Maharashtra Marathi Breaking News Live | मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट सांगणारा ‘संघर्ष योद्धा’
Maharashtra Breaking News in Marathi: आज 20 जानेवारी 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबई, दि.20 जानेवारी 2024 | अयोध्येत प्रायश्चित्त पूजनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारी सुरुवात झाली. आज पुष्पाधिवास होणार आहे. त्यानंतर २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होत असून तो दिवस मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी हिंदुमहासभेच्या वतीने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज सकाळी ९ वाजता मुंबईकडे निघणार आहे. त्यांच्या आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी ३ वाजता मराठा आरक्षणासंदर्भात ऑनलाईन बैठक बोलवली आहे. यासह राज्यातील आणि देशातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तसेच अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हे आदेश लागू केले आहेत.
-
रश्मिका मंडण्णाचा डीपफेक करणाऱ्या आरोपीला अटक
बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंडण्णा हिचा डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी पकडले. हा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
-
-
राम मंदिर बांधणे ही चांगली गोष्ट आहे, पण शिक्षणावरही काम व्हायला हवे : डिंपल यादव
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव म्हणाल्या की, राम मंदिर बांधले जात आहे हे चांगले आहे, पण आजही सरकारने जमिनीवर लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवायला हव्यात. तरुण बेरोजगार आहेत. शिक्षणाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही, समाजाची प्रगती व्हावी असे शासनाला वाटत असेल तर प्रत्येक गावात चांगले शिक्षण मिळावे यासाठी शासनाने काम केले पाहिजे.
-
लखनौमध्ये 18 मार्चपर्यंत कलम 144 लागू
लखनौमध्ये 18 मार्चपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. 22 जानेवारी आणि 26 जानेवारीच्या आगामी कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
उद्योगमंत्री उदय सामंत यांची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका
मुंबई : जागतिक आर्थिक परिषद २०२४ साठी आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला गेलो ते यशस्वी झाले. ३ लाख ७२ हजाराचे सामंजस्य करार आम्ही करू शकलो. अनेक कंपन्यांना आम्ही दावोसला जाण्यापूर्वीच जागा दिली आहे. नुसते आश्वासन देण्यासाठी किंवा थंड हवेसाठी आम्ही गेलो नाही. काही लोकं थंड हवेच्या ठिकाणी जाऊ न शकल्याने पोटशूळ उठलेले आहे अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
-
-
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांचा जीवनपट सांगणारा ‘संघर्ष योद्धा’
जालना, अंतरवाली सराटी : मनोज जरांगे मराठा समाज आरक्षण लढ्यामुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर चर्चेत आले. त्यांचे मोठ्या प्रमाणात फॅन आणि फ्लॉलोअर्स वाढले. आता जरांगे पाटील यांचा आरक्षण लढ्याचा संघर्ष आणि त्यांच्या जीवन पटावर आधारित सोनाई फिल्म क्रिएशन मराठी चित्रपट काढत आहे. या चित्रपटाचे नाव संघर्ष योद्धा असणार आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
-
कोणाला वाटते म्हणुन चौकशी होत नाही, शंभूराज देसाई
सातारा : देशभरात फक्त विरोधकांवरच ईडीच्या कारवाया का? एकाही सत्ताधाऱ्यांच्या नेत्यावर का नाही? मोदी ईडीचा वापर विरोधकांवर हत्यार सारखा करत आहेत. त्यामुळं आता कोर्टात जाणार असल्याचं शरद पवार म्हणालेत. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी ईडी स्वतंत्र संस्था आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करत असते. कोणाला वाटते म्हणुन चौकशी होत नाही असे म्हटले आहे.
-
गृहमंत्री फडणवीस चुकलं तर डिसमिस करतात – अजित पवार
पुणे : सहकारमध्ये राजकारण आले की कारखाना बंद होतो. खरोखरच दोषी असेल त्याला सजा मिळाली पाहिजे मग सत्ताधारी असो किंवा विरोधी. पोलिसांना खुलेपणाने काम करता आलं पाहिजे. कोणीही दबाव आणला नाही पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणी चुकलं तर निलंबित नव्हे तर डिसमिस करतात असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशनचे उदघाटन प्रसंगी काढले.
