Maharashtra Breaking Marathi News Live | मुंबई पोलीस भरतीत घोटाळा, ‘या’ आमदाराचा आरोप

| Updated on: May 21, 2023 | 7:03 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | मुंबई पोलीस भरतीत घोटाळा, 'या' आमदाराचा आरोप
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धारमैया आज शपथविधी घेणार. तर डीके शिवकुमारही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानच्या दौऱ्यावर. 30 मे पासून पुणे ते मिरज दरम्यान सुरू होणार साप्ताहिक विशेष रेल्वे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 May 2023 11:17 PM (IST)

    नवेगाव नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण ; सुधीर मुनगंटीवार

    नवेगाव नागझिरा अभयारण्यात 2 नव्या पाहुण्यांचे आगमन
    वाघांच्या संख्या वाढीसोबत इतर प्राणीपक्षी वाढीसाठी कार्य सुरु –
    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न
    अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण
  • 20 May 2023 11:15 PM (IST)

    भाजप नेत्या नयना सिरसाट यांचा ठाकरे गटात जाहिर प्रवेश

    बीड :
    भाजप नेत्या नयना सिरसाट यांचा ठाकरे गटात जाहिर प्रवेश
    सिरसाट या गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या खंदे समर्थक
    मुंडे साहेबांच्या नंतर मला भाजपमध्ये त्रास सुरू
    मला विश्वासात घेतले गेले नाही
    ठाकरे गटाने माझे कार्य लक्षात घेतले
    मला केज मतदारसंघात उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे
    मी आजपासूनच कामाला लागणार आहे
    मुंदडा कुटुंबाला मी टक्कर देणार आहे
    माझे सामाजिक कार्य मोठे आहे
  • 20 May 2023 08:55 PM (IST)

    शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच उन्हाळ कांद्याची नाफेड मार्फत होणार खरेदी : डॉ. भारती पवार

    शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरच उन्हाळ कांद्याची नाफेड मार्फत होणार खरेदी

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची लासलगाव बाजार समितीला अचानक भेट

    3 लाख मेट्रिक टन उन्हाळ कांद्याची केली जाणार खरेदी

    नाफेड सब एजन्सी कंपन्यांमार्फत खरेदी केलेल्या लाल कांद्याची कागदपत्र मिळताच रक्कम केली जाणार अदा

  • 20 May 2023 08:43 PM (IST)

    लोकांना कशाला रांगेत उभे राहावे लागेल..? पाचशे, शंभर चालू आहेत ना… : चंद्रशेखर बावनकुळे

    लोकांना कशाला रांगेत उभे राहावे लागेल..?

    पाचशे, शंभर चालू आहे ना..

    जे इमानदरीचे आहेत त्यांना भीती नाही

    99 टक्के लोक म्हणतात,  नोटबंदीचा हा निर्णय योग्य आहे

    ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, नोटबंदीची  भीती आहे

  • 20 May 2023 08:34 PM (IST)

    महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स रस्त्यावर, राजधानी दिल्लीत एकच गर्दी

    राजधानी दिल्लीकरांनी महेंद्रसिंग धोनीसाठी चाहत्यांनी केली

    एकच गर्दी

    क्रिकेट टीम बसमधून जात असताना धोनीच्या नावाचा गजर

    राजधानी दिल्लीत महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स उतरले रस्त्यावर

  • 20 May 2023 08:16 PM (IST)

    राज ठाकरे यांचं नाशिकमध्ये फटाके फोडून जंगी स्वागत

    राज ठाकरे नाशिकच्या मनसे कार्यालयात दाखल

    मनसेच्या राजगड कार्यालयात राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकांचं सत्र

    मनसे कार्यालयावर राज ठाकरे यांचं जंगी स्वागत

    फटाके फोडून घोषणाबाजी देत राज ठाकरेंचं स्वागत

  • 20 May 2023 08:04 PM (IST)

    तळोदा तालुक्यातील रापापुर परिसरात जोरदार वादळासह पाऊस, घरांचं मोठं नुकसान

    तळोदा तालुक्यातील रापापुर परिसरात जोरदार वादळासह पाऊस

    वादळी वाऱ्यांमुळे घरांचे आणि विजेच्या खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    विजेचे खांब कोसळल्याने परिसरात विद्युत पुरवठा खंडित

    घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

  • 20 May 2023 07:50 PM (IST)

    Kailas Gorantyal On Mumbai Police Recruitment Scam | मुंबई पोलीस भरतीत घोटाळा, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप

    पोलीस भरतीत उमेदवारांकडून 10-12 लाख घेतले, गोरंट्याला यांचा दावा

    पाहा आमदार कैलास गोरंट्याल आणखी काय म्हणाले?

  • 20 May 2023 06:55 PM (IST)

    नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स रस्त्यावर

    राजधानी दिल्लीकरांनी धोनीसाठी केली एकच गर्दी

    क्रिकेट टीम बसमधून जात असताना धोनीचा गजर

    राजधानी दिल्लीत धोनी फॅन्स उतरले रस्त्यावर

  • 20 May 2023 06:46 PM (IST)

    नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल घेणार मोठा निर्णय

    केंद्र सरकारच्या निर्णयाला केजरीवाल सरकार आव्हान देणार

    सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत केंद्र सरकारचा नवा अध्यादेश

    दिल्लीमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले

    केंद्र सरकारच्या निर्णयाला केजरीवाल सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

  • 20 May 2023 06:26 PM (IST)

    नाशिक : राज ठाकरे नाशिकच्या मनसे कार्यालयात दाखल

    मनसेच्या राजगड कार्यालयात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र

    मनसे कार्यालयात राज ठाकरे यांचे जंगी स्वागत

    फटाके फोडून घोषणाबाजी देत राज ठाकरे यांचे स्वागत

  • 20 May 2023 06:11 PM (IST)

    मुंबई : पुणे एक्सप्रेसवर डस्टर कारचा भीषण आग

    खोपोली येथे भर उन्हाच्या कडाक्यात दुपारच्या सुमारास एका खासगी कारने पेट घेतला

    पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या डस्टर कारला अचानक आग लागली

    कारला लागलेली आग इतकी भीषण होती की काही क्षणातच कार जळून खाक झाली

    प्रवासी वेळेतच कारमधून बाहेर पडल्याने सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

  • 20 May 2023 05:55 PM (IST)

    भाजपला लोकसभेची एक देखील जागा जिंकू देणार नाही

    दिल्लीत जागोजागी महारॅली आणि सभा घेणार

    लोकांच्या भाजपविरोधात तीव्र प्रतिक्रिया

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला इशारा

  • 20 May 2023 05:48 PM (IST)

