Maharashtra Breaking Marathi News Live | उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब देसाई यांना मरोणोत्तर पद्मश्री देण्याची मागणी केली होती: शंभूराज देसाई
Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.
मुंबई : नवी मुंबईतील उलवेनोड येथे तिरुपती बालाजी मंदिर उभारण्यात येणार आहे. या प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे. नागपूरमध्ये येत्या 10 जूनपासून अग्नीवीर सैन्य भरती सुरू होणार आहे. या भरतीसाठी 6 हजार 354 युवक शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
कोल्हापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची कसून चौकशी होणार: जिल्हाधिकारी राहुल रेखावर
कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये घडलेल्या राड्याची चौकशी केली जाणार असून सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा आणि कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली.राहुल रेखावर यांनी याबाबत सांगितले की, आतापर्यंत 25 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले असून जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडूनही कसून चौकशी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ज्यांनी आतापर्यंत बेजबाबदारपणे वक्तव्य केली आहेत, त्याची चौकशी केली जाणार अशी माहिती आयजी सुनील फुलारी यांनी दिली. -
उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब देसाई यांना मरोणोत्तर पद्मश्री देण्याची मागणी केली होती: शंभूराज देसाई
मुंबईः
मी राज्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे केंद्राकडे बाळासाहेब देसाई यांना मरोणोत्तर पद्मश्री पुसस्कार द्यावा अशी विनंती केली होती . तर त्यानंतर आतासुद्धा मी मुख्यमंत्र्याकडे यांच्याकडे मागणी केली असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी या मागणीला मी वेळ देत असल्याचे सांगत योग्य वेळी तो निर्णय देण्यात येईल असंही त्यांना सांगितले. त्याचबरोबर आमची बाजू न्यायालयातही मांडण्यात आली आहे आणि ती गोष्ट आता अध्यक्षांकडेही माडण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
-
-
पॅराडाईज ग्रुपच्या विकासकांवर आयकरचे छापे; बेहिशेबी रोकड सापडली
नवी मुंबई
नवी मुंबईतील पॅराडाईज ग्रुपच्या विकासकांवर आणि संबंधित लोकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या छाप्यामध्ये बेहिशेबी रोकड सापडल्याचे सांगण्यात आले आहे.
इन्कम टॅक्सच्या तपास शाखेकडून पॅराडाईज ग्रुपच्या विकासकांवर आणि संबंधित लोकांवर छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून छापेमारी सुरू असून या कारवाईतून आणखी काही धागेदोर सापडतात काय त्याचा तपास सुरु आहे.
-
यशोमती ठाकूर यांचा कोल्हापूरच्या घटनेवरुन भाजपवर गंभीर आरोप
अमरावती : कोल्हापूरच्या घटनेवरुन काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपवर गंभीर आरोप. यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडलीय. “जातीय-धार्मिक ध्रुवीकरणासाठी देशभर प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. खासकरून सधन – औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागांमध्ये अशांतता निर्माण केली की मोठ्या प्रमाणावर मजूर-कर्मचारी रस्त्यावर येतात आणि अशा लोकांना दंगली घडवण्यासाठी वापरता येतं हे भाजप आणि कट्टरतावादी संघटनांची मोडस् ऑपरेंडी”, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय.
जातीय- धार्मिक ध्रुवीकरणासाठी देशभर प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. खासकरून सधन – औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागांमध्ये अशांतता निर्माण केली की मोठ्या प्रमाणावर मजूर-कर्मचारी रस्त्यावर येतात आणि अशा लोकांना दंगली घडवण्यासाठी वापरता येतं हे भाजपा आणि कट्टरतावादी संघटनांची मोडस्…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) June 7, 2023
“त्याचमुळे हातावरचं पोट असलेल्या औद्योगिक भागांमध्ये किंवा स्थलांतरित मजूरांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य ही धोक्यात येऊ घातलं आहे”, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला.
-
शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई : राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभुराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पद्मश्री देण्याच्या मागणीकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केलं, आरोप त्यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरेंनी केंद्र शासनाकडे मागणी केली नाही. नवीन सरकारने केंद्राकडे मागणी करावी. बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करावा”, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी केली.
-
-
कोल्हापुरातील इंटरनेट सेवा किती वेळ बंद राहणार? महत्त्वाची माहिती समोर
कोल्हापूर : कोल्हापुरातील इंटरनेट सेवा अंशता खंडित करण्यात आली आहे. जिओ आणि बीएसएनएलची सेवा पूर्णपणे बंद आहे. तर इतर नेटवर्कला ही अडचणी येत आहेत. उद्या रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
-
‘कोल्हापूरच्या घटनेवरुन राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम…’, दीपक केसरकर यांचा राऊतांवर निशाणा
कोल्हापूर :
कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूरच्या घटनेवर खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. “काही लोकं राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम करत आहेत. बेजबाबदारपणे वक्तव्यसुध्दा अशा घटनांना कारणीभूत आहे”, असं केसरकर म्हणाले
“काही ठराविक समाजाच्या मतांसाठी अशी वक्तव्य केली जातायत. शरद पवारांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजबाबत केलेले वक्तव्य मी योग्य आहे की नाही हे सांगणार नाही. त्यावर शरद पवारांनी विचार करावा”, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली.
“कोल्हापूरच्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. उद्यापासून कोल्हापूरात शांतता असणार आहे. लव्ह जिहादसाठी कमिटी स्थापन करण्याचा निर्णय”, असं दीपक केसरकर म्हणाले
-
Mahesh Landge On Shirur Lok Sabha | भाजप आमदार महेश लांडगे लोकसभेसाठी इच्छूक, म्हणाले…..
भाजप आमदार महेश लांडगे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने संधी आणि उमेदवारी दिल्यास मी लोकसभा निवडणूक लढवेन, असं लांडगे यांनी म्हटलंय.
-
Anupriya Patel Vip Security | अनुप्रिया पटेलला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा
NDA सहयोगी आणि अपना दल (सोनेलाल) च्या अध्यक्षा अनुप्रिया पटेल यांना केंद्र सरकारने Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. बुधवारी गृह मंत्रालयाने याबाबत आदेश जारी केला. गृह मंत्रालयानुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांना ‘Y+’ श्रेणीचे सुरक्षा कवच प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
Assam Wagons Of Freight Train Slipped | आसाममधील कामरूपमध्ये मालगाडीचे 20 डब्बे घसरले
आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बोकोजवळ बुधवारी कोळशाने भरलेली मालगाडी रुळावरून घसरली. ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. 20 डब्बे रुळावरून घसरल्याचे सब्यसाची डे यांनी एएनआयला सांगितले.
