Maharashtra Breaking Marathi News Live | मोदींनी खेळाडूंचं म्हणणं ऐकून घ्यावं, राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

| Updated on: Jun 01, 2023 | 7:15 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | मोदींनी खेळाडूंचं म्हणणं ऐकून घ्यावं, राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 298 वी जयंती. भाजपचे आममदार राम शिंदे यांच्याकडून सकाळी 5.30 वाजता महादेवाची पूजा. पूजेनंतर अहिल्यादेवींच्या स्मारकाचं दर्शन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. निळवंडे धरणाच्या कालव्यांना पाणी सोडून घेतली जाणार चाचणी. सोलापूर जिल्ह्यातील विरवडे टोल नाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा. टोल प्रशासनाने 8 पैकी केवळ 2 लेन सुरू ठेवल्याने वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 May 2023 08:41 PM (IST)

    अहिल्यादेवींचं नाव दिल्याच्या निर्णयाचं स्वागत : रोहित पवार

    अहिल्यादेवींचं नाव दिल्याच्या निर्णयाचं स्वागत

    अहिल्यादेवींच्या नामकरणासाठी अनेकांचं योगदान

    त्यामुळे आता यावर कोणी राजकारण करू नये

    या नामकरणाचं श्रेय प्रत्येकाला जाते

  • 31 May 2023 08:28 PM (IST)

    झूकना लोगों को पसंद नाही, इतिहास होगा मेरा भी नाम आएगा : पंकजा मुंडे

    झूकना लोगों को पसंद नाही, इतिहास होगा मेरा भी नाम आएगा

    मुंडे साहेब म्हणायचे की मी झुकणार नाही

    झुकणार नाही म्हणजे अहंकार नाही तर स्वाभिमान

    ज्यांच्या मागे ताकद आहे त्यांच्या मागे उभं राहा

    कार्यक्रम हायजँक करायला सुरूवात झाली आहे

    मला कशाचीची भीती वाटतं नाही

  • 31 May 2023 08:13 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये गारांसह पावसाची हजेरी, नागरिक भयभीत

    पिंपरी चिंचवडमध्ये गारांसह पावसाची हजेरी

    काही ठिकाणी तर गारांचा सडाच पडला

    नजर जाईल तिकडे गाराच गारा

    गारांचा पाऊस पडत असल्यामुळे नागरिक भयभीत

  • 31 May 2023 07:18 PM (IST)

    Raj Thackeray | राज ठाकरे यांचं कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन पंतप्रधानांना पत्र

    राज ठाकरे यांचं कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन पंतप्रधानांना पत्र

    कुस्तीपटूंच्या आंदोलनात आपण लक्ष घालावं, ठाकरेंची मोदींना विनंती

    आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा, मनसेप्रमुखांची पंतप्रधानांना विनंती

    वाचा अधिक | Raj Thackeray On Wrestler Protest | “कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना…”, राज ठाकरे यांचं पंतप्रधान मोदी यांना पत्र

  • 31 May 2023 06:18 PM (IST)

    Wrestler Protest | कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल घ्यावी, प्रीतम मुंडे यांचा सरकारला घरचा आहेर

    कुस्तीपटूंच्या आंदोलनावरुन खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडून मोदी सरकारला घरचा आहेर

    कुस्तीपटूंच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहिजे, प्रीतम मुंडे याची प्रतिक्रिया

    दखल घेतली जात नसेल तर ही घटना स्वागतार्ह नाही, प्रीतम मुंडे यांची रोखठोक भूमिका

    लोकशाहीमध्ये ही घटना स्वागतार्ह नाही : प्रीतम मुंडे

  • 31 May 2023 06:13 PM (IST)

    J J Hospital | डॉ तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांचे राजीनामे, नक्की कारण काय

    जे जे रुग्णालयात विविध पदावर काम करणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे

    डॉ तात्याराव लहाने, रागिणी पारेख यांच्यासहित 9 जणांचे राजीनामे

    अधिष्ठाता मानसिक त्रास देत असल्याची वरिष्ठ डॉक्टरांची तक्रार

  • 31 May 2023 06:06 PM (IST)

    मुंब्रा शहरातील नालेसफाईचे तीनतेरा

    मुंब्रा शहरातील नालेसफाईचे तीनतेरा

    शहरातील मुख्य नाले अजूनही तुडुंब भरलेलेच

    ठाणे महापालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच

  • 31 May 2023 05:56 PM (IST)

    नंदू जोशी याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

    डोंबिवली : डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

    फ्लॅट खाली करण्यासाठी शारीरिक सुखाची वारंवार मागणी केल्याचा महिलेने केला आरोप

    डोंबिवली मानपाडा पोलिसानी गुन्हा दाखल करत पोलिसांनी सुरू केला तपास

    पीडित महिला एका पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असून दोघांमध्ये वाद सुरु आहे

  • 31 May 2023 05:36 PM (IST)

    महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने वस्त्र संहिता जारी

    राज्यभरातील मंदिरांकडून आता त्याला प्रतिसाद मिळताना दिसतो

    नागपुरात सुरुवातीला चार मंदिरांनी या पद्धतीची वस्त्रसंहिता लागू केली

    नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरांनी वस्त्र संहिता लागू केली

  • 31 May 2023 05:12 PM (IST)

    पुण्यात मुलीच्या हत्येविरोधात आंदोलन

    दिल्लीत झालेल्या साक्षी या अल्पवयीन मुलीच्या हत्येच्या विरोधात आंदोलन

    हिंदू महासंघ पुण्यातील गुडलक चौकात वाहणार साक्षीला श्रद्धांजली

    दोन दिवसापूर्वी दिल्लीत झाली होती एका अल्पवयीन मुलीची हत्या

    त्या विरोधात हिंदू महासंघाचे आंदोलन

  • 31 May 2023 04:52 PM (IST)

    आखाड्याबाहेर कुस्तीचे डावपेच सुरुच

    कुस्तीपटूंच्या आरोपांवर खासदार बृज भूषण शरण सिंह यांची प्रतिक्रिया

    कार्यकाळ पूर्ण झाल्याची दिली माहिती

    काही अनुचित आढळल्यास अटकेच्या कारवाईची दिली माहिती

  • 31 May 2023 04:44 PM (IST)

    अहिल्यादेवींची 300 वी जयंती होणार जय्यत

    जयंती जगाला हेवा वाटेल अशी साजरी करु

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

    चौंडीतील सभेत दोन मोठ्या घोषणा

  • 31 May 2023 04:41 PM (IST)

    चौंडीत राजकारण करणाऱ्यांचं सरकार 20 दिवसांत घालवलं

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोहित पवार यांना टोला

    नाव बदलण्याचा निर्णय आमच्या कार्यकाळात होत आहे हे आमचे भाग्य

    मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाची दिली माहिती

  • 31 May 2023 04:38 PM (IST)

