Maharashtra Marathi Breaking News Live : जनतेनं ठरवावं कुणाला गाडावं आणि कुणाला पुरावं : उद्धव ठाकरे
Maharashtra Breaking News in Marathi: आज 16 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.16 जानेवारी 2024 | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज चार दिवसांच्या दौऱ्यासाठी स्वित्झरलँडच्या दावोस येथे जाणार आहेत. या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्रातून स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झालेल्या अनेक एनआरआयकडून मुख्यमंत्री यांच्या स्वागताचे संदेश जारी करण्यात आले आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास आजपासून प्रारंभ होत आहे. २२ जानेवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत भगवान श्रीरामाच्या अभिषेक प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचा बॅनर झळकाला सुरवात झाली. मिलिंद देवरे काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. त्यावरुन सामनात मिलिंद देवरे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. कराड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
विराट-अनुष्काला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांना अयोध्येतील राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
-
काँग्रेसने राजस्थानमधील विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा
काँग्रेसने राजस्थानमधील विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने अलवर ग्रामीणचे आमदार आणि माजी मंत्री टिकाराम जुली यांना विरोधी पक्षनेते केले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने यावेळी एका दलित चेहऱ्यावर विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी दिली आहे.
-
-
योगी आदित्यनाथ यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण
योगी आदित्यनाथ यांना 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून निमंत्रण पत्रिका देण्यात आली होती. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत.
-
जागावाटपाबाबत उद्या सपा आणि काँग्रेसची बैठक होणार
बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपासह अन्य मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
-
नार्वेकर आणि शिंदेंनी सुरक्षेशिवाय जनतेत यावं, उद्धव ठाकरेंचं आव्हान
मुंबई | उबाठा गटाकडून मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणावरुन दिलेल्या निर्णयाची चिरफाड करण्यात आली. यावेळेस ठाकरे गटातील विविध नेत्यांनी भाषण केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली बाजू मांडली. या दरम्यान ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर यांना आव्हान दिलं. शिंदे आणि नार्वेकर यांनी पोलीस सुरक्षेशिवाय जनतेत यावं. मी पण येतो. त्यांनंतर जनतेने ठरवावं की शिवसेना कुणाची. त्यानंतर जनतेनेचं ठरवावं की कुणाला गाडावं आणि कुणाला पुरावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
-
2018 ला निवडणूक अधिकारी बाळकृष्ण जोशी यांनी प्रक्रिया सुरू केली, अनिल परब
मुंबई : आम्ही घटना दुरुस्ती केली नाही. घटना नव्हती वगैरे असं सांगितलं जात होतं. ते कसं चुकीचं आहे, हे दिसून आलं आहे. २०१८ ला राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक झाली. त्यावेळी घटना दुरुस्ती केली. त्याचे जे ठरवा होते, संघटनात्मक रचना, नियुक्ती वगैरे. ते सर्व दिले. 2018 ला राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली. निवडणूक अधिकारी बाळकृष्ण जोशी यांनी प्रक्रिया सुरू केली.
-
जनता न्यायालयात रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांनी मांडलेला ठराव काय?
मुंबई : 2013 च्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याचा ठराव रामदास कदम यांनी मांडला आणि त्याला अनुमोदन खासदार गजानन किर्तीकर यांनी दिले होते याचा व्हीडीओ जनता नायालयात दाखविण्यात आला.
-
अनिल परब यांनी सांगितले 2013 येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीतील ठराव
मुंबई : 2013 आणि 2018 ची घटना आहे ती माहिती देतो. बाळासाहेब ठाकरे 23 जानेवारी 2013 येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. शिवसेना प्रमुख हे नाव कुणालाही शोभत येत नाही. त्यामुळे हे पद गोठविण्यात यावे हा महत्वाचा ठराव घेण्यात आला. दुसरा ठराव होत पक्षप्रमुख हे पद तयार करण्यात यावे. राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचे अधिकार पक्षप्रमुख यांच्याकडे असतील.