-
संजीव जीवा हत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून एसआयटीची स्थापना
मुख्तार अन्सारीचा जवळचा सहकारी संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याची लखनऊ न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या पथकाला आठवडाभरात तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
जेजुरी देवस्थानात आणखी 4 विश्वस्त निवडण्यात येणार
जेजुरी देवस्थानात आणखी 4 विश्वस्त निवडण्यात येणार आहेत. चार वाढवण्यासाठी धर्मदाय आयुक्तांना सूचना करण्यात आल्या आहेत. उद्या ठराव करणार अशी घोषणा प्रमुख विश्वस्तांनी केली आहे. नव्या विश्वस्तांनी ठराव न केल्यास धर्मदाय आयुक्त स्वत: ही प्रक्रिया राबवणार आहेत.
-
कोण शरद पवार? ओळखत नाही : केंद्रीय मंत्री अजय मिश्रा
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. कोण शरद पवार? मी त्यांना ओळखत नसल्याचं सांगितलं आहे. पवारांनी माझ्या मतदारसंघात येऊन निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान मिश्रा यांनी केलं आहे. 5 ते 6 खासदार असलेल्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही, असंही त्यांनी पुढे सांगितलं.
-
पुण्यात गोपीचंद पडळकर आणि मुनगंटीवार यांच्याविरोधात पोस्टरबाजी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केलं. श्वानाच्या तोंडावर पडळकर आणि मुनगंटीवार यांनी फोटो लावत आंदोलन केलं. शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं आहे.
-
23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक, राहुल गांधींची असेल उपस्थिती
23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. जेडीयू नेते लालन सिंह यांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि इतर विरोधी नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित राहणार आहेत.
-
नवी मुंबईत पॅराडाईज ग्रुपच्या विकासकासह संबंधितांवर आयकर विभागाचे छापे
नवी मुंबईत पॅराडाईज ग्रुपच्या विकासकासह संबंधितांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. तीन दिवसांपासून येथे छापेमारी सुरु आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अनेक गोष्टींचा खुलासा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
-
क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक संपली, रेसलर्स म्हणाले…
केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांची कुस्तीपटूंसोबतची बैठक संपली आहे. ही बैठक जवळपास 6 तास चालली. बैठकीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी सांगितलं की, ‘सरकारने आम्हाला आश्वासन दिलं आहे की, 15 जूनपूर्वी पोलीस आपला तपास पूर्ण करतील.’
-
निवडणुकांसाठी भाजपची खलबतं, बैठक तिसऱ्या दिवशीही सुरूच
निवडणुकीची तयारी आणि संघटनात्मक बदलासाठी भाजपची बैठक तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि बीएल संतोष भाजपच्या विस्तारित कार्यालयात बैठक घेत आहेत.
-
बोरिवलीमध्ये नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह
बोरिवलीच्या गोराई नाल्यात तरुणाचा मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हा तरुण गोराई परिसरातील रहिवासी असून तो अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या बोरिवली पोलीस एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
-
पुणे पोलीस दलातील गिर्यारोहक स्वप्नील गरड यांचं निधन
माऊंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर पुणे पोलीस दलातील गिर्यारोहक स्वप्नील गरड यांचं निधन झालं आहे. माऊंट एव्हरेस्टवर ब्रेन डेड झाला होता. त्यानंतर त्यांना काठमांडूतील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज दुपारी त्यांचं निधन झालं असून या घटनेमुळे पुणे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे पुणे पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत ते कार्यरत होते.
-
देशात जय औरंगजेब म्हणणाऱ्या प्रवृत्तींना खपवून घेतलं जाणार नाही- सोमय्या
कोल्हापुर दंगल प्रकरणावर बोलताना किरीट सोमय्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, देशात जय औरंगजेब म्हणणाऱ्या प्रवृत्तींना खपवून घेतलं जाणार नाही, असं कडक शब्दात सुनावलं आहे. शिंदे फडणवीस सरकार अशा प्रवृत्ती चालून घेणार नाही, राज्यात 32 महिने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार होतं त्यांच्या सरकारकडुन अशा प्रवृत्तींचा थेट प्रोत्साहन दिल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केली आहे.
-
शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने पुण्यात पडळकर आणि मुंनगंटीवारांविरोधात पोस्टरबाजी
-भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
-पुण्यामध्ये गोपीचंद पडळकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याविरोधात पोस्टरबाजी केली आहे. भाजपच्या दोन्ही नेत्यांचे फोटो श्वानाच्या तोंडावर लावले आहेत. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळणार असल्याचं दिसत आहे.
-
कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित
-कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने समाजात तेढ आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्णाण होऊ नये म्हणून इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
-कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा दिनांक 7 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते दिनांक 8 जून 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 31 तासांच्या कालावधीकरिता खंडीत करण्याचे आदेश गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी पारित केले आहेत.
-जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे. कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याच्या कारणावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन धर्मात तेढ निर्माण झाली आहे.
-
कुस्तीपटूंचे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित – साक्षी मलिक
क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत 5 तासांहून अधिक काळ झालेल्या बैठकीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. साक्षी मलिकने प्रसारमाध्यमांशी बोलताना मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा विचार केला जाईल, असे सांगितलं आहे.