-
दावोस दौऱ्यात 35 कोटी रुपयांची उधळपट्टी, सुप्रिया सुळे यांचा आरोप
पुणे : दावोस दौऱ्यादरम्यान कष्ट करणाऱ्या जनतेच्या 35 कोटी रुपयांची उधळपट्टी केली गेली अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दावोस दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यासोबत करारावर सही केली आहे ते सज्जन जिंदल हे मुख्यमंत्री यांच्या घरापासून तीन मिनीटाच्या अंतरावर राहतात. तर, दुसरे गौतम अदानी हे दर आठवड्याला महाराष्ट्रात येतात. त्यामुळं त्यांच्यासोबत करार करायला दावोसला जाऊन 35 कोटी रुपयांची उधळपट्टी करायची गरज नव्हती असे त्या म्हणाल्या.
-
तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनकडून नवीन प्रजातींचा शोध
मुंबई : भारतीय द्वीपकल्पामधून, पिल्लाला जन्म देणार्या सापसुरळीच्या नव्या कुळाचा आणि पाच नवीन प्रजातींचा शोध तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनने लावला आहे. ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन’च्या संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आले आहे. पिल्लाला जन्म देणार्या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे.
-
जळगावातील जुने जळगाव परिसराचे अयोध्या जुने जळगाव नामकरण करण्याचा निर्णय
जळगावातील जुने जळगाव परिसराचे अयोध्या जुने जळगाव नामकरण करण्याचा रहिवासी नागरिकांचा निर्णय घेतला आहे. अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी घेतला अयोध्या नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जुने जळगाव परिसरात भगवे झेंडे, रांगोळ्यामुळे संपूर्ण वातावरण राममय झाले आहे. 22 जानेवारीला तब्बल 500 क्विंटलचे भरीत आणि 5100 क्विंटल बुंदीच्या लाडूचा महाप्रसादाच्या वाटपाचा होणार कार्यक्रम होणाार आहे.
-
कष्ट करणाऱ्या जनतेच्या 35 कोटी रुपयांची उधळपट्टी- सुप्रिया सुळे
दावोस दौऱ्यादरम्यान कष्ट करणाऱ्या जनतेच्या 35 कोटी रुपयांची उधळपट्टी केली गेलीय असं म्हणतं खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्याच्या दावोस दौऱ्यावरून जोरदार टीका केलीय.
-
मराठा आंदोलकांना एमआयएम पक्षातर्फे जाहीर पाठिंबा
मराठा आंदोलकांना एमआयएम पक्षातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. मराठा बांधवांसोबत मुस्लिम बांधवदेखील मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. एमआयएम पक्षाच्या वतीने आम्ही मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मोर्चात चालत निघालो आहोत. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. मराठा समाज हा बहुसंख्य असूनही त्यांच्यावर सरकारकडून अन्याय होत आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं MIM पक्ष अध्यक्ष सोलापूर फारूक यांनी म्हटलं आहे.
-
नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना मिळाला दिलासा
ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना मिळाला दिलासा मिळाला आहे. बडगुजर यांच्या अटकपूर्व जामीनावर पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. येत्या २२ आणि २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे येणार नाशिक दौऱ्यावर असणार आहेत.
-
जुहू बीचवर प्रभू श्रीरामांची उंच प्रतिकृती
मुंबईतील जुहू बीचवर महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड श्री रामाची व मंदिराची १२ फूट उंची प्रतिकृती बनवत आहेत. वाळूने भगवान श्री रामाची आणि नवीन मंदिर बनवण्याचे काम सुरु आहे, जवळपास मंदिर तयार आहे, हे मंदिर तयार होताच जुहू चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांसाठी ते आकर्षणाचे केंद्र ठरेल. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. सर्व प्रकारचे कलाकार प्रभू श्री रामाच्या आगमनाचा हा ऐतिहासिक क्षण आपल्या कलेच्या माध्यमातून सादर करत आहेत.
-
टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे
बारामतीतील शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस असून,यंदाच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना नव्यानेच व देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे.यात पोमॅटोची ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे.टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आलेय.. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे..या पिकाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत आहे.
