Maratha Reservation Maharashtra News LIVE : ‘शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत’, बच्चू कडू यांचं रोखठोक वक्तव्य
Manoj Jarange on Maratha Aarakshan Maharashtra News LIVE : आज 27 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता संपणार आहे. धर्मवीर आनंद दिघे आनंद दिघे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. पुणे पोलिस आयुक्तालयातील १७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
संजय राऊत यांनी घेतलं शनी देवाचं दर्शन
अहमदनगर | शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनी देवाचं दर्शन घेतलं आहे. त्यांनी चौथऱ्यावर जाऊन शनीला तैलभिषेक केला. राऊत यांच्यासोबत जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी होते. राऊत सध्या दोन दिवसांच्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
-
‘शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाही’, बच्चू कडू यांचं वक्तव्य
अमरावती | “माणसाच्या अंगात ताकद किती आहे यापेक्षा डाव कसा मारता येईल हे महत्त्वाचं आहे. आमची पार्टी दोन आमदाराची जरी असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेसा आहे. आम्ही चितपट केल्याशिवाय राहत नाहीत. सभागृहात कोण बसला आहे, कोण नाही बसला याची चिंता आम्ही करत नाही. नेता आमचा बाप होऊ शकत नाही. जातपात, धर्म बाजूला ठेवून आता खरी लढाई शेतकऱ्यांची लढली गेली पाहिजे. मी जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलो पण शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत. शेतकरी महत्त्वाचा आहे. सरकार अनेक बदलले पण शेतकऱ्यांबद्दलचे धोरण अजून बदलले नाही”, असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.
-
-
फडणवीस यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी… नितेश राणे यांचा आरोप
मुंबई : ज्यांनी राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी दगडफेक केली त्यांना उत्तर देऊ. लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतीत आम्ही माहिती देऊ. काही पोलिस अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने काम केलं याची माहिती देखील मिळाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी काम केल्याचे दिसत आहे. त्यांना आता त्यांची जागा दाखवून देऊ असे आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी दिले.
-
मराठ्यांचा संघर्ष संपला, एक चांगली सुरुवात झाली, मंत्री दीपक केसरकर
मुंबई : जेव्हा असा कोणताही नियम काढायचा असतो त्याला ऑब्जेक्शन, सजेशन मागवावेच लागतात. ओबीसींना यामध्ये काही ऑब्जेक्शनेबल वाटत असेल तर त्यांनी ते मांडावे आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू. ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता कुणबी प्रमाणपत्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. ओबीसींनीसुद्धा सुरुवातीला सांगितले होते की कुणबी हे पूर्वीचे आरक्षण असल्यामुळे आमचा त्याला काही विरोध असणार नाही असे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
-
वेल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो, सदावर्ते यांच्यावर मनसेची टीका
मुंबई : सदावर्ते हा कोण आहे. मुर्खाच्या नंदनवनात फिरणारा हा माणूस स्वतःचे अस्तित्व नाही. वेल्डिंगवाल्याचे चष्मे घालून फिरतो. जोकर सारख्या माणसांवर प्रतिक्रिया देणं म्हणजे स्वतःच अपमान करून घेण्यासारखं आहे. मूर्ख माणसा राज ठाकरे यांच्यासमोर बोलायची किंवा उभा राहायची तुझी पात्रता आहे का? पहिले महाराष्ट्र सैनिकांसमोर डिबेट करायला ये. स्वतःची पात्रता कळेल, अशी टीका मनसे राज्य उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.
-
-
भाजपने केला कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा तो व्हिडीओ व्हायरल
पुणे : कसब्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये ते अधिकाऱ्यांना ‘ही मस्ती आली कुठून? असे म्हणताना दिसत आहेत. त्यावर भाजपने यांचे नेते दिवसरात्र ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून तोंडच्या वाफा टाकतात. पण, ‘मोहब्बत की दुकान’चा हाच खरा चेहरा आहे अशी टीका केली आहे.