    अहमदनगर नव्हे अहिल्यादेवी होळकरनगर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौंडीतील कार्यक्रमात मोठी घोषणा

    हे राज्य जनतेचे, सर्वसामान्य लोकाचं आहे

    सर्वसामान्यांना आम्ही न्याय देणार

  • 31 May 2023 04:35 PM (IST)

    अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी होळकरनगर होणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

    राज्य सरकारने निर्णय घेतल्याचे केले जाहीर

    उपमुख्यमंत्री आणि मी एकत्रच निर्णय घेतो

  • 31 May 2023 04:30 PM (IST)

    धनगर समाजाला आमच्या सरकराने अनुदान दिले

    माविआ सरकारच्या काळात निधी मिळाला नाही

    फडणवीस यांनी साधला निशाणा

    अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार-फडणवीस

  • 31 May 2023 04:27 PM (IST)

    अहमदनगरचे नाव अहिल्यानगर होणार

    उपमुख्यमंत्र्यांनी मागणीचा केला उल्लेख

    छत्रपती संभाजीनगर, धाराशीव झाले, हे नाव पण बदलण्यात यावे

    हे हिंदुत्ववादी सरकार आहे -फडणवीस

    राम शिंदे, गोपीचंद पडाळकरांच्या मागणीला दिला दुजोरा

  • 31 May 2023 04:25 PM (IST)

    राजामाता अहिल्यादेवी यांनी अखिल भारतात जीर्णोद्धार केला

    स्वतःच्या तिजोरीतून जीर्णोद्धार केला

    राज्याच्या तिजोरीतील रक्कमेला त्यांनी कधी हात लावला नाही

    देशातील मंदिरांचे जीर्णोद्धाराचे मोठे काम अहिल्यादेवी यांनी केली-फडणवीस

  • 31 May 2023 04:23 PM (IST)

    हिंदवी स्वराज्याचा विस्तार माता अहिल्यादेवी यांनी भारतभर केला

    त्यांनी न्यायप्रिय शासन चालविले

    अहिल्यादेवींनी भेदभाव केला नाही

    जनतेसाठी नवीन योजना आणणार

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौंडीत

  • 31 May 2023 04:19 PM (IST)

    सुषमा अंधारे यांच्या कार्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

    शिरसाटांवर कारवाई होणार नव्हती

    वैभाव नाईक यांची क्लिनचिटवर पहिली प्रतिक्रिया

  • 31 May 2023 04:17 PM (IST)

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर करा

    अहमदनगरचे नाव बदलण्याची चर्चा

    मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

    चौंडी येथील कार्यक्रमात राम शिंदे यांची मागणी

  • 31 May 2023 04:07 PM (IST)

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमानप्रकरणी कारवाईचे निर्देश

    संबंधित वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले

    अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी केली होती कारवाईची मागणी

    महापुरुषांचा अवमान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक

  • 31 May 2023 04:04 PM (IST)

    प्रचंड पोहचले दिल्लीत

    नेपाळचे पंतप्रधान पुष्प दहल प्रचंड भारतात

    पदभार सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच परदेश दौरा

    दौऱ्यात विविध विषयावर चर्चा होणार

  • 31 May 2023 03:57 PM (IST)

    मी सांगतो आणि फडणवीस तिजोरी उघडतात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    निळवंडे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

    राज्याच्या तिजोरीची चावी फडणवीस यांच्याकडे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • 31 May 2023 03:43 PM (IST)

    डोंबिवली | डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची गुंडागर्दी

    दोन फेरीवाल्यांनी एका पादचाऱ्याला लाथाबुक्की, बांबूने केली बेदम मारहाण

    जितलाल रामआश्रय वर्मा ,श्रीपाल रामआश्रय वर्मा अशी मारहाण करणाऱ्या आरोपी नावे

    डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 31 May 2023 03:35 PM (IST)

    कोल्हापूर | दिवसभराच्या उकाड्यानंतर कोल्हापुरात पावसाची हजेरी

    ढगांच्या गडगटासह बरसला पाऊस

    अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांची तारांबळ

    जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाची हजेरी, पावसाचा हजेरीने बळीराजा सुखावला

    मशागतीच्या कामाला येणार वेग

  • 31 May 2023 03:17 PM (IST)

    कोल्हापूर | कोल्हापुरात भरदिवसा तलवारीने हल्ला

    हल्लेखोराने भर चौकात तरुणावर तलवारीने केले सपासप वार

    हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, प्रकाश बोडके असे जखमी तरुणाचे नाव

    जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

  • 31 May 2023 03:05 PM (IST)

    औरंगाबादचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस

    औरंगाबाद शहरातील घरकुल घोटाळा प्रकरणी नोटीस

    घरकुल घोटाळा प्रकरणी सुनील चव्हाण यांची होणार चौकशी

    औरंगाबाद शहरातील चाळीस हजार घरांच्या निविदा प्रक्रियेत झाला होता घोटाळा

    घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची होणार चौकशी

  • 31 May 2023 03:05 PM (IST)

    कोल्हापुरात भरदिवसा तलवार हल्ला

    हल्लेखोराने भरचौकात तरुणावर तलवारीने केले सपासप वार

    हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

    प्रकाश बोडके असे जखमी तरुणाचे नाव

    पूर्ववैमन्सामधून हल्ला झाल्याची प्रथमिक माहिती

    जखमी तरुणाला उपचारासाठी सिपीआरमध्ये केले दाखल

  • 31 May 2023 03:04 PM (IST)

    2024 ला राष्ट्रवादीकडे विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट मागणार – रुपाली चाकणकर

    खडकवासला मतदारसंघातून तिकिट मागणार

    शिरसाटांना क्लिनचीट दिल्याचा अहवाल नाही

  • 31 May 2023 03:02 PM (IST)

    औरंगाबाद | तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस

    औरंगाबाद शहरातील घरकुल घोटाळा प्रकरणी नोटीस

    घरकुल घोटाळा प्रकरणी सुनील चव्हाण यांची होणार चौकशी

    औरंगाबाद शहरातील चाळीस हजार घरांच्या निविदा प्रक्रियेत झाला होता घोटाळा

    घोटाळा प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची होणार चौकशी

  • 31 May 2023 02:57 PM (IST)

    पाण्याच्या खाली बॉटलमध्ये नळाचे किंवा विहिरीचे पाणी भरून विकणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांची कारवाई

    खाली बॉटलमध्ये पाणी भरण्याच्या ठिकाणावर धाड टाकत केली कारवाई

    रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या झाडीमध्ये करत होते हे काम

    कचरा वेचणाऱ्यांकडून बॉटल घ्यायचे त्यासाठी लागणारे झाकण बाजारातून विकत आणत होते

    बॉटलमध्ये पाणी भरून नवीन झाकण लावून त्याला सीलबंद करायचे

    शहराच्या बाहेर रेल्वे यार्ड जवळ सिग्नलवर रेल्वे थांबली की तिथे या बोटल्स 15 ते 20 रुपये भावाने ते प्रवाशांना  विकायचे

