इतर पाच मागण्यांचे निवेदन दिले निवेदन

    जयंत पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांशी या प्रकरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे

  • 05 Jun 2023 07:51 PM (IST)

    खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार जगजीत सिंह पाटील यांच्यामध्ये खडाजंगी

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर

    आणि भाजप आमदार जगजीत सिंह पाटील यांच्यामध्ये खडाजंगी

    तेरणा येथील प्रकल्पच्या बंद पाईपलाईन मुद्यावरून शाब्दिक वादाला सुरूवात

    अखेर पालकमंत्री डॉ तानाजी सावंत व आमदार चौगुले यांच्या मध्यस्थीनंतर यावर वाद मिटला

    भंगारचोर, बाळ आहेस अजून तु अजून असे आमदार जगजीत सिंह हे ओमराजे यांना म्हणाले.

    औकातीत रहा, तेरणा ट्रस्टचा लुटार,  पिता पुत्र चोर अश्या शब्दात ओमराजे यांनी आमदार पाटील यांना सुनावले

    यापूर्वी देखील खासदार ओमराजे व आमदार जगजीत सिंह यांच्यात झाला आहे मोठा वाद

  • 05 Jun 2023 07:37 PM (IST)

    नाट्यगृहात राजकीय नेत्यांच्या सभाच खूप होत आहेत जयंत पाटील यांचे मोठे विधान

    आज काल लिखाणाचे कौतुक फार तर मोबाईलवर होते

    समोरा समोर कुणीच कुणाचे कौतुक करत नाही

    राजाराम बापू पाटील यांच्या नावाने ही ललित कला अकादमी सुरू झाली याचा मला आनंद आहे

    मराठी साहित्यिक हे केवळ महाराष्ट्रतातच आहेत असे नाही, सगळीकडे ते पोहोचले आहेत

    आजकाल मराठी नाटके खुप कमी झाले आहेत

    आलिकडे नाट्यगृहात राजकीय नेत्यांच्या सभाच खूप होत आहेत, सांगली जिल्हा हा साहित्यिकांचा गर्दीचा जिल्हा आहे.

  • 05 Jun 2023 07:31 PM (IST)

    पाणी प्रश्नांवर यवतमाळ नगर पालिकेतील नगरसेवक आक्रमक

    10 दिवसापासून शहरातील बांगरनगर वंजारी फैल भागात पाणी टंचाई

    नगरसेवकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यालयाच्या दरवाजाला लाथ मारून केला राग व्यक्त

    जीवन प्राधिकरण कार्यालयात नगरसेवकांचा राडा

    नगरसेवक छोटू पावडे, नगरसेवक उध्दव साबळे, छोटू सवाई यांचा गदारोळ

  • 05 Jun 2023 07:22 PM (IST)

    मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी तीन तासात नवीन रस्ता बांधत पालिकेने केला मोठा विक्रम

    ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज किसननगरमध्ये

    अनेक प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे

    त्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले

    किसननगर नंबर एक याठिकाणी क्लस्टर योजनेचे भूमिपूजन करण्यासाठी

    मुख्यमंत्री येणार आहेत याच ठिकाणी असणारा खडतर रस्ता पालिकेने तीन तासात

    नवीन रस्ता बनवला, तीन तासांमध्ये रस्ता तयार करत पालिकेने मोठा विक्रमच केलाय

  • 05 Jun 2023 07:17 PM (IST)

    काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणार आंदोलन

    येत्या 8 ते 10 दिवसांत काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर करण्यात येणार आहे आंदोलन

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि इतर या आंदोलन उपस्थित राहणार आहेत

    नाशिकच्या चांदवड येथे शेतकरी मेळावा आणि आंदोलनाचे आयोजन

    कांद्याला भाव मिळावा, शेतीपिकाला योग्य भाव मिळावा,

    अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत त्वरित मिळावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे

    काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि नाशिक जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे

  • 05 Jun 2023 07:11 PM (IST)

    खासदार गोपाळ शेट्टी यांचे बोरिवली मध्य विभागाच्या कार्यालयाला आंदोलन सुरू

    भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली आर/मध्य विभाग कार्यालयाचा घेराव केला आहे

    भाजप कार्यकर्ते बीएमसी कार्यालयाच्या गेटवर बसून आंदोलन करत आहेत

    बीएमसीने बोरिवली पश्चिम येथील शिवाजी नगर झोपडपट्टीत बांधलेली शौचालये

    कोणतीही नोटीस न देता पाडली आहेत. यामुळे खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक झाले आहेत

    शौचालयाच्या प्रश्नाबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी आर/मध्य विभाग गाठला

    अगोदर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही.

    गोपाळ शेट्टी हे सर्व नगरसेवकांसह बोरिवली आर/मध्य विभागाच्या कार्यालयाला घेराव घालून आंदोलन करत आहेत.

  • 05 Jun 2023 07:07 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

    वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

    काल झालेल्या वादळीवाऱ्यासह वाशिम जिल्हात मोठे नुकसान झाले आहे

    वादळी वाऱ्यामुळे रिसोड तालुक्यातील अनेक गावांना बसला मोठा फटका

    मागुळझनक, देगाव, केशवनगर भागांमध्ये 30 तासापासून बंद आहे वीज पुरवठा

    70 गावाची वीज खंडित झाली आहे.

  • 05 Jun 2023 07:01 PM (IST)

    Aasam Arunachal Border Firing | आसाम-अरुणाचल सीमेवर गोळीबार, दोघांचा मृत्यू, 2 जखमी

    एका हल्लेखोराने आसाम-अरुणाचल सीमेजवळ गोळीबार केला आहे. या हल्ल्यात 2 लोक ठार आणि 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती आसामच्या धेमाजी जिल्ह्याचे एसपी रंजन भुयान यांनी दिली.

  • 05 Jun 2023 06:59 PM (IST)

    आसाम-अरुणाचल सीमेवर गोळीबार; 2 ठार, 2 जखमी

    आसामच्या धेमाजी जिल्ह्याचे एसपी रंजन भुयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने आसाम-अरुणाचल सीमेजवळ गोळीबार केला. या हल्ल्यात 2 लोक ठार आणि 2 लोक गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे

  • 05 Jun 2023 06:49 PM (IST)

    संजय राऊत सिल्व्हर ओकवर नमाज पढायला जातात का, राधाकृष्ण विखे पाटील यांचा खोचक प्रश्न

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यसभा खासदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत सिल्व्हर ओकवर नमाज पढायला जातात का, असा खोचक प्रश्न विखे पाटलांनी विचारला आहे. तसेच आरोप करताना तारतम्य ठेवायला हवं, असा सल्लाही विखे पाटील यांना राऊतांना दिला. राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना विखे पाटलांनी राऊतांवर टीका केलीय.

