Maharashtra Breaking Marathi News Live | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन

| Updated on: May 08, 2023 | 6:57 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन
Marathi NewsImage Credit source: tv9 marathi

मुंबई : मध्य रेल्वेवर आज जम्बो मेगा ब्लॉग. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची ससेहोलपट होणार. एनसीआरटीईनं दहावीच्या अभ्यासक्रमातून विज्ञान उत्क्रांती हा धडा वगळला. एनसीआरटीई विरोधात अंनिस सुरू करणार मोहीम. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा बारामती दौरा सुरू. विविध विकासकामांची करणार पाहणी. बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री यांचे मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा जोरदार स्वागत. अंबरनाथमध्ये धीरेंद्र शास्त्री यांचा तीन दिवसांचा कार्यक्रम आहे. यासह राज्य आणि देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 May 2023 12:28 AM (IST)

    राजस्थानवर सनराइजर्स हैदराबादचा ‘रॉयल’ विजय

    राजस्थान रॉयल्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामधील सामन्यात हैदराबाद संघाने 4 विकेट्स संघाने विजय मिळवला. नाट्यमयरित्या झालेल्या या सामन्यामध्ये हैदराबादने मारली बाजी. राजस्थानने सनराजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं टार्गेट दिलं होतं. हे आव्हान हैदराबादने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

  • 07 May 2023 03:53 PM (IST)

    शरद पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन

    शरद पवार हे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विठ्ठल मंदिरला भेट देऊन दर्शन घेतले

    विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तात्काळ पवार हे सांगोला दौऱ्यापूर्वी पोहोचले

    नियोजित कार्यक्रमात बदल करून पवारांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

  • 07 May 2023 12:58 PM (IST)

    आगामी काळात भाकरी फिरवावी लागेल-रोहित पवार

    रोहित पवार म्हणाले…

    काहीजण फक्त नेत्यांच्या मागेपुढे करत असतात

    मात्र आगामी काळात भाकरी फिरवावी लागेल

    2024 मध्ये सोलापूरचा आमदार आपल्याच विचारांचा असेल

    माझ्याकडे जी जबादारी दिली आहे

    त्यामध्ये पंढरपूरचीही जबाबदारी माझ्याकडे आहे

    पवारसाहेब पंढरपूरकडेही लक्ष द्यावे लागणार आहे

  • 07 May 2023 12:49 PM (IST)

    शरद पवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा

    शरद पवार यांचा सरकारवर निशाणा

    सरकारने सांगितलंय की साखरचे निर्यात करायचं नाही

    कांदा परदेशात पाठवायचं नाही

    त्यावेळी नाशिक जिल्ह्यात आंदोलन झाली

    शेतकऱ्यांना उध्दवस्त करण्याचं केंद्र सरकारचं धोरण – शरद पवार

  • 07 May 2023 12:40 PM (IST)

    मणिपूर धगधगतंय; सध्याची स्थिती काय?

    मणिपूर धगधगतंच,

    आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू

    काँग्रेस नेते शशी थरूर यांची राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

    “मणिपूरचा दौरा करा”

    इरोम शर्मिला यांचं पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आवाहन

  • 07 May 2023 12:29 PM (IST)

    जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच

    जंतर-मंतरवर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच

    कुस्तीपटूंना सुजात आंबेडकर यांचा पाठिंबा

    जंतर-मंतरवरच्या आंदोलनाला सुजात आंबेडकर यांची भेट

    अनेक राज्यातील शेतकरीही कुस्तीपटूंच्या भेटीसाठी जंतर-मंतरवर दाखल

    जंतर-मंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  • 07 May 2023 11:59 AM (IST)

    शरद पवार अनेक वेळा शिवाजी महाराज यांचं नाव घेतात – छगन भुजबळ

    – मी शरद पवार यांच्यासोबत 1991 पासून आहे..

    – अनेक वेळा ते शिवाजी महाराज यांचं नाव घेतात.

    – राज ठाकरे यांनीच शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेतली होती.

    – त्यात त्यांनी हाच प्रश्न विचारला होता..