    रेल्वे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली तर एकाच शोध सुरू

  • 31 May 2023 02:56 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनची धान खरेदी सुरू

    आदिवासी विकास महामंडळ चार तालुक्यात धान खरेदी करते

    आतापर्यंत धान खरेदी सुरू झाली नाही

    शेतकरी वाऱ्यावर

  • 31 May 2023 02:55 PM (IST)

    पंतप्रधानांचा डेप्युटी सेक्रेटरी असल्याचा बनाव

    तोयता आयएएस अधिकाऱ्याला पुण्यात अटक

    पुण्यातील एका कार्यक्रमात आरोपी आयएएस अधिकारी बनून फिरत होता

    मी पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आहे असं सांगत कार्यक्रमाला आरोपींनी लावली होती हजेरी

    पुण्यातील बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊन्डेशन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जम्मू-कश्मीर येथे मदतीसाठी पाठविण्याकरीता रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा होता

    याच कार्यक्रमात हा आरोपी पंतप्रधान कार्यालयातील डेप्युटी सेक्रेटरी असल्याचे सांगत करत होता बनाव

    वासुदेव निवृत्ती तायडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

    या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात वासुदेव विरोधात कलम 419, 170 अन्वये गुन्हा दाखल

  • 31 May 2023 02:47 PM (IST)

    नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 दिवस मनाई आदेश लागू

    30 मे ते 13 जून दरम्यान 15 दिवस हा मनाई आदेश लागू राहणार

    या कालावधीत नागरिकांना कोणतेही दाहक आणि स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही

    मोर्चा, आंदोलन, उपोषण यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक करण्यात आलीय

    नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत

  • 31 May 2023 02:38 PM (IST)

    2 हजारांच्या नोटबंदीचा फायदा घेऊन सोने व्यापाऱ्याची फसवणूक करण्याचा प्रयत्न

    लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांकडून दोन जणांना अटक

    झवेरी बाजार येथील यशोदा जगदीश अँड सन्सचे सोने व्यापाऱ्याची फसवणूक करणारे दोघेजण अटकेत

    50 लाखांचे दागिने बनवून देतो असं सांगून ऑर्डर द्यायच्या आधी 42 लाख घेऊन फरार झाले

    दोन आरोपींना राजस्थानमधून अटक

    आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून स्वीकारलेल्या सर्व नोटा जाणूनबुजून 2 हजारच्या स्वीकारल्या होत्या

    2 हजारांच्या नोटा घेऊन पसार झाल्यास पोलीस तक्रार होणार नाही असा आरोपींचा भ्रम होता

    पोलिसांनी आरोपीना अटक करून 35 लाख रुपये हस्तगत केले आहेत

  • 31 May 2023 02:36 PM (IST)

    कारंजा तालुक्यातील चिंचोली गावात वादळामुळे झालेल्या नुकसानीची आमदार दादाराव केचे यांच्याकडून पाहणी

    काही दिवसापूर्वी अचानक आलेल्या पाऊस
    वादळात काही घरांचे, गोठ्यांचे छत उडून झाले नुकसान
    आमदार केचे यांनी भेट देत घेतली नुकसानीची माहिती
    अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती
  • 31 May 2023 02:35 PM (IST)

    कोल्हापूरच्या वडणगे इथं दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

    मधुमेह आजारावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यावर मृत्यू झाल्याचा दावा

    मधुकर कदम आणि जयश्री कदम असं मृत पती-पत्नीची नावं

    पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापुरातीलच एका आयुर्वेदिक डॉक्टरांकडून घेतले होते औषध

    औषध घेतल्यानंतर वीस मिनिटांनी दोघांनाही त्रास जाणू लागला

    दूध आणण्यासाठी गेलेले मधुकर कदम डेअरीच्या दारातच कोसळले

    तर जयश्री कदम या घरातच बेशुद्ध पडल्या

    डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले

  • 31 May 2023 02:34 PM (IST)

    स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की, शिंदेंच्या सर्व खासदारांना तिकीट मिळणार नाही – वैभव नाईक

    शिंदे गटात आणि भाजपमध्ये धुसपूस आहे

    शिंदे यांचे खासदार भाजपमध्ये जातील

    काही खासदारांची तिकीट नाव बदलून भाजप त्यांच्याकडे मागेल

    आणि निश्चितपणे जे शिंदे सोबत 12 खासदार गेलेत ते सगळे तिकीट मिळण्यापासून वंचित राहतील

  • 31 May 2023 02:31 PM (IST)

    शोले स्टाईल आंदोलन करणाऱ्या तरुणावर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

    महेंद्र डावखर या तरुणाने काल शिवाजीनगर परिसरात पुलाच्या खांबावर चढून आंदोलन केले होते

    यावेळी प्रशासनाला वेठीस धरणे, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    जुन्नर तहसीलदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी केले होते आंदोलन

  • 31 May 2023 02:31 PM (IST)

    येणाऱ्या निवडणुकीत शिंदेंचे आमदार गेले ते देखील इतिहास जमा होतील – वैभव नाईक

    केंद्र सरकारकडून महिलांवरती अन्याय अत्याचार थांबतील असं कुठलंही विधान करण्यात येत नाहीये

    दिल्लीतील कुस्तीपटू बघा महिनाभरापासून उपोषण करतात त्यांना न्याय मिळत नाही

    शिरसाट यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार नाही हे आधीपासूनच ठाऊक होतं

    म्हणूनच आम्ही आवाज उठवत होतो

    सुषमा अंधारे या पद्धतीने काम करतात, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे

    कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे

    याआधी सुद्धा काही आमदार घेऊन नारायण राणे यांनी शिवसेना सोडली

    पण त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली

    त्यांच्यासोबत जे आमदार गेले ते इतिहासात जमा झाले

    जी कोकणामध्ये विकास काम मंजूर केली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी स्टे दिलाय

    हा स्टे मुख्यमंत्र्यांनी उठवला पाहिजे आणि लोकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या पाहिजेत

    भुमरेना त्यांच्या मतदारसंघातले किती आमदार विचारतात हे त्यांनी सांगावं

    संजय राऊतांवर टीका करण्यापेक्षा तुमचा कार्यकाल कसा असेल हे तुम्हाला जनता दाखवेल

    भाजपला आठवणी ही आमची भूमिका आहे आमच्या आमच्यात कुठलेही धुसफूस नाही

  • 31 May 2023 02:27 PM (IST)

    पुणे जिल्ह्यातील वेल्हा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन

    पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
    उद्घाटन करून पाटलांकडून इमारतीची आणि परिसराची पाहणी
    कार्यक्रमासाठी वेल्हा तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित
  • 31 May 2023 02:26 PM (IST)