    आमच्याच तहसीलदारांची आम्हाला लाज वाटते

    राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला संताप

    वाळू आणि वाळू डेपोसाठी अधिकारी अडथळे

    जे आडवे येतील त्यांना आता सरळ करु-विखे

  • 20 May 2023 05:45 PM (IST)

    सुरक्षा रक्षक नेमताना करा खातरजमा

    हाऊसिंग सोसायटीत सुरक्षा कर्मचारी नेमताना खात्री करुन घ्या

    परवानाधारक एजन्सींकडून सुरक्षा रक्षक कामावर घेण्यापूर्वी माहिती घ्या

    या सुरक्षा रक्षकाची संपूर्ण माहिती, पार्श्वभूमी तपासा

    पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आवाहन

  • 20 May 2023 05:37 PM (IST)

    विरोधकांकडे जास्त नोटा असतील म्हणून त्रास होत असेल

    नोटबंदीवरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला टोला

    नोटाबंदीवरुन विरोधकांच्या टीकेला दिले उत्तर

    नोटबंदीवरुन टीका करणाऱ्यांना शिंदे यांनी लगावला टोला

  • 20 May 2023 05:33 PM (IST)

    पालघरमध्ये कामगार रुग्णालय उभारणार

    बोईसर पट्ट्यात लवकरच 150 बेडसचे रुग्णालय

    30 टक्के बाहेरील रुग्णांवर होणार उपचार

    एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार विकास

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  • 20 May 2023 05:23 PM (IST)

    शरद पवार नागपूर दौऱ्यावर

    नागपुरात विदर्भ स्तरीय ओबीसी मेळावा

    राष्ट्रवादी काँग्रेसचा ओबीसी मेळावा

    4 जून रोजी शरद पवार नागपूरमध्ये

  • 20 May 2023 05:17 PM (IST)

    छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी नोटबंदीचा घेतला खरपूस समाचार

    पुन्हा नोटबंदी करण्याची गरज काय, हे आरबीआयने स्पष्ट करावं

    7 वर्षानंतर तुम्ही तुमचाच निर्णय कसा काय फिरवता

    नोट छपाईसाठी आला 1600-1700 कोटींचा खर्च

    हा करदात्यांचा पैसा आहे, भुपेश बघेल यांनी दिली आठवण करुन

  • 20 May 2023 05:10 PM (IST)

    जी-7 मध्ये जगाच्या भुवया उंचावल्या

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची झाली भेट

    अनेक विषयावर दोन्ही देशात झाली बोलणी

    युक्रेनमधील परिस्थिती निवळण्यासाठी केली आशा व्यक्त

  • 20 May 2023 05:05 PM (IST)

    सत्तेची मस्ती करु नका

    नशा डोक्यात जाऊ देऊ नका

    अजित पवार यांचा सरकारवर निशाणा

    तर अजितदादांनी आत्मपरिक्षण करावं

    विखे पाटील यांनी हाणला टोला

  • 20 May 2023 04:51 PM (IST)

    भंडारा: लाखनी बाजार समिती सभापती व उपसभापती निवडणूक बिनविरोध.

    सभापतीपदी शिवराम गिरेपुंजे तर उपसभापती विनायक बुरडे यांनी निवड

    लाखनी बाजार समिती सभापती व उपसभापती निवडणूक बिनविरोध

    लाखनी बाजार समितीत 18 संचालक पदापैकी काँग्रेसला ४ तर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला १४ जागावर विजय प्राप्त

    भाजपा- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष.

  • 20 May 2023 04:37 PM (IST)

    बोरघाट, खोपोली: अचानक पेट घेतल्याने डस्टर कार जळून खाक

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ अचानक पेट घेतल्याने डस्टर कार जळून खाक

    ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

    सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतिहानी नाही

    घटनास्थळी देवदूत रेस्कु टीम,बोरघाट महामार्ग पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून,डस्टर कार बाजूला घेण्यात आली

    मुंबई पुणे प्रवासा दरम्यान तळपत्या उन्हामुळे कारचे इंजिन गरम होऊन ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे

  • 20 May 2023 04:32 PM (IST)

    मुंबई पोलीस भरती परीक्षेत कोट्यवधीचा घोटाळा- काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल

    फेरपरिक्षा घेण्याची मागणी करत

    काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा उपोषणाचा इशारा.

    7 मे रोजी मुंबई मधील पोलीस भरतीच्या परीक्षेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून फेरपरिक्षा घेण्यात यावी अशी मागणी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली

    आज यावर जालना येथे पत्रकार परिषदे दरम्यान गोरंट्याल यांनी हा आरोप केला असून या मागणीसाठी आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय.

  • 20 May 2023 04:13 PM (IST)

    कोल्हापूर: गद्दार, 50 खोके हे शब्द आता जनतेलाही पटले आहे – अजित पवार

    राज्याचे आर्थिक शिस्त बिघडली आहे त्याला जबाबदार कोण

    तुम्ही काय काय केल हे जनतेला माहित आहे- अजित पवार

    गद्दार, 50 खोके हे शब्द आता जनतेलाही पटले आहे

    महाविकास काळातील विकास कामांवरची बंदी हायकोर्टाने उठवली तरी हे सुप्रीम कोर्टात गेले काय कारण आहे?

    आम्ही काही घरचे काम केलं नाही- – अजित पवार

    जनता सगळे दाखवून देत असते

    कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिलं – अजित पवार

    आमच्या काळात आम्ही काय त्यांची काम बंद केली नव्हती

  • 20 May 2023 03:56 PM (IST)

    ११ महिन्यांनंतरही महागाई गेली नाही, लोकसभेत ताकद दाखवा – अजित पवार

    शिंदे MPSC आयोगाला निवडणूक आयोग बोलतात – अजित पवार

    शेतकऱ्यांच्या समस्यांवर सरकार गप्पच – अजित पवार

    सरकारनं सर्वसामान्यांसाठी काहीच केलं नाही – अजित पवार

    कर्नाटकात भाजपची काय अवस्था झाली हे सर्वांनी पाहिलं – अजित पवार

  • 20 May 2023 03:22 PM (IST)

    The Kerala Story च्या माध्यमातून प्रकाश राज यांनी केंद्र सरकारवर साधला निशाणा; म्हणाले, ‘निवडणुकीत मत मिळवण्यासाठी…’

    ‘निवडणुकीत मत मिळवण्यासाठी…’, अभिनेते प्रकाश राज यांच्या पोस्टची सर्वत्र चर्चा,

    सिनेमाच्या माध्यमातून साधला केंद्र सरकारवर निशाणा… वाचा सविस्तर

  • 20 May 2023 03:10 PM (IST)