  • 05 Jun 2023 06:26 PM (IST)

    ओडिशा रेल्वे अपघातात जखमी झालेल्या 950 प्रवाशांना रुग्णालयातून डिस्चार्ज

    ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 275 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 1100 हून अधिक लोक जखमी झाले असून त्यापैकी 950 हून अधिक जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी 170 मृतांची ओळख पटली आहे.

  • 05 Jun 2023 06:23 PM (IST)

    लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये बोर्ड पडला, तीन जण अडकले

    लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियममध्ये मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जोरदार वाऱ्यामुळे स्टेडियममध्ये लावलेला बोर्ड पडला आणि त्याखाली तीन लोक दबले गेल्याची माहिती आहे.

  • 05 Jun 2023 05:50 PM (IST)

    भाजपमध्ये आणि शिंदे गटात नाराजी, आमदार पळून जाण्याची भीती- अंबादास दानवे

    -या सरकारला काहीच घेणं देणं नाही, कायदा सुवियवस्था वाऱ्यावर आहे. अहमदनगरला औरंगजेबाचे फोटो दाखवले जातात केवळ शब्दांचा मारा उपमुख्यमंत्री करतात. संभाजीनगरलाही असंच झालं पुन्हा तेच चित्र पाहायला मिळतंय हे दुर्दैवी असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

    – कॅबिनेट विस्तार काही होणार नाही. 50-50 चा फाॅर्म्युला केलाय, भाजपमध्ये आणि शिंदे गटात नाराजी आहे. ज्यांना पद मिळणार नाही ते जातील या भीतीने कॅबिनेट विस्तार होणारच नाही.

    – पडळकर यांना कोण विचारतंय पण सुधीर मुनगंटीवार सारख्या नेत्यांने शरद पवार यांचा एकेरी ऊल्लेख करणं मंत्री पदाला शोभणारं नाही.

    – कुणी मुख्यमंत्री व्हावं हे जनता ठरवते, पण कार्यकर्त्यांनी संयम ठेवायला हवं नेत्यांमध्येही एकवाक्यता हवी.

  • 05 Jun 2023 05:42 PM (IST)

    मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून आमदार बच्चू कडूंची मिश्किल प्रतिक्रिया

    -कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई मग जाय आपल्या माहेरा पण कारल्याला काही कारलं येत नाही आणि सुनबाई काही माहेरी जात नाही अशीच एकंदरीत व्यवस्था असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

    -मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल तुम्ही कशाला एवढं मनावर घेता.

    -विस्तार झाला नाही तरी राज्यातलील कामं झाली आहेत.

    -आता तुम्हीही विस्ताराच्या बातम्या दाखवणे बंद करा.

    -जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा दिवसभर बातम्या दाखवा.

  • 05 Jun 2023 05:35 PM (IST)

    मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शाहांकडून ग्रीन सिग्नल मिळेल- आठवले

    -अनेक ठिकाणी पालकमंत्री नाहीत. त्यामुळे विस्तार लवकरात लवकर करावं लागणार

    -कालच्या बैठकीनंतर अमित शाहांकडून विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळेल.

    -विस्तार होईल तेंव्हा आरपीआयला एक मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे.

    -लोकसभेच्या दोन जागा आरपीआयला द्याव्या ही आमची मागणी आहे.

    -एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगलं संबंध आहेत.

    -केंद्राचा विस्तार पण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.

  • 05 Jun 2023 05:27 PM (IST)

    सुधीर मुगंटीवार यांनी राजीनामा दिला पाहिजे- नाना पटोले

    -राज्यात RFO च्या बदल्या झाल्यात, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बँक खात्यात पैसे वळते करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या चार आमदारांनी केला या वर नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार वर जोरदार टीका केली आहे.

    – महाराष्ट्र राज्यातील सरकार शंभर टक्के भ्रष्टाचार करणारं आहे. सुधीर मुगंटीवार यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचे चार आमदार जर आपल्या मंत्रावर आरोप लावत असतील तर हे दुर्दैवी असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

    – महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वन विभागामध्ये इतका मोठा भ्रष्टाचार हा दुर्दैवी आहे सुधीर मुनगंटीवार सारखा तत्त्व सांगणारा माणसाच्या खात्यात पैसे वढत असतील तर हे महाराष्ट्राच दुर्दैवी आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

  • 05 Jun 2023 05:16 PM (IST)

    संजय राऊतांना डॅाक्टरांची गरज- दिपाली सय्यद यांची टीका

    -डॅाक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळे त्यांना त्रास झालाय का?

    -डॅाक्टर त्यांच्यावर उपचार करतील, काहींनी राजकारणाची हद्द पार केलीय

    -सार्वजनिकपणे थुंकलं जातंय, समाजाला चांगल्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या.

    -तुम्हाला काही गोष्टी आवडल्या नाही तर मतं मांडा, तुम्ही सुधारायला पाहीजे.

  • 05 Jun 2023 04:50 PM (IST)

    नगरमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकविल्याप्रकरणात गुन्हा दाखल

    – नगरच्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    – ‘बाप तो बाप होता है बेटा तो बेटा होता है’ अशा घोषणा देण्यात आल्या

    – दोन समाजात तेड निर्माण करण्याच्या आरोपाखाली चौघांविरोधात गुन्हा

    – सरफराज जहागिरदार , सरवर शेख , व अफनान शेख अशी आरोपीची नावे

    – या तिघांवर भादंवि 505(2) ,298,34 प्रमाणे गुन्हा दाखल

  • 05 Jun 2023 04:31 PM (IST)

    केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्या इंदापूर दौऱ्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी काढला चिमटा

    – अगोदर माहिती असते तर स्वागताला बुके घेऊन गेली असते

    – जेव्हा गडकरी साहेबांचा कार्यक्रम असतो तेव्हा मला निमंत्रण असतं

    – केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा

    – केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत

  • 05 Jun 2023 04:18 PM (IST)

    बालसोर दुर्घटनेतील अपंग झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला होमगार्डची नोकरी – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

    – बालसोर दुर्घटनेत हात पाय गमावलेल्या पीडीतांना पश्चिम बंगाल सरकारची मदत

    – अपंग पीडीतातील कुटुंबातील एका सदस्याला होमगार्डची नोकरी

  • 05 Jun 2023 04:03 PM (IST)

    कोणी औरंगजेबाचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    देशात आणि महाराष्ट्रात आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत.

