Maharashtra Breaking Marathi News Live | संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, विधानसभा अध्यक्ष अवमान प्रकरणी संजय शिरसाट यांच्याकडून हक्कभंग
Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.
मुंबई : कर्नाटकातील जनतेने काँग्रेसला स्पष्ट कौल दिला आहे. पण अजूनही तिथे मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. डीके शिवकुमार काल रात्री दिल्लीला जाणार होते. पण अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला. त्यांनी प्रकृती अस्वास्थाच कारण दिलं. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसतायत. तेच महाराष्ट्रातही या विधानसभा निवडणूक निकालाचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज मुंबईत येणार आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिवसेनेत प्रवेश
पुणेः
– जिल्हा प्रमुखांच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे गटाला धक्का
– उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकरांचा शिवसेनेत प्रवेश
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला पक्ष प्रवेश
– यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे यांचीही उपस्थित
-
विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
सांगलीःविटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यातविटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यातसांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विनायक औंधकर ताब्यातऔधकर यांनी बांधकाम ठेकेदाराकडून इमारत बांधकाम परवानगीसाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती .दोन लाखांची लाच घेताना विटा नगरपालिकेचे औधकर याना रंगेहात पकडले -
-
सरकारवर यापूर्वी टीका झाली नाही का? : संजय राऊत
सरकार विरोधी बोलणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार
सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते
गुन्हा दाखल केला करू द्या, पण न्यायालयाचे आभार
सरकारच्या मनात होत तेच पोलिसांनी केलं
सरकारवर यापूर्वी टीका झाली नाही का?
-
दिल्लीहून मुंबईत, आसपासच्या परिसरातील घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांना विक्रोळीत पोलिसांकडून अटक
विक्रोळी पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या तीन आरोपींना केली अटक
घरफोड्या करून चार लाख 13 हजारांचा मुद्देमाल केला लंपास
माहितीदारांच्या आधारे पोलिसांनी या 3 जणांना घेतलं ताब्यात
-
संजय राऊत सरकार पडत नसल्यामुळे संतत्प झालेत : भरत गोगावले
सरकार पडत नसल्यामुळे राऊत देवेंद्र फडणवीसांवर बोलत आहेत
संजय राऊतांनी पाण्यामध्ये ठेवलेले देव वरती येत नाहीत
राऊतांना वेळ आल्यावर कळेल की नक्की पायपुसनी आहे की हात पुसणी
-
-
राज्यात काही अनैसर्गिक आघाडी, ठाकरेंच्या काळात कुठलीही दंगल नाही : संजय राऊत
राज्यात काही अनैसर्गिक आघाडी आहे
उद्धव ठाकरे यांच्या काळात कुठलीही दंगल नाही
कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात दंगल झाली
राज्य अस्थिर आणि तणाव निर्माण करुन मत माघायची
सरकारला सर्व माहिती आहे पण कारवाई केली जात नाही
कर्नाटक आणि मणिपूरमध्ये तुमचं राज्य आहे
निवडणुकीपूर्वी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे
-
संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर
नाशिकातील वक्तव्याप्रकरणी मिळाला दिलासा
नाशिकमधील वक्तव्य आले होते अंगलट
या वक्तव्यावरुन झाला होता वाद
-
प्रशांत दामले मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी
पेढे भरवत चाहत्यांनी केला जल्लोष
राज्य सरकारने नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी आर्थिक तरतूद केली आहे
नाट्यपरिषद आणि सर्व शाखा आर्थिक सक्षम करण्यावर भर
सारखं राज्य सरकारकडे आर्थिक मदत मागणे योग्य नाही-दामले
-
दंगलीचं लोण गृहविभागाने थांबवावे
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण
गृहविभागाने घटनांच्या तपशीलात जावे
याप्रकरणी तातडीने योग्य पावले टाकावीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब आहे. गृह विभागाने या घटनांच्या तपशीलात जाऊन ताबडतोब योग्य पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील यांनी केली आहे. प्रदेश कार्यालय, मुंबई येथे आज जयंतराव…
— NCP (@NCPspeaks) May 16, 2023
-
कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेचे गुऱ्हाळ
मुख्यमंत्री पदावरुन दोन नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच
डी. के. शिवकुमार नवी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या भेटीला
सिद्धरमय्या पण मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये
मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी डी. के. शिवकुमार
-
साताऱ्यात महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
गोकुळ हेळवाक, कोयनानगर येथे उभारणार केंद्र
या केंद्रासाठी 38.93 हेक्टर जागा लवकरच उपलब्ध करुन देणार
सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी ३८.९३ हेक्टर आर जागा सातारा जिल्हा पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यास आज… pic.twitter.com/xIK5ECuJQp