-
अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केल्यास वाचेल कर
अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्यदिव्य मंदिर अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला ऑनलाईन दान केल्यास कराची बचत होऊ शकते.
-
मराठा समाजाचे आंदोलक मुंबईला रवाना
सोलापुरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मुबंईला रवाना होत आहेत. सोलापुरातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. सकल मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी एकवटले आहेत. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवरून मराठा आंदोलक मार्गस्थ झाले आहेत.
-
महिलांच्या मागे पतीदेव यायला लागले- शरद पवार
महिलांच्या मागे पतीदेव यायला लागले. नंतर त्यांना लक्षात आले आणि त्या स्वतः निर्णय घेऊ लागले, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. महाराष्ट्राने महिलांना आरक्षण दिले त्याची दाखल केंद्र सरकारने घेतली. त्यानंतर विविध राज्यात महिला आरक्षण दिले गेले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
-
वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ जातीचा कासव
वसई – वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ जातीचा कासव मृतावस्थेत आढळला आहे.आज शनिवारी समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांना हा कासव।मृतावस्थेत आढळून आला आहे. वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यानी त्याला ताब्यात घेऊन, त्याचा रीतसर किनाऱ्यावरच अंत्यविधी केला आहे.
-
पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील विस्तारित सेवा लवकरच सुरू होणार
पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील विस्तारित सेवा लवकरच सुरू होणार आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असून मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने मार्गाची तपासणी केली आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांच्याकडून या मार्गाची अंतिम तपासणी सुरू आहे. या तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळेल. तपासणी २२ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या मार्गावर सेवा सुरू करण्यास अंतिम मंजुरी देण्याचा निर्णय होणार आहे.
-
विजय वडेट्टीवार यांचा मोदींवर जोरदार घणाघात
काँग्रेसच्या नागपूर विभागीय आढावा बैठकीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघात. ही मोदींची शेवटजी निवडणूक आहे, त्यामुळे ते राम राम करत आहेत, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
-
शरद पवार यांनी केले मोठे भाष्य
सोलापूर ही महान व्यक्तिमत्वांची नगरी आहे. इथे अनेक कर्तृत्ववान व्यक्ति जन्माला आले. देशातील पहिले विमान कंपनी काढणारे व्यक्ति सोलापूरचे होते,असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
-
…म्हणून मी ॲडव्हान्टेज विदर्भ आयोजित केले – नितीन गडकरी
मी नागपुरात राहतो म्हणून मला अनेकदा विदर्भातील लोक विचारतात की तुम्ही फक्त नागपूर पुरते काम करता. म्हणून यावेळी ॲडव्हान्टेज विदर्भ आयोजित केलं आहे असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
-
फेब्रुवारी अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होणार – संजय शिरसाट
मराठा आंदोलनकर्त्यांनी इतर लोक त्यांच्या आंदोलनाचा फायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मराठ्यांना फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात आरक्षण मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत चिंता करु नये असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
-
जरांगे यांच्या आंदोलनावर बावनकुळे यांची आळीमिळी गुपचिळी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे धुळे शहराच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जरांगे पाटील यांच्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.
-
जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधणार
जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी बच्चू कडू यांच्या संपर्कात आहेत. जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येऊ नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अशी विनंती सरकारकडून जरांगे पाटील यांना केली जाणार आहे. गिरीश महाजन, उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि इतर नेत्यांचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची मुंबईत येण्यापूर्वीच भेट देखील घेणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
-
जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये
जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर आज दुपारी तीन वाजता सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भातली इत्यंभूत माहिती मुख्यमंत्री घेणार असल्याचं कळतंय. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना जरांगे पाटील घेत असलेली भूमिका ही टोकाची असल्याचं सरकारचं मत आहे.
-
सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकचं दुसरं लग्न
टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. या चर्चांदरम्यान आता शोएबने थेट दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला आहे. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. वाचा सविस्तर..