    Salman Khan याच्या कमाईत होणार मोठी वाढ; भाईजान मुंबईमध्ये बांधतोय १९ मजली हॉटेल

    खास व्यक्ती आहे सलमान खान याच्या १९ मजली हॉटेलची मालकीण

    भाईजानचं हॉटेल व्यवसाय क्षेत्रात दमदार पदार्पण… वाचा सविस्तर

  • 20 May 2023 03:03 PM (IST)

    गुलाबराव पाटील यांच्या गाडीमध्ये बसून त्यांनी केलेला विकास मला बघायला आवडेल- एकनाथ खडसे

    तुमच्या मतदारसंघात केलेले कामे हे तुमचं कर्तव्यच
    पालकमंत्र्यांच्या नात्याने जिल्ह्याचा आणि खानदेशचा विकास झाला पाहिजे
    असा कुठला मोठा प्रकल्प, तुम्ही पूर्ण करून दाखवला ते ? दाखवा
    मी त्याचं कौतुकच करेल, स्वागत करेल
    आपल्या मतदारसंघातील विकास एखाद्या रस्त्याचा केला असेल
    मात्र जिल्ह्याचा विकास झाला असं होत नाही
    आम्ही जिल्ह्याच्या मोठ्या विविध प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केले आहेत त्याला मंजुरी द्या
    असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दिला आहे
  • 20 May 2023 03:02 PM (IST)

    मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यात जिल्ह्याच्या विकास कामावरून जुंपली

    कामे पहायची असतील तर खडसेंनी माझ्या गाडीत बसावे
    गुलाबराव पाटलांचा टोला
    एकनाथ खडसे यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर
    जिल्ह्यात अनेक कामे होत असून, ती पाहण्यासाठी खडसेंनी माझ्या गाडीत बसावे
  • 20 May 2023 02:59 PM (IST)

    नागपुरात फडणवीसांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले

    मन लावून काम करणारे कार्यकर्ते हवेत – फडणवीस

  • 20 May 2023 02:52 PM (IST)

    भर उन्हात दुचाकीवर अंगावर पाणी टाकतानाचा व्हिडीओ व्हायरल

    अमरावती येथील राजकमल चौकातील हा प्रकार

    एक युवक दुचाकी चालवत असून पाठीमागे एक वृद्ध बसलेला आहे

    अमरावती जिल्ह्यात उन्हाने कहर केलेला आहे

    या उन्हापासून बचाव करण्यासाठी अनोखी शक्कल लढवलीय

    चक्क अंगावर बकेटमधून पाणी आपल्या अंगावर टाकताना पाहायला मिळालं

  • 20 May 2023 02:43 PM (IST)

    गडचिरोलीत दोन ग्रामपंचायतील मतमोजणी प्रक्रिया आज तहसील कार्यालयात पार पडली

    सिरोंचा तालुक्यातील नरसिहापल्ली पोचमपल्ली या दोन ग्रामपंचायतीमध्ये 18 मे रोजी मतदान संपन्न झाले

    ग्रामपंचायत निवडणुकीची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज तहसील कार्यालय सिरोंचा येथे पार पाडली

    या दोन ग्रामपंचायतीवर 70.23% मतदान झाले होते

    नरसिहापल्ली आणि पोचमपल्ली हे दोन्ही ग्रामपंचायत अति संवेदनशील अतिदुर्गम भागात मोडले जातात

    या दोन ठिकाणी काँग्रेस पक्षाला एक ग्रामपंचायत तर राष्ट्रवादी अपक्ष उमेदवाराला एक ग्रामपंचायत विजय मिळविला

  • 20 May 2023 02:41 PM (IST)

    छोटा पुढारी म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेला घनश्याम दराडे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परभणीत

    केंद्राने 2 हजाराची नोट बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाने सामान्यांना रडू येत नाही आणि हसूनही येत नाही
    या निर्णायक सरकारचे स्वागत झालं पाहिजे, कारण सामान्यांकडे 2 हजाराची नोट नव्हती
    2024 निवडणूक लढणाऱ्यांना या निर्णयामुळे झटका लागणार
    सरकारने 2 हजार ऐवजी दुसरी नोट चलनात आणावी
    आर्थिक स्थिती मंद होईल असं सरकारने काही पाऊल उचलू नये
    2 हजार ऐवजी सरकारने परत 1 हजाराची नोट काढावी
    2 हजाराची नोट ठराविक जनतेसाठी होती
    केंद्र सरकारचा हा निर्णय चांगला आहे
    मात्र सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे
    सरकारने नोटीकडे ध्यान न देता विकासाकडे ध्यान दिला पाहिजे
  • 20 May 2023 02:29 PM (IST)

    परळी महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू – संजय राऊत

    मुंडे कुटुंबीयांनी शिवसेनेच्या नेत्यांचं स्वागत केलं

    मविआ मजबूत आहे हे यातून दिसत आहे

  • 20 May 2023 02:25 PM (IST)

    जळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई

    बंदुका, तलवारींसह मोठा शस्त्रसाठा पकडला
    4 गावठी कट्टे, 5 तलवारी, दोन चोपर, 1 चाकू आणि जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त
    जळगाव जिल्हा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई
    पोलिसांच्या कारवाईने मोठी खळबळ
    भविष्यातही अशाच पद्धतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येणार असल्याची पोलिसांची माहिती
  • 20 May 2023 02:21 PM (IST)

    समीर वानखेडे सीबीआय ऑफिसमध्ये दाखल

    वानखेडेंच्या चौकशीसाठी दिल्लीतील आठ सीबीआय अधिकारी मुंबईत दाखल

    वानखेडे यांची चौकशी सुरु

    22 मे पर्यंत समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण

  • 20 May 2023 02:19 PM (IST)

    परभणीच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती/उपसभापतीच्या निवडीत मविआचा बोलबाला

    सभापदीपदी काँग्रेसचे चक्रधर पौळ, तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे प्रकाश मुळे यांची निवड

    निवडीनंतर कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष

    फटाक्यांची अतिषबाजी करुन ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा

    सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीने मारली बाजी

    राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका पार पडल्या होत्या

  • 20 May 2023 02:18 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमस्थळी दाखल

    आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडणार

    आदिवासी आणि गरजू लोकांना मुख्यमंत्र्यांनी भरघोस अनुदान द्यावे अशी स्थानिक नेत्यांची मागणी

  • 20 May 2023 02:16 PM (IST)

    महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुंबईच्या दौऱ्यावर

    आज माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची घेतली भेट

    आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली

  • 20 May 2023 02:15 PM (IST)

    धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या हाताने फेटा बांधून संजय राऊत यांचं स्वागत केलं

    हा फेटा सत्तेच्या सोपणापर्यंत जाणार असा विश्वास संजय राऊत यांनी केला व्यक्त

  • 20 May 2023 02:13 PM (IST)

    जवळपास आठ लाख कोटींच्या 2000 च्या नोटा छापल्या, प्रत्यक्षात मात्र 10 टक्के नोटा चलनात – विजय वडेट्टीवार

    या सगळ्या नोट्या मोठे उद्योगपती कॉर्पोरेट हाऊसने हा पैसा दाबून ठेवलाय

    तो पांढरा करण्यासाठी नोटबंदी केली

    या नोटा आज चलनात दिसत नसल्याने या नोटाचा वापर करून विशिष्ट लोकांनी गोळा करून पैसा व्हाईट करून घेतला

    गुजरातमध्ये कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून 400 कोटी रुपये व्हाईट करून घेतले

    याचा फायदा सरकारच्या जवळच्या लोकांना होईल

    अचानक घेतलेल्या निर्णया मागे सरकारचे मित्र मंडळीना पोहोचवण्याची ही भूमिका

  • 20 May 2023 02:10 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार

    अजित पवार यांचं मेळाव्याच्या ठिकाणी आगमन

    आमदार हसन मुश्रीफही मेळाव्याला उपास्थित

  • 20 May 2023 02:10 PM (IST)

    सांगलीमधील विष्णु अण्णा फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

    फळ मार्केटचे गेट बंद करून आंदोलनाला शेतकऱ्यांकडून सुरुवात

    नागरी सुविधा, शेतकऱ्यांच्या सुविधा आणि ट्रॅफिकच्या अडचणींबाबत शेतकऱ्यांचे मार्केट कमिटीच्या दारातच आंदोलन

  • 20 May 2023 02:08 PM (IST)

    वज्रमुठ ही काही राहिलेली नाही, आपापसातच ते एकमेकांना ठोसे मारत आहेत – संजय शिरसाट

    आता उद्धव ठाकरे हे पुन्हा सिल्वर ओकवर पायपुसणी करायला जातील
    आणि शरद पवारांना म्हणतील काका मला वाचवा
    पूर्वी अजित पवार बोलायचे, काका मला वाचवा
    आता उद्धव ठाकरे हे शरद पवारांना काका म्हणतात
    त्यामुळे ते त्यांना आता काका मला वाचवा असे बोलतात
    हा प्रयोग जो आहे, तो आता सिल्वर ओकवर होतोय
    शिवसेना प्रमुखांची शिवसेना आता उद्धव ठाकरेंनी “रखेल” म्हणून केलेली आहे
    सिल्वर ओकवर आम्हाला वाचवा आणि आम्हाला भीक द्या असे म्हणणारे हे लोक आहेत
    यांचं अस्तित्व राहिलेलं सुद्धा नाही, त्यामुळे 2024 ला हे दिसणार सुद्धा नाहीत
  • 20 May 2023 02:07 PM (IST)

    आदित्य ठाकरे बाळ आहे – संजय शिरसाट

    त्याला खूप राजकारण शिकायचं आहे
    हातवारे करणं आणि स्टाईल करणं म्हणजे राजकारण नाही
    ग्राउंडला उतरून जनतेची काम केली पाहिजे
    तुमचा पोपट मेला नाही आहे तर त्याचा अत्यंसंस्कार सुद्धा झालं आहे
    कोणत्या निवडणुकीत काय होईल ते पुढे कळेल ना
  • 20 May 2023 02:06 PM (IST)

    संजय राऊत यांना खूप इतिहास माहित आहे – संजय शिरसाट

    उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत
    त्या धृतराष्ट्राला हा संजय काहीतरी सांगतो आणि ते त्याला सत्य मानायला लागलेले आहेत
    या मूर्ख माणसाला सगळे लोक कंटाळले आहेत
    काही काळानंतर या संजय राऊत यांच्यावर शिवसैनिक वैतागतील
  • 20 May 2023 02:05 PM (IST)

    उद्धव ठाकरे हे स्वतःचे मुख्यमंत्रीपद केल्यापासून दुःखात आहेत – संजय शिरसाट

    इतर कोणीही मुख्यमंत्री होणार हे आता त्यांना सहन होत नाही, म्हणून ते गेले नाही आहेत
    महाविकास आघाडीमध्ये तारतम्य नाही
    यांच्याकडे मूर्ख सल्लागार आहेत
    यांना अस्तित्वाची लढाई लढायची नाही, तर त्यांना स्वतःची लढाई लढायची आहे
    महाविकास आघाडीकडून आमच्या युतीला कोणताच धोका नाही
  • 20 May 2023 02:03 PM (IST)

    पहिल्या नोटबंदीचा निर्णय हा काळा धनाच्या साठाच्या संदर्भात घेतला होता – संजय शिरसाट

    मार्केटमध्ये सध्या 2 हजाराच्या नोटा नाहीत
    त्या कुठे गायब झाल्या आहेत
    या 2 हजाराच्या नोटबंदीचा परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांवर होणार नाही
  • 20 May 2023 01:59 PM (IST)

    विद्यापीठाचा विधी शाखेचा पेपर व्हायरल

    अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा विधी (LLB ) शाखेचा पेपर व्हायरल

    शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीमध्ये सुरू होती परीक्षा

    एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर बाहेरच्या एका व्यक्तीला पेपर केला शेअर

  • 20 May 2023 01:54 PM (IST)

    अंबादास दानवे शेवगावात पोहचले

    दगडफेक प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेवगावात पोहचले

    घटनास्थळी जाऊन केली पाहणी

    व्यापाऱ्यांशी संवाद साधून सरकारवर साधला निशाणा

    पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली असती तर दंगल टाळत आली असती- दानवे

  • 20 May 2023 01:49 PM (IST)

    साई संस्थानचे आवाहन

    साईभक्तांनो ३० सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नका

    साई संस्थानचे आवाहन

    ३० सप्टेंबर पर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारच्या नोटा स्वीकारणार.