-
निवडणूक आयोगाचाच निर्णय घेतला, नेते अनिल परब
मुंबई : कपिल सिब्बल शिवसेनेची बाजू मांडत होते. त्यावेळी जे मुद्दे मांडत होते त्यामुळे ते गद्दार अपात्र होतील असे मत झाले होते. सुप्रीम कोर्टांच्या निर्णयानुसार अध्यक्ष यांना एक फ्रेम करून दिली होती. निवडणूक आयोगाचा जो निर्णय आला त्याचेच वाचन केले. शिवसेनेच्या लोकांना अपात्र न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी असे सांगितले की निवडणूक आयोगाची कागदपत्रे तपासली.
-
राहुल नार्वेकर चलो जाव : संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुंबई : राहुल नार्वेकर या व्यक्तीने रामशात्री यांच्या परंपरेला काळिमा फासला. अध्यक्ष यांनी ते काम केले आहे. ती खुर्ची नसेल तर त्यांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आग आहे. त्याच्याशी तुम्ही खेळले आहात हे लक्षात ठेवा.
-
दोन्ही गटांना पात्र केले, हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान – वकील असीम सरोदे
मुंबई : जे कायद्यात लिहिले आहे 1999 ची घटना गृहीत धरली. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेतील बहुमत पहिले, जी पाच वर्षाची अस्थायी आहे. बहुमत याचे कायदेशीर नाव काय आहे. पक्ष फोडलेले. पळून गेलेले, अध्यक्ष म्हणाले यांनी दोन्ही गटांना पात्र केले. हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. पाच ज्येष्ठ न्यायाधीश यांनी बसून निकाल दिला आणि हे म्हणतात पक्षाचा प्रश्न आहे.
-
राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सर्व देशद्रोही, वकील असीम सरोदे
मुंबई : अध्यक्ष यांनी हा निकाल देताना पूर्ण राजकारण केले. राहुल नार्वेकर यांच्या मदतीने राजकारण करणारे सर्व देशद्रोही आहेत. चौकशी याचा अर्थ त्यांनी पुरावे घेतले. आम्ही जे निर्णय घेतले त्याआधारे अध्यक्ष यांनी निर्णय घ्यावे असे म्हटले होते. पण, अध्यक्ष यांनी पुरावे गोळा करण्यात वेळ घालविला.
-
विधानसभा अध्यक्षांनी अधिकाराचा विश्वासघात केला, वकील असीम सरोदे
मुंबई : संविधानाच्या सहाव्या परिच्छेदानुसार अपात्रतेचा मुद्दा तयार होतो. त्यावेळी त्याची सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांसमोरच झाली पाहिजे. त्यामुळेच शक्तीचं विकेंद्रीकरण केलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना अधिकार असल्याचे सांगितलं. परंतु, विधानसभा अध्यक्षांनी अपात्रत अधिकाराचा विश्वासघात केला अशी टीका वकील असीम सरोदे यांनी केली.
-
एकनाथ शिंदे अपात्रच आहेत, वकील असीम सरोदे यांचा मोठा दावा
मुंबई : दोन तृतियांश लोक बाहेर गेले तर त्यांनी गट स्थापन केला किंवा विलिनीकरण केलं तर संरक्षण मिळतं. शिंदे यांच्यासोबत गेलेले लोक दोन तृतियांश संख्येने गेले नाहीत. आधी १६ लोक गेले. नंतर काही लोकांना अमिष दाखवलं. काहींना बोलावून घेतलं. अशा प्रकारे ३८ ते ४० झाले. दोन तृतियांश बहुसंख्येने ते बाहेर पडले नाही त्यामुळे ते अपात्र आहेत असे वकील असीम सरोदे म्हणाले.
-
प्रत्येकाने राजकारणावर बोललं पाहिजे
प्रत्येकाने राजकारणावर बोललं पाहिजे, असे अॅड. असीम सरोदे यांनी आवाहन केले. शिंदे,फडणवीस यांचे त्यांनी हे प्रबोधन घडवण्यासाठी आभार मानले. पक्षांतराची बेकायदेशीर बाराखडी म्हणजे नार्वेकर यांचा निकाल असल्याचे ते म्हणाले.