-
औरंगजेबाचा पुतळा जाळत मनसेचं आंदोलन
दादर येथील शिवाजी पार्कजवळ मनसेचे आंदोलन
संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात औरंगजेबाचा पुतळा जाळला
औरंगजेबवर प्रेम करणाऱ्यांना पण गाडणार
-
देशात जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयोगशाळा
यशोमती ठाकूर यांचा सरकारवर निशाणा
औद्योगिक क्षेत्रात अशांतता निर्माण करण्याची तयारी
राज्याचं सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात
जातीय- धार्मिक ध्रुवीकरणासाठी देशभर प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. खासकरून सधन – औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागांमध्ये अशांतता निर्माण केली की मोठ्या प्रमाणावर मजूर-कर्मचारी रस्त्यावर येतात आणि अशा लोकांना दंगली घडवण्यासाठी वापरता येतं हे भाजपा आणि कट्टरतावादी संघटनांची मोडस्…
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) June 7, 2023
-
तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार
चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
राज्यात तणाव निर्माण करु नका,
राज्यात शिंदे-भाजपचं सरकार
-
कोल्हापुरातील घडामोडीनंतर मनसे आक्रमक
मनसेचे दादरमधील शिवाजी पार्कमध्ये आंदोलन
थोड्याच वेळात मनसेकडून होणार आंदोलन
मनसे आंदोलक औरंगजेबाचा पुतळा जाळणार
-
बीएसएनएल पण 4जी, 5 जीच्या मैदानात
गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी मोठ्या पॅकजेची घोषणा
बीएसएनएलला देणार 89,000 कोटी रुपये
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला निर्णय
-
सरकार चालविता येत नसेल तर पायउतार व्हा
नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात
राज्याची बदनामी होत आहे
राज्यात महिला, तरुणी सुरक्षित नाही
शिंदे-भाजप सरकारला कायदा सुव्यवस्था सांभळता येत नाही – नाना पटोले
-
राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांची तपासणी होणार
चर्चगेटमधील वसतिगृहातील घटनेनंतर आदेश
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आदेश
उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती
-
उत्तर प्रदेशात पुन्हा कोर्ट परिसरात हत्याकांड
आरोपी संजीव जीवाची लखनऊ कोर्ट परिसरात हत्या
गोळी झाडून आरोपीची केली हत्या
भारतीय जनता पक्षाचे नेते ब्रह्म दत्त यांचे हत्याकांड प्रकरण
उत्तर प्रदेश: भारतीय जनता पार्टी के नेता ब्रह्म दत्त हत्याकांड के आरोपी संजीव जीवा की लखनऊ सिविल कोर्ट में गोली मारकर हत्या की गई। अधिक जानकारी की प्रतीक्षा है।
(नोट: वीडियो में अपश्बदों का इस्तेमाल हुआ है।) pic.twitter.com/RcYZ6jDxis
— ANI_HindiNews (@AHindinews) June 7, 2023
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार वरदान
दरवर्षी 9 कोटी प्रवाशांची वाहतूक होणार
42 विमाने राहतील उभी, पहिल्या टप्प्यात 4 टर्मिनल
2 धावपट्या असणार , 11.4 किलोमीटर परिसरात विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे यासाठी आजची पाहणी करण्यात आली. सध्या सुरु असणाऱ्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे मुख्यमंत्री… pic.twitter.com/aFoSM4NCYR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 7, 2023
-
कोल्हापूरमध्ये वातावरण बिघडवण्यासाठी सरकारनेच लोक पेरलेत का ? संजय राऊत यांचा सवाल
महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्यामागे कुणाचं षडयंत्र आहे असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. कोल्हापुरातील वादावरून राऊत यांनी टीका केली.
हिंदुत्ववादी सरकार असताना औरंगजेबाचा फोटो कसा झळकतो ? निवडणुकांसाठी तणाव निर्माण केला जातोय का,असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
-
नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये , पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन
सोशल मीडियावरील अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. तसेच गरज नसताना घराबाहेर पडून गर्दीत भर घालू नये, असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले आहे.
कोल्हापूर मधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. परिस्थितीचा फायदा घेऊन लोकांना घाबरवणाऱ्या व दंगा घडवणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे. जे नुकसान झालंय त्याची दखल घेऊन दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
-
पुणे विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला
बंगळुरुला जाणाऱ्या फ्लाईटचे वेळापत्रक बदलल्याने पुणे विमानतळावर प्रवाशांनी गोंधळ घातला. फ्लाईटचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवासी नाराज झाले आणि त्यांनी गोंधळ घातला. याप्रकरणी प्रवाशांनी सुरक्षा रक्षकांना धारेवर धरलं.
-
चर्चगेटमध्ये मुलींच्या वसतीगृहातील तरूणीच्या हत्येचा तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे – अजित पवार
वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या वसतीगृहात एका मुलीचा असा अंत होणे हे दुर्दैवी आहे. हत्येचं हे प्रकरण सरकारसाठी लज्जास्पद असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी घटना आहे. वसतीगृहात अशी घटना घडणे हे सरकारचं अपयश असून सरकारने घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी. या प्रकरणाचा पारदर्शकपणे तपास झाला पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली.
-
जेजुरीत आंदोलनस्थळी ग्रामस्थांनी केला जल्लोष
जेजुरी विश्वस्त निवडीसंदर्भात सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष केला. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सुनावणीत या वादावर अखेर तोडगा काढण्यात आला आहे. त्यानंतर आज ग्रामस्थ आणि नवीन विश्वस्तांची बैठक होणार असल्याचे समजते.
-
भाजप कर्नाटक निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेणार, उद्या बंगळुरूत होणार बैठक
कर्नाटक निवडणुकीतील पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी भाजप उद्या बंगळुरूमध्ये बैठक घेणार आहे. ही बैठक दोन भागात होणार आहे. सकाळी पहिली बैठक होणार असून, त्यात भाजपचे आमदार सहभागी होणार आहेत. दुसरी सभा दुपारी होणार असून, त्यात पराभूत उमेदवार उपस्थित राहणार आहेत.
भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवडणूक काही दिवसांनी होणार आहे. कर्नाटकातील भाजपचे प्रदेशाध्यक्षही बदलण्याची शक्यता आहे.
-
कोल्हापूरात जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर
कोल्हापूरातील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीसांना कडक पाउलं उचलावी लागली. औरंगजेबचे स्टेटस ठेवण्याप्रकरणी हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्च करावा लागला.
जनतेला शांतता राखण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
-
राज्यात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न – अजित पवार
कोल्हापूरमध्ये कायदा सुव्यवथ्या अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्क प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. राज्याच्या ईतर भागातही जाणीवपूर्वक दंगली घडवून आण्याचा प्रयत्न होत असून यातून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे अजित पवार म्हणाले.
-
मुंबईतील घटना शरमेनं मान खाली घालायला लावणारी- अजित पवार
मुंबईच्या मरिन ड्राईव्ह परिसरात असलेल्या शासकीस वस्तीगृहात घडलेली घटना ही महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आहे अशी प्रतिक्रीया विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली. सुरक्षीत मानल्या जाणाऱ्या परिसरात विदर्भातील तरूणीसोबत नराधमाने केलेल्या कृत्याचा त्यांनी समाचार घेतला.
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अशा घटना घडत आहेत, महिला राज्यात सुरक्षीत नाही याला सरकार आणि पोलीस जबावदार असल्याचे अजित पवार म्हणाले.