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
-
जयंत पाटील यांनी मागितला ईडीकडे वेळ
ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार
8-10 दिवसांचा मागितला वेळ
ईडीकडे हजर राहण्यासाठी मागितला वेळ
-
राशन कार्ड नाही हे तर स्मार्ट कार्ड
त्रिपुरा करणार देशात प्रयोग
मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिली माहिती
ठेकेदारांच्या कमिशनमध्ये वाढीवर विचार
#WATCH भविष्य में राशन कार्ड को स्मार्ट कार्ड बनाया जाएगा। बहुत सारी समस्याएं आ रही हैं। डीलरों के कमीशन में बढ़ोत्तरी करने की इच्छा है। जो सामान दिए जाते हैं उसे भी बढ़ाने की बात भी हो रही है: रोजगार मेले के अवसर पर त्रिपुरा के मुख्यमंत्री माणिक साहा, अगरतला pic.twitter.com/OiZATRiVXM
— ANI_HindiNews (@AHindinews) May 16, 2023
-
छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज झाली बैठक
निवडणुकीची तयारी, संघटनात्मक बदल, धोरणावर झाली चर्चा
कर्नाटक निवडणुकीनंतर देशभरात विरोधकांनी कसली कंबर
मुख्यमंत्री निवास पर आज हमने बैठक की है। जिन लोगों को पार्टी में आना था, उन सभी को बैठक की जानकारी थी। आगे चुनाव की तैयारियां, संगठन का काम, कार्यकर्ताओं का मनोबल बनाना, लोगों के काम की तरफ और ध्यान देना, बचे हुए कामों को जल्द से जल्द पूरा करने पर चर्चा हुई: छत्तीसगढ़ के… pic.twitter.com/rZ0iVKQ52P
— ANI_HindiNews (@AHindinews) May 16, 2023
-
मी अभिनंदन करायला आलोय – उदय सामंत
मी विश्वस्त म्हणून होतोहे त्यांच्या कतृत्वावर आले आहेतलोकशाहीत कोणालाही पाठिंबा देण्याचा अधिकार असतोपवार ह्यात विश्वस्त आहे. त्यामुळे त्यांची भेट घेतीलमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतीलनाट्यकर्मींचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न होतीलमागच्या 5 वर्षात जो सावळा गोंधळ झाला तसा होणार नाही१०० वं नाट्य संमोलन कुठे करायचं हे नियामक मंडळ ठरवेल -
जबरदस्तीचे धर्मांतरण आणि लव जिहादविरोधात कारवाई
तपास करुन दोषींविरोधात कारवाईचा इशारा
मध्यप्रदेशमध्ये अनेक प्रकरणे समोर आल्याने राज्य सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले कारवाईचे आश्वासन
-
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश
मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण जाहीर
अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने दिलेल्या प्रस्तावात सादर केलेला मुद्दा
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र
-
नितीन गडकरी यांना फोन कॉलवर धमकी
गडकरी यांना रात्री दिल्ली या त्यांच्या निवासस्थानी फोन कॉलवरून धमकी देण्यात आली होती
धमकीनंतर गडकरी यांची दिल्ली पोलिसांना माहिती
फोन कॉलची चौकशी सुरू असल्याची दिल्ली पोलिसांची माहिती
या अगोदर देखील गडकरी यांना धमकी देण्यात आलेल्या आहेत
सतत गडकरी यांना मिळणाऱ्या धमक्यांचे कारण काय?
पोलिसांचा तपास सुरू
-
रोजगार कुंभमेळाव्यात अनेकांचे रोजगाराचे स्वप्न साकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तरुणांना दिले नियुक्तीपत्र
71,000 जणांना दिले नियुक्तीपत्र
रोजगार मेळ्यात पात्र तरुणांच्या आनंदाला उधाण
दहा लाख तरुणांना रोजगार देण्याचा केंद्राचा संकल्प
PM @narendramodi distributed about 71,000 appointment letters to newly inducted recruits under #RozgarMela
Read here: https://t.co/Al5h7iFoqg
Snippet from the event? 1/4 pic.twitter.com/RdsDsl4XHh
— PIB India (@PIB_India) May 16, 2023
-
आयटीआय कंत्राटी निदेशकांना मोठा दिलासा
निदेशकांचे मानधन आता 25 हजार
यापूर्वी मिळायचे मानधन 15 हजार
इतर कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढीची अपेक्षा
मंत्रिमंडळाने आज घेतला निर्णय
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय#मंत्रिमंडळनिर्णय#CabinetDecisions pic.twitter.com/JlUhTLsENl
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 16, 2023
-
आशिष देशमुख यांचा आता सावनेर मतदार संघावर दावा
सुनील केदार यांच्या विरोधात दंड थोपटणारसावनेर मतदारसंघात केदार विरुद्ध देशमुख -
पुण्यात फेरीवाल्यांकडून महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाण
अतिक्रमण विभागाकडून कारवाई सुरू असताना केली मारहाण
पुण्यातील ढोले पाटील रोड परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू
याप्रकरणी महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
-
प्रदीप कुरुलकरला 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
कोठडीत वेगळी काही सुविधा मिळणार नाही
औषध मात्र देऊ शकता
कोर्टाच्या सूचना
-
प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश
म्हाडाच्या बृहन्मुंबई मधील ५६ वसाहतीतील संस्थाकडील सन १९९८ ते २०१८ या कालावधीमधील वाढीव सेवाशुल्क माफ करण्याबाबत शासनाकडून परिपत्रक जारी
प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नांना यश
म्हाडाच्या बृहन्मुंबईमधील ५६ वसाहतील संस्थांचे सन १९९८ ते २०१८ या कालावधीमधील थकीत सेवाशुल्कासंदर्भात म्हाडाने सादर केला होता प्रस्ताव
२२.३.२०२१ अन्वये “अभय योजना” लागू करून हा शुल्क माफ करण्यात येणार
वाढीव सेवाशुल्काची रक्कम रु.२६४ कोटी इतकी आहे..