    – त्यावेळी शरद पवार म्हणाले, ‘शिवाजी महाराज हे सर्वांचेच आहेत’

    -शिवाजी महाराज यांनी राज्यक्रांती केली. सर्वांना सोबत घेतले.

    – पण शाहू, फुले, आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीत फार मोठं काम केलं.

    – म्हणून पवार साहेब म्हणाले की, या महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर हे महत्त्वाचे आहेत.

    – दिल्लीत सगळे जण महाराष्ट्रातील नेत्यांना मराठा लीडर असंच म्हणतात. याचा अर्थ महाराष्ट्रातील नेता असा होतो.

  • 07 May 2023 11:53 AM (IST)

    व्यंगचित्रकारांच्या मानधनासाठी प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

    व्यंगचित्रकारांच्या मानधनासाठी प्रयत्न करणार – चंद्रकांत पाटील

    कार्टून हा व्यवसाय नसून ही आवड आहे.

    मी खूप इंटरेस्ट घेऊन कार्टून पाहत होतो.

    कोण कुणाला चिमटा काढला आहे हे पहायला मला आवडतं.

    नवीन शिक्षण धोरणात अनेक नविन कोर्स सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे.

    व्यंगचित्रासाठी देखिल एखादा कोर्स सुरू करावा, यासाठी काहीही मदत लागली तर शासन म्हणून मी मदत करणार.

    व्यंगचित्रकारांना पाच वर्ष महाराष्ट्र सरकारकडून काही मानधन दिलं जावं यासाठी प्रयत्न करणार.

  • 07 May 2023 11:46 AM (IST)

    अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

    – शरद पवारांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमन अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.

    – पंढरपूर विधानसभा मतदारसंघात २०२४ मध्ये अभिजित पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता.

  • 07 May 2023 11:37 AM (IST)

    Rohit Sharma IPL 2023 : ‘रोहित नाव बदलून तू आता, No…’, श्रीकांत रोहितला जिव्हारी लागेल असं बोलले

    Rohit Sharma IPL 2023 : रोहित शर्मा काल CSK विरुद्धच्या सामन्यात सुद्धा फ्लॉप ठरला. त्याच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा क्रिकेट विश्लेषकांच्या रडारवर आहे. रोहितवर सातत्याने चहूबाजूंनी टीका सुरु आहे. वाचा सविस्तर….

  • 07 May 2023 11:15 AM (IST)

    महाराष्ट्राची तिजोरी गुजरातला नेण्याचे काम – नाना पटोले

    – येणारा आठवडा महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा ठरणार असून या आठवड्यात अनेक राजकीय घटना घडतील.-

    – जनेतला लुटण्याचे काम आणि १०५ सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपाने राज्यात तमाशा केलाय.

    – महाराष्ट्राचे तुकडे करुन महाराष्ट्राची तिजोरी गुजरातला नेण्याचे काम भाजपाने केलंय

  • 07 May 2023 11:13 AM (IST)

    सांगली पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवले कोंबिंग ऑपरेशन

    अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ, नशेच्या गोळया, गांजा बाळगणाऱ्या मुसक्या आवळत

    ६ जणांना अटक करत ७ पिस्तूल, १७ जिवंत काडतुसे, २२८ नशेच्या गोळ्या, गांजा असा ९ लाख ६७ हजारांचा माल हस्तगत

    सहा मधील चार जण सराईत गुन्हेगार

    सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागासह चार पथकांची कारवाई

  • 07 May 2023 10:55 AM (IST)

    अजित पवारांबद्दल गैरसज पसरविले जात आहे- शरद पवार

    अजित पवार फिल्डवर काम करणारे नेते- शरद पवार

  • 07 May 2023 10:51 AM (IST)

    निवडणूका जवळ आल्यावर उद्धव ठाकरे मराठी माणसावर बोलतात- नितेश राणे

    मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कातळशिल्प दिसले नाही का?- नितेश राणे

    महारष्ट्र पेटवणं आता तुमच्या ताकदीत राहिलेलं नाही- नितेश राणे

  • 07 May 2023 10:44 AM (IST)