    त्यामुळे कोणी औरंगजेबाचे नाव घेत असेल तर त्याला माफी नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा

    अहमदनगरमध्ये उरूसात औरंगजेबाचे फोटो घेऊन तरूण नाचत होते

    याचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला होता व्हायरल

  • 05 Jun 2023 03:58 PM (IST)

    जालना मतदारसंघासाठी मी इच्छुक नाही – राजेश टोपे

    – काही हौशी कार्यकर्त्यानी माझं नाव पुढे केलं आहे

    – महाविकास आघाडीत मेरिटनुसार जागावाटप व्हावे

    – राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला

    – अमरावतीमध्ये काही सर्व्हे असेल म्हणून अनिल देशमुख यांनी दावा केला असेल

    – जालन्यात राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आहेत

  • 05 Jun 2023 03:52 PM (IST)

    निवडणुकीच्या रणीनितीवर अमित शहा यांच्यासोबत चर्चा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राज्यातील अनेक विषयांसंबंधीही केली चर्चा

    महिला बचतगटाचे सक्षमीकरण होईल -मुख्यमंत्री

    तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार

  • 05 Jun 2023 03:41 PM (IST)

    अध्यक्षांना सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीपनुसार निर्णय द्यावा लागणार – जितेंद्र आव्हाड

    – सिंधी समाजाची मी माफी मागितली आहे, मोर्फ केलेला व्हिडीओ समोर आणला गेला

    – 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा नव्हे तर 350 व्या वर्षाला सुरुवात आहे.

    –  मात्र सध्या 15 ऑगस्ट हा पण 16 ऑगस्टला साजरा केला जाईल, सर्वच बदलत आहे, आव्हाड यांची टीका

  • 05 Jun 2023 03:22 PM (IST)

    जालना – रावसाहेब दानवेंच्या विरोधात चंद्रकांत दानवेंना उमेदवारी ?

    राष्ट्रवादीच्या दालनात चंद्रकांत दानवेंच्या नावाची रंगत्ये चर्चा

    जालन्यातून राष्ट्रवादी चंद्रकांत दानवेंना लोकसभेसाठी उतरवणार असल्याचे वृत्त

  • 05 Jun 2023 03:14 PM (IST)

    भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय – एकनाथ खडसेंची टीका

    भाजपामध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली टीका

    कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपात परत जाणार नाही, खडसे यांनी केले स्पष्ट

  • 05 Jun 2023 03:08 PM (IST)

    कुस्तीपटूंसह आंदोलनात सामील झालेली साक्षी मलिक कामावर परतली, आंदोलनातून माघार घेतली नसल्याचे केले स्पष्ट

    ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात कुस्तीपटूंसोबत आंदोलन करणारे साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया त्यांच्या कामावर परतले आहेत.

    मात्र आंदोलनातून माघार घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    सत्याग्रहासोबत रेल्वेप्रती असलेली जबाबदारी निभावत आहे – साक्षी मलिक

  • 05 Jun 2023 02:45 PM (IST)

    माण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान

    माण तालुक्यात दहिवडीसह पश्चिम भागाला सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार फटका बसला.

    वादळी वाऱ्यासह पावसामुळे विजेचे खांब,झाडांची पडझड झाली.

    पावसामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

    या झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्याला पूर आल्याने छोट्या पूलांवरून पाणी वाहू लागलं.

    बिजवडी येथील प्रशांत विरकर यांच्या साडेतीनशे होऊन अधिक आंब्याच्या झाडांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला.

  • 05 Jun 2023 02:44 PM (IST)

    चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते 5 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना हस्तांतरीत

    पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे किंमती व मौल्यवान मुद्देमाल नागरिकांना पुन:प्रदान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन

    पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मुद्देमाल हस्तांतरण सोहळा

    गेल्या १ वर्षात पुणे पोलिसांकडून तब्बल 5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    आज तो फिर्याद (तक्रार) दिलेल्या नागरिकांना पुन:प्रदान करण्यात येत आहे.

    या मुद्देमालमध्ये मोबाईल, सोन्याचे दागिने यासह इतर मौल्यवान वस्तू आहेत.

    चंद्रकांत पाटील यांच्याकडून या वस्तू हस्तांतरण करण्यात येत आहे.

  • 05 Jun 2023 02:30 PM (IST)

    मराठा समाजातील काही लोकांनी माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला – गुणरत्न सदावर्ते

    निलंबित वकील सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप.

    मराठा समाजातील काही लोकांनी माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला – सदावर्ते

    माझ्या घराच्या खाली लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अडवलं.

    मी पोलिसात रीतसर तक्रार करणार, मात्र रद्द झालेलं आरक्षण असं करून मराठा समाजाला कधीच मिळणार नाही.

  • 05 Jun 2023 02:29 PM (IST)

    भंडारा, मुंबईनंतर बुलढाण्यातही झळकले नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री आशयाचे पोस्टर

    भंडारा, मुंबई नंतर बुलढाण्यातही भावी मुख्यमंत्री म्हणून नाना पटोले यांचे पोस्टर झळकले.

    काँग्रेस कार्यकर्ते हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावत आहेत.

    भंडारा, मुंबईनंतर बुलढाणा जिल्ह्यातही भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांचे पोस्टर लावले.

    आपापल्या राजकीय नेत्यांच्या प्रेमापोटी हे कार्यकर्ते त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावत आहेत.

    मात्र या संपूर्ण पोस्टरबाजीमुळे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री होण्याची कोणाकोणाची महत्त्वकांक्षा आहे ?, हे समोर येत आहे.

    कितीही नाही म्हटलं तरी प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांची सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा असणे सहाजिकच आहे.

    हीच महत्वकांक्षा आता या पोस्टरबाजीच्या माध्यमातून समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

    खामगाव शहरातील मुख्य भाग असलेल्या टॉवर चौकात हे पोस्टर लागले आहेत.

    त्यामुळे या संपूर्ण भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरबाजीमुळे राज्यात पुन्हा एकदा राजकारण रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

  • 05 Jun 2023 02:17 PM (IST)

    मुख्यमंत्रीपदावरून प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा

    महाविकास आघाडीत बापात बाप नाही, लेखात लेख नाही अशी अवस्था आहे

    त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न बघण्या गोदर जागा वाटपावर लक्ष दिलं तर महत्त्वाचं राहील.

    एका बाजूला जागा वाटपाचं घोंगडं भिजत ठेवायचं, दुसऱ्या बाजूला आम्ही मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहोत म्हणायचं, हा छुपा गेम मला दिसतो.

    ज्यांची चौकशी सुरू आहे, ते सर्व मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले आहेत.

  • 05 Jun 2023 02:13 PM (IST)

    उद्या रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा, देशातून मोठया संख्येने शिवभक्त दाखल!

    उद्या रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार,

    शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात.

    रायगडावर महाराष्ट्रसह देशातून मोठया संख्येने शिवभक्त दाखल.

    संयोगीताराजे संपूर्ण कामाचा आढावा घेत आहेत.

  • 05 Jun 2023 02:08 PM (IST)

    “एक हिरोईन आणि एक बुजगावणे”, यशोमती ठाकूर यांचं नाव न घेता राणा दाम्पत्यावर टीकास्त्र

    महाविकास आघाडीने मंजूर केलेले कामे एक वर्ष या गद्दार सरकारने रखडवली.