-
15 हजार लिटर क्षमतेची कढई करणार दान
नागपुरातील प्रसिद्ध सेफ विष्णू मनोहर यांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी विशालअशी 15 हजार लिटर क्षमतेची कढई तयार केली आहे. या कढईत अयोध्येत प्रसाद म्हणून 7 हजार किलो हलवा तयार केला जाणार आहे. सेफ विष्णू मनोहर स्वतः अयोध्येत 7 हजार किलो हलवा तयार करणार आहेत. 2000 किलो वजनाची ही कढई असून या कढई मध्ये 15 हजार किलो अन्न शिजविले जाऊ शकते. ही कढई अयोध्येच्या मंदिराला दान स्वरूपात दिली जाणार आहे.
-
बच्चू कडू अंतरवाली सराटीत दाखल
आमदार बच्चू कडू अंतरवाली सराटी मध्ये दाखल झाले आहे. त्यांच्यासह मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उप जिल्हाधिकारी रिता मेहत्रेवर यांचे शिष्टमंडळ आहे. जरांगे पाटील यांना वाचण्यासाठी ड्राफ्ट देण्यात आला आहे.
-
मुख्य आरोपींना न्यायालयात केले हजर
शरद मोहोळ हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार या दोन्ही आरोपींना पुणे पोलिसांनी कोर्टात हजर केलं. मोहोळ हत्येच्या एक महिना आधी दोन्ही आरोपींनी महत्वाची बैठक बोलावली होती. पुणे पोलिसांनी कोर्टात ही माहिती दिली.
-
अयोध्येत आजपासून राम मंदिराच्या सोहळ्याला सुरुवात
अयोध्येत आजपासून राम मंदिराच्या सोहळ्याला सुरुवात झाली. आज यजमानांनी शरयू नदीच्या तीरावर प्रायश्चित केले. राम मंदिराच्या सोहळ्याची अधिकृत सुरुवात झाली आहे. कर्मकुट पूजा आणि प्रायश्चित पूजा शरयू तीरावर करण्यात आली आहे.
-
एकनाथ खडसे यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात एक रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे व भाजपचे मंत्री गिरीश महाजन या दोघांमधील राजकीय वैमानस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. एकमेकांवर अगदी टोकाला जाऊन टीका आरोप प्रत्यारोप दोघे मातब्बर नेते नेहमी करत असतात. गेल्या काळात मंत्री गिरीश महाजन यांनी खोटे विधान करून त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे समाजात बदनामी झाली असा आरोप करत एकनाथ खडसे यांनी आज जळगाव जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला असून एक रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल केला आहे.
-
मनसेच्या बॅनरवर झळकला प्रभू रामचंद्रांचा फोटो
देशात सगळीकडे राममय वातावरण झालं आहे. त्यात 22 तारखेला अयोध्येत प्रभू रामचंद्र विराजमान होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत बोरोवली मध्ये मनसेकडून कार सेवक यांची स्वप्नपूर्ती असे मोठे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
-
कल्याण स्टेशनवर महिलेची छेडछाड
कल्याण स्टेशनवर महिला उभी असताना आवडली म्हणून रोमियोने पाठलाग करत स्टेशनवर करत केली विनयभंग करण्यास सुरवात. मात्र पोलिसांनी रोमिओला धडा शिकवत महिलेची तक्रार घेत आरोपीला ठोकल्या बेड्या
-
सदाभाऊ खोत यांनी केले अत्यंत मोठे विधान
महायुतीमधून हातकणंगले लोकसभेची जागा मी मागितली आहे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. कुणाच्याविरोधात लढाईसाठी हातकणंगलेची जागा मागितली नाही तर शेतकऱ्यांसाठी मागितली आहे. आम्हाला देखील एक दोन जागा मिळाल्या पाहिजे आम्हाला समान न्याय द्यावा ही आमची मागणी, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले.
-
एका जिल्हात 30-30 लाख कागदपत्रांची छाननी- बच्चू कडू
एका जिल्हात 30-30 लाख कागदपत्रांची छाननी केली, असल्याचे मोठे विधान बच्चू कडू यांनी केले आहे.