    विरोधी पक्ष एकत्र आले तरी 2024 ला काही फरक पडणार नाही – निलेश राणे

    शरद पवार केंद्रासाठी नेहमी आघाडी करतात पण काही होत नाही

    काँग्रेसमध्ये केंद्रीयमंत्री असतानाही पवारांनी असा प्रयोग केला होता

    विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याला गांभीर्याने घेऊ नका

  • 31 May 2023 02:24 PM (IST)

    2014 ते 2023 पर्यंत मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताने सुवर्णकाळ अनुभवला त्याची माहिती देणार – नितेश राणे

    भारताची प्रतिमा आज जगामध्ये महासत्ताच्या दिशेने जाणारा देश

    संकटकाळात विविध देशांना मदत करणारा देश अशी नवीन ओळख तयार केलीय

    काँग्रेसच्या काळात देशाची एक वेगळी प्रतिमा होती

    भ्रष्टाचाराने बरबटलेला देश अशी तेव्हा ओळख होती

    शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांना त्यांचा मान देणं, सन्मान देणं हे या सरकारने केलं

    काँग्रेस सरकारच्या काळात योजना जाहीर व्हायच्या पण योजनांचा पैसा लालफितीत अडकून पडायच्या

    आर्थिक समृद्धी दारात आणण्याचे काम मोदी सरकारच्या हातून झालेलं आहे.

    2014 च्या अगोदर रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो मच्छीमारांसाठी चुकून प्रस्ताव यायचे

    मुंबई गोवा महामार्गाचा विकास याच कालावधीत झाला त्यामुळे मोठया संख्येने पर्यटक येऊ शकले

    मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजनाचे मोठ्या संख्येने देशात लाभार्थी झाले आहेत

    सबका साथ सबका विकास या घोषणेमुळे धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला

    ना खाऊंगा ना खाणे डुंगा यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला

    कोरोना काळात विविध देश संघर्ष करत होते, तेव्हा व्हॅक्सिन पाठवून देशाला सन्मान मिळवून दिला

    अमेरिकेचे अध्यक्ष मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे आले

    जगभरात भारताची प्रतिमा बदलली आहे

    या 9 वर्षात भारताला खऱ्या अर्थाने महासत्ताकडे घेऊन जाण्याचे काम सुरू आहे

    महाराष्ट्र्राला काँग्रेसच्या काळात वेगळी वागणूक मिळायची

    पण या 9 वर्षात महाराष्ट्राने जे काही मागितलं त्याच्या दुप्पट देण्याचे काम मोदी सरकारच्या काळात झालं

    ग्रामीण भागाचा मोठा विकास या 9 वर्षाच्या काळात झाला

  • 31 May 2023 02:21 PM (IST)

    निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या चाचणीचा शुभारंभ

    मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री निळवंडे धरण परिसरात हेलिपॅडवर दाखल

    बटन दाबल्यानंतर डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाणार

    तब्बल 53 वर्षानंतर निळवंडे धरणाच्या उद्घाटनाला मुहूर्त

    8.32 टीएमसी क्षमता असलेल्या धरणाच्या माध्यमातून 68000 हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

    नाशिक आणि अहमदनगरच्या 182 गावांना मिळणार संजीवनी

  • 31 May 2023 02:19 PM (IST)

    नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर पुन्हा गुन्हे दाखल

    चाकणच्या मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता गौतमी पाटीलचा कार्यक्रम

    गौतमीच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आयोजकाने आयोजित केला होता कार्यक्रम

    आयोजक समीर गवारे, आनंद गवारे आणि विश्वनाथ गवारे यांच्यावर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 31 May 2023 02:18 PM (IST)

    जर सावरकर पुतळ्यासाठी तिथे कायमची जागा दिली असती तर हा प्रकार घडलाच नसता- आनंद दवे

    गडकरी, दादोजी यांचे पुतळे तर तोडले होते

    त्याबद्दल अजित दादा, भुजबळ साहेब यांना व्यथा झाल्या नाहीत का ?

    हे त्यांचे अपमान नव्हते का ?

    महाराष्ट्र सदनामधील पुतळे हलवणे हे चूकच

  • 31 May 2023 02:05 PM (IST)

    शिंदे गट लाचार, एकामध्येही धमक नाही – संजय राऊत

    जनताच शिंदे गट आणि भाजपला धडा शिकवेल

    कितीही बुडबुडे सोडलात तरी शिंदे गट अपात्र होणार

    पक्ष, चिन्ह विकत घेतले तरी जनता शिंदे गटाला मत देणार नाही

    मोदींचा फोटो लावून मतं मागा आणि निवडून येऊन दाखवा

    उद्याच्या चिंतेने शिंदे-फडणवीसांची झोप उडालीय

  • 31 May 2023 01:56 PM (IST)

    मोदींसाठी शहांसाठी गुजरात हाच भारत देश – संजय राऊत

    मोदींसाठी शहांसाठी गुजरात हाच भारत देश.आहे

    सगळी गुंतवणूक ही गुजरातला नेली जात आहे

    गुलामाला आपल्या मालकांच कौतुक करावं लागतं

    मांडलिक आपले राजे होते, संस्थानिक होते

    मात्र ब्रिटिश राजवटीत मुजरे करावे लागायचे

  • 31 May 2023 01:38 PM (IST)

    मी शेतकऱ्याचा मुलगा हे काही लोकांना सहन होत नाही – मुख्यमंत्री

    निळवंडे प्रकल्पासाठी 53 वर्ष वाट पाहावी लागली

    शेतकऱ्यांना जादा मदत मिळावी, यासाठी NDRF चे निकष बदलले.

    झालं गेलं गंगेला वाहिलं, आता स्वच्छ पाणी येणार.

    शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगले दिवस येणार.

    महायुतीच सरकार सगळ्यांच सरकार

    मी शेतकऱ्याचा मुलगा हे काही लोकांना सहन होत नाही

  • 31 May 2023 01:31 PM (IST)

    आम्ही सामन्यांसाठी काम करतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पहिल्या दिवसापासून आम्ही सामन्यांसाठी काम करत आहोत.

    सरकारचे सर्व निर्णय हे शेतकऱ्यांच्या हिताचे.

  • 31 May 2023 01:29 PM (IST)

    राज्य सरकार शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देणार – देवेंद्र फडणवीस

    – पीडीएलचा अवलंब केल्याने फोर्सने पाणी देणे शक्य होणार आहे.

    – काल मंडत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली.

    – शेतकऱ्यांना 6 हजार रुपये जस केंद्र सरकार देतं तसेच राज्य सरकार देखील 6 हजार देणार.

    – 1 रुपयात पीक कर्ज मिळणार

    – कोणी मध्यस्थी असणार नाही ही देखील व्यवस्था आम्ही करतो आहोत

    – ग्रामीण रस्ते, शेत रस्ते यावर आपण भर दिला आहे.