    एक हिरोईन आणि एक बुजगावणे कोणत्या पक्षाचे आहे माहीत नाही

    नाव न घेता काँग्रेस आमदार यशोमती ठाकुरांचे राणा दाम्पत्यावर टीकास्त्र..

    निवडुन येण्यासाठी आमच्याकडे येतात मग तिकडे जाऊन कुरघोडी करतात.

    लोकशाही मध्ये जे तुम्हाला मतदान देतात त्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे.

    आता या गद्दारांचे दहा माहिनेच राहले.

    यांना काय नाचायचे नाचू द्या.

  • 05 Jun 2023 02:00 PM (IST)

    भंडारा | गुरुदेव सेवा मंडळातील बालकांनी नाना पटोले यांना भरवला केक

    गुरुदेव सेवा मंडळातील बालकांनी नाना पटोले मुख्यमंत्री होण्याची व्यक्त केली इच्छा

    नाना पटोले यांचा आज त्यांच्या मूळ गावी सुकळी येथे वाढदिवस साजरा

    मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सुकळी या गावी केली गर्दी

    लहान बालकांनी नाना पटोले यांना केक भरवत बर्थडे केले सेलिब्रेशन

    नाना पटोले यांनी सुद्धा मोठा उत्साहात लहान मुलांना केक भरवत सेलिब्रेशन केले

  • 05 Jun 2023 01:59 PM (IST)

    सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवेचं काम अक्कलकोटच्या शेतकऱ्यांनी पाडले बंद

    – अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी आक्रमक

    – सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले

    – बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा या मागणीसाठी काम बंद पाडण्याचा प्रयत्न

    – या भागातील शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरचे शेड काढून मशिनरी पाडल्या बंद

    – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील दिला इशारा

    – सुरत चेन्नई ग्रीन फिल्ड हायवेच्या मंजूर मार्गाचे काम सुरू झाले होते मात्र ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न

  • 05 Jun 2023 01:44 PM (IST)

    अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी अग्नीशमन दलाचे अधिकारी सिद्धिविनायक मंदिरात दाखल

    अग्निशमन यंत्रणेच्या पाहणीसाठी अग्नीशमन दलाचे अधिकारी सिद्धिविनायक मंदिरात दाखल

    अग्नीशमन दलाचे अधिकारी पाहणीसाठी सिद्धिविनायक मंदिरात दाखल

    मंदिरातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आल्याची प्राथमिक माहिती

    भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात मंदिरातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यासाठी आल्याची माहिती मंदिरानं दिली

    अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस अधिकारी देखील हजर

  • 05 Jun 2023 01:39 PM (IST)

    मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडून लाभार्थ्यांना केंद्राच्या विविध योजनांच्या चेकचे वाटप

    मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडून लाभार्थ्यांना केंद्राच्या विविध योजनांच्या चेकचे वाटप

    केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल हे आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर

    प्रल्हाद सिंह पटेल यांच्या उपस्थितीत आज दौंडमध्ये केडगाव चौपुला या ठिकाणी लाभार्थी मेळावा झाला

    लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या चेकचे वाटप करण्यात आले

    भाजपचे हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी रवींद्र टंडन, दौंडचे आमदार राहुल कुल, महिला अध्यक्षा कांचन कुल, किसन मोर्चाचे वासुदेव काळे आणि कार्यकर्ते उपस्थित

  • 05 Jun 2023 01:37 PM (IST)

    केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल आज, उद्या बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर

    प्रल्हाद सिंह पटेल पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा

    आज त्यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे जाहिर सभेला उपस्थिती लावली

    दुपारी ते इंदापूर तालुक्यातील लघु व्यावसायकांशी ते जंक्शन या ठिकाणी संवाद साधणार

    तसेच बारामती तालुक्यातही विविध ठिकाणी भेट देणार

  • 05 Jun 2023 01:32 PM (IST)

    अक्कलकोट येथे शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे रास्तारोको आंदोलन, काय मागणी?

    – तालुक्यातील पिण्याचे पाणी, रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन

    – अक्कलकोट-सोलापूर महामार्ग ठाकरे गटाने रोखला

    – अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहावे लागले ताटकळत

    – उजनीतील दोन टीएमसी पाणी मिळावे तसेच रस्त्याची कामे निकृष्ट करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी रास्ता रोको

    – अक्कलकोट- सोलापूर महामार्गांवर हे रास्तारोको आंदोलन

    – रास्ता रोको दरम्यान पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दिक चकमक

    – आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू

    – दिल्लीतील दोन दाढीवाल्यांच्या इशाऱ्यावर हे डोंबारी सरकार नाचते

    – दरम्यान आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक खोळंबली होती

  • 05 Jun 2023 01:27 PM (IST)

    एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

    आजारी पत्नीला भेटण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

    तीन आठवड्यांचा जमीन मंजूर

    26 जूनला होणार पुढची सुनावणी

    सुनावणी वेळी पत्नीच्या आजाराबाबतची कागदपत्रे सादर करावी लागणार

    प्रदीप शर्मा यांना अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती

  • 05 Jun 2023 01:24 PM (IST)

    शिरूर लोकसभेनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू

    शिरूर लोकसभेनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरू झाला आहे

    स्वतः शरद पवार आज बैठकीत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतं आहेत

    संभाव्य उमेदवारावरतीही बैठकीत चर्चा सुरू आहे

  • 05 Jun 2023 01:21 PM (IST)

    सांगलीत “स्पेशल 26” या हिंदी चित्रपटाला ही लाजवेल असा दरोडा

    सांगलीमधील रिलायन्स ज्वेलर्स या शोरूममध्ये काल भर दिवसा दरोडा

    पडलेल्या सशस्त्र दरोडामध्ये एकूण 14 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

    अंदाजे 15 ते 20 किलो सोने आणि हिरे मानके केले लंपास

    परराज्यातील ही टोळी असल्याचा पोलिसांचा अंदाज.

  • 05 Jun 2023 01:17 PM (IST)

    बीड |आष्टीत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा 23वा पुण्यतिथी सोहळा संपन्न

    बीडच्या आष्टीत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांचा 23वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

    या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेची काढली भव्य मिरवणूक

    टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी आणि भाविक मिरवणुकीत झाले मंत्रमुग्ध

    महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी

    ठिक ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी तर रिंगण सोहळा देखील पार पडला

  • 05 Jun 2023 12:59 PM (IST)

    नाशिक | येवल्यात कांदा बाजारभाव प्रश्‍नी प्रहार शेतकरी संघटना आक्रमक…

    केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंडन करत केले आंदोलन..