-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अध्यक्षपद
अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले
उपाध्यक्षपदी नरेश गडेकर
-
की ही केवळ राजकीय मागणी आहे?- खासदार अमोल कोल्हे
पुणे जिल्ह्याची विभागणी करून शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या जीवनमानावर काही फरक पडणार आहे का? की ही केवळ राजकीय मागणी आहे?
पुणे जिल्ह्याची विभागणी करण्याच्या मागणीला धरून शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला उपस्थित प्रश्न
-
गोंदिया: गोंदियात सतत वाढत असलेला पाराने दुपारी सिग्नल बंद…
चालकांना उन्हाच्या चटक्याने दिलासा
सूर्यदेव आग ओकतोय
जिल्ह्याचा पारा 43 अंशांवर
दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान ऊन मोठ्या प्रमाणात असल्याने गोंदिया शहरातील सिग्नल दोन तास बंद असणार
आणखी पारा वाढल्यास सिग्नल बंद ठेवण्याचे वेळ वाढविण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी सांगितले
-
पुण्यात अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण
– पुण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना अतिक्रमण विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे.
– अतिक्रमण विभागाचे निरीक्षक आणि सुरक्षारक्षक यांना मारहाणीत करण्यात आली आहे.
– ढोले पाटील रोडवर कारवाई करण्यासाठी हे दोघे गेले असता फेरीवाल्यांनी त्यांना मारहाण केली.
-
अज्ञात व्यक्तीने केली ४ हजार केळीच्या झाडांची कत्तल
– नंदुरबारच्या ब्राह्मणपुरीमध्ये ४ हजार केळीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
– अज्ञात व्यक्तीकडून केळीची नासधूस करण्यात आली.
– प्रमोद पाटील आणि भीक पाटील असे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
-
राज्यपाल यांचा कुलगुरूंना इशारा, निकाल लावण्यास विलंब झाल्यास जबाबदार धरू
– विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत लावण्याचे बंधन आहे.
– मात्र, बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत.
– विद्यापीठांच्या निकालासोबत विद्यार्थ्यांचे भवितव्य निगडित आहे. त्यामुळे सर्व विद्यापीठांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
– निकाल लावण्यास विलंब झाल्यास थेट कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल, असा इशारा राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील कुलगुरुंना दिला आहे.
-
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, विधानसभा अध्यक्ष अवमान प्रकरणी संजय शिरसाट यांच्याकडून हक्कभंग
– संजय राऊत यांनी चॅनलच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सामना पेपरच्या माध्यमातून अनेक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
– नाशिकला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हे सरकारच वैध नाही. याचे आदेश मानू नका असे म्हणाले.
– दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष हे सर्व पक्ष फिरून आलेले आहेत. आमच्याकडे वकील करत होते. त्यांना याच्यातले काही कळत नाही किंवा त्याने चुकीचा निर्णय दिला तर आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असे म्हणाले.
– संजय राऊत यांनी जे काही वक्तव केले ते खऱ्या अर्थानं हक्कभंग झाल्याचे मला वाटतं त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
– विधानसभा अध्यक्षांना काही कायदेशीर अधिकार आहे. विधानसभा एक कायदे बनवणारे मंडळ समजलं जातं. त्याचे अध्यक्ष आहेत.
– अध्यक्ष्याच्या निर्णयाला चॅलेंज करण हा भाग वेगळा. परंतु, त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही हे माझं मत आहे.
– विधानसभा अध्यक्ष हा कोणत्या एका पक्षाचा नसतो. विधानसभा अध्यक्षांनी अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर ते पक्षाच्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रममध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. असे आमदार संजय शिरसाट म्हणाले.
-
काँग्रेसचे सर्व माजी मुख्यमंत्री निघाले दौऱ्यावर
– काँग्रेसचे राज्यातील सर्व माजी मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर निघणार आहेत.
– काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण हे तिन्ही माजी मुख्यमंत्री लवकरच सोलापूरचा दौरा करणार आहेत.
– 21 मे रोजी सोलापुरामध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत.
– यावेळी काही नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. त्यानंतर हे माजी मुख्यमंत्री दौरा करणार आहेत.
-
नवाब मलिक यांच्या जमीन अर्जावर आता जुलैमध्ये सुनावणी
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर लवकर सुनावणीला घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
त्यामुळे आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.
