Maharashtra Breaking Marathi News Live | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची रणनिती तयार, कुणाला लॉटरी?

| Updated on: May 23, 2023 | 7:43 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची रणनिती तयार, कुणाला लॉटरी?
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यपाल रमेश बैस आजपासून पाच दिवसाच्या साताऱ्यातील महाबळेश्वर दौऱ्यावर. गिरीदर्शन बंगल्यात करणार मुक्काम. पुण्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं. 20 दिवसांत जवळपास 175 तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये नोंद.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 5 नावांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवला. आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर. कोराडी वीज प्रकल्प परिसरातील प्रदूषित गावांना भेट देणार. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 May 2023 12:09 AM (IST)

    वाशिम शहरातील गोंदेश्वर भागात कमानीचे बांधकाम सुरू असताना कमान कोसळली; 1 ठार, 2 गंभीर

    वाशिम:

    वाशिम शहरातील गोंदेश्वर भागात कमानीचे बांधकाम सुरू असताना कमान कोसळली

    धक्कादायक घटना घडल्यामुळे वाशिम शहरात खळबळ

    नवीन बांधकाम सुरू असताना कोसळलेल्या कमानी खाली 1 मजूर ठार तर दोन जण गंभीर जखमी

    जखमींना पुढील उपचारासाठी वाशिम शहरातील रुग्णालयात केलं दाखल

  • 23 May 2023 12:07 AM (IST)

    विद्युत पुरवठा खंडित केल्याने महावितरणच कार्यालयात जाऊन वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    अमरावती :

    वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित केल्याने महावितरणच कार्यालयात जाऊन वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    अमरावती शहरातील जुना बायपास परिसरातील महावितरण कार्यालयातील धक्कादायक घटना

    वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपी विरोधात राजापेठ पोलीसात गुन्हा दाखल.

  • 22 May 2023 09:26 PM (IST)

    वाशिम शहरात बांधकाम सुरू असताना कमान कोसळली 

    वाशिम शहरातील गोंदेश्वर भागात कमानीचे बांधकाम सुरू असताना कमान कोसळली

    नवीन बांधकाम सुरू असताना कोसळलेल्या कमानी खाली 1 मजूर ठार तर दोन जण गंभीर जखमी..

    जखमींना पुढील उपचारासाठी वाशिम शहरातील रुग्णालयात केलं दाखल.

  • 22 May 2023 08:36 PM (IST)

    राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसे आक्रमक, फेरीवाल्यांना हुसकावले तर बांगड्याही दिल्या गिफ्ट

    राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर मनसे आक्रमक

    कल्याण स्टेशन परीसरात मनसेची धडक

    फेरीवाल्यांना हुसकावले तर बांगड्याही दिल्या गिफ्ट

    कल्याण रेल्वे स्थानकात छेड कडल्याच्या घटनेमुळे मनसेची सटकली

    15 दिवसात यावर योग्य ती कार्यवाही होईल स्टेशन मास्तर नी दिले अश्वासन

  • 22 May 2023 07:56 PM (IST)

    Maharashtra Cabinet Expansion | राज्य सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, इतक्या आमदारांचा शपथविधी : सूत्र

    शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची रणनिती तयार

    ईडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना-भाजपचे प्रत्येकी 7-7 आमदार मंत्रिमदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती

    शिंदेच्या शिवसेनेकडून अनिल बाबर, भरत गोगावले, संजय रायमूलकर आणि बच्चू कडू यांना मंत्रिपद, विश्वसनीय सूत्रांची माहिती

    तर उर्वरित तिघांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम आणि प्रताप सरनाईक यांच्या नावाची चर्चा, मात्र तूर्त वेटिंगवर, सूत्रांची माहिती

    महिन्याअखेर राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

  • 22 May 2023 07:41 PM (IST)

    Uddhav Thackeray On Disqualification of 16 MLAs | उद्धव ठाकरे 16 आमदारांच्या अपात्रेबाबत काय म्हणाले?

    सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयानंतर 16 आमदारांना अपात्र करावंच लागेल : उद्धव ठाकरे

    महाविकास आघाडीला डॅमेज करण्याचा प्रयत्न, भाजपवर ठाकरेंचा आरोप

    जागावाटपासंदर्भात संदर्भात वाद टाळण्यासाठी काळजी घेणार, ठाकरेंची प्रतिक्रिया

    मविआत परस्पर सामंजस्य, उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्टोक्ती

    उद्भवलेल्या कोणत्याबी समस्येचे आम्ही निराकरण करु, उद्धव ठाकरे यांच्याकडून विश्वास व्यक्त

  • 22 May 2023 07:34 PM (IST)

    NCP Leader Jayant Patil Ed Inquiry | जंयत पाटील यांची सात तासांपासून चौकशी सुरु

    राष्ट्रवादी नेते जंयत पाटील यांची 7 तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरु

    ईडी चौकशीवरुन सत्ताधारी विरोधक आमनेसामने

    ईडी चौकशी सूडबुद्धीतूनच, विरोधकांचा आरोप

    तर ईडी स्वायत्त संस्था, सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तर

    जयंत पाटलांच्या ईडी चौकशीमुळे कार्यकर्ते आक्रमक

  • 22 May 2023 07:27 PM (IST)

    Aditya Singh Rajput Dead | टीव्ही अभिनेता आदित्य सिंह राजपूत याचा मृत्यू

    अंधेरीतील घरच्या बाथरुममध्ये सापडला मृतदेह

    रुगणालयात नेताच डॉक्टरांकडून मृत घोषित

    मृत्यूचं कारण अजून अस्पष्ट

  • 22 May 2023 07:20 PM (IST)

    Samruddhi Expressway 2nd Phase | समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण केव्हा?

    समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं 26 मे रोजी लोकार्पण

    दुसऱ्या टप्प्याचं मु्ख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते घोटीपर्यंतचा समावेश, दुसरा टप्पा एकूण 80 किलोमीटर इतका

    दुसऱ्या टप्प्यामुळे 50 मिनिटं वाचणार

  • 22 May 2023 07:11 PM (IST)

    Mumbai Congress Committee Meeting | मुंबई काँग्रेसची मंगळवारी बैठक

    मुंबईत मंगळवारी काँग्रेस कोअर कमिटीची महत्तावाची बैठक

    बीकेसीमध्ये सकाळी 10 वाजता बैठक

    आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा होणार

    पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार

  • 22 May 2023 07:04 PM (IST)

    कर्नाटक निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडू शकतात

    कर्नाटक निकालामुळे निवडणुका लांबणीवर पडू शकतात

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे मत

    सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याची तयारी नाही

    अनिल देशमुख यांना नाहक तुरुंगवास – पवार

  • 22 May 2023 07:01 PM (IST)

    जागावाटपाबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाला नाही

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्पष्टीकरण

    बीएमसी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीत लवकरच चर्चा

    राष्ट्रवादीच्या १० जणांची आतापर्यंत चौकशी

    तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे – शरद पवार

  • 22 May 2023 06:38 PM (IST)

    पंढरपुरात वादळी वाऱ्यासह पाऊस

    सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील मध्यवस्तीतील अनेक झाडे पडली

    सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ अधिक काळ वादळी वाऱ्याचा जोर

    वादळी वाऱ्यामुळे अनेक फळ पिकांचे मोठे नुकसान

  • 22 May 2023 06:12 PM (IST)

    कल्याण : मनसेची रेल्वे स्टेशन परिसरात धडक

    स्कायवॉक आणि रेल्वे स्टेशनवरील ब्रिजवर गर्दुल्ले आणि फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन

    आज रेल्वेच्या ब्रिजवर एका प्रवासी महिलेचा माथेफिरूने केला होता विनयभंग

    संतप्त मनसैनिकांची स्कायवॉक रेल्वेच्या ब्रीजवर धडक

  • 22 May 2023 05:51 PM (IST)

    पुणे : चप्पल चोरांची टोळी सक्रिय

    चप्पल चोरांची टोळी शहरभर झाली सक्रिय

    पुण्यातील खडकी भागातील घटना

    खडकी भागातून 55 चप्पल आणि बूट चोरले

    तब्बल 40 हजारांच्या चपला चोरट्यांनी चोरल्या

    खडकी पोलिसांकडून तीन जणांना अटक

  • 22 May 2023 05:30 PM (IST)

    पुणे : दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

    नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

    शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील भीमा नदी पात्रात घडली आहे

    यामध्ये गौरव स्वामी आणि अनुराग मांदळे या दोघांचा बुडून मृत्यू

    24 तासानंतर त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी लागले

  • 22 May 2023 05:20 PM (IST)

    वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवस बंद राहणार

    वाशिम शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची

    आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे उद्या एक दिवस बाजार समिती राहणार बंद

    कोणत्याही शेतकऱ्यांनी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विक्रीस न आणण्याचे आव्हान

    बाजार समिती बंदमुळे शेतकरी वर्गात नाराजीच वातावरण निर्माण

  • 22 May 2023 04:57 PM (IST)

    केंद्र आणि राज्य सरकार मिळून कामगार रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज उभारणार – मनोज कोटक

    मुलुंड इएसआयएस हॉस्पिटलची जागा पडीक होती

    याठिकाणी कामगारांसाठी एक हॉस्पिटल उभारावं

    तसेच येथे मोठ्या जागा उपलब्ध असल्याने मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज उभारावं अशी मागणी केली होती

    आजच्या बैठकीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तत्त्वता मान्यता

  • 22 May 2023 04:55 PM (IST)

    शरद पवार बालगंधर्व रंगमंदिराकडे रवाना

    दिलीप वळसे पाटील देखिल रवाना

  • 22 May 2023 04:50 PM (IST)