    – दिवसा 12 तास वीज मिळावी यासाठी सोलर फिडर आणण्याची व्यवस्था केली आहे.

  • 31 May 2023 01:24 PM (IST)

    मविआ सरकारला निर्णय लकवा होता – देवेंद्र फडणवीस

    नगरमधील 235 गाव जलयुक्त करण्याच काम सुरु

    शेतकऱ्यांना पीकविमा देण्याची पद्धत आम्ही बदलत आहोत.

    मंत्रालयातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार.

    निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याची चाचणी पार पडली.

  • 31 May 2023 01:21 PM (IST)

    निळवंडे प्रकल्पाची चाचणी झाल्याने आनंद – देवेंद्र फडणवीस

    – आज अत्यंत आनंदाचा दिवस

    – पाणी सोडल्यानंतर प्रचंड गतीने पाणी आल्याने मोठं समाधान

    – हा प्रकल्प माझ्याही जन्माच्या आधीचा

    – 8 कोटींचा प्रकल्प 5 हजार कोटींची पुढे गेला

    – 95 साली युतीचे सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली

    – 2017 पर्यंत सुधारित मान्यता नव्हती

    – त्या नंतर आपण प्रशासकीय मान्यता दिली आणि काम सुरू झालं

    – त्या वेळी विखे साहेब विरोधी पक्ष नेते होते

    – फोर्स लावावा लागेल अस मी त्यावेळी त्यांना म्हणालो

    – पिचड साहेबांना विश्वासात घ्या असा सल्ला मला विखे साहेबांनी दिला

    – शेतकरी आणि आदिवासी बांधवांना समजावून सांगा असं आम्ही पिचड साहेबांना सांगितलं.

    – मध्ये अडीच वर्षे जे सरकार होत, त्यांच्याकडून उणेंडूने 400 कोटी रुपये मिळाले.

    – आमचं सरकार आल्यावर 5177 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.

    – गोसे खुर्द नंतर सगळ्यात जास्त पैसे या प्रकल्पाला दिले.

  • 31 May 2023 12:58 PM (IST)

    जेजुरीतील विश्वस्त निवडीचा वाद; आंदोलनात युवक कॉंग्रेसचाही सहभाग

    जेजुरी मंदिर ट्र्स्टच्या विश्वस्त निवडीचा वाद

    जेजुरीकरांचं गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन

    आजच्या आंदोलनात युवक कॉंग्रेसचा सहभाग

    पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचीही उपस्थिती

  • 31 May 2023 12:55 PM (IST)

    53 वर्षानंतर नाशिकच्या निळवंडे धरणातून पाणी सोडलं जाणार

    नाशिकच्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या चाचणीचा शुभारंभ

    मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निळवंडे धरण परिसरात हेलिपॅडवर दाखल

    बटन दाबल्यानंतर डाव्या कालव्यातून पाणी सोडलं जाणार

    तब्बल 53 वर्षानंतर निळवंडे धरणाच्या उद्घाटनाला मुहूर्त

    8.32 टीएमसी क्षमता असलेल्या धरणाच्या माध्यमातून 68, 000 हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली

    नाशिक आणि अहमदनगरच्या 182 गावांना मिळणार संजीवनी

  • 31 May 2023 12:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना शिवीगाळ

    छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चालकाचा रस्त्यावर धिंगाणा

    वर्दीवर असलेल्या पोलीस दाम्पत्याला दिवसाढवळ्या रस्त्यावर शिवीगाळ

    अर्वाच भाषेत पोलिसांना शिवीगाळ

    महिला पोलिसाला देखील आर्वाच भाषेचा वापर

    वळण घेताना स्वतः नियंत्रण सुटले मात्र मागून येणाऱ्या कार मधील पोलीस दाम्पत्यावर आळ

    बुलेट चालकाची दादागिरी, कुठलीही चूक नसताना शिवीगाळ रास्ता रोको

    नगरनाका भागातील घटनेने खळबळ

    पोलीस दाम्पत्य विनवणी करीत होतं, मात्र बुलेट चालाकाची शिवराळ भाषा सुरूच होती

  • 31 May 2023 12:35 PM (IST)

    पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार घेणार आज महत्त्वाची बैठक घेणार, निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

    पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विलनीकरणाच्या हालचाली वाढल्या

    खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बिर्डचा पुणे महानगरपालिकेत होणार समावेश?

    पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार घेणार आज महत्त्वाची बैठक

    पुणे कॅन्टोन्मेंट पुढच्या अधिकाऱ्यांसोबत पार पडणार आयुक्तांची बैठक

    जर दोन्ही पोर पुणे महापालिकेत समाविष्ट झाले तर शहराचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार

    आजच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

  • 31 May 2023 12:24 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यात मनरेगाच्या कामांना वेग

    भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भर उन्हात मनरेगाच्या कामावर मजुरांची उपस्थिती

    बोगस मजुरांवर आळा घालण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मजुरांची हजेरी

    जिल्ह्यातील सर्व सातही तालुक्यात मनरेगाच्या विविध कामावर तब्बल 80 हजार 532 मजूर काम करत आहेत

    भर उन्हात ग्रामीण भागात महिला आणि पुरुष मजुरांची मोठ्या प्रमाणात संख्या दिसून येत आहे

  • 31 May 2023 12:12 PM (IST)

    ‘त्या’ अल्पवयीन मुलांची पोलिसांकडून सुटका

    बिहारहून 30 अल्पवयीन मुलांची मनमाड रेल्वे पोलिसांनी केली सुटका

    या अल्पवयीन मुलांना सांगली आणि पिंपरी चिंचवडमधील मदरशात नेलं जात असल्याची प्राथमिक माहिती

    रेल्वे पोलिसांनी बाल तस्करीचा संशयातून केली कारवाई

    सध्या यातील 15 मुलांना नाशिकच्या उंटवाडी येथील बालसुधार गृहात ठेवल्याची माहिती

    आणखी 15 मुले आस्था या संस्थेत असल्याची माहिती

    अल्पवयीन मुलांना बिहारमधून महाराष्ट्रात का आणण्यात आलं?, यासंदर्भात चौकशी सुरू

    याप्रकरणी चार संशयित तस्करांविरोधात गुन्हा दाखल

  • 31 May 2023 11:58 AM (IST)

    ठाण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांची अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई

    – ठाण्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई केली आहे.

    – रस्त्यांच्या कामात त्रुटी आढळल्याबाबत अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस तर कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड ठोठावला आहे.

    – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कामांमध्ये रस्ते साफसफाई व इतर कामांबाबत त्रुटी आढळल्या होत्या.

    – मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सदर कामाबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही कारवाई केली आहे.

    – तसेच उद्यान ठेकेदारांना देखील नोटीसा बजावण्यात आल्या आहेत

  • 31 May 2023 11:52 AM (IST)

    रुपाली चाकणकरही उतरणार लोकसभेच्या रींगणात

    – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केलीय.