    येवला प्रांत कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत केले मुंडन…

    कांद्याला दोन हजार रुपये हमीभावाची.. निर्यात होणाऱ्या कांद्याला अनुदान…

    विक्री झालेल्या कांद्याला लाल कांद्याप्रमाणेच अनुदानाची मागणी…

    खताच्या किमती कमी करण्याची मागणी…

  • 05 Jun 2023 12:47 PM (IST)

    अग्नीशमन दलाचे अधिकारी पाहणीसाठी सिद्धिविनायक मंदिरात दाखल

    मंदिरातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी अधिकारी आले असल्याची प्राथमिक माहिती

    भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात मंदिरातील अग्निशमन यंत्रणेची पाहणी करण्यासाठी आल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिराकडून देण्यात आली आहे

    अग्निशमन दलाचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस अधिकारी देखील आहेत

  • 05 Jun 2023 12:44 PM (IST)

    भारत जोडो यात्रेचं ठाकरे गटाला निमंत्रण नव्हतं – संजय शिरसाट

    राऊतांनी पवारांच्या सांगण्यावरुन सेनेत फूट घडवली – संजय शिरसाट

    निमंत्रण नसतानाही आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभाही झाले – संजय शिरसाट

    मातोश्रीचा आब संजय राऊतांनी घालवला – संजय शिरसाट

    पूर्वी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार देखील मातोश्रीवर नमन करायचे – संजय शिरसाट

  • 05 Jun 2023 12:33 PM (IST)

    भाजप – शिवसेनेची युती भक्कम, एकत्र निवडणुका लढवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    अमित शाहा यांच्यासोबत विस्ताराबाबत सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    राज्यात अनेक प्रकल्प वेगानं सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

  • 05 Jun 2023 12:27 PM (IST)

    जसे संस्कार आहेत तसे ते बोलतात… अजित पवार यांचा फडणवीस यांना टोला

    मंडल आयोगाची अमलबजावणी शरद पवार यांनी केली – अजित पवार

    महिलांना प्रतिनिधीत्व न देणं त्यांना पटत असेल. त्यांना वाटत असेल 20 लोकांचे मंत्रिमंडळ नीट चालते – अजित पवार

    मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला.

    ज्याचे जसे संस्कार आहेत तसे ते बोलतात. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती – अजित पवार

    पण दुसऱ्याकडून तरी अजिबातच अपेक्षा नाही, अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला.

  • 05 Jun 2023 12:24 PM (IST)

    औरंगाबाद | कांद्याला भाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

    कांद्याला भाव द्यावा या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचा रस्ता रोको

    हातनूर टोलनाक्यावर शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

    कांद्याला रास्त भाव देण्यात यावा शेतकऱ्यांची मागणी

  • 05 Jun 2023 12:18 PM (IST)

    सुलोचना दीदींच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा – देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस सुलोचना दीदींच्या अंत्यदर्शनाला

    सुलोचना दीदींची कारकिर्द थक्क करणारी – देवेंद्र फडणवीस

  • 05 Jun 2023 12:15 PM (IST)

    ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’चे कंत्राटदार माजल्यासारखे वागतात – यशोमती ठाकूर

    ग्रामसडक योजनेचे कामे अर्धवट राहिल्याचा आरोप करत आमदार यशोमती ठाकूर संतापल्या…

    पावसाळ्यात जर रस्ता बंद झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही; कंत्राटदाराला खडसावलं..

    खोकेवाल्यांचे सरकार या पद्धतीने निधी वाटपात भेदभाव करीत आहे, याचा जनता त्यांना नक्कीच धडा शिकवेल….

  • 05 Jun 2023 12:12 PM (IST)

    मुंबईत पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध – आशिष शेलार

    मुंबईत पाणीपट्टी दरवाढ नको – आशिष शेलार

    पाणीपट्टीत दरवाढ न करण्याची आयुक्तांकडे मागणी – आशिष शेलार

    मुंबईकरांना अप्पर वैतरणामधीर सरकारच्या साठ्यातून पाणी मिळणार – आशिष शेलार

    लिटरमाहे २५ पैसे ते ४ रुपयांपर्यंत पाणीपट्टी वाढ प्रस्तावित

    भाजपच्या कोअर कमिटीची उद्या मुंबईत बैठक

  • 05 Jun 2023 12:05 PM (IST)

    चित्रपटसृष्टीतील वात्सल्यमूर्ती हरपली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सुलोतना दीदींच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सुलोतना दीदींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

    शिवाजी पार्कातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार

  • 05 Jun 2023 11:59 AM (IST)

    माझ्या मतदारसंघातील रेल्वे आणि इतर विषयांसंदर्भात आज डीआरएम यांची भेट घेतली – श्रीकांत शिंदे

    बैठकीमध्ये बरेचसे मुद्दे मांडले

    स्थानिक लोकांच्या समस्यांना वाट मोकळी करण्याचं काम आमच्यामार्फत केलं जातंय

    खासदार अनुराग ठाकूर हे आले जरी किंवा फिरले जरी तरी मला काही फरक पडणार नाहीये

    कारण आमची युती जास्त मजबूत होईल

    भाजपा आणि शिवसेना आणखी मजबूत होईल, येत्या दिवसात दिसेल

    साडे तीन लाख मते होती, ती आणखी वाढतील

  • 05 Jun 2023 11:57 AM (IST)

    अक्कलकोट येथे शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे रास्ता रोको आंदोलन

    अक्कलकोट तालुक्यातील रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रास्तारोको आंदोलन सुरु

    तालुक्यातील ग्रामस्थाना रस्ते हलक्या प्रतीचे असून त्याविरोधात रास्ता रोको आंदोलन

    अक्कलकोट-सोलापूर महामार्ग ठाकरे गटाने रोखला

    अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहावे लागते ताटकळत

  • 05 Jun 2023 11:56 AM (IST)

    उद्या होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 349 वा च

    श्रीमंत शाहू छत्रपती यांचा दावा

    1974 ला कोल्हापुरात 300वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला होता

    त्याच वर्षी शाहू महाराजांची जन्मशताब्दी देखील साजरी झाली होती

    श्रीमंत शाहू छत्रपतींची माहिती

    त्यामुळे उद्या होणारा शिवराज्याभिषेक सोहळा 349 वा च

    श्रीमंत शाहू छत्रपतींनी उद्या न्यू पॅलेस परिसरात होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीची केली पाहणी

  • 05 Jun 2023 11:54 AM (IST)

    माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना दिलासा

    प्रदीप शर्मांना तीन आठवड्याचा अंतरिम जामीन

  • 05 Jun 2023 11:47 AM (IST)

    राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शाहांसोबत सकारात्मक चर्चा – एकनाथ शिंदे

