मुंबई : केरळच्या मलप्पुरममध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मुंबई पोलिसांची बागेश्वर बाबांना नोटीस. वादग्रस्त विधान न करण्याच्या सूचना. मार्च महिन्यात राज्यात 2200 मुली बेपत्ता. महिला आयोगाचे गृह विभागाला तपास करण्याचे आदेश. सातारा, सांगली आणि भंडाऱ्यात जोरदार अवकाळी पाऊस, अचानक आलेल्या पावसाने शेतकरी चिंताग्रस्त. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
मोका वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने बंगाल आणि ओडिशामध्ये अलर्ट जारी केला आहे. धोका लक्षात घेता मच्छिमार, लहान जहाजे, खलाशांना आग्नेय आणि मध्य बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, या चक्रीवादळाचा कितपत परिणाम होईल, याची माहिती हवामान खात्याने अद्याप दिलेली नाही.
काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी 9 मे रोजी राजस्थान दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी राहुल गांधी माउंट अबूला येत आहेत. राहुल गांधी देलवारा येथील स्वामीनारायण धर्मशाळेत काँग्रेस प्रशिक्षण शिबिराला संबोधित करणार आहेत.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीचा संपूर्ण आकडेवारी सांगितली.मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, 3 मे रोजी झालेल्या घटनेत सुमारे 60 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, 231 लोक जखमी झाले आणि सुमारे 1700 घरे जाळली गेली. मुख्यमंत्री एन वीरेन सिंह म्हणाले, ‘मी लोकांना राज्यात शांतता राखण्याचे आवाहन करतो. अडकलेल्या लोकांना आपापल्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम सुरू झाले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सार्वभौमत्वावर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडली आहे. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावली आहे.
‘द केरळ स्टोरी’ रिलीज झाल्यापासून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालने या चित्रपटावर बंदी घातली आहे. पश्चिम बंगालच्या या कारवाईवर भाजप लवकरच न्यायालयात जाणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सार्वभौमत्वावर केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस बजावली आहे.
शिरोळ, हातकणंगलेमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची हजेरी
अवकाळी पावसामुळे हवेतील वातावरणामध्ये गार हवा
गार हवेमुळे उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा
अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ
मणिपूर येथे अडकलेले विद्यार्थी महाराष्ट्रात परतले
मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांचे झाले आगमन
मणिपूरमधील वादात महाराष्ट्रामधील 22 विद्यार्थी अडकले होते
शासनाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणण्यात महाराष्ट्र सरकारला यश
मदतीची अपेक्षा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी साधला मुलांशी संवाद
अजित पवार म्हणाले की मुख्यमंत्री घोषणा करतात अमलबंजावणी करत नाहीत
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन अनुदान देणार ही घोषणा अजितदादांनी केली होती
पण आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर 50 हजार प्रोत्साहन अनुदान एका क्लिकमध्ये शेतकऱ्यांच्या अंकाऊटवर टाकले
आमच्या सरकारने दोन हेक्टर पेक्षा जास्त एनडीआरएफच्या निकषाद बदल करून जास्त मदत केली आहे
शिवाजीनगर, स्वारगेट, डेक्कनसह उपनगरात पावसाची हजेरी
दिवसभर कडक उन्हानंतर सायंकाळी शहरातील अनेक भागात पावसाची संततधार
पुणे वेधशाळेने शहरासह जिल्ह्यातदेखील आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तवला होता
हवामान खात्याकडून शहराला यलो अलर्टदेखील देण्यात आला होता
राज ठाकरे यांचे ट्वीट गांभीर्याने घेण्याची आवश्यकता वाटत नाही
सकाळचे ट्वीट राज ठाकरे यांनी अकाउंटवरून हटवले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवे ट्वीट
हलगी वाजवून फुलांचा गाडीवर वर्षाव करत स्वागत
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे शरद पवारांचे आगमन
फटाक्यांच्या आतिषबाजीत शरद पवारांचे स्वागत
रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यात
सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर शरद पवार यांच्या स्वागतासाठी दिग्गजांची हजेरी
खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील उपस्थित
रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल
रुग्णालयातील रुग्ण उकाड्याने हैराण, तीन तासांपासून लाईट सुरू करण्याचे प्रयत्न सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनरेटर बनले शोभेची वस्तू
ऐन उन्हाळ्यात लाईट गेल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे प्रतिपादन
प्रत्येक सरकार धोका नाही असेच सांगते
मनाला वाटेल तसे बोलणाऱ्यांना महत्त्व देत नाही
आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचे संकट तूर्त टळले
नाशिक जिल्ह्यात कुठेही पाण्याबाबत काळजी करण्यासारखी परिस्थिती नानी
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती
भुसे यांनी पाणी नियोजन बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक
निपाणी येथील भाषण संपल्यानंतर शरद पवार यांनी मोठी घोषणा दिलीये.