    परभणीत तिन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा बोलबाला

    सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीचे दशरथ सूर्यवंशी पाटील यांची सभापती म्हणून निवड
    तर उपसभापतीपदी उत्तम जाधव यांची निवड
    परभणी बाजार समिती निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पांढरीनाथ घुले यांची सभापती पदी निवड
    काँग्रेसचे अजय चव्हाण यांची उपसभापती पदी निवड
    पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल नखाते यांची सभापती पदी निवड
    तर शाम धरमे यांची उपसापतिपदी निवड
  • 22 May 2023 04:42 PM (IST)

    धरणगाव-एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

    नवनिर्वाचित संचालकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
    गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्यात यश
    सहकार पॅनलला 15 पैकी 15 जागावर विजय प्राप्त
  • 22 May 2023 04:39 PM (IST)

    हे गाव मंदिर नाही, मंदिरासंदर्भात निर्णय सर्व हिंदू घेणार, मंदिर समिती घेणार – तुषार भोसले

    स्थानिकांची ही मागणी

    राज ठाकरे ह्यांनी ही भूमिका का घेतली

    नोटबंदीच्या संभ्रमामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल

    मागच्या नोंटबदीच्या काळात त्यांना त्रास झाला होता, ते त्याच संभ्रमात आहे

  • 22 May 2023 04:37 PM (IST)

    नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

    शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील भीमा नदी पात्रात घडली घटना

    मयत मुलं इयत्ता 10 वीचे विद्यार्थी

    एक विद्यार्थी पाण्यात पोहायला शिकत होता

    मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला

    त्याला वाचविण्यासाठी दुसरा गेला

    मात्र त्याला घट्ट पकडल्याने दोघेही बुडाले

  • 22 May 2023 04:35 PM (IST)

    ईडीच्या चौकशीवरून भाजप आमदार राम शिंदे यांची विरोधकांवर टीका, तर रोहित पवारांवर साधला निशाणा

    ईडीच्या चौकशी अशा पद्धतीने लागते, त्याच्यावरती अनेक दिवस चिकित्सा केली जाते

    ज्यावेळी संशात्मक काही गोष्टी आढळून येतात, त्याचवेळी ईडीची चौकशी लागते

    चुकीचं केलं असेल तर सजा ही भोगाविच लागेल, काही केलं नसलं तर ते निर्दोष सुटतील

    अनेक लोकांना ईडीची चौकशी लागते, मात्र अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही

    विनाकारण लोकांसमोर हा तमाशा मांडायचा आणि आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत असं दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

    रोहित पवारांचा बालिशपानाचे वक्तव्य,

    त्यांना कर्नाटकच्या निवडणुकीवर बोलण्याचा अधिकार नाही, कारण त्यांना उमेदवार उभे करता आले नाही

  • 22 May 2023 04:21 PM (IST)

    मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार – एकनाथ शिंदे

    75 हजार नोकऱ्या देण्याचा निर्णय

    कौशल्य विकासाच्या माध्यमातून 2 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार

    आम्ही 10 महिन्यांपूर्वी क्रांतीकारी निर्णय घेतला, ती काळाची गरज होती

    कृषी देशाची आणि अर्थव्यवस्थेची जिवनदायीनी

    मी अभिमानाने सांगतो की, मी हेलिकाॅप्टरने जातो

    शेतकऱ्यांनी जाऊ नये का ? फिरू नये का ?

    हेलिकाॅप्टरने शेतात जातो वेळ वाचवतो

    काही जण एरियल फोटोग्राफी करतात

    एकनाथ शिंदेंचा ऊद्धव ठाकरेंना टोला

    मी कामाने ऊत्तर देतो

  • 22 May 2023 04:13 PM (IST)

    माझं सकाळी जयंत पाटील यांच्याशी बोलणे झाले, आमच्यासाठी नवीन नाही – सुप्रिया सुळे

    शरद पवारांना देखील अशी नोटीस पाठवली होती

    त्यांनतर महाराष्ट्रात काय झालं आपल्याला माहिती आहे

    हे दडपशाहीच्या सरकार विरोधी पक्षातील लोकांना नोटीस पाठवतात

    आधीची सरकारे होती त्यावेळी त्या स्वायत्त संस्था होत्या

    आता अदृश्य हात या संस्था चालवतो

    जो विरोधात बोलतो त्याला ईडीची नोटीस पाठवतो

    त्यांच्या लग्नाच्या वाढदिसानिमित्त हे गिफ्ट आले आहे

    जयंत पाटील 2 पुस्तके घेऊन गेले आहेत, तिथे वाचायला

    अनिल देशमुख यांच्या घरी 109 वेळा धाड पडली

    नवाब मलिक जे काही बोलत होते ते आज खरं होत आहे

    ते बोलत होते म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले

    भाजपचे नेते म्हणतात की, आम्ही भाजपमध्ये गेल्यापासून आम्हाला झोप शांत लागते

  • 22 May 2023 04:11 PM (IST)

    पिंपरी चिंचवडच्या चिखलीत भरदिवसा गोळीबाराची घटना

    सोन्या तापकीर याच्यावर हा गोळीबार झाल्याची पोलिसांची माहिती

    दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या

    यात सोन्या तापकीर हा गंभीर जखमी

    जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

    गोळीबार का केला? हे अद्याप अस्पष्ट

    दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली

    अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरु

  • 22 May 2023 04:10 PM (IST)