-
अयोध्या नगरीत उत्साहाच वातावरण
अयोध्या उत्सव साजरा करत आहे. सगळीकडे राममय वातावरण झालं आहे. राम होते ते टेंट मधून बाहेर मंदिरात येतायत.
-
Maharashtra News : नाशिक जिल्ह्यात तापमानात मोठी घट
नाशिक जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे. पारा सात अंशापर्यंत खाली उतरला असल्याने थंडीचा सामना करावा लागत आहे.
-
Mumbai News : मुंबईत पारा घसरला, धुक्यातही वाढ
मुंबईसह उपनगरात पारा तब्बल चार अंशानं घसरला आहे. यामुळे नागरीकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळे धुक्यातही वाढ झाली आहे.
-
Maharashtra News : पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहाणार
पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद राहाणार आहे. या काळात देखभाल दुरूस्तीची कामं केली जाणार आहे.
-
Maratha Reservation : जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात
जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. फौजदारी रिट याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. आंदोलनाला परवाणगी नाकारण्याची मागणी सदावर्ते यांनी कोर्टाकडे केली आहे.
-
Maharashtra News : वरळीत उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद
आज उद्धव ठाकरे यांची वरळीत 4 वाजता पत्रकार परिषद आहे. नार्वेकरांच्या निकालावर आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषदेला ठाकरे गटाकडून महापत्रकार परिषद असं नाव.
-
मुंबई विमानतळ आणि इंडिगोला कारणे दाखवा नोटीस
मुंबई विमानतळावरील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून मुंबई विमानतळ आणि इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
-
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची विभागवार बैठक सुरू
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीबाबत भाजपची विभागवार बैठक सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते या बैठकीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे. देशभरातील 150 क्लस्टर प्रभारी बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत. एका नेत्याकडे तीन ते चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 48 जागांबाबत क्लस्टर प्रभारी बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षांना माहिती देणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत बैठक चालणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांचे क्लस्टर प्रभारी बैठकीत सहभागी झाले आहेत.
-
बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक
बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर शिष्टमंडळ अंतरवली सराटीत जाणार आहे.
-
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेविषयी दिल्ली बार असोसिएशनचं पत्र
श्रीराम मंदिर उद्घाटन थेट कोर्टापर्यंत पोहोचलंय. पटियाला हाऊस कोर्टाच्या न्यायाधीशांना दिल्ली बार असोसिएशनने पत्र लिहिलं आहे. येत्या 22 जानेवारीला वकील किंवा याचिकाकर्ते कोर्टात हजर राहिले नाही तर त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करू नका. त्यावर न्यायाधीश महोदय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
-
मुंबईच्या ओशिवरा परिसरामध्ये भाजपाच्या वतीने 50 फुटी राम मंदिराची प्रतिकृती
मुंबईच्या ओशिवरा परिसरामध्ये भाजपाच्या वतीने 50 फुटी राम मंदिराची प्रतिकृती बनवण्यात येत आहे. भाजप नेते संजय पांडे यांच्या प्रयत्नातून ही राम मंदिराची प्रतिकृती निर्माण केली जात असून भाजपा नेते आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते या मंदिराच्या प्रतिकृतीच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले.