    आगामी निवडणुका युतीत लढणार

    राज्यातील विकासाच्या प्रश्नावरही शाहांसोबत चर्चा

    मविआच्या काळात रखडलेले प्रकल्प मार्गी लावले

    सहकार विभागाबाबत सकारात्मक चर्चा

    लोकसभा, विधनासभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा

    विरोधकांना दुसरं काम नाही, त्यांना टीकाच करायची आहे

    आपण लक्ष द्यायचे नाही

  • 05 Jun 2023 11:45 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुलोचना दीदी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले

    दादर येथील निवास स्थानी मुख्यमंत्री पोहोचले

    सुलोचना दीदी यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेश

  • 05 Jun 2023 11:40 AM (IST)

    कोर्टाचा निकाल लोकांपर्यत पोहचावा यासाठी ठाकरे गटाची नवीन मोहीम

    सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर कोर्टाने काय निकाल दिलाय यावर जनजागृती सुरु

    याचाच भाग म्हणून सोशल मीडियावर ठाकरे गटाकडून कोर्ट काय म्हणाले यावर व्हिडिओ अपलोड केले जात आहेत

    निकालात न्यायालयाने काय म्हटलंय, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले जाताहेत

    याआधी ठाकरे गटाकडून महत्वाच्या मुद्यांची प्रत संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना देण्यात आली होती

  • 05 Jun 2023 11:34 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षास निवासस्थानावरून दादरच्या दिशेने रवाना

    सुलोचनादीदी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेणार

  • 05 Jun 2023 11:33 AM (IST)

    अजित पवार राष्ट्रवादीमध्ये राहून कधी मुख्यमंत्री होणार नाहीत – विजय शिवतारे

    अजित पवारांनी ठरवायचे आहे

    अजित पवारांसोबतच्या मुसद्दी नेत्यांनी ठरवायला पाहिजे

    जे उद्धव ठाकरेंबाबत झाले राज ठाकरे सोबत झाले

    राज ठाकरे सारखा नेता असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व गेले

  • 05 Jun 2023 11:31 AM (IST)

    शेतातील पाईपलाईन फोडल्याच्या कारणावरून अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात हल्ल्याची घटना

    पिंपळवाडी येथे अॅसिड, तलवार, कुऱ्हाडीने हल्ला

    युवकाच्या डोळ्यावर अॅसिड ओतले, तर महिलांचे तलवारीने डोके फोडले

    सख्या चुलत भावानेच हल्ला केल्याची माहिती

    किरण देवकाते, संगिता देवकाते यांच्यावर झाला हल्ला

    राजेंद्र देवकाते, अशोक देवकाते यांच्या मुलाने हल्ल्याचा आरोप

  • 05 Jun 2023 11:28 AM (IST)

    व्हायरल झालेली पोस्ट मी टाकलेली नाही – दिनकर पाटील

    दिनकर अण्णा फॅन क्लबच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल झाली

    मी 2 वर्षांपासून लोकसभेची तयारी करतो आहे

    मला तयारी करायला वरिष्ठांनी सांगितलं आहे

    रवींद्र अनासपुरे यांनी मला काम सुरू करायला लावलेल आहे

    पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य

    सुपारी घेऊन मी काम करत नाही

    मोदींच्या नेतृत्वात देशात भाजप निवडून येईल

  • 05 Jun 2023 11:25 AM (IST)

    ओबीसी आरक्षणासाठी आम्ही आयोग नेमला – अजित पवार

    ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका कोर्टापर्यंत नेली

    ओबीसी आरक्षणाबाबत शिंदे-फडवणील सरकारने काय केलं?

    बावनकुळेंना जे बोलायचं ते बोलू द्या

    बावनकुळेंच्या वक्तव्यावर जास्त लक्ष देत नाही

  • 05 Jun 2023 11:23 AM (IST)

    संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक

    सासवडमध्ये आज जोडे मारो आंदोलन

    आंदोलनाला माजी मंत्री विजय शिवतारे यांची उपस्थिती

  • 05 Jun 2023 11:21 AM (IST)

    भाजपनं कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही – चंद्रशेखर बावनकुळे

    ओबीसी समाजाला न्याय देण्याकरीता फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हावं लागलं

    भाजपनं ओबीसी नेत्याला देशाचं पंतप्रधान केलं

    ओबीसींच्या इम्पेरिकल डेटासाठी मविआने निधी दिला नाही

    सरकार आल्यानंतर दोन महिन्यात ओबीसीला आरक्षण मिळालं

  • 05 Jun 2023 11:17 AM (IST)

    सत्ताधारी पक्षाचे आमदार सुहास कांदे यांचे मालेगावात जलसमाधी आंदोलन

    थेट सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळ मानले जाणारे सुहास कांदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

    गिरणा धरणात घेणार जलसमाधी

    तालुक्यातील शेकडो मच्छीमार जल समाधीत कांदे यांच्यासह सहभागी

    मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त

    गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मच्छीमार विरुद्ध ठेकेदार वाद

    हजारो लोक आंदोलनात सहभागी

    पोलिसांकडून लाईफगार्डसह बंदोबस्त

    थोड्या वेळातच आमदार सुहास कांदेही पोहचणार आंदोलनस्थळी

    स्थानिक मच्छमाराना सवलत मिळावी

    गिरणा धरणावरील अवैधरित्या दिलेला रद्द करा यासह अनेक मागण्या

  • 05 Jun 2023 11:12 AM (IST)

    ओडीसा अपघाताबद्दल सामनामध्ये आणि आज पत्रकार परिषदेत गरळ ओकण्याचं काम केलंय – नितेश राणे

    सामना वृत्तपत्र राज्य सरकारकडून 50 लाख जाहिरातीचे घेतात

    महापालिकेतील सर्वात जास्त जाहिराती यांच्या पेपरला जातात

    सरकारी तुकड्यावर जगणाऱ्यांनी हे बोलणे उचित नाही

    नैतिकतेची भाषा करतात मग तुमच्या मालकाच्या सरकारमध्ये लोकांचे जीव गेले तेव्हा पश्चताप झाला का?

    आमचे रेल्वे मंत्री तिथे रात्रभर होते ते चांगलं काम करत आहेत

    त्यांचे मालक परदेशी फिरत आहेत, ते कोविड काळात केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशापासून

    दुसऱ्यांना नैतिकता शिकवता मालकाने कधी राजीनामा दिला का?

    खरी शिवसेना दिल्लीत जात नाही म्हणता मग तुमचा मालक जनपथवर किती वेळा गेला?