-
त्रंबकेश्वर मंदिरातील घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
– त्रंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांकडून बळजबरीने शिरण्याचा कला प्रयत्न झाला.
– या घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.
– सदर घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
-
दबावाखाली निर्णय घेणार नाही – राहुल नार्वेकर
– ज्यावेळेला आपण भाष्य करत असतो आणि ते भाष्य आपण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल करत असतो त्यावेळेला जबाबदारी पूर्वक वक्तव्य करणे अपेक्षित असते.
– पण, अशी अपेक्षा काही लोकांकडून ठेवणं व्यर्थ आहे. त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करणं किंवा त्यांनी दिलेल्या भाषेला महत्त्व न देणे हे लोकशाही आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनिंगसाठी महत्वाचे ठरेल.
– आपण त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ असे ज्या लोकांना वाटतं त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा गैरसमज असेल. अध्यक्ष कधीही दबावाखाली निर्णय घेणार नाही असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
-
राज्यातील हिंसाचाराच्या घटनांनंतर छत्रपती संभाजी नगरात पोलिसांकडून रेड अलर्ट..
छत्रपती संभाजी नगर
राज्यातील हिंसाचाराच्या घटनांनंतर छत्रपती संभाजी नगरात पोलिसांकडून रेड अलर्ट..
छत्रपती संभाजी नगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलर्ट केला जारी..
शहराच्या सुरक्षेसाठी आणि खबरदारीचे उपाय म्हणून एस आर पी च्या दोन तुकड्या तैनात..
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद होण्याच्या वाढल्या घटना..
येणाऱ्या काळात पोलिसांनी अलर्ट राहावे अशा पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या सूचना..
-
घाईत चुकीचा निर्णय घेतल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल – राहुल नार्वेकर
घाईत चुकीचा निर्णय घेतल्यास लोकशाहीसाठी घातक ठरेल. 16 आमदारांच्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार – राहुल नार्वेकर
-
जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
दोन्ही गटाचे सदस्य निवडणुकीसाठी बाजार समितीमध्ये दाखल
थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रियेला होणार सुरुवात
राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने चुरस वाढली
खासदार सुजय विखे गटाचे दोन समर्थक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पॅनल मधून आले आहेत निवडून
हे दोन समर्थक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष
-
मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक
मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक
राहुल गांधी , के सी वेणूगोपाल, खरगे यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक
आज रात्रीपर्यंत मुख्यमंत्रीपदावर तोडगा काढला जाणार
डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे दोन्ही नेतेही राजधानी दिल्लीत दाखल
दरम्यान याबाबतचा आढावा घेतलाय आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी
-
माझ्याकडे 54 आमदारांविरोधात 5 याचिका – राहुल नार्वेकर
माझ्याकडे 54 आमदारांविरोधात 5 याचिका. लवकरच निर्णय घेणार. ठाकरे गटाच कोणतही निवेदन माझ्याकडे आलेलं नाही – राहुल नार्वेकर
-
राजधानी दिल्लीत धुळीचे वादळ; नागरिक त्रस्त
राजधानी दिल्लीत धुळीचे वादळ; नागरिक त्रस्त
नवी दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील लोकांना मंगळवारी प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागला.
सकाळी सहा वाजण्यापासून सुरु झालेले धुळीचे वादळ दिवसभर कायम होते.
धुळीपासून वाचण्यासाठी लोकांना मास्कचा आधार घ्यावा लागला.
इंदिरा गांधी ऑतरराष्ट्रीय विमानतळावर दृष्यता 1100 मीटरपर्यंत कमी झाली होती.
दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळपासूनच हवेत धूळ आहे.
या पसरलेल्या धुळीच्या चादरीमुळे हवेतील दृश्यमानताही बरीच कमी झाली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन दिवस हीच स्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
तसेच दिल्ली IMD चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार.
दिल्लीतील हवेतील धूळ आणि दृश्यमानता अत्यंत कमी आहे. तीन दिवस हवेत धूळ काय राहणार आहे.
हे धुळीचे वादळ राजस्थानातून येत असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
-
अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाने माझ्याकडे दिलाय – राहुल नार्वेकर
संविधानिक शिस्त पाळत कोर्टाने विधिमंडळाकडे अधिकार दिला. अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार कोर्टाने माझ्याकडे दिलाय – राहुल नार्वेकर
-
जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
दोन्ही गटाचे सदस्य निवडणुकीसाठी बाजार समितीमध्ये दाखल
थोड्याच वेळात निवडणूक प्रक्रियेला होणार सुरुवात
राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने चुरस वाढली
खासदार सुजय विखे गटाचे दोन समर्थक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पॅनल मधून आले आहेत निवडून
हे दोन समर्थक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष
-
महामार्गावरील दुरूस्तीच्या कामामुळे कसारा घाटात वाहतूक कोंडी
महामार्गावरील दुरूस्तीच्या कामामुळे कसारा घाटात वाहतूक कोंडी.