    मागील नोटबंदीच्या काळातील 3 कोटी रुपयांच्या नोटा पडून असल्यानं साई संस्थानचा निर्णय

  • 20 May 2023 01:43 PM (IST)

    बांधकाम खात्याच्या अभियंत्याला मारहाण

    मुक्ताईनगर सार्वजनीक बांधकाम खात्याचे विश्रामगृह विना पास मिळण्यासाठी सार्वजनीक बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 May 2023 01:36 PM (IST)

    सोलापुरात छावा संघटनेचे आंदोलन

    सोलापूर जिल्ह्यातील दूध खरेदी करणाऱ्या काही खाजगी डेअरी मालकांनी दुधाचे दर पाडले. या निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटना आक्रमक झाली असून रस्त्यावर शेतकऱ्यांनी दूध ओतून आंदोलन केले आहे. तसेच पंढरपूर सांगोला रस्त्यावर मांजरि येथे रास्ता रोको देखिल करण्यात आला असुन येत्या दहा दिवसात जर दुधाला दर वाढून नाही मिळाला तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

  • 20 May 2023 01:26 PM (IST)

    राज ठाकरेंकडून आनंद दवे यांनी मागितले पुरावे

    त्र्यंबकेश्वरला धूपची परंपरा असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

    राज साहेब कृपया पुरावे द्या- आनंद दवे

    मग भोंगे विषय पण स्थानिक लोकांनीच पाहायचा का ?

    हा विषय स्थानिक किंवा बाहेरचा कसा होऊ शकतो ?

  • 20 May 2023 01:20 PM (IST)

    वाशिम : बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय

    वाशिम बाजार समिती पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा वाशिम बाजार समितीचा निर्णय.

    शेतकरी आक्रमक झाल्याने हळद दर कमी मिळत असल्याने खरेदी बंद पाडून गोधळ घातला होता.

    बाजार समितीत हळद खरेदीचा पहिलाच दिवस होता.

  • 20 May 2023 01:14 PM (IST)

    पुणे FTI मध्ये दाखवला जाणारं केरळा स्टोरी

    केरळ स्टोरीज एफटीआयमध्ये स्पेशल स्क्रीनिंग

    स्क्रीनिंगच्या विरोधात विद्यार्थ्यांचे मोठ आंदोलन

    विद्यार्थी संघटनेचा मात्र मोठा विरोध

    स्क्रीनिंगसाठी चित्रपटाची स्टार कास्ट एफटीआयमध्ये येणार

    पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

    एका गटाचा चित्रपट स्क्रीनिंगला मोठा विरोध

  • 20 May 2023 01:09 PM (IST)

    मुख्यमंत्री पालघरकडे रवाना

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या निवासस्थानातून पालघर दौऱ्यासाठी निघाले

    ठाण्यातून हेलिकॉप्टरचा प्रवास करत पालघर येथे पोहोचणार

  • 20 May 2023 01:01 PM (IST)

    ही सदिच्छा भेट, देवेंद्र फडणवीस भेटीवर आशिष देशमुख यांची प्रतिक्रिया

    – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज उमरेड दौऱ्यावर आहेत.

    – या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी आमदार आशिष देशमुख यांची भेट घेतली.

    – सुमारे एक तास ही भेट होती.

    – आशिष देशमुख यांनी ही सदिच्छा भेट होती असे सांगितले.

    – फडणवीस हे विदर्भाचा विकास घडवणारे एकमेव नेते आहेत.

    – पक्ष विरहित संस्कृतीच्या नात्याने ते माझ्याकडे आले होते असे देशमुख म्हणाले.

  • 20 May 2023 12:55 PM (IST)

    केरला स्टोरी चित्रपटाला विद्यार्थ्यांचा विरोध

    – पुण्यातील FTI मध्ये केरला स्टोरी या चित्रपटाला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला.

    – मात्र या चित्रपटाला अनेक स्तरातून विरोध होत आहे.

    – आतापर्यंत या सिनेमाने 200 कोटी रुपये कमावले आहेत.

  • 20 May 2023 12:45 PM (IST)

    कर्नाटक : सिद्धरामय्या यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

    – कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे सिद्धरामय्या यांनी शपथ घेतली.

    – राज्यपाल थावरचंद गेलहोत यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

    – या शपथविधी सोहळ्याला 19 प्रमुख पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते.

  • 20 May 2023 12:38 PM (IST)

    कर्नाटकावरून आल्यांनतर फडणवीस जास्त त्रस्त – खडसे

    – कर्नाटकमध्ये निवडणुकीचा प्रकार करून आले.

    – तिकडे प्रचार केला. पण, पराभूत झाले.

    – तेव्हापासून फडणवीस जास्त त्रस्त आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

  • 20 May 2023 12:30 PM (IST)

    चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदी अभिनेता सुशांत शेलार यांची नियुक्ती केली आहे.

    – निर्माता, लेखन, अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांची कार्यकारिणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

    – यात अभिनेता राजेश भोसले, शेखर फडके, केतन क्षीरसागर, भरत भानूशाली आणि शंतनु कुलकर्णी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    – तर सरचिटणीसपदी योगेश शिरसाठ, शर्मिष्ठा राऊत आणि चिटणीसपदी अलका परब, अमित कुलकर्णी, विजय सुर्यवंशी, वैभव विरकर यांची निवड करण्यात आली आहे.

    – शरद राणे यांची खजिनदारपदी निवड केली आहे.

  • 20 May 2023 12:20 PM (IST)

    विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेवगावमध्ये दाखल

    – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शेवगावमध्ये दाखल

    – दानवे यांनी घटनास्थळाची पाहणी करत व्यापाऱ्यांशी संवाद साधला

    – यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. ‘

    – पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत चर्चा करणार अशी माहिती दानवे यांनी दिली.

  • 20 May 2023 12:12 PM (IST)

    ‘वज्रमूठ’ सभेसाठी शरद पवार घेणार महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक

    – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी महाविकास आघाडीची सभा होणार आहे.

    – मंगळवारी महाविकास आघाडीची पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

    – या बैठकीमध्ये वज्रमूठ सभेसंदर्भात चर्चा होणार आहे.

    – राज्यात उष्माघात वाढल्यामुळे ही सभा काही काळ स्थगित करण्यात अली होती.

    – मात्र, आता पुन्हा ही सभा घेण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 20 May 2023 12:06 PM (IST)

    जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिंदे फडणवीस पुन्हा अयोध्येला जाणार

    मंत्री आणि आमदारही जाणार अयोध्येला
    याआधी नऊ एप्रीलला शिंदे आणि फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले होते
  • 20 May 2023 12:02 PM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे आज पालघर दौऱ्यावर

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पालघर दौऱ्यावर आहेत.

    – या दौऱ्यात आदिवासी समाजातील तसेच दुर्बल घटकातील 201 वधूवरांच्या सामूहिक लग्न सोहळ्याला विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत.