भाषण संपवताना शरद पवार यांनी जय कर्नाटक, जय महाराष्ट्र, जय निपाणी जय हिंद अशी घोषणा दिली आहे.
या भाषणामध्ये शरद पवार यांनी भाजपावर टीका देखील केलीये.
निपाणी येथे बोलताना शरद पवार यांनी मोठे भाष्य केले आहे.
शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासभूमिक काम करण्यासाठी आम्ही कर्नाटक मधील काही उमेदवार द्यायचं ठरवलं
मणिपूर मध्ये 4 दिवसात 54 लोकं बळी पडले आहेत
ज्यांच देशात सत्ता आहे त्यांना मणिपूर सारखं राज्य सांभाळता येत नाही
पहिल्यांदा तुम्ही ते राज्य सांभाळा
महाराष्ट्रामध्ये काही लोक फोडले आणि सरकार बनवलं
कर्नाटकमध्ये लोक फोडले आणि सरकार बनवल
पैशातून माणसं फोडायचे आणि त्यातून सरकार बनवायचं ही त्यांची भूमिका
पैशाचा वापर करून राजकारण करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे
कर्नाटकात 40% ची सुरुवात करायची आणि ती हळूहळू देशात वापरायची आहे ही भाजपची मानसिकता
या देशात शेतीचे अनेक प्रश्न आहेत
शेतकऱ्यांना सन्मान मिळेल अशा तरतुदी करण्याची गरज आहे
राजकारणात कुठे थांबायचं कळलं नाही की घात होतो
विरारमध्ये सायकलच्या विचित्र अपघातामध्ये 9 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी
सायकल चालवत असताना अचानक हँडल तुटल्याने ही घटना घडली आहे.
हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जखमी झालेल्या मुलाला पुढील उपचारासाठी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
राज्यात भ्रष्टाचार बोकाळलाय, बदल्यांचे रेट ठरलेत
राजू शेट्टीनीही ही बाब सांगितलीय
आम्ही सत्तेचा माज कधी केला नाही.
त्यामुळे आजही अधिकारी आमचे ऐकतात
आज मंत्री कुणाला विचारत नाहीत
मंत्रालयात बसत नाहीत
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडुन द्या असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय
काही तासांत राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत सुधारणा करीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मराठी मतदारांना केलंय.
आपल्या पहिल्या आवाहनात राज ठाकरेंनी म्हटलं होतं की उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठीच असायला हवा
त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.
या देशात हुकूमशाही वाढत चालली आहे
विरोधात बोलणाऱ्याला गप्प बसवायच काम सुरु आहे
कर्नाटकात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार यावं अशी इच्छा आहे
आमचे चार ते पाच आमदार कर्नाटक मधील निवडून येणार
यावर्षी कर्नाटक राज्यात भाजप सरकार येणार नाही
उपमुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्याचा पक्ष
भारतीय जनता पक्षाने तुम्हाला फौजदाराचा हवालदार केला आहे
तुम्ही आमची माप काढावी का
शरद पवार यांच्या झंझावातात 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष होणार, असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला
पण मला पृथ्वीराज चव्हाण यांना सांगायचं आहे..
येतील लोकांना विचारा बी टीम कोण बनलं आहे
लोकं उघडपणे बोलत आहेत भाजपचे पैसे घेऊन काँग्रेस उत्तम पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे- हसन मुश्रीफ
सातारा- यशवंत गौरव प्रकाशन सोहळ्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचे आगमन
संस्कार मूर्ती यशवंत पाटणे यांची ग्रंथ तुला
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राने सुवर्णकाळ पाहिला.
कुठलाही डाग लागू देता पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले.
मात्र अडीच वर्षात महाविकास आघाडीने हे काम पुसण्याचे काम केलं..
बारसु रिफायनरी प्रकल्प, समृद्धी महामार्गात अडथळे आणण्याचे काम महाविकास आघाडी करते.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावे- अनिल बोंडे.
-मणिपुर हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
-उच्च न्यायालय एखाद्या वर्गाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करण्याचा आदेश कसा देऊ शकते असा सवालच सर्वोच्च न्यायालयाने आज उपस्थित केला.
-सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.