    – खडकवासला मतदारसंघात चाकणकर यांनी उमेदवारी मागितली आहे.

    – सुषमा अंधारे यांनी जी तक्रार दिली होती.

    – राज्य महिला आयोगाला तपास अहवाल प्राप्त झाला.

    – अजूनही तो तपास सुरु आहे. मात्र, पोलिसांनी क्लीन चिट दिल्याचा अहवाल आम्हाला मिळालेला नाही

  • 31 May 2023 11:44 AM (IST)

    ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात आहे. – संजय शिरसाट

    – काही लोकांना प्रसिद्धी हवी आहे.

    – पण खोटे आरोप मी सहन करणार नाही

    – पोलिसांनी क्लीन चिट दिली यावर त्याचा किती विश्वास बसतो हे माहित नाही

    – आता कोर्टाची लढाईही लढावी लागेल.

    – संजय राऊत यांच्या कार्यकाळ संपत आला आहे.

    – खोटे बोलत असाल खोटे हास्य आणावे लागते. मी खरं तेच बोलतो. त्यामुळे मला कशाची भीती नाही.

  • 31 May 2023 11:38 AM (IST)

    महाविकास आघाडीची वज्रमुठ तुटणार – मंत्री संदीपान भुमरे

    – आम्ही कोणीही शिवसेनेतून बाहेर जाणार नाही.

    – उलट अनेक राष्ट्रवादीचे आणि ठाकरे गटाचे लोक हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बघा

    – संजय राऊत यांनी कधी निवडणूक लढवली आहे का? एखादी निवडणूक लढवून दाखवा.

    – महाविकास आघाडीची वज्रमुठ ही तुटणार आहे असा दावा मंत्री संदीपान भुमरे यांनी केला.

  • 31 May 2023 11:32 AM (IST)

    बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

    – बीड येथील जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळजनक घटना घडलीय.

    – बाळू बहिर असे रुग्णाचे नाव आहे.

    – घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी पोहचले असुन या प्रकरणी तपास सुरू आहे.

  • 31 May 2023 11:27 AM (IST)

    पुण्यात कस्टम विभागाची मोठी कारवाई, 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, 4 आरोपींना बेड्या

    – पुणे पोलिसांनी 5 कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज जप्त केले आहेत.

    – हे अमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते.

    – पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने ही संयुक्त कारवाई केली.

    – या सर्व प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे

  • 31 May 2023 11:21 AM (IST)

    जेजुरीच्या आंदोलनात व्यसनमुक्त युवक संघटनेचा सहभाग

    – जेजुरीतील मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त निवडीवरुन वाद निर्माण झालाय

    – या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थांनी सुरु केलेल्या आंदोलनाला विविध संघटना पाठींबा देत आहेत.

    – बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघटनेच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनात सहभाग घेत विविध मागण्या केल्या.

  • 31 May 2023 11:17 AM (IST)

    नाशिक : पक्ष प्रवेशासाठी पैसे मागितल्याने झालेल्या वादातून हत्या

    – जेलरोड परिसरातील रामेश्वर नगर येथे सोमवारी पहाटे प्रवीण दिवेकर यांची हत्या करण्यात आली होती.

    – या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

    – एका राज्यस्तरीय पक्षात प्रवेश करण्यासाठी पैसे मागितल्याने तिघा तरुणांनी प्रवीण दिवेकर यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

    – नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने या प्रकरणात तिघा संशयितांना अटक केली आहे.

    – यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.

    – मयत प्रवीण दिवेकर यांनी एका पक्षात प्रवेश देण्याचे सांगत पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्यास नकार दिला असता संशयित आरोपी आणि दरेकर यांच्यात वाद झाला. त्यानंतर संशयितांना दिवेकर याचा खून केला.

  • 31 May 2023 11:11 AM (IST)

    रणरणत्या उन्हात आशा कर्मचारी पुन्हा उतरल्या रस्त्यावर

    – आरोग्य यंत्रणेचे चाक असलेल्या आशा सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी रणरणत्या उन्हात आशा कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरल्या.

    – कामाच्या मोबदल्यात देण्यात येणारे मानधन नियमित देण्यात यावे, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर्स यांनी मोर्चा काढला.

    – सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक पतपेढी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

    – यावेळी आशा कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले.

  • 31 May 2023 10:55 AM (IST)

    खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

    वरोरा येथील निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी धानोरकरांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन

    थोड्याच वेळात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

    धानोरकरांच्या जाण्याने निर्माण झाली मोठी पोकळी

  • 31 May 2023 10:44 AM (IST)

    मध्य प्रदेश : हरदा येथे कारमध्ये लागली आग, 4 जणांचा मृत्यू

    मध्य प्रदेशातील हरदा येथे नौसरजवळ टायर फुटल्याने कार झाडावर आदळली.

    गाडीने पेट घेतल्याने 4 जणांचा मृत्यू झाला.

  • 31 May 2023 10:34 AM (IST)

    बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

    धानोरकर यांनी वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    दिल्लीतील मेदांता रुग्णालयात सुरू होते उपचार

    काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन

  • 31 May 2023 10:27 AM (IST)

    सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पोलीस आयुक्तांच्या भेटीला

    अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ हे पोलीस आयुक्तांसह सुरू असलेल्या बैठकीस उपस्थित

    इंडिक टेल्स वेबसाईटसह लेखकावर कारवाईची मागणी

  • 31 May 2023 10:09 AM (IST)

    Pakistan plane seized : पाकिस्तानची जगात नाचक्की, जिगरी मित्र देशानेच विमान केलं जप्त

    Pakistan plane seized : जिगरी दोस्तीमध्ये आला पैसा. पाकिस्तानवर इतके वाईट दिवस आलेत. दुसऱ्या देशात त्यांची विमान जप्त केली जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानची जगात मोठी नाचक्की झाली आहे. वाचा सविस्तर….

  • 31 May 2023 10:08 AM (IST)

    WTC Final 2023 : ऑस्ट्रेलियन संघात टीम इंडियाच्या एका प्लेयरची प्रचंड दहशत, 2 वर्षांपूर्वी त्याने कामच तस केलय

    WTC Final 2023 : पॅट कमिन्स आणि कंपनीला त्याच्यापासून विशेष सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला टीम इंडियाचा हा खेळाडू विराट कोहली वाटला असेल, पण तसं नाहीय. या खेळाडूची ऑस्ट्रेलिया विरुद्ध कामगिरीच तशी आहे. वाचा सविस्तर…..

  • 31 May 2023 10:07 AM (IST)

    IPL 2023 : ‘ते’ शेवटचे 2 चेंडू टाकण्याआधी हार्दिक बरोबर काय बोलणं झालं, त्यावर अखेर Mohit Sharma चा खुलासा

    IPL 2023 : ‘मी माझ्या बाजूने सर्वोत्तम प्रयत्न केले असं Mohit Sharma ने सांगितलं. त्या’ शेवटच्या 2 चेंडूंमुळेच चेन्नई सुपर किंग्सची टीम पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनली. रवींद्र जाडेजा विजयाचा नायक ठरला. वाचा सविस्तर….