-
Live Update : मथुरेच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
मथुरेच्या सर्वेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती… अलाहाबाद उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने थांबवले… गेल्या महिन्यात कोर्ट कमिश्नर कडून सर्वेक्षणाचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते… सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली
-
Live Update : मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही – सूत्र
मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत मोठी बातमी…. मनोज जरंगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही… राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न… मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची एका मंत्र्यांची टीव्ही 9 मराठी ला माहिती… मनोज जारंगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना मुंबई देण्याची वेळ येणार नाही.. राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार नाव न सांगण्याच्या अटीवर एका मंत्राची माहिती
-
Live Update : अयोध्येत येणाऱ्या निमंत्रित साधू-संतांसाठी राहण्याची विशेष व्यवस्था
अयोध्येत येणाऱ्या निमंत्रित साधू-संतांसाठी राहण्याची विशेष व्यवस्था… ४ हजार साधूंना सोहळ्याचं निमंत्रण… साधूंसाठी भगवी चादर, भगवी उशी, भगवी ब्लॅंकेटची व्यवस्था… अयोध्येत उभं करण्यात आलंय राहण्यासाठी तीर्थक्षेत्रपूरम… तीर्थक्षेत्रपुरममध्ये राहण्यासह भोजनाची देखील करण्यात आलीये उत्तम व्यवस्था…
-
Live Update : समाज मोठा… चर्चा महत्त्वाची नाही – जरांगे पाटील
समाज मोठा… चर्चा महत्त्वाची नाही… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. चर्चा होते पण, त्यातून काहीच निष्फळ होत नाही. सरकार माझ्याविरोधात डाव टाकण्याच्या तयारीत… असं देखील जरांगे पाटील म्हणाले…
-
भाजप राज्यात लोकसभेच्या 32 जागा लढवणार ?
भाजप राज्यात लोकसभेच्या 32 जागा लढवणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीतील भाजपच्या बैठकीत 32 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. शिंदे गट 10, अजित पवार गट 6 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
विजय मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू
संजय भंडारी, विजय मल्ल्या, नीरव मोदीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू. CBI, NIA , ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक यूकेला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. तिघांच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय यंत्रणेच्या हालचाली वाढल्या.
-
शरद पवार आज सीमाभागातील दौऱ्यावर
शरद पवार आज सीमाभागातील दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. बेळगावसह सीमाभागातील कानडी बोर्ड सक्तीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो सेवेवर परिणाम
तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रोची सेवा कोलमडली, दहिसर ते कांदिवलीदरम्यान मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. बिघाड दुरूस्त झाल्यावर बऱ्याच वेळाने मेट्रो सेवा पूर्ववत सुरू झाली.
-
पैसे, दहशतीच्या जोरावर पक्ष चोरला – संजय राऊत
नार्वेकर, शिंदे खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवा. हिंमत असेल तर पक्ष काढा आणि चालवा असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. पैसे, दहशतीच्या जोरावर पक्ष चोरला अशी टीकाही त्यांनी केली.
-
नाशिक जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट
नाशिक जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट, निफाड मध्ये पारा ७.४ वर, तर नाशिक शहरात ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद , तापमान घासरल्याने थंडीत वाढ, हवेत प्रचंड गारवा आहे. अजून दोन ते तीन दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
-
राजधानी दिल्लीत पारा पुन्हा घसरला
राजधानी दिल्लीत तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. दिल्लीतले आजचे कमीत कमी तापमान 4 डिग्री सेल्सिअस आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात धुकं आहे. धुक्याचा परिणाम विमानसेवा आणि रेल्वे सेवेवर झाला आहे. आज पहाटेपासूनची 15 पेक्षा जास्त विमानांचं उड्डाण उशिरा होणार आहे. राजधानी दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या तीन ते चार तास उशिरा आहेत. राजधानी दिल्लीतली दृश्यमानता पोहोचली 50 फुटांवर पोहोचली आहे.
-
महा पत्रकार परिषदे आधी ठाकरे गटाची बॅनरबाजी
महा पत्रकार परिषदे आधी ठाकरे गटाची बॅनरबाजी करण्यात आली आहे. जनता न्यायालयात सत्य ऐका आणि विचार करा अशा आशियाचे बॅनर लागले आहेत. मुंबईच्या मुंबादेवी परिसरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
-
शरद पवार आज निपाणीमध्ये
राष्ट्रवादी चे नेते शरद पवार आज सीमा भागात आहेत. निपाणीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांचा सन्मान सोहळा होणार आहे. कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उपस्थित राहणार आहेत. सीमाभागातील चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात ही पवारांच्या राष्ट्रवादीकडून चाचपणी केली जात आहे. उत्तम पाटील यांना चिक्कोडी लोकसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची तयारी सुरु आहे. आज निपाणी भागात शरद पवार आणि उत्तम पाटील शक्ती प्रदर्शन करणार आहेत. निपाणीनंतर शरद पवार सांगलीत असणार आहेत. सांगली स्टेशन चौकात उभारण्यात आलेल्या राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत.