भाजप उमेदवार गुरमे सुरेश शेट्टी यांचा प्रचार
कर्नाटक निवडणुकीत मुख्यमंत्र्यांकडून भाजपचा प्रचार
उडपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघात प्रचार
मारहाणीत युवक गंभीर जखमी
किरकोळ वादातून दोन गटात मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्राने सुवर्णकाळ पाहिला
कुठलाही डाग लागू देता पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं
मात्र अडीच वर्षात महाविकास आघाडीने हे काम पुसण्याचे काम केलं
बारसू रिफायनरी प्रकल्प, समृद्धी महामार्गात अडथळे आणण्याचे काम महाविकास आघाडी करते
त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व्हावे
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल असे लिक होत असतात का?
सामनाच्या आजच्या अग्रलेखात संजय राऊत हे तोंड फाटेपर्यंत राष्ट्रवादीची स्तुती करत होते
त्याच राष्ट्रवादीचे तुकडे पाडण्यासाठी संजय राऊत अग्रलेख लिहत आहे
सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांना टार्गेट केलं जातं
राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम संजय राऊत करतात
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अस्वस्थता ही सर्वाधिक महाविकास आघाडीत
संजय राऊत यांना फोडाफोडीचे काम जमते त्यामुळे राष्ट्रवादीलाही ते फोडणार
सार्वभौमत्व शब्दावर भाजपचा आक्षेप
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
कॉंग्रेस पक्षाचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची भाजपची मागणी
सोनिया गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सार्वभौम शब्द उच्चारला म्हणून भाजपचा आक्षेप
राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा
सभास्थळी शरद पवार याचं आगमन
व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ उपस्थित
काल देवेंद्र फडणवीस यांनी या सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादीवर केला होता हल्लाबोल
राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यात मर्यादित पक्ष असा केला होता उल्लेख
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शरद पवार काय उत्तर देणार याकडे लक्ष
हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे
हा सिनेमा चालला तर तुमच्या पोटात का दुखतंय?
हिंदूच्या हिताच्या चार गोष्टी समोर येतेय म्हणून का?
कोरोना काळात तुम्हाला न्यूझीलंडला जावंसं वाटलं ही तुमची देशभक्ती
त्यामुळे उगाच हिंदू समाजाच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका
आमच्या कामांना स्थगिती दिली, काही जणांनी कोर्टात जाऊन स्थगिती उठवली
यापूर्वीच्या सरकारने कधी स्थगिती दिली नाही
या सरकारने सत्तेत आल्यावर स्थगिती दिली
जनतेच्या कामांना स्थगिती देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला
लोकंचे प्रश्न सोडवायचे राहिले अन् गेलेत तिकडे कर्नाटकला
चिठ्ठी आली की बोलतात, अरे मुख्यमंत्री आहात एखादी नोट घ्या
काही झालं की लगेच शेती करायला गेले
तीन दिवसात 65 फाईल काढल्या
आम्ही 2-3 तासात 65 फाईल काढतो
लाखभर मुलांना रोजगार देणारे प्रकल्प परराज्यात
नोकर भरती करणार, काय झालं..? कुठं गेली नोकरभरती
महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केलाय, मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला
घोषणा केल्या, आम्ही मदत करणार, कधी करणार?
आमदार निधी वाटपालाही स्थगिती, मी 2 कोटीवरुन 5 कोटीवर आमदार निधी आणला
आम्ही सत्तेत असताना पक्षभेद केला नाही
आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राची पिछेहाट झालीय
जनतेच्या पैशातून ह्यांची जाहिरातबाजी, करोडो रुपये खर्च करतात
बेस्ट बसेसवर ह्यांचेच फोटो, लोक बघायचं नाही म्हणतात तरीही ह्यांचेच फोटो
मीही अर्थमंत्री होतो, आम्ही शिस्त लावली होती, ती बिघडवण्याचे काम हे करतात
हे दुसऱ्याला शिव्या देतात, मला शिव्या, साहेबांना शिव्या, अरे शिव्या देण्यापेक्षा काम करा ना
रयतेला आम्ही किती मदत करतो, साहेब संस्थेसाठी काय काय करतात
तुम्ही तुमचं बघा ना, ह्यांच्या एकाधिकारशाहीला लोक कंटाळलेत
कोरेगावमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत, आपल्याला पुढेही यश मिळवायचंय
कुठेही कमी पडायचं नाही, सगळ्या समाजाला बरोबर घ्या
काहीजण बेताल वक्तव्य करतात, त्यांची वक्तव्ये ऐकण्यासारखीही नसतात
अशी परिस्थिती कधीही महाराष्ट्रात झालेली नव्हती
यापुढे महाविकास आघाडीमय व्हायला हवं
अनेक ठिकाणी चांगलं यश, काही ठिकाणी थोड्या मतांनी अपयश
अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाने उन्माद करायचा नाही हे साहेब सांगतात
आजवरच्या इतिहासात बाजार समिती निवडणुकीत इतक्या तुल्यबळ लढती झाल्या नाहीत
बाजार समिती निवडणुकीत एका पॅनेलला 50 कोटी खर्च
हे सरकार आल्यापासून कसा कारभार सुरुंय हे सामान्य नागरिक म्हणून बघा
शिंदे सरकारवर टीका
अधिकारीही म्हणतात मला इथं रहायचं नाही
इथं पोलीस निरीक्षकाची जागा रिक्त आहे, कोणीही यायला तयार नाही
हा कसला कारभार चाललाय
एका कार्यकर्त्याने फोटो दाखवला, त्याचा हातच तोडलाय, काय मोगलाई लागलीय का?
यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून साताऱ्याची ओळख
आम्हीही इथं पालकमंत्री म्हणून काम केलं, पण कधी असं चुकीचं वागलो नाही
मी कोरेगावमध्ये मागे आलो, मोठा कार्यक्रम झाला, 75 हजाराने निवडून येतील असं सांगितलं
2019 ला काय घडलं हे तुम्ही पाहिलं
मी 1991 ला लोकसभेला उभा होतो
साहेब म्हणाले किती मतांनी येशील मी म्हटलं 1 लाख
साहेब म्हणाले 1 लाख म्हणजे किती हे कळतं का
निकालात मला देशातील पहिल्या क्रमांकांची मते मिळाली
बाजार समितीत इतर नेते यश मिळवतात तर आपण का नाही
सगळ्या घटकांना बरोबर घ्यावं लागतं, लोकांमध्ये मिसळावं लागतं
आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मविआ म्हणून एकजूट ठेवू
काही ठिकाणी कॉंग्रेस, काही ठिकाणी सेना आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद असेल
हा एकोपा एकत्र ठेवून आपण पुढे जायची मानसिकता ठेवा
आता ठराविक आमदारांना सांभाळण्याचं काम चालूंय
भ्रष्टाचार बोकाळलाय, बदल्यांचे रेट ठरलेत
राजू शेट्टीनीही ही बाब सांगितलीय
आम्ही सत्तेचा माज कधी केला नाही, त्यामुळे आजही अधिकारी ऐकतात
आज मंत्री कुणाला विचारत नाहीत, मंत्रालयात बसत नाहीत
आज काही माणसे फिरतात तुमचं काम करुन द्यायचं का
कुणी काहीही बोलतंय, छत्रपतींचा अपमान केला जातो
कोरोना काळातही आमदार मागणी करतील ती मदत केली
आम्ही ठेकेदाराला दर्जेदार काम करायला सांगतो, त्याला अडचण आली तर मदत करतो
इथं तुमच्या भागात काय चाललंय
संधी आम्ही देतो, त्या संधीचं सोनं करायचं की राख हे तुमच्या हातात
आज कोरेगावला आलो, काय रस्त्याची अवस्था आहे
सरकार तुमचंय, मुख्यमंत्री तुमचाय, मग तुम्ही काय करताय
1 लाख कोटींची बिलं थकवलीत, अशी तशी कामं होत नाहीत, पाठपुरावा करावा लागतो
बारामतीत कोणी पाहुणे असतील तर विचारा, पहाटेपासून काम सुरु करतो
सातारा हे एक महत्वाचे शहर, संस्था ताब्यात घेणं सोपं पण चालवणं लय अवघड
निर्व्यसनी रहा, अजिबात वेड्यावाकड्या गोष्टी करु नका
संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत, अनेक योजना आहेत, त्याचा लाभ घेतला पाहिजे
मला केवळ माझ्याच मतदारसंघात कामे करुन चालत नाही
देशाच्या पंतप्रधानपदी ओबीसी नेता बसला असल्याने अनेकांचे पोट दुखते
या पोटदुखीचे कोणते औषध नाही
या देशाचं सक्षम नेतृत्व वाढलेलं आहे
देशाचे सन्मान वाढवतो, देशात जातीचे पक्ष आहेत
जातीच्या नावावर मतदान मागतात
देशाचे पंतप्रधान मंत्री यांनी देशाची उंची वाढवली आहे
अशा नेत्यांच्या बाबत स्वार्थी, खुर्चीवर प्रेम करणारे लोक असेच बोलणार
मुनगंटीवार यांचा ओवेसी यांना टोला
छत्रपती संभाजीनगर येथे चेंबरमध्ये गुदमरून तीन मजुरांचा मृत्यू
चेंबर साफ करण्यासाठी तीन मजूर उतरले होते चेंबरमध्ये
चेंबरमध्ये गॅसमुळे गुदमरून तीन मजुरांचा मृत्यू
छत्रपती संभाजी नगर शहरातील धक्कादायक घटना
सलीम अली सरोवर परिसरात घडली धक्कादायक घटना
पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिकन वाटपाचा कार्यक्रम
आमदार टिंगरे यांच्या कार्यकर्त्याकडून वाढदिवसानिमित्त आगळावेगळा उपक्रम
एक रुपये किलोने चिकन खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा
येरवड्यातील लक्ष्मी नगर परिसरात चिकन खरेदीसाठी मोठी गर्दी
पुणे : सकाळी ८ च्या सुमारास घडली घटना
या अपघातामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना बराच वेळ वाहतूककोंडी मध्ये अडकवून राहायला लागले
घटनेची माहिती मिळताच पुणे वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली
क्रेन बोलवून कंटेनर बाजूला करून घेण्याचे काम चालू झाले आहे
कल्याण : बृजभूषण सिंह यांच्या निषेधार्थ कल्याण युवक काँग्रेसचं कल्याणामध्ये काळया फिती बांधून ठिय्या आंदोलन