  • 31 May 2023 10:06 AM (IST)

    IPL 2023 : आयपीएल 2023 मध्ये एका प्लेयरची बल्ले, बल्ले, फक्त 10 रन्ससाठी मिळाले 1 कोटी रुपये

    IPL 2023 : फ्रेंचायजीने इतकी मोठी रक्कम मोजून त्याला विकत घेतलं. पण त्याने केल्या फक्त 10 धावा. आयपीएलमध्ये खेळणारा हा दिग्गज फलंदाज होता. त्याला संधी द्यायची नव्हती, मग विकत का घेतलं? हा प्रश्न आहे. वाचा सविस्तर…..

  • 31 May 2023 10:05 AM (IST)

    अरविंद केजरीवाल घेणार तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 1 जून रोजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत.

    तसेच 2 जून रोजी केजरीवाल हे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही भेट घेणार आहे.

    दिल्लीबाबत केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत.

  • 31 May 2023 09:57 AM (IST)

    संजय शिरसाट यांना क्लिन चिट

    संजय शिरसाट यांच्यावर सुषमा अंधारे यांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांचे ताशेरे.

    पुणे आणि परळीत केलेल्या तक्रारीनंतर डीसीपी यांनी चौकशी करत दिली क्लीन चीट

    विनयभंगाची तक्रार दाखल करता येणार नाही असा दिला अहवाल…

    सुषमा अंधारे यांचं कुठेही नाव घेण्यात आलं नसून ती व्यक्ती समोरही नव्हती, असं पोलीसांच्या अहवालातून उघड.

  • 31 May 2023 09:49 AM (IST)

    निवडणुका का घेत नाही- संजय राऊत

    शिंदे गटाच्या आमदार खासदारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागणार – संजय राऊत

    नऊ वर्षात मोदी सरकारने जनतेला काय दिले

    निवडणुका का घेत नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे- संजय राऊत

    मुंबईवर भाजपचा झेंडा, नड्डांच्या या वक्तव्यावर शिंदे गट गप्प का, राऊत यांचा सवाल

  • 31 May 2023 09:45 AM (IST)

    पंतप्रधान मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी- संजय राऊत

    पंतप्रधान फक्त मन की बात करतात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदे घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी

    राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षाचे नेते पत्रकारांशी बोलतात, मोदी बोलत नाही

    संजय राऊत यांनी केली मोदी यांच्यांवर टीका

  • 31 May 2023 09:40 AM (IST)

    पुण्यात पत्नीचा चाकूने गळा चिरून केला खून

    पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा चाकूने गळा चिरून केला खून

    कोंढव्यातील पिसोळी भागात घडला धक्कादायक प्रकार

    या घटनेनंतर पती पसार झाला असून याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल

    आरती रणजीत झा असे खून झालेल्या महिलेचे नाव,

    याप्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

    आरोपी रणजीत झा मूळचा बिहारचा रहिवासी असून चालक म्हणून काम करत आहे.

  • 31 May 2023 09:35 AM (IST)

    धर्मांतरबंदी कायदा लागू करा- दवे

    ५० रुपयात धर्म बदलून मिळतो आपल्याकडे आणि तो कितीही वेळा बदलू शकता आणि त्याचे फायदे पण मिळवू शकता

    जोपर्यंत धर्मांतरबंदीचा कायदा येत नाही, तोपर्यंत हे सुरु राहणार, आनंद दवे यांचे मत

    आनंद दवे यांनी धर्मांतरबंदी कायद्याची मागणी केली

  • 31 May 2023 09:25 AM (IST)

    मुलांची तस्करी, ५९ मुलांची केली सुटका

    बिहारमधून रेल्वेत तस्करी करून नेत असलेल्या ५९ मुलांची सुटका

    भुसावळ रेल्वे पोलीस विभागाची मोठी कारवाई

    भुसावळ आरपीएफ पोलिसांना एक मोठी कारवाई करण्यामध्ये यश आले

    बिहार राज्यातून 59 मुलांना सांगली येथील मदरशामध्ये तस्करी करताना रेल्वेमध्ये घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती आहे

    मात्र रेल्वे विभागाने हा डाव उधळून पाडला

    भुसावळ मनमाड स्थानकावर त्यांची सुटका करण्यात आली

  • 31 May 2023 09:18 AM (IST)

    अमरावती स्काय वॉकच्या मार्गातील अडथळा दूर

    अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळातील स्काय वॉकच्या निर्मितीच्या मार्गातील अडथळा दूर

    राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून काही अटी अ् शर्थी ठेऊन मिळाली परवानगी.

    पावसाळ्यानंतर काम सुरू होणार सिडकोची माहिती.

    हरिकेन पॉईंट ते गोराघाट पॉईंटपर्यत आहे स्काय वॉक.

    स्कायवॉकच्या खालील जागा वन्यजीवाची असल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने काम होते थांबवले.

    कामाला परवानगी मिळाल्याने पुढील एक वर्षात स्कायवॉक सुरू होण्याची शक्यता

  • 31 May 2023 09:12 AM (IST)

    भोरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

    पुण्याच्या भोरमध्ये संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे शासन आपल्या दारी या अभियाना अंतर्गत आयोजित केलेल्या शिबिरासाठी उभारलेला मंडप कोसळला. संध्याकाळी शिबीर आटोपल्यानंतर ही घटना घडली. सुदैवाने यामध्ये कुणालाही इजा झाली नाही. मंडपाच मात्र यात मोठं नुकसान झालय.

  • 31 May 2023 09:04 AM (IST)

    संजय राऊत यांनी लावला उद्धव ठाकरे यांचा फोटो

    खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील घरात लावला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचा फोटो

    ही दोस्ती तुटायची नाही… अशी टँगलाईन या फोटोवर लिहिण्यात आली आहे

    आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी हातात घेत मुठी आवळलेला फोटो आहे

    कोणत्याही परिस्थितीत ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी या फोटोच्या माध्यमातून दिलाय

  • 31 May 2023 08:59 AM (IST)

    औरंगाबाद शहरातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आता सेमी इंग्लिशचे धडे

    महानगरपालिकेच्या सर्व उर्दू-मराठी माध्यमांच्या शाळा सेमी इंग्रजी करण्याची घोषणा

    महानगरपालिकेच्या शाळेमध्ये 15 जूनपासून सेमी इंग्लिशचे शिक्षण सुरू होणार

  • 31 May 2023 08:55 AM (IST)

    दिल्ली, चंदीगड परिसरात पावसाच्या सरी

    सकाळपासूनच दिल्ली आणि चंदीगड परिसरात पावसाला सुरुवात

  • 31 May 2023 08:50 AM (IST)

    कोल्हापूर, हातकणंगलेच्या जागांसाठी ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीही आग्रही?