-
असचं चालू राहिल्यास महाराष्ट्रात उद्योग येणार नाहीत- अनिल परब
गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात होत असलेल्या घटनांमुळे राज्याचे वातावरण खराब होत आहे. असंच चालू राहिल्यास महाराष्ट्रात उद्योग योणार नाहीत असे मत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी व्यक्त केले.
राड्यांच्या घटनांमागे नेमकं कोणा आहे हे शोधलं पाहिजे असे अनिल परब म्हणाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांकडूनच अपेक्षा करावी लागेल असेही ते म्हणाले.
-
गेल्या दहा महिन्यापासून ठिकठीकाणी राड्याच्या घटना घडत आहे- अनिल परब
गेल्या दहा महिन्यापासून राज्यभारात अनेक ठिकाणी राड्याच्या घटना घडत आहेत. यामागे नेमके सुत्रधार कोण आहे हे शोधने आवश्यक असल्याचे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले. अशा गोष्टी जाणून बुजून केल्या जात असतील तर त्यामागची कारणे शोधली गेली पाहिजे असेही ते म्हणाले.
राड्याच्या घटना थांबल्या नाही तर राज्याचा विकास थांबेल असेही अनिल परब म्हणाले. याशिवाय अशा घटना घडण्यामागे एखाद्या राजकीय पक्षाचा हात आहे का तेही तपासणे आवश्यक असल्याचे परब म्हणाले.
-
“मुलींची सुरक्षा करण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी”, सुप्रिया सुळे यांची टीका
मुंबईत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.शासकीय इमारतीमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही सारख्या सुविधा बसवल्या पाहिजेत. हॉस्टेलसारख्या ठिकाणी मुलींच्या रूममध्ये अलार्म बेल लावायला हवेत. जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत येतो तेव्हा कायमच अशा गोष्टी कशा घडतात? सर्व ठिकाणी असं कस होऊ शकतं ? लोकांमध्ये भीतीच वातावरण आहे. मुलींची सुरक्षा करण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे.
दिल्लीमध्ये कुस्तीपटुंची भेट घ्यायला अनुराग ठाकूर तयार झाले आहेत. ही चांगली बाब आहे, पण हे सर्व भाजपचं अपयश आहे एवढं नक्की. कुस्तीवीरांना एवढं आंदोलन का कराव लागलं हे भाजपने पाहावं.
-
भंडाऱ्यात बियाणे आणि खतांचा काळाबाजार, कृषी विभागाच्या भरारी पथकांची करडी नजर
भंडारा जिल्ह्यातील कृषी विभाग अलर्ट मोडवर आली आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा भरारी पथक नेमण्यात आले आहे. जिल्ह्यात 2.1 लाख हेक्टरवर पीक लागवडीचे प्रस्तावित नियोजन करण्यात आलं असून विविध पिकांच्या लागवडीसाठी 46,320 क्विंटल बियाणे, तर 89,318 मेट्रिक टन खताची आवश्यकता भासणार आहे.
खतांचा काळाबाजार केल्यास तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना कृषी जिल्हा विभागाने दिले आहेत. शेतकऱ्यांना तक्रार करायची असल्यास डेडीकेटेड मोबाइल नंबर सुद्धा जिल्हा कृषी विभागाने दिले आहेत.
-
भावना गवळी यांची डोकेदु:खी वाढणार, ठाकरे गटाचा ‘हा’ नेता आव्हान देणार
खासदार भावना गवळी यांची डोकेदु:खी वाढणार.
ठाकरे गटाचे नेते महंत सुनिल महाराज खासदारकीसाठी इच्छुक आहेत.
मी विद्यमान खासदार भावना गवळी यांना आव्हान देणार.
उद्धव ठाकरेंनी संधी दिल्यास यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उभा राहणार.
बंजारा समाज आणि इतरही समाज माझ्या पाठीशी आहे.
आजवर भावना गवळी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाने जिंकत होत्या.
-
शेतकऱ्यांना अतिवृष्टी, अवकाळीची मदत तात्काळ द्या, ठाकरे गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
राज्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.मात्र सरकारकडून अद्यात कोणतीच मदत मिळालेली नाही.पिक विम्याचे पैसे मिळाले नाही. ही संपूर्ण मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी त्याचबरोबर शेतकऱ्यांना खरीपासाठी पीक कर्ज विनाअट, विनाशर्त उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी आज ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आल आहे.
खरिपाचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची कुठलाच प्रकारची अडवणूक होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
-
राज्याचे वातवारण खराब करण्याचा प्रयत्न- राऊत यांचा आरोप
महाराष्ट्राचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, सरकार तुमचं आहे, तुमच्या सरकारमध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवण्याची हिंमत होतेच कशी, कसलं सरकार चालवता तुम्ही, स्टेटस ठेवणाऱ्यांच्या पाठीमागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे.
आतापर्यंत औरंगजेब कुठेच नव्हता यांच्याच सरकारमध्ये तो जिवंत कसा काय झालं, किंवा त्याला जिवंत करण्याचं काम सत्ताधारी तर करत नाहीत ना अशी शंका येत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
पुण्यात जन्मलेले इवान मेनेजेस यांचे निधन
जगातील सर्वात मोठी आणि महागडी मद्य कंपनी डियाजिओचे भारतीय वंशाचे सीईओ इवान मैनुअल मेनेजेस यांचे बुधवारी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मेनेजेस यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांचे वडील मैनुअल मेनेजेस भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष होते.
-
कोतवाल भरती प्रकरणात भंडाऱ्यात चौघांविरुद्ध गुन्हा
कोतवाल भरती प्रकरणात भंडाऱ्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. 28 मे ला भंडारा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात कोतवाल भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा केंद्रावरील परीक्षेचा उमेदवार चेतन बावनकुळे यानं प्रश्नपत्रिकेचा स्क्रीन शॉर्ट व्हॉट्सअँप बाहेरील त्यांच्या साथीदारांना पाठवून परीक्षेत गैरप्रकार केला.
गैरप्रकार उघडकीस आल्याने भंडारा तहसिलदार अरविंद हिंगे यांनी याची तक्रार भंडारा पोलिसात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून चेतन बावनकुळे, राहुल बावनकुळे, सुनील घरडे या तिघांना अटक केली आहे.
-
ओडिशा ट्रेन अपघात, अजून अनेकांची ओळख पटली नाही
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताला 110 तास उलटले तरी अद्याप 83 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. ज्या 205 मृतदेहांची ओळख पटली आहे ते त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी भारतीय रेल्वेने वर्तमानपत्रात जाहिराती देऊन सर्वसामान्यांची मदत घेतली आहे. रेल्वेने एका वेबसाइटची लिंक जारी केली असून मृतदेहांचे छायाचित्र पोस्ट केले आहे.