कल्याण छत्रपती शिवाजी चौक सरकारविरोधात घोषणा करत केले आंदोलन
बृजभूषण सिंह यांना अटक करा अन्यता उग्र आंदोलनाचा दिला इशारा
पुणे : जसा निकाल लागेल तसे ते सगळे चालले जातील
चर्चेप्रमाणे त्यांच्याकडचे लोक आमच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क करत आहेत
सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्ही सन्मानाने स्वीकारू
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
पुणे : 82 टक्के पंचनामे झाले आहेत
आणखी 4 दिवस पाऊस पडणार
हे अस्मानी संकट आहे, कोणीही राजकारण करू नये
बदलत्या हवामानाप्रमाणे नवीन काही पीक घेता येईल का यावर विचार सुरू आहे
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी संजय राऊत यांच्यावर केली टीका
सामन्याच्या अग्रलेखाची आम्ही सहमत नाही, पक्षातले सर्वच पवार साहेबांच्या राजकीय विचारांचे वारस
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी प्रत्येक ग्रामीण भागात आणि जिल्ह्यात जाऊन सर्वे करावा
त्यानंतर त्यांना कळेल एक दोन नव्हे तर लाखो संख्येने पवार साहेबांच्या विचाराचे वारस आहे
– महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे.
– मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकार वाढले आहेत.
– या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का ? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारला आहे.
– सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याबाबत महिलांच्या संबंधाने काम करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांची मते जाणून घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे असेही म्हटले आहे.
– भाजपाचा बालेकिल्ला मध्य प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
– माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे पुत्र दीपक जोशी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे.
– दीपक जोशी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे
– राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला असून बागलीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे मला वाईट वाटले आहे. मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, असे ते म्हणाले.
– या वर्षअखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. या दरम्यान जोशी यांच्या प्रवेशामुळे भाजपाला धक्का तर काँग्रेसला बळ मिळाले आहे.
– ठाकरे गटाचे नेते राहुल कणाल यांनी नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे.
– मानहानीच्या दाव्यासंदर्भात आमदार नितेश राणे यांना ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
– दिशा सालियन प्रकरणातील आरोपांवरून ही नोटीस पाठवली आहे.
मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आज विशेष विमानाने महाराष्ट्रात आणणार
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
संध्याकाळी साडेसहा वाजता विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान मुंबईमध्ये उतरणार आहे.
बँकेची उलाढाल 45 हजार कोटींवर
सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी नफा
जयेश पुजारीची NIA चौकशाची शक्यता
जयेश पुजारी सध्या नागपूरातील मध्यवर्ती कारागृहात कैदेत
Shubman Gill IPL 2023 : वीरेंद्र सेहवागला शुभमन गिलच्या खेळात काय खटकतय?. वाचा सविस्तर…..
पीडित महिला 2019 नंतर अनेकवेळा भारतात आली. आरोपी गगनदीपने महिलेला लग्नाच आश्वासन देऊन वेगवेगळया ठिकाणी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. वाचा सविस्तर
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या फायनलआधी टीम इंडियासाठी एक गुड न्यूज आहे. वाचा सविस्तर….