-
मनसेकडून मिसळ महोत्सव
मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील अभिनव नगर मैदानात मनसे कडून तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कालपासून सुरू झालेल्या मिसळ महोत्सवाला बोरिवलीकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून याठिकाणी नागरिक झणझणीत आणि रस्सेदार मिसळीवर ताव मारताना दिसून आले. या मिसळ महोत्सवाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील भेट दिली विशेष म्हणजे मनसेच्या स्टेजवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी देखील उपस्थिती लावल्याने उपस्थितांमध्ये वेगळ्या चर्चां रांगल्याचे दिसून आले आहेत.
-
जळगावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष
जळगावमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने जल्लोष करण्यात आला. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याचा जळगावत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. नृत्य करत मराठा समाजाच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला.
-
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिज्ञा घेतली होती..त्यानुसार सर्वसामान्य सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ , दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांनी दिलेली साथ व मराठा समाजाचा संयम अशा सर्वांचा हा एकत्रित विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
-
50 किलो वजनाची पोती पळवण्याची अनोखी स्पर्धा
सांगलीमध्ये हमाल बांधवांच्या पोती पळवण्याच्या स्पर्धा पार पडल्या आहेत.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात या स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होतं.काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन पार पडले.दीड किलोमीटर अंतराच्या 50 किलो वजनाची पोती पळवण्याच्या या स्पर्धेमध्ये जवळपास 100 हून अधिक हमाल बांधवाना सहभाग घेतला होता.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली शपथ खरीप करून दाखवली – उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा आहेत. दसरा मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली त्याचा सार्थ अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. औंध येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार ते बोलत होते.
-
भुजबळांवर पुन्हा प्रहार
छगन भुजबळ, मराठा-ओबीसी यांच्यात भांडणं लावत आहेत, असा आरोप मराठा आंदोलक छगन भुजबळ यांनी केला. जर ते असेच विरोध करत राहिले तर त्यांचे आरक्षण घालवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही दम लावून लढून आरक्षण मिळवल्याचा टोला त्यांनी छगन भुजबळ यांना लगावला.
-
जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही – प्रकाश शेंडगे
मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळालं आहे. 100 टक्के मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घ्यायचा जरांगे पाटील आणि सरकारचा प्रयत्न यशस्वी झाला असं दिसत आहे. पण यात खरंच मराठा समाजाचा फायदा की तोटा दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होईल. आता ओबीसी आरक्षणाचा वर्गीकरण आणि विभाजन होईल. जो कुणबी दाखला घेईल तो पुन्हा मराठा होऊ शकत नाही. तुम्ही पुन्हा 96 कुळी मराठा म्हणून घेऊ शकत नाहीत. असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.
-
भुजबळ यांना स्पष्ट सांगु इच्छितो ओबीसींवर अन्याय होणार नाही – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कार्यपद्धती असते. भुजबळ यांना स्पष्ट सांगु इच्छितो ओबीसींवर अन्याय होणार नाही. कायदेशीर अडचण होती ती दूर करून कार्यपद्धती सोपी केली, भुजबळ साहेबांचं समाधान होईल. मोठा समाज आहे, सर्वेक्षण सूरु आहे, क्युरेटिव्ह मध्ये मार्ग निघाला नाही तर सर्वेक्षण सुरू आहे. सकारात्मक मार्ग क्युरेटिव्ही मध्ये निघेल अशी आशा आहे. गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे. घर जाळणे, थेट हल्ला, हे गुन्हे कोर्ट आदेश शिवाय मागे घेता येणार नाही. इतर आंदोलनातील गुन्हे मागे घेऊ.
-
मला आनंद आहे, सरकारने सकारात्मक दाखवली – देवेंद्र फडणवीस
मला आनंद आहे, सरकारने सकारात्मक दाखवली. मनोज जरांगे यांचं अभिनदं करतो. मार्ग कायदेशीर काढावा लागेल असे आम्ही सांगत होतो. नोंदी असलेल्या रक्त नात्यातील लोकांना प्रमाणपत्र देता येईल. सरकारने मार्ग स्वीकारला. मराठा समजाचा प्रश्न सुटणार आहे. ओबीसींवर अन्याय होऊ दिला नाही. राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
-
मराठा आरक्षणाची गरज होती त्यांना ते मिळालं आहे – प्रकाश सुर्वे
मराठा आरक्षणाची गरज होती त्यांना ते मिळालं आहे. जरांगे साहेबांनी त्यांच्यासाठी फार कष्ट उचलले आहेत. ते आज फलित झालेले आहे. आरक्षण देण्याचे काम मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. बाकीच्या समाजाला सुद्धा धक्का न लागतात हे आरक्षण मिळणार आहेत. मला वाटतं मराठा आरक्षण समाज गेल्या पन्नास साठ वर्षापासून आंदोलन करत होते. भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितले होते की मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. असे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे.