-
नाशिकमध्ये एसीने घेतली पेट
नाशिक जिल्हा परिषद इमारतीतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशेजारी सभगृहासाठी लावण्यात आलेल्या एसी यंत्राने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी कार्यालयीन कामकाजासाठी आलेल्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांची देखील धावपळ उडाली. सतर्क कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाला संपर्क केला. त्याच वेळी काही कर्मचाऱ्यांनी फायर इंस्टींगग्यूशरच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
-
कोल्हापुरात इंटरनेट सेवा बंद
कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणण्याचे निर्देश केले आहे. यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
-
कोल्हापुरात शांतता राखा
कोल्हापुरात शांतता राखावी, शहरात शांतता निर्माण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे आवाहन केले.
कोल्हापुरातील अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
-
जेजुरी देवस्थानच्या घटनेनुसारच नियुक्त्या
जेजुरी देवस्थामधील सर्व नियुक्त्या घटनेनुसारच झाल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये काहीही गौर नाही, असा दावा नवीन विश्वस्थांकडून करण्यात आला आहे. सातही विश्वस्तांची निवड ही कायद्यानुसारच झाली आहे. नवे नियुक्त विश्वस्त हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत. तसेच नियुक्तीच्या वेळी आम्ही कुठलेही शिफारस पत्र वापरले नाही, आंदोलन करणारे काही व्यक्ती खोटी अफवा पसरवत आहेत, असे नव्या विश्वस्तांनी म्हटले आहे.
-
परभणीच्या सोनपेठेत दोन सोन्याची दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये दहशत
परभणीच्या सोनपेठेत दोन सोन्याची दुकाने फोडल्याचे समोर आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परभणीच्या सोनपेठ शहरात कार मध्ये आलेल्या चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकून दोन सोन्याची दुकाने फोडून 56 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. सोनपेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस पुढील तपास करत आहे.
-
पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री? पुणे हवामान विभागाची माहिती
दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाहणारे वारे कायम असल्याचे दिसतेय. पश्चिमेकडील वाऱ्यांच्या उंचीमध्ये वाढ होणे तसेच अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ किनार्यावरील ढगाळ वातावरणात वाढ होणे हे मान्सून दाखल होण्याचे संकेत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.
-
इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली, चार दिवसांवर असलेल्या वारीतील वारकऱ्यांचा आरोग्य धोक्यात?
चार दिवसांवर वारी आली असताना केमिकल सोडल्याने इंद्रायणी नदीचे पात्र पुन्हा एकदा फेसाळ्याचे पाहायला मिळत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान येत्या 11 तारखेला होत आहे. मात्र या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याचं कुणाला काही पडलच नाही, अशी स्थिती आळंदीतल्या इंद्रायणी नदीकडे पाहून होत आहे. चार दिवसांवर वारी आली असताना केमिकल सोडल्याने इंद्रायणी नदीचे पात्र पुन्हा एकदा फेसाळ्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचं इंद्रायणी नदीत स्नान केल्याने आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
-
सिन्नरच्या सोनांबे येथील आई भवानी मंदिरात चोरी, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील डोंगरवर असलेल्या आई भवानी मंदिरात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दानपेटी फोडून पैसे चोरतानाची संपूर्ण घटना कैद झाली. सिन्नर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा तपास करत आहे.
सोनांबे येथील डोंगरवर असलेल्या आई भवानी मंदिरात पहाटेच्या दरम्यान मंदिराचे पुजारी राणू बाबा घोडे पूजा करण्यासाठी आले असता मंदिरातील दानपेटी फुटल्याचे लक्षात येतात गावातील नागरिकांशी संपर्क साधून या चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
-
मुंबईतील वस्तीगृहात झालेल्या वीस वर्षे तरुणीच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
मुंबईतील वस्तीगृहात झालेल्या वीस वर्षे तरुणीच्या हत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. गुन्हेगारांवर पोलिसांसह शासनाचा कोणताही धाक राहिला नसून मुंबईत शिक्षणासाठी रोजगारासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली. पोलीस ऍक्टिव्हिजन आणि शासकीय निमशासकीय तसेच खाजगी महिला वस्तीगृहात महिला पोलीस पथक नेमण्यात यावे, अशी मागणीही केली.
-
पुणे लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर आता काँग्रेसचा मावळवरही दावा
राष्ट्रवादीने पुणे लोकसभा मतदार संघावर दावा केल्यानंतर आता काँग्रेसने पुणे मावळवर देखील दावा केला आहे. मावळमधून तीनवेळा राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे, त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेश नेतृत्वाकडे मागणी केली जात आहे. तर २०१९ मध्ये अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारचा मावळमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे आता या मतदारसंघात जागा वाटपावरून महाविकास आघाडीत संघर्ष पेटण्याची चिन्ह असल्याचे सांगितले जात आहे.
-
कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर पुन्हा टोळक्याचा हैदोस, खुलेआमपणे केली लुटमार
कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर पुन्हा टोळक्याचा हैदोस पाहायला मिळत आहे. कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका इसमाला खुलेआमपणे लुटल्याची माहिती समोर येत आहे. आज बुधवारी सकाळ ही घटना घडली आहे. 5 ते 6 जणांच्या टोळक्याने गोंधळ घालत टोळक्यांनी ही लुटमार केली आहे. लुटमारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर रेल्वे आणि शहर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
-
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे सिन्नर तालुक्यात आगमन, पहिला रिंगण सोहळा आज होणार
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेने श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी निघाली असून सिन्नर तालुक्यात अवघड असलेल्या पास्ते घाटातून पालखी ही लोणारवाडी येथून आज दातली येथे संध्याकाळी पहिला रिंगण सोहळ्यासाठी दाखल होणार आहे हा नयनरम्य रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील भक्तांची मोठी उपस्थिती होत असते कोरोना सारख्या महामारीनंतर दुसऱ्यांदा श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा पार पडणार आहे.
-
भंडारा शहरासह विदर्भासह मध्यप्रदेशात विविध ठिकाणी घरफोडी
भंडारा शहरासह विदर्भ आणि मध्यप्रदेशात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तीन सराईत घरफोड्यांना भंडारा एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. सोन्याच्या दागिन्यांसह दुचाकी असा सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भंडारा पोलिसांनी अनिल बोरकर (37), अक्षय गुप्ता (24), रवी माचेवार (37) या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीनं भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहे.
-
जेजुरी ग्रामस्थांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता
धर्मदाय आयुक्त कार्यालयात आज होणार सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या निवडी विरोधात ग्रामस्थांनी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती.
नवनिर्वाचित सदस्यांवर स्थगिती आणा अशी मागणी याचिकेत केली होती. याच याचिकेवर आज दुपारी धर्मदाय आयुक्त कार्यालयात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
-
मुंबई | गर्ल्स हॉस्टेलच्या बंद खोलीत तरुणीचा मृतदेह, आरोपीने संपवलं स्वतःचं आयुष्य… सर्वत्र खळबळ
मुंबईत सावित्रीबाई फुले वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या, आरोपीने देखील संपवलं स्वतःचं आयुष्य
सावित्रीबाई फुले वसतीगृहात भाजप नेते चित्रा वाघ दाखल
सावित्रीबाई फुले वसतीगृहाबाहेर पोलिसांचा कडकोट बंदोबस्त
-
कोल्हापूर | कोल्हापुरातील आंदोलनादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज
आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न
जमावबंदीनंतरही हिंदू संघटनांचा मोर्चा
कोल्हापुरात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट
हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक
आक्षोपार्ह पोस्ट करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
-
सांगली | देशातील रिलायन्स ज्वेल्समध्ये गेल्या चार महिन्यांत विविध शहरांत चार दरोडे
सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समध्ये पडलेल्या दरोड्यानंतर पोलीस तपासात माहिती समोर
सांगली पोलिसांची आठ पथके राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा येथे रवाना
दरोडेखोर देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी नेपाळमध्येही तपास यंत्रणेचं लक्ष
चारही दरोड्यांची पद्धत जवळपास एकच, त्यामुळे या दरोड्यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याची पोलिसांना शक्यता
-
कोल्हापूर | कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन
हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक
आक्षोपार्ह पोस्ट करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
-
The Kerala Story फेम अदा शर्मा हिची मोठी घोषणा; इतक्या कमी किंमतीत पाहता येणार सिनेमा
‘द केरळ स्टोरी’ सिनेमा आतापर्यंत पाहिला नसेल तर, तुमच्यासाठी ‘बेस्ट ऑफर’, अदा शर्माने केली मोठी घोषणा…
सध्या सर्वत्र अदा शर्मा फेम ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा… वाचा सविस्तर
-
डोंबिवली | दिव्या’मधील बॅनर डोंबिवलीत झळकले! बॅनर वरून भाजप नेत्यांचे फोटो गायब
ठाण्याचे माजी उपमहापौर शिंदे गटाचे पदाधिकारी रमाकांत मढवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या स्वागतासाठी लावले बॅनर
बॅनरवर शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे फोटो
भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांचाही फोटो नसल्याने चर्चेला उधाण
-
लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये गेल्या 24 तासात वेगवेगळे तीन अपघात
अपघातात दोघांचा मृत्यू तर चार जण जखमी
उदगीर शहरात बसने दिलेल्या धडकेत युवकाचा मृत्यू
तोगरी-मोड इथं टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक
नगर पालिकेसमोरील रस्त्यावर ट्रॅक्टरची ऑटोला धडक, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
-
तुमचं सरकार कायदेशीर आणि चांगलं आहे तर मग निवडणुका होऊन जाऊद्या – संजय राऊत
औरंगाबाद आमचा गड मागच्या वेळी आमच्या हातून निसटला असला तरी आम्ही तो यावेळी खेचून आणू
राज्यात सगळीकडे तणावाची स्थिती आहे
कोल्हापुरात वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे वाद झाला म्हणतात, औरंगाबादमध्ये औरंगजेबला गाडलंय
औरंगजेबाचे कोणी फोटो नाचवत असेल तर त्यांना इथे राहण्याचा अधिकार नाही पाकिस्तानमध्ये चालले जावे
मात्र निवडणुकांसाठी हे सगळं होत असेल तर चुकीचं आहे
ज्यांनी हे केलं त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे
शिंदे फडणवीस सरकारमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले जातात हे कसे काय होते, हे सरकारचे अपयश नाही का?
की हे सगळे तुम्हीच घडवून आणत आहेत का..?
डॉ कुरुंदकर यांनी पाकिस्तानला आपले गुपिते विकली हा आरएसएसचा कार्यकर्ता आहे
मग त्याच्या विरोधात मोर्चे का नाहीत
या सरकारच्या पायाखालची वाळू सरकार आहे, जनमताचा आधार नाही त्यामुळे हे घडत आहे
कर्नाटकच्या जनतेने हे सगळे डाव उधळून लावले आहेत
तेच या महाराष्ट्रात घडू शकते ही भीती सत्ताधाऱ्यांना आहे
फक्त आकडा वाढविण्यासाठी जागा वाटप नको
जिंकेल त्याची जागा या सूत्रानुसार जागा वाटप झाले पाहिजे
बेईमान गटाला मदत होईल अशा पध्दतीने जागांचा आकडा वाढवला नाही पाहिजे
18 जागी शिवसेना जिंकली तिथला आमचा मतदार कायम आहे
प्रत्येकाची एक पाऊल मागे येण्याची तयार आहे, त्यामुळे महाराष्ट्र आम्ही जिंकूच
-
नाशिक शहरात प्रथमच शाही मार्गावरून जगन्नाथ पुरीच्या धर्तीवर निघणार रथयात्रा
पंचवटीतील आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदीरात भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची स्थापना
रथयात्रेसाठी 14 फूट उंच, 6 फूट लांब रथाची बांधणी सुरू
रथ ओढण्याची संधी भाविकांना मिळणार
-
अमरावतीत वडाळी फिडरवरील वीजपुरवठा आठ तासापासून खंडित
मध्यरात्री संतप्त नागरिकांची महावितरण कार्यालयावर धाव
नागरिकांकडून कार्यालयाची तोडफोड
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर
बाळासाहेब चांदेरेंच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास लावणार हजेरी
नुकताच बाळासाहेब चांदेरे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केलाय
आज चांदेरे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री येणार
-
कोल्हापुरात हिंदुत्ववाधी संघटनांकडून आंदोलन सुरु
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यानं वाद
हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक
-
वर्ध्यात सेवाग्राम एमआयडीसी परिसरातील भंगार डेपोला आग
आगीत मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जळून खाक
अग्निशामक दलाच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू
अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
-
कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत तोडगा निघणार?