    महाराष्ट्र प्रिमीयर लीग सुरू करत आहोत – रोहित पवार

    महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि डी डी स्पोर्टशी करार झालाय

    यंदा महिलांच्याही 3 टीम असणार

    15 जूनपासून या स्पर्धांना सुरुवात होणार

    एमपीएलमध्ये एकूण 6 टीम असणार

    पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, जळगाव,या सहा टीम असणार

    आयपीएलप्रमाणे सुविधा खेळाडूंना मिळणार आहेत

    आयपीएलचेच नियम यामध्ये असणार

  • 22 May 2023 04:08 PM (IST)

    ई-श्रम पोर्टलवर जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी केली जाईल – देवेंद्र फडणवीस

    आज काही महत्वाच्या विषयाची बैठक ठेवली होती

    केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित होते

    तीन ठिकाणच्या जागा आम्ही देऊ शकलो आहे

    मुंबईत मनोज कोटक यांनी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करावे अशी मागणी केली

    केंद्र आणि राज्य मिळून 400 असंघटित कामगार आहेत त्याना सामाजिक सुरक्षा देता येईल यावर निर्णय झाला

  • 22 May 2023 04:07 PM (IST)

    रयत क्रांती संघटनेची शेतकऱ्यांची वारी पदयात्रा काही वेळात सुरू होणार

    शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा शेतकऱ्यांची वारी पदयात्रा

    कराडच्या प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून यात्रा निघणार

    पदयात्रेला मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघत आहे यात्रा

    सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास ही पदयात्रा मंत्रालयावर धडकणार

  • 22 May 2023 03:03 PM (IST)

    आदित्य ठाकरे नागपुरात दाखल, कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

    नागपुरात आदित्य ठाकरे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’चे बॅनर

    देशात सत्याच्या बाजूनं असणाऱ्यांवर केंद्रीय यंत्रणांचा दबाव – आदित्य ठाकरे

    घटनाबाह्य सरकारचे घोटाळे – आदित्य ठाकरे

  • 22 May 2023 02:52 PM (IST)

    Salman Khan ला जीवेमारण्याची धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई ‘या’ १० लोकांची करणार हत्या? NIA चौकशीत मोठा खुलासा

    फक्त सलमान खान नाही तर, लॉरेंस बिश्नोई हिच्या निशाण्यावर आणखी १० लोक?

    त्यांची देखील हत्या करणार असल्याचा गँगस्टरने NIA चौकशीत केला खुलासा… वाचा सविस्तर

  • 22 May 2023 02:16 PM (IST)

    पुणे | भाजपविरोधात मविआ आक्रमक होणार , 16 जूनला पुण्यात मविआचा विराट मोर्चा

    लाल महाल ते पुणे मनपा असा निघणार मोर्चा

    महापालिकेच्या समोरच मविआची सभा होणार

    सभेला अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांना येण्यासाठी स्थानिक पदाधिकारी देणार निमंत्रण

    भाजपाच्या काळात महापालिकेत झालेला भ्रष्टाचार, गेल्या दीड वर्षात प्रशासकाच्या काळात निवीदा प्रक्रियेत झालेला भ्रष्टाचार याविरोधात निघणार मोर्चा…

  • 22 May 2023 02:06 PM (IST)

    ठाणे | मुंब्य्रातील शिवाजी नगरमध्ये भीषण आग, तीन ते चार जणांचा मृत्यू

    मुंब्य्रातील शिवाजीनगर येथील चाळीत आग लागल्याची घटना समोर..

    आगीत २ लहान मुले, १ महिला, १ पुरुष यांचा मत्यू झाल्याची माहिती समोर

    जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु ..

    आगीच्या घटनेमुळे आजूबाजूची घरेही रिकामी करण्यात आली आहेत…

    अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू…

  • 22 May 2023 12:54 PM (IST)

    पंतप्रधान मोदी दर महिन्याला महाराष्ट्राचा दौरा करणार

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.

    – या दौऱ्याच्या तारखा लवकरच निश्चित होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 22 May 2023 12:33 PM (IST)

    बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचा नवा फंडा

    – निवडणुकीदरम्यान होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा निणर्य घेतला आहे.

    – मतदान झाल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    – मात्र, शाईऐवजी आता लेझर मार्क लावण्यात येणार आहे.

  • 22 May 2023 12:24 PM (IST)

    अरविंद केजरीवाल घेणार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट

    – आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री हे लवकरच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

    – भाजप विरोधात सर्व पक्ष एकवटत आहेत.

    – त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

  • 22 May 2023 12:20 PM (IST)

    वर्धा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा

    – वर्धा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा सांगितलं आहे.

    – हा मतदारसंघ अनुकूल आहे.

    – राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघात प्राबल्य आहे त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे.

    – वर्धा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी जिंकेल असा दावा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख म्हणाले.