  • 20 May 2023 11:55 AM (IST)

    घटनाबाह्य मुख्यमंत्री वरळीतून लढणार असतील तर मी राजीनामा देईन-  आदित्य ठाकरे

    आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान
  • 20 May 2023 11:47 AM (IST)

    आशिष देशमुख भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

    आशिष देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान

    अनील देशमुख आणि सुनील केदार यांच्या विरोधात  आशिष देशमुख निवडणूक लढवण्याची शक्यता

  • 20 May 2023 11:38 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष देशमुखांच्या भेटीला

    आशिष देशमुखांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतली भेट
    देशमुख भाजपकडून काटोल किंवा सावनेरमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

    देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित

  • 20 May 2023 11:20 AM (IST)

    मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर तो बेकायदेशीर असेल – संजय राऊत

    मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार लवकरच होणार – मुंगंटीवार

    मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर तो बेकायदेशीर असेल- संजय राऊत

    16 आमदारांवर अपात्रतेची तलवार अद्यापही कायम- संजय राऊत

  • 20 May 2023 11:15 AM (IST)

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिंदेंचा दुशासन कारभार : संजय राऊत

    राज्यात सुशासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उच्चार

    संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल

    राज्यात सुशासन नसून दुशासन आहे- संजय राऊत

  • 20 May 2023 11:07 AM (IST)

    आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंची सीबीआय चौकशी 

    चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल

    समीर  वानखेडे मुंबईच्या सीबीआय ऑफीसमध्ये दाखल

  • 20 May 2023 10:50 AM (IST)

    मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पुन्हा ॲक्शन मोडवर

    राज्य सरकारकडून लवकरच क्युरेटिव्ह पिटीशन दाखल होणार

  • 20 May 2023 10:45 AM (IST)

    पुणे : 2 हजारची नोट बंद केल्यानंतर राष्ट्रवादीचे आंदोलन

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं अनोखं आंदोलन

    अवघ्या 6 वर्षांत नोट बंद करण्याची वेळ का आली ?

  • 20 May 2023 10:40 AM (IST)

    काश्मीरमध्ये 15 ठिकाणी एनआयएनचे छापे

    जम्मू-काश्मीरमधील 7 जिल्ह्यांमध्ये 15 ठिकाणी एनआयएने छापे टाकले

  • 20 May 2023 10:23 AM (IST)

    सिद्धरामैया यांच्या शपथविधी सोहळ्यात कमल हसन यांचीही उपस्थिती

    सिद्धरामैया आज दुसऱ्यांदा घेणार कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    या सोहळ्यास अभिनेते कमल हासनही उपस्थित राहणार

    दुपारी 12.30 वाजता पार पडणार शपथविधी

  • 20 May 2023 10:14 AM (IST)

    समीर वानखेडे सीबीआय चौकशीसाठी रवाना

    समीर वानखेडे सीबीआय चौकशीसाठी रवाना झाले आहेत.

    आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडे यांची चौकशी होणार आहे.

  • 20 May 2023 10:07 AM (IST)

    त्र्यंबकेश्वरच्या मुद्यावर निर्णय स्थानिकांनी घ्यावा – राज ठाकरे

    त्र्यंबकेश्वर मुद्यात इतरांनी लक्ष घालू नये, या वादात इतरांनी पडू नये

    नसते मुद्दे उकरून काढू नका, राज ठाकरेंचा भाजपाला टोला

  • 20 May 2023 10:03 AM (IST)

    तर ही वेळ आली नसती, राज ठाकरेंची नोटबंदीवरून टीका

    तज्ज्ञांना विचारून नोट आणली असती तर बंद करण्याची वेळ आली नसती

  • 20 May 2023 10:00 AM (IST)

    नाशिक : मनसेची शॅडो कॅबिनेट कायम आहे – राज ठाकरे

    शॅडो कॅबिनेट पुन्हा ॲक्टिव्हेट होईल

    पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कार्यक्रम देणार

  • 20 May 2023 09:56 AM (IST)

    २२ ते ३१ मे दरम्यान तालुका स्तरावर स्त्री समस्या समाधान शिबिराचे आयोजन

    जिल्हास्तर, विभाग आणि राज्य स्तरावर महिलांच्या विविध समस्यांबाबत महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो, त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यात २२ ते ३१ मे दरम्यान प्रत्येक तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 20 May 2023 09:51 AM (IST)

    मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून लवकरच क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केलं जाणार

    मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून लवकरच क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केलं जाणार

    क्युरेटीव्ह पिटीशनचं ड्राफ्टींगच काम अंतिम टप्प्यात

    या आठवड्यात पिटीशन दाखल होण्याची शक्यता

    आवश्यक ते बदल पिटीशनमध्ये केलेत

    विश्वसनीय सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

    लवकरच आरक्षणप्रश्नी राज्य सरकार पुन्हा कोर्टात जाणार

  • 20 May 2023 09:47 AM (IST)

    गरोदरपणात सूर्यग्रहणाशी डोळे भिडवणाऱ्या विवाहितेला गोडस आणि सदृढ कन्यारत्न

    सूर्यग्रहण सुरू झालं,आणि चार महिन्यांची गरोदर असणाऱ्या विवाहितेने थेट सूर्यग्रहण पाहिले,खरंतर गरोदर महिलेने सूर्यग्रहण पाहणे अशुभ मानलं जातं,मात्र समाजातल्या रूढी परंपरांना छेद देऊन इस्लामपूरच्या नवेखेड येथील सावित्री च्या लेकीने पूजा ऋषीराज जाधव हिने सुर्यग्रहण पाहिला,आणि आता तिने गोंडस आणि सुदृढ बाळाला जन्म दिला आहे.नुकतेच या मुलीचे राजनदिनी असे नामकरण करण्यात आले आहे

  • 20 May 2023 09:42 AM (IST)

    शरद पवार कर्नाटकला शपथविधी सोहळ्यासाठी रवाना

    शरद पवार कर्नाटकला शपथविधी सोहळ्यासाठी रवाना

    खाजगी विमानानं शरद पवार शपथविधीसाठी गेलेत..