-
Maratha Morcha : मराठा आरक्षणाचा प्रश्न 85 ते 90 टक्के सुटला आहे- शंभूराज देसाई
मराठा आरक्षणाचा प्रश्न 85 ते 90 टक्के सुटला आहे त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि कायमस्वरूपी टिकणारा तोडगा काढला जातोय असं शंभूराज देसाई म्हणाले.
-
Maratha Morcha : ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कुठलाही वाद नाही- मनोज जरांगे
मनोज जरांगे पाचील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने पायी निघाले आहेत. त्यांच्यासोबत लाखो मराठा बांधव सामिल झालेले आहेत. मराठा आणि ओबीसी एकत्र आहेत आमच्यात कोणतेही वाद नाहित असं मनोज जरांगे म्हणाले.
-
Maratha Morcha : 26 जानेवारीनंतर मुंबईच्या गल्लो गल्लीत मराठा दिसतील
मनोज जरांगे यांचा मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे. 26 जानेवारीपर्यंत मुंबईत तीन कोटींपेक्षा जास्त मराठा मुंबईत एकत्र येतील. जगाने कधीच न बघितलेली एकजुट पाहायला मिळणार आहे. मुंबईत गल्लो गल्लीत फक्त मराठाच दिसतील असं मनोज जरांगे म्हणाले.
-
Manoj Jarange : मला कुठलाही दिखावा करायचा नाही- मनोज जरांगे
आम्ही मराठा आरक्षण घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. नियोजनानुसार मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. लाखो मराठा बांधव या मोर्चामध्ये सामिल झालेले आहेत. मला कुठलाच दिखावा करायचा नाही असं मनोज जरांगे म्हणाले.
-
Ayodhya : आजपासून अयोध्येतील रेल्वे सेवा रद्द
सुरक्षेच्या कारणास्तव आजपासून अयोध्येतील रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. महाष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांना लखनौ आणि सूलतानपूरला उतरावे लागणार आहे.
-
Manoj Jarange : अंतरवाली सराटीतील मुख्य रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त
अंतरवाली सराटीतील मुख्य रस्त्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. जरांगेंच्या पायी मोर्चाला सुरूवात झाली आहे. आजच्या उपोषणाला समाजाला विचारून निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
-
मनोज जरांगे अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने रवाना
मनोज जरांगे पाटील अंतरवाली येथून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईत जरांगे यांचं आमरण उपोषण. अंतरवाली सराटीतील मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
कोल्हापूर – पालकमंत्री हसन मुश्रीफ करणार अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता
कोल्हापूर – पालकमंत्री हसन मुश्रीफ अंबाबाई मंदिर परिसराची स्वच्छता करणार . अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाच्या पार्श्वभूमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना मंदिर स्वच्छतेचं आवाहन केलं. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हसन मुश्रीफ यांची अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम.
-
नागपूर – मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून आढावा
नागपूर – मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षण संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाकडून आढावा. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. दिलेल्या मुदतीतच, 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या.
-
रत्नागिरी – ठाकरे गटाच्या युवासेनेच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल
रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाचे युवासेनेचे जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजन साळवींवर ACB कारवाई सुरू असताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप मोरेंवर आहे . त्यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
-
प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याचा विचार पक्का – शरद पवार
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांना इंडिया आघाडीत घेण्याचा विचार पक्का आहे असं शरद पवार म्हणाले.
48 जागांपैकी ठिकाणी 35 जागांवर एकमत आहे. बाकीच्याबाबत चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
-
सरकार ईडीचं हत्यार वापरतंय – शरद पवार
सोलापूर – सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे , सरकार ईडीचं हत्यार वापरत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला.
रोहित पवार यांना एकट्यालाच नव्ह तर सर्वच नेत्यांना ईडीचा धाक दाखवला जातोय. अनिल देशमुख, संजय राऊत यांनाही जेलमध्ये टाकलं, पण कोर्टाने चार्जशीट पाहून मुक्तता केली.
-
सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका गुन्ह्यात बडगुजर यांनी जामीनासाठी अर्ज केलाय. आपल्या पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरवातीला या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन मिळाला होता. २२ आणि २३ तारखेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बडगुजर प्रकरणी न्यायालयात होणारी सुनावणी महत्त्वाची आहे.