अँकर : मुंबई -नाशिक महामार्गावरील कसारा घाटात खचलेल्या रस्त्याची दुरूस्ती करण्याचे काम चालु असल्याने मुबंई कडुन नाशिक कडे जाणाऱ्या लेनवर नेहमीच वाहतूक कोंडी होत असुन वाहनचालकांना नाहक ञास होत आहे.
-
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आजा यांनी मुंबई उपनगरातील नाल्यांना भेट दिली.
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आजा यांनी मुंबई उपनगरातील नाल्यांना भेट दिली.आशिष शेलार म्हणाले की, सर्व आमदार, खासदार, नगरसेवकांसह त्यांनी मुंबई उपनगरातील नाल्यांना भेटी दिल्या आहेत, नाले सफाईवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम भाजपकडून केले जात आहे, इतर पक्षाचे लोक अद्याप एसीमधून बाहेर पडलेले नाहीत.अद्याप 100% काम झालेले नाही, अजूनही बरेच नाले सफाईचे काम बाकी आहे, -
शेवगाव दंगल प्रकरण
शेवगाव दंगल प्रकरण
-आज काही दुकाने उघडत आहे..
-सध्या तिथे शांतता आहे..
-पोलीस कुणालाही सोडणार नाही..
-कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल..
-
त्र्यंबकेश्वर मंदिर जमावाकडून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न प्रकरण
-त्र्यंबकेश्वर मंदिर जमावाकडून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न प्रकरण*-त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू**-नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून**-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वरिष्ठ अधिकारी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल* -
वसई मांजरी ने सशाच्या पिलांची केली शिकार..
वसई:- वसई मांजरी ने सशाच्या पिलांची केली शिकार.. मांजरीच्या शिकारीचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहेवसई च्या वाघोली सोज आळी मधील एका घराच्या आवारातील ही घटना आहे.दोन सासाची पिल पाळलेली होती. तर शिकारी मांजर ही त्याच परिसरात वावरणारी आहे..सासाचे पिलू पहाताच तिने त्याच्यावर झडप टाकून त्याची शिकार केली आहे. -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक
आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये भरीव वाढ , अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय ,इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ
(उद्योग विभाग)
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण
व
(सामाजिक न्याय) ———————-
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले
-
मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय
मंत्रिमंडळ बैठक: संक्षिप्त निर्णय
दिनांक: १६ मे २०२३
आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये. भरीव वाढ. (कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभाग)
अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय (पदुम विभाग)
इले्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ
(उद्योग विभाग)
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण (सामाजिक न्याय) ———————-
सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले
-
पुणे जिल्हातील थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून..
– पुणे जिल्हातील थोपटेवाडी येथे 50 वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून खून.. पाझर तलावाच्या बाजूला मृत देह दिला होता फेकून..
– पुण्यातील पुरंदर तालुक्यातील थोपटेवाडी येथे एका पन्नास वर्षीय महिलेचा दगडाने ठेचून निर्घृनपणे खून केल्याची घटना समोर आलीय… यासंदर्भात या महिलेच्या जावयाने जेजुरी पोलिसात सोमवारी रात्री उशिरा फिर्याद दिलीय. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजलेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली असून… थोपटेवाडी येथील पाझर तलावाच्या बाजूला या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करण्यात आल्याची माहिती जेजुरी पोलिसांच्यावतीने देण्यात आलीय. सातारा जिल्ह्यातील कापडगाव येथील ही महिला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलय…
-
केळी पिकाला उन्हाचा फटका, इतर पीकांसहीत बागा सुकल्या, बळीराजा पुन्हा संकटात
केळी पिकाला उन्हाचा फटका, इतर पीकांसहीत बागा सुकल्या, बळीराजा पुन्हा संकटात
जळगाव जिल्हा हा सध्या हॉट जिल्हा म्हणून सध्या ओळखल्या जात आहे.
45 च्या वर सेल्सिअस तापमानाचा पारा पार केला असून उष्णतेच्या कडाक्याने नागरिक हैराण झाले आहेत.
त्यातच जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक मानल्या जाणाऱ्या केळी पिकालाही उष्णतेचा फटका बसत आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा केळी सह इतर पिके बागा सुकायला लागली आणि बळीराजा पुन्हा संकटात
-
नंदुरबार | शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे 4 हजार केळीचा झाडांची कत्तल…..
अज्ञात व्यक्तीने केळीची बाग केली उध्वस्त….
प्रमोद पाटील आणि भिका पाटील या शेतकऱ्यांच्या शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान….
शहादा पोलीस स्टेशनला अज्ञात टोळक्यांविरोधात गुन्हा दाखल……
-
पुणे | महापालिका अधिकाऱ्याची अरेरावी, माधव जगतापांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद,
महापालिका उपायुक्त माधव जगतापांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद…
अतिक्रमण विरोधी कारवाई करतांना रस्त्यावरील स्टॉल पायाने लावलेत उडवून…
फर्ग्युसन रोडवरील कारवाई करतांनाचा व्हिडीओ समोर..