जेव्हा जेव्हा काँग्रेसने मोदींवर टीका केली तेव्हा तेव्हा प्रायश्चित मिळाले
काँग्रसचे नेते पातळी सोडून पंतप्रधान मोदींवर टिका करत आहेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदार मतदानाद्वारे बदला घेतील- एकनाथ शिंदे
देश भरातील स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबीरासाठी नागपूरात दाखल
25 दिवस चालणार संघाचं शिबीर
राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडावं, असं राऊतांना वाटतंय का ? – छगन भुजबळ
शिंदेंच्या बॅगांवर लक्ष ठेवलं असतं तर आज वेगळं चित्र असतं- भुजबळांचा टोला
राजस्थानाच्या हनुमानगडमध्ये वायुसेनेचं मिग 21 हे विमान कोसळलं
विमानातील पायलट सुरक्षीत
रहिवाशी भागात विमान कोसळले
वाढत्या तापमाणामुळे रहदारी कमी झाली
विरोधकांची मोटबांधणी करण्यासाठी नितीश कुमार पुठाकार घेणार
शरद पवारांनी दिली माहिती
उध्दव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार
अजित पवार हे महाराष्ट्राचे अभ्यासू नेते, त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता- शशिकांत शिंदे
बजरंगदलवर बंदी आणले शक्य नाही- ओवैसीची टिका
दिल्लीत कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा आज 16 वा दिवस आहे.
बजरंग पुनिया, साक्षी मलिक यांच्यासह कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे
आजही आंदोलन स्थळी प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त
राजस्थानमधील हनुमानगढ येथील घटना
पायलट सुरक्षित
विमान कोसळल्याने एक महिला मृत्यूमुखी
सांगली मधील महिला कुस्तीपटू आणि क्रीडाप्रेमींनी ब्रिजभूषण शरण सिंहचा पुतळा जाळून केला निषेध.
ब्रिजभूषण मुर्दाबाद, ब्रिजभूषणवर कारवाई झालीच पहिजे अशी दिली घोषणाबाजी
ब्रिजभूषणवर तात्काळ कारवाई करा, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि राज्य क्रीडा संघटक संजय भोकरे आणि क्रीडापटूची या आंदोलनाद्वारे मागणी
कर्नाटकमधील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत.
भाजप आणि काँग्रेसमध्ये एक हाती सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
कर्नाटक विधानसभेसाठी 10 तारखेला होणार आहे मतदान
13 मे रोजी निकाल लागणार आहे
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेऊन येणारे विशेष विमान सायंकाळी 6.30 वाजता मुंबईत दाखल होणार आहे.
सायंकाळी 4.30 वाजता हे विमान गुवाहाटी येथून मुंबईकडे प्रयाण करणार आहे.
आता मणिपूरच्या इंफाळ येथून हे विद्यार्थी गुवाहाटीकडे रवाना होणार आहेत.
नंदूरबार जिल्ह्यातील अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करता यावा यासाठी केंद्र सरकारने आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरू केली आहे. या योजनेत जिल्ह्यात १ लाख १२ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, या योजनेसाठी जिल्ह्यातील ९१ हजार ६८८ शेतकऱ्यांनी आधार लिंक पूर्ण करून घेतल्याने त्यांना सुलभपणे हप्ता लवकर मिळणार आहे.
सांगोला येथे झाले शरद पवारांचे जोरदार स्वागत
आज शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्याचा दुसरा दिवस आहे
पिंपरी चिंचवड
-पुणे मुंबई महामार्गावर देहूरोड परिसरात लोकांना अडवून लूटमार करणाऱ्या तीन भांमट्यांना अटक करण्यात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला यश आलंय
IPL 2023 Cheerleaders : स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडून चिअरलीडर्सबद्दल कशी अभद्र भाषा वापरली जाते, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कामाच्या ठिकाणी छळाचाच प्रकार आहे. वाचा सविस्तर…..
पंढरपूर .. सांगोला महाविद्यालयाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभाच्या सोहळ्यासाठि देशाचे नेते शरदचंद्र पवार सांगोल्यात दाखल….. राजीनामा मागे घेतल्यानंतर पवारांच्या पहिल्याच दौऱ्यातील आज चा दुसरा दिवस
RR vs SRH : राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन दमदार इनिंग खेळला. 66 धावा करुन त्याने 214 पर्यंत टीमची धावसंख्या पोहोचवली. पण विकेटपाठी त्याने खराब कामगिरी केली, ज्याचा फटका राजस्थान रॉयल्सला बसला. वाचा सविस्तर….