-
50 टक्यांच्यावर आरक्षण देतो असं म्हणणं दिशाभूल करणारं – उल्हास बापट
50 टक्यांच्यावर आरक्षण देतो असं म्हणणं दिशाभूल करणारं आहे. सग्या सोयऱ्यांची व्याख्या ठरवली आहे त्याविरोधात आता कोर्टात जाता येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात कोर्टात जाता येणार आहे. राजकीय लढाई संपली आहे, आता कायदेशीर लढाई सुरु होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्याव लागेल असं मी सांगत होतो तेच जरांगे बोलत आहेत. असं कायदे तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे.
-
सरकारने मराठा आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला – रावसाहेब दानवे
राज्य सरकारने मराठा आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. मराठ्यांनी मुंबईत येणे टाळले आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यात दाखल झाले असून टेंभी नाका आनंद आश्रम आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळावर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत.
-
मराठ्यांना EWS लाभापासून वंचित ठेवण्यासाठी आंदोलन – सदावर्ते
मराठ्यांना EWS लाभापासून वंचित ठेवण्यासाठी आंदोलन असल्याचा आरोप एड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
-
आरक्षणाच्या अध्यादेशानंतर कोल्हापुरात शिंदे गटाचा आनंदोत्सव
आरक्षणाच्या अध्यादेशानंतर कोल्हापुरात शिंदे गटाचा आनंदोत्सव सुरु झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेश क्षीरसागर यांच्याकडून साखर पेढे वाटप करण्यात आले.
-
Live Update : जरांगे पाटील यांच्यासाठी खास गिफ्ट, मुलगा शिवराजने सांगितलं सस्पेन्स
आमच्यासाठी आजचा दिवस सणा सारखा आहे. माझ्या पप्पांनी समाजासाठी सार्थक केलं. आज मला खूप आनंद होतोय. पप्पांना मी खास गिफ्ट देणार आहे. गिफ्ट हे सस्पेन्स आहे. पप्पा घरी आल्यावर मी देणार आहे. साडे पाच महिण्यानंतर पप्पा घरी येणार आहेत. त्याचा मोठा आनंद आहे. असं जरांगे पाटील यांचा मुलगा म्हणाला.
-
Live Update : जरांगे पाटील यांच्यासाठी खास गिफ्ट, मुलगा शिवराजने सांगितलं सस्पेन्स
आमच्यासाठी आजचा दिवस सणा सारखा आहे. माझ्या पप्पांनी समाजासाठी सार्थक केलं. आज मला खूप आनंद होतोय. पप्पांना मी खास गिफ्ट देणार आहे. गिफ्ट हे सस्पेन्स आहे. पप्पा घरी आल्यावर मी देणार आहे. साडे पाच महिण्यानंतर पप्पा घरी येणार आहेत. त्याचा मोठा आनंद आहे. असं जरांगे पाटील यांचा मुलगा म्हणाला.
-
Live Update : सकल मराठा समाजाचा कोल्हापुरात आनंदोत्सव
सकल मराठा समाजाचा कोल्हापुरात आनंदोत्सव… आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाजाकडून आनंद व्यक्त… आंनंद व्यक्त करण्यासाठी कोल्हापुरातील सकल मराठा बांधव दसरा चौकात जमल्याची माहिती मिळत आहे…
-
Live Update : आरक्षण मिळाल्याचा जल्लोष ग्रामीण भागात गाव खेड्यात सुरू
आरक्षण मिळाल्याचा जल्लोष ग्रामीण भागात गाव खेड्यात सुरू… फटाक्याची आतिशबाजी करत मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे.. डीजेवर जरंगे पाटील यांचं गाणं लावून गाव खेड्यात आनंद साजरा केला जात आहे… या आनंदात एकमेकांना समाज बांधवांनी भरवले पेढे
-
Live Update : सत्तर वर्षांचा लढा सार्थ ठरला – जरांगे पाटील यांच्या मुलीचं वक्तव्य
आरक्षण मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करत जरांगे पाटील यांची मुलगी म्हणाली, ‘सत्तर वर्षांचा लढा आज सार्थ ठरला आहे. पप्पांनी साडेपाच महिने जो संघर्ष केला, त्याला फळ मिळालं आहे. मराठा समाजाला आनंत झाला.