    आज काँग्रेसच्या शपथविधी सोहळ्याचं पवारांंना निमंत्रण

  • 20 May 2023 09:32 AM (IST)

    सिद्धेश्वर मंदिर समितीने प्रवेशद्वारावरील बॅनर्स हटवले

    – सिद्धेश्वर मंदिर समितीने प्रवेशद्वारावरील बॅनर्स हटवले

    – मंदिर समितीने असे कोणतेही बॅनर लावले नसल्याचे स्पष्टीकरण

    – त्या बॅनर्सशी सिद्धेश्वर पंचकमिटीचा काडीमात्र ही संबंध नाही

    – मंदिर समितीच्या ठरावांमध्ये अशा प्रकारचा कोणताही निर्णय झालेला नाही

    – त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून ते बॅनर्स तात्काळ काढून टाकण्यात आले आहेत

    – सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांचे स्पष्टीकरण

    – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य आणि अशोकनीय वस्त्रधारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश नाही अशा अशयाचे बॅनर्स लागले होते

    – त्याचबरोबर हाफ पॅन्ट, बर्मुडाधारींना मंदिरात प्रवेश नाही अशा आशयाचे बॅनर्स झळकले

    – मात्र मंदिर समितीने हे सर्व प्रकार भेटायला असून अशा प्रकारचा कोणताही नियम नसल्याचे स्पष्ट केले आहे

  • 20 May 2023 09:18 AM (IST)

    बेस्टच्या ताफ्यात ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडच्या २,१०० इलेक्ट्रिक एसी बस लवकरच दाखल होणार

    बेस्टच्या ताफ्यात ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडच्या २,१०० इलेक्ट्रिक एसी बस लवकरच दाखल होणार.

    – टाटा मोटर्सने मुंबईत २,१०० इलेक्ट्रिक बसचा पुरवठा करण्याच्या निविदा बोलीतून अपात्र ठरवण्याच्या बेस्ट उपक्रमाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

    बेस्टच्या निर्णयाला आव्हान देणारे टाटा मोटर्सचे अपील सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले असून या बस बेस्टकडे येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडकडून सांगण्यात आले.

    या माहितीला बेस्ट उपक्रमानेही दुजोरा दिला असून येत्या डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्यात बस येतील, अशी माहिती आहे…

  • 20 May 2023 09:14 AM (IST)

    समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून त्यावर अपघातांचे सत्र सुरू

    समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाल्यापासून त्यावर अपघातांचे सत्र सुरू आहे.

    – महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर ३५८ अपघात घडले असून, यामध्ये ३९ जणांनी जीव गमावला आहे.

    – १४३ जण या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले असून, २३६ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

    १५३ अपघातांमध्ये कुणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

    महामार्ग पोलिसांनी या अपघातांमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १०४ अपघात डुलकी लागल्याने किंवा शेकडो किमीचा सलग प्रवास करून थकल्याने घडले आहेत.

    ८१ अपघात हे टायर फुटल्याने घडले असून, उष्ण तापमान आणि अतिवेग यामुळे घर्षण होऊन टायरफुटीच्या घटना घडत असल्याचे म्हटले जात आहे.

  • 20 May 2023 09:10 AM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम

    सकाळी 11.45 वाजता : हिंगणा उपविभाग शासकीय आढावा बैठक, तहसिल कार्यालय, हिंगणा (जिल्हा नागपूर) दुपारी 1 वाजता : हिंगणा भाजपा कार्यकर्ता संमेलन, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृह, हिंगणा दुपारी 3 वाजता : पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शासकीय निवासस्थान उदघाटन/पाहणी दुपारी 3.30 वाजता : उमरेड उपविभाग शासकीय आढावा बैठक, तहसिल कार्यालय, उमरेड (जिल्हा नागपूर) दुपारी 4.45 वाजता : उमरेड भाजपा कार्यकर्ता संमेलन, पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृह, उमरेड

  • 20 May 2023 09:07 AM (IST)

    विरोधी पक्ष नेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

    विरोधी पक्ष नेते अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

    थोड्याच वेळात अजित दादांच्या गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या चिरंजीवी हॉटेलचा होणार उद्घाटन

    दुपारी दोन वाजता अजित दादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन

  • 20 May 2023 09:06 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात शेतकरी हवालदिल

    भंडारा जिल्ह्यात सतत येत असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्यातच अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला.दर टमाटर आणि कांयाप्रमाणे कमी दरामुळे वांग्यानेही शेतकऱ्याला रडवल्याने मुरमाडी येथील भाष्कर गजभिये या शेतकऱ्यावर वांगी रस्त्यावर फेकून देण्याची पाळी आलेली आहे.

  • 20 May 2023 09:06 AM (IST)

    महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू होणार

    – महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू होणार,

    – येत्या दोन दिवसात पुण्यातील सभेची तारीख नक्की होणार,

    – 14 मेला पुण्यात वज्रमुठ सभा होणार होती,

    – वाढत्या तापमानामुळे वज्रमुठ सभा थांबवण्यात आल्या होत्या,

    – मात्र आता पुन्हा वज्रमुठ सभेला सुरुवात होणार असल्याची माहिती

  • 20 May 2023 08:58 AM (IST)

    कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आठ आमदार शपथ घेणार

    कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत आठ आमदार शपथ घेणार आहेत

    त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे यांचाही समावेश

    याआधीच्या टर्ममध्येही प्रियांक खरगे माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहत होते

  • 20 May 2023 08:56 AM (IST)

    गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेला ओतूर पोलिसांनी अटक केली

    ओतूर येथे बस मध्ये बसताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेला ओतूर पोलिसांनी अटक केली तर चोरीस गेलेले दीड तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र पोलिसांनी परत केल्याने वृद्ध महिलेने ओतूर पोलिसांचे आभार मानलेत

  • 20 May 2023 08:45 AM (IST)

    भाव पडताच कांद्याच्या शेतात फिरवल्या शेळ्या अन् मेंढ्या

    भुसावळ तालुक्यात कांदा लागवडीचे क्षेत्र सुमारे ३ हजार हेक्टरपर्यंत आहे. पण, उन्हाळी कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा काढणी खर्चही निघत नाही. यामुळे हतबल झालेल्या गोजोरा व वांजोळा शिवारातील शेतकऱ्यांनी कांद्याच्या शेतात
    रोटोव्हेटर फिरवला. काही शेतकऱ्यांनी पिकात मेंढ्या चरायला सोडल्या.
  • 20 May 2023 08:39 AM (IST)

    नीरा भीमा’ वरील आत्मक्लेष मोर्चाप्रकरणी २०० ते २५० शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

    भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना येथे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी देखील शेतकऱ्यांची गर्दी जमवून कारखाना परिसरात मोठ्याने घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह आयोजक व उपस्थित दोनशे ते अडीचशे शेतकऱ्यांवर इंदापूर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, बुधवारी नीरा भीमा कारखाना येथे ऊस बिल अदा न केल्याने आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली होती.

  • 20 May 2023 08:37 AM (IST)

    सोलापुरात 18 दिवसाच्या नवजात बाळाच्या विक्रीचा प्रकार उघड

    – सोलापुरात 18 दिवसाच्या नवजात बाळाच्या विक्रीचा प्रकार उघड

    – या बालकाला 3 लाखाला विकल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघड

    – जन्मदात्या आई-वडिलांनी आपल्या बाळाची विक्री केल्याचे समोर

    – यामध्ये मध्यस्थी महिलेने ८० हजार घेतल्याचा प्रकार उघड

    – दरम्यान या प्रकरणी एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला

    – अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत सदर बाजार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

    – यामध्ये आपले बाळ दत्तक देत असल्याचा बाँड केला मात्र हे बाळ कोणाला देणार याचा उल्लेख केला नाही त्यामुळे बाळाच्या आईने पोलिसात दिली फिर्याद

    – पोलिसांनी घटनेचा उलट तपास करताना आईनेच आरोपीला आपले बाळ तीन लाखात विकल्याचे निष्पन्न झाले

    – बाळ दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया न करता दुसऱ्याच एका महिलेला बेकायदेशीर रित्या सांभाळास दिले

    – बाळ दत्तक दिल्याचा खोटा बॉण्ड उघडकिस आला

    – पुढीलचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

  • 20 May 2023 08:32 AM (IST)

    जुन्नर तालुक्यातील रोहोकडी,ओतूर परिसरात टोमॅटोवर सी एम व्ही प्लास्टिक रोगाचा प्रादुर्भाव

    उत्तर पुणे जिल्ह्यातील  ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी व परिसरातील शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकावर सी एम व्ही प्लास्टिक व्हायरस रोगाने आक्रमण केल्याने उत्पन्नाच्या उंबरठ्यावर हजारो हेक्टर वरील टोमॅटो पिक मोठ्या  संकटात सापडले आहे,

  • 20 May 2023 08:30 AM (IST)

    खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक 24 मे रोजी होणार

    पुणे जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतींची निवडणूक 24 मे रोजी होणार

    या बाजार समितीत स्वत: अजित पवार यांनी लक्ष घातले असून तेच सभापती कोण हे ठरवणार

    राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने सभपाती पदावर दोन जुन्या की आठ नव्या संचालकांपैकी कुणाला संधी मिळते? याची उत्सुकता

  • 20 May 2023 08:28 AM (IST)

    अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील तयार करणाऱ्या युवकांने बाईकवर केली अंधोळ

    अधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी रील तयार करणाऱ्या युवकांने बाईकवर केली अंधोळ,

    चंद्रपूरचे वाढते तापमान दाखविण्यासाठी अशा पद्धतीने बाईकचा केला वापर,

    या बाईकस्वारांवर आता पोलिस कारवाई करणार, या रील स्टार युवकांना बोलावून दिली जाणार समज,

    यापुढे त्यांच्याकडून असे वर्तन घडल्यास दाखल केला जाणार संबंधित कायद्यान्वये गुन्हा,

    पोलिसांनी अशा रीतीने कायदेभंग करत रील तयार करणाऱ्या युवकांना दिला कारवाईचा इशारा

  • 20 May 2023 07:56 AM (IST)

    केंद्र सरकारचा पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का

    सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय केंद्र सरकारने बदलला

    दिल्लीतल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार केंद्र सरकारने नायब राज्यपालांना दिले

    अध्यादेश काढून केंद्र सरकारने निर्णय बदलल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का

    अधिकार दिल्ली सरकारला असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता

  • 20 May 2023 07:44 AM (IST)

    सर्वोच्च न्यायालयात 2 नवीन न्यायाधीशाना शपथ

    आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रशांत कुमार मिश्रा आणि जेष्ठ वकील कल्पती विश्वनाथन यांना न्यायाधीश पदाची शपथ

    दिनेश माहेश्वरी आणि एम आर शहा निवृत्त झाल्यामुळे दोन नव्या न्यायाधीशांचा शपथविधी

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिली शपथ

  • 20 May 2023 07:37 AM (IST)

    अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्यांने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये मिळविलं स्थान

    तल्लख स्मरणशक्तीमुळे त्याला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने केले सन्मानित

    कमी वयात हे यश संपादन करणारा गोंदिया जिल्ह्यातील एकमेव मुलगा

    खेळण्याच्या वयात सांगतो देश आणि विदेशातील विविध माहिती

    अवघ्या फक्त साडेतीन वर्षाचा नर्सरीमध्ये शिकणारा अनुदिप

  • 20 May 2023 07:35 AM (IST)

    दोन हजारांच्या नोटा बाद, आता गुप्तदान वाढणार?

    तीर्थस्थळांच्या दानात होणार वाढ?; गुप्तदानात होणार वाढ?

    नोटबंदीनंतर साईबाबा संस्थानच्या दानात झाली होती वाढ

    आता दोन हजारांच्या नोटांचे दान वाढणार असल्याचे संकेत

    भाविक साईचरणी करतात कोट्यवधींच दान

    साईबाबा संस्थानकडे आज मितीला 2800 कोटी रुपये, राष्ट्रीय कृत बँकेत जमा आहे सर्व रक्कम

  • 20 May 2023 07:16 AM (IST)

    पुणे ते मिरज दरम्यान 30 मे पासून सुरू होणार साप्ताहिक विशेष रेल्वे

    दर मंगळवारी सकाळी 8 वाजता पुण्यातून सुटणार रेल्वे, मिरजला 1 वाजता 35 मिनिटांनी पोहोचेल

    त्याच दिवशी 2 वाजून 35 मिनिटांनी मिरजहून सुटेल आणि पुण्यात संध्याकाळी 7 वाजता पोहोचेल

    जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, सांगली या स्थानकावर ही रेल्वे थांबेल

  • 20 May 2023 07:14 AM (IST)

    भंडाऱ्यात बळीराजाचा आक्रोश, वांगी रस्त्यावर फेकून शेतकऱ्याने केला संताप व्यक्त

    अवकाळीने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला

    लागवड केलेला खर्च तर‎ सोडाच वांगे तोडणीसाठी‎ लावलेल्या मजुराचे पैसे देखील‎ वसुल झाले नसल्याने या‎ शेतकऱ्यांना वांगे फेकल्यावर‎ गहीवरुन आले

    सध्या बाजारात‎ भाजीपाल्याचे भाव गडगडले‎ असल्याने भाजीपाला उत्पादक‎ शेतकरी संकटात सापडले आहे

  • 20 May 2023 07:11 AM (IST)

    नवे सरकार, नवे राज्य; सिद्धारमैया दुसऱ्यांदा घेणार कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    दुपारी 12.30 वाजता पार पडणार शपथविधी

    या सोहळ्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण

    शरद पवार पुण्यातून कर्नाटकसाठी होणार रवाना

    मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी के शिवकुमार घेणार शपथ

    20 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

Published On - May 20,2023 7:08 AM

Follow us
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.