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांवर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..
अनैसर्गिक अत्याचार करून ते तीस वर्षीय महिलेला ब्लॅकमेल करत व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी..
विवाहितेला धमकावून ब्लॅकमेल करत तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे समोर..
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मुक्तार खान उर्फ बब्बू असे पदाधिकाऱ्याचे नाव..
पदाधिकाऱ्यावर बलात्कार,अनैसर्गिक अत्याचाराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल..
-पुण्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली असून दोन पिस्तुल जप्त केली आहेत
-राम पाटील असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील वाकड, देहूरोड, हिंजवडी, रावेत, सांगवी, खडकी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
-आरोपी राम पाटीलला पिशवीतून पिस्तुल घेऊन जाताना रंगे हात पकडले. दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.आरोपीने केलेले नऊ गुन्हे देखील उघड झाले आहेत
– कर्नाटकात टप्प्या टप्प्यावर चेक पोस्ट
नाशिक ब्रेकिंग
-झाडांवर खिळे ठोकून, बॅनर लावून जाहिरात करणाऱ्यांविरोधात पर्यावरण प्रेमी आक्रमक
-जाहिरातबाजी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी
-थेट मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन तक्रार करून कारवाईची केली मागणी
-झाडांना खिळे ठोकून केले जाते विद्रुपीकरण
-याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चैतन्य गायकवाड यांनी..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटक प्रचाराचा आजचा दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मेंगलुर येथील व्यकटरमना महालक्ष्मी मंदिरात पुजा करुन दुसऱ्या दिवशी प्रचाराची सुरुवात केलीय. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांकडून कर्नाटकात भाजपच्या विजयासाठी महापुजा केलीय. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कर्नाटकातील उडपी जिल्ह्यात दोन प्रचारसभा आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रचाराच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महालक्ष्मी मंदिरात पुजा करुन केलीय. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी.
आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट
अम्मा का टिफिन उपक्रमाबद्दल जाणून घेतली माहिती, माता महाकाली महोत्सवासाठी आ. जोरगेवार यांनी केले आमंत्रीत
आमदार किशोर जोरगेवार यांनी ताडोबा येथील विश्राम गृह येथे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट घेत त्यांना आॅक्टोंबर महिण्यात आयोजित माता महाकाली महोत्सवासाठी आमंत्रीत केले आहे.
यावेळी सचिन तेंडूलकर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सुरु असलेल्या अम्मा का टिफिन या उपक्रमाची माहिती घेतली.
नागपूरच्या पाचपावली पोलिसांन गाईच्या पिल्लांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला… यातील एकाला अटक करण्यात आली असून तो कुख्यात गुन्हेगार आहे तर दुसरा फरार आहे …. दोन गाई चोरल्याची त्याने कबुली दिली …. महत्त्वाचं म्हणजे गाई चोरीसाठी ते कारचा उपयोग करत होते… ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली…
महाड मध्ये झालेल्या स्नेहल जगताप यांच्या प्रवेशा दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सभेत सुषमा अंधारे यांनी शिवसेना प्रवक्ते आमदार भरत गोगावले आणि आमदार पुत्र विकास गोगावले यांच्यावर भंगार व्यवसायावरून टिका केली. यावर उत्तर देताना विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, त्यामुळे गेली पंधरा वर्ष विरोधक भंगार भंगार बोलत आहेत. सुषमा आंधेरे जातात तेथे त्या त्या आमदारा विरोधात बोलतात.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी 14 कोटींच्या येणार नव्या कार.
Anc :- दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी नगर महापालिकेचे उपायुक्त यांच्या वाहनाने अचानक पेट घेतल्याने त्यानंतर महानगरपालिकेने आता जुनी वाहन बदलून नवी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे,या नव्या वाहन खरेदीसाठी चौदा कोटीच्या कार खरेदी केल्या जाणार असून नव्या कार आता महानगरपालिकेच्या परिसरात पाहायला मिळणार आहेत.