  • 22 May 2023 12:10 PM (IST)

    नाशिकमध्ये कर्ज देण्याच्या नावाखाली 5 कोटींची फसवणूक

    – नाशिकमध्ये लोन देण्याचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आलीय.

    – नवीन सोलर प्लांट तयार करण्याकरिता लोन देण्याचे आमिष राकेश बोराडे यांची फसवणूक करण्यात आली.

    – आरोपींनी कर्ज मजूर झाल्याचा पाच कोटींचा बनावट डीडी दिला.

    – उपनगर पोलिस ठाण्यात बोराडे यांनी या प्रकरणी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

  • 22 May 2023 11:57 AM (IST)

    गंगा नदीच्या घाटावर नाव पालटून 4 जणांचा मृत्यू

    – उत्तर प्रदेशमधील बलिया येथे एक बोट दुर्घटना घडली आहे.

    – 40 जणांना घेऊन जाणारी एका बोट पलटून अपघात झाला.

    – या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला.

    – बुडालेल्या इतर लोकांचे शोध घेण्याचे काम सुरू आहे.

    – हे सर्व प्रवाशी दशक्रिया विधीसाठी आले होते.

  • 22 May 2023 11:03 AM (IST)

    नरेंद्र मोदी देशाला मिळालेले लहरी राजा – संजय राऊत

    लहरी राजा असेच निर्णय घेणार हे गृहीत धरून 2024 पर्यंतचा काळ आपण ढकलला पाहिजे- संजय राऊत

    कर्नाटकसारख्या प्रखर हिंदू राज्याने भाजपचा दारून पराभव केला – संजय राऊत

    अशा प्रकारचे पराभव तुमच्या वाट्याला येणार आहेत – संजय राऊत

  • 22 May 2023 10:56 AM (IST)

    ‘मला न्यायालयावर विश्वास आहे’ : समीर वानखेडे

    अतीत अहमदसारखी घटना मझ्यासोबतही घडू शकते- समीर वानखेडे

    CBI ला सहकार्य केल्याची वानखेडे यांची माहिती

    समीर वानखेडे यांच्या याचीकेवर आज सुनावणी

  • 22 May 2023 10:55 AM (IST)

    IPL 2023 : पराभवानंतर खवळलेल्या Faf du plessis ने टीम इंडियाच्या ‘या’ प्लेयरला ठरवलं विलन

    IPL 2023 : प्लेऑफमधून बाहेर होताच फाफ डु प्लेसिस भडकला. गुजरात टायटन्सने RCB ला बाहेर केलं. गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 6 विकेट राखून विजय मिळवला. वाचा सविस्तर….

  • 22 May 2023 10:54 AM (IST)

    Virat Kohli IPL 2023 : WTC फायनलआधी टीम इंडियाला टेन्शन, विराट कोहलीला दुखापत ?

    Virat Kohli IPL 2023 : टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो. कारण आयपीएल 2023 चा सीजन संपल्यानंतर टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. वाचा सविस्तर….

  • 22 May 2023 10:40 AM (IST)

    मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण, राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता

    राज्याच्या काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

    विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता

    हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

  • 22 May 2023 10:34 AM (IST)

    दोन हजारांच्या नोट बंदीमुळे पेट्रोल पंप चालक त्रस्त

    100 रूपयांचे पेट्रोल टाकण्यासाठी लोकं देत आहेत दोन हजारांची नोट

    सुट्या पैशांच्या उपलब्धतेनुसार 2000 रूपयांची नोट स्वीकारण्याची भूमीका संघटनेतर्फे घेण्यात येणार

    पेट्रोलपंपावर दोन हजारांच्या नोटा देणाऱ्यांची संख्या वाढली

  • 22 May 2023 10:00 AM (IST)

    राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे – जयंत पाटील

    आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे. माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे. – जयंत पाटील

  • 22 May 2023 09:58 AM (IST)

    अवजड वाहनांच्या काचा फोडल्या

    हिंगोली-राज्यमार्गावरून जातांना साईट का देत नाही म्हणून अवजड वाहनांच्या काचा फोडल्या

    औंढानागनाथ / जिंतूर मार्गावरील रात्रीची घटना

    औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव शिवारात अज्ञातांनी फोडल्या काचा

    अद्याप पोलिस स्टेशनला तक्रार नाही

  • 22 May 2023 09:47 AM (IST)

    अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

    अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटल्याने पाण्याची नासाडी

    अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर येथे मालवाडा, लोणाग्रा, हातला, अंत्री या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी अंदाजे तीन वर्ष आगोदर अडीच कोटी रुपये खर्च करून शासनाने नवीन पाईपलाइन टाकली होती. पण गेल्या दोन दिवसापासून ही पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होतांना दिसत असून आली आहे. अद्यापही पंचायत समिती प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची लिकेज बंद करण्याची उपाय योजना अजूनही करण्यात आलेली नाही आहे,

  • 22 May 2023 09:38 AM (IST)

    समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत

    समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत

    समीर वानखेडे-माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला करू शकतो

    मीडियाच्या रूपाने माझ्यावर हल्ला होऊ शकतो – समीर वानखेडे

    एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या सीबीआयच्या दोन दिवसांच्या चौकशीनंतर आज त्यांच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

    समीर वानखेडे म्हणाले की, माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, जे काही कायदेशीर आहे ते मी न्यायालयात सांगणार आहे.

    सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या, आम्ही सीबीआयला शुभेच्छा देतो.

    सुरक्षेचा प्रश्न माझ्यासमोर आहे, मी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे सुरक्षेची मागणी करणार आहे.

    पोलिसांना असेही सांगण्यात आले आहे, सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर सतत धमक्या येत आहेत, या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्तांशी एकत्रित चर्चा करणार आहे.

  • 22 May 2023 09:37 AM (IST)

    हौशी पर्यटकाने युवकाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच आग लावल्याचा प्रकार

    वसई किल्ल्यातील येणाऱ्या एका हौशी पर्यटकाने युवकाने इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवण्याच्या नादात थेट किल्ल्यातील चर्चमध्येच आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे वसई किल्ल्याची विटंबना झाल्याचा आरोप किल्ला प्रेमींनी केला आहे. या प्रकारावर पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असून या विटंबना करणाऱ्या स्थानिक तरुणांवर कठोर कारवाईवी करावी अशी मागणी होत आहे.

  • 22 May 2023 09:27 AM (IST)

    मुंबईत चोरलेले दागिणे भुसावळमध्ये सापडले

    मुंबई कुर्ला येथून 28 लाख रुपये किमतीचे अर्धा किलो सोन्याचे दागिने चोरून पसार झालेल्या आरोपीस भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दागिन्यांसह अटक केली आहे.

  • 22 May 2023 09:23 AM (IST)

    भुसावळ येथे तापी नदी पात्रात दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू 

    जळगाव
    भुसावळ येथे तापी नदी पात्रात दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
    मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
    दानिश शेख व अंकुश ठाकूर असे मृत मुलांचे नाव
  • 22 May 2023 09:22 AM (IST)

    तापी बंधाऱ्याची जलपातळी खालावली केवळ १० दिवसांचा जलसाठा शिल्लक 

    शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाऱ्यात केवळ दहा ते ११ दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यामुळे शहरात आगामी काळात आवर्तन न मिळाल्यास पुन्हा टंचाईचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पालिका प्रशासन आता व हतनूर धरणाकडे आवर्तन मिळण्यासाठी मागणी नोंदवणार आहे. शहरात वेळेत आवर्तन पोहोचल्यास टंचाई होणार नाही..
  • 22 May 2023 09:12 AM (IST)

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एप्रिल महिन्यापासून प्रति सदनिका साठ रुपये उपयोगिता कर आणि कचरा संकलन सेवा कर आकारायला सुरुवात

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून एप्रिल महिन्यापासून प्रति सदनिका साठ रुपये उपयोगिता कर आणि कचरा संकलन सेवा कर आकारायला सुरुवात झाली

    -त्याला नागरिकांकडून मोठा विरोध असला तरी हा कर भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं समोर आलंय

    – आत्तापर्यंत महापालिकेने 14 कोटी रुपये उपयोगिता कर आणि कचरा संकलन कर या माध्यमातून मिळवल्याचं स्पष्ट झालं आहे

  • 22 May 2023 09:11 AM (IST)

    पुण्यात अनधिकृत होर्डिंग चा मुद्द्यावर अजूनही तोडगा निघलेला नाही

    पुण्यात अनधिकृत होर्डिंग चा मुद्द्यावर अजूनही तोडगा निघलेला नाही

    पुण्यासह रावेत येथे झालेल्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर, पुणे जिल्ह्यात विविध तालुक्यांत १,४४० होर्डिंग्ज

    त्यापैकी १,३७० होर्डिंग्ज विनापरवानगी असल्याची धक्कादायक माहिती

    यातील १,२३० होर्डिंग्जचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले नाही

    सुमारे एक हजार होर्डिंग्ज विनापरवाना उभारल्याने त्यांच्या मालकांना नोटिसा देण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे

  • 22 May 2023 08:57 AM (IST)

    प्रदीप कुरुलकर प्रकरणानंतर डीआरडीओ अलर्ट मोडवर

    इंटरनेट वापरताना काळजी घ्या

    अधिकाऱ्यांनी सायबर शिस्त पाळावी, आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेले फोन कॉल्स उचलू नका

    अनोळखी व्यक्तीकडून संपर्क करण्याचा प्रयत्न झाला तर तत्काळ माहिती द्या

    अधिकाऱ्यांनी सोशल मिडीया वापरताना काळजी घ्यावी

    डीआरडीओचे प्रमुख डॉ. व्ही कामत यांच्या सूचना

    डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणानंतर अधिकाऱ्यांना सक्त सूचना

  • 22 May 2023 08:56 AM (IST)

    Shubman Gill message to MS Dhoni: शुभमन गिलने एमएस धोनीला ललकारल, चेन्नईमध्ये तुम्ही….