    ठाकरेंचा पक्ष राहिला नसल्याने संजय राऊत राष्ट्रवादीच्या वाटेवर- नितेश राणे

    संजय राऊत यांच्यावर नितेश राणेंचे गंभीर आरोप

    संजय राऊत यांचे मनसुबे उद्धव ठाकरे यांना लवकरच कळणार- नितेश राणे

  • 07 May 2023 10:36 AM (IST)

    महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भुकंप होणार- नितेश राणे

    संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार- नितेश राणे

    अजित पवारांनी पक्ष सोडल्यास संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश घेतील- नितेश राणे

    संजय राऊतांच्या राष्ट्रवादीसोबत अनेक बैठका झाल्या आहेत- नितेश राणे

  • 07 May 2023 10:30 AM (IST)

    शरद पवार पंढरपूरात दाखल

    विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार

    साखर कारखाण्याच्या बायोगॅस प्रकल्पाचे भुमिपूजन करणार

    सोलापूरमध्ये होणाऱ्या शेतकरी मेळाव्यालाही शरद पवार हजर राहणार

  • 07 May 2023 10:22 AM (IST)

     मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कर्नाटक दौऱ्यावर

    कर्नाटकमध्ये एकनाथ शिंदे भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणार

    एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टिका

  • 07 May 2023 10:17 AM (IST)

    बीड माजलगाव मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण

    मुख्य रस्ता अरूंद झाल्याने रहदारीला अडचण

  • 07 May 2023 10:12 AM (IST)

     महाराष्ट्र, केरळ आणि तामिलनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

    मोचा चक्रीवादळ आजपासून 9 मेपर्यंत सक्रिय होणार

  • 07 May 2023 10:04 AM (IST)

    मुंबईनंतर आता नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस

    नाशिकला मिळणार 25 इलेक्ट्रिक बसेस

    सटी कार्यालयात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू

  • 07 May 2023 10:02 AM (IST)

    16 वर्षीय तरुण जलाशयात बुडून बेपत्ता

    परभणीच्या जिंतूर तालु्यातील येलदरी जलाशयात फिरण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय तरुण पोहता पोहता पाण्यात बुडला, प्रशासन आणि ग्रामस्थांनी पाण्यात शोध घेतला.मात्र रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध लागला नव्हता.

  • 07 May 2023 09:57 AM (IST)

    उन्हाळ्यात धबधबा प्रवाहित

    गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने नांदेडचा सहस्त्रकुंड धबधबा चांगलाच प्रवाहित झालाय. इतिहासात प्रथमच ऐन उन्हाळ्यात धबधबा प्रवाहित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पैनगंगा नदीवर असणारे लहान मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहे. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय.

  • 07 May 2023 09:50 AM (IST)

    कर्नाटकात प्रचाराचा आज सुपर संडे

    ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचार रॅली

    निपाणी मतदारसंघातील भोज गावात भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांची जोरदार प्रचार

    रविवार सुट्टीचा मुहूर्त साधत उमेदवारांचा जास्तीत जास्त मतदारांना भेटण्याचा प्रयत्न

  • 07 May 2023 09:40 AM (IST)

    पवार यांचा जनता दरबार

    शरद पवार यांनी आज बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये मणिपूर येथील IIIT शैक्षणिक संस्थेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्याबाबत विनंती करण्यासाठी सांगली येथील एक कुटुंब आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मात्र आलेल्या संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला विद्यार्थी सुखरूप येतील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले

  • 07 May 2023 09:29 AM (IST)

    कोल्हापुरात अपघात

    पन्हाळा रस्त्यावरील वाघबीळ घाटामध्ये अपघात

    200 फूट क्रेटा गाडी गेली दरीत

    पहाटेच्या सुमारास झाला अपघात, 4 जण गंभीर जखमी

    ड्रायव्हरला वळणाचा अंदाज न आल्याने घडला अपघात

  • 07 May 2023 09:19 AM (IST)

    राज्यात पुन्हा अवकाळी

    राज्यात पुन्हा अवकाळीचे संकट निर्माण झाले आहे. तसेच मार्च आणि एप्रिल महिन्यात पाऊस झाला. आता परंतु मे महिन्यात पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने पुणे शहराला यलो अलर्ट दिला आहे. राज्यात तीन दिवस पाऊस असणार आहे…सविस्तर वाचा