– सत्तासंघर्षवर 11 तारखेला निकाल येण्याची शक्यता,
– घटनातज्ञ उल्हास बापट यांची टीव्ही 9 ला माहिती,
– सुप्रीम कोर्टाकडून तशा हालचाली सुरू झाल्याची माहिती
नाशिक जिल्हा सहकारी बँकेने थकबाकी वसुलीसाठी उचलले पाऊल
10 लाखांहून अधिक थकबाकी असलेल्यांची नावे फ्लेक्सद्वारे झळकणार
आरबीआयचे लायसन्स अबाधित ठेवण्यासाठी बँकेने घेतला कठोर निर्णय
थकबाकी भरण्याचे बँकेचे आवाहन
26 जानेवारी 2024 ला कर्तव्यपथावर दिसणार नारी शक्तीची ताकद
बॅंड पथक, चित्ररथ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसणार
संरक्षण विभागाचं एअर फोर्स, आर्मी आणि नेव्ही सह अन्य मंत्रालयाला पत्र
नितीश कुमार यांचा 11 मे रोजी मुंबई दौरा
दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांचीही भेट घेणार
घटनातज्ञ उल्हास बापट यांची टीव्ही 9 ला माहिती
सुप्रीम कोर्टाकडून तशा हालचाली सुरू झाल्याची माहिती
आमिर खान नेपाळमधील बुधनिलकंठ याठिकाणी विपश्यना केंद्रात करणार ध्यानसाधना
जवळपास 11 दिवस करणार मेडिटेशन
याठिकाणी येणाऱ्यांना किमान दहा दिवसांचा कोर्स करावा लागतो, वाचा सविस्तर..
अभिजित पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे काळे आणि भालके नाराज असल्याची चर्चा
नाराजीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची
अभिजित पाटलांची पंढरपूर मतदारसंघातून शरद पवारांनी उमेदवारी देण्याचे दिले संकेत
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज कसबा मतदारसंघात घेणार महामेळावा
भाजपच्या कार्यकर्त्यांना बावनकुळे करणार संबोधित
कसबा मतदारसंघातील बूथ प्रमुखांना बावनकुळे करणार मार्गदर्शन
पुणे शहर भाजप कार्यकारणीतील सर्व स्थानिक पदाधिकारी बैठकीला राहणार उपस्थित
कसबा विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपा कसब्यात घेणार अनेक मेळावे
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले 10 दिवस कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलं
भाजप आणि काँग्रेसमध्ये एक हाती सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच
कर्नाटक विधानसभेसाठी 10 तारखेला होणार आहे मतदान
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही महाराष्ट्रातील अनेक नेते प्रचारासाठी कर्नाटकात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची निपाणीत जाहीर सभा
राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचारार्थ दुपारी 3 वाजता शरद पवार यांची सभा
शरद पवार आज सांगोल्यात बाबुराव गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित रहाणार
सोलापूर जिल्ह्यानंतर शरद पवार आज साताऱ्याकडे रवाना होणार
शरद पवारांची निपाणीत जाहीर सभा
अपघातात एक महिला किरकोळ जखमी
भिवंडीकडे जाणाऱ्या बसने दिली कल्याण स्टेशनच्या दिशेला जाणाऱ्या रिक्षाला धडक
धडक दिल्यानंतर बस चालकाची दादागिरी सुरू झाल्याने नागरिक संतप्त
रिक्षात बसलेल्या प्रवाशी आणि नागरिकांनी भर चौकात घातला गोंधळ
वाहतूक पोलीस नसल्याने तब्बल अर्धा तास वाहतूक कोंडी
शहरातील पावसाळ्यापूर्वी करण्याची कामे जैसे थे
रस्ते दुरुस्ती नालेसफाई आणि गटाऱ्यांच्या स्वच्छतेची केवळ 26 टक्के कामाची पूर्तता
उर्वरित कामे 10 जून पर्यंत पूर्ण होतील महापालिका प्रशासनाचा दावा
पण शहरातली कामे मात्र संथ गतीनेच सुरू
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून शहरातील पावसाळी कामांचा आढावा
पावसाळापूर्वक कामांसाठी महापालिकेकडून 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर
11 मे रोजी पुण्यातून सोडण्यात येणार भारत गौरव ट्रेन
28 एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्थानकातून पहिली भारत गौरव ट्रेन रवाना करण्यात आली होती
देशातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जाण्यासाठी विविध राज्यातून भारत गौरव पर्यटन रेल्वे सुरू करण्यात आली आहे
देशभरातून एकूण 28 ठिकाणाहून या रेल्वे चालवण्यात येणार आहेत
किराणा दुकानात खाऊ घेण्यासाठी जाणाऱ्या तीन वर्षीय बालिकेच्या अंगावर शेषराव मेघराज यांच्या घराची भिंत कोसळली
ती त्यात दाबल्यानं बालिकेचा दबून मृत्यू
भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात घडली घटना
देविका प्रकाश दिघोरे (3) असं मृतक बालिकेचं नावं
प्रवाशांना घेऊन जात असताना बोट नदीत बुडाली
बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरलेले होते
अजूनही अनेकजण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू
10 जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश