Maharashtra Breaking News in Marathi : विजय शिवतारे याना भेटायला मंत्रिमंडळातील एक मंत्री पुण्यात
Maharashtra Breaking News in Marathi : आज 15 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई | 15 मार्च 2024 : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर आजपासून दोन रुपयांनी स्वस्त केले आहे. आजपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत आज मध्यरात्री लोकलसेवेचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शुक्रवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा दरम्यान ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. मुंबईतील १५ टक्के पाणी कपात मागे घेतल्यानंतर आता लगेचच पुन्हा एकदा पाच टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. आता २४ एप्रिलपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभा आज होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्याकडे रवाना
दौंड | विजय शिवतारे दौंड दौरा अर्धवट सोडून पुण्याकडे रवाना झाले आहेत. विजय शिवतारे यांना भेटायला मंत्रिमंडळातील एक मंत्री पुण्यात आले आहेत. विजय शिवतारे यांची नाराजी दूर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न केला. मुंबईत काल बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भेट घेतल्यानंतर आज विजय शिवतारे दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. पण दौंड तालुक्याचा दौरा अर्धवट सोडून विजय शिवतारे पुण्याकडे परतले.
-
अमरावती लोकंसभा मतदारसंघावर आहे आनंदराव अडसूळ यांचा दावा
अमरावती | नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आनंदराव अडसूळ यांना निवडुन आणणारच असे पोस्टर व्हायरल झाले आहेत. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचे पोस्टर शिवसैनिकाडून व्हायरल करण्यात आले आहेत. व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टरवर पंतप्रधान मोदी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या सह धनुष्यबाणाचा फोटो आहे.
-
-
तेलंगणात BRS-BSP युती
लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगणामध्ये BRS-BSP यांची युती आहे.
-
अब्दुल खलिक यांनी राजीनामा दिला
आसाममधील बारपेटा येथील काँग्रेसचे खासदार अब्दुल खालेक यांनी राजीनामा दिला आहे. तिकीट न मिळाल्याने ते संतापले.
-
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस बजावली
शेतकऱ्यांना प्रत्येक पिकावर एमएसपी देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, पंजाब आणि हरियाणा सरकारला नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागवले आहे. वकील चरणपाल सिंह यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला 4 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
-
-
मध्य प्रदेशात राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी होळीपूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात काही टक्के वाढ जाहीर केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, मध्य प्रदेश सरकारने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर सध्याच्या 42 वरून 46 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशमध्ये 1 जुलै 2023 पासून सातव्या वेतनश्रेणीअंतर्गत हे लागू होईल.
-
भाजपच्या यादीची वाट पाहत आहोत, सन्मान मिळाला नाही तर स्वतंत्र : पशुपती कुमार पारस
केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपती कुमार पारस यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, प्रसारमाध्यमांमधून येत असलेल्या बातम्यांनुसार आमच्या पक्षाला प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. जोपर्यंत भाजपची औपचारिक यादी येत नाही, तोपर्यंत आमच्या पक्षाच्या 5 खासदारांचा फेरविचार करावा, अशी आमची विनंती आहे. आम्ही यादीची वाट पाहू. घोषणेनंतर आम्हाला योग्य सन्मान दिला गेला नाही तर आमचा पक्ष कुठेही जायला मोकळा आहे.
-
घरी बसून काही कळत नाही फिल्डवर जावे लागते – एकनाथ शिंदे
घरी बसून काही समजत नाही, त्यासाठी फिल्डवर जावे लागते असा टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. नायर दंत महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीला शिंदे यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
-
यवतमाळ : पीकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी केली मारहाण
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
-
मागाठाणे येथील 340 प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा
मागाठाणेच्या 120 फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येणाऱ्या 340 घरांचे पुनर्वसन तेथेच करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
-
कामाला लागा, लोकसभा आपलीच – उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
मुंबईतील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरील बैठक संपली. सर्वांनी कामाला लागा, लोकसभा आपलीच आहे. संघटना वाढवा, असे उध्दव ठाकरे यांनी बैठकी दरम्यान पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
-
घरात बसून फेसबुकवर लाईव्ह करून चालत नाही – एकनाथ शिंदे
जी कामे आधी झाले नाहीत ती 10 वर्षात मोदी गॅरंटीमध्ये झाली म्हणून सर्व मोदी गॅरंटी बोलतात. संवेदनशील सरकार असलं पाहिजे घरात बसून फेसबुकवर लाईव्ह करून चालत नाही. फेस टू फेस जावे लागते. आरोपाला एकनाथ शिंदे आरोपांनी उत्तर देत नाही. माझं कुटुंब माझी जवाबदारी नाही सर्व माझं कुटुंब आहे.
-
कॉमन मॅन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
माझ्या कार्यकाळात मी असा मुख्यमंत्री पहिला नाही जो जनता व सर्वाना सांभाळून घेतो, मंगल प्रभात लौढा यांनी केली मुख्यमंत्री याची स्तुती
-
अमिताभ बच्चन यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी
नुकताच अमिताभ बच्चन यांच्यावरील शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली आहे.
-
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर कोणतीही बंदी नाही
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर कोणतीही बंदी नाही. सर्वोच्च न्यायालयाचा सध्या हस्तक्षेप करण्यास नकार, न्यायालय 21 मार्चला सुनावणी करणार. सर्वोच्च न्यायालयाने टिपणी केली की सामान्यतः आम्ही विधिमंडळाच्या कायद्याला स्थगिती देत नाही.
-
राजकीय पक्षांना एकच महिना मिळणार वेळ
18 एप्रिलला पहिला टप्पा असण्याची शक्यता आणि मे च्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता.
-
उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार
देशात 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची शक्यता आहे. उद्या दुपारी 3 वाजता निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार आहे. त्याचबरोबर आचारसंहिताही उद्या दुपारी 3 वाजल्यापासून लागू होणार आहे. महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
-
बारामती मतदारसंघातील सर्व परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली- विजय शिवतारे
बारामती मतदारसंघातील सर्व परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे. महायुतीचे टार्गेट बारामती तालुक्यात कसं मिळवता येईल याबाबत चर्चा झाली. सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी दोन दिवस याबाबत चर्चा होईल आणि वरिष्ठ निर्णय घेतील. लोकशाहीत ताई आणि वहिनी हाच वाद चुकीचा आहे. कोणाच्यातरी सौभाग्यवती म्हणून त्यांना मत देणं हे चुकीचं आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.
-
यवतमाळ- मृदू आणि जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द
यवतमाळ- मृदू आणि जलसंधारण विभागाच्या 670 पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. स्थापत्य अभियंता पदाकरिता भरती घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी होत्या. त्यात काही जणांना अटकसुद्धा झाली होती. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आदेश मंत्री संजय राठोड यांनी दिला. ही भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत करण्यात आली होती. या परीक्षेला 52 हजार 690 विद्यार्थी बसले होते.
-
गिरीश महाजन यांचा सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा
सोलापूर- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराचं दर्शन घेतलं. गिरीश महाजन यांनी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराची आरतीदेखील केली. यावेळी माजी पालकमंत्री आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत त्यांनी दर्शन घेतलं. दर्शनानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने गिरीश महाजन सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. सोलापूर लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याने गिरीश महाजनांच्या या मेळाव्याकडे इच्छुकांचं लक्ष लागून आहे.
-
निवडणूक आयोगाची बैठक संपली
नवी दिल्ली- निवडणूक आयोगाची बैठक संपली असून 40 मिनिटे ही बैठक चालली होती. या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त सहभागी झाले होते. बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यात आली आणि तारखेबाबत चर्चा झाली.
-
Live Update | निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा
निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा… ईव्हीएम बाबत दाखल असलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या… लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी दाखल असलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या…
-
Live Update | देशात CAA लागू केल्यानंतर सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल
CAA वर होणार सुनावणी… देशात CAA लागू केल्यानंतर सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल… सर्व याचिकांवर एकत्रित होणार सुनावणी… येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
-
Live Update | निवडणूक आयोगाची बैठक सुरु
मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन नवनियुक्त निवडणूक आयुक्त यांची बैठक… सुरक्षा आणि मतदारांची सुविधा यावर चर्चा… मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखविंदर संधू यांची बैठक सुरु…
-
Live Update | कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल… 17 वर्षाच्या लहान मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप… कर्नाटक पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत केला गुन्हा दाखल
-
उद्या राहुल गांधी ठाण्यात
उद्या राहुल गंधी यात्रा ठाण्यात दुपारी पोहचणार आहेत. यात्रा यशस्वी व्हावी म्हणून वर्षाताई , काँगेस नेते काम करत आहे, असे काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
-
जळगावमध्ये मोठी घडामोड
जळगाव जिल्ह्यातील अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. अजित पवार गटाचे रवींद्र नाना पाटील सिल्व्हर ओक वर जावून शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
-
फ्लोमिंगो पाहुणे दाखल
नवी मुंबईतील सीवूड खाडीकिनारी फ्लेमिंग पाहुणे दाखल झाले. परदेशातून फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईत दाखल झाले.नवी मुंबईतील खाडीकिनारी अनेक भागात फ्लेमिंगो पक्षांचे थवे पाहायला मिळत आहे
-
माढ्यात नाराजीचे सत्र
माढ्यातून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते-पाटील गट अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसे झाल्यास रणजीत नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होणार आणि भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.
-
वंचिताला चार जागांचा प्रस्ताव
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. वंचितने ज्या 27 जागांची यादी दिली होती. त्यात चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
-
60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे
अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण करणाऱ्या काही प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांसह जिल्ह्याधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
-
सोने आणि चांदीत दरवाढ
या आठवड्यात सोमवार ते बुधवार किंमती वाढल्या नाहीत. उलट त्यात घसरण झाली. चांदीने पण ग्राहकांना दिलासा दिला. पण आठवड्याच्या अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंनी पुन्हा उचल खाल्ली. किंमतीत पुन्हा वाढ झाली.
-
चंद्रपूरमध्ये घरगुती साहित्य विक्रीच्या मॉलला लागली भीषण आग
चंद्रपूरमध्ये घरगुती साहित्य विक्रीच्या मॉलला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटननास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याते प्रयत्न सुरू आहेत.
पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
-
जळगाव जवळ वाळूचा ट्रक व क्रूझरची भीषण धडक, ३ ठार तर चौघे जखमी
जळगाव – जळगावच्या बांभोरी गावाजवळ वाळूचा ट्रक व क्रूझरची भीषण धडक होऊन झालेल्या अपघाता तीन जण ठार तर चौघे जखमी झाले.
ओंकारेश्वर येथे महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांपैकी ३ जणांचा अपघातात मृत्यू . तर चार जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले, चारही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती.
-
माझ्या बारामती मतदारसंघात दमदाटी करायची नाही – सुप्रिया सुळेंचा इशारा
माझ्या बारामती मतदारसंघात दमदाटी करायची नाही. हर्षवर्धन पाटलांना शिवीगाळ केली तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. इंदापूरच्या सभेत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला इशारा दिला.
-
लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग
लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग आला आहे. ‘महाविजय 2024’ समितीच्या सदस्यांची आज मुंबईत होणार महत्वाची बैठक. भाजप प्रदेश मुख्यालयात आज सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत या बैठकीत मंथन होणार आहे.
-
पुणे – गंगाधाम येथे आई माता मंदिराजवळ गॅरेजमधील १७ वाहनांना अचानक आग, अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग
पुण्यातील गंगाधाम येथे आई माता मंदिराजवळ मोकळ्या जागेत असलेल्या एका गॅरेमधील १७ चारचाकी वाहनांना आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि जवानांनी आगीवर नियंञण मिळवले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
-
Maharashtra News | पंढरपूर विठ्ठल मंदिरासंदर्भात महत्त्वाची बातमी
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढली जाणार. पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार गर्भगृहातील काढली जाणार ग्रॅनाईट फरशी. गाभाऱ्यातील ग्रॅनाईट फरशी काढण्यासाठि श्री विठ्ठ्ल आणि रुक्मिणिमातेचे अंदाजे 45 दिवस पदस्पर्श दर्शन बंद ठेवले जाणार. सकाळी 6 ते 11 या वेळेत फक्त भाविकाना घेता येणार मुखदर्शन.
-
Maharashtra News | नवी मुबंईत मनसेला धक्का
मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना नारायण म्हात्रे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौघुले यांच्या नेतृत्वात प्रवेश. नवी मुबंईत मनसेला धक्का.
-
Maharashtra News | पुण्यात शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागले बॅनर
पुण्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लागले भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर. कार्यकर्त्यांकडून पुण्यातील कात्रज चौकात तानाजी सावंत यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर. ऐन लोकसभेच्या तोंडावर बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
-
Maharashtra News | अमरावतीत नवनीत राणा किती लाखाच्या लीडने विजयी होतील?
“मी जेव्हा संकटात होतो, तेव्हा माझ्या सोबत तुम्ही उभे राहिलात. मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगून आलो आहे, अमरावती जिल्ह्यामधून एक खासदार देणार तोही 3 लाख मतांने विजयी होईल. अमरावतीत नवनीत राणा 3 लाखाच्या लीडने विजयी होतील”, आमदार रवी राणा यांचा दावा.
-
Marathi News | 12500 शिक्षकांना प्रशिक्षण
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत पुण्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येतंय. पुणे जिल्ह्यातील एकूण 13 तालुक्यांमध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांवर शिकवणाऱ्या 12500 शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येतयं. शिक्षकांच्या या क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 425 तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम तयार करण्यात आलीयं, त्यांना तीन टप्प्यात हे प्रशिक्षण देण्यात येतंय.
-
Marathi News | रेल्वेत आता बॅटमॅन तिकीट तपासणी पथक
लोकल प्रवास करताना रात्रीच्या वेळी तिकीट तपासनीस पथक नसल्याने, बहुसंख्य प्रवासी विनातिकीट प्रवास करीत होते. या प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होत होता. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने रात्रीचे तिकीट तपासनीस पथक सज्ज केले. या पथकाला ‘बी अवेअर टीटीई मॅनिंग ॲट नाईट’ (बॅटमॅन) असे नाव देण्यात आले आहे.
-
Marathi News | मुंबईत १० करबुडव्यांची थकबाकी १४७.२४ कोटी रुपयांवर
मुंबई महापालिका प्रशासनाच्या कर निर्धारण व संकलन विभागाने मालमत्ता कर वसुलीसाठी कठोर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेने आतापर्यंत मलामत्ता करापोटी सुमारे १२०० कोटी रुपये वसूल केले आहेत. अद्याप साडेतीन हजार कोटी रुपयांची वसुली शिल्लक असून मालमत्ता कर थकवणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात महानगरपालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे.
-
Marathi News | पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक
मुंबईत रेल्वे रूळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी शुक्रवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर ३ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. शुक्रवारी रात्री ११.५० वाजता ते रात्री २.५० वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि डाउन जलद मार्गावर रात्री १.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत असेल. गाडी क्रमांक १९१०१ विरार-भरूच मेमू १५ मिनिटे उशिराने निघेल आणि त्यामुळे विरारहून पहाटे ४.३५ वाजता नियोजित सुटण्याऐवजी पहाटे ४.५० वाजता सुटेल.
Published On - Mar 15,2024 7:16 AM