    GT vs CSK Qualifier 1 IPL 2023 : एकट्या शुभमन गिलने RCB ला IPL 2023 मधून बाहेरचा रस्ता दाखवला. आता त्याने एमएस धोनीला ललकारलय. वाचा सविस्तर….

  • 22 May 2023 08:55 AM (IST)

    Mumbai Indians Playoff : मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये, आता फक्त एकच टेन्शन, लवकर यावर तोडगा हवाच

    Mumbai Indians Playoff : तेव्हाच मुंबई इंडियन्सला ‘दुनिया हिला देंगे’ शक्य होईल. मुंबईच सहाव्यांदा ट्रॉफी उंचावण्याचा स्वप्न आहे. या मार्गात फक्त एक अडथळा आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला यावर काम कराव लागेल. वाचा सविस्तर….

  • 22 May 2023 08:53 AM (IST)

    पुण्यातील येरवडा येथील जलतरण तलावात बुडून 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    शिरीष पंडित सुतार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव

    त्याच्यासोबत असलेल्या इतर तरुणांनी त्याला तलावातून बाहेर काढलं

    तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं

  • 22 May 2023 08:47 AM (IST)

    आसाम | गोलपारा जिल्ह्यात पोलिसांकडून 25 लाख रुपयांच्या कफ सिरपच्या बाटल्या जप्त

    याप्रकरणी तीन जणांना अटक

    पोलिसांनी पैकान परिसरात दोन वाहने अडवली आणि झडती घेतली

    वाहनांतून 5075 कफ सिरपच्या बाटल्या सापडल्या

  • 22 May 2023 08:41 AM (IST)

    ‘द केरळ स्टोरी’वर जया किशोरी यांची मोठी प्रतिक्रिया

    प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांनी ‘द केरळ स्टोरी’वर मांडलं मत

    हिंदू राष्ट्र आणि राजकारण या विषयांवरही झाल्या मोकळेपणे व्यक्त, वाचा सविस्तर..

  • 22 May 2023 08:35 AM (IST)

    “मला माशीसारखं बाजूला काढलं”; ‘तारक मेहता..’च्या रिटा रिपोर्टरकडून निर्मात्यांवर गंभीर आरोप

    जेनिफर मिस्त्री, मोनिका भदौरियानंतर आता अभिनेत्री प्रिया अहुजाचे ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर आरोप

    पतीने मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांनी काम न दिल्याची तक्रार, वाचा सविस्तर..

  • 22 May 2023 08:28 AM (IST)

    मान्सूनच्या आगमनापूर्वी महाराष्ट्रात उष्णतेची लाट

    8 ते12 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं होणार आगमन

    बंगालच्या उपसागरात मान्सूनचं आगमन

    महाराष्ट्रात येण्यासाठी 20 दिवस वाट पाहावी लागणार

    राज्यातील काही शहरांत तापमान जवळपास 44 अंशाच्या जवळ

    परभणी आणि अकोल्यात तापमान 44 अंशावर

    विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात नागरिक उकाड्याने हैराण

  • 22 May 2023 08:22 AM (IST)

    एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे मुंबईच्या दिशेने रवाना

    सीबीआयच्या 2 दिवसांच्या तपासानंतर समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी

  • 22 May 2023 08:17 AM (IST)

    नाशिक | ठेकेदाराकडे फाईल सापडल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा

    जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला इशारा

    यापुढे ठेकेदाराकडे फाईल आढळल्यास फाईलशी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर होणार गुन्हा दाखल

    याअगोदर फाईलचा प्रवास वेळेवर व्हावा म्हणून ठेकेदार फाईलच्या मागावर असत

  • 22 May 2023 08:09 AM (IST)

    नाशिक | रोजगार मेळाव्यात 255 आदिवासी उमेदवारांची प्राथमिक निवड

    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि जिल्हा कौशल्य विकास यांच्या माध्यमातून आदिवासी युवक युवकांसाठी करण्यात आले होते रोजगार मेळाव्याचे आयोजन

    या युवकांची लवकरच अंतिम निवड होऊन नियुक्तीपत्र दिले जाणार

    या मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा, यशस्वी स्किल्स, आदित्य बिर्ला कॅपिटल, डेटा मॅटिक्स सोल्युशन्स या कंपन्यांचा सहभाग

  • 22 May 2023 08:02 AM (IST)

    नाशिक | नाशिक महामार्गावर हवाई सेवेचे होणार ब्रँडिंग

    ‘मी नाशिककर’ या संस्थेचा राहणार पुढाकार

    जवळपास 61 फलकांद्वारे करण्यात येणार ब्रँडिंग

    नाशिकला येणाऱ्या नागरिकांना विविध ठिकाणी जाणाऱ्या विमानसेवेची मिळणार माहिती

  • 22 May 2023 07:57 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी 5 नावांचा प्रस्ताव राज्यपालांना पाठवला