-
महापुराचा नागपूर महापालिकडून धसका
नागपुरात मागील वर्षी झालेल्या महापुराचा नागपूर महापालिकेने धसका घेतला आहे. यावर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून आतापासूनच सुरू नाले सफाई केली आहे. नागपुरातील तिन्ही नद्यांची सफाई करत गाळ काढला जाणार आहे. नदी नाल्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला जाणार आहे. महापालिकेने यासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या जात आहेत.
-
नाशिकमध्ये भाजपा आणि ठाकरे गटात बॅनरवॉर
नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात भाजपा आणि ठाकरे गटात बॅनरवॉर रंगलं आहे. येत्या २२ जानेवारी अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने काळाराम मंदिर परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळतेय. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपाकडून शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत. तर ठाकरे गटाने लावले उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘एक रावण को श्री राम ने मारा, हुकुमशाही के रावण को हम सब मारेंगे’ असा ठाकरे गटाच्या बॅनरवर उल्लेख आहे.
-
मोर्चा निघण्यआधी मराठा बांधवांची प्रतिक्रिया काय?
मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी ते मुंबई पदयात्रेला आजपासून सुरुवात होत आहे. बीडमधून हजारो मराठा बांधव आंतरवलीकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजीराजांना अभिवादन करून हजारो मराठे पदयात्रेसाठी निघाले आहेत. आरक्षण घेवूनच आम्ही परतू असा विश्वास मराठा बांधवांनी यावेळी बोलून व्यक्त केला आहे.
-
Pune news | गॅस गळतीमुळे आकुर्डीत भंगारच्या दुकानाला आग, चार जण जखमी
आकुर्डी गावठाण येथे एका भंगारच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित वायसीएममध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. ही आग स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
-
Maratha Reservation | मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून प्रशिक्षण
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटला सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम देण्यात आले होते. आज गोखले इन्स्टिट्यूटचे मास्टर ट्रेनर्स अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतील. पुढे पर्यवेक्षक म्हणून अधिकारी काम पाहतील. उद्या आणि परवा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच प्रगणक यांना अधिकारी प्रशिक्षण देतील.
-
Manoj jarange patil | मनोज जरांगे पाटील उपोषणाला कुठून सुरुवात करणार?
आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईला यायला निघणार आहेत. अंतरवली या ठिकाणापासून मी आमरण उपोषण करणार आहे, असं त्यांनी म्हटलय. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान केला होता असं ते म्हणाले.
-
Marathi News | उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर
उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहे. येत्या २२ आणि २३ जानेवारी रोजी ते नाशिकमध्ये येतील. २२ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात घेणार दर्शन घेणार आहे. त्यानंतर गोदावरी किनारी आरती करणार आहे. २३ जानेवारी रोजी ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये होणार आहे.
-
Marathi News | मनोज जरांगे यांची मुंबईकडे कूच
मराठा समाजाला ओबीसीमधून आणि सरसकट आरक्षण मिळावे यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. 54 लाख कुणबी जात प्रमाणपत्रा बाबत तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील आज सकाळी नऊ वाजता मुबंईकडे निघणार आहेत.
-
Marathi News | मराठा आरक्षणासाठी आज बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक आज बोलवली आहे. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. व्हिसीद्वारे त्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
-
Marathi News | २२ जानेवारी मर्यादा पुरुषोत्तम दिन जाहीर करा
अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होत असून तो दिवस मर्यादा पुरुषोत्तम दिन म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी हिंदुमहासभेच्या वतीने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आणि केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत हिंदु महासभेचे राष्ट्रीय नेते दिनेश भोगले यांनी सांगितले की, हिंदू महासभेच्या वतीने, तत्कालीन फैजाबाद जिल्हाध्यक्ष स्वर्गीय ठाकुर गोपालसिंह विशारद यांनी रामलल्लाच्या दर्शन, पूजेचा अधिकार मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयात (३/१९५०) वादपत्र प्रस्तुत करुन न्यायालयीन लढा सुरु केला होता.
Published On - Jan 20,2024 7:14 AM