-
Live Update : मराठा आरक्षण; धाराशिव शहरात आनंदाचं वातावरण
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मराठा समाजाने पेढा वाटून, गुलाल उधळून व फटाके फोडत नाचून आनंद व्यक्त केला
-
Live Update : सरसकट गुन्हे मागे घ्या हा नियम यापुढे सर्वांनाच लागू होईल का? – छगन भुजबळ
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा अरक्षण आंदोलनाला यश मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सरसकट गुन्हे मागे घ्या हा नियम यापुढे सर्वांनाच लागू होईल का? मराठा समाजातील विद्यार्थ्यांना फक्त मोफत शिक्षण का सगळ्यांनाच मोफत द्या… उद्या याबाबत संध्याकाळी 5 वाजता मी माझ्या मुंबईतील निवस्थानवर बैठक घेऊन चर्चा करणार… हा अध्यादेश नाही नोटिफेकेशनचा मसुदा आहे.. असं देखील छगन भुजबळ म्हणाले.
-
Live Update : मराठा समाजाला आरक्षण, यश मिळाल्यानंतर सर्वत्र मोठ्या उत्साहात जल्लोष
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे. यश मिळाल्यानंतर सर्वत्र मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीमध्ये देखील मराठा समाजाच्या वतीने फटाके फोडत एकमेकांना पेठे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला…
-
सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत – छगन भुजबळ
सगेसोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत . जात ही शपथपत्राने नाही तर जन्माने येते.
-
झुंडशाहीने कायदे, नियम बदलता येत नाहीत – छगन भुजबळ
मराठा समजाचा विजय झालाय असं मला वाटत नाहीत. झुंडशाहीने कायदे, नियम बदलता येत नाहीत, छगन भुजबळ यांनी केली टीका.
-
Maratha Reservation | आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जे आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येईल, नोकरी देण्यात येईल.
-
Maratha Reservation | आजचा दिवस मराठा बांधवांच्या विजयाचा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आजचा दिवस मराठा बांधवांच्या विजयाचा दिवस आहे. मतासाठी नाही तर हितासाठी आमचे निर्णय असतात. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार.
-
Maratha Reservation | शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
Maratha Reservation | या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा – मनोज जरांगे पाटील
आरक्षणातील कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी सर्वात पुढे राहीन. या अध्यादेशाला काही धोका झाला तर मी सगल्यात पहिले मुंबईला, आझाद मैदानावर उपोषणाला आलोच म्हणून समजा
-
Maratha Reservation | सगेसोयरे आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश महत्वाचा होता – मनोज जरांगे पाटील
सगेसोयरे आरक्षणात यावेत यासाठी अध्यादेश महत्वाचा होता. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढल्याबद्दल त्यांचे आभार.
-
Maratha Reservation | मुख्यमंत्र्यांनी विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नये – मनोज जरांगे पाटील
मराठ्यांनी जो गुलाल उधळला आहे त्याचा मुख्यमंत्र्यांनी अपमान होऊ देऊ नये. नवा जीआर आता कायम राहू दे.
-
Maratha Reservation | शरीर साथ देत नसताना मराठा समाजासाठी लढलोय – मनोज जरांगे पाटील
माझं शरीर साथ दत नव्हतं, तरी समाजासाठी लढलोय. सतत लढा दिला आहे.
-
Maratha Reservation | 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या – मनोज जरांगे पाटील
साडेचार महिन्यांपासून संघर्षण सुरू आहे. आरक्षणासाठी 300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीर सुरू, 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या.