याप्रकरणी जगतापांच्या विरोधात महापालिका आयुक्तांकडे तक्रार…
-
कोल्हापूर | माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाभियोग नेमा
ठाकरे गट राष्ट्रपतींकडे करणार मागणी
कोल्हापुरातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांची माहिती
अनिल देसाई यांच्या कार्यालयातून लवकरच मागणीचे पत्र राष्ट्रपतींकडे जाणार
12 आमदारांच्या नियुक्तीला भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विलंबाबाबत सुनील मोदी यांनी घेतली होती उच्च न्यायालयात धाव
-
पुणे | भाजपा आखणार राज्यभरातील निवडणुकीची रणनीती
राज्य कार्यकारणीच्या बैठकीनिमित्ताने भाजप इलेक्शन मोडवर
भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू?, १८ तारखेला पुण्यात बालगंधर्वला भाजप प्रदेश कार्यकारणी बैठक
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आमदार आणि खासदार गटाची बैठक घेणार
जे पी नड्डा मंत्री गटाची देखील घेणार बैठक
-
माविआच्या चर्चेत काँग्रेसने भूमिका मांडल्याची सुत्रांची माहिती
काही ठिकाणी स्वबळावर लढू, काँग्रेसची भूमिका – नाना पटोले
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका परिस्थिती पाहून लढू – नाना पटोले
-
वेब गोगावले आणि शिंदेंची निवड कायम स्वरूपी अयोग्य नाही- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर राजकीय पक्ष कोणता हे ठरवूनच पुढील कारवाई- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर सर्वांना मत मांडण्याची संधी देणार- नार्वेकर कोर्टाकडून संविधानीक शिस्त कायम ठेवण्याचं काम- नार्वेकर
गोगावले आणि शिंदेंची निवड कायम स्वरूपी अयोग्य नाही- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर
राजकीय पक्ष कोणता हे ठरवूनच पुढील कारवाई- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर
सर्वांना मत मांडण्याची संधी देणार- नार्वेकर
कोर्टाकडून संविधानीक शिस्त कायम ठेवण्याचं काम- नार्वेकर
-
दुर्योधनाच्या बाजूने असाल तर कायद्याची पदवी पेटीत बंद करून ठेवा- संजय राऊत
16 आमदारांच्या अपात्रतेला विलंब करणं हा देशद्रोह – संजय राऊत
देशातील हुकूमशाही विरोधात आमचा लढा- संजय राऊत
-
काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारणीची आगामी बैठक 23 मे रोजी होणार
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार
कर्नाटकमध्ये आलेल्या निकालाच्या पार्श्वभुमीवर आगामी निवडणूकीची रणनिती ठरवणार
-
त्र्यंबकेश्वर घटनेसंबंधी एसआयटी चौकशीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
इतर धर्मियांकडून मंदिरात बळजबरीने शिरण्याचा झाला होता प्रयत्नघटनेची सरकारकडून गंभीर दखल
अतिरीक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधीकारी तपास करणार
FIR नोंदवून कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश
-
बेकायदेशीर सरकारचा हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न- संजय राऊत
माझा आवाज बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न- संजय राऊत
हे सरकार आमच्या दृष्टीने बेकायदेशीर- संजय राऊत
-
त्यांच्या लोकांमध्ये आशा जीवंत ठेवण्याच काम उद्धव ठकरे करत आहेत- देवेंद्र फडणवीस
शिंदे सरकारचा पोपट मेलाय,जाहीर करणं बाकी- संजय राऊत
-
नवी दिल्ली : दिल्लीतील आणखी एक शाळा उडवण्याची धमकी
दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागातील अमृता शाळेत मेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली.
शाळा प्रशासनाला सकाळी धमकीचा मेल आला.
दिल्ली पोलिसांनी शाळा रिकामी केली आहे.
बॉम्ब निकामी करणारे पथकही पोहोचले असून सर्च ऑपरेशन सुरू आहे.
-
ठाकरे हे दंगलीमागील मास्टरमाईंड – नितेश राणे
नितेश राणेंनी सोडले टीकास्त्र
-
नाट्यगृहांच्या दुरावस्थेवरून अभिनेते वैभव मांगलेने व्यक्त केली नाराजी
मच्छर, खराब एसीमुळे प्रेक्षकांचे हाल, नाट्यगृहाच्या दुरावस्थमुळे भडकले अभिनेते वैभव मांगले
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळा अंतर्गत निवडक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘रोजगार मेळा’ अंतर्गत सरकारी विभागांमधील निवडक 71,000 कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देणार आहेत.