    लोकसभेच्या दोन्ही जागा संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत काल सायंकाळी पार पडली बैठक

    राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ यांनाच कोल्हापुरातून लोकसभेसाठी उतरवण्याच्या हालचाली

    तर हातकणंगले जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि कर्णसिंह गायकवाड यांच्या नावावर चर्चा

    गेल्या तीन लोकसभा निवडणुकीत उसना उमेदवार दिल्यानेच पक्षाचं नुकसान झाल्याचा बैठकीत सूर

    त्यामुळे यावेळी पक्षात काम केलेल्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता

  • 31 May 2023 08:44 AM (IST)

    पुणे लोकसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर

    पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपकडून भेटीगाठीला सुरुवात

    विधानसभा मतदारसंघनिहाय संपर्क अभियान राबविण्याचे पदाधिकऱ्यांना आदेश

    यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती भाजप कार्यकर्त्यांकडून देण्यात आली आहे

  • 31 May 2023 08:37 AM (IST)

    ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील कारवाईसाठी सरकारला 5 दिवसांची अंतिम मुदत

    भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या कारवाईसाठी कुस्तीपटू आक्रमक

    देशाच्या आघाडीच्या कुस्तीपटूंचा आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा इशारा

    मंगळवारी संध्याकाळी हरिद्वार इथल्या गंगा घाटावर नाट्यमय घडामोडींनंतर कुस्तीपटूंनी पदकं विसर्जनाचा निर्णय मागे घेत दिली अंतिम मुदत

  • 31 May 2023 08:32 AM (IST)

    15 जूननंतर धावणार सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बस

    शिवशाहीप्रमाणेच तिकीट दर; राज्यात 5150 बसची निविदा

    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा

    इंधनावरील कोट्यवधींचा खर्च कमी करून आणि प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविली जाणार

    पुणे-नगर, पुणे-मुंबई यासह इतर काही मार्गांवर सद्य:स्थितीत 70 इलेक्ट्रिक बस धावत आहेत

    महामंडळाकडे सोलापूरसाठी 75 इलेक्ट्रिक बसगाड्या देण्याचा प्रस्ताव

  • 31 May 2023 08:25 AM (IST)

    पुणे : वाघोली परिसरातील पुणे-अहमदनगर रोडवरील गोदामाला भीषण आग

    पहाटे 4 वाजताच्या सुमारास लागली आग

    पीएमआरडीएच्या दोन अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात

    घटनेत कोणतीही जीवितहानी नाही

    लाखोंची उत्पादनं आणि पिकअप टेम्पोचं नुकसान

  • 31 May 2023 08:20 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

    मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक दोन तास पार पडली

    यावेळी मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

  • 31 May 2023 08:15 AM (IST)

    नाशिक शहरात 15 दिवस मनाई आदेश लागू

    30 मे ते 13 जून पर्यंत राहणार मनाई आदेश लागू

    या कालावधीत मोर्चा, आंदोलन करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक

    तसेच कोणतेही दाहक, स्फोटक, शस्त्र बाळगता येणार नाही

    आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा

  • 31 May 2023 08:11 AM (IST)

    नाशिक | महापालिकेत लवकरच 2100 पद भरतीसाठी आशा पल्लवित

    2100 पद भरतीसाठी शासनाने मागवला जॉबचार्ट

    नगरविकास विभागाने आवश्यक पदांचा पदनिहाय जॉबचार्ट मागवला

    सद्यस्थितीत महापालिकेतील रिक्त पदांची संख्या 2800

  • 31 May 2023 07:56 AM (IST)

    नाशिकच्या औद्योगिक संघटनांचा शहरात शुक्रवारी उद्योग बंदचा इशारा

    निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कारखान्यावरील हल्ल्याप्रकरणी उद्योजक आक्रमक

    गुरुवारपर्यंत हल्लेखोर व्यक्तींना अटक करण्याची मागणी

    काही दिवसांपूर्वी निमाच्या कार्यक्रमात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांना धक्का लागून त्या खाली पडल्या होत्या

    त्यानंतर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या कार्यालयावर काही व्यक्तींनी केला होता हल्ला, त्याचा निषेध म्हणून बंद पुकारला जाणार आहे

  • 31 May 2023 07:32 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यातील विरवडे टोल नाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा

    टोल प्रशासनाने 8 पैकी केवळ 2 लेन सुरू ठेवल्याने वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे

    केवळ दोन लेन सुरू असल्याने दुरवर वाहतूक कोंडी झाली

    टोल प्रशासनाच्या गलथान कारभारावर वाहन चालकाची तीव्र नाराजी

    टोल लेन पूर्ण क्षमतेने सुरु न ठेवल्याने विरवडे टोल नाक्यावर वाहतूक कोंडी

    पैसे देऊन नाहक त्रास सहन करण्याची वेळ वाहन चालकांवर आली

    रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याकडे लक्ष देण्याची वाहन चालकांची मागणी

  • 31 May 2023 07:30 AM (IST)

    पालघर – डहाणूतील साखरा डॅमला पोहण्यासाठी गेलेले तीन तरुण बुडाले

    यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे

    वाचलेल्या दोघांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत

    अनिकेत पडवले असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून देवजी पडवले आणि दीपक पडवले यांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आल आहे

    हे तीन्ही तरुण डहाणूतील सरावली येथील असून तिघांनीही वाणगाव येथून आपलं आयटीआयच शिक्षण पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे

  • 31 May 2023 07:27 AM (IST)

    भरधाव जाणाऱ्या दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक, दोन युवक ठार

    धाड-चांडोळ मार्गावरील सावळी जवळ घडली घटना

    काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडला अपघात

    चांडोळ येथील दुचाकीस्वार युवक गणेश पाकळ हा धाड येथून आपल्या गावी चांडोळकडे परत येत होता

    तर धामणगाव येथील राहुल जेउघाले हा आपल्या गावी परत जात असताना दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली

  • 31 May 2023 07:24 AM (IST)

    जेजुरी देवस्थान विश्वस्त मंडळ निवड वाद, ग्रामस्थांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस

    काल जेजुरीच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

    विश्वस्त निवडीत स्थानिक ग्रामस्थांवर अन्याय झाल्याची भावना

    बेमुदत धरणे आंदोलनावर ग्रामस्थ ठाम

    भविष्यात जेजुरी शहरात कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा

  • 31 May 2023 07:19 AM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    निळवंडे धरणाच्या काळव्यांना पाणी सोडून घेतली जाणार चाचणी

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडणार पाणी

    लाभक्षेत्रातील 182 गावांची 52 वर्षांची प्रतिक्षा संपणार

    लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

    उत्तर नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण

Published On - May 31,2023 7:14 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.