-
मुख्यमंत्री शिंदेंकडून जरांगेंना नवा जीआर सुपूर्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जरांगेंना नवा जीआर सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी जरांगेना भगवी शाल देऊन, त्यांना गुलाल लावला.
-
Maratha Reservation | मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं उपोषण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्यायला ज्यूस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
-
मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण
क्रेनमधून मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभास्थळी आगमन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सभास्थळी आगमन झाले आहे. मराठा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
-
सभेपूर्वी मनोज जरांगे शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करणार
मनोज जरांगे यांची विजयी सभा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सभेपूर्वी मनोज जरांगे शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करणार आहेत.
-
थोड्याच वेळात मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होणार
मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत पोहचले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री गिरिष महाजनसुद्धा पोहचले आहे.
-
गिरीश महाजन मनोज जरांगे यांच्या भेटीला
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा नवा अध्यादेश मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन मनोज जरांगे यांच्या भेटीला वाशी येथे पोहोचले आहेत.
-
मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार
आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार आहे. अंतरवाली सराटीसह राज्यभरातील आंदोलकांचा यामध्ये समावेश असणार आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत पोहचले
मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशीत पोहचले आहे.
-
मराठ्यांच्या लठ्याला यश, वाशीत जल्लोष
मुख्यमंत्री शिंदे वाशीकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश सरकारणं काढलं आहे. मराठा समाजाच्या लढ्याला यश मिळाले आहे. सध्या वाशीत जल्लोष सुरू आहे.
-
माझ आंदोलन यापुढे सुरु राहणार – मनोज जरांगे पाटील
“माझ आंदोलन यापुढे सुरु राहणार. कोणाला जातप्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असतील, तर मी लढत राहणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
आजच्या विजयाच श्रेय सर्व मराठा समाजाच – मनोज जरांगे पाटील
“मी संघर्ष केला. माझ्या समाजाने खूप संघर्ष केला. आरक्षणासाठी शेवटी आम्हाला मुंबईकडे याव लागलं. मराठ्यांच्या ताकदीमुळे हा अध्यादेश निघाला” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
Pune news | पुणे एफटीआयआय बॅनर प्रकरणी पोलिसांची कारवाई
पुणे एफटीआयआय बॅनर प्रकरणी पोलिसांची कारवाई. डेक्कन पोलिसात 15 जणांविरोधात गुन्हा दाखल. श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एफटीआयआयमध्ये ‘रिमेंबर बाबरी डेथ ऑफ कॉन्स्टिट्यूशन’ अशा आशयाचे बॅनर झळकविण्यात आले होते. या वादग्रस्त बॅनरमुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत बॅनर जाळले होते. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले होते.
-
Maratha Reservation | पुण्यात कुठे होणार सेलिब्रेशन ?
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासाठी पुणे शहरातील मराठा समाज बांधवांतर्फे आज सकाळी 10 वाजत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती करून जल्लोष करण्यात येणार आहे.
-
Marathi News | सभेच्या ठिकाणी फुलांची पुष्पवृष्टी होणार
मराठा आंदोलनाला यश आले. त्यासाठी आता विजयी सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी जेसीबीतुन फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आरक्षण मिळल्यामुळे मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
-
Marathi News | शिधापत्रिकेवर मिळणार साडी
अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबातील महिलांना शासनाच्या माध्यमातून आता दरवर्षी प्रत्येकी एक साडी भेट म्हणून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील 49 हजार 942 अंत्योदय शिधापत्रिकांवर ही साडी स्वस्त धान्य दुकानांत दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने 10 नोव्हेंबर 2023 रोजी अंत्योदय शिधापत्रिकांवर प्रती शिधापत्रिका एक साडी मोफत देण्याचा निर्णय घेतला होता.
-
Marathi News | वाशीत मराठा आंदोलकांची विजयी सभा
मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यानंतर शनिवारी, दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी – नवी मुंबई या ठिकाणी विजयी सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित ही सभा होणार आहे.
-
Marathi News | पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
पुणे पोलिस आयुक्ताल्याच्या हद्दीतील १७ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी हे आदेश काढले आहे. यापूर्वी १५ जानेवारी रोजी वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
Published On - Jan 27,2024 7:15 AM