-
शिंदे सरकारचा पोपट मेलाय, फक्त नार्वेकरांकडून जाहीर करणं बाकी आहे – संजय राऊत
बेकायदेशीर सरकारविरोधात बोलल्यावर माझ्यावर गुन्हा
शिंदे सरकारमुळे महाराष्ट्र दिल्लीच्या दारातील पायपुसणं झालंय – राऊतांची टीका
-
देशातील हुकूमशाहीविरोधात आमचा लढा – संजय राऊत
शिंदे सरकार आमच्या दृष्टीने बेकायदेशीर
देशात लोकांच्या लिहीण्यावर, बोलण्यावर बंदी
-
जामखेड बाजार समिती सभापतीची आज निवडणूक
नगरमधील जामखेड बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक
राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला
दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने चुरस
तर राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांच्या गटातील दोन संचालकांनी घेतली भाजप खासदार सुजय विखेंची भेट
अंकुश ढवळे आणि कैलास वराड या दोघांनी घेतली सुजय विखे यांची भेट
दोघेही विखेंचे कट्टर कार्यकर्ते मात्र रोहित पवार यांच्या पॅनल मधून आले निवडून
-
प्रदीप कुरुलकरची होणार पॉलीग्रीफी टेस्ट
DRDO चे संचालक प्रदीप कुरुलकरची होणार पॉलीग्रीफी टेस्ट
एटीएसला टेस्ट करण्यासाठी परवानगी मिळाली असल्याची माहिती
पॉलिग्राफी टेस्टमध्ये माहिती मिळाली नाही तर नार्को टेस्ट ही केली जाऊ शकते, सूत्रांची माहिती
काल पुणे न्यायालयाने कुरुलकरला एक दिवसांची कोठडी सुनावली आहे
-
कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार
डी के शिवकुमार हे दिल्लीसाठी रवाना
सध्या कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी डीके शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यात रस्सीखेच सुरू आहे..
काल सिद्धरामय्या हे दिल्लीला गेले होते तर आजारी असल्याचं कारण देत डी के शिवकुमार यांनी दिल्ली दौरा रद्द केला होता
-
सुसाईड नोट व्हायरल
पंढरपूर : माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांची सुसाईड नोट व्हायरल
स्वतः च्या पेट्रोल पंपावर मॅनेजर व पुतण्याने १ कोटी २१ लाखांत फसवले
गुन्हेगारी वृत्तीचा मॅनेजर व पुतण्याने संगनमताने पैशाची लूट केल्याचा संशय सुसाईड नोटमध्ये
पेट्रोल पंपासाठी जमीन विकून अन् बँकेच्या कर्जातून माळी यांनी उभे केले होते भांडवल
१ कोटी २१ लाखांची फसवणूक झाल्याने बाळासाहेब माळी हे सुसाईड नोट व्हायरल करत गायब झाले
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे दत्तकृपा पेट्रोल पंप त्यांचा आहे.
-
अपघातात एक ठार
बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड- मलकापूर पांगरा मार्गावर लग्न मंडपाचे सामान घेऊन जाणारे ट्रॅक्टर पलटी झाला. यामधे ट्रॅक्टर खाली दबल्याने एक जणाचा मृत्यू झाला. एकनाथ कारभारी कायंदे, वय 40 असे मृतकाचे नाव आहे.
-
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर अतिक्रमणावर कारवाई
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटने फाट्याजवळ अतिक्रमण कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत भाजी मंडई, टपऱ्यावर ही अतिक्रमण कारवाई करण्यात आली.
-
अमरावती | अकोलामधील दंगलीच्या घटनेनंतर अमरावतीत पोलीस अलर्ट
दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
26 सेकंदांचा आक्षेपार्ह व्हिडिओ अमरावतीच्या नावाने केला होता व्हायरल
-
समीर वानखेडेंच्या घरी सीबीआय छाप्यानंतर पत्नी क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया समोर
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
वानखेडेंच्या घरावर सीबीआयचे छापे
वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरची पहिली प्रतिक्रिया समोर, वाचा सविस्तर..
-
कोल्हापूर | राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात घट
गतवर्षीच्या तुलनेत आणि साठ्यात आठ ते नऊ टक्क्यांची घट
सध्या धरणात 28 टक्के इतकाच पाणीसाठी
यावर्षी वाढलेल्या उन्हाचा परिणाम
पाणीसाठा घटल्याने धरणाच्या बॅकवॉटरचा भाग झाला खुला
-
सोलापूर | एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना संचित रजांचे पैसे मिळेनात
मागील तीन वर्षांपासून संचित रजांचे पैसे मिळणे झाले बंद
नव्या सरकारने तरी निवृत्तीनंतर संचित रजांचे पैसे देण्यास सुरुवात करावी अशी निवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी
निवृत्तीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूटी, भविष्य निर्वाह निधी, शिल्लक रजेचे पैसे आणि वेतन वाढीतील फरक दिला जातो
2018 पर्यंत ही सर्व शिल्लक देणी निवृत्त कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना दिली जात होती
मागील तीन वर्षांपासून ही रक्कम मिळायची बंद झाल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना बसला आर्थिक फटका
-
नवी दिल्ली | कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम
डिके शिवकुमार आज दिल्लीत दाखल होणार
सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेण्याची शक्यता
आज मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता
काँग्रेस पक्ष निरीक्षकांनी अहवाल खरगे यांच्याकडे सोपवला
येत्या 18 तारखेला बंगळुरू मध्ये सरकारचा शपथविधी सोहळा – सूत्रांची माहिती
-
डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील धक्कादायक घटना
रेल्वे रुळावर रिल बनवताना दोघांना ट्रेनची धडक
ट्रेनच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
चेतन गोगावले आणि सुयोग उत्तेकर अशी तरुणांची नावं
सोमवारी रात्री डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे रुळावर घडली घटना
-
कोल्हापूर | सीपीआर रुग्णालयातील ताण वाढला
सोनोग्राफीसाठी करावं लागतंय आठ ते दहा दिवसांचं वेटिंग
अपुऱ्या रेडिओलॉजिस्ट आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येचा परिणाम
दिवसाला 80 ते 90 रुग्णांच्या सोनोग्राफी सिटीस्कॅन, टेस्टसाठी सोनोग्राफी सेंटरकडे फेऱ्या
खासगी सोनोग्राफी सेंटरमुळे रुग्णांना बसतोय आर्थिक फटका
-
कोल्हापूर | जिल्हाधिकारी कार्यालयाचे शेंडा पार्कमध्ये होणार स्थलांतर
नवीन इमारतीचा आराखडा तयार करण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना
भाड्याच्या जागेत असलेली 43 सरकारी कार्यालय शेंडा पार्क मधील जागेत नेण्याच्या प्रशासनाच्या हालचाली
महापूर काळात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पाच फुटांपर्यंत येतं पाणी
वारंवार येणारा महापूर आणि पार्किंगच्या अपुऱ्या जागेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय शेंडा पार्क मधील शासकीय जागेत हलवले जाणार
-
बीकेसीला बाळासाहेब ठाकरे यांच नाव देण्याची मागणी
– मुंबईच्या बीकेसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स म्हणजेच बीटीसी असं नाव देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र.
– शिंदे गटाचे नेते किरण पावसकर , कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मागणी
– मातोश्रीच्या बाजूलाच आहे बीकेसी परिसर , संपूर्ण देशामध्ये उद्योगासाठी प्रख्यात.
-
राज्यातील तलाठ्यांसाठी महत्त्वाची बातमी
– राज्यातील तलाठ्यांसाठी महत्त्वाची बातमी
– सातबारा उताऱ्यावरील नोंदी आणि प्रत्यक्ष जमीनीचे मोजमाप ही प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावा
– 31 जुलैंपर्यंत सातबारा दुरुस्ती मोहिम राबवली जाणार आहे.
– जर तलाठ्यांनी टाळाटाळ केल्यास किंवा लवकर न केल्यास गुन्हा दाखल होणार
– राज्यात 2 लाख 62 हजार उतारे आहेत. मात्र ज्यांची जमीन नोंद आणि प्रत्यक्ष जमीन यामध्ये ताळमेळ नाही. त्यामुळे या दुरुस्ती करण्याचा निर्णय संबंधीत प्रशासनाने घेतला आहे..
-
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर
– ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर
– ठाकरे गटाचे उपनेते सुनिल बागुल यांच्या पुत्राचा विवाहसोहळा निमित्ताने येणार नाशिकमध्ये.
– माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे देखील येण्याची शक्यता.
– दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्यावर मुंबई नाका पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल.
-
उत्तर महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता
– उत्तर महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता
– विहिरी कोरड्या पडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा
– नाशिक जिल्ह्यात 31, जळगाव जिल्ह्यात 16, तर अहमदनगर जिल्ह्यात 9 टँकरने पाणीपुरवठा
– नाशिक विभागात एकूण 119 ठिकाणी 56 टँकरने पाणीपुरवठा
-
पुणे-लातूर एक्स्प्रेस रेल्वे संदर्भात होणार बैठक
– पुणे लातूर एक्स्प्रेस रेल्वेच्या संदर्भात या आठवड्यात मुंबईत मध्य रेलच्या कार्यालयात होणार बैठक
– बैठकीत पुणे ते लातूर एक्स्प्रेस या रेल्वे गाडीला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव पुणे रेल्वे विभागानं मध्य रेल्वे विभागाला दिला आहे
– लातुरला जाणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता एक्स्प्रेसची मागणी करण्यात येत आहे.
– या आठवड्यात यावर निर्णय होणार आहे.
-
रमेश बैंस यांचा राज्यातील सगळ्याच विद्यापीठांना इशारा
– राज्यपाल रमेश बैंस यांचा राज्यातील सगळ्याच विद्यापीठांना इशारा
– विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर लागला नाही तर त्याला संबंधित विद्यापीठ जबाबदार असेल
– काल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंची रमेश बैस यांनी घेतली बैठक
– बैठकीत राज्यपालांनी केल्या सूचना
– निकाल वेळेत लागला नाही तर विद्यार्थ्यांच पुढील शैक्षणिक वर्ष बिघडतं त्यामुळे निकाल 45 दिवसांत लावण्याचे बंधन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
Published On - May 16,2023 7:33 AM