    दिल्लीला मातोश्रीची मम्मी आहे

    Cbi चौकशीवर बोलता मग श्रीधर पाटणकरबद्दल बोल ना

    शरद पवारांनी याची कानातून रक्त काढेपर्यंत लायकी काढली आहे म्हणून आता अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाही

    एक इंटरनल सर्व्ह मविआचा झालाय

    यात शिवसेनेला बावीस जागा आणि मविआ पडेल असं दिसतंय

    येणाऱ्या निवडणुकीत 22 चे दोन कसे होतील बघा

    चायनीज शिवसेनेचा नेता आहे हा, त्यांची शिवसेना चायनीज

    राहुल गांधी यांच्या दौऱ्याची चौकशी व्हावी

    उद्धव ठाकरे जनपथवर उद्धव ठाकरे साडी घालून जायचा का?

    हिजड्याचं प्रमुख यांना म्हणायचं का?

    मोदींवर टीका करण्यापेक्षा तुझ्या मालकाने काय केलं सांग

  • 05 Jun 2023 11:07 AM (IST)

    अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीची बैठक

    अजित दादांनी कार्यकर्यांना सुनावलं

    कामं केली नाही तर कानाखाली देईन, पद काढून घेईन

    लोकांची कामं करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहेत

  • 05 Jun 2023 10:26 AM (IST)

    पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होणार

    पुणे जिल्हा ग्रामीण आणि लोकसभा मतदारसंघाच्या होणार स्वतंत्र बैठका

    थोड्याच वेळात पुणे जिल्हा ग्रामीणच्या बैठकीला होणार सुरुवात

    या बैठकीला विरोधी पक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार राहणार उपस्थित

    तर राज्यातील काही लोकसभेच्या मतदारसंघातील शरद पवार घेणार आढावा

    या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते राहणार उपस्थित

  • 05 Jun 2023 09:55 AM (IST)

    बिहारमधील भागलपूरमध्ये निर्माणाधीन अगुवानी-सुलतानगंज पूल कोसळला

    एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल

    एसडीआरएफच्या चार बोटींकडून शोधमोहीम सुरू

    सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

  • 05 Jun 2023 09:50 AM (IST)

    जेजुरी विश्वस्त निवडीवरुन वाद सुरु असतानाच नवनियुक्त विश्वस्तांची बैठक

    काल नवनियुक्त विश्वस्तांच्या बैठकीत मुख्य विश्वस्तांची झाली निवड

    पोपट खोमणे यांची प्रमुख विश्वस्तपदी झाली निवड

    स्थानिकांना प्राधान्य न दिल्यामुळे सुरु आहे जेजुरीकरांचे आंदोलन

    आंदोलन सुरु असताना प्रमुख विश्वस्त निवडल्याने वाद आणखी चिघळण्याची शक्यता

  • 05 Jun 2023 09:45 AM (IST)

    नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप शिंदे गटात रस्सीखेच सुरू

    भाजपच्या इच्छुक उमेदवाराकडून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर टीका

    सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्ट मधून शिवसेना खासदारांवर टीका

    नाशिक लोकसभेच्या जागेवरून निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी

    भाजप नगरसेवकांकडून शिवसेनेच्या खासदारांवर गद्दार म्हणून उल्लेख करत पोस्ट मधून टीका

    भाजपच्याच इच्छुक नगरसेवकाकडून मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्याच खासदारावर गद्दार असल्याची सोशल मीडियातून टीका

  • 05 Jun 2023 09:40 AM (IST)

    ओडिशाच्या बालासोरमधील रेल्वे अपघात प्रकरण

    अपघातामुळे प्रभावित झालेल्या रुळांवर प्रवासी गाड्या चालवण्यास सुरुवात

  • 05 Jun 2023 09:35 AM (IST)

    कल्याण | महावितरण कंपनीचे ठेकेदार उमेश साळूखे यांच्यावर गोळीबार

    अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून काढला पळ

    उमेश साळूखे यांना उपचारासाठी मुंबईच्या शासकीय रुग्णालयात केलं दाखल

    पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू

  • 05 Jun 2023 09:30 AM (IST)

    हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते बॅरी न्यूमॅन यांचं निधन

    वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    1971 मधील ‘वॅनिशिंग पॉईंट’ या ॲक्शन थ्रिलर चित्रपटामुळे मिळाली लोकप्रियता

  • 05 Jun 2023 09:25 AM (IST)

    अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण

    या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता

    हवामान खात्याने वर्तवला अंदाज

    येत्या 2 ते 3 दिवसांत मुंबई, ठाण्यात पाऊस कोसळण्याची शक्यता

  • 05 Jun 2023 09:20 AM (IST)

    मुसंडी चित्रपटाच्या टीमने घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट

    भेटीदरम्यान मुख्यमंत्री आणि छोटा पुढारी धनश्याम दराडे यांच्यात संवाद

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब मुसंडी चित्रपट पाहणार असल्याचं दिलं आश्वासन

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या विशेष शुभेच्छा

  • 05 Jun 2023 09:15 AM (IST)

    जेजुरी विश्वस्त पदाच्या वादावर आजपासून धर्मादाय आयुक्त कार्यालयात सुनावणी

    जेजुरी ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केली याचिका

    याचिकेत घेतला 5 विश्वस्तांच्या निवड निकषावर आक्षेप

    तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होऊन निकाल येणार

    विश्वस्तपदी नियुक्त करण्यात आलेल्या 5 जणांवर जेजुरी ग्रामस्थांनी घेतला आक्षेप

  • 05 Jun 2023 09:10 AM (IST)

    सांगली | मिरज रस्त्यावरील दागिन्यांच्या शोरूममध्ये सशस्त्र दरोडा

    कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले

    तोतया पोलीस बनून कर्मचारी आणि ग्राहकांना बंदी बनवून टाकला दरोडा

  • 05 Jun 2023 09:05 AM (IST)

    सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

    सुलोचना दीदी यांचं पार्थिव राहत्या घरी आणलं

    अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी

  • 05 Jun 2023 08:59 AM (IST)

    फिल्मफेअर पुरस्काराबद्दल नसीरुद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

    प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच एक मुलाखत दिली.

    त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, त्यांना त्यांच्या कारकीर्दीत बरेच पुरस्कार मिळाले. मात्र त्या पुरस्कारांना ते गांभीर्याने घेत नाहीत.

    आपल्या कारकीर्दीत मिळालेल्या फिल्मफेअर ट्रॉफीचा वापर चक्क वॉशरूमचा हॅण्डल म्हणून केला असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.

  • 05 Jun 2023 08:55 AM (IST)

    राहुल गांधी रेल्वे अपघाताबद्दल काय म्हणाले?

    काँग्रेसच्या काळातही असाच रेल्वे अपघात झाला होता. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी असं नाही म्हटलं की, हा अपघात इंग्रजांमुळे झाला. उलट त्यांनी म्हटलं की, मी या अपघाताची जबाबदारी घेतो अन् राजीनामा देतो. पण आता तसं घडताना दिसत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

  • 05 Jun 2023 08:51 AM (IST)

    एका मोठ्या नक्षलवादी नेत्याचा ह्दयविकाराने मृत्यू

    गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात आणि छत्तीसगड राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या नक्षलवाघांच्या एक प्रमुख नेत्याचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

    कटकम सुदर्शन आनंद दुला या नेत्याचा ह्दयविकाराने छत्तीसगड राज्यातील दंडकराण्यांना जंगलात मृत्यू झाला.