-
भाजप कार्यकर्त्यांकडून निलेश राणेंच्या विविध पोस्ट
रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरुच आहे. सोशल मिडियावर माजी खासदार निलेश राणेच्या लोकसभा उमेदवारीसाठी भाजप कार्यकर्ते सक्रीय आहेत. सोशल मिडियावर भाजप कार्यकर्त्यांकडून निलेश राणेंच्या विविध पोस्ट केल्या जात आहेत.
-
Ayodhya news | अयोध्या नगरी धुक्यात हरवली
अयोध्येत तापमानाचा पारा घसरला 8 अंशावर. उत्तर भारतात थंडीचा कडाका. संपूर्ण अयोध्या नगरी धुक्यात हरवली.
-
Manoj jarange patil | सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगे यांची भेट
बच्चू कडू, संदीपान भुमरे आणि मंगेश चिवटे यांचा शिष्टमंडळात समावेश. विशेष विमानाने दुपारी शिष्टमंडळ येणार संभाजीनगर विमानतळावर. दुपारी अंतरवली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेणार. आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांना देणार फायनल ड्रफ्ट. मनोज जरांगे 20 तारखेला मुंबईला येण्याआधीच आरक्षणावर काढणार तोडगा. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी फायनल ड्रफ्ट घेऊन शिष्टमंडळ घेणार भेट.
-
वसईत काचेच्या मांज्यामुळे 11 वर्षाचा मुलगा गंभीररित्या जखमी
मोटारसायकलच्या पाठीमागील चाकात तुटलेला काचेचा मांज्या अडकला होता, आणि ती मोटारसायकल वेगात जाताना तो काचेचा मांज्या खेळत असणाऱ्या मुलाच्या पायाला घासला आणि यात मुलगा गंभीर जखमी झाला. मुलाचा पाय एवढा गंभीर रित्या कापला होता की त्याच्या पायाचे अक्षरशा ऑपरेशन करावे लागले आहे. सध्या मुलगा सुखरूप असून, ऑपरेशन यशस्वी झाले आहे
-
Pune | शरद मोहोळ हत्या प्रकरणात किती जणांना अटक?
शरद मोहोळ हत्या प्रकरणात एकूण 24 जणांवर पुणे पोलिसांची कारवाई सुरू. शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मध्यरात्री केली कारवाई. गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना घेतलं ताब्यात. पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली कारवाई. त्यांना आज कोर्टात हजर केलं जाणार.
-
Marathi News | सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत होम प्रदीपन सोहळा
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळा काल पार पडल्यानंतर आज होम प्रदीपन विधी होणार आहे. या होम प्रदिपन विधी सोहळ्यामध्ये बाजरीच्या पाच पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगल चिन्हाचा वापर करुन कुंभार कन्येचे रुप देण्यात येते. त्यानंतर मानकरी फळांचा वर्षाव करतात.
-
Marathi News | मंत्री गुलाबराव पाटील यांचा रिक्षेतून प्रवास
जळगावात रस्ता सुरक्षा कार्यक्रम मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शहरातील ७ गुलाबी रिक्षा महिला चालकांना तीळगुळ वाटप करत मकरसंक्रातीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम संपल्यानंतर महिला चालकांच्या एका गुलाबी रिक्षेतून पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोबत प्रवास केला.
-
Marathi News | मनसेच्या बॅनरवर प्रभू रामचंद्रांचे चित्र फडकले
अयोध्येत भगवान श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या प्रसंगामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचा बॅनर झळकाला सुरवात झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतर दहिसर विधानसभेत ”कारसेवकांच्या स्वप्नपूर्ती ” चे बॅनर झळकायला सुरवात झाली आहे.
-
Marathi News | आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन
कराड येथे आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात 11 देश सहभागी होणार आहेत.
Published On - Jan 16,2024 7:14 AM