केंद्र सरकार लवकरच कुस्तीपटूंशी चर्चा करणार
कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे भाजप पक्षाला नुकसान
अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आंदोलनाबाबत केंद्र सरकारच्या हालचाली
भाजप पक्षातील महिला खासदारही आंदोलनाबाबत नाराज असल्याची माहिती
आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीपटूंच्या आंदोलनाची चर्चा झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लवकरच तोडगा काढला जाणार
-
नवी मुंबईच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत दाखल
थोड्या वेळात वर्षा निवासस्थानातून स्वच्छ मुंबई व्हॉट्सअप हेल्पलाईनचा करणार शुभारंभ
-
कोल्हापुरातील शिवाजी चौकात हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न
निषेध रॅली काढल्यावरून सुरु आहे चर्चा
-
नगरमध्ये 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 350 जोडप्यांच्या हस्ते महाआरती
साडेतीनशे जोडप्यांनी हातात मशाल घेऊन महाआरतीत सहभाग नोंदवला
आकाशात रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन
-
जळगावमध्ये 143 गावांमधील एक हजार हेक्टरवरील केळीचे नुकसान
कृषी विभागाकडून झालेल्या नुकसानीची माहिती
1786 शेतकऱ्यांना वादळाचा फटका
वादळात 1200 हेक्टरवरील फळपिकांचे मोठे नुकसान
-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली हवाई पाहणी
कामाची सद्यस्थिती जाणून घेतली
विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम तसेच इतर कामांची पाहणी केली
-
चर्चगेट वसतिगृहातील मुलीची हत्या प्रकरण
भाजपच्या आमदार मनीषा चौधरी आज मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात भेट देणार
सकाळी 11 वाजता महिला मंडळासह मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात जाणार
-
चर्चगेटमधील घटना दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस
पोलिसांचा सखोल तपास सुरु
-
अडीच वर्षांची मुलगी पडली बोअरवेलमध्ये
मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील मुंगवली गावातील घटना
शेतात खेळत असताना बोअरवेलमध्ये पडली मुलगी
मुलीला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु
खडकाळ जमिनीमुळे बचावकार्यात अडथळे
सध्या मुलगी 50 फूट खाली अडकली आहे
तिला सतत ऑक्सिजन दिला जात आहे
-
फतेहपूरकडे येणारी कार आणि सालासरकडे जाणारा ट्रेलर यांच्यात धडक
सकाळी साडेसहाच्या सुमारास झाला अपघात
अपघातात कारमधील 4 जणांचा मृत्यू
-
पुढील 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता अधिक वाढणार
वादळ गोव्यापासून 890 किलोमीटर नैऋत्याकडे
वादळामुळे 8 जून पासून शनिवार 10 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यामधील समुद्र खवळलेला राहणार
-
राज्य आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल निर्णय घ्यावा लागेल- शरद पवार
आज शेतकऱ्याच्या घरात 50% पेक्षा जास्त कापूस
निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल
राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठिशी
हे सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील नाही
शरद पवार यांची पत्रकार परिषदेत टीका
-
दिल्लीशिवाय राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, शरद पवारांचा टोला
राज्याचे निर्णय देशातील नेते चालवतात अशी लोकांमध्ये चर्चा- शरद पवार
-
देशात भाजप विरोधात ट्रेंड आहे- शरद पवार
केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात भाजप नाही
हाच ट्रेंड लोकसभेपर्यंत राहिला तर वेगळं चित्र असेल हे सांगायला ज्योतिषची गरज नाही
शरद पवार यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य
-
संभाजीनगर | शरद पवार यांची पत्रकार परिषद
मोबाईलवर मॅसेज पाठवला म्हणून रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणं योग्य नाही- शरद पवार
आज सत्ताधारी त्याला प्रोत्साहन देत असल्याचं शरद पवारांचं वक्तव्य
सत्ताधारी पक्षाचे नेते यात सहभागी होतं आहेत, हे घडवलं जातंय- शरद पवार
नगरमध्ये औरंगजेबचा फोटो दाखवला त्यासाठी पुण्यात मोर्चा काढण्याची काय गरज?
शरद पवारांचा सवाल
-
गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात बदलीचा बनावट मेल पाठवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला अटक
पत्नीच्या बदलीसाठी स्वतःच पतीने सायबर कॅफेमधून पोलीस अधीक्षकाच्या नावाने बदलीचे बनावट आदेश काढले
पत्नी गडचिरोली पोलीस विभागांतंर्गत जांबिया गट्टा पोलीस स्टेशनमध्ये अंमलदार पदावर तैनात
-
दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये
दहावी आणि बारावीच्या जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर
18 जुलैपासून सुरू होणार परीक्षा
परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या वेबसाइटवर उपलब्ध
-
दिल्ली | जामियानगर इथल्या एका कारखान्यातील लाकडी पेटीत आढळले दोन मुलांचे मृतदेह
सात आणि आठ वर्षांच्या मुलांचे मृतदेह
5 जूनपासून मुलं होती बेपत्ता
पोलिसांचा पुढील तपास सुरू
-
बालासोर रेल्वे अपघाताचा सीबीआय तपास
सीबीआयने गुन्हा दाखल करून तपासाला केली सुरुवात
सीबीआयच्या 10 जणांच्या पथकाकडून घटनास्थळी रुळांची तपासणी, सिग्नल कक्षाची पाहणी
-
नाशिक | महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांवर अनधिकृत धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी
अतिक्रमण निर्मूलन विभाग लवकरच मोहीम राबविण्याच्या तयारीत
नव्याने काही धार्मिक स्थळे उभारली का, याची घेतली जाणार माहिती
महापालिकेने अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासाठी हालचाली सुरू केल्याने राजकारण पेटण्याची शक्यता
-
दक्षिण मुंबईत सापडलेल्या दोन मृतदेहांमुळे गूढ वाढलं
मुंबईतील एका हॉस्टेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी एका तरुणीचा मृतदेह आढळला.
या तरुणीच्या गळ्याभोवती दुपट्यासारखा एक कपडा गुंडाळलेला होता.
तपास सुरू असतानाच पोलिसांना आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे.
त्यामुळे या दोन्ही मृत्यूमागचं गूढ वाढलं आहे. वाचा सविस्तर….
-
फॅक्टरीत सापडले दोन लहान मुलांचे मृतदेह
दिल्लीच्या जामिया नगर येथील एका फॅक्टरीतून दोन लहान मुलांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. लाकडाच्या एका पेटीत हे मृतदेह होते. 5 जूनपासून ही मुलं बेपत्ता होती. पुढील तपास सुरु आहे.