    हा मोस्ट वाँटेड नक्षलवादी होता. जवळपास 48 वर्ष तो भूमिगत होता.

    31 मे रोजी मृत्यू झाल्याचा खुलासा नक्षलवाद्यांनी एक पत्रकार द्वारे केला

  • 05 Jun 2023 08:46 AM (IST)

    Wedding night : लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवविवाहित जोडप्याबरोबर जे घडलं, त्याने सगळे हळहळले, नियतीचा अजब खेळ

    Wedding night : कुठे घडली घटना? तो 22 वर्षांचा, ती 20 वर्षांची. ही बातमी वाचल्यानंतर असं कोणाच्याही बाबतीत घडू नये असच तुम्ही म्हणाल. दोघे पत्नी लग्नानंतर त्यांच्या खोलीत गेले. वाचा सविस्तर….

  • 05 Jun 2023 08:45 AM (IST)

    ओदिशा ट्रेन अपघातानंतर रेल्वे मंत्री काय म्हणाले?

    आमची जबाबदारी अजून संपलेली नाही, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. घटनास्थळावरुन अपघातग्रस्त ट्रेनचे डब्बे हटवण्यात आले असून तिथे प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे.

  • 05 Jun 2023 08:42 AM (IST)

    पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प

    पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लवकरच मिळणार मान्यता

    केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला होणार सुरुवात.

    प्रकल्पाला मान्यता मिळावी यासाठी लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे रेल्वेकडून प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे

    पुणे जिल्ह्यातील 54 गावातून हा प्रकल्प जाणार आहे..

  • 05 Jun 2023 08:35 AM (IST)

    बीएसएफकडून ड्रोन आणि हेरॉइन जप्तीची कारवाई

    पाकिस्तानातून तस्कर ड्रोनच्या माध्यमातून हेरॉइनची तस्करी करू शकतात, अशी मागच्या मागच्या 2-3 दिवसापासून आमच्याकडे टीप होती. त्यावर कारवाई करत आमच्या सैनिकांनी एक ड्रोन आणि हेरॉइनची 3 पाकिटं जप्त केली, अशी माहिती बीएसएफचे डीआयजी संजय गौर यांनी माहिती दिली.

  • 05 Jun 2023 08:05 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते.

    – दोन्ही नेत्यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर अमित शाहांशी चर्चा केल्याची सुत्रांची माहीती.

    – महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांवर केंद्र सरकारचं मार्गदर्शन आणि सहाकार्यावर चर्चा झाली.

    – शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीवरही चर्चा झाली.

  • 05 Jun 2023 08:02 AM (IST)

    odisha train accident : मोठ्या मनाचा वीरेंद्र सेहवाग, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी घोषणा

    odisha train accident : तुम्ही सुद्धा वीरेंद्र सेहवागच्या या निर्णयाच कौतुक कराल. सेहवागसारखी उद्योगपती गौतम अदानी यांनी सुद्धा घोषणा केली आहे. वाचा सविस्तर….

  • 05 Jun 2023 08:01 AM (IST)

    अमरावतीच्या वरुड तालुक्यात अज्ञात रोगाने सुकू लागल्यास संत्र्याच्या बागा

    वरुड तालुक्यातील अनेक संत्रा उत्पादक शेतकरी आले पुन्हा अडचणीत

    वातावरणातील बदलांमुळे अनेक बागांमध्ये आंबिया बहारच फुलला नसल्याचा वास्तव समोर

    आधीच भाव नाही त्याच्यात झाडे सुकू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याचा शेतकऱ्यांचा आवाहन

  • 05 Jun 2023 07:47 AM (IST)

    नाशिक दिंडीतील वारकऱ्यावर काळाचा घाला

    सातपूर परिसरात रिक्षाच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

    मधूकर शिंदे असं अपघातात दगावलेल्या वारकऱ्याचं नाव

    रिक्षा चालकाचा तोल गेल्याने रिक्षाची मधूकर शिंदे यांना धडक बसली, त्यात त्यांचा मृत्यू झाला

  • 05 Jun 2023 07:33 AM (IST)

    बुलढाणा, नाशिक, अमरावतीत वादळी वाऱ्यासह पाऊस

    बुलढाणा, नाशिकच्या मालेगाव आणि अमरावतीतील नांदगाव पेठ येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला

    यावेळी जोराचे वारे वाहत होते, त्यामुळे धूळधाळणही मोठ्या प्रमाणावर झाली होती

    अचानक आलेल्या पावसाने येथील रहिवाशांची चांगलीच तारांबळ उडाली

    मात्र, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे

  • 05 Jun 2023 07:29 AM (IST)

    पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, शरद पवार मार्गदर्शन करणार

    पक्षाचे सर्व नेते बैठकीला उपस्थित राहणार, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार करणार बैठकीला मार्गदर्शन

    आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक महत्त्वाची आहे

    राष्ट्रवादी काँग्रेसनं किती जागा लढवायच्या यावर चर्चा होऊ शकते

    सकाळी 10. 30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे

  • 05 Jun 2023 07:27 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येणार

    पुण्यातील कोथरुडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत.

    ठाकरे गटातून नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या शाम देशपांडे यांनी या सोहळ्याचं आयोजन केलंय.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या सोहळ्याला हजेरी लावणार

  • 05 Jun 2023 07:17 AM (IST)

    नागपूरमध्ये मान्यता नसलेलं बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्या 29 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

    29 कृषी सेवा केंद्रांना विक्रीबंदचे आदेश, 25 विक्रेत्यांचे परवाने रद्द

    कृषी विभागाच्या कारवाईमुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले

    नागपूर जिल्ह्यातील कृषी विभागाचे 14 भरारी पथकं

    भरारी पथकामार्फत 3 बियाणं उत्पादक आणि 434 कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी

  • 05 Jun 2023 07:14 AM (IST)

    विदर्भात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अलर्ट जारी

    विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे.

    गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भात उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत.

    शुक्रवारी नागपूरचे कमाल तापमान अर्ध्या अंशाने वाढून 43 अंशांवर स्थिरावले होते.

    पुढील दोन दिवस अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असल्यामुळे तीव्र चटके बसण्याची शक्यता आहे.

  • 05 Jun 2023 07:11 AM (IST)

    ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

    अभिनेत्री सुलोचना चव्हाण यांचं पार्थिव त्यांच्या प्रभादेवी येथील घरी दर्शनासाठी ठेवण्यात येणार

    त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार

    दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

Published On - Jun 05,2023 7:08 AM

Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.