    आता 26 तारखेला राज्यपाल रमेश बैंस घेणार पाच जणांच्या मुलाखती

    5 नावांपैकी चारजण पुणे विद्यापीठातीलचं प्राध्यापक

    आयआयटी मुंबईत पार पडल्या मुलाखती

    27 पैकी 5 नावांचा प्रस्ताव राज्यपाल रमेश बैंस यांना पाठवला

    पुणे विद्यापीठाला लवकरच मिळणार नवीन कुलगुरू

  • 22 May 2023 07:44 AM (IST)

    पुण्यातील वाघोलीतील वाघेश्वर मंदिरात आता तोकड्या कपड्यांसह आलेल्या भाविकांना आतमध्ये प्रवेश नाही

    वाघेश्वर प्रतिष्ठानं घेतला निर्णय

    तोकडे कपडे घालून भाविकाला प्रवेश दिला जाणार नाही

    पुरुषांनादेखील शॉर्ट पँट घालून प्रवेश दिला जाणार नाही

    मंदिर प्रशासनाने मंदिराच्या बाहेर लावला बोर्ड

    नगर रस्ता परिसरात असणाऱ्या या मंदिरात मोठी गर्दी भाविकांची होत असते

  • 22 May 2023 07:24 AM (IST)

    अहमदनगर -कर्जत बाजार समितीच्या निकालाची आज पुन्हा होणार मतमोजणी

    दोन्ही गटाच्या 9-9 जागा आल्याने मोठा पेज निर्माण झाला होता

    मात्र आता यावर दोन जागांसाठी राम शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने पुन्हा मतमोजणी

    सोसायटी सर्वसाध आणि महिला मतदारसंघासाठी होणार पुन्हा मतमोजणी

    आज 22 तरखेला होणार पुन्हा मतमोजणी, सकाळी 8 वाजता सुरु होणार मतमोजणी

    मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष, तर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला

  • 22 May 2023 07:23 AM (IST)

    पुण्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलं

    20 दिवसांत जवळपास 175 तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये नोंद

    दिवसाला सरासरी 9 घटना शहरात महिला अत्याचाराच्या घडतायेत

    यामध्ये महिलांना हिन वागणूक देणे, तिचा छळ करणे,बलात्कार, विनयभंग, अपहरण अशा वेगवेगळ्या घटनांच्या तक्रारी येतायेय

    चार महिन्यात 775 गुन्हे दाखल करण्यात आले

  • 22 May 2023 07:22 AM (IST)

    मध्य रेल्वेकडून ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा पूर्ण

    धीम्या लोकलसाठी येथे स्वतंत्र रेल्वे स्थानक उभारण्यात येणार

    भविष्यात ‘ठाणे लोकल’ नव्या स्थानकातून सोडण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन

    पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या मनोरुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे स्थानक उभारण्यात येणार आहे.

    मनोरुग्णालयाची एकूण जागा 6 हेक्टर असून, यापैकी 1.3 हेक्टर जागेत नव्या स्थानकाची उभारणी होणार आहे

    नव्या ठाणे स्थानकामध्ये होम फलाटासह दुतर्फा तीन फलाट असतील

    स्थानकात तीन पादचारी पूल उभारण्यात येणार असून, यापैकी दोन पुलांची जोडणी फलाटांना आणि एका पुलाची जोडणी पूर्व-पश्चिम असेल.

    स्थानकात 250 बाय 30 मीटर उन्नत डेक उभारण्यात येणार असून, हा डेक महामार्गाला जोडण्यात येणार आहे

    त्यासोबतच सरकते जिने, लिफ्ट या आधुनिक सुविधा फलाटांवर असतील

  • 22 May 2023 07:20 AM (IST)

    आदित्य ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

    कोराडी वीज प्रकल्प परिसरातील प्रदूषित गावांना भेट देणार

    आदित्य ठाकरे नांदगाव, वराडा गावाला भेट देणार

    आदित्य ठाकरेंसोबत असणार पर्यावरण तज्ज्ञ लिना बुद्धे

    आदित्य ठाकरे गावकऱ्यांशी संवाद साधणार

  • 22 May 2023 07:14 AM (IST)

    राज्यपाल रमेश बैस महाबळेश्वर मुक्कामी, आजपासून पाच दिवसाचा सातारा दौरा

    राजभवन येथील अधिकृत निवासस्थान असलेल्या गिरीदर्शन या बंगल्यामध्ये करणार मुक्काम

    या दौऱ्यात ते जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार

    श्रीक्षेत्र महाबळेश्‍वर मंदिरासह बेल एअर रुग्णालय तसेच प्रेक्षणीय स्थळांनाही ते भेटी देणार

    सकाळी 11च्या सुमारास हेलिकॉप्टरने वाई येथील किसन वीर कॉलेजच्या मैदानावरील हेलिपॅडवर आगमन होईल

    तेथून ते बेल एअर हॉस्पिटलला भेट देतील. त्यानंतर 11.30च्या दरम्यान पुस्तकाचे गाव भिलारला भेट देतील

    त्यानंतर 12.45च्या सुमारास ते राजभवन महाबळेश्वरला जातील आणि तेथे मुक्कामी राहतील

Published On - May 22,2023 7:11 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.