  • 07 May 2023 09:10 AM (IST)

    मुख्यमंत्री कर्नाटक दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानावरून एअरपोर्टच्या दिशेने रवाना

    भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री जाणार कर्नाटकात

    कर्नाटकात १० मे रोजी मतदान

  • 07 May 2023 09:02 AM (IST)

    नक्षलवादी संघटनेने तयार केले ट्रॅक्टर लॉन्चर रॉकेट

    गडचिरोलीत नक्षलवादी संघटनेने तयार केले ट्रॅक्टर लॉन्चर रॉकेट

    नक्षलवादी संघटनेची दुर्गम भागात आर्मीला टार्गेट करण्याचे प्रयत्न

    पोलीस विभागाचे किंवा आर्मीचे मोठे पोलीस स्टेशन किंवा कॅम्प उद्धवस्थ करण्याचा प्रयत्न

    दुर्गम भागात ब्लास्ट करून ट्रॅक्टर लॉन्चरचा उपयोग

  • 07 May 2023 09:00 AM (IST)

    समंथाशी घटस्फोटाबाबत नाग चैतन्यची मोठी प्रतिक्रिया

    घटस्फोटानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबतच्या नात्याविषयी नाग चैतन्य व्यक्त

    वर्षभरापूर्वी कोर्टाने मंजूर केला घटस्फोट, वाचा सविस्तर..

  • 07 May 2023 08:50 AM (IST)

    कॉन्ट्रोव्हर्सीचा ‘द केरळ स्टोरी’ला चांगलाच फायदा; दुसऱ्या दिवशी कमाईत आणखी वाढ

    5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ची दुसऱ्या दिवशी चांगली कमाई

    पहिल्या दिवशी कमावला 8.03 कोटी रुपयांचा गल्ला

    शनिवारी 12.50 कोटी रुपयांची कमाई, वाचा सविस्तर..

  • 07 May 2023 08:45 AM (IST)

    पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी 

    शहरात गेल्या दहा दिवसांचा विचार केल्यास कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी

    पुणे शहरात शनिवारी 6 मे रोजी 205 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली

    त्यातील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

  • 07 May 2023 08:32 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्यात १० वर्षांनी सुरु होणार टॅंकर!

    सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांतील दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी उजनी धरण ठरलं वरदान

    उजनी एकाच दिवसात 0.70 टक्के मायनसमध्ये

    आता धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार

    सोलापूर शहरासाठी 10 जूनपासून धरणातून पाणी सोडले जाणार

    भीमा नदीतून सोडलेले पाणी आठ दिवसांत औज बंधाऱ्यात पोहोचणार

    सध्या आठ दिवस पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात शिल्लक

  • 07 May 2023 08:26 AM (IST)

    कोल्हापुरात साकारणार फुटबॉल स्ट्रीट

    सॉकर सिटी म्हणून कोल्हापूरचा देशभर नावलौकिक

    खेळाडूंसह त्यांच्या समर्थकांना प्रोत्साहित करून फुटबॉलची ऊर्जा अखंडितपणे तेवत ठेवण्यासाठी कोल्हापुरात फुटबॉल स्ट्रीट साकारण्यात येणार

    महापालिकेने हाती घेतला दोन कोटी 74 लाखांचा हा ड्रीम प्रोजेक्ट

    छत्रपती शाहू स्टेडियम आणि छत्रपती शिवाजी स्टेडियम यांच्या मधोमध असलेल्या रस्त्यावर फुटबॉल स्ट्रीट होणार

  • 07 May 2023 08:18 AM (IST)

    पुणे शहरात रात्री अनेक ठिकाणी पाऊस

    शहरातील अनेक भागात रात्रभर सूरू होता पाऊस

    शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण

    पुण्यात आजदेखील मुसळधार पावसाचा अंदाज

    हवामान खात्याकडून शहराला येलो अलर्ट

    सकाळपासूनच पुणे शहर परिसरात पावसाची संततधार

    आज दिवसभर पुणे शहरासाह मराठवाडा , विदर्भ भागांमध्ये पावसाची शक्यता

  • 07 May 2023 08:09 AM (IST)