-
नेरुळ रेल्वे स्टेशनजवळ लागलेल्या आगीवर नियंत्रण
नेरूळ स्लायडिंगच्या बाजूला झाड व पालापाचोळ्याला आग लागली होती.
त्यामुळे रेल्वे एकाच ठिकाणी चक्क वीस मिनिटं थांबवून ठेवण्यात आली होती.
आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे.
पनवेल व बेलापूर पासून मुंबईला जाणाऱ्या गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
-
नाशिकमधील लाचखोर अधिकाऱ्याची कारागृहात रवानगी
– नाशिकमधील लाचखोर मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांची कारागृहात रवानगी झाली आहे.
– पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
– धनगर यांच्याकडे 1 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता आढळून आली.
– 50 हजार रुपयांची लाच घेताना सुनीता धनगर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते,
-
ट्रक आणि कारची टक्कर
राजस्थानच्या फतेहपूर भागात सालासार-फतेहपूर रोडवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला.
-
अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती
गेल्या तीन तासात चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका झाला आहे.
पुढील १२ तासात त्याचा वेग आणखी वाढेल. काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही.
राज्यात 4 जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे
-
WTC Final 2023 IND vs AUS | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन होणार का?
टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही महिन्यांपासून ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, तो आजचाच दिवस. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून म्हणजेच 7 जूनपासून ते 11 जून पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना रंगणार आहे. वाचा सविस्तर….
-
नेरुळ रेल्वे स्टेशनजवळ आग
नेरूळ स्लायडिंगच्या बाजूला झाड व पालापाचोळ्याला आग लागली आहे. त्यामुळे रेल्वे एकाच ठिकाणी चक्क वीस मिनिटं थांबवून ठेवण्यात आली आहे.
ज्या ठिकाणी आग लागली, त्या बाजूला रेल्वेचे पॉईंट्स देखील आहेत.
सदर घटनास्थळी अग्निशमक दल व रेल्वेचे पथक आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे.
त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.
-
अमेरिकेत गोळीबार
अमेरिकेत व्हर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीजवळ गोळीबाराची घटना घडली आहे.
एकूण 7 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
शाळेच्या पदवीदान समारंभाच्यावेळी घटना घडली. दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
देहूत वारीच्या कामांना वेग, स्वच्छ वारी निर्मल वारी अंतर्गत 1 हजार फिरते शौचालये देहूत दाखल
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा 3 दिवसांवर आल्याने देहूत कामांना वेग आलाय
महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होण्यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाकडून घेण्यात येत आहे
वारकरी दाखल होण्यापूर्वीच तब्बल 1 हजार शौचालय देहू नगरीत दाखल झाले आहेत, त्याची जोडणी सध्या सुरू आहे.
देहू नगरीत 13 ठिकाणी ही शौचालय उभारली जाणार आहेत. त्यामुळे स्वच्छता आणि आरोग्य याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे
-
हिंदुत्ववादी संघटनाच्या बंदमुळे कोल्हापूर जिल्ह्यात आज बंदी आदेश लागू
साक्षी भारी स्टेट्सवरून काल झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश लागू केला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आज सकाळी 10 वाजता शिवाजी चौकात जमणार असून निदर्शने करणार आहेत.
-
नगरच्या समनापूर येथे दोन गटातील दगडफेक प्रकरणी 16 जणांना अटक
संगमनेर शहरातून काल निघालेल्या मोर्चानंतर समनापूर येथे दगडफेक झाली होती
संगमनेर शहर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत 16 जणांना अटक केली
आज आरोपीना न्यायालयात हजर केले जाणार आहे
समनापूर येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात नवी मुंबई विमानतळ कामाचा आढावा घेणार
नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळ येथील टर्मिनल इमारत आणि धावपट्टी साईटला भेट देत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मॉडेल रुमची पाहणी करणार आहेत.
नवी मुंबई विमातळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होणार असल्याचे विकासकांनी स्प्ष्ट केले आहे.
उर्वरित टप्प्यांचा विकास हा आगामी 15 वर्षांमध्ये प्रवाशांची वाढती संख्या पाहता टप्प्या टप्प्याने केला जाणार आहे.
-
पुणे जिल्ह्यात कर आकारणी आता होणार ऑनलाईन. पुणे जिल्हा परिषदेकडून ई – चावडी प्रकल्पाला सुरुवात
ई – चावडी प्रकल्प अंतर्गत नागरिकांना भरता येणार महसूल
जिल्ह्यातील 537 गावांमध्ये कर आकारणी ऑनलाईन पद्धतीने होणार
तर जुलै महिना अखेरपर्यंत जिल्ह्यातील सर्व 1913 गावांमधील कर आकारणी ऑनलाईन करण्याची योजना
ऑनलाइन कराकारणीमध्ये पुणे जिल्ह्यातील महसुलात 30 ते 35 टक्क्यांनी होणार वाढ, जिल्हा प्रशासनाचा अंदाज
-
येत्या 10 जून पासून अग्नीवीर सैन्य भरती सुरू होणार, नागपुरात होणार भरतीची प्रक्रिया
6 हजार 354 युवक देणार शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी
भारतीय सेनेने गेल्या वर्षीपासून अग्नीवीर भरती सुरू केली
यंदाचे हे दुसरे वर्ष असून 10 जून पासून नागपुरातील विभागीय क्रीडा संकुलात भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे
बुलढाणा वगळून विदर्भातील 10 जिल्ह्यातील युवक भरतीत सहभागी होणार आहेत
-
तिरुपती बालाजी मंदिरासाठी काहीही कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
तिरुपती बालाजी मंदिरामुळे सर्वांना सुखशांती लाभेल, सर्वांना दर्शन घेण्याचा लाभ मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही सर्व सहकार्य करू, बालाजीच्या आशीर्वादानेच आम्ही काम करत आहोत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन.
महाराष्ट्रात मंदिर होत आहे ही महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे, मुख्यमंत्र्यांचं विधान.
तिरुपती बालाजीचं मंदिर उभारण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं योगदान दिलं, फडणवीस यांनीच दिल्लीतून सर्व परवानग्या आणल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं उद्घाटन
उलवे नोडमध्ये श्री व्यंकटेश मंदिर उभारण्यात येणार आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विधीवत पूजा आणि मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौतम सिंघानिया, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
Published On - Jun 07,2023 7:10 AM