    नाशिक | नाशिक महापालिकेच्या कर सवलत योजनेला नागरिकांचा प्रतिसाद

    एप्रिल महिन्यात तब्बल 1 लाख 27 हजार 991 मिळकतधारकांनी घेतला 8 टक्के सवलत योजनेचा लाभ

    एका महिन्यात मनपाच्या तिजोरीत 52 कोटी रुपयांची घरपट्टी जमा

    संपूर्ण घरपट्टी एकरकमी भरणाऱ्या करदात्यांना बिलाच्या रक्कमेतून आठ टक्के देण्यात आली होती सवलत

  • 07 May 2023 08:01 AM (IST)

    नाशिकमध्ये एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार पहिल्या टप्प्यात 25 इलेक्ट्रिक बसेस

    नाशिकच्या विभागीय एसटी कार्यालयात चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू

    सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत 25 बस दाखल होण्याची शक्यता

    मुंबईनंतर काही महिन्यांतच नाशिकमधून धावणार इलेक्ट्रिक बस

  • 07 May 2023 07:20 AM (IST)

    पुण्यातील डीआरडीओच्या अधिकाऱ्याची रॉकडूनही चौकशी

    या आधी अनेकवेळा तो पाकिस्तानात जाऊन आल्याची माहिती

    पाकिस्तान गुप्तहेर यंत्रणांना काय माहिती पुरवली याचा तपास सध्या केला जातोय

    मुंबईतील काळाचौकीत प्रदीप कुरुलकर विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे

    जप्त केलेला मोबाईल तपासासाठी पोलीस महासंचालकांकडे देण्यात आला आहे

  • 07 May 2023 07:19 AM (IST)

    बागेश्वर धाम सरकारचे धीरेंद्र शास्त्री यांचे मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा जोरदार स्वागत

    अंबरनाथमध्ये धीरेंद्र शास्त्री यांचा तीन दिवसांचा कार्यक्रम

    कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी धीरेंद्र शास्त्री यांचे आज पहाटे साडेचार वाजता मुंबई विमानतळावर आगमन

    धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, पुन्हा एकदा अंबरनाथ के पागलोंने हमे बुलाया है, अमरनाथमध्ये 3 दिवस श्री हनुमंत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 07 May 2023 07:17 AM (IST)

    एनसीआरटीई विरोधात अंनिस सुरू करणार मोहीम

    एनसीआरटीईनं दहावीच्या अभ्यासक्रमातून विज्ञान उत्क्रांती हा धडा वगळला आहे

    चला उत्क्रांती समजून घेऊया अंनिस सुरू करणार मोहिम

    हमीद दाभोलकर यांनी एनसीआरटीईचा केला निषेध

  • 07 May 2023 07:16 AM (IST)

    पुण्यातील धोकादायक वास्तूंचे होणार ऑडिट, शहर आणि जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे ऑडिट करा

    मानसून पूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आदेश

    धोकादायक इमारती, पूल आणि जुन्या वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

    जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्सूनपूर्व बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा

    वेळ आहे तोपर्यंत मान्सूनपूर्व कामे करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  • 07 May 2023 07:15 AM (IST)

    आषाढी वारीवर अल निनो वादळाचं संकट?; महापालिका प्रशासनाची जय्यत तयारी

    यंदाची आषाढी वारी एक महिना आधी येत आहे.

    त्यामुळे अल निनोचा होणारा परिणाम लक्षात घेता पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि नगरपरिषदा यांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष राहावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

    वारीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन आणि दोन्ही संस्थांच्या प्रमुखांची बैठक घेतली

    वारी सोहळ्यात पाणी कमी पडू देऊ नका अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत

  • 07 May 2023 07:12 AM (IST)

    अजित पवार पुन्हा सक्रिय, बारामतीचा दौरा सुरू; विकासकामांचा घेतला आढावा

    पहाटे 6 वाजल्यापासून अजितदादा करताहेत विकासकामांची पाहणी

    बारामतीतील विविध विकासकामांचा अजितदादांनी घेतला आढावा

Published On - May 07,2023 7:10 AM

Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.